सच्चिदानंद बाबांची गोष्ट

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 10:58 am

गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो.
"काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो.
"महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे."
संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते.
"उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो.
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.
ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.

शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें ||
सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला ||

अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले.

त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते.

मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती.

विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

15 Aug 2013 - 7:13 pm | प्यारे१

उगीच्च?
चमत्कार या शब्दाला अवतरण चिन्ह देण्याचं कारण समजलं नाही का 'रे धन्या' तुला? त्यातला उपहास पोचला असावा असं वाटत होतं. नाही पोचला. असो.
बाकी पारायणातलं 'तीन दिवसातलं वाचन' करुन कुणी टीका लिहीण्याएवढं 'फास्ट क्रॅश कोर्स वालं 'कुणी नसावं असं 'मला वाटतं.'

बाकी कळावे, लोभ असावा. ( ही नम्र विनंती. ;) )

धन्या's picture

15 Aug 2013 - 7:22 pm | धन्या

चमत्कार या शब्दाला अवतरण चिन्ह देण्याचं कारण समजलं नाही का 'रे धन्या' तुला? त्यातला उपहास पोचला असावा असं वाटत होतं. नाही पोचला.

शिकेल हळूहळू दुनियादारी. तेव्हढं पारायणाचं घ्या ज्ञानेश्वरी "वाचून काढायची" असेल तर. :)

प्यारे१'s picture

15 Aug 2013 - 7:37 pm | प्यारे१

नाही चालत तातडी.
आमची 'श्रद्धा' वर नसेल त्यापेक्षा 'सबुरी' वर जास्त 'भक्ती' आहे. ;)
(पहिल्या दोन अवतरणित शब्दांचा कॉपीराईट: साईबाबा, शिर्डीवाले)

मन१'s picture

14 Aug 2013 - 7:30 pm | मन१

देव्-धर्म्-श्रद्धा विषय तोच तो असला तरी मांडाणी आवदली.
ररांचा प्रतिसाद तसाच त्यांचा जुना लेख(पुनर्जन्माच्या अकाउंट बद्दलचा)सुद्धा आवडला.
तूर्तास इतकेच.

माझ्या लेखावर दिलेल्या प्रतिसादात तुमची सुरूवात अशी आहे:

तरीही या प्रतिसादाच्या निमित्ताने माझी प्रतिवाद करण्याची हौस भागवून घेतो

पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही कारण तुमचं स्वतःचंच मत नक्की नाही. त्या प्रतिसादात शेवटी तर तुम्ही स्वतःच्या लेखनाची जवाबदारी नाकरलीये.

ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे.

थोडक्यात सगळा तुमचा अंदाज आहे. विषय संपला!

तिथे तुम्ही म्हटलंय :

माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात.

तुम्हालाच `सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात' तर या लेखाचं प्रयोजन काय?

आणि पुढे म्हणतायं :

त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा

तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं. तुमचंच नक्की ठरत नाहीये, तस्मात या लेखाला अर्थ नाही.

असो, माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय....असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं काहीही नाही. माझ्या लेखनावर, काहीही अभ्यास नसतांना, इतके दिवस तुम्ही उगीचच तिरकस प्रतिसाद दिलेत इतकंच सांगतो.

पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही कारण तुमचं स्वतःचंच मत नक्की नाही.

तुम्हाला लोकांशी वाद घालण्यात अजिबात रस नसतो हे मला माहिती आहे.

पण मलाच तुमच्याशी काही मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा होता. म्हणून मी तो प्रतिसाद दिला. ज्या गोष्टीचं मला पुर्णतः आकलन झालेलं नाही त्याबाबतीत मी कधीच स्वतःची ठाम मतं बनवत नाही. स्वतःची चूकीची मते रेटण्याईतका कोडगेपणा माझ्यात नाही.

थोडक्यात सगळा तुमचा अंदाज आहे. विषय संपला!

ती घटना जवळपास आठशे वर्षांपूर्वी घडलेली आहे. आठशे वर्षांपूर्वी काय घडले असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. मी म्हणतो तसंच घडलं होतं किंवा तसंच आहे असं रेटून सांगण्यासाठी माणूस कमालीचा दुराग्रही असावा लागतो. मी तसा नाही.

तुम्हालाच `सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात' तर या लेखाचं प्रयोजन काय?

दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो. त्या तथ्यांशाची चर्चा करणे हे या लेखाचं प्रयोजन.

तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं. तुमचंच नक्की ठरत नाहीये, तस्मात या लेखाला अर्थ नाही.

माझं वाक्य असं आहे: त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा

मी जर तर अशी वाक्य रचना केली आहे. एकतर दंतकथा असाव्यात किंवा दंतकथा नसतील तर तर त्यात काही तथ्यांश असून त्यामागे कार्यकारणभाव असावा. तुम्ही म्हणताय तसं "तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं" असं नाही.

माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय....असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं काहीही नाही.

इथे "माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय...." या शब्दरचनेला तुम्ही माझ्या आयटीवरील लेखाचा दूवा दिला आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आयटी हा माझा हातखंडा असलेला विषय आहे असं मी कधीच दावा केलेला नाही. माहिती तंत्रज्ञान ही ज्ञानशाखा हा महासागर आहे. या महासागरातील फार फार तर ओंजळभर पाणी मी उचललं असेल. त्यामुळे या विषयात माझा हातखंडा आहे असं विधान मी कधीच करु शकणार नाही.

माझ्या लेखनावर, काहीही अभ्यास नसतांना, इतके दिवस तुम्ही उगीचच तिरकस प्रतिसाद दिलेत इतकंच सांगतो.

तुम्ही ज्या विषयावर लिहिता त्याचा माझा काहीही अभ्यास नाही असं तुम्ही म्हणताय ते कदाचित तथ्य असेलही. माझे प्रतिसाद तुम्हाला तिरकस वाटले असतील तर मी त्याबद्दल दिलगीर आहे.

ज्याचं स्वतःचंच नक्की ठरत नाही त्याच्याशी चर्चा निष्फळ आहे!

आणि तरीही तुम्ही हा प्रतिसाद देऊन तुमचा बहुमोल वेळ वाया घालवलात.

त्या तथ्यांशाची चर्चा करणे हे या लेखाचं प्रयोजन.

तुम्ही फक्त अंदाज व्यक्त करतायं आणि त्याला तथ्याचा मुलामा देतायं.

त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील.

आणि तुम्हाला पुढे जाऊन रेडा आणि भिंतपण कव्हर करायची आहे, म्हणून म्हणतायं :

त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा

हे वाक्य पाहा :

ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो.

याचा अर्थ, ते चमत्कार नव्हते तर त्यामागे कार्यकारण असावं हे तुम्हाला सुचित करायचंय. आणि तुमचा मूळ हेतू (दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो) तुम्ही पुढे दामटतायं.

अर्थात, गाडी शेवटी पुन्हा चमत्कारावर आणली आहेच :

मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"

मी खरं तर इतकं लिहीणार नव्हतो पण इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता तुमच्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे.

पाश्चिमात्य विमानाचा शोध लावतात आणि `रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे' म्हणजे `ती टेक्नॉलॉजी आमच्याकडे पूर्वीपासनं होतीच' असा मूर्ख स्टँड घेऊन आपण भारतीय स्वतःच हसूं करून घेतो.

ते सेल फोनचा शोध लावतात आणि आपण म्हणतो त्यात काय विषेश? कर्णपिशाच्च्य विद्या तर आम्ही पूर्वीपासूनच जाणतो!

