ओदिशा - ९ अंतिम: भुवनेश्वरची दोन वस्तुसंग्रहालये

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in भटकंती
21 Oct 2013 - 2:48 pm

ओदिशा - १
ओदिशा - २
ओदिशा - ३
ओदिशा - ४
ओदिशा - ५
ओदिशा - ६
ओदिशा - ७
ओदिशा - ८

२३-११-२०११.
आता पाहायचे होते राज्य वस्तुसंग्रहालय अर्थात स्टेट म्यूझियम. जातांना रिक्षाने जाऊन येतांना बसने यायचे असे ठरले. रिक्षा भुवनेश्वरच्या अतिशय देखण्या राखलेल्या भागातून जायला लागली. मुंबईतल्या म्यूझियमसभोवतालच्या प्रदेशातले रस्ते किंचित अरुंद केले तर कसे वाटेल तसे. पण मुंबईच्या मानाने झाडे भरपूर. ती देखील चांगली निगा राखलेली.

संग्रहालयाला प्रशस्त, विस्तीर्ण आवार. राजभवन, टी आय एफ आर वगैरे मोजकी स्थळे वगळता मुंबईत एवढे विस्तीर्ण आवार कुठेच नाही. आवारात विविध आकारांच्या चौकटीत सीमित केलेली, सुरेख राखलेली हिरवळ आणि व्यवस्थित कातरलेली झाडे.
स्टेट म्यूझियम

भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत दिसलेली घाण बकालपणा याचा मागमूस कुठे नाही. वाटले नंदनवनातच आलो.
म्यूझियमचे देखणे आवार

ख्रिसमस ट्री हा फर असतो असा माझा समज आहे तो बहुधा चुकीचा नसावा. नसल्यास क्षमस्व. हा कधी देखणा दिसत नाही? काही व्यक्तींकडे उपजत नीटनेटकेपणा असतो, शिस्त असते. काही झाडे पण तशीच असतात. फरचे मला तस्सेच वाटते. पाहावे तेव्हा हा आपला व्यवस्थित आणि नीटनेटका. जिथे जातो तिथला परिसर मोहमयी करून टाकतो. आणि मस्त गोलाईने कातरलेले बहुधा स्प्रूस; मन प्रसन्न झाले तरच नवल. व्यवस्थित राखल्यामुळे आवाराचा प्रचंड विस्तार अंगावर येत नाही. मुख्य बाब म्हणजे जमीन उगीचच सपाट करून त्यावर हिरवळ वाढवली नव्हती. जमिनीतले मूळचे नैसर्गिक उंचवटे तस्सेच ठेवून हिरवळीचा साज त्यावर चढवला होता.
म्यूझियमच्या आवारात

अधूनमधून आकर्षक शिल्पे आणि पुतळे.
देखणी शिल्पे

देखणी शिल्पे

देखणे आवार

देखणी शिल्पे

संग्रहालयाचे प्रथमदर्शन जोरदार होते. संग्रहालयाच्या आतली सजावट कलापूर्ण होती. स्वागत दालनात उत्सवी भडकपणाचा चमकदार स्पर्श असलेली सजावट.
स्वागतक्षाची सजावट

ही सर्वव्यापी श्रीकृष्ण, बालभद्र आणि सुभद्रा यांची त्रिमूर्ती आणि त्यांचे ते ओदिशी शैलीतले वैशिष्ट्यपूर्ण टप्पोरे डोळे.
सर्वव्यापी त्रिमूर्ती आणि टप्पोरे डोळे

आतली मांडणीही सुबक. जमीन, भिंती, काचा, खिडक्यांची स्वच्छता चकाचक. रंगसफेती नीटस आणि आकर्षक. काचखिडक्यात वस्तू टापटीपीने व्यवस्थित मांडलेल्या. उडिया, देवनागरी आणि इंग्रजीत पाट्या लिहिलेल्या.
काचघर

प्रकाशचित्रणाला प्रतिबंध नसल्यामुळे चंगळच झाली
काचघर

संग्रहालयाच्या आतल्या खिडकीतून दिसणारी संग्रहालयाची नीटनेटकी इमारत
इमारत आतून

इमारत आतून

इमारत आतून

काचघर

एके ठिकाणी उडिया लिपी प्राचीन लिपीवरून कसकशी विकसित झाली ते दाखवले आहे. सहज आठवले म्हणून लिहितो. वर्षभरापूर्वी आंग सान ची वरचे मराठी पुस्तक वाचले होते. मीना गवाणकरांचे. त्यात ब्रह्मी लिपीतल्या पाट्यांची प्रकाशचित्रे आहेत. ब्रह्मी, उडिया दोन्ही लिप्या मला वाचता येत नाहीत. पण तरीही ब्रह्मी लिपी उडियाशी फारच मिळतीजुळती वाटली. यांगूनच्या एखाद्या दुकानाची पाटी भुवनेश्वरच्या बाजारात लावली तर आपल्याला कळणार देखील नाही.
लिपीचा विकास

