अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?

चिखल्या's picture
चिखल्या in जनातलं, मनातलं
17 May 2013 - 10:50 pm

मागच्या काही दिवसात भरपुर भुतं स्वप्नात आली आणि आमच्यावर संशोधन करा, लेख पाडा असं म्हणु लागली, अर्थात तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही याचा मला विश्वास आहेच. पण जौद्या आता भुतच
मानगुटीवर बसल्यावर लेख तर लिहावाच लागणार आणि पाडायचं मी तुमच्यावर सोडुन देतो. कसं?

नक्की कुठली व्यक्ती कोणते भुत होणार हे कसं ठरवलं जातं? पिशाच्च, देवचार, भुत, हडळ, डाकीण हे वर्गीकरण नक्की कोणत्या आधारावर होते? नक्की कोणत्या बायका हडळ होतात? म्ह्ण्जे हडळ व्हायचं काय क्वालिफिकेशन असावं? कुरुप चेहरा, लांब केस, पिंजारलेले केस, लांब नखं(बाकी या ह्डळ जाम आळशी असाव्यात नखं केस कापत नाहीत म्ह्ण्जे टू मच) बरेच वर्ष डाक बंगल्यातल्या भुतीणीला डाकीण म्हणतात असं वाटायच मला. आणि डायन म्ह्ण्जे मेलेली दाक्षिणात्य भुतीण. (कारण त्यांच्यात नावाच्या शेवटी 'न' लिहितात जसं मुरुगन, कुलशेकरन) रच्याकने कुलशेकरन आणि केळशिकरण मध्ये नक्की काय साम्य असावं? आणि शिरकाण हा शब्द शिकरण शब्दावरुन आला असावा का? जसं केळ शहिद होते शिकरणात तसं युद्धात सैन्य शहिद म्हणजेच शिकरण आय मीन शिरकाण?

भुतांचे रोमँटिक आयुष्य कसे असेल? व्हॅलेंटाइन डे ला भुत हडळीला काय गिफ्ट देत असावेत? सेनेची भुते मग अशा वेळेस काय करतात? एक भुत दुसर्या भुतावर्/हडळीवर इ इ प्रेम करतात का? त्यांच्यात लग्न वगैरे होतात की डायरेक्ट लीव इन? दाखवायचे कार्यक्रम पिंपळाच्या झाडावर होतात का? म्हण्जे मुहुर्त पाहुन अमावसेला इच्छुक भुत मस्त आंघोळ, दाढी करुन (की वाढवुन) हडळीला पहायला जातोय आणि तिकडे हडळ झाडाला उलटी लटकलेली आहे असं काही असतं का? मग त्यांचा मेनु काय असतो जेवायचा? जसं माणसात सालस कन्या, तसं भुतांमध्ये सालस, सुसंस्कृत, विनयी हडळ असं काही आहे का? कसं वाटतं ऐकायला निर्व्यसनी, कर्तुत्ववान भुत? मुलीला काय काय येतं यामध्ये? माणसांना घाबरवणे, खिमा करणे, अजुन काय असावं? चांगली हडळ हे हॅपीली मॅरीड सारखंच वाटतं ऐकायला. दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत एकमेकांना. बरं ह्डळपित्याने ह्डळदान करायला यावे कसं वाटतं ऐकुन? एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर भुतांमध्ये प्रचलित आहेत का? एमॅअ करायला या भुतांना एकांत मिळतो का? भुतांमध्ये गटग होते का? आपल्या गझलात जसं मढं, प्रेत, कलेवर, प्रेम इ इ गोष्टी आहेत तसं त्यांच्या गझलांमध्ये जीवन, नरडा, घोट, खुन, इ इ असावेत का? अनुभवी लोकांनी त्यांचे अनुभव सांगावेत कृपया. चालु जीवनातील छंद मेल्यावरही राहतात का?

त्यांना मनुष्यप्राण्याची बाधा होते का? हडळीचे केस इतके लांब असतात तर ती कुठला शँपु वापरते? तिच्या डोक्यात कोंडा होत असेल ना? त्यांच्यात सध्या कुठल्या हेअरस्टायल ची फॅशन असेल? हडळ इतक्या लांब केसाच्या वेण्या घालण्यात त्यांचा बराच वेळ जात असेल. फावल्या वेळात माणसांना घाबरवणे, पिडणे, तोंडी लावण्यापुरते बदले घेणे, बाकिच्या भुतांवर लाइनी मारणे, इतर हडळीना नावे ठेवणे इ इ काम करत असतील ना? आपल्या घराची, शेतीची जशी नोंद होते तशी नोंद भुतं आणि हडळ कुणाकडे करतात का? मग त्यातही भ्रष्टाचार होतो का? मग ते कागद पत्तर कुठे ठेवतात? वारसा हक्काने पिंपळ, झपाटलेले घरं, वाडे पुढच्या पिढीतल्या भुतांकडे जातात का? इस्टेट वरुन भुतं भाडंणं करतात का?

