अस्मादिकांना एलर्जी, हृदय आणि मणक्याचे दुखण्याचा त्रास असल्या मुळे मेट्रोत तास भर उभे राहून प्रवास करणे त्रासदायकच. म्हणतात न ‘जहाँ चाह, वहाँ राह’ बसायला सीट कशी मिळवावी या वर बरेच विचार मंथन केले. वय मोठ दिसाव म्हणून पांढऱ्या झालेल्या केसांना रंगविणे सोडून दिले.
मेट्रोत चढल्या बरोबर, सीट वर बसलेल्या लोकांचे निरीक्षण करतो. तरुण दिसत असलेल्या व्यक्ति जवळ उभे राहून विनम्र आवाजात ‘थोडी जगह मिलेगी क्या' म्हणून विचारतो. तरुण व्यक्ती सभ्य असल्यात पांढऱ्या केसां कडे पाहून थोडीशी जागा बसायला देतो. एकदा ‘बुड’ टेकवायला जागा मिळाली की डोळे बंद करून ‘चीन प्रमाणे हळू हळू संपूर्ण सीट गिळंकृत करण्याच्या प्रयास सुरु करतो. शेवटी तो सभ्य व्यक्ति त्रासून जागा सोडून उठून जातो. बसायला संपूर्ण जागा मिळते.
पण अधिकांश यात्री सभ्य नसतात, ते बसल्याबरोबर डोळे बंद करून झोपेचे नाटक करतात. या वर ही उपाय शोधला. (सकाळी उत्तम नगर पर्यंतचा रिक्षा करून रूट क्र. ७४० मधून सचिवालय पर्यंतचा प्रवास बसून करतो. त्या स्टेंड जवळ एक भिकारी ‘एक रुपये का सवाल है बाबा' म्हणत कित्येक वर्षांपासून भीक मागतो आहे, नेहमीचा असला तरी, त्याचा अत्यंत केविलवाणा चेहरा पाहून, त्याचा हातावर १-२ रुपये न कळत ठेवतोच.)
आपल्याला सीट देऊ शकेल असा सावज शोधून (शक्यतो ३०च्या आतला) मनातल्या मनात त्या भिकाऱ्याचा चेहरा डोळ्यांसमोर आणतो, व त्याचाच सारखा अत्यंत केविलवाणा दीनहीन चेहरा करत ‘सावजच्या’ समोर उभा राहतो व एका हात तोंडावर ठेऊन खोकला येत नसला तरी लक्षवेधण्या साठी खोकलण्याचे नाटक सुरु करतो. सीट वर बसलेल्या व्यक्तीला डोळे उघडावेच लागतात, आपल्या समोर उभ्या आलेल्या व्यक्तीची प्रकृती ठीक दिसत नाही हे पाहून, बहुधा त्याचा हृदयात दयेचा पाझर फुटतोच आणि मला बसायला जागा मिळतेच.
पण समजा असे घडले नाही, तरी ही खोकलण्यामुळे, खेटून उभ्या असलेल्यांना त्रास हा होतोच, त्यातला एखादा म्हणतोच ‘देखते नहीं अंकलजी को तकलीफ हो रही है’, बेचारा तो तरुण व्यक्ति मजबूरन आपली सीट सोडतो. सीट वर बसल्याक्षणी डोळे बंद करून झोपेचे नाटक सुरु करतो. उत्तम नगर आल्यावरच डोळे उघडतो.
पुष्कळदा मला वाटते माझ्यात आणि त्या भिकाऱ्यात काही ही फरक एवढाच तो पैश्याची भीक मागतो आणि मी सीटची.
प्रतिक्रिया
29 Oct 2013 - 7:22 pm | कपिलमुनी
निर्लज्ज व्हा
हा अभ्यासपूर्ण लेख वाचा..पुढील प्रवासास शुभेच्छा ..
( तुमचा लेख आवडला)
31 Oct 2013 - 1:35 pm | आदिजोशी
:)
31 Oct 2013 - 5:04 pm | नित्य नुतन
हे हे हे.. मस्त आयडिया ... :-) :-) :-)
31 Oct 2013 - 6:36 pm | देशपांडे विनायक
हृदयस्पर्शी लेख
मी सध्या झोपेची भीक मागत आहे
माझ्या फ्ल्याट वरील फ्ल्याट मध्ये गेले सहा महिने renovation चालू आहे
काम सुरु होण्यापूर्वी मालकीण बाई '' थोडा त्रास होईल '' असे सांगून गेल्या
सोसायटीच्या नियमानुसार दुपारी २ ते ४ काम बंद ठेवणे त्यांना जमेना म्हणून फोन केला तेंव्हा sorry म्हणाल्या . काही दिवसानंतर रात्रो काम बंद करण्याची वेळ जमेना म्हणून फोन केला तर म्हणाल्या '' अहो ते कामगार आमचेही ऐकत नाहीत . त्यांच्या पध्दतीने ते काम करतात ''
दोन दिवसापूर्वी रात्रो १२ वाजून ९ मिनिटांनी मी watchman ला बरोबर घेऊन कामगारांना बाहेर काढले
अर्ध्या तासात कामगार परत फ्ल्याट मध्ये गेले
मी watchman ला विचारले तेंव्हा तो म्हणाला ''फ्ल्याट च्या मालकांनी त्यांना चावी दिली आहे आणि आता रात्रो ते काम करणार नाहीत ''
दिवाळीपूर्वी काम संपवायचे आहे म्हणून त्यांच्या पद्धतीने सध्या दिवस रात्र काम चालू आहे
मला स्विच ऑन ऑफ पद्धतीने झोप लागत नाही
कुणी मार्गदर्शन कराल ?
नाहीतर माझे भीक मागणे चालू आहेच पण परमेश्वर झाला म्हणून काय झाले , त्यालाही रोज भीक घालणे परवडत नाही !!
31 Oct 2013 - 6:59 pm | आदिजोशी
फ्लॅटमालक आणि सोसायटी ह्या दोघांविरुद्ध पोलिस कंप्लेंट करा