ओदिशातील विविध आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचे दर्शन घडवून माहिती देणारी काचघरे होती.
आदिवासी

आदिवासी

आदिवासी

आदिवासी

आदिवासी

कारंज्याने सजीव केलेले वातावरण
कारंजे

आता दुसरे संग्रहालय. रीजनल म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी. पहिले संग्रहालय जास्त चांगले की आताचे असा प्रश्न पडावा.

प्रादेशिक निसर्ग संग्रहालय

निसर्ग संग्रहालय

थोडाफार सोनटक्क्यासारखा दिसणारा पण जास्त मोठा आणि जास्त मोहक हेलिकोनिया.हिरवळ, सुंदर झाडे, शिल्पे वगैरेंच्या जोडीला टेनिस चेंडूएवढ्या मोठ्या आकाराचे मोठ्ठे झेंडू ठिकठिकाणी फुललेले. झुळझुळणार्‍या वार्‍याने त्या सजीव वातावरण उत्साह भरला.
निसर्ग संग्रहालय

गेंदेदार झेंडू

प्रवेशद्वार

प्रवेशद्वारातून

प्रवेश केल्याबरोबर समोर हत्तीचा हाडांचा सापळा ठेवला आहे.
हत्तीचा सांगाडा

काचघर

पुढील ्युगुलातला मी कोणता ते ओळखा पाहू
सापळ्यांचे युगुल

मोर

जंगलचा राजा

जगातले सर्वात मोठे अंडे
टिप्पणीची गरज आहे?

पक्षी आणि त्यांची अंडी

गवा

पुन्हा देखण्या आवारात
देखणे आवार

देखणे आवार

देखणे आवार

दिवस मस्त गेला. परत येणे तसे सोपेच होते. पण बसला गर्दी असल्यामुळे रिक्शा केली. थोडा वेळ आराम करून, स्नान करून जेवायला निघालो. दुपारी न जेवल्यामुळे जोरदार भूक लागली होती. आज ताजी मिठाई मिळाली. तीच मावा स्टफ्ड मावा केक म्हणावी अशी. ती डिस्कव्हरीवर दाखवलेली बहुधा छेना की मिठाई म्हणतात ती हीच असावी.

आता परतीचे वेध लागले होते. मनाशी गोळाबेरीज होऊ लागली. हुमा वगळता सारी ठिकाणे सुंदर होती. सुरुवात परीक्षा घेणारी झाली तरी दौरा सार्थकी लागला होता. आठवडा कसा गेला हे कळलेही नव्हते. राहायच्या हॉटेलसमोरच भुवनेश्वर स्थानक होते. त्यामुळे कोणार्क मुंबई गाडी फलाटावर लागल्याशिवाय सामान बाहेर काढायचे नाही असे ठरले. बहुतेक खरेदी पिपलीलाच झाली होती. आता उद्या २४ तारखेला दुपारी निघेपर्यंत आरामच आराम.

२४-११-२०११.
बाळीला पुन्हा एकदा लिंगराज मंदीर पाहायचे होते. तेही तिने पाहून घेतले. फार थकायला झाले असल्यास रेलवेची तिकिटे रद्द करून विमानाने मुंबईला यायचे ठरले होते. पण तसा थकवा आलाच नव्हता. त्यामुळे रेलवेच पसंत करून पैसे वाचवले. ओरिसा तसे मुंबईपुण्याच्या मानाने बरेच स्वस्त आहे. त्यातून आम्ही स्थाकनजीकत्त्व साधायला बकाल परिसरात साधारण हॉटेलात राहिलो. त्यामुळे नियोजित अंदाजपत्रकाच्या ४० टक्केच खर्च आला. दौर्‍याच्या मधुर आठवणी जागवीत गप्पा हाणत मजामस्ती करीत पुणे कधी आले ते कळलेही नाही. ओदिशातली भटकंती अशा तर्‍हेने सुफळ अंपूर्ण झाली.
माझी लिखित वटवट खपवून घेतल्याबद्दल सर्व वाचकांचे अगोदरच आभार मानतो.