हडळ भुत तत्सम प्राणी पांढर्या रंगांचेच कापडं का घालतात? रंगीत कपड्यांचा माल त्यांच्या मार्केट मध्ये आला नाही का अजुन? चायनीज भुते इकडे लक्ष देतील काय? त्यांचे कपडे इतके स्वच्छ असतात, मला नेहमी प्रश्न पडतो की हे कुठुल्या लाँड्रीत कपडे धुवुन आणत असतील? बराच खर्च येत असेल कपडे स्वच्छ ठेवायचा. इतक्या घाण पडीक जागेत रहायचे आणि इतके स्वच्छ कपडे घालायचे , हे असं काय डेडली कॉम्बिनेशन आहे देवास सॉरी भुतास ठावुक. बाकी दिवसभर सगळ्या हडळी कपडे धुवायच्या मोहिमेवर जात असाव्यात. दिवसा कपडे आणि रात्री माणसं धुवायचे असं काही त्यांचा दिनक्रम असावा, मग फावल्या वेळेत पत्ते कुटत बसत असतील नाही तर हाडं कवट्या कुटत बसत असतील.

भुतांमध्ये अध्यात्म असते का? त्यांच्यामध्ये धर्म आहेत काय? मग त्यांच्यात धर्मावरुन दंगली होतात काय? हडळीवरुन होत असतील तर होउ देत. भुतांना चष्मे असतात का? भुतं फावल्या वेळात पत्ते कुटतात का? जसं शहरात माणसांची गर्दी असते तसं निर्जन ठिकाणी भुतांची गर्दी असते का? भुतांच्या माणसांकडुन काय अपेक्षा असतात? ते मनुष्य गणाला का दर्शन देतात? भुतं साक्षर असतात का? हा लेख भुतं वाचायचे चान्सेस किती? भुतं चहा पितात का?

भुतांना कवट्या का आवडत असाव्या? की कवट्या हे त्यांच्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे का? बहुतेक भुत त्यांचे घर सजवायला कवट्या वापरत असावेत. आता भुतं जाणार स्मशानात फिरायला मग आणत असतील एक दोन कवट्या आणि हाडं तेवढीच त्यांच्या पोरा बाळांना करमणुक. आपण आपले उगाचच घाबरतो. स्मशानात अजुन दुसरं तरी काय मिळणार म्हणा. हॉरर ची काय कॉन्सेप्ट असावी भुतांमध्ये? हॉरर मुव्ही म्हणुन भुतं काय पाहत असतील?

चकवा प्रकाराची उत्पत्ती कशी होत असावी? बहुतेक हे चकवा लोक मुम्बईतले पुर्वाश्रमीची माणसं असावीत जे नुक्कड्वर बसुन पत्ते(चुकीचे) सांगत असावीत, जसं आगेके चौकसे डावे बाजु वळनेका. आणि हीच सवय चकवा(भुत) बनल्यावर सुद्धा कायम असावी, त्यामुळे लोकांना चकवणे आणि मजा बघणे हा यांचा टायमपास असावा, ही भुते फक्त रस्ता चुकवतात इतर त्रास ऐकिवात नाही. शाळेत असताना या चकव्यांनी मला फार छळलय, मी शाळेत जायला घरातुन निघायचो आणि थोड्याच वेळात स्वत:ला थियेटर मध्ये असलेला पहायचो. पण घरी आणि शाळेत मास्तर भुताने मला थियेटरला आणले यावर विश्वास ठेवायचे नाही म्हणुन फार मार खावा लागायचा. पण त्या चकव्याने माझा पिच्छा सोडला नाही आणि भरपुर पिक्चर पहायला लावले. पण लोक भुतावर विश्वास ठेवत नाहीत आणि चिखल्यावर तर नाहीच नाही. स्मित

कुठल्यातरी किल्ल्यात अंगाईगीत गाणारे भुत आहे म्हणतात, काय तर रात्री ते भुत अंगाई गाते रोज. ती पण एकच, यावरुन खालील निष्कर्ष काढता येतो:
१. त्या हडळेला एकच गाणे येते
२. भुतांमध्ये एकच अंगाईगीत आहे
३. त्या हडळेची कॅसेट अडकली आहे.
४. हडळ कुठल्यातरी स्पर्धेसाठी अंगाईगीताची प्रॅक्टीस करत आहे.
किती ती निरुपद्रवी हडळ, लोक उगीच बदनाम करतात हडळींना. बिचारी गाणे गाते, लोकांना अंगाईगीत गावुन झोपवते आणि तुम्ही लोक उगाच तिचा तर्रास करुन घेता. आता ती बिचारी इतकी गाढ झोपी घालते की लोक डायरेक्ट दुसर्याच जगात जागे होतात यात बिचारीची काय चुक.

