=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
मनोरंजक प्रवासाचे वर्णन सर्वांनाच आवडते. शिवाय तो प्रवास जर जगातील सर्वात मोठ्या अंतराचा आणि सर्वात मोठ्या काळाचा असला तर त्याचे वर्णन रंजक वाटले नाही तरच आश्चर्य नव्हे काय? आणि मुख्य गंमत म्हणजे तो प्रवास अजूनही चालूच आहे... दोन लाख वर्षे पुरी झाल्यानंतर आणि सगळी पृथ्वी व्यापून टाकल्यानंतरही चालूच आहे! हा प्रवास आहे तुमचा, माझा, आपल्या सर्वांच्या पूर्वजांचा... आणि मानवी आठवणीपूर्वीच्या पूर्वजांचाही.
आपल्या सर्वांनाच कधी न कधी "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" प्रश्न सतावत असतात. मग त्यांची उत्तरे जो तो आपापल्या परीने धर्म, अध्यात्म, गुरू, वगैरे, वगैरेने शोधायचा प्रयत्न करतो. शास्त्रज्ञ म्हणजे माणसेच ना! त्यांनाही ह्या प्रश्नांनी सतावले नसते तरच नवल! त्यांनी अर्थातच शास्त्रीय पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न सुरू केला. शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे पण प्रयत्न अजून चालूच आहेत. मात्र आतापर्यंत हाताला जे लागले आहे ते स्तिमित करणारे आहे... मुख्य म्हणजे शास्त्रज्ञांचे हे प्रवासवर्णन केवळ समजूत, अंधश्रद्धा किंवा अंदाजावर अवलंबून नसून शास्त्रीय पुराव्यांवर आधारलेले खणखणीत नाणे आहे. शिवाय जसजसे नवीन पुरावे हाती येत आहेत तसतसे त्यांच्या आधारे हे प्रवासवर्णन बदलून ते अधिक विश्वासू आणि सत्याच्या अधिक जवळ आणण्यास शास्त्रज्ञांची अजिबात ना नाही. आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांत गेल्या एक दोन दशकांत जनुकशास्त्रातील आणि कार्बन डेटिंग तंत्रातील क्रांतिकारी संशोधनाने जी प्रचंड भर घातली आहे ती केवळ अतुलनीय आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाणारी जनुके खोटे बोलू शकत नाहीत तसेच अणूंमधून होणारा किरणोत्सर्ग फसवाफसवी करत नाही! त्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये मानवाच्या अतिप्राचीन जगप्रवासातील अनेक सत्ये खात्रीलायकरीत्या उघड झाली आहेत. त्यामुळे आता "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? " या प्रश्नांची अधिकाधिक खात्रीलायक उत्तरे सापडत आहेत. मग काय? चलणार ना या जगातल्या सर्वात महान प्रवासाचे पुनरवलोकन करायला आणि स्वतःच्या मनातील प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे शोधायला?
आधुनिक मानवाचा प्रवास सुरू झाला साधारण दोन लाख वर्षांपूर्वी. पण हा प्रवास करणार्या व्यक्ती या पृथ्वीवरचे सर्वप्रथम प्रवासी होते काय? छे, छे, अजिबात नाही! त्यांच्या काही कोटी वर्षे अगोदर त्यांच्या पूर्वजांनी आपल्या मूळ स्थानावरून अनेक दशसहस्त्र किमी पर्यंत प्रवास केलेला होता. त्यामुळे आपला मुख्य प्रवास जरी दोन लाख वर्षांचा असला तरी त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आपल्याला अजून बरेच मागे जावे लागेल...
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील बरेचसे भूभाग (आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, इ.) एकमेकाला जोडलेले होते. त्या वेळेस प्लेसियाडापीस (Plesiadapis) या प्रजातीचे प्राणी आताच्या अमेरिकन खंडाच्या भूमीवर अस्तित्वात होते आणि पुढच्या काळात ते आशिया व आफ्रिकाभर पसरले.
आफ्रिकेमध्ये साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी प्लेसियाडापीसपासून प्रायमेट (Primates) या प्रजातीच्या अनेक प्राण्यांची उत्क्रांती झाली. या प्रजातीत अगदी Madame Berthe's mouse lemur नावाच्या केवळ ३० ग्रॅम वजन असणार्या छोट्या प्राण्यापासून ते २०० किलो वजन असणार्या गोरीलासारख्या मोठ्या प्राण्यापर्यंत अनेक प्राण्यांची गणना होते.
