परीक्षण कसे असावे ? जे वाचल्यावर ते नाटक , तो सिनेमा ,ते पुस्तक पहावेसे वाटले पाहिजे ना ?
पण तसे लिखाण उतरत नसेल आणि सर्वांनी ते नाटक पाहावे असे वाटत असेल तर काय करावे ?
आज सकाळपासून लिहिण्याचा प्रयन्न करत आहे पण जे वाटले ते उतरतच नाही
आता आनंद इंगळे हा अभिनेता आपल्याला हसवतो पण त्याला काल हसताना ,टाळ्या वाजवताना ,दाद देताना पाहिले
महाभारतातील प्रसिद्ध कृष्ण भारद्वाज चक्क कृष्ण STYLE चे हास्य सोडून रसिक प्रेक्षक नात्याने हसताना पाहिला
असे तयार कलाकार ज्या नाटकावर फिदा झालेले पाहिले त्या नाटकाचे परीक्षण तसेच सुंदर व्हावे
तसे करता येत नसेल तर सरळ सांगावे हाच एक पर्याय दिसतोय
पण माझ्या सांगण्याने लोक जातील नाटक पाहण्यास ?
चांगले परीक्षण आले म्हणून तरी मी कोठे जातो ?
माझा आनंद SHARE करावयाचा आहे म्हणून सांगतो
काल २ ८ मे रोजी पुण्यात ज्योस्त्ना भोळे सभागृहात [हिराबागेशेजारी ] मी नाटक पाहिले
सदर नाटक पाहताना मला फार आनंद झाला
माझ्या बरोबर आलेल्या मित्र परिवारास आनंद झाला
हे नाटक तिथेच ९ जून रोजी आहे
मी आहे
तुम्हाला निमंत्रण देतो
प्रतिक्रिया
29 May 2013 - 9:20 pm | jaypal
फुकट हाई का इकत? न्हाई म्हंजी कस, आमचा एकदम सरळसोट बघा सुभाव ओ सुभाव.
जे असल ते एकदम सपष्ट इचारल्याल बर उगाच नाटाक काश्या पाई करायच?
29 May 2013 - 9:22 pm | इनिगोय
तुमचा प्रामाणिकपणा आणि प्रयत्न आवडला.
नाटकाचं नाव काय आहे?
29 May 2013 - 10:23 pm | खेडूत
थोडं उत्खनन केल्यावर सापडलं.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर चं Du and मी नावाचं नाटक आहे. (म्हणून 'तू आणि मी'.)
एक लेखकु जर्मन पण असल्याने तसे नाव असावे.
चकटफू नाही, देणगी प्रवेशिका आहेत, पंधरा वर्षाखालील मुलामुलीनां प्रवेश नाही.
बाकी आनंद इंगळे आणि इतर टाळ्या वाजवून का हसत होते ते नाटक पाहिल्याशिवाय कळणे नाही.
(कदाचित श्रीरंग गोडबोलेंचे नाटक आहे म्हणून पण असेल!)
30 May 2013 - 1:21 am | मोदक
धन्यवाद.
हजर राहण्याचा प्रयत्न केला जाईल.. हरकत नसेल तर तुमचा संपर्क क्रमांक व्यनी करता का..?