संपूर्ण.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 4:46 pm | मुक्त विहारि

शक्य झाल्यास एकूण प्रवास खर्च किती झाला ते सांगू शकाल का?

कूणी काहीही म्हणो

अर्थातच खरा अर्थ आहे....

ओदिसा लेखमालेचे सर्वच भाग खूप माहितीपूर्ण होते. कोणार्क, चिल्का सरोवर, संग्रहलयांच वर्णन उत्कृष्ट झालायं.

सुधीर कांदळकर's picture

21 Oct 2013 - 8:33 pm | सुधीर कांदळकर

मुक्त विहारि, कुसुमावती धन्यवाद.

@मुक्त विहारि: चौघांचे मिळून ३०,०००/- झाले म्हणजे प्रत्येकी फक्त रु. ७,५००.०० तेव्हा ३ टायर स्लीपरचे भाडे रु. १,४००+ आणि २ टायर स्लीपरचे १९००+ होते. सुमार हॉटेल्स डबल ऑक्युपन्सी रु. ६००/- प्रतिदिन घासाघीस केल्यानंतर होती. छापील दर ११०० - १२०० होते. साधारण बरी हॉटेल्स रु. २२०० होती. त्या दर्जाला हा दर महागच म्हणून सुमार हॉटेलात अटॅच्ड बाथरूम्सची स्वच्छता पाहून खोल्या घेतल्या. बाळ्याची घासाघीस करायची क्षमता असाधारण आहे. स्टॅशनपासून दूर बहुधा दर कमी असावेत. खाण्याची मात्र फार आबाळ झाली. पाणी ५ लिटरचे बुधलेच वापरले. तेव्हा रु. ३५/- ला होते. अर्थात २ लिटरच्या रिकाम्या केलेल्या उचलायची कडीवाल्या बाटल्यात ओतून भरून घेऊन.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 9:28 pm | मुक्त विहारि

म्हणजे स्वस्तातच झाली म्हणायची...

धन्यवाद आम्ही तुम्हाला द्यायचे.घरबसल्या मस्त प्रवास झाला.

प्रचेतस's picture

21 Oct 2013 - 8:45 pm | प्रचेतस

सुंदर लेखमालिका.
अपरिचीत ओदिशा ह्या लेखमालिकेद्वारे आमच्या समोर आणल्याबद्दल तुम्हास धन्यवाद.

प्राचीन मंदिरांचे अजून फोटो असल्यास येथे अवश्य द्यावेत अशी विनंती.

सुधीर कांदळकर's picture

21 Oct 2013 - 9:42 pm | सुधीर कांदळकर

@वल्ली: उद्याच टाकतो. अगोदर निवडून जालावर चढवतो. मग इथे टाकता येतील.

प्रचेतस's picture

21 Oct 2013 - 9:57 pm | प्रचेतस

धन्यवाद.

मनापासून वर्णन आवडले आणि फोटोपण भरपूर दिलेत .आम्ही पण तुमच्या बरोबरच होतो -मागच्या डब्यात .एक विचारायचे आहे .खंडगिरि उदयगिरि साठी एक दिवस धरला नव्हता का ?

सुनील's picture

22 Oct 2013 - 2:09 pm | सुनील

ओदिशा सफर आवडली. फोटोदेखिल झकासच.

तसे फार्फार वर्षांपूर्वी ओदिशात (तेव्हा त्याला ओरिसा म्हणत) अल्पकाळ वास्तव्य झाले होते. पण ते कामानिमित्त. टूरिस्टांचे ओदिशा फारसे पाहिले गेले नव्ह्ते. ती कसर भरून निघाली!

तसे भुबनेश्वरदेखिल चंडीगडप्रमाणेच आखीव-रेखीव. दोन्ही शहरांचा रचनाकारही एकच फ्रेन्च आर्किटेक्ट. पण चंडीगडचे जसे नाव झाले तसे भुबनेश्वरचे झाले नाही!

तरीही ब्रह्मी लिपी उडियाशी फारच मिळतीजुळती वाटली.

शक्य आहे. माझ्या माहितीनुसार, श्रीलंकेची सिंहली लिपीदेखिल उडियाशी थोडी जुळती आहे. सम्राट अशोकाने आपल्या मुलांना बौद्धधर्मप्रसारासाठी श्रीलंकेत पाठवले होतेच. धर्माबरोबरच लिपीचीदेखिल पाठवणी झाली असावी!

