मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली.
तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते.
शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले.
मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,'
मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती,
आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली.
बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता.
त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,'
मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,'
मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,'
मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,'
आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी.
मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,'
रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही.
रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले.
मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे.
साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो.
अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,'
पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला.
मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले.
मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला
,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.'
*ओम साई बाबा*
प्रतिक्रिया
10 Nov 2013 - 5:25 pm | मुक्त विहारि
ढ्यांट ट ढ्यांट
आता लेख वाचतो....
(फॅन ऑफ जीवन भाउ) मुवि
11 Nov 2013 - 4:14 am | स्पंदना
काय? काल रात्रीच पाह्यली अन वाचली होती. पण जीवन्रावांच्या लेखाचा पहिला प्रतिसाद तुमचा ही परंपरा राखायची म्हणुन गप्प बसले.
11 Nov 2013 - 8:45 am | मुक्त विहारि
धन्यवाद...
12 Nov 2013 - 5:22 pm | शैलेन्द्र
"काल रात्रीच पाह्यली"
हे ठिकाय पण
"अन वाचली होती"
:)
12 Nov 2013 - 9:41 am | इरसाल
एक विनंती(नम्र)
पुढ च्या वेळेस मला पहिला प्रतिसाद देता यावा यास्तव आपण मला मदत कराल.
10 Nov 2013 - 5:27 pm | जेपी
शुद्धलेखनात सुधारणा , एक पण आगाऊ प्रतिसाद(आतापर्यंत ) नाही . साईची क्रुपा का ?
=))
10 Nov 2013 - 5:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
भगवान mohite jeevan, ____/\____
10 Nov 2013 - 6:54 pm | mohite jeevan
धन्यवाद
12 Nov 2013 - 8:57 pm | यसवायजी
लायक आहे म्हणजे? अरे आहेच..वादच नाही. कोण न्हाई म्हंतय बघतुच म्या. १ च फाईट वातावरण टाईट करुन टाकू.हाकानाका?
जीवनभौ आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..
---------
शिरियस्ली.. जाहीर पाठींबा कोंकोण देनार?
---------
10 Nov 2013 - 7:01 pm | प्यारे१
हे काय आहे? :(
10 Nov 2013 - 7:18 pm | mohite jeevan
?
10 Nov 2013 - 7:44 pm | शिद
.
10 Nov 2013 - 7:06 pm | निवेदिता-ताई
छान
10 Nov 2013 - 8:17 pm | बॅटमॅन
मनासारखा राजा, राजासारखं मन!! जीवणभौ तुमच्यासाठी कायपण!!! म्हागाई वाहाडली तरीपण!!
12 Nov 2013 - 5:22 pm | हरवलेला
होऊ दे खर्च !!!
19 Nov 2013 - 4:55 pm | देवांग
होऊ दे खर्च !!! नाही …तर आली जीवनला लहर आणि केला साई बाबाची गोष्ट लिहून कहर … पृथ्वी गोल आहे कारण जीवन भाईचे विचार खोल आहेत ….
10 Nov 2013 - 8:50 pm | मनीषा
म्हणजे तो घोड्याचा मालक देव होता, असं का ?
की त्याला त्या वेळी तिथे येण्याची बुद्धी देणारा देव?
का त्या घोड्याला वाचवायला पाहिजे असे त्याला सूचविणारी बुद्धी म्हणजेच देव?
काही कळत नाहीये
ओम साई राम ||
10 Nov 2013 - 9:18 pm | mohite jeevan
मनिषाजी तुम्हाला जे चांगले सुचले ते देव
10 Nov 2013 - 9:30 pm | जेपी
कायपणा मना जीवनभाऊच्या सयंमाच कौतुका आहे आमाला .
कौतीक ठाले तथास्तु
10 Nov 2013 - 10:34 pm | चावटमेला
आख्खया मिपाचा दावा आहे, जीवनभौ छावा आहे
11 Nov 2013 - 1:08 am | आदूबाळ
हा लेख वाचून ¨बेसवाँश¨ वर ताँड धुवून आलो...
11 Nov 2013 - 1:21 am | बॅटमॅन
आम्हीपण!!! बेसवाँशवर तोंड धुतल्यावर मग़ वॉचबे पाहिले अंमळ ;)
(उपसागर-निरीक्षक प्रेमी) बॅटमॅन.
