मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो .
मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण . या वर्गाचे मान ,अपमान , सुख ,दुख यांचे जे मानदंड आहेत ,अशा कल्पना आचरण्यात यांना परम आनंद नव्हे तर जीवनाची पूर्तता वाटते , गीता आचरण्यात आणणे वाटते
परधर्म म्हणजे इतर विचार ,संस्कार यांना खुणाऊ शकत नाहीत . त्यामुळे अत्यंत बेफिकीरीने त्यावर भयावय विचार हे प्रगट करू शकतात . मध्यम वर्गीय संस्कारानेच सर्व प्रश्न सुटतील ,त्यातच सर्वांचे हित आहे असे वाटण्याने हे मध्यमवर्ग सोडतच नाहीत पण या न सोडण्यातही एक प्रकारची GRACE आहे
या वर्गात जन्म घेणे स्वतःच्या गुणांना वाव देण्यास फार मोठा अडथळा ठरतो
घरातील थोरांचे ऐकणे ,स्वतःला त्रास घेऊनही दुसर्याची सोय पाहणे हे गूण अवगुण बनून तुमचा विकास थांबवतात
अश्या लोकाच्याकडून नेहमीच मदतीची अपेक्षा केली जाते
या लोकांना मदत लागते याची जाणीव मात्र क्वचितच कोणाला तरी कधीतरी होते
अस्मिता सुनेच्या रूपाने त्यांची ज्या प्रकारे काळजी घेत आहे ते पाहून मात्र त्यांच्या गाठीशी अजून पुण्याच्या राशी असल्याचे जाणवते
श्री बापूकाका तुमच्याबरोबर ४ ० वर्षे काढली . तुमचे गाणे गुणगुणणे माझ्यासाठी फार मोठा आनंद आहे
तुम्ही गाणे शिकला नाही ,वकील झाला नाहीत याचे वाईट वाटते
तुमचे हस्ताक्षर ,व्यवस्थितपणा हेवा वाटण्याजोगा आहे
माझ्या संसारात नाक खुपसण्याची संधी तुम्ही जाणीवपूर्वक टाळळीत . तुमच्या साध्या ,सरळ विवेकी वागण्याने माझे खास जावयाचे गुण प्रदर्शित होण्याची संधी मला मिळाली नाही
मी त्याबद्दल आपला जल्मोजल्मी ऋणी आहे
प्रतिक्रिया
14 May 2013 - 10:09 am | गवि
संदर्भ लागत नाहीये. पूर्ण होण्याआधीच चुकून पब्लिश झाले असल्यास सांगावे. तात्पुरते अप्रकाशित करुन पूर्ण झाल्यावर पुन्हा प्रकाशित करता येईल.
इतकेच प्रकटन असेल तर वरील सूचनेकडे दुर्लक्ष करावे. क्षमस्व.
14 May 2013 - 5:39 pm | संजय क्षीरसागर
बापूकाकांना लिहीलेलं पत्र त्यांनी पोस्टात टाकायच्या ऐवजी इथे टाकलंय
14 May 2013 - 5:47 pm | गवि
तसा खाजगी मजकूर इथे चुकून आला असल्यास अप्रकाशित करता येईल. लेखकाने विनंती केल्यास. लेखकाने इथेच प्रतिसादात तशी विनंती केली तरी चालेल.
14 May 2013 - 5:57 pm | तिमा
देशपाडॅ साबने खत गलत जगह पाडॅ ऐसाच लगता है|
14 May 2013 - 6:08 pm | गवि
तसं नसावं, कारण "संस्कृती" लेखनविषय /टॅग सिलेक्ट करुन आणि टायटल वेगळ्या जागी योग्य बॉक्समधे एंटर करुन मगच पोस्ट पब्लिश झालेली असते. तेव्हा अन्य कोणासाठी टंकित केलेला मजकूर चुकून इथे आला नसावा. कदाचित हेच अर्थपूर्ण मुक्तक असेल आणि संदर्भ माहीत नसल्याने आपल्याला समजले नसेल किंवा याच्या नंतर बरेच लिखाण बाकी असताना प्रकाशित मात्र चुकून झालेलं असू शकेल. लेखकच काय तो उलगडा (ऐच्छिक) करतील. जे काही आहे ते इंटरेस्टिंग आहे.
14 May 2013 - 6:16 pm | संजय क्षीरसागर
त्याला प्रत्येक लेखनात पोटेंशियल दिसतं
14 May 2013 - 6:16 pm | तर्री
हया लेखावर फटाके नाही फुटले हे लेखकाचे भाग्य !