आता तुम्ही म्हणतायं `वी कॅन रेज अ डेड', आणि मी विचारतोयं `कुठेय तो फॉर्म्युला?

फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची, या तुमच्यासारख्या मानसिकतेनं . धड संशोधन नाही की अध्यात्म नाही.

संशोधन नाही कारण आपला विश्वास चमत्कारांवर! आपल्याला सगळं कष्ट न करता फुकट हवंय आणि अध्यात्माची वाट लावलीये कारण उत्तोमोत्तम साहित्याला असले भंपक चमत्कार जोडून ठेवलेत.

तुम्हाला मी काय म्हणतोय ते पटत असेल तर पाहा. `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं. कारण किमान बुद्धी असलेला माणूस देखील म्हणेल, ज्ञानेश्वरी नंतर वाचू, कुठेय तो फॉर्म्युला?
____________________________

माझे प्रतिसाद तुम्हाला तिरकस वाटले असतील तर मी त्याबद्दल दिलगीर आहे

धनाजीराव, तुम्ही अनेक तिरकस प्रतिसाद दिलेत हे तुम्हाला माहिती आहे. पण का कोण जाणे, तुम्हाला तिथल्यातिथे सुनवावं असा मला कधीही वाटलं नाही. तुमची ही दिलगीरी बहुदा मनापासून असावी. माझ्याबाजूनं, आय ऑलवेज लव्ह टू स्टार्ट ऑन अ क्लिन स्लेट, अँड ऑफकोर्स फॉर यू, दॅट इज माय प्रॉमिस.

जे.जे.'s picture

15 Aug 2013 - 8:53 pm | जे.जे.

तुम्हाला मी काय म्हणतोय ते पटत असेल तर पाहा. `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं.

मूर्ख विधान?? हे जरा जास्त होतय. आणि आता तुम्हि केवळ विरोधासाठी विरोध करताय अस दिसतय.

संजय क्षीरसागर's picture

15 Aug 2013 - 11:11 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसादातला शेवटचा भाग तुम्ही पाहा:

धनाजीराव, तुम्ही अनेक तिरकस प्रतिसाद दिलेत हे तुम्हाला माहिती आहे. पण का कोण जाणे, तुम्हाला तिथल्यातिथे सुनवावं असा मला कधीही वाटलं नाही.

लेखकाला उद्देशून मला काहीही म्हणायचं नाही. ते विधानाच्या संदर्भात आहे. आणि लेखकाशी मी केव्हाच सेटल केलंय हे तुम्ही विसरतायं :

तुमची ही दिलगीरी बहुदा मनापासून असावी. माझ्याबाजूनं, आय ऑलवेज लव्ह टू स्टार्ट ऑन अ क्लिन स्लेट, अँड ऑफकोर्स फॉर यू, दॅट इज माय प्रॉमिस.

आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सोडून देतायं

मी खरं तर इतकं लिहीणार नव्हतो पण इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता तुमच्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे.

फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची, या तुमच्यासारख्या मानसिकतेनं . धड संशोधन नाही की अध्यात्म नाही.

संशोधन नाही कारण आपला विश्वास चमत्कारांवर! आपल्याला सगळं कष्ट न करता फुकट हवंय आणि अध्यात्माची वाट लावलीये कारण उत्तोमोत्तम साहित्याला असले भंपक चमत्कार जोडून ठेवलेत.

मला वाटतं चर्चा भरकटवण्यापेक्षा, या अँगलनं ती विधायक होईल.

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2013 - 12:48 pm | प्रभाकर पेठकर

>>>> `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं. कारण किमान बुद्धी असलेला माणूस देखील म्हणेल, ज्ञानेश्वरी नंतर वाचू, कुठेय तो फॉर्म्युला?<<<<

संपादक मंडळ जागे आहे का?

मूकवाचक's picture

15 Aug 2013 - 1:24 pm | मूकवाचक

निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानकाका आणि मुक्ताईला नाथ संप्रदायात अनुक्रमे शिव, विष्णु, ब्रह्मदेव आणि चित्कला शक्तीचे अंशावतार मानतात. अवतार ही संकल्पना उमगली, पटली आणि मनोमन मान्य झाली की कित्येक कोड्यात टाकणारे प्रश्न मुळातच पडत नाहीत. ही संकल्पना नाकारली तर मारूतीच्या शेपटीसारखी प्रश्नांची भेंडोळी वाढतच जाते, पण ज्ञानेश्वर माउली ते स्वामी समर्थ अशा कित्येक विभूतींच्या आयुष्याचे कोडे काही केल्या उलगडत नाही.

अपवादात्मक परिस्थितीत सिद्ध पुरूषाच्या अलौकिक शक्तीचा प्रत्यय काही निवडक भाग्यवंतांना येतो. अशी कित्येक उदाहरणे सर्व काळात, सर्व देशात आणि जगाच्या पाठीवर सगळीकडे नमूद केलेली आढळतात. ती वैज्ञानिक प्रक्रियेसारखी नसतात आणि त्यांची पुनरावृत्ती 'प्रक्रिया' पद्धतीने होत नाही त्यामुळे अशा गोष्टींवर कुणीही सूज्ञ माणूस विसंबून राहणार नाही. अर्थात अशा गोष्टी सरसकट नाकाराव्यात का याबद्दल मतमतांतरे संभवतात.

'प्रक्रिया' पद्धतीनेच प्रत्येक गोष्ट घडते,'सब्जेक्टिव्ह' अनुभवांना काडीचे मोल नाही, ते थोतांड असतात असा आग्रह धरणारे एका बाजूला तर 'प्रक्रिया' पद्धतीला अपवाद असू शकतात,'सब्जेक्टिव्ह' अनुभवांना सरसकट झिडकारता येत नाही, त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहण्यास आणि स्वीकारण्यासही हरकत नसावी असा विचार करणारे दुसर्‍या बाजूला असा वाद होतो. व्हायचाच. असो.

धन्या's picture

15 Aug 2013 - 2:34 pm | धन्या

श्रद्धा आणि चिकित्सा या दोन्ही विरोधी टोकाच्या बाबी आहेत. त्यामुळे सश्रद्धांना आणि विज्ञानवादयांना परस्परांची मते ही "अज्ञान" वाटतात, आपलीच बाजू सत्य वाटते.

परंतू दोन्ही बाजूंनी मनाचा मोकळेपणा दाखवला, विरुद्ध मताबद्दल आदर ठेवला तर खेळीमेळीत चर्चा होऊ शकते.

अध्यात्म असो वा विज्ञान, दोन्हींचं ध्येय मानवी जीवन सुखकर करणे हेच आहे. ज्याला जो मार्ग योग्य वाटतो त्याने तो आचरावा. जी गोष्ट काळाच्या ओघात समाजाला हानीकारक ठरु लागेल त्यावेळी कुणीतरी राजाराम मोहन रॉय, जोतिबा फुले, र. धों समाजातूनच निर्माण होउन त्या समाजहीताला बाधक गोष्टींचा नाश होईलच.

अगदी आजच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्याला काहीजण नावं ठेवत असले तरी खेडयापाडयांमधील लोकांना अंगात येणे, बुवाबाजी, मांत्रिक वगैरे खुळचट गोष्टींच्या कचाट्यातून सोडवण्यात मोठया प्रमाणावर यश मिळवलं आहे.

जी श्रद्धा जगण्याला बळ देते त्या श्रद्धेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. परंतू जी श्रद्धा मानवी जीवनाला धोकादायक ठरते अशी श्रद्धा मग अंधश्रद्धा होते. आणि अशा अंधश्रद्धेविरुद्ध सार्‍यांनीच आवाज उठवला पाहिजे.

