गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )
गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?
*********************************************************************************
संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे. द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे .
*********************************************************************************
गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती . हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे .
आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड.
वरची वाक्ये हिंदि किंवा इंग्लिश मध्ये लिहिली असती तर ठीक ! पण मर्हाटि माणसाला मुळात गांधी हा सवर्ण हिंदुंचा नेता होता हेच मुळी मान्य नाही ! म्हणुन सुरवात तिथून करावी लागेल . ज्या पक्षाला १३ % एव्हढी जास्तीत जास्त मते मिळाली तो हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो . सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता . गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे .असो . हिंदु संघटक गांधीनी हिंदु जाती पातीत फुटू नयेत म्हणुन केलेले प्रयत्न प्रस्तुत लेखात येणारच आहेत
आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते. हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती, अनुभव, वाचन आणि विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .
महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर
चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या . यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )
आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात -
" चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ...
हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे आहे . …. हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. " (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ )
या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात. माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .
१९ २ ७ सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ )
हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .
हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.
काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली
काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "
हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.
गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . " (कीर - २ ३ ९ )
गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो.
(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र )
सायमन आयोग :
हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ? या प्रश्नांचि उत्तरे पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे .
सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८ च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती "
१ ९ २ ७ ते ३ ० या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे .
*********************************************************************************
विभक्त मतदार संघ म्हणजे काय ?
भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते.
विभक्त मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर मतदार संघात ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि केवळ पदवीधर च मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ.
*********************************************************************************
ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात -
" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत
२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )
या काळात आंबेडकरांनि विभक्त मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत .
निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ? ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)
ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .
गोलमेज परिषद : वणवा पेटला
सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या. त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती . आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले . लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे .
इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.
*********************************************************************************
प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?
ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत . या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे चमचे असत.
प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१ वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे . प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते .
*********************************************************************************
स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही ! राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे !
गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते. प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी मागणी चुकीची होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही त्यामुळे जातीवादी उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई नव्हती.
गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.
वादळी भेट आणि जळते उद्गार
इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०) गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क - र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले)
पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली .
कादाचित हा - पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ? अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत.
अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार. त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !"
या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.
पुणे करार : कौन जिता … कौन हारा
आंबेडकरांनि विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?
ताणलेले दोर
पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली !
आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते . अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते.
त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.
तुटलेले बंध
परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी नेत्याला दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली .
व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )
पुणे करारावर सही - हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?
अंतिम विजय कोणाचा ?
पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार -
१) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला.
२) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )
३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या . त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही . प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही .
गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते .
थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते. स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !
सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते . राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .
१) १९ २ ७ सालच्या महाडच्या संगरात त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी म्हणत असत .
२) पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .
३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !)
एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे .
अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .
समता आणणे आणि लोकशाही रुजवणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता .
स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?
परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी
परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी
गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल- हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे.
गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .
कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते । पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते .
सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)
हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा विचार आहे . हा विचार १ ९ २ ७ सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.
गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण ....
सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते.
भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे . गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही .
समारोप
घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते . . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे .
गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो .
तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे .
गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत .
स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते .
त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 2:56 pm | श्रीगुरुजी
ग्रेटथिन्कर का ग्रेटस्टिन्कर (great stinker) असा मला प्रश्न पडलेला आहे.
18 Oct 2013 - 11:55 pm | विद्युत् बालक
न्ना !!! हे तर खरे "ग्रेटशिटर " =))
15 Oct 2013 - 2:48 pm | बॅटमॅन
अगागागागा _/\_
महान आहात हो मृत्युञ्जय साहेब.
15 Oct 2013 - 2:31 pm | शिल्पा नाईक
@ मृत्युन्जय +१
15 Oct 2013 - 2:45 pm | मुक्त विहारि
बाब्बो....
त्रिवार दंडवत....
15 Oct 2013 - 3:50 pm | arunjoshi123
किती म्हणून कौतूक करावे इतकी चांगली विचारसरणी आहे लेखकाची. अगोदरच्या काळातील विरोधांना किती मोठी तात्विक बैठक असायची. आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकही किती गोड. वाचनाचा आनंद काय ते हा लेख वाचून कळावे.
15 Oct 2013 - 11:59 pm | सौरव जोशी
भारतीयह्रदयसम्राट स्वातंत्र्यसुर्य महात्मा गांधीजी असतीलही... असोत बापडे.
पण हिन्दुह्रदयसम्राट फक्त आणि फक्त एकचः विनायक दामोदर सावरकर!
16 Oct 2013 - 8:56 am | मुक्त विहारि
हे असे काही तरी लिहून आपण मुद्दाम कुणाच्यातरी बुध्धीला गहन विचार करायला भाग पाडत आहात.
असो.
माझ्या कडून तरी +१
स्मॉल पेगर
17 Oct 2013 - 7:22 pm | विजुभाऊ
अरे बापरे असे भाजप उघडपणे म्हणाला तर महायुतीचे काय होणार
16 Oct 2013 - 9:17 am | सुनील
लेख आवडला.
हे थोडेसे सरसकटीकरण वाटते. काहींचे विचार तसे असतीलही पण सर्वांचे नक्कीच नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही हिंदूंची आणि लीग ही मुस्लिमांची संघटना होती, हे नाकारण्यात हंशील नाही.
