तेंव्हा नुसती अश्शी भिरभिरायची नजर
आता बाजूला माझ्यावरच तिरकी नजर !
मनात येताच मित्र जमून करायचो कल्ला
'विचारून' बाहेर जाताना आता ऐकतो सल्ला !
तेंव्हा चापायचो हॉटेलात जाऊन चिकन हंडी
आता आवडून घेतो सात्विक मुगाची खिचडी !
तेंव्हा कशी वेगात बुंगाटत होतो बाईक
आता 'मागून येणा-या' सूचनेचा पाईक !
तेंव्हा कधी बाळगली नाही तमा आयुष्याची
आता जाणवते जबाबदारी तुझ्याही आयुष्याची !
- माशा
प्रतिक्रिया
27 Oct 2013 - 10:45 pm | पैसा
ते पुणे आता राहिले नाही...
27 Oct 2013 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा
लिल्या.. ..! :-D ये रे परतून! =))
यमक बांधणीमुळे तुझी अठवण येतीये! =))