अनिरुद्ध प's picture

16 Aug 2013 - 2:14 pm | अनिरुद्ध प

श्रद्धा आणि अन्ध्श्रद्धा यातिल फरक कोणी व कसा करायचा हे मात्र कोणी सान्गत नाही अगदि अनिस सुद्धा नाही आणि भले विज्ञानाच्या गप्पा मारणारे सुद्धा नाहित्,मग आम्च्यासारख्या अतिसामन्य लोकानी काय करायचे?

तिमा's picture

15 Aug 2013 - 1:30 pm | तिमा

आम्हाला एक मूलभूत प्रश्न पडला आहे तो कोणीच कसा विचारला नाही ? 'सच्चिदानंद बाबाला जिवंत केल्यावर त्याला आठ मुले झाली का ? की सन्यास स्वीकारल्यामुळे पुन्हा ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद खोटाच ठरला ?

पहिल्या परिच्छेदात 'काळाचा' खूपच गोंधळ घातला आहे असे वाटते.उदाहरणार्थ,
मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते.

आम्हाला एक मूलभूत प्रश्न पडला आहे तो कोणीच कसा विचारला नाही ? 'सच्चिदानंद बाबाला जिवंत केल्यावर त्याला आठ मुले झाली का ? की सन्यास स्वीकारल्यामुळे पुन्हा ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद खोटाच ठरला ?

ज्ञानदेवांचे समकालिन संत नामदेव हे ज्ञानदेवांचे आद्य चरित्रकार. ते ज्ञानदेवांना प्रत्यक्ष भेटलेले, त्यांच्यासह प्रवास केलेला. या प्रवासात नामदेव आणि ज्ञानदेव यांना तहान लागल्याची गोष्ट तर खुपच प्रसिद्ध आहे. नामदेवांनी ज्ञानदेवांचे जीवनचरीत्र आपल्या अभंगांतून तीन छोटया संहितांमध्ये लिहिले आहे, आदि, तीर्थावळी आणि समाधि.

यातील आदि या नावाने ओळखले जाणारे अभंग मी अजून वाचलेले नाहीत. यामध्ये बहुधा ज्ञानदेवांच्या बालपणाचे वर्णन असावे. तीर्थावळीचे ६२ अभंग आहेत. यामध्ये नामदेव आणि ज्ञानदेव यांनी एकत्र केलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. तर जवळपास ७० अभंग ज्ञानदेवांच्या समाधी घेण्याच्या प्रसंगावर आहेत.

सच्चिदानंद बाबांचे पुढे काय झाले याबद्दल कुठेच काही वाचनात येत नाही. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" असा आशिर्वाद एखाद्या स्त्रीला मिळाल्यानंतर त्या स्त्रीला आठ मुले होतातच असेही कुठे वाचनात नाही. :)

पहिल्या परिच्छेदात 'काळाचा' खूपच गोंधळ घातला आहे असे वाटते.उदाहरणार्थ,
मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते.

तसं झालंय खरं. परंतू लेख अजिबात न कळण्यापेक्षा थोडाफार का होईना पण कळतोय हे तुम्हा वाचकांचे भाग्य नाही का? ;)

दत्ता काळे's picture

15 Aug 2013 - 4:41 pm | दत्ता काळे

जी श्रद्धा जगण्याला बळ देते त्या श्रद्धेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. परंतू जी श्रद्धा मानवी जीवनाला धोकादायक ठरते अशी श्रद्धा मग अंधश्रद्धा होते. आणि अशा अंधश्रद्धेविरुद्ध सार्‍यांनीच आवाज उठवला पाहिजे.
.. हे खरंय.

मला जेव्हा पहिल्यांदा (१९९०, दहावीला असताना) near death experience झाला/आला तेव्हा सॉलिडच हादरलो होतो. कुणाला सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. २००४-२००५ मधे मी इंटरनेटवर अतिंद्रिय बाबींवर काहीतरी वाचत असताना 'near death experience' हे नाव आणि त्याचा कितीतरी लोकांना आलेला अनुभव वाचून थक्क झालो (थोडा निवांतही झालो.).
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला असा अनुभव येत असताना मला कोणी disturb केले नाही. कधी कधी तर मी ४-५ जणांच्या company मधे होतो आणि हा अनुभव १० मिनिट ते ३० मिनिट चालायचा. तरीही! काही निरीक्षणे नमूद करू इच्छितो-
१. असा अनुभवाचे स्वरुप (नक्की काय झाले) बर्यााच अंशी सगळ्या लोकांचे सामान्यतः समानच असते.
२. हा प्रकार खरा आहे. (गृहितक - मी जागा आहे कि स्वप्नात याचे माझे ज्ञान कोणत्याही इतर माणसासारखेच आहे. असे नाही म्हणायला पुरेसे कारण नाही.)
३. या प्रकाराचा आणि मरणाचा काही संबंध नाही. मला असे २०-३० वेळा झाले. पहिल्यांदा वाटले आपण 'गेलोत'. नंतर खूप भिती वाटायची. शेवटी तिही वाटेनाशी झाली. आता तर मला १००% विश्वास आहे कि असा प्रसंग आला तर मला काही होणार नाही.
४. एक मोठा पाईप दिसणे (मोठा या करिता कि आपण त्यात मावतो), त्याच्या दुसर्या टोकातून प्रकाश येणे. टोकाच्या शेवटी कोणीतरी बसलेला असणे (तो माणूस दरवेळी वेगळा असतो. त्याला मी कधीही 'तू कोण आहेस' असे विचारले नाही. पण प्रत्येक वेळेस आम्ही एकमेकांना काही प्रश्न विचारतो. कधी त्याचा चेहरा दिसतो कधी नाही. माझ्या ओळखीचा कोणी कधी नव्हता.) मी त्या माणसाला 'मी जिवंत आहे का?' असे विचारतो. तो नेहमी irrelevant प्रश्न विचारतो. पाईपच्या त्या टोकाशी जायला फार भिती वाटते. पण आपण ढकलले जात असतो. टोकापलिकडे गेल्यावर परत येणे नाही अशी धारणा होते. पण आपण परत येतोच! सहसा असाच हा एकूण अनुभव असतो.
५. आपण पाईपात मरत नाही तर त्याच्या पलिकडेही मरणार नाही म्हणून मी एकदा त्या टोकाला जाऊन उडी मारली. लख्ख प्रकाश! काही दिसत नाही. परत काही वेळाने आपण पाईपच्या मुखाशी येतो.
६. कधी कधी पाइपाबाहेरचा पण near death experience असतो. त्यात आपण उंच अवकाशात उड्या मारत पण कधीही transmission line, तळे, समुद्र यांत न पडता ऐनवेळी ठीक जमिनीवर पडतो.
७. हा प्रसंग चालू होतो तेव्हा आपला देह सोलटला जाऊन (वेदना न होता) दोन 'आपण' झाले आहेत अशी अवस्था येते. त्यातला एक देह मेंदूच्या पूर्ण नियंत्रणात असतो आणि दुसरा त्याच्या मनाप्रमाणे अंशतः वागतो. पण असा विलग झालेला देह अंततः मूळ देहाशी येऊन विलिन होतो. कधीकधी खेचावा लागतो.
८. डॉक्टर म्हणतात तुमच्या सामान्य जीवनात काही फरक पडत नाही ना? मग कशाला चिंता करता? Neuro, psycho नी याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. मलाही आता या प्रकरणात स्वारस्य नाही. यात घाबरण्यासारखे काही नाही, माझ्यात दोषपूर्ण काही नाही असा पुरेसा दिलासा विज्ञानाने दिला आहे.
९. माझ्या व्यक्तित्वात असे काही का जेणेकरून असा मलाच अनुभव आला असा मी बरेचदा विचार केला. मला दोन बाबी आढळल्या-अ.(निष्कारण) खोल विचार करणे आ. पराकोटीचे अश्रद्ध मन. अर्थात असे असणारे बरेच लोक आहेत पण त्यांना असे होत नाही.