हहपुवा
गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
हे बरेचसे खरे ठरले आहे! (यालाच स्वातंत्र्योत्तर काँग्रेसचे बेरजेचे राजकारण म्हणतात का?)
ही माहिती नवी आहे. रोचक आहे.
१००% सहमत.
16 Oct 2013 - 9:41 am | सुनील
सदर वाक्याबद्दल थोडे अधिक स्पष्टीकरण.
गांधीवाद आणि काँग्रेस संघटना (आणि त्यातील राजकारण) हे दोन संपूर्णतः वेगळ्या गोष्टी होत.
कोंग्रेस संघटनेतील नेते जसे की नेहेरू, पटेल वा मौलाना आझाद हे कोणत्याही अर्थाने गांधीवादी नव्हते! (मात्र गांधी ह्या व्यक्तीवर त्यांची निष्ठा होती)
आणि सर्वार्थाने ज्यांना गांधीवादी म्हणता येतील अशा व्यक्ती जसे की, साने गुरुजी, विनोबा भावे वा दादा धर्माधिकारी यांना काँग्रेस संघटनेत काडीचेही स्थान नव्हते!!
16 Oct 2013 - 10:58 am | मृत्युन्जय
या स्पाष्टीकरणामुळे नेहेरू, पटेल वा मौलाना आझाद हे राजकारणी होते असे सिद्ध होउ शकते मात्र गांधी पक्के राजकारणी होते हे सिद्ध होत नाही. शिवाय या स्पष्टीकरणामुळे तुमच्या "राजकारणी " या शब्दाला जरा वेगळाच वास येतो आहे त्या वाईट अर्थाने गांधीजी राजकारणी होते असे तुम्ही म्हणत आहात असे वाटते आहे. बाकी धुरंधर राजकारणी असल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर कुठल्याही नेत्याला इतका एकजिनसी पाठिंबा लाभणे शक्य नाही हे मात्र मान्य.
16 Oct 2013 - 11:14 am | सुनील
तत्कालीन काँग्रेस संघटनेतील राजकीय निर्णय गांधींना विचारात घेतल्याविना होत नसत. सर्व राजकीय वाटाघाटी वा परिषदांना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीच जात असत. विविध राजकीय चळवळींची संकल्पना आणि नेतृत्व हे गांधींचेच असे (उदा दांडीयात्रा वा चले जाव).
या सर्व गोष्टी गांधी हे मुरलेले राजकारणी होते, हेच सिद्ध करतात.
मी "राजकारणी" हा शब्द वाईट अर्थाने वापरीत नाही. तसे वाटले असल्यास ती माझ्या लेखनीत त्रुटी समजावी!
मान्यच!
16 Oct 2013 - 11:11 am | राजेश घासकडवी
लेख आवडला.
तळागाळातल्या भारतीयांचा - दलितांचा - उद्धार व्हावा हे दोघांनाही वाटत होतं. मात्र 'हिंदू म्हणजे नक्की कोण?' या प्रश्नाबाबत त्या दोघांचा तीव्र मतभेद होता. गांधींचा कल दलित-सवर्ण सर्वांना एकत्र हिंदू म्हणू आणि त्यांच्यात समानता आणण्यासाठी जमेल तशा सुधारणा करत जाऊ. आंबेडकरांना अर्थातच हा सलोखा झाला काय अगर न झाला काय, दलितांचा उद्धार करणं हे अधिक महत्त्वाचं होतं.
गांधींच्या उपोषणापुढे मान तुकवून आंबेडकरांनी नाइलाजाने पुणे करार केला. त्यामागची राजकारणी चाल बाबासाहेब ओळखून असणार. गांधींनी स्वतःला अधिक व्यापक समाजाचा नेता म्हणून सिद्ध केलं, आंबेडकरांबरोबर करार करून त्यांना दलितांचे नेते म्हणून मान्यता दिली, आणि शिवाय तडजोडीत योग्य त्या मागण्या पूर्ण करून दिल्या.
सहमत. कुरुंदकरांनी म्हणूनच त्यांना 'बॅरिस्टर महात्मा' म्हटलेलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच आंबेडकरांवरचा जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमा पाहिला. तो काहीसा लांबलचक आहे, पण त्यांच्या जीवनाचं उत्तम चित्रण केलेलं आहे. त्यात पुणे करारावर बराच भर दिलेला आहे.
16 Oct 2013 - 1:32 pm | ग्रेटथिन्कर
एकही पद ज्या व्यक्तीने भूषवले नाही त्याला अट्टल राजकारणी म्हणायचे हे जरा अतीच होतय.
समाजकारणातून आलेल्या मानसन्मानामुळे राजकारणी त्यांना भिऊन असायचे.
त्यामुळे ते अट्टल समाजकारणी होते.
16 Oct 2013 - 1:47 pm | प्यारे१
निवडणूक लढवणारा नि पद भूषवणारा तोच राजकारणी अशी आपली व्याख्या असेल तर आपल्या ग्रेट थिंकींग ला पुन्हा एकदा सलाम!
कृष्णापासून चाणक्य ते अलिकडं राज ठाकरेंपर्यंत सगळे समाजकारणी असावेत. काश... ऐसाही होता. :)
16 Oct 2013 - 2:29 pm | मुक्त विहारि
आणि आमचे लाडके बाळा साहेब ठाकरे...
