हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली .....
एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही..
सावधान.......
सावधान.......
सावधान.......
प्रतिक्रिया
21 Jun 2013 - 11:17 pm | मोदक
काय प्रॉब्लेम आहे दुसरी वास्तू नावावर असली तर..?
21 Jun 2013 - 11:38 pm | दर्यासारंग
तिसरा भाउ काय करतो
22 Jun 2013 - 2:10 am | शिल्पा ब
इथे धागे काढतो.
22 Jun 2013 - 3:39 am | धमाल मुलगा
मेलो तिच्यायला!!!!
कस्लं टायमिंग...कस्लं टायमिंग...एकदम अशोकमामा सराफ आठवले ना.
कॉफी+नरडं=ऊर्ध्व.
23 Jun 2013 - 10:17 pm | फिरंगी
खलास टायमिंग …… वा …
22 Jun 2013 - 3:10 am | अत्रुप्त आत्मा
सामाजिक प्रगल्भतेनं वास्तविकतेचं भान अणवणारं , समाज सापेक्ष पुरोगामी लेखन !!!
22 Jun 2013 - 8:42 am | मोदक
ब्वॉर ब्वॉर..
22 Jun 2013 - 9:11 am | अत्रुप्त आत्मा
अर्र र्र :-)) मोदु चुकिचा प्लॅट फॉम घेतलास! ;-)
22 Jun 2013 - 7:21 pm | अमोल सहस्रबुद्धे
दोन घरे नावावर असणे याला विरोध म्ह्णजे त्याकरता आपण विनाकारण पर्यावरणाचा नाश करत असतो. बर्याच जणांचा असा अपसमज असतो कि मी एकट्यानी घर बांधल्यानी असा काय फरक पडणार आहे. तिथेच आपण चुकतो कारण असा विचार प्रत्येक जण करु लागतो आणि त्याचे पर्यवसन म्हणजे आत्ताची परिस्थिती उद्भवते. आज नागावात(अलिबागजवळ) आम्ही लहानपणी पाहिलेल्या कितीतरी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. हल्ली नवीन घर बांधल्यावर त्याजवळ या जमिनीला निरुपयोगी अशा शोभेच्या वनस्पती लावल्या जातात. अशी कितीतरी कारणे आहेत. आपण खरंच विचार केला पाहिजे. नेहमीप्रमाणे मला काय त्याचे, मला काय करायचयं, एवढ्याश्यानी काय होतयं असं म्हणून चालायचे नाही. अन्यथा येता काळ असा असेल की पुढली पिढी असणारच नाही ....
तेंव्हा वेळ गेल्ये आतातरी सावधान ....... सावधान ....... सावधान .......
22 Jun 2013 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा
माझं म्हणणं कि, दर वेळी निसर्गाच्या'च भरवश्यावर कशाला रहायच? तो देइल तेच "जतन" करा,हा "धर्म"पाळण्यापेक्षा, हव्या त्या वनस्पतिंची लागवड करण्याची मोहिम आपण नि'सर्ग प्रेमींन्नी हाती घ्यायला हवी! यावर आपलं काय मत?????माणसाच्या हव्यासाचा निषेध ठिक.पण आपल्या सारखे लोक स्वत: कधिहि काहिही "करायला" जात नाहि,त्याचे काय? ते बोला!
22 Jun 2013 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा
माझं म्हणणं कि, दर वेळी निसर्गाच्या'च भरवश्यावर कशाला रहायच? तो देइल तेच "जतन" करा,हा "धर्म"पाळण्यापेक्षा, हव्या त्या वनस्पतिंची लागवड करण्याची मोहिम आपण नि'सर्ग प्रेमींन्नी हाती घ्यायला हवी! यावर आपलं काय मत?????माणसाच्या हव्यासाचा निषेध ठिक.पण आपल्या सारखे लोक स्वत: कधिहि काहिही "करायला" जात नाहि,त्याचे काय? ते बोला!
22 Jun 2013 - 9:52 pm | सस्नेह
तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे हे प्रथम ठरवा पाहू !
दोन घरे असणे, पर्यावरण-नाश की सर्वांनी बिघडणे ?
22 Jun 2013 - 10:54 pm | प्यारे१
सावधान तीन वेळा का लिहीलंय त्यांनी ते लक्षात नाही आलं का?
दोन घरे असणे...... सावधान
पर्यावरण-नाश ...... सावधान
की
सर्वांनी बिघडणे ..... सावधान
जल्ला अलिकडं समदा शिकवाय लागतो ! (ह. घ्या. स्नेहातै)
22 Jun 2013 - 9:57 pm | पाषाणभेद
मला तर पहिल्या भावाचा हेवा वाटतोय. प्रत्येक गावात घरे म्हणजे मज्जाच मज्जा.
22 Jun 2013 - 10:52 pm | शिल्पा ब
हेवा का बॉ? सगळीकडे घर असल्याने मज्जा नेमकी कसली?
22 Jun 2013 - 10:59 pm | प्यारे१
पैसा- शिल्पा ब मावशी- पैसा. (भारतीय रिझर्व्ह बँक वाला, बँकेतनं व्हॉलंटरी रिटायर झालेला नव्हे ;) )
सगळीकडं घरं म्हणजे बक्कळ प्रॉपर्टी म्हणजे बक्कळ पैसा. आलं लक्षात?
22 Jun 2013 - 11:06 pm | पाषाणभेद
असं काय! मलाही हे नविनच आहे. पण माझ्या मनात हे नव्हते हो.
23 Jun 2013 - 2:43 pm | प्यारे१
इथेही?????
तुम्ही हल्ली 'वेगळ्याच भेदां' च्या मागे लागला आहात असे निरीक्षण नोंदवतो नि गप्प बसतो. ;)
परबू गुर्जीला बोलवा!
23 Jun 2013 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा
भेदा'भेद भ्रम... अ मं ग ळ :-b
23 Jun 2013 - 8:53 pm | पाषाणभेद
मिपा बंद होते त्याची कसर भरून काढतो आहे. जुन्या आठवणी येतात मिपाच्या.
24 Jun 2013 - 12:43 pm | मोदक
लोकहो..
त्या पहिल्या भावाचे प्रत्येक गावात घर म्हणजे 'होम' आहे.. 'फ्यामिली' नाहीये.
निघाले सगळे स्वप्नरंजनाला. ;-)
25 Jun 2013 - 12:57 am | शैलेन्द्र
इन रास्तोंपे अपने, कदम बढाते चलो..
दिल मिले न मिले, हात मिलाते चलो..
न बनावो ताज, के बहोत महंगा पडेगा..
न बनावो ताज, के बहोत महंगा पडेगा..
हर शहर मे लेकीन, एक मुमताज बनाते चलो..
24 Jun 2013 - 1:47 pm | मृत्युन्जय
मला वाटते सावधान त्या म्हातार्याने रहायला पाहिजे होते. "जरासी सावधानी जिंदगी भर आसानी". ते ३ सावधान बहुधा ३ बेसावध क्षणांसाठी असावेत ;)
24 Jun 2013 - 8:06 pm | अत्रुप्त आत्मा
@"जरासी सावधानी जिंदगी भर आसानी". ते ३ सावधान बहुधा३ बेसावध क्षणांसाठी असावेत>>> :-)) ठ्ठार जाहलो रे भगवंता ठ्ठार जाहलो! :-)) अरे शब्दभुभू,अता तरि ये रे,तुला नविन एँगल दिलाय... :D अता यावर 1 धागा काढ! :-))