संजय क्षीरसागर's picture

17 Aug 2013 - 1:12 am | संजय क्षीरसागर

इट प्रूवज ओन्ली वन थिंग, near death experience वाल्या माणसाला आपोआप उठून बसता येतं, कुणाही सिद्धाची गरज नाही.
तस्मात, लेखातली घटना, (लेखकाच्या तर्काप्रमाणे) near death experience असेल तर `द डेड वॉज नॉट रेज्ड अ‍ॅट ऑल! आणि मग लेखाला अर्थच उरत नाही.

धन्या's picture

17 Aug 2013 - 11:16 am | धन्या

तस्मात, लेखातली घटना, (लेखकाच्या तर्काप्रमाणे) near death experience असेल तर `द डेड वॉज नॉट रेज्ड अ‍ॅट ऑल! आणि मग लेखाला अर्थच उरत नाही.

धन्यवाद सर.

तुमच्यासारख्या स्वतःची लेखनिक कारकिर्द असणार्‍या ज्ञानी व्यक्तीने ज्याअर्थी हे लिहिलंय तर त्यात नक्की तथ्य असणार. इतरांसारख्या माझ्या लेखावर नुसत्या पिंका न टाकता तुम्ही दुनिया काय म्हणेल, धागाकर्त्याला काय वाटेल याचा विचार न करता तुमचे परखड मत मांडलेत याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

मला माझी चुक कळली आहे. इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता माझ्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे आपण याच धाग्यावरील प्रतिसादात व्यक्त केली आहे, त्याचा अर्थ आता मला कळतोय.

माझ्यासारख्याच्या मानसिकतेनं फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची. धड संशोधन नाही की अध्यात्म नाही. खरं आहे सर हे तुमचं म्हणणं.

पण मला आता बदलायचं आहे. मला त्यासाठी मार्गदर्शन हवं आहे. या जिकडे तिकडे पिंका टाकत फीरणार्‍यांचा भरणा असणार्‍या संस्थळावर मला फक्त एक तुम्हीच काय ते सुज्ञ आणि ज्ञानी दिसत आहात. मला तुमचे मौलिक मार्गदर्शन लाभेल का? तसं झालं तर मी कृतकृत्य होईन, शुन्य होईन. मी ही निराकार होईन.

सर कराल ना माझ्यासाठी एव्हढं. माझं हे भरकटलेलं तारु किनार्‍याला आणण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे. फक्त तुम्हीच अवघड ते सोपे करुन सांगू शकता.

ज्ञानी पुरुष फक्त चुक दाखवून थांबत नाहीत. तर ते चुक सुधारण्याचा मार्गही दाखवतात असं मी कुठेतरी वाचलं होतं. सर तुम्हीही माझी चुक दाखवून थांबू नका. मला माझी चुक सुधारण्याचा मार्गही दाखवा.

कराल ना सर माझ्यासाठी एव्हढं?

इतक्यातच शस्त्र खाली ठेवले का !

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 12:50 pm | प्रभाकर पेठकर

धन्यासाहेब,
तुमची व्यथा समजू शकतो. मनांत कटूता येऊ देऊ नका.

"लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण" अशीच गत झाली म्हणायची माझी.

संजय क्षीरसागर's picture

18 Aug 2013 - 7:57 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या या विधानात

तुम्ही दुनिया काय म्हणेल, धागाकर्त्याला काय वाटेल याचा विचार न करता तुमचे परखड मत मांडलेत याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

सारी व्यथा पोहोचली.

इंटरनेट या अत्यंत प्रभावी माध्यमाचा केवळ मनोरंजनासाठी उपयोग व्हावा असं मला तरी वाटत नाही. निदान मराठी माणसाचा दृष्टीकोन तरी वस्तुनिष्ठ आणि वैज्ञनिक व्हावा या हेतूनं सगळं लिहीलंय. तुम्ही ते व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा होती.

अशा वेळी भावनाविवश होण्यात काय पॉइंट ? माझ्या दृष्टीनं विषय संपला होता.

तुम्ही तर त्याही पुढे गेलात आणि नवा लेख लिहीलात. (तुमचा तो हेतू नसावा अशी आतापर्यंत आशा होती पण वर तुम्ही स्वतःच म्हणतायं). एकच सांगतो, भावनाविवश होऊन तुम्ही स्वतःची समजूत काढतायं, वास्तविकात तसं काही नाही.

टू बी वेरी स्ट्रेट, तुमच्या जागी जर मी असतो, आणि इतक्या घाऊक स्वरूपातल्या माझ्या भावनिक धारणा कुणी व्यर्थ ठरवल्या असत्या, तर मला आनंद झाला असता. कारण धारणा मुक्ती हीच तर खरी अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ती तुम्हाला धारणारहित चित्तदशेप्रत नेते. तुम्हाला निर्भार करते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Aug 2013 - 9:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

टू बी वेरी स्ट्रेट, तुमच्या जागी जर मी असतो, आणि इतक्या घाऊक स्वरूपातल्या माझ्या भावनिक धारणा कुणी व्यर्थ ठरवल्या असत्या, तर मला आनंद झाला असता. कारण धारणा मुक्ती हीच तर खरी अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ती तुम्हाला धारणारहित चित्तदशेप्रत नेते. तुम्हाला निर्भार करते.

अरेरे… म्हणजे तुम्हाला आनंद मिळण्याचा एक मार्क बंद झाला. शिवाय ती "खरी अध्यात्मिक प्रक्रिया" तुम्हाला यापुढे कधीही अनुभवता येणार नाही. काय हा दैवदुर्विलास !!!

शिवाय ती "खरी अध्यात्मिक प्रक्रिया" तुम्हाला यापुढे कधीही अनुभवता येणार नाही?

इथे लेखक निरूत्तर झाल्यानं भावनाविवश झाला आहे. इतक्या उघड गोष्टीवर पुन्हा सारवासारव करून काय उपयोग?

असो, या निमित्तानं एक सांगावसं वाटतं, कंपूबाजी करून चुकीच्या गोष्टी बरोबर ठरत नाहीत. उलट तुम्ही जास्त उघडे पडता.

माझ्या लेखनावर सारखा गोंधळ का होतो याचं उत्तर देखिल तुमच्या(सारख्यांच्या) प्रतिसादातून आणि लेखनातून स्पष्ट होतं.

वास्तविकात, या लेखातले निष्कर्श संपूर्ण चुकीचे आहेत तरीही, पदार्थवाचक नांव असणार्‍या एका सदस्यानं माझ्या लेखावर, `तुम्हाला काँप्लेक्स आला असावा' असा दिव्य अंदाज काढला. या लेखाची सद्य परिस्थिती बघून तो किती बाळबोध होता हे लक्षात येईल.

दरम्यान मला एका वेगळ्या कारणासाठी व्य. नि. आला आणि त्यात, माझ्याविषयी इथे कायकाय गैरसमज पसरले आहेत (का पसरवले गेले आहेत?), ते सांगितलं.