11 Nov 2013 - 1:22 am | कवितानागेश
स्वच्छ धुतलं का?
आता क्राँसवर लक्ष द्या.
येशू दिसेल.
साईबाबा दिसणार नाहीत.
त्यासाठी आरशात पहावं लागतं..
12 Nov 2013 - 5:16 pm | यसवायजी
:D
(हे 'गारवा' च्या चालीत वाचायचं हां)..
ताँड स्वच्छ धुऊन घे.. क्रॉसकडे बघ.. येशू दिसणार नाही..
तु संत नाहीस हे लक्षात ठेव..आता आरशात पहा..
चप्पल, पँट, घोडा सSगळं विसरुन जा..
बघ साईबाबा दिसतात का..
(आजीवन-जीवन-पंखा..)
11 Nov 2013 - 1:19 am | संजय क्षीरसागर
असंबद्ध कल्पना उमटत जाणं मनाच्या सैरभैर अवस्थेचं लक्षण आहे. ते लेखनातून प्रकट होतयं. वेळीच सावरा.
11 Nov 2013 - 1:22 am | बॅटमॅन
हे आले जज्ज!!!! एक तरी धाग़ा धड सोडला तर शपथ =))
(संक्षीफ्यान) बॅटमॅन.
11 Nov 2013 - 2:08 am | अत्रुप्त आत्मा
=))
हा वड तो वड झपाटतो वडं अचाटं प्रतिसाद हवे
विळ्या भो-पळ्या वैरात केवळ नाते शोधू नवे।
=))
11 Nov 2013 - 5:37 am | mohite jeevan
सल्ले देणारे खुप आसतात....... त्यातला तुमचा एक ... धन्यवाद
11 Nov 2013 - 9:59 am | संजय क्षीरसागर
मागे एक सदस्य असंच अनर्गल लिहीत असे. पब्लिक त्याच्या लेखनात गहन अर्थ असल्यासारखे प्रतिसाद द्यायचं. आणि माझ्या प्रत्येक लेखावर कंपू येऊन धडकायचा.
वास्तविकात स्वच्छ मन म्हणजे क्लॅरिटी - समोर आहे ते सुस्पष्ट दिसणं आणि आजूबाजूला चाललेलं व्यवस्थित ऐकू येणं. याला कृष्णमूर्ती That which is म्हणतात. ती मनाची शांत आणि स्थिर अवस्था आहे. या उप्पर तुमची मर्जी.
11 Nov 2013 - 10:43 am | mohite jeevan
साहेब,तुमचा सल्ला चांगला आहे ...... धन्यवाद.
19 Nov 2013 - 4:59 pm | देवांग
खी खी खी :प
11 Nov 2013 - 7:02 pm | दिपक.कुवेत
वाचायचीच राहिली. बहुतेक माझ्या स्व्च्छ मनाला दिसलीच नसेल! आजपासुन मी पण बेसवाँश मध्ये धुवुन आरशात पाहणार (चेहरा!). कथा डिट्टेल कशी लिहावि ह्याचं उत्तम उदाहरण......."म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व ....."
जीवनभौ अहो खाली जाताना तुम्हि काय काय घालता निदान ते तरी वगळत चला हो. बाकि कथा मनाला भीडली. शी बॉ आपल्याला असं कधी (च) लिहिता येणार नाय ह्याचा प्रचंड न्युनगंड आलाय!
12 Nov 2013 - 5:56 am | mohite jeevan
दिपकराव धन्यवाद..........
12 Nov 2013 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा
@जीवनभौ अहो खाली जाताना तुम्हि काय काय घालता निदान ते तरी वगळत चला हो>>> =)) ह्या ह्या ह्या =))
पूर्णपणे वारल्या गेलो आहे! =))
12 Nov 2013 - 9:10 am | अग्निकोल्हा
परंतु ही कथा मात्र नो स्मोकिंग बघून लिहली काय असा संशय आहे.
12 Nov 2013 - 10:16 am | mohite jeevan
नो स्मोकिग़ हे काय आहे?मुव्ही का?
12 Nov 2013 - 4:36 pm | अग्निकोल्हा
थोटचा शॉट देणारा चित्रपट.
श्हाण्याना आवडात नाय, येड्यान्ना समजत नाय... ना मला आवडला ना समजला...