16 Oct 2013 - 2:16 pm | ग्रेटथिन्कर
राजकडे पद नाही ...आँ!!
मग मनसेचे अध्यक्ष कोण आहेत???
.
.
.
.
जरा अभ्यास करुन परिक्षेला बसत जा.
16 Oct 2013 - 2:25 pm | मुक्त विहारि
"म्हणजे गांधीजी कोंग्रेसचे अध्यक्ष न्हवते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?"
बाकी नेहमी प्रमाणे...
आधीच्या मुळ शंकांचे काय?
प्रश्र्नाचे उत्तर तुम्हालाच द्यायचे आहे इ.इ.
16 Oct 2013 - 2:29 pm | प्यारे१
आम्ही परिक्षेला बसतच नाही.
बाकी गांधीजींनी काँग्रेसचं अध्यक्षपद नव्हतं भुषवलं?
16 Oct 2013 - 2:38 pm | मुक्त विहारि
http://en.wikipedia.org/wiki/President_of_the_Indian_National_Congress
16 Oct 2013 - 3:10 pm | ग्रेटथिन्कर
गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते जरुर. परंतु त्यावेळी काँग्रेसचे स्वरुप राजकिय पक्ष असण्यापेक्षा independence movement organisation असे होते. ब्रिटिशांना घालवणे व देश स्वतंत्र करणे यासाठी कांग्रेसचे नेतृत्व गांधिंनी स्विकारले,
सुभाषचंद्र बोसांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद ३८ साली स्विकारले होते, आता त्यांना अट्टल राजकारणी म्हणायचे कि क्रांतिकारक?????
.
.
.
गणिताच्या पेपरला नागरिकशास्त्राचा अभ्यास करुन जाऊ नये.
16 Oct 2013 - 3:17 pm | प्यारे१
बरं. :)
16 Oct 2013 - 3:17 pm | प्यारे१
बरं. :)
16 Oct 2013 - 3:41 pm | मुक्त विहारि
"सुभाषचंद्र बोसांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद ३८ साली स्विकारले होते, आता त्यांना अट्टल राजकारणी म्हणायचे कि क्रांतिकारक?????"
इतका साधा प्रश्र्न पण तुम्हाला सोडवता येत नाही?
16 Oct 2013 - 8:02 pm | वेताळ
पण गांधीजी पुर्णपणे समाजकारणी होते ,ते राजकारणी नव्हते हे म्हणणे जरा पचले नाही. याकरिता कोणत्या पाचक गोळ्या वापराव्यात?
16 Oct 2013 - 8:10 pm | मुक्त विहारि
मुद्दाम विचार (अरे हो... गहन विचार) करून बवलेल्या गोळ्या आहेत त्या.
इतक्या सहजा सहजी मिळत नाहीत.आणि मिळाल्या तरी प्रत्येकाला पचतीलच अशी खात्री पण देता येत नाही.
16 Oct 2013 - 8:28 pm | ग्रेटथिन्कर
नथुगुग्गुळ चुर्ण सकाळ, संध्याकाळ घ्या ,पोट साफ होईल.
16 Oct 2013 - 9:08 pm | मुक्त विहारि
तुम्ही हे असे मध्ये तोंड घालणार ते माहीतच होते.
म्हणूनच मी मुद्दामच विचार (गहन केलाच नाही बघा आम्हाला किंचीत पण पुरतो.) करून मी नांव दिले न्हवते.अहो नथूगुग्गूळाचा फायदा तुम्हाला होणार.त्यांना कसा काय होईल्?
कमी रक्त दाब असलेल्या रोग्याला , जास्त रक्त दाबाची तक्रार असलेल्या रोग्याची औषधे देवून चालेल का?
अर्थात तुम्ही अद्याप "नथुगुग्गुळ चुर्ण" चालू केलेले दिसत नाही. कारण ते "पोट साफ व्हायचे औषध नसून" वेगळ्या उपायावर आहे.अर्थात जो पर्यंत तुम्ही ते घेत नाही तोपर्यंत तुम्हाला उपाय पण समजणार नाहीच म्हणा...
आणि हो
बाकी नेहमी प्रमाणे....
उत्तर आपणच द्यायचे आहे वगैरे वगैरे..आता आपले निदान इतके तरी पाठ झाले असेलच.....
@ वेताळ,
आपल्या साठी लागणर्या औषधाचा व्य.नि. लवकरच करत आहे.
17 Oct 2013 - 1:32 pm | उद्दाम
नथुगुग्गुळगुटी पुरुषांमधील 'दोस्ताना' वाढवायला मदत करु शकेल का?
17 Oct 2013 - 7:05 pm | अनिरुद्ध प
आपणच या बद्दल जास्त चान्गले सान्गु शकाल कारण आपण वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आहत.
17 Oct 2013 - 8:23 pm | साती
लेख आवडला.
दोन्ही नेते आपापल्या परीने योग्य असे मनापासून नेहमी वाटत होते पण त्याची कारणीमिमांसा कदाचित इतक्या स्पष्ट मांडता आलि नसती.
18 Oct 2013 - 9:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणासाठी आणि दलित समाजासाठी अपरिमित कष्ट उपसले ह्यात काही वादच नाही. काँग्रेस च्या धुर्त सद्ग्रुहस्थांना (?) आणि त्यांच्या शेपट्यांना राजकारणामधे मोनोपॉली निर्माण करायची होती हे तर स्पष्ट दिसतचं आहे. आणि त्याची फळं आपण वेगवेगळ्या आघाड्यांवर भोगतोच आहोत. बाबासाहेबांच्या कष्टांची फळं दलित समाजाच्या नावाखाली कुठंला पक्ष भोगतोय ते आपण पाहातोच आहोत.