ही आहेत आता सद्या आस्तिवात असलेल्या काही आधुनिक प्रायमेट प्राण्यांची चित्रे (जालावरून साभार)...
वरील प्राण्यांबरोबरच प्रायमेट प्रजातीत एक खास शाखा विकसित झाली. या शाखेतल्या मूळ पूर्वज प्राण्यांतून ८० लाख पूर्वी प्रथम गोरीला आणि ५० लाख वर्षांपूर्वी चिंपँझी वेगळे झाले... आणि त्या कालावधित मध्येच सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी अलग झालेल्या एका शाखेपासून आदिमानव व मानव प्रजाती उत्क्रांत झाल्या. थोडक्यात म्हणजे "माकडापासून मानव उत्क्रांत झाला नाही" तर “आदिमानव, मानव आणि महामाकडे या प्रजाती एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाल्या आहेत." त्यामुळे आधुनिक मानवाच्या सर्वात जवळची प्राणीशाखा असलेल्या चिंपँझी आणि मानवाच्या जनुकांत ९८.४% साम्य आहे असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नको, नाही का?! किंवा वेगळ्या प्रकारे म्हणायचे तर चिंपँझी आणि माणसात जे प्रचंड फरक आहेत ते ७० लाख वर्षांच्या कालावधीत स्वतंत्रपणे विकसित झालेल्या फक्त १.६% जनुकीय सामग्रीत साठवलेले आहेत!
अतीअतीप्राचीन प्रायमेट प्रजातीपासून उत्क्रांत होत आता अस्तित्वात असलेले मानवाच्या जवळपास येणारे प्राणी, आदिमानव आणि आधुनिक मानव कसे उत्क्रांत झाले हे दाखविणारा आराखडा (जालावरून साभार)...
असो, सुरुवातीलाच जनुकशास्त्राच्या गुंतागुंतीत जास्त न घुसता (पुढच्या भागांत योग्य ठिकाणी ते विस्ताराने येणे जास्त योग्य होईल) सर्वांना अधिक रोचक वाटेल अश्या भागाकडे वळूया.
ज्यांचे आणि आपले पूर्वज एक होते हे शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेल्या आदिमानवांची (आपल्या दूरच्या नातेवाईकांची) थोडी खबरबात घेतल्याशिवाय ह्या प्रवासाची पूर्वतयारी अपूर्ण राहील. ही आहे त्यांची तोंडओळख...
३५ लाख वर्षांपूर्वी: Australopithecus afarense : हे आदिमानव दोन पायांवर उभे राहू आणि चालू शकत होते. मात्र ते फक्त आफिकेतच राहिले आणि मुख्यतः: झाडांवर वस्ती करत असत.
२० लाख वर्षांपूर्वी: Paranthropus boisel: हे आदिमानवही आफ्रिका सोडून बाहेर फिरायला गेले नाही. यांचे दात सद्याच्या मानवाच्या दातांपेक्षा चारपट मोठे होते आणि चावायला कठीण असणार्या वनस्पती खाण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे.
२० लाख वर्षांपूर्वी: Homo habilis: हे आधुनिक मानवाचे (म्हणजे आपले) बहुतेक सर्वात पहिले पूर्वज असावेत. यांच्यामध्ये हुशार असल्याची लक्षणे होती. हे हत्यारे बनवणारे पहिले आदिमानव होत. यांनी आपल्या आहारात प्राण्यांच्या मांसाचा प्रथम उपयोग सुरू केला. मात्र प्राण्याची शिकार करण्याची पात्रता त्यांच्यात नव्हती व हे मांस मृत प्राण्यांपासून मिळालेले (इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतून अथवा मेलेल्या प्राण्याचे) असे. हे आदिमानवही आफ्रिका सोडून बाहेर फिरायला गेले नाही.
१५ लाख वर्षांपूर्वी: Homo ergaster: यांचा मेंदू पूर्वीच्या आदिमानवांपेक्षा बराच मोठा होता. ह्यांची हत्यारे अधिक सुधारलेली होती आणि ते कसबी शिकारी होते. हे आपले पूर्वज असण्याची बरीच शक्यता आहे. हे आदिमानव प्रवासी होते. ते आशियात पसरले आणि त्यांना तेथे Homo erectus या शास्त्रीय नावाने ओळखले जाते.
