मिले सुर मेरा तुम्हारा...

अनुप ढेरे's picture
अनुप ढेरे in जनातलं, मनातलं
15 Aug 2013 - 12:19 am

नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लागणारं हे गाणं माहित नसणारा माणूस विरळाच. अशोक पत्की आणि लुइस बँक्स यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जाहिरात क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव, पियुश पांडे यांनी लिहिलेलं हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं 'मेरे देश की धरती' सारखं स्फुरण चढवणारं नाहिये. किंवा 'ए मेरे वतन के लोगों' सारख डोळ्यात पाणी आणणारं पण नाहिये. हे गाणं मनाला काहिशी हुरहुर लावणारं आहे.

भीमसेन जोशी यांच्यापासून सुरु होणारं हे गाणं आपल्याला ८-९ भाषा वापरून, अनेक अभिनेते, गायक-गायिका, खेळाडू, लेखक यांच्या मार्फत बहुतांश भारताची सफर घडवुन आणते. या गाण्यात भीमसेन जोशी, लता मंगेशकर, बालमुरलीकृष्णन हे गाय़क आहेत. मल्लिका साराभाईं सारख्या नर्तिका आहेत. कमल हसन, अमिताभ, जितेंद्र, ओम पूरी हे अभिनेते आहेत. शबाना आझमी, तनुजा, हेमा मालिनी, वहीदा रेहेमान या अभिनेत्री आहेत. क्रिकेटर किरमाणी आणि हिरवाणी आहेत. अगदी अरूण लाल पण आहे. सह्याद्री, हिमालय, समुद्र, हत्ती, ताज महाल सारं काही आहे. हे गाणं काहिसं आपल्या देशाचं प्रतिबिंब आहे. ज्या तीन गोष्टी या गाण्यात प्रामुख्याने दिसतात त्या म्हणजे संगीत, चित्रपट आणि खेळ. त्याच तीन गोष्टी आपल्या देशाला जोडण्यात महत्वाचा वाटा उचलतात असं मला वाटतं.

२-३ वर्षांपुरवी हेच गाणं नव्या अवतारात लोकांसमोर आलं होतं. काही लोकांना ते आवडलं तर काही लोकांना अजिबात नाही. गाण्याचं नवं रुपडं कसही असो, आत्मा तोच होता. तीच भैरवी सद्रुश्य चाल आणि चित्रपट, संगीत आणि खेळ ही त्रिमुर्ती. मुक्या मुलांनी 'गायलेलं' गाणं ही या नव्या अवतारातली उल्लेखनीय गोष्ट !

मराठी, कन्नड, तमिळ, बंगाली, पंजाबी यापुढे जाउन माझी अजुनही काही ओळख आहे हे वाटण्यालाच राष्ट्रीय भावना म्हणतात का हे मला माहीत नाही, पण हे गाणं आणि त्या भावनेचं काहितरी नातं नक्किच आहे. आता या गाण्यामुळे ही भावना निर्माण होते का ती भावना आपल्यात असते म्हणून हे गाणं आपल्याला आवडतं हे सांगणं कठीण आहे.

१९८८ साली स्वातंत्र्यदिनादिवशी पहिल्यांदा प्रसारित झालेल्या या गाण्याला आज २५ वर्ष पूर्ण झाली.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेछ्छा.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

15 Aug 2013 - 8:39 am | चौकटराजा

वा ! मस्त संदर्भ स्वातंत्र्यदिना निमित्त..

दिपक.कुवेत's picture

15 Aug 2013 - 11:38 am | दिपक.कुवेत

ऑफिसातुन तुनळि दिसत नाहि असो. पण माझ्याकडे जुनं गाणं आहे...एकतो अधुन मधुन

तिमा's picture

15 Aug 2013 - 2:40 pm | तिमा

शायनी अहुजाला धांवताना पहायला खूपच आवडायचं , म्हणून गाणं ऐकू आलं की हातातलं काम सोडून आम्ही टीव्ही कडे धांव घ्यायचो.

कानडाऊ योगेशु's picture

16 Aug 2013 - 3:10 pm | कानडाऊ योगेशु

शायनी अहुजाला धांवताना पहायला खूपच आवडायचं

तुम्हाला शायानी विल्सन (किंवा शायनी अब्राहम) म्हणायचे असावे.