असो, जगलो वाचलो तर पुढचा भाग लिहिल, पिंपळावर बसुन कंटाळा आलाय मला. आज बर्याच लोकांना मला थियेटर्मध्ये पोचवायचं आहे. चला येतो मी!

विनोदलेख

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

रच्याकने भुतांनाही कंटाळा येतो तर ! असो. कोणता पिक्चर लागलाय आज?

पुभाप्र.

प्यारे१'s picture

17 May 2013 - 11:08 pm | प्यारे१

आदमी और इन्सान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2013 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

असं होय. मला वाटलं मुंजा लोकांची रामसे बंधूंच्या पिक्चरना लोक "पोचवायची" एजन्सी असेल.

चिखल्या's picture

19 May 2013 - 1:30 am | चिखल्या

कैच्याकै

काय भूतोपिडीया लिहिताय काय?
एक गोष्ट निश्चित… या भुतांना माणसांच्या इन्टरनेटचा पत्ता लागलाय!

विचार चांगलाय, घेतो लिहायला

भुतं कधीचीच आलीत आयटित सुद्धा, हेम्याला भेटला नाहीत वाट्टं अजुन.

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 11:41 pm | बॅटमॅन

=)) =)) =)) =))

जबरी!!!! भूतसूक्त लिहिण्यास प्रेरणा देणारे एकदम ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2013 - 1:16 am | निनाद मुक्काम प...

Throat Slash
आमच्या नादी लागू नका
आमच्या भूत संप्रदायाच्या अस्मितेची गळवे फोडू नका
अजून चांद रात आहे.
कबर खोडणे चालू आहे.
त्यासाठी एका शवा ची गरज आहे.
क्या समझे
Grave Digger

परदेशी भूतांची खालील प्रकारात गणती होते.
रक्तपिपासु वैंपायर Girl Vampire
ते येथे राहतात
Vampire in Coffin
वेअर वुल्फ
जो मनुष्य देह धारण करतो व विशिष्ट प्रसंगी आपले खरे रूप प्रकट करतो.
Werewolf
झोंबी
Bloody Zombie
ज्यावर नुकताच बॉलीवूड मध्ये एक शिणेमा आला आहे.

सध्या इतकेच
अशुभ रात्री
Gollum Screaming.

कोमल's picture

18 May 2013 - 11:00 am | कोमल

काय कल्पना आहे बॉ.. एकदम झक्कास..

व्हॅलेंटाइन डे ला भुत हडळीला काय गिफ्ट देत असावेत? सेनेची भुते मग अशा वेळेस काय करतात?

:)) :)) :))

मग फावल्या वेळेत पत्ते कुटत बसत असतील नाही तर हाडं कवट्या कुटत बसत असतील

आता भुतं जाणार स्मशानात फिरायला मग आणत असतील एक दोन कवट्या आणि हाडं तेवढीच त्यांच्या पोरा बाळांना करमणुक

खल्लास..

पिंपळावर बसुन कंटाळा आलाय मला. आज बर्याच लोकांना मला थियेटर्मध्ये पोचवायचं आहे

ठ्ठो...

आणि काही:
१) भूतं विड्या-सिगरेट्स ओढत असतील का?
२) हडळ आणि भूत फोन वर कसे बोलत असतील?
३) भूतांची फेवरिट मालिका कोणती?
४) जसं चिखल्याला ओढीत थेटरात घेउन जाणारे भूत होते, तसे नक्की कोणते भूत आम्हाला मिपा वर ओढून आणते?

चिखल्या's picture

20 May 2013 - 7:32 pm | चिखल्या

१) भूतं विड्या-सिगरेट्स ओढत असतील का?
>>> कशाला आठवण करुन देताय, विड्या-सिगरेट्स मुळे तर भुत झालोय मी
२) हडळ आणि भूत फोन वर कसे बोलत असतील?
तोंडाने
३) भूतांची फेवरिट मालिका कोणती?
-संसद लाइव टेलेकास्ट
४) जसं चिखल्याला ओढीत थेटरात घेउन जाणारे भूत होते, तसे नक्की कोणते भूत आम्हाला मिपा वर ओढून आणते?
-मिपाचे मालक कोण आहेत मग?