त्याला उत्तर देतांना, त्या गैरसमजात काहीही तथ्य नाही, तशी शक्यता या जन्मी तरी नाही. आय लीव इन टोटल सेलिब्रेशन असं सांगून, माझा दिनक्रम आणि इतर व्यक्तिगत माहिती मी दिली आणि तो व्य.नि. `कंपूलाही पाठवा' (म्हणजे त्यांना प्रकाश पडेल) असं सांगितलं. आणि नंतर दोन दिवस ट्रीपला गेलो.

इथे येऊन पाहतो तर काय आश्चर्य? नार्सिसिझमवरच्या लेखाचा रोख `नक्की कुणाकडे आहे' ते खुद्द लेखकानंच कबूल केलं (लोकासांगे ब्रह्मज्ञान)! अशाप्रकारे तुम्ही जास्तजास्त उघडे पडत जाता.

थोडक्यात काय तर `मेजर डिस-कनेक्ट, तज्ञांची मदत' ... ते पार पीडा, वगैरे फालतू जादूचे प्रयोग माझ्यावर करणं मूर्खपणा आहे.

यापूर्वी इथे एका सदस्येनं (अर्थात, `सो कॉल्ड अध्यात्मिक' सदस्यासाठी) माझ्यावर `दुफळी' वगैरे शब्दप्रयोग करून, माझं इथलं लेखन बंद पाडण्याचे निकराचे प्रयत्न केले आहेत (ते प्रतिसाद नंतर आश्चर्यकारकपणे गायब झाले). पण या प्रकारात तुम्ही, तुमची मानसिकता माझ्यावर लादतायं किंवा स्वतःचं सांत्वन करतायं (नार्सिसिझम) इतकंच.

जो मनासारख्या विषयावर स्वतःची लेखमाला सुरू करू शकतो त्याला तुम्ही स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमधे अडकवणं अशक्य आहे.

पण त्याही पुढे जाऊन, माझ्या लेखावर गोंधळ घालून इतरांची दिशाभूल करणं, तुमचं अस्वास्थ्य कमी करेल हा भ्रम सोडून द्या. त्यापेक्षा शांतपणे ते लेख वाचून त्यावर विधायक चर्चा घडू दिली तर ती संकेतस्थळाला उपयोगी ठरेल (आणि कदाचित तुम्हालाही उपयोग होईल).

उदाहरणार्थ `नार्सिसिझम' हा लेख प्रकाशित करून लेखकानं, व्यक्तिगत निराशेपायी इतरांचा वेळ घेतला आणि (माझ्याविषयी) दिशाभूलही करण्याचा प्रयत्न केला, हे अयोग्य आहे.

साहेब,
आपल्या अगाध ज्ञानापुढे,आम्ही काही मत व्यक्त करणे म्हणजे सुर्यापुढे काजव्याने टिमकी वाजवण्यासारखे आहे,तरिसुद्धा आपल्याविशयी काही उणे अधिक लिहिले गेले असेल माफी असावी,आणि मनावरच्या चन्चलतेवर सय्यम,ठेव्ण्यासाठीचे ज्ञान देण्याची या पामरावर क्रुपा करावी,जर हे ज्ञान जर आम्हास्,शक्तीपाताने दिले गेले तर तो एक चमत्कारच गणला जाईल.

कारण नसतांना तुम्ही काहीही कमेंटस करता आहात आणि हे ५/७ वेळा झालं आहे. थोडक्यात तुम्हाला पुरेशी सूट दिली आहे. तस्मात, उगीच पिंका टाकणे थांबवावे.

अनिरुद्ध प's picture

19 Aug 2013 - 7:19 pm | अनिरुद्ध प

शक्तिपात हा फिजीकल प्रकार आहे,हे जर माहीत असते तर्,असे लिहीले नसते,आणि मी आप्ल्याला ज्ञान देण्याची विनन्ति केली होती,आणि जर माझे म्हणणे जर आप्ल्याला त्रासदायक वाटत असेल्,तर या पुढे आपल्या भाषेत पिन्का न टाकण्याची खबरदारी अवश्य घेतली जाईल.

संजय क्षीरसागर's picture

19 Aug 2013 - 7:54 pm | संजय क्षीरसागर

मनःपूर्वक आभारी आहे.

अवतार's picture

17 Aug 2013 - 3:23 pm | अवतार

शहाण्यांना पुरेसा असतो धनाजीराव! हे कळण्याइतपत शहाणपण तुम्हाला आले असेल असे वाटले होते. पण तुमच्या प्रतिसादातून तुमची चित्तदशा संभ्रमित झाल्याचेच उघड झाले आहे.
प्रतिसाद सोडा हो तुम्ही
एक शब्द नव्हे
एक अक्षर नव्हे नव्हे
किंबहुना पूर्णविराम, स्वल्पविराम, अनुस्वार, उद्गारवाचक चिन्ह (आणि अर्थातच) प्रश्नचिन्ह
अशी नुसती विरामचिन्हे जरी टाकलीत तरी त्यातून तुमचा अभ्यास शून्य असणे, तुमचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित असणे, तुम्ही पराभूत होणे इत्यादी गोष्टी आपोआपच जगजाहीर होणार आहेत. इतकेच काय तुम्ही लेख म्हणून नुसतीच ब्ल्यांक स्पेस जरी टाकलीत तरी देखील ह्याच सर्व गोष्टी उघड होणार आहेत.
किंबहुना मिपाचे सदस्यत्व घेऊन तुमच्या ह्या अज्ञानाचे प्रदर्शन करणे हीच तुमची फंडामेंटल चूक आहे.

आता नीट वाचून बघा बरे का धनाजीराव, ह्या संपूर्ण प्रतिसादात "मी तुम्हाला तुच्छ लेखत आहे" असे मी कुठेही लिहिलेले नाही. तेव्हा हा व्यर्थ आरोप माझ्यावर करून संपादक मंडळाला वेठीला धरू नका.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Aug 2013 - 11:47 am | विश्वनाथ मेहेंदळे

Near death experience आणि hallucinations यात नक्की काय फरक आहे ?

धन्या's picture

17 Aug 2013 - 11:57 am | धन्या

Near death experience इज स्पेशल टाईप ऑफ hallucinations :)

नगरीनिरंजन's picture

15 Aug 2013 - 9:31 pm | नगरीनिरंजन

बाबांची गोष्ट फारच लांबली नाही :)

जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा मग लांबणं आणि थोडक्यात आटपणं यात फरकच उरणार नाही.

स्पा's picture

19 Aug 2013 - 3:06 pm | स्पा

ओक्के
नवग्यानी बाबा

म्हैस's picture

21 Aug 2013 - 2:46 pm | म्हैस

@अनिरुद्ध प - तुम्हाला कोणी सांगितलं शक्तिपात हा फिजीकल प्रकार आहे म्हणून?
मला वाटतंय अर्धवट न्यानाच्या जोरावर आपण प्रतिक्रिया देत आहात.
मला इथे काही मुद्दे मांडावेसे वाटत.
१. अध्यात्माचे नियम विज्ञानाला लागू होत नाहीत तसेच विज्ञानाचे नियम अध्यात्माला लागू होत नाहीत
२. ह्दय बंद पडल्याने मृत्यू होत नसतो. मेंदू बंद पडल्यावर मृत्यू होतो.
३. डॉक्टर फक्त त्या मुलीला शुद्धीवर आणायचा शक्य तो प्रयत्न करत होते. त्यांना खात्री नवती कि ती मुली खरोखर उठेल.
४.ज्ञानेश्वर महाराज अत्यंत आत्मविश्वासाने त्या माणसाला फक्त डोक्यावर हाथ ठेवून अत्यंत आत्मविश्वासाने उठ म्हन्तायेत.
५. मुलीचं ह्दय बंद पडून फक्त ४१ मिनिटे झाली होती. त्या माणसाची प्रेतयात्रा चालली होती त्या अर्थी त्याला मारून किमान ५-६ तास तरी झाले असणार. सगळे नातेवाईक जमले असतील. रडून गागून झाला असेल. त्यात किती वेळ गेला असेल.
६. मी इथे अंध श्रद्धेला पाठींबा देत नाहीये. खऱ्या योग्सामार्थ्याच्या बाजूने बोलतेय.

