मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)
__________________________________
मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.
अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.
____________________________
प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.
(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)
मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.
मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्यात सापडतो आणि या कामात बर्याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.
मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.
ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.
जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
________________________________
‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण
________________________
पूर्वप्रकाशन : मनोगत
प्रतिक्रिया
23 Jun 2013 - 12:16 am | संजय क्षीरसागर
या लेखात मी फक्त स्मृती या प्रभागा विषयी लिहीलं आहे. विषयाचा आवाका मोठा असल्यानं इतर फॅकल्टीज वर यथावकाश चर्चा पुढील लेखात होऊ शकेल.
पण तुम्ही डायरेक्ट :
वगैरे सुरू केलंत याचा अर्थ तुमचा स्वतःच्याच अनुभवावर विश्वास नाही. आणि याचं उघड कारण म्हणजे तुमची चित्तदशा `सांख्य की भक्ती' यात दोलायमान आहे.
23 Jun 2013 - 2:35 am | अर्धवटराव
यु नो व्हॉट... मला तुमची हि अदा प्रचंड आवडते... कुणी काहि प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर सरळ न्यायधिशाच्या खुर्चीत जाऊन बसायचं आणि दुसर्याची चित्तदशा कशी दोलायमान आहे, दुसर्याचे विचार म्हणजे भ्रम कशे आहेत, दुसर्याची समज कशी कमी आहे वगैरे छापाचे निकालपत्र देऊन मोकळं व्हायचं. अपेक्षेप्रमाणे मूळ मुद्याला साजेसं उत्तर तुमच्याकडुन अजुनही आलेलं नाहि.
>>या लेखात मी फक्त स्मृती या प्रभागा विषयी लिहीलं आहे. विषयाचा आवाका मोठा असल्यानं इतर फॅकल्टीज वर यथावकाश चर्चा पुढील लेखात होऊ शकेल.
-- तुम्ही तुमच्या प्रक्रियेशिवाय इतरांना व्यर्थ, भ्रमीष्ट नि काय काय ठरवुन टाकलत. त्या दोन चार वाक्यांचं मॅग्निट्युड उर्वरीत लेखाच्या मॅग्नीट्युडपेक्षा कितीतरी जास्त आहे. बाकि प्रक्रियांचं राहु देत, तुम्ही वाचकांना देखील त्याच टाईपचे उत्तर देता... विषय जर फक्त स्मृतीबद्दलचा होता तर या करामतींची आवष्यकता नव्हती. असो.
>>वगैरे सुरू केलंत याचा अर्थ तुमचा स्वतःच्याच अनुभवावर विश्वास नाही. आणि याचं उघड कारण म्हणजे तुमची चित्तदशा `सांख्य की भक्ती' यात दोलायमान आहे.
-- आले न्यायाधीश महाराज. त्याचं कसं आहे ना जज् साहेब... मला जर एक शेर ऐकवायचा असेल आणि ओरिजनल शायरचं नाव माहित असेल, गालीब वगैरे, तर "गालीब ने कहा है" अशीच सुरुवात करेन मी.
मूळ मुद्याला बगल देण्याची माझी खात्री आण्खी बळकट केल्याबद्द्ल धन्यवाद.
अर्धवटराव
21 Jun 2013 - 11:41 pm | संजय क्षीरसागर
तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे!
तुम्हाला वाटतंय मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर टाळतोय. मी तुम्हाला विचारलं होतं की `हा राम कुठे असतो?'
तुमचं उत्तर आहे ( ते देतांना तुम्ही मनाच्या जाळ्यात सापडलाय हे बहुदा लक्षात आलेलं दिसत नाही) :
थोडक्यात ती एका जनसमूहाची धारणा आहे, इट हॅज नो एक्झिस्टन्स बिसाइडस वन्स ओन माइंड.
सत्य सार्वभौम आहे. त्याला कोणत्याही श्रद्धेची वा धारणेची गरज नाही.
राम होता की नव्हता हा वाद नाही. तो आता, इथे, (सर्वांना आणि सर्वत्र) उपलब्ध आहे का? मुळात ज्याला राम म्हणजे कोण हे शिकवलं नाहीये त्याला तो दिसेल का?
आणि माझा दावा आहे, सत्य आता, इथे, सर्वांना आणि सदैव उपलब्ध आहे, फक्त मन धारणारहित हवं.
धारणा कशा सघन होतात हे देखील तुम्ही तुमच्याच प्रतिसादात सांगितलंय:
हे चिंतन, भ्रम सघन करण्याचा राजमार्ग आहे. मन हे जसं बायो कंप्युटर आहे तसंच बायो-प्रोजेक्टरही आहे. तुमच्या धारणा ते प्रोजेक्ट करायला लागतं. तुम्हाला (एकट्याला) समोरचं स्पष्ट दिसण्या ऐवजी तुमच्या मानसिक प्रतिमा दिसायला लागतात. आणि भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.
या उलट तुम्ही मनापासनं जसजसे मोकळे होता तसतसं तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूला चालू असलेलं ऐकू यायला लागतं. त्याला `दॅट विच इज' म्हणतात. आणि ते जगातला कुणीही नाकारू शकत नाही.
तुम्ही आणि इथले सदस्य थोडे सामंजस्यानं काय लिहीलंय ते समजावून घेतील आणि चर्चा व्यक्ती निरपेक्ष होईल अशी अपेक्षा आहे. मी इथे कुणाचेही उतारे, लिंक्स काहीही डकवत नाही, तुम्ही देखील कुणाला मधे आणू नका. अमका शहाणा की वेडा हे ठरवण्यात काही अर्थ नाही. आणि ते आपल्याला ठरवताही येणार नाही. मी स्वतः कधीही त्या फंदात पडलो नाही. द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. तुम्हाला लेखनातली प्रक्रिया उपयोगी ठरते का ते पाहा. प्रक्रिये विषयी मी निशं:क आहे, तुम्ही लेखनावर फोकस करा.
22 Jun 2013 - 12:34 am | संजय क्षीरसागर
सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.
22 Jun 2013 - 3:49 am | लंबूटांग
मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे पण आज शुक्रवार असल्याने हापिसात शांतता आहे आणि हातात वेळच वेळ आहे.
आनंद नक्की कोणाला होतो आहे? मनाला की व्यक्तीला?
कोणत्या कंप्युटर बद्दल बोलत आहात आपण?
सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का?
वर कोणीतरी विचारल्याप्रमाणेच तुमचा लिहीण्यात तरी किंवा समजण्यात किंवा समजवण्यात काही तरी घोळ आहे. तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह.
मला आजपर्यंतचे एकच कळत नाहीये की तुम्हाला जे काही बॅक ट्रॅक वगैरे मार्ग अवलंबून जे काही साध्य झाले आहे त्याची इतरांना गरज आहे का ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की. तुम्हाला त्या मनाच्या अवलोकनाने वा नाम साधनेने आणि काय ध्यान धारणेने वगैरे फरक नसेल पडला पण बाकीच्यांना पडत असेल तर त्यांना मूर्खात काढण्याची अथवा चूक ठरवण्याची काय गरज आहे? त्यातून तुम्हाला त्या गोष्टी जमत/ झेपत नाहीत असाही निष्कर्ष निघू शकतो.
असो आता हातातला वेळ संपला आणि घरी जायची वेळ झाली. तेव्हा तूर्तास इतकेच.
22 Jun 2013 - 10:04 am | संजय क्षीरसागर
.
तेच तर तुम्हाला सांगतोय, माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
मी त्या प्रक्रियांबद्दल लिहीलंय आणि त्यांची व्यर्थता सकारण सांगितलीये. कुणालाही मूर्खात काढण्यात मला काहीही रस नाही. अर्थात, तसं कोणी स्वतःला समजत असेल तर माझा नाईलाज आहे.
22 Jun 2013 - 1:20 pm | कवितानागेश
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.>
हे जरा जास्त होतय.
आपण सार्वजानिक संस्थळावर काहीही लिहितो तेन्व्हा आपण कुणाच्यातरी विचारप्रक्रियांच्या आणि चरचा करणार्या लोकांच्या 'मधेच' पडत असतो.
इथे प्रत्येका ला आपले विचार लिहिण्याचा अधिकार आहे.
22 Jun 2013 - 1:52 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही जेव्हा मला `हे जरा जास्त होतय' म्हणता तेव्हा त्यांच्या प्रतिसादाची सुरूवात आणि टोन पाहा:
>मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे
असं असेल तर मग ते कशाला उगीच पिंका टाकतायत? आणि हो, पिंक जरा जास्तच वाटत नाहीये का?
22 Jun 2013 - 1:55 pm | कवितानागेश
होय! :)
22 Jun 2013 - 10:17 am | यशोधरा
ह्या धाग्यावर खुद्द लेखक महाशय धरुन विषयाला सोडून सगळ्यांची जी उत्तरे प्रत्युत्तरे सुरु आहेत की सगळ्यांची (पुन्हा, लेखक महाशय धरुन) मनं करतायत की कसं?