सुधीर कांदळकर's picture

22 Oct 2013 - 4:45 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.
@कंजूस: तरीच मागच्या डब्यातून आमच्यावर शिव्या आणि दगडांचा वर्षाव होत होता. खंडगिरी उदयगिरी प्रथम आराखड्यात होते. ६४ योगिनी मंदीर, खीचकेश्वर मंदीर होते. कालावधी कापऊन कमी केला त्यात गेले. तरी भुवनेश्वरचा टॅक्सीवला त्याच मोबदल्यात दाखवतो म्हणाला होता. पण माझ्या सोबत्यांकडे शक्ती कमी पडली. लौकर थकली मंडळी. लेण्यांच्या दहापण पायर्‍या चढणार नाही म्हणाले. त्यामुळे केले नाही. असो. धन्यवाद.
@ वल्ली: कबूल केलेल्या फोटोबाबद पदरी निराशा आली. लेखात उल्लेख न केलेली मंदिरे आम्ही काही पाहिली नव्हतीच. राजाराणी मंदिराचा इथे न टाकलेला एक फोटो मिळाला. आणि मुक्तेश्वरमध्ये कोरीव कामाचे काही फोटो मिळाले. बाकीच्या फोटोत आम्हीच आहोत. मागचे फारसे काही दिसत नाही. तेवढे मोजून दहा फोटो टाकतो. बाकीबद्दल क्षमस्व.
राजाराणी मंदीर पाठीमागून
राजाराणी मंदीर पाठीमागून

मुक्तेश्वर मंदिरातले कोरीव काम:
मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

खालील चित्रात डाव्या बाजूला तिरप्या उताराच्या मध्यभागी बाहेर डोकावणारे टोक आहे ते भो चिन्ह असावे. जावा सुमात्रा इथून आलेले. अंगकोरला पण आहे म्हणतात. मंदिराच्या शिखराच्या चार बाजूंना चार असतात.
मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

खालील चित्रात पण एक भो चिन्ह दिसते आहे.
मुक्तेश्वर

जसे सभामंडपाला तिथे जगमोहन म्हणतात. त्यावर एकावर एक सपाट मजले ठेवल्यासारखे छप्पर असेल तर ते पीढ जगमोहन तसे तिथे अर्धचंद्राकृतीला चंद्रशाला म्हणतात. मगरींनी केलेल्या कमानीला आपल्यासारखेच मकरतोरण म्हणतात.

हरीशंकरमधील एका उपमंदिरातील खास ओदिशी शैलीतली त्रिमूर्ती अगोदर टाकायची राहून गेली होती.
हरीशंकर

हुमा शिवमंदिरातील एक शिल्प
हुमा शिवमंदिराच्या आवारात

ही त्रिमूर्ती आता आठवत नाही. बहुधा समलेश्वरी मंदिरातली.
समलेश्वरी मंदिरातील आवारात

पुन्हा एकदा सर्वांना शन्यवाद

प्रचेतस's picture

22 Oct 2013 - 7:30 pm | प्रचेतस

धन्यवाद काका.
शिल्पकला अप्रतिमच आहे.

त्या 'भो' चिन्हाला बहुधा डेन्टिल्स म्हणतात. रोमनांकडून आलेला हा प्रकार.

हा बघा टोका -प्रवरासंगम इथल्या मंदिराचा हा फोटो

a

ते आम्ही नाही हो .लोभ असावा .

या माहितीबद्दल धन्यवाद. वस्तुसंग्रहालये आहेत तो विभाग सुंदरच आहे. या भागाच्या पहिल्याच परिच्छेदात तसे मी म्हटलेच आहे. दोन्ही संग्रहालयाची आवारे किती सुंदर आहेत ते तर दिसतेच आहे. सिंहली लिपी जास्त तमिळसारखी आहे. मी २०११ मध्ये जाऊन आलो. हा घ्या सिंहलीचा नमुना.
कॆन्डीतल्या बाजारात

ओडिशा ट्रिप केली आणि यावरचे लेख वाचल्याचे आठवले. वाचकांना पुन्हा वाचण्यासाठी शेवटच्या भागाचा लेख वर काढत आहे. सर्व लिंक्स यात आहेतच.
महाराष्ट्रातून आता अधिकाधिक लोक ओडिशा पर्यटन करतील ही आशा.
मिपाचे अँड्राइड अॅपमुळे हे लेख पटकन शोधता आले. मिपापुस्तकेमध्येही आहे हे कळले.