अनिरुद्ध प's picture

21 Aug 2013 - 3:28 pm | अनिरुद्ध प

मी कुठे असे म्हणालो की शक्तिपात फिजीकल आहे?ही दुसर्याकोणीतरि दिलेली पळवाट आहे,हे आपल्याला धागा नीट वाचल्यावर कळेल्,तसेच त्यातल्या भाषेतला फरक कळेल असो याबाबत जर आपल्याला काही उध्रुत करायचे असेल तर जरुर व्य नि करा अथवा ख व मध्ये नोन्द करा.

धन्या's picture

21 Aug 2013 - 6:53 pm | धन्या

१. अध्यात्माचे नियम विज्ञानाला लागू होत नाहीत तसेच विज्ञानाचे नियम अध्यात्माला लागू होत नाहीत

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. निसर्गाचे नियम सांगणारे शास्त्र. त्यामुळे जे जे विज्ञान मांडतं ते ते पूर्व अटींची पुर्तता झाली या विश्वातील प्रत्येक गोष्टीला लागू होतं.

तुमची अध्यात्माची व्याख्या सांगितलीत तर यावर सखोल चर्चा करता येईल.

मुद्दा २ आणि ३ बरोबर आहेत.

४.ज्ञानेश्वर महाराज अत्यंत आत्मविश्वासाने त्या माणसाला फक्त डोक्यावर हाथ ठेवून अत्यंत आत्मविश्वासाने उठ म्हन्तायेत.
५. ... त्या माणसाची प्रेतयात्रा चालली होती त्या अर्थी त्याला मारून किमान ५-६ तास तरी झाले असणार. सगळे नातेवाईक जमले असतील. रडून गागून झाला असेल. त्यात किती वेळ गेला असेल.

ही जवळपास आठशे वर्षांपुर्वी घडलेली घटना आहे. त्यावेळी अगदी असंच घडलं असेल हे तुम्ही कशावरुन म्हणता?

६. मी इथे अंध श्रद्धेला पाठींबा देत नाहीये. खऱ्या योग्सामार्थ्याच्या बाजूने बोलतेय.

"खऱ्या योग्सामार्थ्याचा" तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहे का? असे योग सामर्थ्य असणारी व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? की ही तुमची ऐकीव्/वाचलेली माहिती आहे?

म्हैस's picture

23 Aug 2013 - 3:01 pm | म्हैस

त्या असामान्य अशा मुलांना पोषक असं वातावरण बालपणी मिळाल्यावर ती बुद्धीमत्ता, प्रतिभाशक्ती अजून उजळून
निघणं यात चमत्कार कसला?????
अरे देवा. ह्या माणसाला ज्ञानेश्वराचा बालपण माहित नाही ??????????? ह्या माणसाला खरच काहीच माहित नाहीये.. कशाला उगीच प्रतिक्रिया देतो हा.
ह्यांनी म्हणे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्हीही दोन्हीही वाचलंय पण त्यांना काहीच कळलं नाही.......... हा हा हा
ह्यांना एवढा सोप्या भाषेत, संदर्भासहित स्पष्टीकरण देवून लिहिलेली ज्ञानेश्वरी समजत नाही. आणि हे म्हन्तायेत संस्कृत गीतेचा निरुपण हा चमत्कार नाही.
तुम्ही खरच आधी अभ्यास करा हो आणि मग प्रतिक्रिया देत जा. . please विनंती आहे.

धन्या's picture

23 Aug 2013 - 4:02 pm | धन्या

अरे देवा. ह्या माणसाला ज्ञानेश्वराचा बालपण माहित नाही ??????????? ह्या माणसाला खरच काहीच माहित नाहीये.. कशाला उगीच प्रतिक्रिया देतो हा.

तुम्हाला ज्ञानदेवांच्या बालपणाबद्दल काय माहिती आहे? तुम्हाला जी काही माहिती आहे ती तुम्हाला कुठे मिळाली?
राहिली गोष्ट मी प्रतिसाद देण्याची. माझी माहिती, माझी मते चुकीची असू शकतात. पण ती चुकीची असतील तर तुम्ही तसे दाखवून दया.

ह्यांनी म्हणे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्हीही दोन्हीही वाचलंय पण त्यांना काहीच कळलं नाही.......... हा हा हा
ह्यांना एवढा सोप्या भाषेत, संदर्भासहित स्पष्टीकरण देवून लिहिलेली ज्ञानेश्वरी समजत नाही.

असं मी कुठेही म्हटलेलं नाही. मी फक्त एव्हढंच म्हटलंय की "माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत."

आणि हे म्हन्तायेत संस्कृत गीतेचा निरुपण हा चमत्कार नाही.

ज्ञानेश्वरीचे साहित्यमुल्य अनमोल आहे यात शंका नसली तरी ज्ञानेश्वरी ही भगवदगीतेवरील एकमेव टीका नाही. अगदी ज्ञानदेवांचे लहान भाऊ सोपान यांनीही "सोपानदेवी" नावाने भगवदगीतेवर टीका लिहिली आहे. यात चमत्कार कसला?

तुम्ही खरच आधी अभ्यास करा हो आणि मग प्रतिक्रिया देत जा

मी अभ्यास करुनच लिहितोय. उचल बोट आपट कीबोर्डवर असं करत नाही.

please विनंती आहे.

अशी विनंती करण्यापेक्षा माझे म्हणणे तुमच्या मुददयांनी खोडून काढा.

पिलीयन रायडर's picture

23 Aug 2013 - 4:33 pm | पिलीयन रायडर

प्रतिसादाचा टोन अजिबात पटला नाही.
जी काही असेल ते मुद्द्यात मांडा.. नुसतेच हा हा न हि ही करुन अक्कल काढल्या सारखं का लिहीताय?
तुम्हाला वाटत असेल "ज्ञानेश्वर" चमत्कार.. काहींना ती निसर्गदत्त असामान्य प्रतिभा वाटु शकते. ज्यात चमत्कार तो काय? अनेक लोकांची बुद्धिमत्ता सर्वसामान्यां पेक्षा खुप जास्त असते. पण तसे होण्यास नक्की काही शास्त्रीय कारण असेलच.. अगदिच अनाकलनीय वाटावा असा प्रकार वाटत नाही.
ह्या उप्परही.. हे आपापले मत आहे. तसे मत असण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.

म्हैस's picture

23 Aug 2013 - 5:58 pm | म्हैस

हा आता कसं बोललात. लहानपणापासूनच अध्यात्माची आवड. आणि वाचनाच प्रचंड वेड. आजपर्यंत इतकी पुस्तके पचली आहेत कि कुठे, कधी, काय वाचलंय हे आठवत नाही. अनेक पुस्तके मी विकत आणलीयेत. अनेक library मधून घेवून वाचलीत. आता ह्या वीकेंड ला त्या पुस्तकांची नावं आणि लेखाच्या लिनक्स शोधून काढते. मग देते तुम्हाला.

धन्या's picture

23 Aug 2013 - 6:29 pm | धन्या

धन्यवाद.