22 Jun 2013 - 10:41 am | लंबूटांग
.
22 Jun 2013 - 10:46 am | यशोधरा
विषय ना? भुंगा कसा गुणगुणतो :)
22 Jun 2013 - 3:03 pm | संजय क्षीरसागर
भुंग्याला गप कसं करायच असा विषय आहे. आणि डेमोसकट प्रॅक्टीकल दाखवतोय.
22 Jun 2013 - 3:21 pm | यशोधरा
मुळात गुणगुण आहे म्हणूनच ना?
24 Jun 2013 - 12:53 pm | मोदक
काय हो.. दोन देशांनी एकमेकांत केलेला करार एका देशाने मोडला तर दुसर्याने तो पाळणे आवश्यक असते का..?
24 Jun 2013 - 3:36 pm | यशोधरा
ए बाबा, ते आमाला काय विचारते? दुसर्या देशाच्या मनाला विचार ने! =))
22 Jun 2013 - 10:35 am | लंबूटांग
Hate to break it to you तुमच्या लेखनात कोणालाच रस नाहीये पण मी (आणि इतरही बहुतेक जण) तुमच्या लेखनातील शब्दांच्या तर्कशून्य खेळाला आणि व्यर्थतेला आक्षेप घेत आहेत. तुम्हीच स्वत:ला हवे तसे शब्द मोडून वाकवून आपण कारणे देतोय असे काहीतरी समजताय.
वर लिहील्याप्रमाणे त्या प्रक्रिया व्यर्थ आहेत असे तुमचे मत झाले. ती कारणे जी देताय ती कारणे नसून तुमचे वैयक्तिक मत आणि अनुभव आहेत. वर लिहील्याप्रमाणे तुम्हाला एका विशिष्ट प्रक्रियेने फरक पडला आणि इतर प्रक्रियांनी तुम्ही तसाच परिणाम साधण्यास असमर्थ ठरलात ह्याचा निष्कर्ष त्या प्रक्रिया व्यर्थ आहेत असा कसा काय ब्वॉ?
हे म्हणजे तुम्हाला Tylenol ऐवजी Advil ने गुण आला तर मग Tylenol व्यर्थ आहे म्हणण्यासारखे झाले. (दोन्ही तापावरची औषधे म्हणून वापरली जातात अमेरिकेत - आपल्याकडे क्रोसिन असते तशीच).
अर्थात, कोणी स्वतःला सर्वज्ञ समजत असेल तर माझा नाईलाज आहे.
22 Jun 2013 - 10:40 am | लंबूटांग
ते तेवढे स्मृतीच्या मुद्द्याचं उत्तर देण्याचे राहून गेलेय तुमचे. ते देता का? की मला रस नाहीये म्हणून दिले नाही आहे?
22 Jun 2013 - 10:45 am | मदनबाण
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)
ज्या विषयी तुम्ही काहीही लिहणार नाहीत त्यावर या लेखात भाष्य करायची आणि संतांची आणि नाम साधनेला व्यर्थ ठेवायचा तुमचा विचार तुम्ही याच लेखात विस्ताराने का नाही लिहले. आणि जर इतक्यात काही लिहायचे नव्हते तर मग त्या विषयावर या लेखान आपण विधाने कोणत्या कारणाने करत आहात ?
म्हणुनच मी या धाग्यावर तुम्हाला वारांवार विचारले :-
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत?
या प्रश्नाचे उत्तर तुम्ही माझ्या शेवटच्या प्रतिक्रियेला दिलेल्या तुमच्या प्रतिसादात शोधुन सुद्धा सापडले नाही.
तुम्हाला वाटतंय मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर टाळतोय. मी तुम्हाला विचारलं होतं की `हा राम कुठे असतो?'
तुमचं उत्तर आहे ( ते देतांना तुम्ही मनाच्या जाळ्यात सापडलाय हे बहुदा लक्षात आलेलं दिसत नाही) :
आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा !
थोडक्यात ती एका जनसमूहाची धारणा आहे, इट हॅज नो एक्झिस्टन्स बिसाइडस वन्स ओन माइंड.
सत्य सार्वभौम आहे. त्याला कोणत्याही श्रद्धेची वा धारणेची गरज नाही.
मनाच्या अस्तित्वावर वि़ज्ञान सुद्धा अथक संशोधन करत आहे आणि आंतरमन आणि बाह्यमन या संकल्पना विज्ञानाने मान्य केल्या आहेत अशी माझी माहिती आहे, ती चूक असल्यास तसे मला सांगा. मी जे तुम्हाला उत्तर दिले आहे ते योग आहे असे मला वाटत आणि मी कोणत्याही मनाच्या जाळ्यात सापडलेलो नाही. जेव्हा बाह्यमनातुन घेतले जाणारे नाम आंतर मनातुन सुद्धा घेतले जाउ लागते तेव्हा साधकाची पुढची अवस्था अजपाजप ही असु शकते.श्वासागतीक ही क्रिया घडली जाते.मग कोणी सोहम् म्हणते तर कोणी राम कोणता मंत्र आपण नामात घेतला हे त्यावर अवलंबुन आहे आणि साधनेवर.
राम होता की नव्हता हा वाद नाही. तो आता, इथे, (सर्वांना आणि सर्वत्र) उपलब्ध आहे का? मुळात ज्याला राम म्हणजे कोण हे शिकवलं नाहीये त्याला तो दिसेल का?
आपणास वाल्मिकी ठावुक असतील असे गॄहित धरुन सांगतो...त्यांना सुद्धा राम कोण होता हे माहित नव्हते,नारद मुनींनी त्यांना राम नाम घेण्यास प्रवॄत्त केले. सुरवातीला मरा मरा असे नाम उलटे घेणारा नंतर रामनाम चिंतनात मग्न झाला आणि या रामनाम चिंतनानेच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी महर्षि झाले.
हे चिंतन, भ्रम सघन करण्याचा राजमार्ग आहे. मन हे जसं बायो कंप्युटर आहे तसंच बायो-प्रोजेक्टरही आहे. तुमच्या धारणा ते प्रोजेक्ट करायला लागतं. तुम्हाला (एकट्याला) समोरचं स्पष्ट दिसण्या ऐवजी तुमच्या मानसिक प्रतिमा दिसायला लागतात. आणि भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.
हे जे सर्व वरील लिहले आहे त्यालाच मी भ्रम म्हणतो.मला वाटतं.
या उलट तुम्ही मनापासनं जसजसे मोकळे होता तसतसं तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूला चालू असलेलं ऐकू यायला लागतं. त्याला `दॅट विच इज' म्हणतात. आणि ते जगातला कुणीही नाकारू शकत नाही.
गंमतच आहे,हजारो साधकांनी साधना केली, संतांनी नामाचे महत्व सांगितले आणि ते जगमान्य असताना देखील तुम्ही त्यास व्यर्थ म्हणता ! मात्र स्वतः जे काही लिहता त्याला जगात कोणीही नाकारु शकत नाही असे प्रमाणपत्र जोडता.
तुम्ही आणि इथले सदस्य थोडे सामंजस्यानं काय लिहीलंय ते समजावून घेतील आणि चर्चा व्यक्ती निरपेक्ष होईल अशी अपेक्षा आहे. मी इथे कुणाचेही उतारे, लिंक्स काहीही डकवत नाही, तुम्ही देखील कुणाला मधे आणू नका. अमका शहाणा की वेडा हे ठरवण्यात काही अर्थ नाही. आणि ते आपल्याला ठरवताही येणार नाही. मी स्वतः कधीही त्या फंदात पडलो नाही. द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. तुम्हाला लेखनातली प्रक्रिया उपयोगी ठरते का ते पाहा. प्रक्रिये विषयी मी निशं:क आहे, तुम्ही लेखनावर फोकस करा.
क्षीरसागरजी पुन्हा नम्रपणे मी आल्याला निदर्शनात आणु इच्छितो की आमचाही सामंज्यस्याने लिहण्याचा हा प्रयत्न आहे तो समजण्याचा प्रयत्न करा.तुम्ही तुमच्याच लेखनात ज्यांची नावे घेउन त्यांची साधना त्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे असे विधान केले आहे.मग त्याच संतमंडळी पैकी मी काहींची उदाहरणे माझ्या प्रतिसाताद दिली तर ते तुम्हाला का खटकते ?अमका वेडा का शहाणा हे ठरवण्यात अर्थ नाही म्हणता आणि स्वतः इतरांची सानधा व्यर्थ ठरवून मोकळे होता,याला दुट्टपीपणा असे म्हणतात.
आणी मी सुद्धा म्हणतो द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. माझ्या प्रतिसादातले संदर्भ आणि शेवटी दिलेला व्हिडीयो तुमच्या उपयोगी पडतो का ते पहा आणि मनावर फोकस करा.