एका कोलसेंटर मधे फक्त बुरखा घातलेल्या स्त्रियाच फोन घेत असतात /काम करत असतात असा प्रसंग आहे. त्यामधून सरकार कसे अल्पसंख्यांकाना हाताशी धरून जनतेला वेठीस धरते हे सिम्बोलिक्पने दाखवायचे होते असे अनुराग म्हणाला होता.(या नंतर आमची काय अवस्था जाली असेल समजू शकता, निम्या लोकांनी वेडाचा झटका येउ नये म्हणून चित्रपट मध्यात सोडला होता अन आम्ही मात्र झटका आलाहोता म्हणून बघायला गेलो होतो)
असा प्रत्येक प्रत्येक प्रसंग सिम्बोलिक बनवलेला व् देर इज नो एस्केप असा संदेश देणारा हा चित्रपट आहे.
12 Nov 2013 - 5:13 pm | कपिलमुनी
अजूनही तो प्रसंग आठवला की मनात धडकी भरते ...हात पाय थर थर कापतात ..
त्या रातीच्या काळ्याकुट्ट आठवणी ....
मला तर काहीच कळत नव्हता ...
मोरपिसे वले बाबा .. लिंबू वाले भगत ..आणि पिचू वाले वैद्य
यांनी एकत्र उपाय केले तेव्हा जरा नॉर्मलला आलो होतो ..
कोणावर सूड घ्यायचा असेल तर "तो" पिक्चर दाखवा ..
13 Nov 2013 - 10:11 am | अनुप ढेरे
मला तर बब्वॉ आवडला होता. पहिला हाफ विशेषतः
12 Nov 2013 - 10:00 am | उदय के'सागर
डोळे पाणावले....
बाकी कथा वाचून माहेरच्या साडी सिनेमातील किशोरी शहाणेची आठवण झाली...
14 Nov 2013 - 4:45 pm | धन्या
माहेरची साडी सिनेमात किशोरी शहाणे होती?
12 Nov 2013 - 10:17 am | mohite jeevan
धन्यवाद
12 Nov 2013 - 2:17 pm | विजुभाऊ
माहेरच्या साडीत किशोरी शहाणे???????? तुम्हाला अलका कुबल म्हणायचे आहे का? किशोरी शहाणे त्यावेळेस मराठी चित्रपटातून बाहेर पडली होती
12 Nov 2013 - 2:30 pm | दिपक.कुवेत
होती कि......अजिंक्यची आयटम होती! "काल सपना मधी माझा सजणा गं माही पप्पी घेउन गेला" हे गाणं पण तिच्यावर चित्रित झालेलं.
12 Nov 2013 - 2:32 pm | साती
माझा जीवनसाहेबांच्या साहित्यसंपदेशी फारसा परिचय नाही त्यामुळे ते नेहमी कसा विचार करतात माहिती नाही.
पण वरिल लेखात उल्लेखलेल्या विचारांचा संबंध बायको माहेरी गेलेली असणे या गोष्टीशी आहे का?
12 Nov 2013 - 2:47 pm | mohite jeevan
वैचारीक मानसाला बायको आसो किंवा माहेरी ग़ेलेली आसो काही फरक पडत नाही
12 Nov 2013 - 3:38 pm | विजुभाऊ
वैचारीक मानसाला बायको आसो किंवा माहेरी ग़ेलेली आसो काही फरक पडत नाही
तुम्हाला स्थितप्रज्ञ असे म्हणायचे आहे का?
पुलं च्या तुझे आहे तुजपाशी मध्ये स्थितप्रज्ञाबद्दल काकाजी काय बोलतात ते पहा.
12 Nov 2013 - 2:36 pm | दिपक.कुवेत
घोडयाची खिंकाळी कि किंकाळी?
12 Nov 2013 - 4:52 pm | बॅटमॅन
घोडा जो आवाज काढतो ती खिंकाळी. किंकाळी शक्यतोवर मानवी असते.
12 Nov 2013 - 5:24 pm | विजुभाऊ
यः खिं खिं करोति सः खिंकरः
ब्याटम्यानेन सह सहमतास्मि.
12 Nov 2013 - 5:58 pm | दिपक.कुवेत
आहे रे. जीवनभौचा घोडा किंकाळी मारतोय म्हणुन आपलं विचारलं
12 Nov 2013 - 6:47 pm | विजुभाऊ
दिपक तो घोडा
आवाज ऐकुन किंकाळतोय.
