अभिप्राय पाहिजे

देवांग's picture
देवांग in जनातलं, मनातलं
5 Sep 2013 - 3:14 pm

काही दिवसांपूर्वी मित्राकडून समजले कि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तेथील रहिवास्यांसाठी हेल्प लाईन चालू केली आहे. तेथील ऑपरेटर तुम्ही ८ ८ ८ ८ ० ० ६ ६ ६ ६ वर फोन केला असता महानगर पालिकेच्या कामासंदर्भात माहिती हवी असेल तर देतो. तुमची काही तक्रार असेल तर ती नोंदवून घेतली जाते. तसेच त्या तक्रारीचा क्रमांक तुमच्या सेल फोन वर येतो. तसेच त्या तक्रारीचे त्वरित निवारण केले जाते.

उदा.

तुमच्या घरासमोर कचरा पडला आहे तर तुम्ही काय कराल? नगरसेवकाला फोन कराल मग त्याने काही केले तर ठीक नाही तर परत त्याला फोन कराल. त्या पेक्षा हेल्प लाईनला फोन करा ते त्वरित कारवाई करून घरासमोरून कचरा उचलून नेतील.

तुमच्या घरी पाहुणे आले आहे त्यांना जवळच्या बागेत फिरायला न्यायचे आहे. पण तुम्हाला माहित नाही कि ती उघडी असेल कि नाही. हेल्प लाईनला फोने करा ते तुमच्या भागामध्ये किती उद्याने, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे आहेत ह्याची माहिती, भेट देण्याच्या वेळा, प्रवेश फी असेल तर सांगतील.

घरात साप शिरला आहे काय करणार, त्वरित हेल्प लाईनला फोने करा, तुम्हाला सर्पोद्यानाचा तसेच पिंपरी चिंचवड मधील सर्प मित्रांचे सेल फोन मिलतिल.

घरात नवीन नळ connection घ्यायचे आहे? कोणती कागद पत्रे लागतात, ती कुठून मिळवावीत? कोठे submit करावीत ह्याची माहिती मिळेल. तुमचा वेळ वाचेल.

तुम्हाला marriage certificate पाहिजे. कुठे मिळेल, काय कागदपत्रे लागतात, appointment कशी घ्यावी? सगळी माहिती एका फोन call वर मिळेल.

घरा समोरचे झाड तोडायचे आहे त्या साठी काय करावे?

२ ४ तास औषधे शहरामध्ये कुठे मिळतील?

water tanker कुठे आणि किती रुपयामध्ये मिळेल?

माझ्या घराजवळ किती हॉस्पिटल आहेत? ते कोणी सुविधा देतात?

शवागृह कुठे आहे? त्याची फी किती आहे? विद्युत दाहिनी कुठे आहे?

अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला महानगर पालिकेकडून देत्यात येतील

महानगरपालिकेने आत्ता पर्यंत २८ department चे frequently asked questions ची यादी त्यांच्या वेब साईट वर प्रसिध्य केली आहे. ज्यांना इंटरनेटचा access नाही ते फोन करून माहिती मिळवू शकतात. महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे कि सर्व नागरिकांना लागणारे फॉर्म फुकट देण्यात यावेत. ते तुम्ही महानगरपालिकेच्या साईट वरून download करून शकता.

www.pcmcindia.gov.in

हेल्प लाईन www.pcmchelpline.in

ह्या उपक्रमाबद्दल तुमचे काय मत आहे?

धोरणप्रतिसाद

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2013 - 3:22 pm | संजय क्षीरसागर

त्यांची सध्या प्राईमिनिस्टरशी चर्चा चालूये. पण हे घ्या

एच्टूओ's picture

5 Sep 2013 - 3:34 pm | एच्टूओ

असे उपक्रम कायमस्वरूपी सर्व महापालिकानी सुरु करायला आणि टिकवायला हवेत...

अनिरुद्ध प's picture

5 Sep 2013 - 3:42 pm | अनिरुद्ध प

+१

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2013 - 3:43 pm | संजय क्षीरसागर

त्यानं कोणतीही कामं सहज मार्गी लागतील असं वाटतं.

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2013 - 3:45 pm | संजय क्षीरसागर

अनिरूद्ध प नां नाही. ते उगीच मधे घुसले.