22 Jun 2013 - 4:01 pm | संजय क्षीरसागर
`या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो' हे मी या आधीच म्हटलंय. थोडक्यात विषय तुम्ही सुरू केलाय म्हणून प्रतिसाद देतोय. तरी आता परत परत तो मुद्दा काढू नका हे नम्रपणे सांगतो कारण आता चर्चा सुरू झालीये.
आता तुमचे मुद्दे :
अजपाजप याचा अर्थ आता मनाची विचार करण्याची क्षमता संपली. भ्रम अंतर्मनात पोहोचला.
तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो, मन श्वासातून घेतलेल्या प्राणवायुवरच चालत असल्यानं, विचार करतांना श्वासाची लय बदलते. एकदा भ्रम अंतर्मनात पोहोचला की न्यूनतम श्वासात तो संगृहित राहतो. याचा अर्थ तुम्ही श्वासाची लय बदलून सुद्धा त्यात काही फरक पडत नाही. म्हणजे नॉर्मली एखादा नेगटीव विचार आपण खेळायला लागतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन आणि श्वासाचा जोम वाढून निघून जातो आणि आपण फ्रेश होतो पण अजापाजपात भ्रम कायमस्वरूपी मेंदूत राहतो. तो हटता हटत नाही.
अर्थात! ते दाऊदला उपरती होऊन त्याचा साने गुरुजी होण्यासारखं आहे. याच्या विपरित घटना म्हणजे एखाद्या होतकरू तरूणाचा संपूर्ण चिंतन-मननानं ओसामा बिन लादेन होणं. पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी लिहीला आहे ते या कॅटेगरीत येत नाहीत. इथे मनावर हुकुमत मिळवण्याची गोष्ट चालू आहे. व्यक्तिमत्त्वाच्या रूपांतरणाची नव्हे.
मी साधनेला व्यर्थ म्हणतो कारण ती फारफार तर (खरं तर थोडं फार) व्यक्तिमत्त्व बदलू शकते. पण सूज्ञ माणूस कधीही वाल्मिकी सारखं वागत नाही त्यामुळे त्याला असल्या साधनेची गरज नसते.
आणि त्याही पुढे जाऊन त्यानं अजपाजप वगैरे साधना केली तर तो हमखास भ्रमिष्ट होतो.
माझ्या एका मित्राच्या आईनं (अक्कलकोट का कुणी तत्सम) स्वामींचं असंच घनघोर चिंतन, मनन आणि जप अनेक वर्ष केला. आता कुणीही आलं तरी त्या, "स्वामी आलात? यावं. किती उशीर करायचा तो. आता जेवूनच जायचं हं. आणि असं मला सोडून, न सांगता जायचं नाही" वगैरे सुरू करतात.
दादा, आता हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद आहे याचा उपयोग होतो का ते पाहा. नाही तर माझं लेखन वाचणं तरी थांबवा, तुम्हाला कधीमधी दिसणारा राम एकदम अंतर्धान पावेल.
22 Jun 2013 - 6:51 pm | कवितानागेश
पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी लिहीला आहे ते या कॅटेगरीत येत नाहीत.>
माणूस म्हणजे माणूस! त्यात कॅटेगरी नसते. हे म्हणजे फक्त ९५% च्या वर मार्क असलेल्या मुलांसाठी क्लासेस चालवण्यासारखे झाले. शिवाय त्यांनीपण प्रश्न विचारायचे नाहीत.
इथे मनावर हुकुमत मिळवण्याची गोष्ट चालू आहे. व्यक्तिमत्त्वाच्या रूपांतरणाची नव्हे.>
बुद्धी वापरली की मनावर हुकुमत येतेच. आणि व्यक्तिमत्व बदलणार नसेल तर मनावर हुकुमत येणार म्हणजे नक्की काय होणार आहे?
त्याही पुढे जाऊन त्यानं अजपाजप वगैरे साधना केली तर तो हमखास भ्रमिष्ट होतो.
माझ्या एका मित्राच्या आईनं ........>
फक्त एका उदाहरणावरुन असा निष्कर्ष? अभ्यास फारच कमी पडतोय......
शिवाय कित्येक लोक जप न करताही म्हातारपणी भ्रमिष्ट होतात. त्यांचे काय?
एक मित्रत्वाचा सल्ला: यापुढे कुणावरही, कुठल्याही संदर्भात, कुठल्याही पद्धतीवर, राळ न उडवता केवळ तुमच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल आणि विचारांबद्दल लिहिलेत तर बरे होईल.
22 Jun 2013 - 11:48 pm | संजय क्षीरसागर
>माणूस म्हणजे माणूस! त्यात कॅटेगरी नसते. हे म्हणजे फक्त ९५% च्या वर मार्क असलेल्या मुलांसाठी क्लासेस चालवण्यासारखे झाले.
= त्याच्या पुढे तुम्ही वाचलेलं दिसत नाही :पण सूज्ञ माणूस कधीही वाल्मिकी सारखं वागत नाही त्यामुळे त्याला असल्या साधनेची गरज नसते.
>शिवाय त्यांनीपण प्रश्न विचारायचे नाहीत.
हे मी ज्यांना म्हटलंय त्या विषयी तुम्ही पूर्वीच्या प्रतिसादात राजी झाला आहात. बाकीच्या सर्व जवाबदारीनं विचारलेल्या प्रश्नांना मी सविस्तर उत्तरं दिलीयंत.
> फक्त एका उदाहरणावरुन असा निष्कर्ष?
मी अजापजप या साधनेची फलश्रुती सांगितली आहे आणि ती प्रत्येक मानवी मनाला अॅप्लिकेबल आहे. उदाहरण फक्त स्पष्टीकरणासाठी, नेमकं काय होतं ते समजावं, म्हणून दिलंय.
>बुद्धी वापरली की मनावर हुकुमत येतेच. आणि व्यक्तिमत्व बदलणार नसेल तर मनावर हुकुमत येणार म्हणजे नक्की काय होणार आहे?
= मनावर हुकुमत याचा अर्थ अंतःप्रेरणेनं (इंटीश्यूननं) जगणं. त्यासाठी बुद्धी उपयोगी असते पण ती निर्णायक नाही. ते जाणिवेच्या प्रगल्भतेनं शक्य होतं. त्याविषयी पुढे लिहीणार आहे. जाणिव प्रगल्भ झाली की माणूस आपसूक संवेदनाशील होतो त्याला व्यक्तिमत्त्व बदलाची वेगळी गरज राहात नाही.
> एक मित्रत्वाचा सल्ला: यापुढे कुणावरही, कुठल्याही संदर्भात, कुठल्याही पद्धतीवर, राळ न उडवता केवळ तुमच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल आणि विचारांबद्दल लिहिलेत तर बरे होईल.
= तुम्ही इतरांसारखीच चूक करतायं. मी प्रचलित साधना पद्धतीचे दोष सविस्तर स्पष्टीकरणासहित सांगितले आहेत. आणि माझ्या अनुभवानं सर्वांना उपयोगी होईल अशी एक अत्यंत नवी पद्धत सांगितली आहे.
सदस्यांनी एकतर त्या पद्धातीचा उपयोग करून येणारे निष्कर्श लिहावे किंवा मनावर हुकुमत मिळवण्यास प्रचलित पद्धती (अवलोकन आणि नामसाधन) कश्या सहाय्यक ठरतात ते दाखवावं इतकी साधी अपेक्षा होती.
23 Jun 2013 - 12:14 am | कवितानागेश
मी अजापजप या साधनेची फलश्रुती सांगितली आहे आणि ती प्रत्येक मानवी मनाला अॅप्लिकेबल आहे. >
पण तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे का, की त्याची फलश्रुती तुम्ही सांगताय..... :(
शिवाय तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतय हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानी करुन पाहवी.
शिवाय प्रत्येक मानवी मन सारखं असेल आणि त्याला एकच साधना अप्लिकेबल असेल तर अपवादांचे काय? असे अपवाद कसे काय असतील? शिवाय कॅटेगरीही कशी काय असेल?
मनावर हुकुमत याचा अर्थ अंतःप्रेरणेनं (इंटीश्यूननं) जगणं.>
ही व्याख्या पटत नाही. शिवाय मन म्हणजे काही 'शत्रु' नाही त्यावर हुकुमत गाजवायला.. it is seat for emotions.
अंतःप्रेरणा म्हणजे काय? instinct?
मी फक्त महात्मा गान्धीच्या लिखाणात हा शब्द वाचला आहे. पण म्हणजे तुम्हला नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे?
आणि अंतःप्रेरणेचा बुद्धीशी संबंध काय आणि कसा असतो तेपण सांगा.
कारण शेवटी माणूस स्वतःच्या बुद्धीवरच विश्वास ठेवतो.
