पौरुषाला आव्हान...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
6 May 2013 - 8:49 pm

राम राम मिपाकरहो,

आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास..

फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य..

परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया..

त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं.. परंतु का माहित नाही, रामदासबुवांना ते मिपावर टाकणं तेवढंसं प्रशस्त वाटेना..

परंतु मला मात्र त्या मुक्तकामधली ताकद, त्यातील अफाट ऊर्जा जाणवली आणि 'तुम्ही नाही तर निदान मला तरी हे मिपावर लिहू द्या आणि मिपाकरांना एका छोटेखानीच परंतु जबरदस्त कलाकृतीचा आस्वाद घेऊ द्या..' असं मी रामदासबुवांना म्हटलं आणि अखेर हो, ना करत त्यांनी परवानगी दिली..

---------------------------------------------------------------------------------------------

सदर मुक्तकातली बच्यकी ही एक वेश्या आहे आणि तिचं हे प्रकटन आहे...

पौरुषाला आव्हान.. (शीर्षकश्रेय - तात्या.)

कथा जशी सरकत जाते त्याप्रमाणे बच्यकीची अनेक नॅरेशन्स आहेत .त्यापैकी एक...

ये ना पुढे. ये..!

माझ्या लाखो पेशी वाट बघतायत..
त्या पुरुषोत्तमाची जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतून..
भिरकावून टाकेल त्याच्या श्वासांच्या वावटळीत
झेलेल अल्लद त्याच्या अनेक हातानी...

आणि मी म्हणेन सोडू नको मला आता...!

मी वाट बघते त्याची, जो करेल मोकळे आतून बंद झालेले झरे
आणि न्हाऊ घालेल मला माझ्या बेबंद निर्वस्त्र अस्तित्वाला..

पुरून उरेल ज्याची वाफ, अशा ढगासारखा येईल... कधीही...!

आणि मलाही लाज वाटणार नाही माझ्या ओलेत्या अंगाची...

ये.., ये ना पुढे. लाखो डोळ्यानी - लाखो इंद्रीयाचा इंद्र होउन ये...!

एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते...

एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही.
एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर....

तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप..
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!

-- रामदास.

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 9:01 pm | ढालगज भवानी

खरं सांगायचं तर एका वेश्येचे म्हणून "अतर्क्य व असंभव" वाटतय. कारण अनेक पुरषांशी केलेल्या अनिच्छापूर्ण संगानंतर , संगाची इच्छा तरी रहात असेल का असा प्रश्न पडतो.
मी एका कथेत वेश्येचे एक वाक्य वाचले होते. पोलीस तिला कोठडीत भिरकावतो अन ती परकर वर करुन म्हणते "ये मा**द तू पण चढ. तूच बाकी राहयलायस." ते वाक्य माझं हृदय जळत्या लोखंडी कांबीसारखं चीरत गेलेलं.
मला ते जास्त वास्तवाच्या जवळ जाणारं वाटलं होतं.
असो.

शैलेन्द्र's picture

6 May 2013 - 9:39 pm | शैलेन्द्र

सहमत.. कविता वाचताना ती मागणी वाटते, मनाच्या तळातून आलेली.. वेश्येसारखे भोग नाही वाटत..

मी एका कथेत वेश्येचे एक वाक्य वाचले होते.

गरजेच नाही ना दर वेळेस वेश्येने फक्त त्याच पध्ध्तीने रिएक्ट व्हावे ,हि कदाचित दुसरी बाजु असेल तिच्या व्यवसाया व्यतिरीक्त तिच्या भावना व्यक्त करायची.पैसे देउन-घेउन देखील तिला हव असलेल समाधान मिळ्त नसेल कदाचीत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 May 2013 - 12:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद आवडला. या कथेतलं वर्णन वास्तवाच्या अधिक जवळ जाईल असं वाटतं. वेश्यासंदर्भातल्या लिखाणांमधे अशा प्रकारच्या उल्लेखांमधून, परिस्थितीमधून शरीरसंबंधांबद्दल त्यांना असणारी अनासक्ती स्पष्ट दिसते.