तिमा's picture

16 Aug 2013 - 7:45 pm | तिमा

तुम्हाला शायानी विल्सन (किंवा शायनी अब्राहम) म्हणायचे असावे.
बरोबर! माफीची चुकी असावी.

माझी दोन आवडती गाणी मी भारतीय सैन्याला अर्पण करतो... {दोन्ही गाण्यांचा सैनिकांशी सबंध नाही, दोन्ही गाणी फार वेगळी आहेत... दोन्ही गाणी ही चित्रपटातील आहेत.पण गाण्याच्या व्हिडीयोत मात्र सैनिकांचे फोटो वापरण्यात आले आहेत. हे फ्युजन मला दोन्ही व्हिडीयोंच्या बाबतीत आवडले. }
चित्रपट:- गुलाल
आरंभ है प्रचंड

आरंभ है प्रचंड,
बोले मस्तकों के झुंड,
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या कि जान काहो दान आज,
एक धनुष केबाण पे उतार दो,
आरंभ है प्रचंडमन करे सो प्राण दे,
जो मन करे सो प्राण ले,
वही तो एक सर्वशक्तिमान है,
विश्व की पुकार है ये भागवत का सार हैकि,
युद्ध ही तो वीर का प्रमाण है,
कौरवों की भीड़ हो या पाँडवों का नीड़ हो,
जो लड़ सका है वो ही तो महान है,
जीत की हवस नहीं,
किसी पे कोई वश नहीं,
क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो,
मौत अंत है नहीं तो मौत से भीक्यों डरें,
े जा के आसमान में दहाड़ दो,
आरंभ है प्रचंड...
हो दयाका भाव या कि शौर्य का चुनाव या कि,
हार का हो घाव तुम ये सोच लो,
याकिपूरे भाल पर जला रहे विजय का लाल,
लाल ये गुलाल तुम ये सोच लो,
रंग केसरी होया मृदंग केसरी हो,
या कि केसरी हो काल तुम ये सोच लो,
जिस कवि की कल्पना में ज़िन्दगी हो प्रेम गीत,
उस कवि को आज तुम नकार दो,
भीगती मसों में आज फूलती रगों में आज,
आग की लपट का तुम बखार दो.....
आरंभ है प्रचंड,बोले मस्तकों के झुंड,
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या कि जान काहो दान आज,
एक धनुष केबाण पे उतार दो,
आरंभ है प्रचंड
************************************
चित्रपट :- Naan Kadavul
Om Shivoham

Hara hara hara hara hara hara hara hara Mahadev
Hara hara hara hara hara hara hara hara Mahadev

Om.
Bhairava Rudraya
Maha Rudraya
Kaala Rudraya
Kalpanta Rudraya
Veera Rudraya
Rudra Rudraya
Gora Rudraya
Aghora Rudraya
Maarthanda Rudraya
Anda Rudraya
Brahmanda Rudraya
Chanda Rudraya
Prachanda Rudraya
Thanda Rudraya
Soora Rudraya
Veera Rudraya
Bhava Rudraya
Bheema Rudraya
Athala Rudraya
Vithala Rudraya
Suthala Rudraya
Mahathala Rudraya
Rasathala Rudraya
Talatala Rudraya
Pathala Rudraya
Namo Namaha

Om Sivoham..
Om Sivoham..
Rudra naamam bajeham..

(Chorus)Om Sivoham
Om Sivoham
Rudra naamam bajeham

Veera badraya agni nethraya gora samhaaraka
Sakala lokaaya sarva boothaya Sathya saakshatkara
(chorus)Shambo Shambo Sankara

Om Sivoham
Om Sivoham
Rudra naamam bajeham

(Chorus) Hara hara hara hara hara hara hara hara Mahadev

Sri Rudhra manthras..

Namah somaya cha Rudraya cha Namastamraya charunaya cha Nama shangaya cha pashupataye cha Nama ugraya cha bhimaya cha Namo Agrevadhaya cha dure vadhaya cha Namo hantre cha haniyase cha Namo vrukshebhyo harikeshebhyo Nama staraya Namash shambhave cha mayo bhave cha Namah shankaraya cha mayaskaraya cha Namah Shivaya cha shivataraya cha

Anda brammanda koti
Akhila paripaalana
Poorana jagat kaarana sathya deva deva Priya

Vedha vedhartha saara
yagna yagnomaya
Nishchala dushta nigragha
sapta loga samrakshana