23 Jun 2013 - 11:44 pm | संजय क्षीरसागर
मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!.
आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कलापव्यय ही नाही.
मनाची `धारणा' ही फॅकल्टी अशी काम करते :
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यासाठी मनाला तिचं सतत स्मरण घडवून द्यावं लागतं. समजा राम भेटावा अशी इच्छा असेल तर उठता-बसता, प्रत्येक वेळी, जरा फुरसत मिळाली की त्याचा जप करावा लागतो. असा जप दीर्घ काल केल्यानं मनात येणारे इतर विचार थांबून केवळ रामनाम मनात रूंजी घालू लागतं. मनाला सवय लावायला वेळ लागतो पण एकदा लागली की सुटणं कठीण. जप करणार्याला जपाचा आधार वाटायला लागतो कारण अनेकानेक विचारांऐवजी मनात `राम' हाच विचार घुमू लागतो. वास्तविकात मात्र भक्ताची श्रवणसंस्था निकामी व्हायला लागते कारण जाणीवेची नॉर्मल डायनॅमिक स्टेट संपून (थोडक्यात आपण जसं एकावेळी आजूबाजूला चाललेलं सगळं ऐकत असतो), आता तिचा रोख मनाकडे वळायला लागतो. अजपाजप सुरू झाला की भक्ताला आजूबाजूचं ऐकू येण्याऐवजी `रामनाम' ऐकू यायला लागतं. मग त्याला आणखी बरं वाटतं पण परिस्थिती गंभीर व्हायला लागलेली असते.
कारण मनाचा दुसरा पैलू दृक आहे. एकदा अजपाजप सुरू झाला की नामघोष निद्रेत प्रवेश करतो. मग मनात रामाची प्रतिमा तयार व्हायला लागते. एकदा अंतर्मनात (किंवा सबकाँशसमधे) अशी प्रतिमा तयार झाली की भक्ताच्या जाणीवेचा रोख मनाच्या पुरत्या कह्यात जातो.
आधी श्रवण नादुरस्त आणि मग अवलोकन नादुरूस्त होऊ लागतं कारण अंतर्मन ती प्रतिमा समोरच्या निराकारावर प्रोजेक्ट करायला लागतं. भक्ताला समोरचं स्पष्ट दिसण्याऐवजी सगळीकडे राम दिसायला लागतो आणि आजूबाजूचं नीट ऐकू येण्याऐवजी रामनाम ऐकू येऊ लागतं. तो मनाच्या पूर्ण ताब्यात जातो, याला सायकॉलॉजित भ्रमिष्टावस्था म्हटलंय.
भक्ताला वाटतं आपण भवसागर पार केला पण परिस्थिती नेमकी विपरित असते, तो वास्तविकतेपासून पूर्णपणे भरकटलेला असतो. ही इज टोटली कट ऑफ फ्रॉम द रिअॅलिटी.
मी मनाला इतकं अंतर्बाह्य जाणलंय की माझ्या जाणीवेचा रोख ते माझ्या इच्छेशिवाय स्वतःकडे वळवू शकत नाही. त्यामुळे मला समोरचं लख्खं दिसतं आणि बाजूचं स्पष्ट ऐकू येतं!
तुमच्या `तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे क`?' या प्रश्नाचं आता वेगळं उत्तर देण्याची गरज नाही.
मनावर हुकुमत याचा अर्थ मन शत्रू आहे असा नाही तर मनाच्या गुलामीत न जगता, मन या फॅकल्टीचा उपयोग करत स्वेच्छेनं जगणं असा आहे.
अंतःप्रेरणेबद्दल पुढच्या लेखात लिहीन.
24 Jun 2013 - 1:24 pm | कवितानागेश
मनाचे अवलोकन करणं अगदीच निर्धोक आहे हे मला आणि इतर अनेकांना नक्कीच माहित आहे. पण या पूर्वी अनेकांनी सांगितलेल्या साधनापद्धती मोडीत काढून तुम्ही वेगळंच काहितरी सांगत आहात अशी कल्पना तुमच्या लिखाणावरुन होतेय. म्हणून पुन्हा खात्री करुन घेतली. स्वतःच्या मनाचा-भावविश्वाचा शोध घेण्यात तसेही कठीण काहीच नाही.
पण जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ते मात्र पूर्णतः गैरसमजांवर आधारीत आहे असं खेदानी नमूद करतेय. अजपाजप करणारे शिवाय अतिशय बुद्धिमान आणि मेन्दूच्या सगळ्या फॅकल्टॅज उत्तम चालू असणारे, मनानी आणि शरीरानी व वागणूकीनीदेखिल अतिशय निर्मळ असणारे अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत.
अर्थात, मी इथे जपाचे फायदे लिहित बसणार नाही.
तुम्हाला कधी वेळ असेल तर पूर्वग्रहदूषित द्रुष्टीकोन न बाळगता करुन पाहा.
अजून एक प्रश्न म्हणजे 'स्वेच्छेने जगणं' हे अन्तिम ध्येय कसं काय होउ शकत?
स्वेच्छेने जगणं हे प्रत्येक वेळेस योग्य जगणं असेलच असं नाही. आणि जरी तसं असलं तरीही त्यातून आनंद मिळेलच असंही नाही.
सैनिक स्वेच्छेनी जगू शकत नाही, आणि त्यामुळेच आपण इथे मजेत स्वेच्छा वगरै गप्पा करतोय याची निदान मला तरी स्वच्छ जाणीव आहे.
24 Jun 2013 - 2:42 pm | संजय क्षीरसागर
`अजपाजप' याचा अर्थच: "तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष".
तुम्हाला बहुदा अजपाजप म्हणजे नक्की काय याची कल्पना नसावी. तुम्ही तुमची व्याख्या लिहा म्हणजे चर्चा होईल.
तोच तर चर्चेचा विषय आहे!
माझा कोणताही पूर्वग्रह नाही. सध्या जगात प्रचलित असलेल्या सर्वच्यासर्व साधनांचा (तंत्रसूत्र, झेन (जाझेन), सूफी (वर्लिंग), डायनॅमिक आणि कुंडलिनी (ओशो), गुर्जेफियन स्टॉप मेथडस, पातंजलींच्या अष्टांगयोगाची सूत्र, बुद्धाची विपश्यना) मी अभ्यास केला आहे. आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे.
"राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय?
मला ही त्यावर लिहीयंच आहे पण प्रथम हा इश्यू सेटल व्हायला हवा.
24 Jun 2013 - 10:32 pm | अर्धवटराव
>>`अजपाजप' याचा अर्थच: "तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष".
-- नाहि. अजपाजप हा आवक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माईंड मधला नामघोष नाहि. काहि शब्दांचा/वाक्प्रचारांचा थोडासा खुलासा करतोयः
अजपाजपः ज्याप्रमाणे परागकणांत सुगंध आहे त्याप्रमाणे नामात सच्चिदानंद आहे. हा आनंद प्रथम वाक्शक्ती वापरुन मनात उतरवला जातो. या प्रोसेसमधे मनाप्रमाणेच शरीराची देखील ध्यानशक्ती खर्च होते. अभ्यासाने ध्यानशक्ती पुरेशी बळकट झाली कि मन स्वयंस्फूर्तीने या आनंद निर्झराचा प्रत्यय स्वतः घेतं... आता त्याला शरीराकडुन ध्यानशक्ती उसनवारीने घ्यायची आवश्यकता नाहि. शारीरीक, बौद्धीक कार्य विनाअडथळा उत्तम प्रकारे चाललय व मनात निरपेक्ष आनंदाचा नामरुपी निर्झर वाहतोय याला म्हणावे अजपाजप.
नामातला आनंद: सच्चिदानंदाने मानवी इंद्रियांना गोचर असे स्वरुप धारण केले व त्याचे नाम हे सच्चिदानंदाचे वाक्/श्रवणरूप झाले (याला नामाव्यतिरिक्त इतर काहि पुरावा नाहि... हा मुर्खपणा वाटण्याचा संभव आहे... पण त्याला स्वप्रत्ययाशिवाय दुसरा इलाज नाहि). म्हणुन गुळात गोडवा असावा त्याप्रमाणे नामात आनंद सामावला आहे (उदाहरण थोडं घिसेपिटे टाईपचे आहे, मान्य... माझ्या प्रतिभेचा संकुचीतपणा)
राम दिसणं म्हणजे नक्की काय? : शरीर, मन, बुद्धी, चेतना... यच्चयावत पातळ्यांवर सच्चिदानंदाचा प्रत्यय येणे म्हणजे राम दिसणे. अमिताभ बच्चन पडद्यावर दिसतो. ते त्याचे प्रतिमारूप. प्रतिक्षा बंगल्याबाहेर एकाविशिष्ट वेळी जाऊन उभे राहिलात तर अमिताभ बच्चन स्वतः दिसतो. ते त्याचे स्वरुप. मास्तर वर्गात गणित शिकवत असताना आपण विजय दिनानाथ चौहाणचे अंगरक्षक बनुन फाईट सीन मधे रमुन जावे हा भ्रम (मधुबाला पासुन दिपीका पादुकोण पर्यंत सिनेनट्यांबरोबर सीन इमॅजीन करणे त्यातल्यात्यात विशेष सुखकारक)
राम दिसणे शक्य आहे काय? : "इतर कुणाला चॅलेंज करण्यासाठी नाहि तर मला स्वतःला राम बघण्याची खरोखरची इच्छा आहे" हे रामच्य दिशेने उचललेलं पहिलं पाऊल. त्यासरशी स्वतः राम दहा पाऊले तुमच्या कडे टाकतो. योग्यवेळी दर्शनाचा लाभ होतो.
