कवितेची पार्श्वभूमी:
काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी --
हृदयात सागराच्या फेसाळती लाटा
प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !"
नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला. अडलेलं पाणी आणि अडलेली कल्पना ह्या गोष्टी मोकळ्या होण्यासाठी एखादी फट पुरते, त्यानंतरचा ओघ सोपा होतो. सकाळी उठल्यावर मग अर्ध्या तासात पुढच्या ओळी सुचत गेल्या.
आधी प्राजुला ही कविता कळवली. तिला आनंद झालाच शिवाय तिने ही कविता मिपावर टाकण्यासाठी आवर्जून सांगितलं. अर्थात कुठल्याही इमारतीसाठी पायाचा दगड महत्वाचा ! पायाचा दगड भक्कम देण्यासाठी प्राजुचे आभार :)
तर असा आहे प्राजुच्या ओळींचा कल्पनाविस्तार --
हृदयात माणसाच्या….
हृदयात सागराच्या फेसाळती लाटा
रंगात दिसे अंबराच्या इंद्रधनुषी छटा
सृष्टीत भारलेले प्रेम आणि जिव्हाळा
का हृदयात माणसाच्या द्वे्षाचा दुरावा ?
डोळ्यांत गायीच्या तर वत्सलशी भावना
पंजात वाघाच्याही जगण्याचीच कामना
धुंदीत मोर नाचे येता पावसाचा गारवा
का हृदयात माणसाच्या द्वे्षाचा दुरावा ?
पोटात जरी की धरेच्या अग्नी रस तापला
पारिजात शुभ्र तो, पहाटे दवात भिजला
श्रावणात सभवताल चैतन्य हात फिरावा
का हृदयात माणसाच्या द्वे्षाचा दुरावा ?
संदीप
९/१९/२००८
प्रतिक्रिया
20 Sep 2008 - 1:27 am | शितल
संदीप ,
कविता आवडली रे.
कल्पना विस्तार मस्त जमला आहे.
:)
20 Sep 2008 - 2:49 am | भाग्यश्री
मस्तच!!
भारी आहे बुआ.. कवी लोकं तुम्ही!! :)
20 Sep 2008 - 3:37 am | प्राजु
अख्खाच्या अख्खा इतिहास लिहिलास की रे...!
पण मला खरंच हा कल्पना विस्तार खूप आवडला. सह्ही...!
आणि धन्यवाद. माझ्या कल्पनेला मूर्तरूप दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Sep 2008 - 9:08 am | विसोबा खेचर
सुरेख कविता....!
पोटात जरी की धरेच्या अग्नी रस तापला
पारिजात शुभ्र तो, पहाटे दवात भिजला
या ओळी अतिशय आवडल्या....
संदिप, जियो....!
तात्या.
20 Sep 2008 - 9:11 am | चतुरंग
चतुरंग
20 Sep 2008 - 9:43 am | संदीप चित्रे
शितल, भाग्यश्री, प्राजु, तात्या आणि रंगा...
मनःपूर्वक धन्यवाद :)
20 Sep 2008 - 9:47 am | ऋषिकेश
झकास! कल्पना लै भारी!
(फक्त चालीत अडखळतेय.. पण ते चालतं :))
- ऋषिकेश
20 Sep 2008 - 12:57 pm | मदनबाण
सुंदर कल्पना विस्तार..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
20 Sep 2008 - 5:36 pm | स्वाती राजेश
छान केली आहे कविता...:)
20 Sep 2008 - 9:10 pm | राघव
छान लिहिलेत.
का हृदयात माणसाच्या द्वे्षाचा दुरावा ?
हा प्रश्न आवडला... पण उत्तर नाही देता यायचे इतके सहज. शुभेच्छा!
मुमुक्षु