14 May 2013 - 7:16 pm | मराठे
>> हया लेखावर फटाके नाही फुटले
अजून
14 May 2013 - 7:28 pm | संजय क्षीरसागर
श्री बापूकाका हे श्वशुर आहेत त्यांनी जावयाच्या `संसारात नाक खुपसण्याची संधी जाणीवपूर्वक टाळली आहे' आणि अस्मिता नांवाची सुन त्यांची परस्पर काळजी घेत आहे. जावयाला आणखी काय पायजेल? म्हणून तो म्हणतोय `मी आपला जल्मोजल्मी ऋणी आहे'
14 May 2013 - 10:25 pm | खेडूत
चूक. श्वशुर आहेत, पण लेखकाचे नव्हे.
>>> अस्मिता सुनेच्या रूपाने त्यांची ज्या प्रकारे काळजी घेत आहे...
ती सूनच आहे आणि बापूकाका हे काका च आहेत असे म्हणायला वाव आहे.
याशिवाय लेखकाचा पुनर्जन्मावर विश्वास असल्यानचे प्रथम दर्शनी दिसते. सबब या धाग्यात रोषणाई होण्यास वाव आहे!
14 May 2013 - 7:35 pm | अभ्या..
अहो घरजावई असू शकतात. ४० वर्शे काढल्याचा उल्लेख आहे की.
म्हणून तो म्हणतोय `मी आपला जल्मोजल्मी ऋणी आहे'
14 May 2013 - 10:30 pm | आतिवास
शीर्षक वाचून अपेक्षेने धागा उघडला पण काहीही समजले नाही.
14 May 2013 - 10:41 pm | अभ्या..
अहो त्यांची शतजल्मकथा आहे ती. प्रत्येक जल्मात ऋणी. ;)
14 May 2013 - 10:37 pm | सौंदाळा
सासरेबुवाना ४० वर्षात एकदाही पिडायला मिळले नाही म्हणुन रुसलेत वाटतय ते.
14 May 2013 - 10:39 pm | प्यारे१
+१.
उगाच टीपी करावा असंही वाटत नाहीये ह्या धाग्यावर.
दोन मित्र/मैत्रिणी बर्याच काळानंतर भेटल्यावर, हितगुज सुरुवात केल्यावर गप्पा रंगात येतायेता एकजण झटकन न सांगताच निघून जातो/जाते असं वाटतंय काहीसं.
14 May 2013 - 10:44 pm | प्यारे१
ते +१ आतिवास ह्यंच्या प्रतिसादासाठी होतं.
जल्ला सौंदाला मंदी आला. ;)
14 May 2013 - 10:44 pm | सस्नेह
टंकन-विसंगतीत सतिशभौंचा पयला नंबर आहे,
अत्यंत असंबद्ध लेखनासाठी देशपांडे साहेबांना पयला द्यायला हरकत नाही .
15 May 2013 - 12:12 am | काळा पहाड
अवघड आहे.
१. लेखकाचे लग्न होउन ४० वर्षे झाली (की जन्म होउन).
२. "जावयाचे गुण प्रदर्शित होण्याची संधी मला मिळाली नाही" म्हणजे जावई गुणी होता. दुर्दैवाने ती संधी मिळाली नाही. नाही तर तो तयारच होता.
३. श्री बापूकाका म्हणजे त्यांचे श्वशूर (की बापूस?)
४. सून ज्यांची काळजी घेत आहे ते लेखकाचे वडील असावेत. (की तेच बापूकाका?)
५. लेखकाला रहस्य कथेचे या वषीचा सर्वोत्तम पुरस्कार द्यायला हरकत नाही.
15 May 2013 - 12:45 am | मराठे
काहीही म्हणा पण 'जल्मोजल्मी ऋणी असणे' हा मिपादालनात शोभून दिसणारा शब्दप्रयोग मात्र देऊन गेले देशपाडॅकाका.
15 May 2013 - 12:53 am | श्रीरंग_जोशी
या शोधासाठी आम्ही आपले धागोधागी ऋणी असू.
मूळ लेखनात काहीतर हटके करण्याचा प्रयत्न दिसतोय, सुरूवात आवडली.
15 May 2013 - 6:31 am | स्पंदना
अशी पार्शॅलिटी का?
या महिन्याचा नव शब्दप्रयोगाचे पहिले बक्षीस अजानुकर्ण यांना जेवढे खातो तेवढेच धुतो या नवशब्द योजनेसाठी जाहिर करण्यात येत आहे. टाळ्या.
15 May 2013 - 10:41 pm | मराठे
अनुमोदन आणि जोरदार टाळ्या! अजानुकर्णसाहेब, आपल्या नवशब्द योजनेबद्धल मी आपला जल्मोजल्मी ऋणी आहे.
15 May 2013 - 6:08 am | स्पंदना
ठसका लागला मला भाऊ!
तरीही "गेले लिहायचे राहुन" धर्तीवरचा लेख दिसतोय. लिहीते रहा! मिपा आपलच आहे.
15 May 2013 - 8:59 am | संजय क्षीरसागर
श्री बापूकाकांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहोळ्यात जावई ओपनिंग बॅटसमन असावेत. आणि श्रोत्यांचे प्रतिसाद आजमावण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या समोर केलाय.
15 May 2013 - 9:47 am | इरसाल
जर्रा म्हणुन चैन घेवु देत नाहीत मिपाकर.
माझ्या चौथ्या रुमालातला तिसर्या खंडातील सातव्या लेखातला उतारा असा अचानक उताणा पडला मिपावर तर त्यात इतका गहजब माजवायचे काय कारण ?
थोडा वेळ द्या आणी त्यांना आपले म्हणा.
ओ देशपांडे साहेब घ्या लिंबुपाणी आणी सोडा ते मौन्व्रत.
15 May 2013 - 2:53 pm | दिपक.कुवेत
जरा वेगळ्या दॄष्टिकोनातुन पहा....धागा खोलवर विचार करायला लावणारा आहे:
१. किती सुना आपल्या सासर्यांची काळजी घेतात?
२. किती लोकांचे सासरे हे वकिल तर आहेतच पण त्याबरोबर उत्तम गाणं शीकलेत?
३. किती लोकांचे सासरे हे जाणीवपूर्वक जावयांच्या संसारात नाक खुपसतात?
बाकि चालु द्या....
15 May 2013 - 3:22 pm | स्मिता.
याला म्हणतात स्त्री-पुरुष समानता! आतापर्यंत सासू मुलगी-जावयाच्या संसारात नाक खुपसते आणि घरातली शांतता बिघडवण्याचं पोटेंशिअल राखून असते असं ऐकलं होतं. आता सासर्यांमधेही हे पोटेंशिअल असतं हे बघून स्त्री-पुरुष समानता आल्याचं कळलं आणि खूप खूप समाधान वाटलं!
15 May 2013 - 11:25 pm | पिवळा डांबिस
जर याच जल्मातल्या श्री. बापूकाकांसाठी लेखक जल्मोजल्मी ॠणी झाले तर मग पुढील प्रत्येक जल्मांत भेटणार्या भावी श्री. बापूकाकांसाठी काय?
:(
-भविष्यजल्मांतील सर्वश्री. बापूकाकांचा वकील
16 May 2013 - 8:13 am | इनिगोय
जल्मोजल्मी बापूकाका पण तेच भेटणार आहेत ना!
16 May 2013 - 9:42 am | पिवळा डांबिस
लेखक जल्मोजल्मी एकच, पण श्री. बापूका़का येगयेगळे!!!
एकाच अशीलाचा वकील व्हायला आमी काय येडे हाय काय?
आमाला क्लास अॅक्शन सूट घालायचीय!!!!
:)
16 May 2013 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे
अहो देशपाडॅ विनायक सायेब,
अजिबात लक्ष देउ नका तुम्ही या सगळ्या तिरक्या प्रतिसादांकडॅ. अहो पिकासोने पण जेव्हा नवचित्रकलेतली चित्रं काढायला सुरुवात केली तेव्हा सुद्धा लोकांना त्यातलं ओ की ठो कळलं नव्हतं (आताही काय फार कळलंय असं नाही, निदान आमाला तर बाबा आजाsssबात नाय :( ). पण त्याची चित्रं मिलियन मिलियनला विकली जाऊ लागली तर आता लोकांना त्या चित्रांत काय काय दिसतं म्हणे ! (आम्हाला तर बाबा अजून आजाsssबात काय पण नाय दिसत ती गोष्ट वेगळी :(. पण तरी मिलियन म्हणजे काय कमी झाले? हल्ली आमी पण लय कळल्याचा आव आणून शेजारच्या माणसाचा खांदा जखमी होईल इतक्या जोरदार मान हलवतो.) असो.
तर मुद्दा असा की तुम्ही गपsssच र्हा आणि मिपा संमंने ह्या अमुल्य अनाकल्नीय (पिकासोच्या चित्रांसारखंच हो) लेखाचा लिलाव लावला आणि घेतला कुणी तो दहा मिलियनला (अंदाजच करायचा तर त्यात कंजूसपणा कशाला हवा?) तर मग हेच हुच्च तिरक्या प्रतिसादवाले तुमच्यावर गोग्गोड प्रतिसादाची लाखोली (अंदाजच करायचा तर त्यात कंजूसपणा कशाला हवा?) वाहतील.
तेव्हा तुम्ही गपsssच बसा... पिकासो तरी कुठे त्याच्या टिकाकारांना उत्तरं देत होता? (आपल्याला नक्की म्हाईत नाय. पण आपल्या पाईंटाच मुद्दा ठासून सांगायला हे असलं कायतरी बरं पडतं.)
मान. देशपाडॅ विनायक च्या कानात (बाकीच्यांनी कानात बोटे घालावी) : ते जर दहा मिलियनचं खरंsssच खरं झालं तर मात्र आमची आठवण ठेवा. येवढ्या अखंड मिपावर फक्त आम्हीच तुमची साईड घेतलेय. हो का नाय?
16 May 2013 - 12:13 am | श्रीरंग_जोशी
प्रतिसादातल्या भावनेशी सहमत.
गविंचे सुरूवातीचे संपादकीय भूमिकेतले प्रतिसाद वाचून आज कौतिकराव ठाले पाटिल यांच्या एकाच मुद्द्यावरील विविध विधानांची आठवण झाली अन...
16 Jul 2013 - 11:10 am | ब़जरबट्टू
लेखक माझे फारच आवडते आहेत.. धागा वर ओढतोय... :)
17 Jul 2013 - 12:06 pm | तिमा
ओढल्याने तरी डॅ चा डे होतोय का बघू या!
18 Jul 2013 - 1:38 am | अग्निकोल्हा
एक प्रकारची GRACE आहे!
18 Jul 2013 - 11:52 am | देशपांडे विनायक
लेखक माझे फारच आवडते आहेत.. धागा वर ओढतोय...
ओढू नका आधार द्या
या लिखाणात खरच...
एक प्रकारची GRACE आहे!
हे वाक्य माझ्या नशिबी ५० वर्षे उशिरा आले [उगीच वाद नको म्हणून तुमच्या प्रतिसादाचा सरळ अर्थ घेतला ]
माझी इच्छा नाव शुद्ध लिहिण्याची आहे
पण घोर अज्ञानामुळे मी ते करू शकत नाही .
मला ते नाव आता तसे लिहिता येत नाही कारण ते कसे लिहिले गेले ते मला कळले नाही
मी मराठी लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ते लिहिले गेले [अनेक प्रकार चे SOFTWARE वापरून पाहत होतो ]
आता मिपा वर येताना मी नाव COPY आणि PEST करून येतो
18 Jul 2013 - 12:42 pm | बाळ सप्रे
नीलकांतला व्यनि करुन त्याला सध्याचे नाव बदलण्याची विनंती करा..
तुमचे नाव टाईप असे करा
deshapaaMDe vinaayak
मग ते "देशपांडे विनायक" असे नीट दिसेल.
हे देखिल ब्राउजरमधील auto complete feature वापरल्यास परत परत टाईप करावे लागणार नाही.
18 Jul 2013 - 3:16 pm | कपिलमुनी
नीलकांतला मोकळा सोडा की थोडे दिवस!
18 Jul 2013 - 3:19 pm | सौंदाळा
ही हा हा :)
मुनींशी सहमत
18 Jul 2013 - 6:42 pm | देशपांडे विनायक
देशपाडॅ विनायक =देशपांडे विनायक
हे कॉम्पुटर समजू शकत नाही पण मिपाचे सभासद समजून चुकले त्यामुळे नीलकांतला मोकळे सोडण्यास पूर्ण सहमती
कवितेचा आकडी प्रकार सादर करून किती मोकळे सोडता येते हे यापूर्वी निर्देशित केलेले आहेच
18 Jul 2013 - 6:48 pm | प्रभाकर पेठकर
असे काय मोठे (दिवसा) काम असते?
18 Jul 2013 - 6:21 pm | देशपांडे विनायक
तुम्ही सांगितल्याप्रमाणे type करून नाव लिहिता आले . thanks
मी gmail मध्ये compose मध्ये जाऊन हे मराठीत लिहितो .
नंतर copy करून paste करतो
देशपांडे विनायक असे नाव लिहून मला मिपा वर प्रवेश मिळत नाही
म्हणून मी देशपाडॅ विनायक असे नाव copy -paste करून प्रवेश मिळवतो .
देशपाडॅ विनायक असे नाव मला type करता येत नाही
''हे देखिल ब्राउजरमधील auto complete feature वापरल्यास परत परत टाईप करावे लागणार नाही.''
माफ करा . हे मला समजू शकत नाहीये [TOO TECHNICAL]
19 Jul 2013 - 11:03 am | बाळ सप्रे
[TOO TECHNICAL] डीटेल्स समजवण्यासाठी व्यनि केलाय..
18 Jul 2013 - 12:47 pm | बाळ सप्रे
BTW
Copy आणि Paste असते..
Pest नव्हे