जपाचे फायदे: अंतीम फायदा वर सांगितल्याप्रमाणे राम दिसणे व अक्षयीची आनंदठेव गटवणे. टेंपरपी फायदे: ध्यानशक्ती मजबूत होणे, निरपेक्ष आनंद हा केवळ भ्रम नसुन ते एक सत्य आहे हा उलगडा होणे, प्रेम हे निसर्गाने दिलेले सर्वोत्तम औषध आहे याचा प्रत्यय येणे... व इतर बरेच काहि.
अवांतरः आम्हाला इतरांच्या चर्चेत मधे मधे टांग मारण्याची वाईट खोड आहे... क्षमस्व.
अर्धवटराव
24 Jun 2013 - 11:46 pm | संजय क्षीरसागर
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.
आनंद शांततेत आहे (नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे). शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे.
मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय.
त्यातून सच्चिदानंद ही स्थिती आहे आकार नाही आणि स्थिती ही नेहमी स्थितीच राहते ती कधीही आकार होत नाही. त्यामुळे तुमचा फंडाच गंडला आहे.
तुम्ही व्याख्येतच पराभूत झालात त्यामुळे पुढचा सर्व प्रतिसाद व्यर्थ आहे.
अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.
25 Jun 2013 - 12:04 am | कवितानागेश
नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे).>
तोच 'अजपाजप' असतो. अनाहत नाद असतो. त्याचा फक्त निर्देश करता येतो. 'ऐकता येत नाही...
जौ दे. ते फार कॉम्प्लिकेटेड आहे.
शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे. >
कशावरुन?
कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला?
जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?
अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता?
त्यामुळे मला फार हसू येतं. =))
25 Jun 2013 - 12:28 am | बॅटमॅन
करमणुकीच्या स्रोताला तू करमणूक का करतोस असे विचारून करमणुकीचा सप्लाय बंद का करतेस गं मौतै ;) =))
25 Jun 2013 - 8:59 am | पैसा
शांतता राखा. नहीं तो सिवाजी द बॉस आ जाएगा..
25 Jun 2013 - 12:43 am | संजय क्षीरसागर
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात!
आहो मग नाम घ्यायचंच कशाला?
शब्बास! आहो स्वरूप म्हणजे आपण! तिथे जायला कशाला लागतंय?
नका फंदात पडू दुरूस्तीच्या, तिथे दुरूस्ती लागतच नाही
25 Jun 2013 - 1:35 am | अर्धवटराव
>>हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.
-- विषयाचं ज्ञान-अज्ञान तर माहित नाहि, पण कुठल्याशा कारणाने तुम्ही तुमचे ज्ञानदरवाजे जाम बंद करुन ठेवलेत हे नक्की. असो.
>>आनंद शांततेत आहे (नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे). शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे.
-- शांती (पीस) आणि शांतता (सायलेन्स) यात मूलभूत फरक आहे. तुमच्या धारणेनुसार एखादा जन्मजात बहिरा व्यक्ती (जर तो जन्मजात आंधळा, मुका, आणि त्वचेचे सेन्सेशन गमावलेला असेल तर फारच उत्तम) खरा शांत आणि सिद्ध, नाहि का?
>>मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय.
-- शांती (पीस) आणि शांतता (सायलेन्स) या भिन्न गोष्टी आहेत हो.
>>त्यातून सच्चिदानंद ही स्थिती आहे आकार नाही आणि स्थिती ही नेहमी स्थितीच राहते ती कधीही आकार होत नाही. त्यामुळे तुमचा फंडाच गंडला आहे.
-- "निराकार" हा कन्सेप्ट्च मुळी आकारावर, त्याच्या निगेशनवर आधारावर आधारला आहे. आपण सभोवती जे आकार बघतो ते त्या सो कॉल्ड निराकारानेच धारण केले असतात. जर तुम्ही आकाराच्या शक्यतेचा, त्याच्या सृजन आणि प्रलयाच्या क्षमतेचा अस्विकार कराल... असो, ज्याचे त्याचे आकलन. सच्चिदानंद हि व्यक्ती आहे. तुमचीच खालील वाक्ये बघा:
१)अर्थात! इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे
२) आपण स्वेच्छेनं जगायला लागू.
३)आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो.
सच्चिदानंदात इच्छा आहे, क्षमता आहे, इंटलिजन्स आहे. इट्स अ पर्सनॅलीटी. असो. सच्चिदानंदाच्या आकार धारणाच्या शक्यतेशी माझी १००% सहमती आहे.
फंडा गंडणे, प्रतिसाद व्यर्थ असणे वगैरे कमेण्ट्स तुमच्या न्यायधिशाच्या भुमीकेला साजेशीच आहेत. त्यात काहि आश्चर्य वाटलं नाहि.
>>अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.
-- अहो चालायचच. तुम्ही नाहि का मनाचे आकुंचन करुन त्याला एका वेगळ्याच "ऐच्छीक" एण्टीटीने कंट्रोल करायचे अगडबंब आणि निर्बुद्ध तत्वज्ञान ऐकवलं... मिपा त्याकरताच बनलय... इथे दोन्हि प्रकारचे लोक येतात... ज्यांना आपण अर्धवट आहोत हे कळलय आणि ज्यांना आपल्या अर्धवटपणाची अजीबात कल्पना नाहि.
अर्धवटराव
24 Jun 2013 - 11:06 pm | कवितानागेश
तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष>
अजपाजप हा अनाहत नाद असतो. पातन्जल योगसुत्र रिवाईज करावे ही विनन्ती.
सब्कॉन्शस माईन्ड आवाक्यापलिकडे नसतं!
जप फक्त नामाचा नसतो. जपाचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत. पण त्या सगळ्या जाउदेत. त्या कामाच्या नाहीत हे तुमचे मत ठाम असेल तर चर्चा तरी कशाला?
पण एकच सांगते, जप करायला सांग्णार्या सर्व संतानी जप जा केवळ एक मार्ग आहे, एक क्रिया आहे, आत्मोन्नतीसाही पुढे जाण्याची एक सोपी पद्धती आहे असेच सांगितले आहे. तो केवळ दरवाजा आहे. पण कुणी जर ससा-कासवाच्या गोष्तीतल्याप्रमाने त्या मार्गावरच गंमतजंमत करत रेंगाळले तर तो दोष त्या मार्गाचा किंवा त्या मारगाकडे बोट दाखवणार्या व्यक्तीचा नाही.
माझा कोणताही पूर्वग्रह नाही.. हे आणि सध्या जगात प्रचलित असलेल्या सर्वच्यासर्व साधनांचा (तंत्रसूत्र, झेन (जाझेन), सूफी (वर्लिंग), डायनॅमिक आणि कुंडलिनी (ओशो), गुर्जेफियन स्टॉप मेथडस, पातंजलींच्या अष्टांगयोगाची सूत्र, बुद्धाची विपश्यना) मी अभ्यास केला आहे.> हे वाक्य विरोधाभास दाखवतय.
आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे.
कुठे?
"राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय? >
नाही. मला माहित नाही. मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही 'राम दिसला' असं सांगणारं...
शिवाय वर एके ठीकाणी तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्ताईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?
25 Jun 2013 - 12:30 am | संजय क्षीरसागर
अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव. द साऊंड ऑफ सायलेंस. ती एकदा झाली की सतत तुमच्या बरोबर असते कारण तुम्ही आणि ती वेगळी राहात नाही.
जाऊं द्या, एकच सांगतो जर तुम्ही जप-साधना केली असती तर त्याविषयी निश्चित असं काही तरी लिहू शकला असता. इतकी गोलमाल वाक्य फक्त हेच दर्शवतात की तुम्ही ती साधना केलेली नाही आणि तुम्हाला त्या विषयाची माहिती नाही.
इथे तर तुम्ही कहरच केलायं! आहो :
हा इतका दीर्घ आणि मौलिक प्रतिसाद मी तुमच्याच प्रश्नाला दिलाय! याचा अर्थ तुम्ही प्रतिसाद देखील वाचत नाही! आणि काहीही न वाचता बिनधास्त फक्त प्रश्न फेकता.
