शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न
परशुरामाचा प्रदेश म्हणजे बुद्दीवंताचा प्रदेश अशी ओळख कोकणाची आहे. याच कोकणातून विचारवंत खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेवक, स्वातंत्रसेनानी, कलाकार, लेखक अशा अनेक क्षेत्रांत कोकणपुत्रानी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. अशी ओळख असलेल्या कोकणाची मुंबई ला चाकरमाणी पुरवीणारा प्रदेश अशीही ओळख होती. मनिऑर्डवर चालणारी घरे आठवली तर आजची कोकणाची प्रगती पाहता आपसूक तोंडात बोटे जातात. शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते.त्याच बरोवर दिशा देणारा पालकही असावा लागतो. असा पालक आम्हाला राणे साहेबांच्या रुपाने मिळाला हेही आमचे भाग्य आहे. आमच्या पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाने व प्रामुख्याने सिंधूदुर्ग जिल्ह्याने राज्यात निर्माण केलेला शिक्षण क्षेत्रातील दबदबा याचा मला सिंधूदूर्गवासी म्हणून सार्थ अभिमान आहे. काही वर्षा पूर्वी राज्यात लातून पॅटर्न चा गवगवा होता. मात्र आज राज्यात सिंधूदूर्ग पॅटर्न उदयास येत आहे. त्याने आता बाळसेही धरले आहे. मला समजलेला हा पॅटर्न मी आपणा समोर ठेवत आहे.
या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी व शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घोषित झाला. आणि जिल्ह्याने राज्यात एक नवीन इतिहास निर्माण केला. तिन्ही परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहील्या क्रमांकावर होता. अशी हॅट्रीक या वर्षी झाली होती. प्रत्येक परिक्षेचा निकाल लागल्यावर दुसऱ्या जिल्ह्यातील माझे शिक्षक मित्र मला फोन करून अभिनंदन करत होते. मी पण मोठ्या अभिमानाने अभिनंदन स्विकारत होतो. आनंदाने माझ्या अंगावर मुठभर मासही चढले. मी अंतरमुख होऊन या यशाचे गमक काय ? यावर विचार सुरू केला.मिळालेल्या यशात मोलाचा वाटा आहे तो म्हणजे येथील शिक्षक , पालक व सर्वात मोठा वाटा आहे तो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा. मेहनतीला सोबत असावी लागते ती योग्य मार्गदर्शनाची. यादोन्ही गोष्टी जेव्हा जमून येतात तेव्हा यश स्वत:होऊन चालत येते. हे याच वर्षी यश मिळतय अस नाही मागील तीन वर्षात सिंधुदूर्गाने अशाच प्रकारचे यश संपादन केले आहे. पुण्या मुंबईत शाळे व्यतिरीक्त पालक आपल्या पाल्यास क्लासेस, शिबीरे अशा अनेक मार्गाने मार्गदर्शन मिळावीत असतात.अशी स्थिती या जिल्ह्याची नाही .मुलांचे कौतूक अशा साठी करावेसे वाटते की हे मिळविलेले यश फक्त शाळेत होणाऱ्या अभ्यासावरील आहे.
आज जिल्ह्यात दिले जाणारे शिक्षण फक्त पुस्तकी राहीले नाही विद्यार्थ्यास परीक्षार्थी न बनवता तो विद्यार्थी कसा बनेल या साठी जिल्ह्यात प्रामाणिक प्रयत्न होत असलेले दिसतात. स्पर्धा परिक्षेत आपल्या जिल्ह्याने राज्यात नव्हे तर देशात छाप उमटवली आहे हे बऱ्याच जणाना माहीतही नाही. देशात मानाची मानली जाणारी एन टी एस परीक्षा माध्यमिक स्तरावरील महत्वाची परीक्षा आहे. देशातील १००० प्रतिभावंत विध्याधार्थी देशभरातून निवडले जातात. अशा या सर्वोश्रेष्ठ परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर सिंधुदूर्गच्या ५३ विद्यार्थ्यानी मोहर उमटवली आहे तर याच परिक्षेत राज्यस्तरावर आज पर्यंत ३०० विद्यार्थी निवडले गेले आहेत. इतकेच नाही तर सलग तीन वर्षे सिंधुदूर्गाचे विद्यार्थी राज्यात प्रथम व द्वितीय क्रमांका वर राहीले आहेत. कृणाल मराठे हा राज्यात प्रथम,तर संजोग जोशी यानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर रामप्रसाद ठाकूर हा राज्यात दुसरा आला आहे. यांच्या या यशाची दखल संपुर्ण महाराष्ट्राने घेतली. याचाच परिणाम म्हणून अहमदनगर, पुणे, मुंबई कोल्हापूरचे या जिल्ह्यातील पालक आपापलल्या पाल्यांना घेवून मार्गदर्शनासाठी सिंधूदूर्ग गाठू लागले. ही सर्व किमया केली ती वसूंधरा विज्ञान केंद्राने. वसूधरांने इयत्ता आठवी मधिल विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परिक्षेचे आयोजन केले. या परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी जिल्ह्यातील १०० विद्यार्थी निवडले जातात तर त्यातील ५० विद्यार्थ्यांची अतिंम यादी तयार करून त्याना मार्गदर्शन केले जाते. अशा प्रकारे सिंधुदुर्गतील प्रज्ञावंत निवडले जात आहेत. हेच प्रज्ञावंत पुढे आपल्या जिल्ह्याचे नाव राज्यभर पोचवत आहेत.