५ लाख वर्षांपूर्वी: Homo heidelbergensis: हे आदिमानवही भटके होते आणि ५ लाख वर्षांपूर्वी ते युरोपमध्ये पसरले होते. त्यांचे हत्यारे बनवण्याचे व शिकारीचे कसब वाखाणण्याजोगे होते. हे आपले पूर्वज नक्की नाही पण नियांडरथाल (Neanderthal) या आदिमानवाचे हे पूर्वज असावे.
२ लाख वर्षांपूर्वी: Homo neanderthalensis: २ लाख ते ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच शेवटच्या हिमयुगापर्यंत हे आदिमानव युरोपचे सर्वेसर्वा होते. मात्र हिमयुगाच्या शेवटाला उष्ण होत गेलेल्या वातावरणामुळे आधुनिक मानवाने युरोपमध्ये शिरकाव करायला सुरुवात केली आणि ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत हे आदिमानव जगातून नष्ट झाले. मात्र हे आधुनिक मानवाच्या काळात आस्तित्वात असलेले आदिमानव नक्की कोणत्या कारणाने नष्ट झाले हे खात्रीलायक रित्या अजून माहिती झालेले नाही.
अश्या या पार्श्वभूमीवर साधारण दोन लाख वर्षांपूर्वी पूर्वोत्तर आफ्रिकेच्या (आताच्या इथिओपिया-केनिया-तांझानिया या भागात) एका Homo Sapiens या प्राण्याच्या जमातीची निर्मिती झाली… हाच तो आधुनिक मानव. इतर सर्व Homo प्रजाती काळाच्या ओघात नामशेष होऊन गेल्या आहेत. या आपल्या शेवटी उरलेल्या एकुलत्या एका प्राणीजमातीचे (species) शास्त्रीय नाव आहे Homo sapiens sapiens.
आजच्या घडीचे सर्व मानव या एकाच Homo sapiens sapiens जमातीचे सभासद आहेत... मग ते कोणत्याही रंगाचे, बांध्याचे अथवा देशाचे रहिवासी असले तरीही.
हा Homo sapiens sapiens सुधारलेला, मोठ्या मेंदूमुळे हुशार, हत्यारे बनवण्यात वाकबगार, कुशल शिकारी आणि भटका प्राणी निघाला. पुढच्या भागापासून आपण त्याच्या भटकंतीच्या सुरस कथांची वर्णने वाचत त्याच्याबरोबर कल्पनेच्या भरार्या घेत भटकूया आणि त्याचबरोबरच "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया.
मग काय, वाट कसली बघताय? करा सुरू प्रवासाची तयारी ! काय समजलात? हा चांगला दोन लाख वर्षांच्या मुदतीचा "पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" आहे, राजे !
(क्रमशः )
=====================================================================
महत्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
प्रतिक्रिया
6 Jul 2013 - 6:13 pm | स्पा
ले भारी हम तय्यार हे
7 Jul 2013 - 8:37 am | रेवती
अभ्यासपूर्ण व सर्वांना आवडेल अशी लेखमाला असणार याची खात्री पटवणारा पहिला भाग !
7 Jul 2013 - 8:40 am | मदनबाण
ह्म्म्म... वाचतोय.
मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया.
जवळपास प्रत्येक लहान मूल हा प्रश्न आपल्या आई-वडिलांना विचारतो ! असा प्रश्न त्याच्या मनात का आणि कसा येत असेल ? आत्म जिज्ञासा त्याला का करावी वाटते ? संपूर्ण पुढील आयुष्य यावर विचार का केला जात नाही ? असो बरेच प्रश्न झालेत...
जाता जाता :- सध्या ७ वे मन्वांतर {वैवस्वत मनु}चालु आहे म्हणे मग एकुण किती वर्ष झाली ?
7 Jul 2013 - 8:45 am | रेवती
जवळपास प्रत्येक लहान मूल हा प्रश्न आपल्या आई-वडिलांना विचारतो
म्हणजे यापुढे देवादिकांवर सगळेकाही ढकलून चालणार नाही म्हण की! ;)
7 Jul 2013 - 8:47 am | मदनबाण
देवादिकांवर सगळेकाही ढकलून चालणार नाही म्हण की!
हा.हा.हा आपल्या कर्माचे "फळ" देव देतो म्हणे ! ;)
7 Jul 2013 - 9:31 am | प्रभाकर पेठकर
एक लहान मुलगा आणि लहान मुलगी टिव्ही समोर 'बे-वॉच' सारखा कार्यक्रम बघत बसलेले असतात. तेंव्हा ती मुलगी मुलाला म्हणते, 'बंड्याची आई फार देवभोळी आहे. सगळ्यांना देवबाप्पा मुलं देतो असंच तिला वाटतं.' असो.