>नाही. मला माहित नाही. मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही 'राम दिसला' असं सांगणारं..
= आख्ख्या प्रतिसादात हे एकमेव वस्तुस्थिती निदर्शक वाक्य तुम्ही लिहीलंय!
या अत्यंत निरागस प्रश्नासाठी तुम्हाला सगळ्या चुका माफ! शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरूत्त्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत.
25 Jun 2013 - 8:21 pm | उन्मेष दिक्षीत
व्वा !
एक फक्त माणसांचं बोलणं सोडलं, तर जगात सगळी शांतताच तर आहे !
25 Jun 2013 - 8:23 pm | उन्मेष दिक्षीत
"अनाहत" शब्दाचा अर्थ काय ?
25 Jun 2013 - 8:30 pm | अभ्या..
उन्मेषदादा अनाहत म्हंजे आपण सगळे 'नॉन वेरीफाईड जेन्टस' ;)
27 Jun 2013 - 9:47 am | पैसा
म्हणे अनाहिता नाही ते "अनाहत"!! सौस्क्रुत कोणे शिकवले रे तुला?
22 Jun 2013 - 11:56 am | निवांत पोपट
धागा वाचून mind मध्ये mind बाबत बरेच प्रश्न पैदा झाले.तथापी उत्तर मिळायची शक्यता पडताळून, इतरांच्या mind ला सांगता येत नसल्याने, स्वतःच्याच mindला "Mind your own business" असं सांगून विषय संपवला.. ;)
22 Jun 2013 - 2:00 pm | प्यारे१
आता प्रतिसादांची पण शंभरी भरली....!
22 Jun 2013 - 3:11 pm | संजय क्षीरसागर
तरी पण स्वतःला कटाप करणारे गडी पुन्हा खेळायला लागले, इतर वेळी संकेतस्थळावर कधीही न दिसणारे नेमके उगवले आणि मदतीला धावून आलेले अॅसिडीटीवाले उपयोग होत नाही म्हटल्यावर गप झाले!
24 Jun 2013 - 12:59 pm | मोदक
कोण हो..?? कोण ते आयडी..??
आम्हाला पण कळूदेत की.
बाकी तुमच्या मनोमनीच्या बाता असतील तर तुमच्यातच राहूदेत - 'सर्वांशी शेअर कराच' असा आग्रह नाहीये.
24 Jun 2013 - 9:48 pm | निवांत पोपट
आयडी वेगैरे काही उगवत नाहीत हो ! प्रतिसादांवरून पहा!"जे पेराल तेच उगवते"..:)
22 Jun 2013 - 4:45 pm | मदनबाण
घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते पण त्याला पाणी पाजता येत नाही हेच खरे !
शेवटी संत श्रेष्ठ श्री चोखामेळा यांचा एक अभंग देतो आणि माझे व्यर्थ ठरु पाहणारे टंकन कष्ट आवरते घेतो.
राम हीं अक्षरें सुलभ सोपींरे । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिकां नाहीं अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपेरें । जपावें निर्धारें एका भावें ॥५॥
22 Jun 2013 - 7:24 pm | अर्धवटराव
22 Jun 2013 - 8:04 pm | प्यारे१
चखन्याला शाकाहारी काय आहे? ;)
22 Jun 2013 - 8:49 pm | अर्धवटराव
22 Jun 2013 - 8:56 pm | मदनबाण
सगळं रेडी हाए... येताय का...
ठांकु अर्धवटराव... :) आलोच बैठकीला तर मला उसाचा रस लागेल ! ;)
23 Jun 2013 - 12:11 am | संजय क्षीरसागर
सेम हिअर!
तुम्ही नामसाधना करत राहा आणि राम भेटला की लेख टाका. मला निराकार गवसलायं त्यामुळे कोणत्याही मानसिक धारणेची, आकाराची किंवा साधनेची गरज नाही.
23 Jun 2013 - 11:13 am | कवितानागेश
मला निराकार गवसलायं
म्हणजे नक्की काय?
एखादी गोष्ट निर्गुण-निराकार असेल तर ती गवसेल कशी काय? ती कशी जाणीवेतच येणार नाही.
तरीही समजा की जाणीव फारच प्रगल्भ झालीये आणि काहितरी निराकारच आहे असं वाटतय तर तो भ्रम/ झोप कशावरुन नाही? एक्दा का झोप लागली की सगळं अस्तित्वच निराकार होउन जातं........
असं मला रोजच वाट्तं.. जाग आल्यावर! मग मलापण निराकार गवसलाय की काय?
आणि समजा यापेक्षा वेगळं काहितरी होत असेलही, तरिही त्याचा उपयोग काय?
सर्वसामन्य आयुष्य जगणार्या साध्या सरळ माणसाला त्याच्या आयुष्यात या निराकाराचा काय उपयोग, की त्यानी त्यासाही काहितरी धडपड करावी?
24 Jun 2013 - 12:24 am | संजय क्षीरसागर
पण भाषेत ते व्यक्त कसं करणार?
मी स्वरूपानं निराकार आहे असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल `हा लिहीणारा कोण आहे?'
येते! कारण निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे.
आपण निराकार आहोत हा उलगडा झाल्यावर माझ्या आयुष्यात दोन बदल झाले : एक, मी कधीही आणि कश्यानंही निराश होत नाही. आणि दोन, आपण मरू ही शक्यताच संपली.
एक्दा का झोप लागली की सगळं अस्तित्वच निराकार होउन जातं.
नाही. जाणीव जागृत असते.
तुम्ही देखील स्वरूपानं निराकारच आहात पण स्वतःला व्यक्ती समजून जगतायं आणि ती मनाची किमया आहे!
ही मनाची किमया नक्की काय आहे ते उलगडण्याचा प्रयत्न लेखमाला करणार आहे.
व्यक्ती म्हणून एक बंदिस्त आयुष्य जगणं आणि स्वतःच्या निराकारत्त्वाचा उलगडा होऊन मुक्त आणि स्वच्छंद जगणं असा तो फरक आहे.
तुम्ही इतके बेसिक आणि कमालीचे सार्थ प्रश्न विचारले त्याबद्दल मन:पूर्वक आभार.
24 Jun 2013 - 1:52 pm | कवितानागेश
निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे.>
म्हणजे कोमा का?
आपण निराकार आहोत हा उलगडा झाल्यावर माझ्या आयुष्यात दोन बदल झाले : एक, मी कधीही आणि कश्यानंही निराश होत नाही. आणि दोन, आपण मरू ही शक्यताच संपली.>>
हे तुम्ही सिरियस्ली लिहित आहात का?
तुम्हाला अनेक्वेळा निराश होउन व्यक्त झालेले इथे अनेकांनी पाहिलं आहे. आणि निराशा हीदेखिल एक भाव्नाच आहे, ती तरी कशाला टाळायची? जश्या इतर भावना उचंबळून येतात आणि सरतात तशीच तेदेखिल होते. निराशेला कशाला घाबरायचय?
त्यापेक्षा राग ही भावना जरा जास्त डेन्जरस आहे. तिच्यावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही काही साधना करता का? असल्यास आम्हालापण सांगा.
त्याव्यतिरिक्त तुम्ही अमर असाल तर चांगलंच आहे. त्याची काही मी पडाताळणी घेणार नाही. तुम्ही निश्चिन्त रहा.
तसेही मरण म्हणजे फक्त change of form आहे हे सगळ्यांनाच माहित असते. म्हणजे अत्ता मी एक complex system आहे. ती तयार करण्यासाठी ज्या मातीतून अनेक पदार्थ घेतले आहेत त्यात मातीत ही सिस्टीम बंद पडल्यावर मिसलणार आहे, म्हणजे फक्त विघटन होणार आहे. हे तसेही सगळ्यांना माहित आहेच. मग जाणीव स्थिर करुन त्यात काही फरक पडेल की काय अशी शंका मनात येतेय.
24 Jun 2013 - 2:15 pm | मोदक
त्यात मातीत ही सिस्टीम बंद पडल्यावर मिसलणार आहे,
मिसलणार म्हणजे काय गं..?
24 Jun 2013 - 2:51 pm | कवितानागेश
अरे, ये मिसल नही जानता!!!! :)
24 Jun 2013 - 3:23 pm | संजय क्षीरसागर
नाही. जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे सिद्धत्त्व!
उलट आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं सतत (शाब्दिक) हल्ले होऊन देखील आजही मी जसाच्यातसा आहे!
तुम्हीही अमर आहात! माझ्या अमरत्त्वाचा प्रत्यय तुम्हाला, `तुम्ही निराकार आहात' हे माझं म्हणणं समजल्या क्षणी येईल.
हा एक पूर्वापार आणि मजेशिर गैरसमज आहे. राग हा अभिव्यक्तीचा आवेग आहे. त्यात विषेश काही नाही.