स्पंदना's picture

18 May 2013 - 12:14 pm | स्पंदना

खल्लास कल्पना!
अगदी काही काही पंचेस तर मस्त जमलेत.
तसाही विषय विचारात पाडणारा आहे.
मेरेकु तो आवड्या.

jaypal's picture

19 May 2013 - 2:05 pm | jaypal

>>>मेरेकु तो आवड्या. ऐवजी मेरेकु तो स्पावड्या वाचल
असो मेरेको बी लै आवड्या

स्पंदना's picture

21 May 2013 - 5:11 am | स्पंदना

मेरेकु तो स्पावड्या

भूत म्हंटल की स्पावड्या नावाचा भावड्या (आता अक्षर चुकवु नका हं) आठवलाच पाहिजे.
आता कुठ कोकणातन भूत इंपोर्ट करायला गेलाय म्हण, आल्यावर बघु!

इनिगोय's picture

18 May 2013 - 12:21 pm | इनिगोय

राम राम राम राम!

चिखल्या's picture

19 May 2013 - 1:32 am | चिखल्या

मरा मरा मरा मरा

पैसा's picture

18 May 2013 - 12:26 pm | पैसा

लेख आवडला! अत्रुप्त आत्मा आणि अग्यावेताळ कधी येतात याची वाट बघत आहे.

प्रचेतस's picture

18 May 2013 - 12:31 pm | प्रचेतस

मलाही तेच आश्चर्य वाटले की अजून अत्रुप्त कसे काय आले नाहीत. बाकी अग्यावेताळ दिसले नैत बहुत काळापासून.

गणामास्तर's picture

18 May 2013 - 12:35 pm | गणामास्तर

मला तर दिसले रे अग्यावेताळ. ;)

पैसा's picture

18 May 2013 - 12:54 pm | पैसा

वेताळ आणि पिवळा डांबीस हे पण राहिले.

थिएटरचा किस्सा मस्तच्.आवडलं, धन्यवाद.

दिपक.कुवेत's picture

19 May 2013 - 11:55 am | दिपक.कुवेत

माझे प्रश्नः भुतांमधे भविष्य कसे आणि कोण पहात असेल? किती माणसांची मानगुट त्याच्या कोट्यात आहे हे त्याच्या भविष्यावरुन कळत असेल का?

चिखल्या's picture

20 May 2013 - 9:23 am | चिखल्या

माणसांचं एकमेव भविष्य मृयुत्यु आणि भुतांचे एकमेव भविष्य जन्म :)

श्रावण मोडक's picture

19 May 2013 - 3:34 pm | श्रावण मोडक

मिपावरचे प्रतिसाद, प्रतिप्रतिसाद, प्रतिप्रतिप्रतिसाद... बारकाईने वाचत जा. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. नीलकांतकडे थोडा वशिला लावून चावडीवर प्रवेश मिळवा, आणखी काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी, आणखीही काही प्रश्न निर्माण होतील... ;-)

नीलकांत's picture

20 May 2013 - 6:32 pm | नीलकांत

चावडीत यायला तुम्हाला संपादक, सल्लागार किंवा तंत्रज्ञ असावं लागतं एवढंच. अन्य वशिल्याची गरज नाही.

श्रावण मोडक's picture

20 May 2013 - 6:45 pm | श्रावण मोडक

स्मायली पाहिली नाही का?

पैसा's picture

20 May 2013 - 7:09 pm | पैसा

स्मायलीची जागा चुकली वाट्टं!

हाच का तो संसदेतला क्वेश्चन आवर??? ;)

श्रावण मोडक's picture

20 May 2013 - 7:26 pm | श्रावण मोडक

मिपावरचे प्रतिसाद, प्रतिप्रतिसाद, प्रतिप्रतिप्रतिसाद... बारकाईने वाचत जा. ;-) तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. ;-) नीलकांतकडे थोडा वशिला लावून चावडीवर प्रवेश मिळवा, आणखी काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. ;-) प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी, आणखीही काही प्रश्न निर्माण होतील... ;-)
चूक झाली. :-( क्षमस्व. :-)

रमताराम's picture

19 May 2013 - 7:44 pm | रमताराम

वा: आमच्या प्रश्नोपनिषदाचा पुढला भाग लिवलाय जणू.
(झैरात झैरात ओरडत येणार्‍यांच्या पारलौकिक अकाउंट मधे घपला करण्यात येईल.)

श्रिया's picture

20 May 2013 - 10:31 am | श्रिया

मस्त लिहिलय. भुतांनी पछाडलेल्या काही वेबसाईट्सहि असतात म्हणे! भूतजगतात कोणते इंटरनेट कनेक्शन वापरतात कोण जाणे?

चिखल्या's picture

20 May 2013 - 7:27 pm | चिखल्या

सध्या आम्ही स्पायडर-नेट वापरतोय :)

अमित राव's picture

20 May 2013 - 11:46 am | अमित राव

मस्तच !