लेख चांगला आहे. उत्कंठावर्धक आहे. वाचतो आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.
7 Jul 2013 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया.
अशा प्रकारच्या लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची एका व्यक्तीच्या जन्मापुरती उत्तरे भौतीक शास्त्राने फार पूर्वीच दिलेली आहेत. तेथे समस्या "उत्तर काय आहे?" ही नसून "ते उत्तर लहान मुलाला कधी व कसे समजावून द्यावे?" ही आहे... आणि ती समस्या सोडवणे हा या लेखाचा उद्देश नाही, हे आपल्या ध्यानात आले आहेच हे तुमच्या "जाता जाता" वरून आमच्याही ध्यानात आले आहे ;)जाता जाता :- सध्या ७ वे मन्वांतर {वैवस्वत मनु}चालु आहे म्हणे मग एकुण किती वर्ष झाली ?
या लेखात तेच वरचे प्रश्न पण "सर्व मानवजमातीला मध्यावर्ती धरून विचारलेले" आहेत. आणि "केवळ भौति़क शास्त्रे वापरून" त्यांची उत्तरे शोधण्याचे चाललेले प्रयत्न व आतापर्यंत मिळालेली उत्तरे यांचा उहापोह या लेखांत करण्याचा मानस आहे, हे लेखात सुरुवातीलाच स्पष्ट केलेले आहे. या कारणामुळे या लेखातले कालमापन हे इंग्लिश कॅलेंडरच्या (ग्रेगोरियन) वर्षांमध्येच केलेले आहे आणि तेच मापन पुढेही असेल.
या प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्या इतर (भौति़क शास्त्रे न वापरणार्या) पद्धतींबद्दल मला आदर आहे. पण त्यांच्याबद्दल अथवा त्यांच्या कालमापनपद्धतींबद्दल माझे ज्ञान शून्य अथवा तोकडे असल्याने मी त्याबद्दल लिहिणे योग्य होणार नाही. शिवाय वरील कारणामुळे या लेखात अथवा लेखासंदर्भात त्यांचा उहापोह करणे म्हणजे विषयांतरच होईल, नाही का?
7 Jul 2013 - 10:06 am | धन्या
पुढील भागसुद्धा असेच अभ्यापुर्ण असतील यात शंकाच नाही.
या लेखमालेत डार्विन आणि त्याचा वारसदार रिचर्ड डॉकिन्स यांचे विचार वाचायला उत्सुक आहे.
7 Jul 2013 - 7:54 pm | प्यारे१
+१११११
(आळशी माणसाला घरबसल्या थेट मेजवानीच )
7 Jul 2013 - 11:53 am | पिंगू
छान असणार आहे लेखमाला. नुकतेच या विषयावर एक पुस्तक वाचले आहे.
7 Jul 2013 - 12:55 pm | मोदक
वाचतोय...
7 Jul 2013 - 3:59 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
7 Jul 2013 - 4:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्पा, रेवती, प्रभाकर पेठकर, धन्या, पिंगू , मोदक आणि मुक्त विहारि : आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
7 Jul 2013 - 4:48 pm | पैसा
तुमच्या बाकी सफरीप्रमाणे याही सफरीवर मजा येणार हे नक्की.
काल परवाच निरंजन घाटेंचं 'कोणे एके काळी' वाचत होते. त्यात त्यानी चीनमधे सापडलेल्या खूप मोठ्या दातांबद्दल लिहिले आहे. तसेच इंडोनेशियातल्या एका प्रायमेटबद्दल वाचलेले आठवत आहे की ते ३ ४ फूट उंच असतात आणि लहान कुर्हाडी घेऊन शिकारी करतात. त्यांना तिथले स्थानिक लोक भुते समजतात.
असे काही दुवे अजून कुठे शिल्लक असावेत का?
7 Jul 2013 - 5:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता तर नुसती प्रस्तावना झाली आहे. हा विषय इतका संशोधला गेला अहे की यात काय सांगू आणि काय नको असे होते. पण ही सद्याची लेखमाला बोजड शास्त्रीय निबंध न करता मनोरंजक पण माहितीपूर्ण लेख अशी लिहिण्याचा मानस आहे. त्यामुळे जेथे खरंच गरज नाही (जे ज्ञान सार्वजनिक मालमत्ता आहे आणि सहज उपलब्ध आहे) तेथे दुव्यांची मोठी यादी देणे टाळण्याचे ठरवले आहे.