पुस्तकांची नावे सांगा, लिन्का दया. पण त्याबरोबरच तुमचे आकलनही लिहा. पुस्तकं मी ही खुप वाचली आहेत. अगदी हजारात म्हणण्याईतकी. पुस्तकांची नावे सांगण्यापेक्षा किंवा लिन्का देण्यापेक्षा तुम्हाला काय समजले ते इथे लिहा. आम्ही वाचायला उत्सुक आहोत.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या मुख्य प्रश्नाला बगल देत आहात. तुमच्या दृष्टीने अध्यात्म काय आहे ते लिहा.

म्हैस's picture

23 Aug 2013 - 6:00 pm | म्हैस

Sorry पचली नाहीत. वाचली आहेत.

म्हैस's picture

24 Aug 2013 - 3:36 pm | म्हैस

ही जवळपास आठशे वर्षांपुर्वी घडलेली घटना आहे. त्यावेळी अगदी असंच घडलं असेल हे तुम्ही कशावरुन म्हणता?

मग ज्ञानेश्वरांकडे योगसामर्थ्य नवतं हे तुम्ही कशावरुन म्हणता?

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. निसर्गाचे नियम सांगणारे शास्त्र. त्यामुळे जे जे विज्ञान मांडतं ते ते पूर्व अटींची पुर्तता झाली या विश्वातील प्रत्येक गोष्टीला लागू होतं

आपण आधी स्वताचा गैरसमज दूर करा. विज्ञानाला अति असतात. परा विज्ञान ( अध्यात्मिक ज्ञान ) अटींमध्ये बांधलेलं नाहीये. ते मुक्त आहे. विज्ञान जिथे संपतं, ईश्वरी सत्ता तिथून चालू होते. हे अगदी खरं आहे.

पुस्तकांची नावं, लिंका ह्या फक्त तुम्च्या माहितीसाठी आहेत. तुम्हाला योग्य तो मार्ग सुचवण्यासाठी. मी ह्या आधीही सांगितलंय दुसरा कोणीही तुम्हाला अनुभव देवू शकत नाही. तो आपला आपणच मिळवायचा असतो. मला जे समजायचं होतं ते मला समजलंय. तुम्हाला स्वताला काय समजतंय ते महत्वाचा आहे न.
खरं योगसामर्थ्य असलेल्या अनेक व्यक्तींच्या मी संपर्कात आली आहे. मी स्वतः भगवद्गीतेत सांगितलेल्या योगमार्गाची साधक आहे.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा. माझ्या द्रीष्टीने अध्यात्म म्हणजे ईश्वराला जाणणे. स्वताला जाणणे. आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान , योगसामर्थ्य काय आहे ह्याचा स्वतः अनुभव घेणे.

हे समजले नाही जरा उध्रुत करुन सान्गाल का? त्य योगे अर्धवट माहितीचा निपात होउन मला देखिल पुढे वाट्चाल करण्यास मदत होइल.

अग्निकोल्हा's picture

27 Aug 2013 - 1:19 pm | अग्निकोल्हा

मी स्वतः भगवद्गीतेत सांगितलेल्या योगमार्गाची साधक आहे.

ओसम! काय आहे हा ? जाणुन घ्यायला (निसत वाचायला न्हवे तर आपल्या जाणिवांच्या पातळिवरुन उमजायला) नक्कि आवडेल.

नुकताच लोहगडाच्या विंचूकाटा नामक बुरुजावर ध्यानस्थ बसलो असताना आपण "अवतारी" पुरुष/स्त्री असल्याचा साक्षात्कार मला झाला.

तस्मात मी इथेच थांबतो. "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 12:50 pm | बॅटमॅन

गुरुदेव रानड्यांसारख्यांनीही निसर्गनियमाविरुद्ध चमत्कार होणे अशक्य आहे असेच सांगितले आहे.

अनिरुद्ध प's picture

28 Aug 2013 - 7:25 pm | अनिरुद्ध प

गुरुदेव रानडे कोण आहेत ? जरा माहिती दिल्यास उपक्रुत होइन.

बॅटमॅन's picture

29 Aug 2013 - 12:46 pm | बॅटमॅन

ही लिंक बघावी.

http://www.gurudevranade.com/home.html

असामान्य बुद्धिमत्तेचा माणूस. उपनिषद्रहस्य, मराठी-हिंदी-कन्नड भाषांतील संत वाङ्मयातला परमार्थमार्ग, ग्रीक आणि भारतीय तत्वज्ञानाचा तौलनिक आढावा-तोही मुळातून प्राचीन ग्रीक ग्रंथ वाचून घेणारे थोर तत्त्वज्ञ. जितके बुद्धिमान तितकेच भक्तिमार्गी. त्यांच्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

अनिरुद्ध प's picture

29 Aug 2013 - 1:05 pm | अनिरुद्ध प

साठी धन्यवाद्,परन्तु सद्ध्या अग्नी भिन्त आड येत आहे आणि घरचा सन्गणक नादुरुस्त असल्याने जसे जमेल तसे पहाण्या येइल.

विजुभाऊ's picture

28 Aug 2013 - 9:38 pm | विजुभाऊ

तस्मात मी इथेच थांबतो. "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.

धन्या पहिले वाक्य एकदम झकास. दुसरे वाक्य जर्रा बदलून लिही

"अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.

या ऐवजी < "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** करण्याची इच्छा माझ्यात नाही> असे लिही.
एखाद्याशी चर्चा करण्याअगोदर त्याचा अधिकार काय आहे ( म्हणजे नक्की काय ते मात्र सांगायचे नाही ) बाकी आम्ही अध्यात्म वाले म्हणजे एकदम बेष्ट असे म्हणायचे. त्याबद्दल शंका घेणारे मात्र तथाकथीत इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** करतात असे म्हणून चर्चा टाळायची. मुद्द्यावर कोणी आले की आपण बरेच फाटे फोडायचे. मुद्दा खोडता आला नाही की समोरच्याचा अधिकार काढायचा. < Do While अधिकार= 0>

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 12:50 pm | बाळ सप्रे

हा हा ..

मुद्द्यावर बोलायला जमलं नाही की बोलणार्‍याचा अधिकार काढायचा आणि मूळ मुद्दा इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** म्हणून दुर्लक्षित करायचा..

+११११

म्हैस's picture

27 Aug 2013 - 1:08 pm | म्हैस

अनिरुद्ध प - अहो साहेब ती माझी स्वाक्षरी आहे. तो प्रतिक्रियेच भाग नाहीये. मला तसा वाटतं म्हणून tashi स्वाक्षरी ठेवलीये.

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 1:44 pm | अनिरुद्ध प

आपल्या लिन्का पुस्तकान्ची यादि याची वाट पहात आहे,बघुया अर्धवट ज्ञानात काही भर पडते का (क्रुपया हे उपरोधाने लिहीले नाही आहे याची नोन्द घ्यावी)
ज्ञान लालसा असलेला
अनिरुद्ध

कोणीतरी म्हणाला होतं वाचायला लागला कि डोळे जड होतात. म्हणून मी शोधण्याचा त्रास घेतलाच नाही. बरं ते असो. फार आनंद झाला कोणाच्या तरी मनात कुतूहल निर्माण झालं.
तसे गीतेत अनेक प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. त्यातला मी निवडलेला योगमार्ग आहे. हा गीतेतल्या १६ व्या अध्यायात आहे. आणि ज्ञानेश्वरीतल्या ६ व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी ह्याचा छान निरुपण केलं आहे. तिथे वाचायला बोर होत असेल तर इथे थोडक्यात सांगते. जास्त detail मध्ये नाही सांगता येणार.
एकूण सव्वा लाख प्रकारचे योग आहेत. हठ्योगात यम, नियम, आहार , प्रत्याहार, असणे, मुद्रा , बंध असं काय काय आहे. हा मार्ग खूप अवघड आहे. ह्याला फार वेळ लागू शकतो. ह्याला काटेकोर नियम पालन , योग्य गुरुंच मार्गदर्शन लागतं. एवढं करूनही अध्यात्मिक शक्ती (ज्याला आपण कुंडलिनी म्हणतो) जागृत करायला फार वेळ लागतो.
अनेक ठिकाणी एकाच प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी माझ्या प्रतिक्रिया 'सचिदानंद बाबांची गोष्ट' ह्या लेखावर दिल्या आहेत. कृपया तिथे वाचावे.

