कडव्याच्या पहील्या दोन ओळीत समस्या आणि नंतरच्या दोन ओळीत पूर्ती असं लिहून पाहीलं आहे.एक प्रयोग.
जर टोचते पाठीला
जर बोचते दंडाला
खसखसूनी घासावी जर
मऊ लागते अंगाला.
***
निर्या काचती पोटाला
जीव कासावीस होई
एका धुण्यामधी कशी
खळ जाईल ग बाई.
***
असं कसं पायताण
चावे जागोजाग बाई
थेंब तेलाचा सोडावा
अंगठ्याला सैल जाई.
***
प्रतिक्रिया
17 Sep 2008 - 12:20 am | प्राजु
आवडला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Sep 2008 - 1:01 am | फटू
एक अभिनव आणि छान प्रयोग !!!
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
17 Sep 2008 - 11:15 am | दत्ता काळे
मस्त आहे
17 Sep 2008 - 5:14 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
एकदम क्रिप्टिक. बहुसंख्य लोकांना न कळ्णारे. मी जे वाचत आहे त्यात मला मास्टर आणि जॉन्सन दिसत आहे. चुकत असेल तर सांगा. तुम्ही धन्य आहात्.धंदा बदला. आता मिळ्वता त्यापेक्षा भरपुर पैसे मिळवाल. शब्द्प्रभु आहात हे मला माहित आहे. त्यामुळे कमीत कमी चौकशी झाली तर पुर्ण खुलासा अपेक्षित आहे.
आपला वि.प्र.
23 Sep 2008 - 7:39 pm | लिखाळ
आपण महान आहात.
इकडे जर, तिकडे कसणे..मस्त आहे.
--लिखाळ.