( स्वच्छ मन या लँडमार्क लेखाचा स्वैर अनुवाद. )
मी ओंफ्फसमधुन घेरीत जात होतो. पुढे काही आंतरावर मेंदू ज्याम होणार होता. मी माझ्या बायकोचा वेग कमी केला आणि तिला सोफ्यावर थांबवली. तशी त्या ज्याम मधून प्रत्येकजण बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागला.
बॉडीचा आवाज, आतल्या गर्दीचा आवाज येत होता. तिथे जवळच एका म्हशीच्या ॐ चा आवाज येत होता. मी विचार केला, आयला, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. मला प्रत्येक आवाज काय सांगतोय ते जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यावेळी अनेक आवाज कानात घुमत होते.
शेवटी मी त्या मेंदू-ज्याम मधून बाहेर पडलो व त्या विचारात असल्याने सहजच माझं लक्ष नेहेमीच्या बेडवरील उशीकडे गेलं. मग माझ्या मनात विचार आला लोक उशीवर डोकं ठेवून कसं करु शकतात- नामस्मरण? कारण उशी तर डबल लागते. मनात मला उशीचाही अभ्यास करावासा वाटला. मी काही वेळातच घेरीत गेलो तर समोर मामाचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो. कारण मामानेच माझ्यासमोर मामीगीता वाचली होती.
आता मला बारबाला आणि मदनिका बघण्याची इच्छा झाली.
बायको माघारी झाली होती. (वैचारिक माणसाला बायको माघारी असो की समोरी काही फरक पडत नाही). मी कपडे घालून चेहरा धुण्यासाठी बेसवॉंशकडे गेलो. चेहरा धुण्याआगोदर एक नज़र चेहरा आरश्यात पाहिला. आज माझा चेहरा वेगळाच दिसत होता.
त्या चेहर्यात मला आईबाबा दिसत होते. मला जाणवले हे तर आईबाबाच आहेत. ते डॅडी, ती मम्मी सारे काही मी आईबाबाच असल्याचे सांगत होते. मग मीच डोळे मिटवले आणि डोके आरश्याला टेकवले.
मी विचार करत होतो, आईबाबा नको त्या वेळी का आले? काय तो भ्रम होता की काही कारण होते?
मग सगळ्यात त्रासदायक प्रश्न होता की असे मला का वाटावे? का मी भारतातील नवीन संता किंवा बंता बनणार आहे का?
मग मला वाटू लागले, ‘ भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संता-बंताची गरज आहे. काय मी त्यासाठी लायक आहे?'
आणि मी आपले डोळे हाळुहाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहू लागलो. आता तो आईबाबाचा चेहरा दिसत नव्हता. मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा ऐषारामबापूसारखा तर आहे. डोळे, ओठ, कान व दाढी.
मग मी ऐषारामबापू विषयी वाचण्यास सुरवात केली. त्यावरुन मनात विचार आला की, ऐषारामबापूना कोणताही धरबंध नव्हता, त्याच्याकडे सर्व वयाचे लोक येत आसत, आणि त्याच्या बंदिवासात आजुन ही येतात. ते म्हणत 'सब माल एक जैसा है,'
रात्री खुप उशीरा मी झोपलो. दुसर्या दिवशी रविवार होता. (आणि मला नुसता विचार करण्याशिवाय इतर उद्योग नव्हता) त्यामुळे काही वाटले नाही.
रात्री मला एक स्वप्न पडले. स्वत:च्या घोड्यावर हात फिरवत ऐषारामबापू उभे आहेत. त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्या चुकलेल्या घोडीची कथा आठवली. व मला तोच हा घोडा आसेल वाटले.
मी स्वप्नात पाहिले की तो घोडा ऐषारामबापूपासून दुर जात आहे, व तो काही अतंरावर उभा राहुन बापूना पाहत आहे.
ऐषारामबाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत, पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे, मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक बायांचे वादंग निर्माण होऊ लागते. आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो.
अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही ऐषारामबाबा नव्हते की, ते बायांचे वादंग नव्हते. पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता. आचानक मी उठलो व डोळे उघडले, खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता. मी खिडकी जवळ गेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या ऐषारामबाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय पोलिसांच्या चापात आडकलेला होता. त्याच्या पायातुन आता काही वाहू शकत नव्हते. जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या. त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते.
मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग मीच विचार केला की, 'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो. पण नाही, मला तसे करताना कोणि पाहीले तर?त्या घोड्याचा मालक कावला तर? मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?
लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांगु? आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न करत आसेल तर त्याच्यामागे सुद्धा लोक घोडा घेऊन उभे आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,'
पण माझ्या डोक्यात विचार आला, ऐषारामबाबानी जर आसा विचार केला आसता तर मालाची वाहातुक झाली नसती.
मग मीच विचार केला, 'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही गेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार. माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लागले. म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लागलो, चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला.
मी खिडकीतुन पाहिले तर एका च्याबूक आसलेल्या घोडीने मालकाला लिलावात काढले होते. मग मला समाधान वाटले. मग मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात ऐषारामबाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला
'तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड.'
*बोंब झाली बाबा*
प्रतिक्रिया
14 Nov 2013 - 12:42 pm | कपिलमुनी
आवडेश !!!
14 Nov 2013 - 12:43 pm | दिपक.कुवेत
संक्षी पार तोडलत हो.......हसुन हसुन खिंकाळतोय....आपलं किंकाळतोय. बायकोचा वेग काय, बायांचे वादंग काय......नि:शब्द झालोय!
14 Nov 2013 - 12:49 pm | बॅटमॅन
उत्तम लेख. उपदेशांचे एरंडेल न पाजणारा अन निखळ मणोरञ्जण करणारा म्हणून विशेष आवडला.
14 Nov 2013 - 1:20 pm | अत्रुप्त आत्मा
14 Nov 2013 - 12:49 pm | विटेकर
सं क्षी..
मजा आली...
14 Nov 2013 - 1:09 pm | शैलेन्द्र
_/\_
14 Nov 2013 - 1:23 pm | साळसकर
'सब माल एक जैसा है
:))
14 Nov 2013 - 1:59 pm | mohite jeevan
बहुतेक 'स्वच्छ मन' कथेने तुमच्या मेंदुवर चाग़लाच परिणाम झालेला दिसतो.... आसो लिहीत रहा ...... स्वच्छ मन कथेकडे आपण खुप वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
14 Nov 2013 - 2:10 pm | अग्निकोल्हा
मजा आली... यापुढेआपण कोणतेहि लेखन करण्यापूर्वी स्वच्छ मन कथा पुन्हा पुन्हा वाचावी हीच प्रार्थना
14 Nov 2013 - 4:05 pm | कवितानागेश
गमतीदार. :)
वाचताना या कथेची आठवण झाली.
14 Nov 2013 - 4:33 pm | जेपी
घ्या फाईव स्टार देतोय , चॉकलेट नाही आमची रँकींग देण्याची पध्दत आहे .आवडल हे वेगळ सागायची गरज नाही .
भावी संपादक - तथास्तु
=)) =))
14 Nov 2013 - 4:39 pm | जेनी...
संजय ़काका भारी झालाय लेख .
भावी संपादिका - पूजा प.
=))
14 Nov 2013 - 5:36 pm | साती
लेख चांगला जमलाय पण अशुद्धलेखन जमलेले नाही.
:)
विशेषतः कंसातली वाक्ये चांगलीच शुद्ध आहेत.
अजून जीवनरावांची उंची गाठायला खूप प्रयत्न करावा लागेल.
कुणीतरी म्हटलेच आहे "नाही अशुद्ध भाषण कसे जमेल लेखन"
14 Nov 2013 - 5:55 pm | अधिराज
झक्कास!
14 Nov 2013 - 5:55 pm | हरवलेला
'सब माल एक जैसा है,'
तुमच्या हाताला हाड नाही !
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
14 Nov 2013 - 6:14 pm | प्यारे१
संक्षी विडंबन(च) छान लिहीतात. :)
14 Nov 2013 - 10:15 pm | यसवायजी
:D मी माझ्या बायकोचा वेग थांबवला :D
हे असलं वाचुन Risk ची आठवण झाली.
27 Nov 2013 - 1:54 pm | संजय क्षीरसागर
धन्यवाद!
27 Nov 2013 - 2:58 pm | अनिरुद्ध प
आपल्या स्वाक्षरी प्रमाणेच लिहीलेला लेख.
24 Jan 2014 - 4:19 pm | तिमा
वाचायचाच राहिला होता. आज वाचला. पण खरं मत सांगू? ओरिजिनल ते ओरिजिनल. त्याची सर कुणाला येणार नाही. ये घोडा डुप्लिकेट लगता हय!
24 Jan 2014 - 7:57 pm | शशिकांत ओक
झक्कास...