अर्थात, माझ्या परखडपणाला राग समजणं हा दुसरा गैरसमज आहे. आणि तो प्रत्त्युत्तर न देता आल्यामुळे घेतलेला स्टँड असू शकतो.
निराशा मात्र चिंताजनक आहे आणि त्यावर उपायाची गरज आहे.
इथून पुढे मात्र तुमचा सर्व प्रतिसाद चुकला आहे. निराकार अपरिवर्तनीय आहे. आणि आपण निराकार असल्यानं अमर आहोत.
तो उलगडा अर्थात, मनाच्या बाहेर पडल्याशिवाय अशक्य आहे.
24 Jun 2013 - 10:32 pm | कवितानागेश
सिद्धत्व म्हणजे नक्की काय?
शिवाय जाणीव स्थिर झाली हे कसे काय जाणवतं?
इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं सतत (शाब्दिक) हल्ले होऊन देखील आजही मी जसाच्यातसा आहे!>
आता मात्र कमाल झाली! हल्ले??
तुम्हीही अमर आहात! >
नक्को रे बाबा. मला स्वतःला गायब होउन इतराना जागा करुन देण्यात बिल्कुल दु:ख वाटत नाही. तरीही तसे असेलच तर माझा किन्वा इतर कुणाचा त्याला इलाज नाही. अश्या परिस्थितीत त्यात आनन्द मानून घेण्यासारखे देखिल काही नाही.
मला जरी असं जाणवले की मी अमर आहे तरी मी काही आनन्दानी वेडी होउन नाचणार नाही.... इट्स ओके. अमर तर अमर! सगळेच अमर.
इथून पुढे मात्र तुमचा सर्व प्रतिसाद चुकला आहे.
ठीकेय. माझे विज्ञानाचे शिक्षण कमी पडतय बहुतेक !!!
पण तसेही मी निराकाराबद्दल बोलत नाहीये. मी 'मी' म्हणून असलेल्या फॉर्मबद्दल बोलतेय. निराकार राहिल त्तसा राहु दे की. त्यानी अत्ताच्या माझ्या फॉर्मला काहीही फरक पडणार नाहीये. आणि फोर्म सम्पल्यावर निराकार हा निराकार म्हणूनच राहणार आहे. त्याचा आत्ता काय सम्बन्ध?
माझा फॉर्म अबाधित असेपर्यन्त माझे आयुष्य सुरळित चालावं यासाही तुमच्याकडे काही उपाय आहेत का?
तुम्ही पुन्हा तेच तेच सान्गताय. मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?
24 Jun 2013 - 10:51 pm | संजय क्षीरसागर
हा लेख त्यासाठीच आहे.
ते तर लेखातच शेवटी सांगितलंय :
24 Jun 2013 - 11:56 pm | कवितानागेश
मला लेखात उपाय वगरै सापडला नाही. म्हणून तर परत परत विचारतेय हो.
मनाच्या एका महत्वाच्या दालनावर जी काही हुकुमत वगरै चालेल ती त्याच्याच बाकीच्या दालनात बसून चालेल. मग 'बाहेर' म्हणजे काय? कशासाठी? आणि जाणीव मनाच्या बाहेर कशी जाणार?
पुन्हा तेच, आणि जाणीव स्थिर झाली हे जाणवणार कसे काय?
शिवाय माझ्या मनात कोलाहल वगरै काही नाहीये. पण मला विचार थांबवणं परवडणार नाही. मी अभ्यास कसा करु माझा? पैसे कसे मिळतील विचार थांबले आणि शांत राहिले तर?
24 Jun 2013 - 11:02 pm | सोत्रि
करेक्ट! असाच प्रश्न मी पहिल्या पानावर विचारला आहे आणि त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. :)
- ('मनातलं जनात,ब्रिजेश उवाच' बोलणारा) सोकाजी
24 Jun 2013 - 11:02 pm | सोत्रि
करेक्ट! असाच प्रश्न मी पहिल्या पानावर विचारला आहे आणि त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. :)
- ('मनातलं जनात,ब्रिजेश उवाच' बोलणारा) सोकाजी
22 Jun 2013 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तर टाका पुढचा भाग. मी तर गोंधळून गेलो आहे की प्रतिसादात नेमकं काय चाललं आहे ते वाचून.
-दिलीप बिरुटे
23 Jun 2013 - 12:03 am | संजय क्षीरसागर
म्हणून `नाम-साधनेवर' लिहीणार नव्हतो पण त्यावर सतत प्रश्न येत राहिल्यानं लिहावं लागलं. अर्थात त्याचा देखील विचार करू शकणार्यांना उपयोग होईलच.
हे वर नमूद केलं आहेच.
पुढच्या भागात स्मृती ऐवजी जाणिवेनं कसं जगावं, अंतःप्रेरणा म्हणजे काय आणि तन्मयता कशानं साधते यावर लिहीणार होतो पण ते पहिली स्टेप ( जो या लेखाचा विषय आहे : `स्मृती सक्रिय होण्यावर हुकुमत') जमल्याशिवाय शक्य होत नाही.
23 Jun 2013 - 11:55 am | Dhananjay Borgaonkar
माझा आधिचा ओशो बद्दलचा प्रतिसाद (खरी माहिती) सं.मं उडवला. असो..
राम नाम जप करा. सर्व भ्रम दुर होतील.
23 Jun 2013 - 10:15 pm | धन्या
या धाग्यावर प्रतिसाद द्यायची ईच्छा नव्हती. अगदीच राहवलं नाही तेव्हा आमचे परम मित्र प्यारेमहाराज वाईकर यांना उद्देशून एक उपहासात्मक प्रतिसाद दिला. "अचपळ मन माझे नावरे आवरीता" दुसरं काय? :)
असो. हा प्रतिसाद वेगळ्या कारणासाठी आहे. "मन" या विषयावर एक अतिशय सुंदर पुस्तक नुकतंच वाचून संपवलं. आपल्या सुदैवाने मराठीत मानसशास्त्र या विषयावर खुप उच्च दर्जाचं लेखन होतं. डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. रमा मराठे, डॉ. वैजयंती खानोलकर या मानसोपचार तज्ञांनी विपुल लेखन केलं आहे.
पण एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक हाती पडलं, आणि एक अनमोल ठेवा हाती लागला.
पुस्तकाचं नाव आहे "मनाचे व्यवस्थापन", लेखक संजय पंडित, ध्रुव मीडीया पब्लिकेशन. जवळपास चारशे पानांच्या या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये आहे.
अगदी सहज सोप्या भाषेत, पुर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून या पुस्तकात "मन" उकलण्याचा प्रयत्न केला आहे. भगवद्गीतेची एक वेगळी ओळखही या पुस्तकात करुन दिली आहे. असो. पुस्तकाचं परीक्षण लिहिण्याईतका मी मोठा नाही. एव्हढंच लिहीन की आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्य सुसह्य करायला आणि आयुष्याचा खरा अर्थ कळायला हे पुस्तक नक्कीच मदत करेल.
प्रत्येक घरात असावं, प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.
24 Jun 2013 - 12:43 am | संजय क्षीरसागर
बरोबर आहे. त्या पुस्तकाच्या परिक्षणाचा वेगळा धागा काढायला हवा होता. अजून ही काढा, मी नक्की प्रतिसाद देईन.
24 Jun 2013 - 8:31 am | धन्या
तुम्ही माझा प्रतिसाद व्यवस्थित वाचलेला नाही. मी म्हटलंय,
परीक्षण तर लिहायचे नव्हते परंतू पुस्तकाचा विषय या धाग्याशी संबंधीत आहे. म्हणून इथेच प्रतिसाद लिहिला.
27 Jun 2013 - 8:14 pm | अग्निकोल्हा
इथे जनसामान्यांचं भलं व्हावं म्हणून मनासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर संजय क्षीरसागर यांच्यासारखी नम्र आणि ऋजू स्वभावाची या क्षेत्रातील अतिशय अधिकारी व्यक्ती कळकळीने लिहित असताना तुम्ही उगाचच आपले पुस्तकी ज्ञान पाजळताय आणि वरुन प्रतिसादातिल त्यांच्या चुकाही काढताय. ;)
24 Jun 2013 - 1:29 pm | आतिवास
अनेक गोष्टी - लेखातल्या आणि प्रतिसादातल्याही - कळण्याइतकं डोकं आपल्याला (प्रथमपुरुषी, आदरार्थी!) नाही याबद्दल समाधान वाटतं आहे आत्ता तरी.
पण चिकित्सेच्या मार्गावर 'प्रबोधन ( अर्थात दुस-यांचे,स्वतःचे नाही) करण्याची ऊर्मी' हा एक भुलभुलय्या असू शकतो, सावध राहिलं पाहिजे आपण (पुन्हा प्रथमपुरुषी, आदरार्थी!) याची जाणीव मात्र झाली. ती किती काळ टिकेल ते बघायचे :-)
24 Jun 2013 - 3:42 pm | बॅटमॅन
बाकी काही म्हणा, "रुणुझुणू रुणुझुणू भ्रमराऽऽ" हे "झुबी डुबी" च्या चालीवर बरे बसेल असे वाटतेय.
