असले कसले जेवण केले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
22 Sep 2013 - 9:00 pm

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

- डू द लुंगीडान्स, पाभे

------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)
३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
---------------------------
जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी
---------------------------
सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है|

हास्यकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Sep 2013 - 9:13 pm | पैसा

अन्न सुरक्षा कायदा आलाय ना आता! सगळ्या बायका खूश होतील! पण आयटीतल्या नवर्‍यांना चांगले जेवण करता येते असे ऐकले आहे ब्वॉ!

खबो जाप's picture

22 Sep 2013 - 10:15 pm | खबो जाप

एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
--> ज्यांना वाटते कि आयटीत काम करून ऐटीत राहता येयील , पण ज्यांची सगळ्यात ज्यास्त पिळवणूक होते असे.
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
--> वरच्या कवितेत परत येवू नये अशी .
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
--> आयटी पेक्षा ऐटीत राहता येयील अशा बर्याच आहेत.

अवांतर : - शतक पक्क आहे, आयटी च्या धाग्यावर तर सहजच (हलके घ्या :-) )

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2013 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा

------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?>>> जिथे जिथे "ती" बोलते,तिथे!

२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. >>> अत्याधुनिक गुणवैशिष्ठ्यांसह असलेला , एक बहुउपयोगी यंत्र मानव!

(शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.) >>> शिक्षककांन्नो लक्ष द्या हो! ;)

३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.) >>> असं होय.. ! बरं झालं लिवलेलं उत्तर खोडलं.

४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.) >>> आमच्यासाठी (सध्या) वाइड बॉल...! म्हणून सोडुन देणेत येत आहे. ;)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत? >>> मी... मी आहे ना! मी रोज ऐटीत कामाला जातो!

२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत) >>> काय भेंडी प्रश्न आहे? ;)

३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत? >>> आहेत..पण त्याही आजकाल ऐटीत कराव्या लागतात म्हणे!
---------------------------
@जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी >>> आमची जाहिरात केल्याबद्दल धण्यवाद्स! =))
---------------------------
@सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है| >>> और हम मेस'वाले है.. इसिलिये हमे हर दाना अन्न महत्व पूर्णच है!
=====================================

भेदकपाषाण सर, प्येपर सोडवला... मार्क द्या ना! =))

स्पंदना's picture

23 Sep 2013 - 4:31 am | स्पंदना

paa bhe ij bEk!!