नमस्कार मंडळी,
आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन.
प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच! आता पारड ह्याचं जड झालय!
तू आलीस त्याला सोडून
म्हणून मी जगायला लागलो
तू जवळ केलस मला मनापासून
म्हणून मी जवळ आलो
आता तुझ्यासोबतीने काय काय करायचं हे ठरवलं होतं
त्याचा माज उतरवयाचा हेच एक ध्येय होतं
मागेच हरवलेलं मन आता गवसलं होतं
तूझ्या मागे चंचल होउन भावविभोर झालं होतं
काय करायचय आयुष्यात ते आता आठवत होतं त्याप्रमाणे
मेंदू आता तल्लख होउन सगळ्या ऑर्डर पाठवत होता
नवनविन कल्पना उदयास येत होत्या आणि
तुझ्यारुपाने त्या मुर्त स्वरुपात येत होत्या
तु ह्सलीस कि मी हसायचो
आता तो रडेल आणि आपण ह्सायचं
त्याच्या डोळ्यातली आसवं आता मी बघणार आणि
आता तु माझीच आहेस हि जाणीव अधीकच मला सुखावणार
आता तो चिडला तरी आपण चीडायचं नाय
उलट त्याला अजुन चिडवायचं/पिडायचं
मुड आपला सदैव रोमॅन्टिक ठेवायचा
प्रेमाचा वर्षाव सतत एकदुसर्यावर करायचा
मी जरी कामात स्व:ताला जखडुन घेतलं
तरी प्रेमाच्या पाशाने तु मला ओढुन घे
भडकण्यार्या ज्वानीत, मदहोश कैफात,
स्वप्नील नजरांत आता आपण कायमचच गुंफून जाउ
हे सर्व बघुन कल्पना नाहि कि किती भेगा पडतील त्याच्या मनाला
खैर वो भी क्या याद रखेगा कि साला एक दोस्त एसा भी मीला था!
प्रतिक्रिया
12 Nov 2013 - 3:19 pm | अक्षया
वाह विडंबन छान जमलय.. :)
12 Nov 2013 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर
एकदा एक मंत्री महोदय वेड्यांच्या इस्पितळाला भेट द्यायला जातात.
एका खोलीत (सेल मध्ये) एक वेडा फार विमनस्क अवस्थेत उर्ध्व दिशेला डोळे फिरवून स्वतःशीच बडबडत असतो.
'कुठे गेलीस तू शेवंता, का गेलीस मला सोडून, येना पर शेवंता, मी जगू शकत नाही शेवंता, कुठे गेलीस तू शेवंता, कुठे गेलीस तू शेवंता....'
त्या मंत्र्याने सोबतच्या डॉक्टरला विचारलं, ' काय आहे ह्याची केस?'
डॉक्टर म्हणाले,' फार हृदयविदारक कथा आहे ह्याच्या आयुष्याची. ह्याचं शेवंता नांवाच्या एका सुंदर मुलीवर अपार प्रेम होतं. पण ती ह्याला सोडून दूसर्याचा हात धरून पळून गेली आणि त्याच्याशी शेवंताने लग्न केलं. तेंव्हा पासून हा बिचारा असा वेडा झाला आहे. शेवंता अजून परत येईल अशी त्याला आशा आहे.'
मंत्री महोदय - ' अरेरे! फार वाईट झालं. फार वाईट झालं.'
ते दुसर्या खोलीजवळ पोहोचतात तिथला वेडा फारच आक्रस्ताळेपणा करत असतो.
स्वतःचेच केस उपटत तो एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा गुरकावत असतो. 'हुंर्रर्रर्र... आआअर्रर्रर्र...हुंर्रर्रर्र...' त्याच्या डोळ्यातील हिंसकता कुणाही हिंमतवाल्याच्या मनाचाही थरकाप उडविणारी होती.
मंत्री महोदयही मनांतून घाबरले. चाचरत चाचरत त्यांनी डॉक्टरला विचारले 'अं..अं.. ह्याची...काय केस आहे?'
डॉक्टर शांतपणे म्हणाले, ' हाच तो, ज्याच्या बरोबर शेवंताने पळून जाऊन लग्न केलं.'
वडापाव आणि दिपक दोघांनाही शुभेच्छा.
12 Nov 2013 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा
=)) पेठकर काका.... =))
13 Nov 2013 - 12:06 am | प्यारे१
=) =) =)
14 Nov 2013 - 11:38 am | झंम्प्या
लय भारी...
13 Nov 2013 - 12:29 am | मुक्त विहारि
झक्कास
14 Nov 2013 - 11:29 am | दिपक.कुवेत
ऑलवेज रॉक्स! माझी आणि वडापावची परीस्थीती एका ज्योकमधे सांगून मोकळे!