इंडोनेशियातल्या एका प्रायमेटबद्दल वाचलेले आठवत आहे.
यांचा उल्लेख पुढे येईल... पण जर तुम्ही काय म्हणता याचा माझा अंदाज खरा असला तर ते प्रायमेट्स नसून आपले जवळचे भाउबंद आहेत... इतर माहिती पुढे येईलच.7 Jul 2013 - 5:17 pm | पैसा
सॉरी, मी लेखातले दुवे म्हणत नव्हते, तर माणूस आणि इतर प्रायमेट्स यांच्यातल्या आणखी काही हरवलेल्या दुव्यांबद्दल विचारत होते!
7 Jul 2013 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रकाशित करा वर घाईने क्लिक् केले आणि मग ध्यानात आले ही हा "दुवा" वेगळा आहे ! :)
यासाठीच स्वसंपादनासाठी केव्हापासून "दुवा" करतोय ;)
8 Jul 2013 - 8:01 am | स्पंदना
"नॅनीज"
हे इंडिनेशीयातले लोक १९४०च्या सुमारास नामशेष झाले अस मी वाचलय. तुरु तुरु झाडीतुन पळणारे हे लोक आहेत अस बर्याचदा सांगुनही त्यावर एक भाकडकथा असा अविश्वास दाखवला गेला. कारण तो काळच तसा होता. इव्हन प्लाटीपसवर कुणी विश्वास नव्हता ठेवला. पण नंतर साधारण ६०च्या दशकात कुणाला तरी त्यांचे सांगाडे सापडले अन मग शोधाशोध सुरु झाली.
7 Jul 2013 - 5:41 pm | बॅटमॅन
जबरी!!! हा प्रवास अन इतिहास दोन्हीही असणारे तस्मात आम्ही तयारच हौत कायमचे!!! आउर आन्दो जल्दीच!
7 Jul 2013 - 6:33 pm | केदार-मिसळपाव
तुमच्या कडुन लेख आहे म्हणजे नक्कीच वाचनीय असणार... पुढच्या भागाची वाट बघत आहे.
7 Jul 2013 - 7:27 pm | प्रचेतस
सुंदर सुरुवात.
पुढे वाचण्यास उत्सुक.
7 Jul 2013 - 9:46 pm | तुमचा अभिषेक
ओह.. मला वाटलेले तुमचाच एखादा प्रवास आहे की काय.. आणि ज्या माणसाने आधीच एवढ्या अफाट सफरी केल्या आहेत तो पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास बोलतोय तरी कशाला या उत्सुकतेनेच उघडले तर... सुंदर धक्का.. बाकी प्रस्तावना देने आवडले, म्हणजे पुढे चांगलीच माहिती मिळणार आहे याची हमी मिळाल्यासारखे झाले. आम्ही सारेच होमो सेपियन सेपियन पुढच्या भागाची वाट बघतोय :)
7 Jul 2013 - 11:05 pm | अग्निकोल्हा
.
7 Jul 2013 - 11:08 pm | किलमाऊस्की
काही प्रश्न डोक्यात आहेत. कदाचित पुढच्या काही भागात उत्तरे मिळतील अशी अपेक्षा असल्याने तूर्तास फार लिहीत नाही. सध्यातरी पु.भा.प्र.
(अवांतर - तुमचे याआधीचे सर्व लेख वाचलेत. प्रतिक्रिया द्यायला जमलंच असं नाही परंतु तुमचे लेख वाचनीय असतात. ही मालिका ही वाचेनच आणि या वेळी नक्की प्रतिसादही देण्याचा प्रयत्न करणार आहे.)
7 Jul 2013 - 11:20 pm | एस
या विषयावर आणखी वाचायला आवडेल. येऊ द्यात.
अवांतर - उसगावात उत्क्रांती हा विषयच धर्माच्या शिकवणीच्या विरुद्ध असल्याने औपचारिक शिक्षणातून हद्दपार केला गेला आहे असे ऐकले आहे. त्यामुळेही उत्सुकता आहेच. (भारतातील विचार व भाषणस्वातंत्र्याचा त्रिवार जयजयकार...)
7 Jul 2013 - 11:38 pm | कवितानागेश
वाचतेय.. :)
8 Jul 2013 - 12:12 am | अर्धवटराव
वळ्कटी बांधुन तयार आहे आपली. लेट्स गो!!!