मुक्तकही आवडलं. स्वतःची लैंगिकता समजून, ती आनंदाने स्वीकारणार्‍या कोणत्याही स्त्रीचं हे मनोगत असू शकेल. विशेषतः नवीनच प्रेमात पडलेल्या आणि शरीरसंबंधांबद्दल अनुभव असणार्‍या, तरूणवय ओलांडलेल्या स्त्रीचं.

वेश्या आणि स्वतःची लैंगिकता सेलिब्रेट करणारी अनुभवसंपन्न स्त्री यांच्यात एक साम्य जरूर असतं; दोघींनाही लैंगिकतेच्या शरीरसंबंध या पैलूबद्दल टॅबू नसतो.

---

मुक्तक न आवडण्याचे प्रतिसाद देणार्‍या पुरुष आयडींचे यासंदर्भातले विस्तृत विचार वाचायला आवडतील.

ढालगज भवानी's picture

7 May 2013 - 12:58 am | ढालगज भवानी

मुक्तक टाकण्या मागील धाडस नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. शिवाय ही "मिपा" हे संतुलीत स्थळ असण्याची पावतीही आहे. की असे मुक्तक इथे संयतपणे चर्चिले जाऊ शकते.

अदिती तुझा प्रतिसाद आवडला.

पिलीयन रायडर's picture

7 May 2013 - 10:58 am | पिलीयन रायडर

का रहात नसेल इच्छा? उलट तीव्र होत असेल असं मला वाटत..
मला तर मुक्तक आवडलं..
कुणी तरी खरं प्रेम करणारं भेटावं अस नक्कीच वाटत असेल तिला..

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2013 - 9:05 pm | श्रीरंग_जोशी

कविता वर वर कळली असे वाटत आहे.

पाप पुण्याच्या अंधारात -> हे 'पापपुण्याच्या अंधारात' असे लिहायला हवे होते.

आजानुकर्ण's picture

6 May 2013 - 9:30 pm | आजानुकर्ण

पुण्याच्या अंधारातले पाप. (पुणे शहराच्या लोडशेडिंगचा काही संबंध असावा काय?)

काकाकाकू's picture

6 May 2013 - 10:00 pm | काकाकाकू

- लिहिलंय रामदासानी, ईथे टाकलंय तात्यानी. पण "एका मिपाकराने मला दाखवलं ते तुमच्या बरोबर शेअर करतोय" असंहि नाहिये. रामदासानी नक्की त्यांचं नाव टाकायला परवानगी दिली आहे का? पण मग त्यानीच का नाहि लिहिलं?

आणि रामदासानी स्वतः जरी टाकलं असतं तरी एकंदरीतच काहि जम्या नहि.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 May 2013 - 10:17 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!

पक पक पक's picture

6 May 2013 - 10:42 pm | पक पक पक

अखेर हो, ना करत त्यांनी परवानगी दिली..

तर्री's picture

6 May 2013 - 10:17 pm | तर्री

वेश्या स्त्री आहे . तिला ही प्रेमाचा संग हवा असणार. तो संग इतका मुक्त , बेभान , प्रदीर्घ असावा की पैसे देवून दिलेले १०० भोग हया एका प्राणप्रिय संभोगात धुवून जावेत.

शेवट मला तरी आवडला नाही. उलट जर तो जोश नसेल तरीही ती त्या प्रियकराला स्वीकाते आहे - असा मला आवडला असता.
जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतून वाह - बेहद्द आवडले.

सुधीर काळे's picture

7 May 2013 - 12:58 am | सुधीर काळे

वाहवा! आज वेळ काढून लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 May 2013 - 1:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

साधारण अशाच प्रकारच्या स्त्रियांच्या गोष्टींवर आधारित बातमी कालच्या हफिंग्टन पोस्टमधे होती.

---

प्रेम आणि शारीरिक संबंध या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं दाखवणारा, स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल बोलणारा, लुईस बुन्युएलचा फ्रेंच चित्रपट Belle de jour आठवला.

मुक्तसुनीत's picture

9 May 2013 - 4:08 am | मुक्तसुनीत

या बातमीबद्दल आभार.

पहिली गोष्ट, वेश्येशी रबर न वापरता संग फक्त जीवावर उदार झालेला पुरूषच करेल. त्यामुळे शारीरिक पातळीवरचं प्रणयातलं परमोच्च `स्पर्शसुख' (दोघांनाही) नेहमी शून्य आहे.