थोडसं अवांतर :
बाबासाहेबांनी कालसिमित आरक्षणाची मागणी केली होती दलितांच्या उन्नतीकरता. आज धुर्त सद्ग्रुहस्थांचा पक्ष वाढीव आरक्षणाच्या कुबड्यांची सवय आरक्षित समाजाला लावतो आहे. त्यांची झगडायची क्षमता मोडत आहे.
सावरकरांविषयी जे गरळ ओकतं आहेत त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी ५० वर्षं अत्यंत प्रतिकुल परिस्थितिमधे कारावास भोगला. तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.
19 Oct 2013 - 10:11 pm | श्रीगुरुजी
>>> सावरकरांविषयी जे गरळ ओकतं आहेत त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी ५० वर्षं अत्यंत प्रतिकुल परिस्थितिमधे कारावास भोगला. तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.
मग त्यात काय विशेष? गांधी सुद्धा आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध होते, तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.
19 Oct 2013 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गांधी बाबांना स्थानबद्ध केलं होतं फक्त. वेळेत अन्नपाणी मिळत होतं. चरखा चालवा, पुस्तकं लिहा वाचायचं स्वातंत्र्य होतं वीर सावरकरांना तेलाचा घाणा फिरवणे (घाणा फिरवताना बैलांचा जीव हैराण होतो), काथ्या कुटणे इत्यादी भयानक कष्टप्रद कामांना जुंपलेले होते. त्यातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी मिळायचं त्यांना. शिवाय प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणुस असता तर कधिच मोडुन पडला असता. माझी जन्मठेप वाचा एकदा.
स्वातंत्र्याचे खरे जनक वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि ज्यांची नावं नादान लोकांच्या उदो-उदो च्या नादात इतिहासातुन पुसली गेली आहेत असे अनेक क्रांतीकारकचं आहेत. हे लोकं नसते तर कदाचित चित्र आजपेक्षा अजुन भयानक असतं.
19 Oct 2013 - 11:55 pm | ग्रेटथिन्कर
अगदी खरंय, गांधीने केलंय काय देशाच्या स्वातंत्र्यासाठी???? खरे स्वातंत्र तात्याराव सावरकरांनी दिले देशाला!
गांधिजी आगाखान पॅलेसमध्ये आरामात राहायचे, रोज पक्वान्न खायचे ,चांगले काम करणार्या लोकांवर माथेफीरु सोडायचे...
ब्रिटीशांची गांधीने माफी मागितली होती ..रीतसर माफिनामा लिहून.. आणि माफीनाम्याचे वचन अगदी पतिव्रतेप्रमाणे १९६६ पर्यंत...माफकरा ४८ पर्यंत पाळले.वर तोंड करुन तो एक स्ट्रॅटेजिचा भाग होता असे निर्लज्ज गांधिभक्त सांगतात, अरे या देशाला काय मुर्ख समजता काय रे.. गांधीवाद्यांनो !
एकही इंग्रज ज्यांनी मारला नाही ते गांधीजी स्वातंत्रवीर मात्र हजारो इंग्रज मारणार्या तात्यारावांना मात्र या गांधीने व काँग्रेसने अपमानीत केले .
कलियुग म्हणतात तेच हेच असावे...! एखाद्याला मोठं ठरवण्याच्या नादात आपण धादांत खोटे लिहतो याची या लोकांना (गांधिवादी) कसलीही चाड नाही.
20 Oct 2013 - 9:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
रोज पक्वान्न खायचे असं कुठे लिहिलं आहे मी जरा दाखवता का?
उपरोधातुन का होईना सत्य बाहेर पडलं हे काय कमी झालं का? त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आजपर्यंत हजार वेळा लोकांना सांगुन झालयं आता परत सांगतो. उपोषण, सत्याग्रह ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास होतो. जुलुमी राजवटीवर त्याचा काडीचाही परीणाम होत नाही (उदा: अण्णा हजारे आणि लोकपाल प्रकरण!! आज आण्णांचा आवाज का बंद झालाय? झालाय का केला गेलाय?). जे मागुन मिळतं ते स्वातंत्र्य नाही, ती भिक आहे. जो तुम्हाला पुर्ण लुटायच्या उद्देशानी आलाय तो तुमच्या उपोषण सत्याग्रहाला एन्टर्टेन करेल का तुमच्या डीफेन्स स्टान्स ला घाबरेल?
20 Oct 2013 - 10:20 am | ग्रेटथिन्कर
उपरोधानं का होईना सत्य बाहेर पडलं
उपरोधानं कशाला त्यांनी खरेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तात्यारावांनी एक हाक दिली कि आख्खा देश त्यांच्या पाठी एकवटायचा जगावर बंदुकींच्या जोरावर राज्य करणारे इंग्रज मात्र तात्यारावांना चळाचळा कापायचे कारण तात्यारावांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे तात्यारावांकडे त्याकाळी भूमिगत असे किमान एकलाख खडे सैन्य होते इंग्रज म्हणाले कि सावरकरांनी जर आप्ल्यावर हल्ला केला तर आपले काही खरे नाही जागतिक सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी सावरकरांना माफीनामा लिहून दिला व जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पळ काढला इतके तात्याराव लोकप्रिय आणि धाडसी होते.