अर्धवटराव
8 Jul 2013 - 7:53 am | शिल्पा ब
हल्लीच एक डॉक्युमेंटरी बघितली ज्यात युरोपातील लोकात अजुनही नियांड्राथॉलचे जवळपास ३-४% जीन्स दिसुन येतात असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं दाखवलं. थोडक्यात अफ्रिकेतले लोकं अन नियांड्राथॉल हे वेगवेगळे प्राणी होते पण शेवटी नियांड्राथॉल कमी होत जाउन या दोघांत संकर होतो अन निथा शेवटी नाहीसे झाले असा निष्कर्ष होता.
इंडोनेशियातल्या बारक्या लोकांबद्दल माहीती नव्हती..उत्सुकता आहे.
असो. मालिकेची सुरुवात आवडली.
8 Jul 2013 - 10:39 am | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay, बॅटमॅन, केदार-मिसळपाव, वल्ली, तुमचा अभिषेक, सिवाजी-द-बॉस, हेमांगीके, स्वॅप्स, लीमाउजेट, अर्धवटराव आणि शिल्पा ब: आपण सर्व सहलीत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! तुमच्या सहभागाने या सहलीत भरपूर धमाल येणार याची खात्री पटली आहे. मात्र यामुळे माझ्यावरची जबाबदारी अजून वाढली आहे... पण ते एक आनंददायक काम आहे हे नक्की !
8 Jul 2013 - 10:55 am | चित्रगुप्त
छान सुरुवात
मानवी उत्क्रांती आणि प्राण्यांची, मानवाची एकंदरित वागणूक यांचे थोर अभ्यासक डेस्मंड मॉरिस यांच्या निष्कर्षांना या लेखमालेत स्थान मिळेल, अशी आशा करतो.
8 Jul 2013 - 1:42 pm | अद्द्या
अति आवडणारा विषय
येउद्या पुढचे भाग
8 Jul 2013 - 2:01 pm | चौकटराजा
मध्यंतरी डॉक्यूमेटरी पाहिली होती. त्या निवेदकाने असे सांगोतले की सूर्यावर फकत हायड्रोजन व हिलियम ही मूलदव्य आहेत. मग आपल्या येथील सिलिकॉन, कार्बन सोने चांदी हे आलो कोठून" आपला मूलस्रोत सूर्य नव्हे. कोणत्या तरी इतर तार्यातून अनेक तारे जन्मताना आपला 'जीव' जन्म झाला असावा !
8 Jul 2013 - 2:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
सूर्यावर फकत हायड्रोजन व हिलियम ही मूलदव्य आहेत
हे सर्वसामान्यांसाठी सांगितलेले धोपट सत्य आहे; पूर्ण अथवा शास्त्रीय सत्य नाही. सूर्याच्या वस्तूमानाचा १.६९% भाग ऑक्सीजन, कार्बन, निऑन, लोह आणि इतर जड मूलद्रव्यांनी बनलेला आहे. हे सूर्याचे १.६९% वस्तूमान वापरून ५,६२८ पृथ्व्या बनू शकतील ! :) सुर्याच्या मध्यभागी १५७ लाख डिग्री सेल्सियस तापमान आहे आणि तेथून पृष्टभागापर्यंत येईपर्यंत ते ५,८०० डिग्री सेल्सियस होते. या सर्व तापमानात सर्व मूलद्रव्ये वायूरूपच असतात.आवांतरः पृथ्वी कशी बनली हा वेगळा आणि अजूनही तावातावाने चर्चा केला जाणारा (hotly debated) विषय आहे !
8 Jul 2013 - 5:36 pm | खबो जाप
https://play.google.com/store/apps/details?id=com.sometimeswefly.littlea....
8 Jul 2013 - 2:54 pm | कपिलमुनी
आपल्याला साधारणतः ५०००- ७००० वर्षांचा इतिहास ज्ञात आहे ( इसपू ३००० वर्षे ) ..
या कालावधी मधे एखाद्या जीवाची उत्क्रांती झाल्याचे आढळले आहे का ?
=====================================================
लेख फारच छान आहे .. अतिशय मोठा कॅनव्हास असलेल्या विषयाला हात घातल्याबदल अभिनंदन !