दुसरी गोष्ट, वेश्येवर प्रेम करणारा स्वतःची निव्वळ फसवणूक करतोय. खरं प्रेम असेल तर तो तिला पहिल्यांदा त्या दलदलीतून बाहेर काढेल. कारण प्रणयसुख मानसिक लेवलवर एकमेकांप्रती असणार्‍या अनुबंधात आहे.

तिसरी गोष्ट, प्रणयसुख एकसंध चित्तदशेत केलेल्या प्रणयात आहे. याचा अर्थ कुणीही कुणावर काहीही उपकार करत नाही. दोघंही समान चित्तदशेत आहेत. इथे वेश्या पैसे न घेणं हा उपकार करतेय. आणि पुरूष खरं तर फुकटात मिळालेली उद्युक्त स्त्री (ज्यासाठी पत्नी अजिबात तयार होणार नाही असले रंगढंग करून) उपभोगण्याची मजा घेतोय पण त्याला प्रेमाचं खोटं नांव देतोय.

सरते शेवटी, प्रणयतृप्ती हा कमालीच्या शांतचित्तदशेचा परिपाक आहे. पोस्ट इतकी उथळ आहे की त्याविषयी लिहीण्यात काही अर्थ नाही.

थोडक्यात, पौरूषत्वाला आव्हान वगैरे काही नाही, प्रणयतृप्तीबद्दल अज्ञान दर्शवणारी लेखकाची स्वतःचीच फँटसी आहे.

अजिबात पटले नाही, आवडले नाही. रामदास असं लिहितील असंही वाटत नाही.

जयंत कुलकर्णी's picture

7 May 2013 - 7:54 am | जयंत कुलकर्णी

एका वाक्यात सांगायचे झाले तर तिला खर्‍या प्रेमाची आंच लागली आहे......अजून बरेच लिहिता येईल पण त्याची आवश्यकता नाही..........कदाचित तिच्या दृस्टीने तेच खरे पौरुषत्व असावे आता.......

श्रावण मोडक's picture

7 May 2013 - 9:50 am | श्रावण मोडक

राम्दासांनी शीर्षक काय दिलं असतं या विचारात पडलोय, आणि हे प्रसिद्ध करायला त्यांना संकोच का वाटला हही प्रश्न पडला आहेच.

सुबोध खरे's picture

7 May 2013 - 9:57 am | सुबोध खरे

वेश्यांमध्ये काम केलेल्या व्यक्तीना असा अनुभव आहे कि जवळ जवळ प्रत्येक वेश्या हि खऱ्या प्रेमाची इच्छा धरते. प्रत्यक्ष ते किती जणींना मिळते हा भाग अलाहिदा. हे प्रत्येक वेश्येचे स्वप्नरंजन असतेच कि एक दिवस कोणीतरी माझ्यावर खरे प्रेम करणारा येईल आणि मला अशा कर्दमातून बाहेर काढेल. गरीब देशात वेश्या त्या व्यवसायात ढकलल्या जातात आणी श्रीमंत देशात( किंवा गरीब देशातील उच्चभ्रू वर्गात) वेश्या पैश्यासाठी स्वखुशीने वेश्यावृत्ती स्वीकारतात. याचा अर्थ त्यांची नैसर्गिक वृत्ती पूर्णपणे नाहीशी होते असे नाही. भिकारी कितीही कचर्यातील अन्न खात असेल पण त्याची सुग्रास जेवणाची अभिलाषा लोप पावते असे नाही तद्वत वेश्या कितीही लोकांशी संबंध करीत असेल तरी कोणीतरी पुरुष आपल्यावर खरे प्रेम करील आणि त्याच्याबरोबर आपल्या चित्तवृत्ती खुलून येतील आणि आपण त्याच्याबरोबर प्रेमात आकंठ बुडून जाऊ अशी इच्छा करणार नाही असे का?
making love and having sex यातील फरक हाच आहे.
वेश्येवर प्रेम करणार स्वतःची केवळ फसवणूक करत आहे हे म्हणणे चुकीचे आहे. अशा कित्येक वेश्या आहेत ज्यांनी आपले संसार थाटले आहेत आणि त्या त्यात आनंदी आहेत. मुळात त्या वेश्या व्यवसायात ढकलल्या गेल्या होत्या पण त्यापूर्वी इतर मुलींसारखे त्यांचे स्वप्न असतेच कि आपलाही एक सुखी संसार असावा.
केवळ रोज इतक्या लोकांबरोबर संबंध ठेवला म्हणून त्यांची प्रेम किंवा सम्भोगाबद्दल आसक्ती संपेल हे म्हणणे चुकीचे आहे. एम बी बी एस च्या तिसर्या वर्षाला असताना प्रसूती गृहातील अनुभव हा स्त्रीदेहाबद्दल अत्यंत किळस निर्माण करेल असा होता आणि पुढचा आठवडाभर स्त्रीबद्दलचे आकर्षण पूर्ण नाहीसे झाल्यासारखे होते. हाच अनुभव जवळ जवळ सर्व पुरुष डॉक्टरना येतो. याचा अर्थ असा नाही कि सर्व स्त्री रोग तज्ञांना स्त्रियांबद्दल आकर्षण नाहीसे होते कि जे रोज तेच काम करीत असतात. मी स्वतः दीड लाखाच्या वर स्त्रियांच्या अंतर्गत सोनोग्राफी( transvaginal) चाचण्या केल्या आहेत. स्त्री देह म्हणजे कमरेच्या खालचा भाग हे समजणार्यांची कीव करावी तेवढी थोडी आहे.