एच्टूओ's picture

5 Sep 2013 - 3:49 pm | एच्टूओ

आपले पण काही काम असल्यास सांगणे.. :)

देवांग's picture

5 Sep 2013 - 3:50 pm | देवांग

कसले काम ?

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2013 - 4:04 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद! माझं कुणाकडे काही काम नसतं. मी निष्काम कर्मयोगी आहे.

अनिरुद्ध प's picture

5 Sep 2013 - 5:20 pm | अनिरुद्ध प

आम्ही मुम्बैकर सारे सवयीचे गुलाम, मुम्बैतल्या लोकल प्रवासाचा परिणाम्,कारण गाडी पकडण्यासाठी मधे घुसावेच लागते,तसेच निश्काम कर्मयोगी होण्यासाठी भाग्य चान्गले असावे लागते.

मदनबाण's picture

5 Sep 2013 - 4:40 pm | मदनबाण

चांगला उपक्रम !
राज्यात आणि देशात होणार्‍या बलात्कारांच्या विरोधात देखील असे फोन { जे चालु असतील आणि राहतील } द्यावेत.
कारण स्त्रीयांना या हेप्ललाईनची फार गरज आहे.
संदर्भ :- पिंपरी-चिंचवडमध्ये चाललंय काय?

मदनबाण पोलिस खाते महाराष्ट्र शासन चालवते त्यात महानगरपालिका हस्तक्षेप नाही करू शकत. ह्या सुविधांचा आणि बालात्कारांचा संबध जोडू नये.

मदनबाण पोलिस खाते महाराष्ट्र शासन चालवते त्यात महानगरपालिका हस्तक्षेप नाही करू शकत.
मान्य ! पण सुविधा नागरिकांसाठीच दिल्या जातात ना ? त्यात याची भर पडावी असे वाटते. बाकी चालुध्या !

देवांग's picture

5 Sep 2013 - 5:20 pm | देवांग

आता तुमच्या मते आबांनी हे करायला हवे… तुमचा निरोप देतो आबांना.

मदनबाण's picture

5 Sep 2013 - 8:11 pm | मदनबाण

तुमचा निरोप देतो आबांना.
आता इतके कष्ट घेतच आहात तर ते काय म्हणतात हे सुद्धा कळवा बरं का.

चौकटराजा's picture

5 Sep 2013 - 5:03 pm | चौकटराजा

इतर अनेक पालिकांपक्षा पिपरी चिंवचड च्या पालिकेचा कारभार चांगला आहे असा आमचा कयास आहे. मी गेले पंचवीस वर्षे चिंचवड परिसरात आहे. लोक इथून पुण्याला रहायला का जातात हे मला कोडे आहे. ( इथे सदाशिव पेठी सांस्कृतिक
रसिकता मात्र कमी आहे.) महापालिकेनी केलेली ही योजना प्रत्येक महापालिकेत असायलाच हवी. महापालिकेनी निर्माण केलेले रस्ते,मुतार्‍या, व्यायामशाळा नाट्यगृहे ,सभागृहे यांची निगा नीट राखली जावी म्हणून नगरसेवकाचा धावा करायला न
लागता थेट तक्रारीची सोय असणे गरजेचे आहे. ही सेवा अजून वापरून पाहिलेली नाही.

देवांग's picture

5 Sep 2013 - 5:19 pm | देवांग

पूर्ण सहमत :)

ब़जरबट्टू's picture

6 Sep 2013 - 1:21 pm | ब़जरबट्टू

पिंपरी चिंचवड महापालिकेचा या बाबतीतील पुढाकार खरच वाणाखण्याजोगा आहे. मी स्वत: ही सुविधा वापरली आहे, आणि केलेल्या तक्रारीसन्दर्भातील आलेला अनुभव आश्चर्यारीत्या खुप चांगला आहे. ईतक्या चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल हे अपेक्षित नव्हते. तक्रार सम्बन्धिताकडे जाणे, उत्तर मिळाले नाही तर तक्रार उच्च अधिका-याकडे जाणे, फोन करून Feedback घेणे इत्यादी सुविधा खरच अभिनंदनिय आहे. आपली सरकारबद्दलची अनास्था नक्की कमी करते.

पैसा's picture

6 Sep 2013 - 3:51 pm | पैसा

अशी सोय सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका वगैरेंनी करून दिली पाहिजे. महिला आणि मुलांसाठी हेल्पलाईन आहे असे वाटते. बसमधे बोर्ड पाहिले आहेत.