उलट गांधीला चारदोन कार्यकर्ते सोडले तर कोण ओळखायचं हो...
तात्याराव रत्नांगिरी राहयचे तिथल्या कोकणी लोकांचा धोतर आणि पंचा हा पोषाख गांधिने ढापला व मोठा झाला.
जय तात्याराव, जय तात्याराव ,जय तात्याराव.
(ही पोस्ट ज्याला उपरोधिक वाटेल तो तात्यारावांचा समर्थक असूच शकत नाही)
20 Oct 2013 - 2:30 pm | श्रीगुरुजी
>>>> उपरोधातुन का होईना सत्य बाहेर पडलं हे काय कमी झालं का? त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आजपर्यंत हजार वेळा लोकांना सांगुन झालयं आता परत सांगतो. उपोषण, सत्याग्रह ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास होतो. जुलुमी राजवटीवर त्याचा काडीचाही परीणाम होत नाही (उदा: अण्णा हजारे आणि लोकपाल प्रकरण!! आज आण्णांचा आवाज का बंद झालाय? झालाय का केला गेलाय?). जे मागुन मिळतं ते स्वातंत्र्य नाही, ती भिक आहे. जो तुम्हाला पुर्ण लुटायच्या उद्देशानी आलाय तो तुमच्या उपोषण सत्याग्रहाला एन्टर्टेन करेल का तुमच्या डीफेन्स स्टान्स ला घाबरेल?
+११११११११११११११११११११......
हे सत्य दडपण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. अंदमान कारागृहात सावरकरांनी भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळींवर चुना फासून एका महामानवाची एक अभिमानास्पद स्मृती सुद्धा नष्ट केली गेली. आता अंदमान कारागृह पाडायची योजना आहे. सावरकरांनी देशासाठी जिथे ११ वर्षे अत्यंत जीवघेणा कारावास सोसला तिथल्या स्मृतीस्तंभावरून त्यांच्या काव्यपंक्ती काढून टाकून ज्या गांधींनी जिथे कधीही पाऊल ठेवले नव्हते अशांच्या ओळी कोरल्या गेल्या. सावरकरांचा काँग्रेसने अत्यंत दुस्वास केला व शक्य तिथे आणि शक्य तितकी त्यांची बदनामी करून त्यांच्या स्मृती नष्ट करण्याचाच प्रयत्न केला. अंहिसेने रक्ताचा एकही थेंब न सांडता गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले असा तद्दन भंपक व खोटा इतिहास शिकविला गेला.
20 Oct 2013 - 2:54 pm | ग्रेटथिन्कर
बरोबर, सावरकराँनी उणीपुरी २५ वर्षे संसदेत काढली तरीही त्यांचे तैलचित्र तिथे लावत नाहीत.
20 Oct 2013 - 4:31 pm | विद्युत् बालक
ऒ ग्रेट साहेब…. जर स्वाक्षरी चा रंग बदल हो डोळ्याला त्रास होतोय…. हिरवा नाही तर निळा ठेवा कसे?
20 Oct 2013 - 9:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
आपली शाळेची पुस्तकं पण पाहा, क्रांतीकारकांवर थोडक्यात माहीती आणि गांधी बाबा आणि खांग्रेस वर उरलेली पानं.
खरं तर शाळेपासुन खरा इतिहास शिकवला गेला पाहीजे.
20 Oct 2013 - 9:33 pm | ग्रेटथिन्कर
थोडक्यात माहीती गांधींवर दिली पाहीजे, नथुराम निदान ५० पानांचा तरी हक्कदार आहे!!!! हाच ना खरा इतिहास.??
21 Oct 2013 - 6:15 pm | श्रीगुरुजी
>>> आपली शाळेची पुस्तकं पण पाहा, क्रांतीकारकांवर थोडक्यात माहीती आणि गांधी बाबा आणि खांग्रेस वर उरलेली पानं.
अहिंसक आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळाले अशा प्रचारकी पुस्तकांनंतर काही वर्षांनी वद्रा हा स्वातंत्र्यसैनिक होता असा इतिहास सुद्धा वाचायला मिळेल.
21 Oct 2013 - 6:18 pm | प्रसाद गोडबोले
म्हणजे काय ? वद्रा आहेतच मुळी स्वातंत्रसैनीक...तिकडे हरियाणात गुडगावात सध्या ते विनोबाजींच्या भुदान चळवळीसारखी चळवळ चालवत आहेत :)
21 Oct 2013 - 6:38 pm | ग्रेटथिन्कर
वद्राला गुरु करुन नितीन माठकरीही तीच भूदान चळवळ चालवतोय ,हो की नै गिरीजा.
आणि महाजनही तेच करायचा, हंबानीकडून पैसा घ्यायचा आणि गोरगरीबांना वाटायचा... रॉबिनहुडच्याच औलादी ,नै का ?
21 Oct 2013 - 6:33 pm | श्रीगुरुजी
>>> खरं तर शाळेपासुन खरा इतिहास शिकवला गेला पाहीजे.
खरा इतिहास शिकविला तर काँग्रेसमधल्या अनेकांची दुकाने कायमची बंद होतील.
21 Oct 2013 - 6:46 pm | ग्रेटथिन्कर
काँग्रेसवाल्यांची दुकाने ... तर भाजपवाले अन्नछत्र चालवतात!....भाजपाच्या अन्नछत्रात वाढपी कोण...तर रेड्डी बंधू, भंगारु लक्ष्मण,संजय जोशी.........