पुलेशु
8 Jul 2013 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रगुप्त व रावसाहेबः सहलीत आपले स्वागत आहे !
8 Jul 2013 - 3:57 pm | नि३सोलपुरकर
साहेब्,सिट बेल्ट बांधून बसलेलो आहे आणी सहल अप्रतिम होईल यात शंका नाही,सो लेट्स गो:::::
8 Jul 2013 - 4:18 pm | दिपस्तंभ
या लेखमालिके बद्दल खूपच उत्सुक आहे... तुम्च्या अभ्यासाबद्दल शंकाच नाही. तसेच आम्हाला कहि प्रश्न पड्ले तर नक्की विचारु एक्का सर...
8 Jul 2013 - 4:19 pm | अनिरुद्ध प
पुढिल भागाची प्रतिक्षा करत आहे.
8 Jul 2013 - 4:37 pm | चेतन माने
हा सर्वात वेगळा प्रवास करायला आवडेल.
पुभाप्र :):):)
8 Jul 2013 - 5:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद आणी सहलीत स्वागत !
8 Jul 2013 - 5:35 pm | चेतन माने
हुश्श मला पण धन्यवाद आला नाहीतर आता लिहिणारच होतो …। (आम्हाला कस विसर…………….? )
:D :D :D
8 Jul 2013 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
खालचा मोठा प्रतिप्रतिसाद लिहित असताना लागलेल्या वेळात तुमचा प्रतिसाद आला. त्यामुळे माझा प्रतिप्रतिसाद प्रकाशित केल्यावरच तो मला दिसला. हा टायमींगचा घोळ होता विसरण्याचा नाही :)
9 Jul 2013 - 12:10 pm | चेतन माने
मी आपली थोडोशी गम्मत केली हो…टायमिंगचा घोळ होतो बऱ्याचदा चालायचंच :)
8 Jul 2013 - 5:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
कपिलमुनी, नि३सोलपुरकर, दिपस्तंभ आणि अनिरुद्ध प : आपले सर्वांचे सह्लितील सहभागासाठी धन्यवाद !
@कपिलमुनी
आपल्याला साधारणतः ५०००- ७००० वर्षांचा इतिहास ज्ञात आहे ( इसपू ३००० वर्षे ) ..
या कालावधी मधे एखाद्या जीवाची उत्क्रांती झाल्याचे आढळले आहे का ?
१. केवळ ५०००- ७००० वर्षांचा नव्हे तर आपण जो साडेसहा कोटी वर्षांचा इतिहास बघतो आहोत तो केवळ अंदाज (थिअरी) नसून शास्त्रीय (जनुकीय आणि कार्बन डेटींग) पुराव्यांनी सिद्ध झालेले सत्य आहे. त्या शास्त्रीय पद्धतींची आणि पुराव्यांची माहिती पुढे येईलच. या पद्धती वापरून एखादा प्राणी इतर दोन प्राण्यांच्या जमातीचा काही हजार, लाख अथवा कोटी वर्षापूर्वीचा पूर्वज होता की नाव्हता हे खात्रीलायकरित्या ठरवता येते.
२. प्राण्यांच्या उत्क्रांतीत ७००० वर्षे हा अत्यंत कमी काळ आहे. लेखातलेच उदाहरण पाहिले तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आस्तित्वात असलेल्य प्रायमेट्सच्या एका शाखेपासून गोरिलंचे पूर्वज ८० लाख वर्षांपूर्वी, आपले पूर्वज ७० लाख वर्षांपूर्वी आणि चिंपांझींचे पूर्वज ५० लाख वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यांनंतर आपल्या (मानवांच्या) शाखेतून वेगवेगळ्या जीवांची (स्पेसिज) उत्क्रांती व्हायला ३५ लाख, २० लाख, १५ लाख, ५ लाख आणि २ लाख वर्षे लागली आहेत. याचे कारण म्हणजे सर्वसाधारणपणे जोपर्यंत जनुकांचा संच खूप वेगळा झाल्यामुळे दोन प्राण्यांत संकर होऊ शकत नाही तोपर्यंत त्या प्राण्यांना वेगळ्या स्पेसिज मानले जाउ शकत नाही.
8 Jul 2013 - 9:30 pm | मैत्र
तुमची लेखमालिका म्हणजे सरसावून बसायला हवं..
इथिओपियातल्या आद्य 'ल्युसी' बद्दल ऐकलं आहे आणि इतक्यात तिच्याही थोडा आधीचा 'आर्डी' सापडला आहे असं वाचलंय. हे सापडलेले सांगाडे / फॉसिल्स म्हणून खरेच आद्य का प्रत्यक्ष उत्क्रांतीच्या टप्प्यासाठी आद्य याची कल्पना नाही.