जिल्ह्यात एकूण २२० माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ---- शाळांचा निकाल १००% लागला असून गेल्या वर्षा पेक्षा शाळांच्या संख्येत --- वाढ झाली आहे. असा हा उंचावत जाणारा निकालाचा आलेख असाच उचावत जाईल याची आशा आहे. या वर्षी मिळालेले हे यश परीक्षां पुरतेच आहे का?असा सवाल प्रत्येकास पडणे सहाजिक आहे. मात्र जिल्ह्यातील विद्यार्थी हा परिक्षार्थी न बनता विध्यार्थी बनला पाहीजे अशा प्रामाणिक इच्छेने जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहेत. याचाच भाग म्हणून सिंधूदूर्ग जिल्हा परीषदेने या वर्षा पासून २३ शाळात इ लर्नींग प्रोजेक्ट सुरू केला आहे. काही वर्षातच सर्व शाळा या प्रणालित जोडल्या जातील. शहरातील विद्यार्थ्यांच्या तॊडीचा विध्यार्थी तयार झाला पाहीजे म्हणून सेमी इंग्रजी विषय सुध्दा इयत्ता पहीली पासून जिल्हा परिषदेच्या शाळामधून सुरू केला आहे. एका प्रामाणिक इच्छेने सुरू केलेल्या या प्रयत्नाना गोड फळे लागताना दिसत आहेत. त्यास काही जणांकडून विरोधही होत आहे मात्र अशा या चांगल्या उपक्रमांना राजकिय विरोध होता कामा नये इतकीच माफक अपेक्षा. अशा या अनेक विविध स्तुत्य उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होताना दिसत आहे.
चांगले शिक्षण म्हणजे फक्त परिक्षा पास होणे, चांगले गुण मिळवीणे इतका तोकडा अर्थ नाही .शैक्षणिक प्रगती होतानाच सामाजीक ,व आर्थीक प्रगती होत असते. विद्यार्थ्याला सर्वगुण संपन्न व चारित्र्यवान बनविण्यासाठी दिले जाणारे ज्ञान देणे म्हणजे शिक्षण होय. आपल्या या जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वगुण संपन्न बनण्यासाठी नवतंत्रज्ञानाची कवाडे त्याला प्राथमिक शिक्षणापासूनच उघडी करून दिली गेली पाहीजेत व त्याची सुरवात सुध्दा या वर्षा पासून झाली आहे. पारंपारीक शिक्षण पध्दतीत शिक्षकाने शिकवायचे व विध्यार्थ्याने शिकायचे अशी पध्दत होता. शिक्षकांनी दिलेल्या माहितीवर परिक्षा द्यावयाची व पास व्हायचे की विध्यार्थी शिकला असा समज होता. तो समज पुर्णपणे चूकिचा ठरत आहे. मात्र आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाची भूमीका बदलली आहे. शिक्षक आता फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावेल तर विध्यार्थी स्वत: नवतंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या विषयाचे अद्यावत ज्ञान प्राप्त करील अशा मार्गाने जिल्ह्यातील शिक्षणाचा प्रवास होणे आवश्यक आहे. भविष्यात जिल्ह्यातील तरूण पिढी आय पी एस , आय ए एस बनलेली आपणास नक्की दिसेल अशी मला आशा आहे. आपले पालकमंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या स्वप्नातला जिल्हा बनण्यासाठी नक्की मदत होईल. या धावत्या युगात माहीतीचा खजीना एका क्लिक वर आला आहे. तो खजीना प्रत्येक शिक्षकाने आपल्या समोरील भावी पीढी पर्यंत पोचवल्यास साहेबांचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.संगणकाकडे पाहण्य़चा शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन हा बदलला पाहीजे संगणक म्हणजे टाईपरायटर नाही तर ते माहीतीच्या गुहेत घेवून जाणाऱ्या वाटेचे प्रवेशद्वार आहे.या तंत्रज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने केल्यास यशप्राप्ती नक्की होईल अशी आशा आहे. जिल्ह्यास मिळालेल्या या यशास माझा सलाम. असेच घवघवीत यश पुन्हा पुन्हा आपल्या जिल्ह्यास मिळो ही सदिच्छा .