आणि सुषमा ,हेमा,नरेंद्र, नितीन, गोपी हे पोट खपाटीला गेलेले बाया बापुडे जेवायला....
धन्य इनोबा ,धन्य भाजप.
20 Oct 2013 - 2:34 pm | श्रीगुरुजी
>>> गांधी बाबांना स्थानबद्ध केलं होतं फक्त. वेळेत अन्नपाणी मिळत होतं. चरखा चालवा, पुस्तकं लिहा वाचायचं स्वातंत्र्य होतं वीर सावरकरांना तेलाचा घाणा फिरवणे (घाणा फिरवताना बैलांचा जीव हैराण होतो), काथ्या कुटणे इत्यादी भयानक कष्टप्रद कामांना जुंपलेले होते. त्यातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी मिळायचं त्यांना. शिवाय प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणुस असता तर कधिच मोडुन पडला असता. माझी जन्मठेप वाचा एकदा.
काँग्रेसचे तुरूंगात गेलेले बहुतेक जण राजकीय कैदी या दर्जाचे होते. त्यांना सक्तमजुरी मिळत नव्हती. लेखन करायची सोय व स्वातंत्र्य होते. तुरूंगात त्यांचा छळ झाला नव्हता. याउलट परिस्थिती अंदमानात होती.
23 Oct 2013 - 11:46 pm | ग्रेटथिन्कर
||मना त्वाची रे पुर्वसंचित केले
तया सारखे भोगणे प्राप्त झाले||-समर्थ रामदास.
गांधी -राजकिय कैदी, सर्व सुख सुविधा ,आराम
सावरकर- अंदमानात कैदी,घाणा ओढणे ,कष्ट करणे, सक्तमजुरी
समर्थउक्तीप्रमाणे कोणाचे पुर्वसंचित चांगले असेल हो!..गांधी कि सावरकर..?
कि समर्थच काहीतरी चूकीचं सांगतायत?
24 Oct 2013 - 9:24 am | उद्दाम
छान
24 Oct 2013 - 10:41 am | मृत्युन्जय
सावरकर त्यांच्या मागच्या जन्मी सावरकर नव्हते. पण सावरकर जन्मात ते सावरकरच होते. तेवढे पुरेसे आहे तुमच्यासाठी,
संत वचनांचा तुम्हाला अजुन थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि त्याबरोबर थोडे डोके लावणे पण अपेक्षित आहे. दाऊन इब्राहिम सध्या मोठ्या सुखात जगतो आहे, बरेच राजकारणीही सुखात आहेत (आपल्या सगळ्यांचे लाडके नेते तर सुखात तरंगत आहेत) म्हणजे मागच्या जन्मात त्यांनी मोठी पुण्ये केली असणार असा जर अर्थ तुम्हाला समर्थांच्या वचनातुन काढायचा असेल तर त्याला बाकी पामर काय करणार?
24 Oct 2013 - 11:26 am | ग्रेटथिन्कर
काढायचा असेल म्हणजे???? तसाच अर्थ निघतो..
24 Oct 2013 - 11:57 am | मृत्युन्जय
शहाणे आहात तुम्ही खुप :)
आता जो अर्थ निघतो. तोच घ्या.
24 Oct 2013 - 12:03 pm | ग्रेटथिन्कर
समर्थांनी जो अर्थ सांगितला तोच आम्ही घेतो ....तूम्ही समर्थांपेक्षा विद्वान आहात काय?
24 Oct 2013 - 12:07 pm | मृत्युन्जय
समर्थांनी मी दिलेल्या वाक्याचा अर्थ दिला आहे काय?
20 Oct 2013 - 3:19 pm | श्रीगुरुजी
>>> स्वातंत्र्याचे खरे जनक वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि ज्यांची नावं नादान लोकांच्या उदो-उदो च्या नादात इतिहासातुन पुसली गेली आहेत असे अनेक क्रांतीकारकचं आहेत. हे लोकं नसते तर कदाचित चित्र आजपेक्षा अजुन भयानक असतं.
+११११११११....
या क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कमी लेखून त्यांना दुर्लक्षित करण्याचे प्रयत्न व फक्त ठराविक व्यक्तींनाच महत्त्व देण्याचे प्रयत्न गेली ६६ वर्षे सुरू आहेत. सुदैवाने हे प्रयत्न अजूनपर्यंत पूर्णत्वाने यशस्वी झालेले नाहीत.
23 Oct 2013 - 11:32 pm | श्रीगुरुजी
लालू अशाच लुटुपुटीच्या तुरूंगात आहे. त्याच्या तुरूंगातील खोलीत ए.सी., टीव्ही, बेड, मच्छरदाणी वगैरे सोयी आहेत. रोज घरून जेवण येते. रोज त्याला भेटायला अनेक कार्यकर्ते, आमदार वगैरे येतात. तो त्यांच्याबरोबर तुरूंग अधीक्षकाच्या केबिनमध्येच बैठका घेतो. लालूसारक्या गुन्हेगारांनी तुरूंगवास, गुन्ह्याबद्दल मिळालेली शिक्षा इ. ची चेष्टा करून टाकली आहे.
18 Oct 2013 - 9:52 am | ग्रेटथिन्कर
खोटी माहीती देऊ नका.