आपण वेश्यांना एक लेबल लावून टाकले आहे कि त्यांना पुरुष देहाबद्दल किळस असते आणि त्या पुरुषांचा द्वेष करीत असतात काही चांगल्या लेखकांच्या सवंग कादंबर्यातून हा गैर समज दृढ होण्यास मदत झाली आहे.किंवा वेश्येला मनच नाही. वेश्येला सुद्धा तरल भावना असतात हे आपण गृहीत धरतच नाही. वेश्या सुद्धा तितकीच चांगली आई असते हे मी त्यांच्या मुलांची रुग्ण म्हणून तपासणी करीत असताना जाणवलेली गोष्ट आहे. त्यांना हि नाजूक आणि संवेदनाशील मन असते हे आपण का विसरतो?
स्त्री पुरुष संबंध हा फिल्मी किंवा आयटेम सोंग सारखा केवळ दीड मिनिटातच संपणारा असतो असे नाही तर एखाद्या रागदारी सारखा चौ अंगाने फुलून येणारा आणि केशरी बासुन्दि सारखा बराच वेळ जिभेवर रेंगाळणारा उदात्त अनुभव पण असतो. पण त्यात दोघांचा सहभाग तितकाच उत्कटतेने असावा लागतो. म्हणून संभोग या शब्दाची फोड सम + भोग ( दोघांनी समान पातळीवर) अशीही केली जाते.
आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकरांची " जोगिया" हि अत्यंत अप्रतिम कविता अवश्य वाचावी.
मला तरी या कवितेत अतर्क्य असे काही वाटले नाही. कविता आवडली कि नाही हा वैयक्तिक आवडीचा भाग आहे.
रामदास साहेब आणि तात्या दोघांचे अभिनंदन
अवांतर -
वेश्यावृत्ती--माझा वर्गमित्र HIV/AIDS च्या कामासाठी बँकॉक(किंवा इंडोनेशिया) ला गेला होता तेथे त्याबद्दल बोलताना एका वेश्येला( जी स्वखुशीने वेश्यावृत्ती करीत होती) त्याने विचारले कि तुम्ही हे हलके काम का करता. त्यावर त्या गणीकेने हे विचारले डॉक्टर तुम्ही काय करता ? मित्र म्हणाला मी आपल्या ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवतो. त्यावर ती गणिका म्हणाली कि तुम्ही आपला मेंदू विकून पैसे मिळवता मी आपले शरीर विकून पैसे मिळवते दोन्हीत फरक काय आहे.तुमचा मेंदू काय आणि माझे शरीर काय हे काही काळासाठी लोकांना विकून तुम्ही आणि मी पैसे मिळवत आहे यात गैर काय? आजही त्याला आणि मला हे उत्तर सापडलेले नाही.

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 10:23 am | विसोबा खेचर

डॉक्टरसाहेब,

>>वेश्या सुद्धा तितकीच चांगली आई असते हे मी त्यांच्या मुलांची रुग्ण म्हणून तपासणी करीत असताना जाणवलेली गोष्ट आहे. त्यांना हि नाजूक आणि संवेदनाशील मन असते हे आपण का विसरतो?