Soma soorya agni lochana
Swetha rishaba vaaghana
Soola pani bujanga booshana
tripura naasha nardhana
Yoma kesa mahaasena janaka
pancha vaktra parasu hastha namaha

Om Sivoham
Om Sivoham
Rudra roopam bajeham

Om Sivoham
Om Sivoham
Rudra naamam bajeham

Kaala trikaala nethra trinethra soola trisoola dhaatram
Sathya prabaava divya prakaasha manthra swaroopa mathram
Nishprapanchaadhi nishkalankoham nija poorna bodha ham ham
Gathya Gathmaagam Nithya Bramhogam Swapna Kasogam Hum Hum

Sachit Pramanam Om Om
Moola Pramegyam Om Om
Ayam Bramhasmi Om Om
Aham Bramhasmi Om Om

Gana Gana Gana Gana Gana Gana Gana Gana
Sahasra Kanta Sapta Viharaki

Dama Dama Dama Dama Duma Duma Duma Duma
Siva Damarugha Nadha Viharaki

Om Sivoham
Om Sivoham
Rudra naamam bajeham

Veera badraya agni nethraya gora samhaaraka
Sakala lokaaya sarva boothaya Sathya saakshatkara
(chorus)Shambo Shambo Sankara

अनुप ढेरे's picture

16 Aug 2013 - 12:25 am | अनुप ढेरे

मस्तं !

जॅक डनियल्स's picture

16 Aug 2013 - 12:32 am | जॅक डनियल्स

+१०^९

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2013 - 10:35 pm | धर्मराजमुटके

पहिले गीत जास्त आवडले. का कोण जाणे पण ते एकदा कैलाश खेर च्या आवाजात ऐकायला जास्त आवडले असते असे वाटते आहे.

लाल टोपी's picture

16 Aug 2013 - 12:10 am | लाल टोपी

अगदी योग्य वेळी एका कालखंडाची आठवण करुन देणा-या धाग्याबद्द ल आभार! स्वतंत्र्यदिनच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा..

नवीन अवतारातले गाणे ऐकवत नाही. तुनळी वर गाणे अर्धवट पाहुन/ऐकुन गाण्याखाली लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचल्यावर दहातले नऊ जण नाराज आहेत (मी सुद्धा त्यातलाच एक) असे समजले.
हे माझे वैयक्तिक मत आहे.

विनोद१८'s picture

18 Aug 2013 - 12:17 am | विनोद१८

ज्याने जुने मिले सुर मेरा तुम्हारा... ऐकले त्याला नवे सुधारीत गाणे आवड्णार नाही हे नक्कीच, कारण त्यामध्ये असणारी'

भीमसेन जोशी, लता मंगेशकर, बालमुरलीकृष्णन

यासारखी रत्ने.

विनोद१८

मनोज श्रीनिवास जोशी's picture

18 Aug 2013 - 12:27 pm | मनोज श्रीनिवास जोशी

भैरवी आहे ती !लेख आवडला.

जुनं मिले सूर मेरा तुम्हारा अप्रतिमच. अनेक प्रख्यात गायक, कलाकार आणि खेळाडूंचा समावेश आणि भारताच्या विविध भागाचं केलेलं सुंदर चित्रण यामुळे फक्त ऐकायलाच नाही तर पाहताना सुद्धा निखळ आनंद देणारं गाणं.
आणि याचं संगीत अशोक पत्कींचं आहे कळल्यावर मराठीबद्दल द्विगुणित झालेला अभिमान तर शब्दातीत.. :)

जुनं मिले सुरच सर्वांत भारी होतं. त्यात सगळेच आवडायचे, पण विशेषतः तेव्हा (आणि आत्ताही बहुतांशी) अगम्य असणार्‍या तमिऴ भाषेत बोलतानाचा बालमुरलीकृष्णा लै आवडायचा. त्याच्या आधीचे पंजाबी "बदलां दा रूप लेके" हे नेहमी "बदलां दारूऽ पलके" असे ऐकल्या जायचे.

"इसैन्दाल, नम्म इरुवरुम सुरमुम नमदागुम.....दिसै वेरिआनालुम...आरिसे आरिगळ मूगिलाई..मऴय्या पोऴ्इ वडुपोल इसै...नम्म इसैइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ" ही शेवटची तान आणि नंतरच्या कट्ट कडकट्टच्या मालिकेबरोबर बरोबर दिसणारा तो हत्तींचा कळपही तितकाच गोंडस.