18 Oct 2013 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
माफ करा. जन्मठेपेची शिक्षा असे वाचा. आकडा वादाचा मुद्दा असला तरी त्यांच्या त्यागाची किंमत कमी होत नाही.
18 Oct 2013 - 11:37 am | Dipankar
सावरकर आणी त्याग, पोटात दुखते काही च्या, ग्रेट विचार करणारे लोक्स
18 Oct 2013 - 10:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विचारजंतु ;)
19 Oct 2013 - 12:29 pm | ज्ञानव
आ म्ब वा डे क र हे आपले नाव सोडून एका ब्राम्हणाचेच नाव आयुष्यभर वापरण्या मागची भूमिका काय? आज बर्याच कमी लोकांना हे माहित आहे कि त्यांच्या गुरुजीनीच त्यांचे आंबेडकर हे "नामकरण" केले.
तसेच गांधीजींना उशिरा उपोषण करणे हि एक सवय होती का ?
पाकिस्तान होऊच नये म्हणून ते उपोषणास का बसले नाहीत. आणि उपोषणाने आंबेडकर ह्यांना कोंडीत पकडणे कितपत बरोबर होते म्हणजे चर्चा न करता, एकमेकांची गोची काय होऊ शकते ते ना पडताळता मी उपोषण करीन हि धमकी देणे आणि उपोषणास बसणे कितपत योग्य आहे.....जर देशाबद्दल कळ कळ होती तर सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांना पंतप्रधान करण्या ऐवजी नेहरूंना (ज्या माणसाला सी डब्लू सी मध्ये एकही मत पडले नाही पण वल्लभ भाई पटेलांना आणि गांधीजींनाच १३+२ अशी मते पडली तेव्हा देशाचा विचार ना करता नेहरू ह्यांनाच पंतप्रधान करा हे गांधीजीनी कुणाला विचारून ठरवले?)....
19 Oct 2013 - 1:50 pm | मुक्त विहारि
जर तुम्ही खरोखरच सिरीयस होऊन प्रश्र्न विचारत असाल तर...
तुमच्या प्रश्र्नांची उत्तरे कदाचित खालील पुस्तकांत मिळतील
१. गांधींनी आणि काँग्रसने अखंड भारत का नाकारला (शेषराव मोरे...हे पुस्तक मी गेले १ वर्ष वाचत आहे..मनन आणि चिंतन तर फार दूरची गोष्ट.... बाकी शेषराव मोरे अप्रतिम माणूस... कधी पण फोन करा,सगळे मुद्दे समजावुन द्यायला तयार)
२. नथूराम गोडसे
३. माझे सत्याचे प्रयोग (खूद्द गांधी..२/३ महिने लागतात वाचायला.त्यांची सगळी मते पटतीलच असे नाही.पण एक माणूस म्हणून जगायला फार उत्तम पुस्तक)
४. प्रकाशाची / सुर्याची सावली... नक्की नाव आठवत नाही पण बाबांच्या मुलावरील पुस्तक आहे...
19 Oct 2013 - 2:15 pm | मृत्युन्जय
रकाशाची / सुर्याची सावली... नक्की नाव आठवत नाही पण बाबांच्या मुलावरील पुस्तक आहे.
प्रकाशवाटा म्हणायचे आहे का मुवि तुम्हाला?
19 Oct 2013 - 4:41 pm | मुक्त विहारि
"प्रकाश वाटा" पण असू शकेल....
19 Oct 2013 - 7:16 pm | राही
आपण म्हणता ते पुस्तक बहुधा 'प्रकाशनो पडछायो' या श्री दिनकर जोषि यांच्या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद असावा. ह्या पुस्तकावर 'गांधी विरुद्ध गांधी' हे नाटक आणि चित्रपटही निर्माण झाला. हे पुस्तक एक कर्तृत्ववान बाप आणि त्याचा त्या मानाने नाकर्ता मुलगा असे गांधीजींच्या घरातील शोकांतिकेवर बेतलेले आहे. गांधीजी आणि त्यांचे पुत्र हरिलाल यांच्या संघर्षातून गांधीजींचा एक वेगळाच पैलू उलगडत जातो. देशाची समस्या सोडवू पहाणारे महापुरुष घरातल्या समस्या सोडवताना कसे हतबल होतात आणि व्यापक देश/समाजहितापोटी कुटुंबहित/सौख्याला कठोरपणे तिलांजली देतात ते अतिशय मनोज्ञ पद्धतीने यात मांडले आहे.
प्रकाशवाटा हे बाबा आमटे यांच्या जीवनावरील पुस्तकही अर्थात तितकेच मनोज्ञ आणि प्रेरणादायक आहे.
19 Oct 2013 - 7:51 pm | मुक्त विहारि
एकदम बरोब्बर...
मी बापूंना कधी बाबा तर कधी गांधीजी असे म्हणतो.मी गांधींचा चूकून बाबा असा उल्लेख केला आणि वाट लागली...
20 Oct 2013 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले.
-दिलीप बिरुटे
20 Oct 2013 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
अतिषय उत्तम लेख !!
अवांतर प्रतिसाद काढुन टाकावेत ही विनंती . ह्या चर्चेत , इथे सावरकरांना आणण्याचे कामच नव्हते .