भक्तीयोग मार्गात नामस्मरण, शास्त्र निहित ग्रंथ, लीला चरित्र वगेरे वाचणे. हे सगळा अत्यंत श्रद्धेने करणे ह्या गोष्टी येतात. इथेही वेळ लागतोच. आणि भगवंताची कृपाही. कर्मयोग वगेरे मध्ये मी फारसं शिरत नाही आता. पण माझा मार्ग आहे तो क्रीयायोगाचा (ज्याला सिद्धयोग, महायोग असं सुधा म्हनला जाता.) ह्या मार्गावर भगवान श्री क्रीश्नांनी विशेष जोर दिला आहे. इथे गुरु आवश्यक आहेत. गुरूंच्या शक्तिपात दिक्षेने शिष्याची अध्यात्मिक शक्ती (कुंडलिनी) जागृत होते.
हठ्योगामध्ये शक्ती जागृतीसाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते इथे घ्यावे लागत नाहीत. परंतु योग्य असे सिद्ध सद्गुरु आवश्यक आहेत.

अग्निकोल्हा's picture

27 Aug 2013 - 4:28 pm | अग्निकोल्हा

जरा सविस्तर लिहु शकाल काय ? रजनिकांथच्या "बाबा" चित्रपटात "महावतार बाबाजींचा" वावर वॉइसओवरमधुन दाखवला आहे, ते आधुनिक जगात क्रियायोगातिल सर्वोच्च जाणकार/गुरु मानले जातात. नक्कि आहे काय हा क्रियायोग ? व्यनि करावा, इथे चर्चा टाळायची असल्यास.

महावतार बाबाजींच्या शिष्याचे शिष्य परमहंस योगानंद यांनी खुप लेखन केलय क्रिया योगावर.

@ धन्या . आपल्या बोलण्यातला उपहास समजला. चांगली गोष्ट आहे आपण प्रतिक्रिया थांबव्ल्यात. विनाकारण वाद घालण्यात काहीच अर्थ नाही हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. .

व्यनि म्हणजे? चित्रपटात काय दाखवलाय हे मला माहित नाही. आणि चित्रपटावर माझा इतका विश्वास नाही.
होय हे खरं आहे. कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे महावतार बाबाजी मोठे जाणकार सिद्ध गुरु आहेत. तसे गुरु अजूनही आहेत परंतु ते ढोंगी बाबांसारखे स्वताला लोकांसमोर आणत नाही म्हणून त्यांची माहिती फारच कमी लोकांना असते.
आज esakal मध्ये बातमी आली आहे. "योगविद्येवर अमेरिकी मोहोर ". किती दुर्दैव आहे .इतर देशातल्या लोकांना ह्याचं महत्व कळतंय आणि आपल्या देशातले लोक मात्र योग, देव, धर्म ह्याची टिंगल करण्यातच धन्यता मानतात आणि मनुष्य जन्म वाया घालवतात.

बॅटमॅन's picture

29 Aug 2013 - 5:18 pm | बॅटमॅन

व्यनि=व्यक्तिगत निरोप.

कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे महावतार बाबाजी मोठे जाणकार सिद्ध गुरु आहेत.

आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?

तसे गुरु अजूनही आहेत परंतु ते ढोंगी बाबांसारखे स्वताला लोकांसमोर आणत नाही म्हणून त्यांची माहिती फारच कमी लोकांना असते.

त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे. क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.

आज esakal मध्ये बातमी आली आहे. "योगविद्येवर अमेरिकी मोहोर ". किती दुर्दैव आहे .इतर देशातल्या लोकांना ह्याचं महत्व कळतंय आणि आपल्या देशातले लोक मात्र योग, देव, धर्म ह्याची टिंगल करण्यातच धन्यता मानतात आणि मनुष्य जन्म वाया घालवतात.

भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 12:54 am | अग्निकोल्हा

आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?

निसर्गसुलभ प्रश्न वाटतो.

त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे.

खात्रि आहे हे पुस्तक आपण वाचुन काढलेले नाहि याचि. ("बाबा" मि बघितलाय त्यातलं "बाबा सिल्वर सिल्वर बाबा" गाण मला फार आवडते)

क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.

जगाला म्हणजे कोणाला ?

भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.

:) फॅन्सी थिंग व महत्व कळणे यात फरक आहे. उदा. इबुक रिडर माझ्यासाठि फँन्सि थिंग आहे पण यातुन कागदाचा व परिणामी मानवाचा वेळ्,कश्ट्,पैसा,जागा याचा अपव्यय टळतो हे याचे (विषेशतः पर्यांवरणाच्या द्रूश्टिने) महत्व कळणे आहे.

जरा स्पष्ट करुन सान्गाल का?

अनिरुद्ध प's picture

30 Aug 2013 - 3:37 pm | अनिरुद्ध प

वरील प्रश्ण प्रतिसाद श्री धनाजीराव याना आहे.

आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?

होय. ते अजूनही आहेत.ते अजूनही २४ वर्षांच्या तरुणासार्खेच दिसतात. चांगदेव नाही का १४०० वर्षे ह्या मृत्यूलोकात होते. सामान्य माणसे ७०-८० वर्षे जगात असताना योग्यांना इतकं दीर्घायुष्य कसा लाभतं ह्याचा उत्तर 'योगी कथामृत' (Autobiography of a yogi ) ह्या पुस्तकात दिलं आहे.

त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे. क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.

होय. जगाच्या कल्याणासाठी त्यांना प्रकाशात आणणा गरजेचं असतं. परमहंस योगानंदांनी ते कार्य केला आहे. महावतार बाबाजींनी स्वताचा उल्लेख कुठेही केलेला नाहीये. एकदा एका अश्रद्ध माणसाला त्यांची महती पटवून देण्यासाठी त्यांच्याच एका शिष्याने एका बंद खोलीत त्यांचं आवाहन केलं. बाबाजी तिथे प्रगट झाले पण शिष्याला रागावले. पुन्हा मला असल्या गोष्टींसाठी बोलावत जावू नको म्हणून. हा किस्सा पुस्तकात आहे.

भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.

नुसतं अप्रूप वाटणं आणि महत्व पटण ह्यात फरक आहे. त्यांना ते पटलय म्हणून शाळेपासून योग हा विषय त्यांनी अभ्यासाला ठेवलाय.

म्हैस's picture

5 Sep 2013 - 3:13 pm | म्हैस

उद्गाते म्हणजे काय?

महावतार बाबाजींच्या शिष्याचे शिष्य परमहंस योगानंद यांनी खुप लेखन केलय क्रिया योगावर.

महावतार बाबाजींचे शिष्य शामाचरण लाहिरी. त्यांचे शिष्य युक्तेश्वर मुखी. त्यांचे शिष्य परमहंस योगानंद