पण यापलिकडे त्यातला अर्थ आणि महत्त्व किंबहुना त्यापासूनचा आत्ताच्या होमो सेपिअन पर्यंतचा प्रवास याबद्दल काहीच माहीत नाही. उत्सुकता खूप आहे..
लेख सुरुवात म्हणून मस्त झाला आहे.. साध्या शब्दात रोचकपणे विषय मांडणं ही खरंच जबरदस्त कला आहे..
8 Jul 2013 - 9:44 pm | अजो
छान सुरुवात. पुभाप्र
9 Jul 2013 - 10:23 am | डॉ सुहास म्हात्रे
मैत्र आणि अजो : धन्यवाद आणि सहलीत स्वागत !
9 Jul 2013 - 11:16 am | मालोजीराव
ते नाशणल जाग्राफिक वर म्हनत असतंय कोनतरी सारखं…मानुस बाहेरन आनून कुनीतर पृथ्विवर सोडलाय म्हने…तसं असन काय ???
- क्युरियस मालोजी
9 Jul 2013 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिल्याच दिवशी शेवटच्या पडावाची माहिती करून घेतली तर मग सगळ्या सहलीची मजा किरकिरी होईल, नाही का? कोणीतरी म्हटले आहेच ना की: "सहलीतला भटकायचा अनुभव गंतव्य स्थानाला पोचण्याच्या आनंदापेक्षा जास्त मजेशीर असतो."
तर मंग बांधा गढुळं आनी यावा भटकायला बरुबर. तुमीआमी संगट काडू की कोनी कुटुन तुमाला हितं आनून सोडलया ते ! काय म्हंता ? ;)
9 Jul 2013 - 12:59 pm | मालोजीराव
व्हय व्हय :) चालंल चालंल :)
9 Jul 2013 - 7:09 pm | मोग्याम्बो
ह्याच विषयावर सध्या History Channel वर "Mankind" हीं मालिका चालू आहे ...
9 Jul 2013 - 10:02 pm | चिगो
पुरातनकाळी केलेल्या अँथ्रोपोलाॅजीच्या अभ्यासात हे वाचलं होतं. पण मग आम्ही लग्न, परीवार , नाती ह्यांत गुंतलो.(सोशिअल अँथ्रपोलाॅजी, हो:-D ) त्येलाही आता ४-५ वर्षं झाली.. आता पुन्हा हा अभ्यास करायला मजा येईल.. :-)
10 Jul 2013 - 2:07 am | लॉरी टांगटूंगकर
नेहमी प्रमाणे झक्कास, पुभालटा !!!
अतिअतिअवांतर, अँथ्रोपोलॉजीमुळे रॉस गेलरची आठवण झाली.
9 Jul 2013 - 10:22 pm | मराठे
अहो काय सांगताय काय? पृथ्वीचं वय फक्त ६,००० वर्षे इतकंच आहे. हा पहा ढळढळीत
पुरावा .
ही संपूर्ण मालिकाच बघण्यासारखी आहे.
9 Jul 2013 - 10:23 pm | मराठे
<a href="http://www.youtube.com/watch?v=lw80oduQckM&list=PLAC3481305829426D">http...
10 Jul 2013 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपण तूनळीवरुन भौतीक शास्त्रे शिकलो भौतेक तर हे जग ६,००० कशाला फक्त ६ वर्षांतच होत्याचे नव्हते होइल ;)
10 Jul 2013 - 1:36 am | अभ्या..
वाचतोय एक्कासाहेब. एकदम मस्त लिहिलेत तुम्ही. येऊ द्या पटापटा.
10 Jul 2013 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्यारे१, मोग्याम्बो, चिगो, मन्द्या आणि अभ्या..: प्रतिसादासाठी धन्यवाद !
10 Jul 2013 - 12:20 pm | चाणक्य
सुरुवात तर मस्त झालीये. येउद्या पुढचा भाग
10 Jul 2013 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
19 Jan 2020 - 6:14 pm | चौकटराजा
सहलीला बुकिन्ग करतो पण या सहलीत बदामचा शिरा,आमरस ,गुलाबजाम असा बदलता मेनू आहे की नाही ....? नाही केसरी, वीणा वाले देतात म्हणून म्हटले.
;:>)))
नव्याने सदस्य झालेल्या मिपाकरांसाठी हा ज्ञान संचय पुन्हा वर काढीत आहे !!!!!
31 Oct 2020 - 6:52 pm | शेवटचा डाव
मस्त आहे