बाकी पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली आणि आचार्य मंडणमिश्र बौध्द होते ही विधाने वाचल्यालावर सदर व्यक्तीला अज्ञानात सुख मानु द्यावे असा विचार केल्याने बाकी काही बोलण्यात अर्थ नाही
21 Oct 2013 - 7:02 pm | वेताळ
सहि पण ते पिवळी करत आहेत. ग्रेटथिंकरांचे विचार बघुन आपले वाचन कमी असल्याचा आनंद झाला. अज्ञानात खरेच सुख आहे.
21 Oct 2013 - 10:08 pm | मुक्त विहारि
अज्ञानात खरेच सुख आहे.
त्याहून पण अति विचारी माणसे जेंव्हा लिहीत नाहीत तंव्हा परम सूख आहे.
ही अतिविचारी माणसे मिपा सोडतील तो सुदिन...
22 Oct 2013 - 1:34 am | रामपुरी
ग्रेटथिंकर यांना संपादक करावे आणि त्यांचे सदस्य नाव बदलून "कुमार केतकर" करावे ही विनंती
22 Oct 2013 - 2:08 pm | श्रीगुरुजी
अनुमोदन !
केतकरांनी लोकसत्ताची वाट लावल्यामुळे त्यांची तिथून हकालपट्टी झाल्यावर त्यांचे मौलिक विचारधन दुर्मिळ झाले होते. पण आता ती उणीव राहिलेली नाही.
22 Oct 2013 - 2:14 pm | ग्रेटथिन्कर
संपादक पत्रकार म्हणजे तूमाला काय हिदुत्वाचा उदो उदो करणारा भाट वाटला काय....जे खरे तेच ते लिहतात.
22 Oct 2013 - 2:19 pm | मुक्त विहारि
तुमची नथू घ्यायची वेळ झाली.
जा बरे तुम्ही तुमचे औषध घ्या आणि हो ते पथ्य पण पाळा....
औषध घेत असतांना टंकनश्रम घेवू नयेत.
22 Oct 2013 - 2:25 pm | श्रीगुरुजी
>>> ....जे खरे तेच ते लिहतात.
फिदी फिदी फिदी ....
खि खि खि ....
22 Oct 2013 - 2:50 pm | बॅटमॅन
ग्रेट्या बाकी काही म्हण, सारखे हिंदू हिंदू करून करून तुझ्याच अंगाला आता हिंदुत्ववादाचा भपकारा येऊ लागलाय. हिंदुत्वाचा भाट शोभतोस खरा.
23 Oct 2013 - 11:01 pm | श्रीगुरुजी
नक्की कळलं नाही. जसे केतकर गांधी घराण्याचे स्वयंघोषित भाट आहेत, अगदी तसेच ग्रेटस्टिंकर हिंदुत्ववादाचे भाट आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला?
23 Oct 2013 - 11:14 pm | ग्रेटथिन्कर
ग्रेटस्टिंन्कर... श्रीभुर्जी..चांगली नावं आहेत.
24 Oct 2013 - 12:04 pm | आंबट चिंच
ओ मु.वि. हा नानु सरंजामे कोण हो? आणि त्य ची अशी अर्धवट सही का बरे आहे. तुम्हाला मी पुढची सही पुर्ण करुन देवु का?
बघा पटले तर.
24 Oct 2013 - 11:36 pm | मुक्त विहारि
"फुंके,शिंके आणि थुंके यांना आमच्या कडे मनाई आहे!"
बघाना
तुमच्या लिखाणांत पण ती सगळ्याच शेवटीच आली आहे.
बाकी काहीही म्हणा पण तुम्ही पण भारीच विनोदी बघा... अहो, चिंच गाभूळलेली असु दे ही हिरवी ती आंबटच असणार ना?
मग मुद्दाम हे आंबट चिंच कशाला?
असो....एकूण सध्या तरी त्रिकूटच दिसत आहे......
26 Oct 2013 - 10:23 am | पिशी अबोली
छान अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख आहे. प्रतिसादांचे कमर्शियल ब्रेक सगळे नंतरच एकत्र आहेत ते बरं आहे. :)
26 Oct 2013 - 12:51 pm | खटासि खट
घटना समितीवर डॉ आंबेडकर निवडून येऊ नयेत म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले. मुंबईत त्यांचा पराभव केला. यावर बंगालच्या एका खासदाराने तुम्ही घटना समितीत नसाल तर देशाच्या सर्व घटकांना न्याय मिळणार नाही असे वाटल्याने मी राजीनामा दिला आहे. माझ्या जागेवर तुम्ही निवडून या असं आवाहन केलं. दिलेला शब्द खरा करत त्यांनी बाबासाहेबांना मसुदा समितीवर निवडून आणलं. ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची. पण फाळणीमधे बाबासाहेबांना निवडून देणारा मतदारसंघ काँग्रेसने पूर्व पाकिस्तानास देऊन टाकला. त्यामुळे बाबासाहेब आपोआपच पाकिस्तानच्या घटनासमितीचे सदस्य झाले. कदाचित भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती यात हा अडथळा ठरला असता. त्यातच बाबासाहेबांनी मी पाकिस्तानची घटना लिहीण्यास तयार आहे हे विधान केल्याने धास्तावलेल्या काँग्रेसने त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि पुन्हा मुंबईतून निवडून आणण्याचे आश्वासन दिले. गुगळून पाहीले तर संदर्भ मिळतील. या घटना ख-या आहेत हे जर आढळून आले तर इतर कुणाचेही विश्लेषण न पाहता प्रत्येकजण त्यांचे अर्थ लावण्यास सक्षम आहेच.