12 Nov 2013 - 7:26 pm | दिपक.कुवेत
घोडा आणि वार्याचे....ह्या मधे जरा स्पेस द्या हो. नको त्या वेलांट्या डोळ्यासमोर येउन हसुन हसुन वेड व्हायला होतं.
12 Nov 2013 - 2:45 pm | मनराव
"माझा आवडता पक्षी बदक" हा आंजावर फिरणारा निबंध आठवला......
12 Nov 2013 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
लोक गोविंदाचे चित्रपट का बघायला जातात? त्यामागे काहीतरी लॉजिक असेलच ना?
तसेच जीवनभौंच्या कथांचे...
12 Nov 2013 - 2:58 pm | चिम् चिम् मामा
kaay mhanayache aahe raav tumhaalaa?
Gaadi...Bike...Ghoda...!
Ase vaatale race laavaal aataa.. Pan tirech puncture zale ki ho.
12 Nov 2013 - 3:30 pm | आनन्दा
असे वाटते.. बाकी छान लिहिता.. लिहत जावा.
12 Nov 2013 - 4:46 pm | mohite jeevan
ठीक आहे आनन्दाभौ
12 Nov 2013 - 5:28 pm | शैलेन्द्र
"पृथ्वी गोल आहे, कारण भाऊंचा विचार खोल आहे"
धन्यवाद जिवनभौ..
12 Nov 2013 - 6:25 pm | हरवलेला
इतक्या कमी शब्दात "धर्मनिर्पेक्षता" समजावणारा लेखक विरळाच !
संपादकांना एक विनंती : एक नवीन लेखनप्रकार सुरु करा "जीवनकथा"
12 Nov 2013 - 7:15 pm | mohite jeevan
हरवलेलाभौ धन्यवाद.....
12 Nov 2013 - 7:20 pm | पिलीयन रायडर
मी घरी जायला निघाले होते..बसल्या जागी विचार केला की मि.पा पाहवे. मग मझ्या मनात विचार आला की जीवन भाऊंची कथा वाचावी. मग मी कथा पाहिली. मग माझ्या मनात विचार आला की मी आता प्रतिसांदाचा अभ्यास केला पाहिजे. मग मीच विचार केला की लोक काय म्हणतील. मग मी विचार केला की साईबाबांना काय वाटेल. विचार आला की येशुला वेदना होतील. मग मीच पुन्हा विचार केला.. का मी डोक्याच इत्कं दही करुन घेतलं..
मी बॅग घेऊन चालु लागले...
12 Nov 2013 - 7:32 pm | साती
तुला कुराणातील आयता, उद्याचा मोहर्रम, मशीदीतली बांग यांपैकी कशाचीच आठवण झाली नाही?
ठेव ती बॅग खाली आणि परत विचार कर.
12 Nov 2013 - 7:31 pm | दिपक.कुवेत
एवढ करुन कथा कळली कि नाहि? संक्षीप्त स्वरुपात.....नेहमी बेसवॉश वर तोंड धुवावे आणि मग चेहरा आरशात पहावा, खाली जाताना नेहमी पँट/चप्पल घालून जावे, येताना-जाताना आजुबाजुला नेहमी कुठला घोडा किंकाळि तर मारतनाहि ना हे पहावे, मारत असेल तर त्या मागचे कारण जाणुन घेउन त्यास (घोड्यास) मदत करणे, नवर्याला माहेरी (त्याच्या स्वःताच्या नव्हे) पाठवणे ई. ई.....
12 Nov 2013 - 8:30 pm | mohite jeevan
कथा न समझल्यास ....... उग़ाच विचार करत बसु नका
12 Nov 2013 - 9:12 pm | प्यारे१
ये बेष्ट हय!
काय ते तुमचं तुम्ही बघा, नका बघू किंवा कसंही.
उगा जीवाला तरास करुन घिऊ नगा!
कसं जीवन भो.
काडा चंची काडा. फुडच्या 'कथेचा' प्लॉट बनवू. ;)
12 Nov 2013 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा
@उग़ाच विचार करत बसु नका>>> खिक्क!!! :-D
12 Nov 2013 - 9:29 pm | सूड
काय्येक कळलं नाय..