24 Jun 2013 - 4:15 pm | अभ्या..
24 Jun 2013 - 4:15 pm | अभ्या..
नाकमुका नाकमुका ऑर चिंताता चिता चिता चिंताता ता कसे वाटतेय? ;)
24 Jun 2013 - 4:21 pm | बॅटमॅन
नाकमुका पेक्षा चिंताता चिता चिता चिंताता ता हे पर्फेक्ट फिट्ट आहे बघ ;)
24 Jun 2013 - 9:20 pm | मोदक
या धाग्यावरचे सगळे इश्यूज सॉर्ट आऊट झाले का..? झाले असल्यास `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (दोन) च्या प्रतिक्षेत.
(आशावादी) मोदक.
24 Jun 2013 - 10:38 pm | कवितानागेश
अती घाई, संकटात नेई!
24 Jun 2013 - 11:28 pm | मोदक
संक्षी...
तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे ते एका सुटसुटीत वाक्यात सांगता का प्लीज..?
25 Jun 2013 - 2:18 pm | पिलीयन रायडर
बडे नासमझ हो.. ये क्या चाहते हो...
25 Jun 2013 - 6:36 pm | प्यारे१
मोदका ,
एका वाक्यात मी सांगू मी सांगू??????????
(संजय सर माझी टैम्प्लिस हा.... आमी कटापच हावो पण आप्लं १२ वा खेळाडू पाणी द्यायला येतो तसं. आय होप तुम्हाला काही त्रास नाही होणार! )
एका वाक्यात 'फक्त मलाच सगळ्या विषयातलं सग्गळंच्या सगळं कळतं'
25 Jun 2013 - 7:00 pm | होकाका
व्वा व्वा!
25 Jun 2013 - 7:07 pm | होकाका
अजून एक संक्षिप्त अर्थः
आमचे येथे सर्व प्रकारच्या चर्चा 'निराकार'पणे लांबवून सर्वांची घड्याळे फेकून दिली जातात.
25 Jun 2013 - 11:36 pm | मोदक
26 Jun 2013 - 7:06 am | चौकटराजा
संक्षी म्हणजे भिडस्त पणा न ठेवता भिडणार्या खेळाडूचा खेळ !! सामना रंगलेला दिसतोय !
आमची साठा उत्तराची कहाणी हे सांगते की आपला उद्धार आपणच करावा . त्यासाठी आपल्याच मनाचे निरिक्षण करायला
जमले पाहिजे म्हणजेच अहंकारावर मात करता आली पाहिजे. समाजधर्म म्हणून इतराना बदलायचा प्रयत्न थोडाफार करावा पण आपल्या मनाकडे दुर्लक्ष न करता. विवेकानंदाचे एक वाक्य आठवले . There is no help outside !
26 Jun 2013 - 8:34 am | धन्या
तुमचं हे म्हणणं सर्वसामान्यांना लागू होतं, ज्यांना निराकार गवसलाय त्यांना नाही. ;)
26 Jun 2013 - 12:02 pm | मोदक
सर्वसामान्य म्हणजे साधक आणि आणखीन एक कोणतातरी प्रकार वगळून शिल्लक राहिलेले अध्यात्मविहीन लोक.
संक्षींच्या मते तर असे अध्यात्मविहीन लोक फक्त गॉसीपमध्ये रस घेतात.
27 Jun 2013 - 12:02 am | अवतार
मार्गही अनंत असू शकतात. कुठला तरी एकच मार्ग बरोबर आणि बाकीचे मार्ग तितकेसे उपयुक्त नाहीत हे म्हणजे आमचाच देव खरा आणि तुमचा देव खोटा ह्यातला प्रकार झाला. आपल्याला अंतिम सत्याची जाणीव झाली आहे असा ज्यांचा दावा असेल त्यांनी इतरांच्या चुका पोटात घालून सातत्याने सत्य मांडत राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.
साक्षात श्रीकृष्ण स्वत: अर्जुनाचा सारथी होता तरी अर्जुनाने विचारल्याशिवाय त्याने मार्गदर्शन केले नाही आणि अर्जुनाच्या इच्छेविरुद्ध सारथ्यही केले नाही. अमुक मार्ग चूक आणि तमुक मार्ग बरोबर या द्वैतातून जे बाहेर पडू शकत नाहीत त्यांना अद्वैत कसे कळावे?
27 Jun 2013 - 8:06 am | संजय क्षीरसागर
येस, पण तुम्हाला एकच मार्ग अनुसरावा लागतो.
मी फक्त दोन प्रचलित साधना पद्धतींचे दोष सविस्तर दाखवून दिले आहेत आणि नवी प्रणाली मांडली आहे. इथे कुणीही त्याचा प्रतिवाद करू शकलेला नाही. तुम्ही काय करावं हा आता सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.
मग चर्चाच होणार नाही.
एकदा तुम्ही म्हणतायं `सत्य मांडत राहा' आणि आता म्हणताय `विचारल्याशिवाय बोलू नका'. शिवाय मी कुणाच्या रथाचं सारथ्य करत नाही कारण ज्यानं त्यानं आपला रथ चालवायचा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
`मार्ग अनंत असू शकतात' हे तुमचं विधान आहे (आणि ते अर्थात योग्य आहे) याचा अर्थच मार्गात द्वैत आहे.
अद्वैताप्रत पोहोचायला निश्चयात्मकपणे एकाच मार्गावर चालावं लागतं आणि अद्वैत जाणलेल्यालाच सर्व मार्गांचं आकलन असू शकतं त्यामुळे तो सर्वात सोपा मार्ग सांगू शकतो.
27 Jun 2013 - 11:14 am | अवतार
हा एकच मार्ग कोणता असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर मार्गांना व्यर्थ ठरवून आपलाच मार्ग बरोबर आहे असे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर ते मानसिक असुरक्षिततेचे लक्षण आहे. अध्यात्म हे निव्वळ शब्दांतून मांडण्यापेक्षा आचरणातून दिसले पाहिजे. संतांनी केवळ अभंग लिहून ठेवले म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. तर त्यांनी त्या अभंगांतील तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवले म्हणून आज त्यांना समाजात आदराचे स्थान आहे. तथागत बुद्धांना स्वत:चे बुद्धत्व शाब्दिक पांडित्यातून सिद्ध करण्याची वेळच आली नाही. त्यांच्या अस्तित्वातूनच त्यांच्या बुद्धत्वाची ओळख पटत होती.
वरील प्रतिसादात प्रतिवाद हा शब्द वापरला आहे. चर्चेचा उद्देश विचारमंथन करून एका निष्कर्षाप्रत येणे हा असतो. प्रतिवादाचा उद्देश स्वत:ची बाजू बरोबर आहे हे पटवून देण्याचा असतो. तुमचा मार्ग चुकीचा आहे असे सिद्ध करण्यात कोणालाच रस नाही. पण इतर मार्ग दोषपूर्ण आहेत हे तुमचे मत इतरांना मान्य नाही.
अध्यात्माचा मुख्य उद्देश इतरांचे दोष दाखवणे हा नसून स्वत:मधील दोष दूर करणे हा आहे. प्रत्येक नदी आपापल्या मार्गाने सागराला जाऊन मिळतच असते. एका नदीचे पात्र विशाल आहे म्हणून इतर नद्यांनी आपले मार्ग सोडून तिला जाऊन मिळावे अशी अपेक्षा निसर्ग देखील करत नाही.
इतरांच्या चुका पोटात घालून सत्य मांडत राहणे असे पूर्ण वाक्य आहे. आपल्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे अशी धारणा असेल तर इतरांचे दोष दाखवण्यापेक्षा त्यांच्यात स्वत:मधील दोष दूर करण्याइतके परिवर्तन घडवून आणणे हे ध्येय असले पाहिजे.
जशी दृष्टी तशी सृष्टी. आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती ज्या जगात आहेत त्याच जगात संत महात्मे देखील आहेत. पण त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी सामान्य जनांहून वेगळी असल्यानेच ते त्या पदाला पोचले आहेत. द्वैत हे मार्गांत नसून दृष्टीमध्ये असते. ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे त्यांना मार्ग अनंत असले तरी त्यांत भेद दिसत नाही.
27 Jun 2013 - 1:54 pm | यशोधरा
उत्तम पोस्ट.
27 Jun 2013 - 1:54 pm | यशोधरा
उत्तम पोस्ट.
27 Jun 2013 - 2:04 pm | बॅटमॅन
फक्त या गीतेचा योग्य तिथे कितपत परिणाम होईल याबद्दल साशंक.