गालिब का छ्लक़ता़ जा़म
१
गो हाथ को जुंबिश नही, ऑखो मे तो दम है
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे.
आस्वाद- या शेर मध्ये बघा गालिब च एक extreme passion व्यक्त होत आहे.हा आता मरणाच्या दारात टेकलेला आहे,शरीराची अवस्था गलितगात्र अशी झालेली आहे, इतकी की हातांची हालचाल ही करण आता मुश्किल आहे (जुंबिश=हालचाल).तर अशा निपचीत अवस्थेत पडलेल्या गालिब समोरुन जेव्हा कोणी दारुचे पेले उचलुन नेउ लागले तर हमारे साह्ब ने कहॉ अरे रुको हातो मे हलचल नही तो क्या अभी ऑखो मे तो दम है अब हम आख से शराब पिते पिते ही दम छोडेंगे.इसलिये ये शराब से भरे हुए सागर मीना मेरे सामने ही रहने दो.
इथे या सारख च extreme passion असलेली मीराबाइ आठवते तर ती काय म्हणाली होती?
कागा़ मोरा चुन चुन खाइयो मांस, बस अखिया ना खाइयो
इनमे लगी पिया की आस
तो अरे कौए मुझे नोच नोच के खाना कोइ बात नहि बस मेरी अखिया छोड देना क्यो की इनमे मोरे पिया के दर्शन की आस जो लगी है. अर्थात गालिब च passion शराब कडे आहे आणि मीरे च ईश्व्ररा कडे आहे हा फरक आहे. पण passion ची तिव्रता किंवा मनस्वीते मध्ये काही च फरक नाही.
२
मै-ए-इशरत की ख्वॉहिश, साकि-ए-गर्दु से क्या कीजे
लिए बैठा है, इक दो चार जाम-ए-वाशगुं वो भी
आस्वाद- आता इथे काय भन्नाट कल्पना आहे बघा तो म्हणतो की (मै-ए-इशरत=ऐश्वर्यसंपन्न मदिरे ची इच्छा मी साकि-ए-गर्दु (खुदा म्हणजे एक गर्दु तिल आकाशातील (गर्दिश मे का) जणु काही साकी च आहे.याच्या कडुन करु ?( अजिबात करणार नाही करुन काही च उपयोग नाही. याच उत्तर दुसर्या कडव्यात अतिशय गमतीत देतो कि तो साकि-ए-गर्दु (खुदा) तो काय मला शराब पाजणार अहो तो स्व्तःच तर दोन चार खालि उलटे पडलेले रीकामे पेले ( जाम-ए-वाशगुं ) घेउन बसलेला आहे. तर तो काय मला देणार आणि मी काय त्याला मागु. इथे उपरवाले को गालिब ने सीधा साकि और शराबी ही बना डाला. साकि-ए-गर्दु मोठा गोड शब्द आहे.
३
जॉंफिजा है बादा जिसके हाथ मे जाम आ गया
सब लकीरे हाथ की , गोया रग-ए-जॉ होए गयी.
आस्वाद- ये जो जाम है शराब (बादा) का हा जो आहे ना याचि एक खासियत आहे तर ती अशी की हा आयुष्यवर्धक (जॉंफिजा) आहे,म्हणायच अस आहे की हा जाम असा काही आनंद देतो की उमर बढ जाती है जैसे ये हाथ मे आते ही.इतनी खुशी देता है ये की जणु अस होत की
बघा अस म्हणतात ना ज्योतिष शास्त्रा प्रमाणे किंवा इन जनरल ही की हातांवर वेगवेग्ळ्या रेषा असतात जषी भाग्यरेषा इ. तशीच एक जिवनरेखा (रग-ए-जॉ) ही असते ना ( जी माणसाला कीती आयुष्य लाभलेल आहे हे दर्शविते ) तर गालिब म्हणतो की जेव्हा हा जाम हातात येतो याचा स्पर्श हाताला होताच बाकी सगळ्या रेषा सुद्धा जिवनरेषा (रग-ए-जॉ) बनुन गेल्या म्हणजे च एकदम च आयुष्य वाढल की हो!
थोडा शब्दछ्ल
बादा किंवा बादः - याचा अर्थ होतो शराब आता यावरच आधारीत दुसरे शब्द बनतात जसे की बादा-ए-अंगबी म्हणजे मधापासुन बनवलेली मदिरा, बादाचश- म्हणजे केवळ तोंडाची चव बदलण्यासाठी थोडीशी दारु चाखणारा किंवा बादाख्वार म्हणजे शराबी किंवा दारुडा याचा गालिब ने च एका सुंदर शेर मध्ये वापर केलेला आहे तो असा
ये मसाइले तसव्वुफ और ये तेरा बयान गालिब
तुझे हम "वली" समझते, जो न बादाख्वार होता
अर्थ- तुझे हे गंभीर तत्वज्ञान (इश्व्ररीय) आणि अर्थपुर्ण काव्य आणि ही तुझी विलक्षण शैली आम्ही तर तुला साधु-महात्मा (वली) च समजलो असतो जर का तु असा शराबी (बादाख्वार ) नसतास.
https://lh4.googleusercontent.com/-sn8oHkS3_VI/Ulv_GT7w-AE/AAAAAAAAABk/m...
प्रतिक्रिया
17 Oct 2013 - 5:28 pm | मारवा
आता आवरल तरी हरकत नाही
18 Oct 2013 - 7:35 am | वेल्लाभट
मिपा वर मराठी सोडून इतर भाषातील स्वलिखित साहित्य प्रकाशित केलेलं चालेल का? संपादक मंडळास प्रश्न.