13 Nov 2013 - 1:58 am | रामपुरी
सामंतकाकांची उणीव भरून काढणारा लेखक अखेर मिपाला लाभलाच म्हणायचा...
पु ले प्र
(अवांतरः चेसुगुंची उणीव भरून काढणारा लेखक अजून मिळालेला नाही. जन्मालाच आला नसावा बहुधा.)
13 Nov 2013 - 6:38 am | अत्रुप्त आत्मा
@जन्मालाच आला नसावा बहुधा>>> मुळातच चेसुगू ही साहित्य क्षेत्रातील एक भरीव उणीव आहे.
13 Nov 2013 - 9:18 am | शैलेन्द्र
वा!, शब्दांची रांगोळी
13 Nov 2013 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या...! =))
आणि कधी कधी रांगोळी, हेच शब्द! :-D
13 Nov 2013 - 12:48 pm | प्यारे१
चेतन सुभाष गुगळे असं पूर्ण नाव घ्या रे.
काय वाटत असेल त्यांना?.... चिंचवडात! ;)
13 Nov 2013 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा
=)) प्यारे..... तू.......!
(पुणे गेट कट्ट्या'ची अठवण झालेला) आत्मू =))
13 Nov 2013 - 5:07 am | पक्या
कथा बीज चांगले आहे. एखादे चांगले कार्य हातून घडत नसेल तरी (म्हणजे ते करण्यात अडचणी येत असल्या उदा. एखाद्याला मदत वगैरे ) निराश होऊ नये. दुसरयाचे भले करण्याचा विचार तरी आपल्या मनात आला हे ही नसे थोडके. नाहीतर हल्ली सगळी कडे असंवेदनशीलताच खूप दिसते. असे काहीसे लेखकाला सांगायचे आहे हे समजले. पण कथा नीट फुलवता आली नाही किंवा शब्दयोजना चांगली झाली नाही. त्यामुळे कथेचा प्रभाव वाचकांवर पडत नाहीये . शुध्दलेखनाकडे लक्ष दिल्यास आपले लिखाण वाचण्यास त्रास होणार नाही.
13 Nov 2013 - 12:01 pm | mohite jeevan
धन्यवाद जय महाराष्ट्र
13 Nov 2013 - 1:52 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही त्यांना डायरेक्ट "जय महाराष्ट्र" केलं!
13 Nov 2013 - 3:30 pm | mohite jeevan
आरे हो ...धन्यवाद पक्या
13 Nov 2013 - 9:42 am | सोत्रि
गोष्टीतला 'किंकाळ्या फोडणारा' घोडा वाचून हे आठवले.
- (मन स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
13 Nov 2013 - 8:03 pm | mohite jeevan
धन्यवाद
13 Nov 2013 - 10:23 pm | चित्रगुप्त
धन्यवाद.
च्यामारी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद वाचून मुळात काय प्रतिसाद देणार होतो, तेच विसरलो.
धन्यवाद.
14 Nov 2013 - 12:06 am | संजय क्षीरसागर
हा जीवनभौंचा फंडा आहे.
तुम्ही काहीही म्हणा, ते फक्त एकच म्हणणार : धन्यवाद!
चलो जीवनभौ, म्हणा पुन्हा एकदा ....
14 Nov 2013 - 7:03 am | mohite jeevan
आहो धन्यवाद म्हणायला समोरच्याची ही तशी लायकी लाग़ते........ उग़ाच कोणाला ही म्हणता येत नाही
14 Nov 2013 - 5:37 pm | हरवलेला
तुमचं चालू दे
14 Nov 2013 - 5:54 pm | mohite jeevan
चिडने चिडवने ह्या शब्दाशी खुप संबंध दिसतो तुमचा
14 Nov 2013 - 6:01 pm | हरवलेला
:(
14 Nov 2013 - 6:10 pm | mohite jeevan
चिडु नका हो भौ
14 Nov 2013 - 6:21 pm | हरवलेला
सहज विचारलं !
14 Nov 2013 - 3:32 am | बॅटमॅन
कुठे बेसवॉशवर का =)) =)) =))
13 Nov 2013 - 9:48 pm | आनन्दिता
जीवनभौ सारख्या जातिवंत लेखकाच्या प्रांजळ लेखकाची जुन्याजाणत्या लोकांनी अशी टर उडवलेली पाहुन एक मिपाकर म्हणून शरम वाटली.