शमशुद्दीन नसिरूद्दीन आत्तार
शिरगाव, ता देवगड
मेल पत्ता : snattar1968@gmail.com
प्रतिक्रिया
5 Sep 2013 - 6:05 am | स्पंदना
शनअत्तार साहेब बरीच ओळख होते आहे तुमच्या लेखणातुन माध्यमिक शिक्षणाबद्दल.
जसे तुम्ही मराठीबरोबर इंग्लिश विषय शिकवायला सुरु करुन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवलात तसेच आणखी एका विषयात रुची वाढवणे अतिशय गरजेचे आहे, अन ते म्हणजे शेती!
नशिबाने तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहात, जेथे अजुन शेती-वाडी शिल्लक आहे. सर्वचजण यशाच्या शिखरावर मावु शकत नाहीत, अन शेतीव्यवसायाबद्दल शाळेपासुनच जर आत्मियता वाढीस लागली तर बरीच सुधारणा घडु शकते या क्षेत्रात. बघा विचार करा. आठवड्याचा एक दिवस शेतावर घालण्यास उद्द्युक्त करा मुलांना. त्यांच्या कष्टातुन उगवलेले धान्य पहायची संधी द्या. नव्या तंत्रज्ञानाने पडलेला फरक जाणवु द्या.
5 Sep 2013 - 8:40 am | नन्दादीप
असेच घवघवीत यश पुन्हा पुन्हा आपल्या जिल्ह्यास मिळो ही सदिच्छा ..........
मी शेठ म. ग. हायस्कूल, माजी विद्यार्थी...
5 Sep 2013 - 9:16 am | चित्रगुप्त
अभिनंदन शनआत्तार साहेब, तुमचे दोन्ही लेख वाचले. आपण इतक्या तळमळीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करत आहात, हे वाचून खूप छान वाटले.
अगदी खरे आहे. आपल्या इकडल्या शिक्षणात एक फार मोठी उणीव आहे, ती म्हणजे कला, साहित्य, संगीत इ. विषयी उत्तम संस्कारांची उणीव. मी माझ्या मुलांचे मित्र (आता मोठे झालेले) बघतो, त्यांना उत्तम चित्रकार, संगीतकार, लेखक, कवी इ.ची नावेही ठाऊक नाहीत, त्यांच्या रचना माहित तर असणे दूरच. याउलट युरोप अमेरिकेतील विद्यार्थ्यांना अगदी लहान पणापासून संग्रहालयात नेऊन अनेक प्रकारची माहिती दिली जाते.
चित्रकलेच्या बाबतीत मी मदत करू शकतो, ती म्हणजे उत्तमोत्तम चित्रे निवडून त्याबद्दल थोडी माहिती असलेला एकादा ब्लॉग बनवून तो विद्यार्थांना दाखवता येइल. याच प्रकारे शाळेत भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत थोडावेळ वाजवले, तर तेही त्यांच्या कानी पडेल.
5 Sep 2013 - 12:51 pm | बॅटमॅन
एकूण उपक्रमाबद्दल आणि यशाबद्दल अनेकोत्तम शुभेच्छा!!
पण
इथे माहिती भरली असती तर अजून बरे झाले असते.
5 Sep 2013 - 9:14 pm | पैसा
एका यशस्वी कार्यक्रमाचा भाग असल्याबद्दल अभिनंदन! आधी लातूर पॅटर्न झाला. आता सिंधुदुर्ग पॅटर्न. या पॅटर्न्सबद्दल अधिक वाचायला आवडेल. साधारण स्कॉलरशिप, १० वी १२ वी अशा परीक्षांसाठी घोकंपट्टी करून रेसचे घोडे तयार केले जातात असा माझा समज आहे. तो चुकीचा ठरला तर आनंदच वाटेल. पण पुस्तकी माहिती मुलांच्या डोक्यात भरण्यापेक्षा अभ्यास कसा करावा आणि तो जास्तीत जास्त आनंददायी कसा होईल हे मुलांना शिकवणे जास्त आवश्यक आहे असे वाटते. अशा परीक्षेसाठी तयार केलेल्या मुलांचे पुढचे करियर फार चांगले होत नाही असे एक निरीक्षण आहे. उलट त्यामुळे मुलांवर तणाव वाढतो. तसे होऊ नये म्हणून तुमच्या पॅटर्नमधे काही उपाय योजना आहेत का?
6 Sep 2013 - 3:39 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत.