रंजनभ्रमरी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
27 Jul 2013 - 6:08 pm

प्राजक्त मनाने झुरलो मी
झरल्यात कळा अनुबंध तळी
मदनाची बाधा भवभोळी
गंधात न्हाइली मूक कळी

चाहूलक्षणांची पागोळी
दंवस्पर्शकोवळ्या अंघोळी
अंगणी श्वेत केशर ओळी
मातीवर ओल्या; रांगोळी

अलवार स्पर्श हळुवार उरी
दरवळ परिमळ मन गाभारी
गोकुळी रास रंजनभ्रमरी
वेदना जरा विरल्या दारी

……………. अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

सुरेख! शब्दयोजना खूप आवडली.