क्या बात है.. डॉक्टरसाहेब, मुंबैच्या फोरासरोडवर वावरताना, नौकरी करत असताना आणि त्यामुळे त्याच विभागात रोज ५-६ तास घालवत असल्यामुळे माझादेखील अनेकदा तेथील लोकल वेश्यांशी संवाद व्हायचा. कधी बार मध्ये कुणी दारू न्यायला यायच्या तर कधी काही खाणं पॅक करून न्यायला यायच्या..अगदी तुमच्यामाझ्यासारखीच माणसं पाहिली मी त्यांच्यात..अगदी आपल्यासारख्याच इच्छा-आकांक्षा असलेली. कधी दुपारची ड्युटी असताना मोकळा वेळ मिळाल्यास त्यांच्यासोबत चक्क झब्बू सुद्धा मी खेळलेलो आहे. आपण ज्या हस-या-खेळत्या वातावरणात घरी खेळतो, अगदी तसाच..!

पण बाहेरच्या दुनियेला नाही समजत या गोष्टी.. असो, त्या बापड्यांचा तरी काय दोष म्हणा..!

देवनारच्या खाटिकखान्यात रोज कित्येक बक-यांच्या मुंड्या कापणा-या खाटकांना आजिबात मनच नसतं असं म्हणणं हे एक तर खूप धाडसाचं तरी होईल किंवा अपपरिपक्वतेचं तरी होईल..!

असो..

डॉक्टरसाहेब, आपल्या मॅच्युरिटीला, एखादी गोष्ट नीट समजून घेण्याच्या वृत्तीला मनापासून दाद देतो..

शेवटी Maturity counts हेच खरं..!

अन्यथा, कीबोर्ड सरसावत फटाफट मतप्रदर्शन करून एखादी गोष्ट निकालात काढणं फार सोपं आहे.. परंतु मिपावर आपल्यासारखेही प्रगल्भ सभासद आहेत याचा आनंद वाटतो..!

>>आजही त्याला आणि मला हे उत्तर सापडलेले नाही.

क्या बात है..! प्रांजळ कबुली आवडली..

जियो...!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2013 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर

तात्या,

डॉक्टरसाहेबांच्या परिपक्वतेबद्दल कौतुक आहेच. त्यांच्या अनुभवातून त्यांना जाणविलेल्या गोष्टी इथल्या सर्व सदस्यांना त्यांनी वाटल्या त्यामुळे आमच्याही ज्ञानात नक्कीच भर पडली आहे.

परंतु, डॉक्टरसाहेबांचे कौतुक करताना इतर सदस्यांना कमी लेखणे न्याय्य आहे का?

डॉक्टरसाहेब, आपल्या मॅच्युरिटीला, एखादी गोष्ट नीट समजून घेण्याच्या वृत्तीला मनापासून दाद देतो..

शेवटी Maturity counts हेच खरं..!

अन्यथा, कीबोर्ड सरसावत फटाफट मतप्रदर्शन करून एखादी गोष्ट निकालात काढणं फार सोपं आहे.. परंतु मिपावर आपल्यासारखेही प्रगल्भ सभासद आहेत याचा आनंद वाटतो

इतर सदस्य 'बापुडे' आहेत, परिपक्व नाहीत आणि फटाफट (उथळ) मतप्रदर्शन करणारे, अप्रगल्भ आहेत असे म्हणणे म्हणजे त्या त्या सदस्यांचा जाणुनबुजून केलेला अपमान आहे असे मला वाटते. ह्यां संस्थळावर लोकशाही आहे, मतप्रदर्शनाचा हक्क आहे ह्या विचारांनी सर्व सदस्य इथे येतात. त्यांच्या भल्या-बुर्‍या लेखांनी आणि प्रतिसादांनीच आज मिसळपावने बाळसे धरले आहे. त्यांच्या मतांचाही आदर करणे म्हणजे खरी परिपक्वता असे मला वाटते.

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 2:42 pm | विसोबा खेचर

पेठकरसाहेब,

>>इतर सदस्य 'बापुडे' आहेत, परिपक्व नाहीत आणि फटाफट (उथळ) मतप्रदर्शन करणारे,

मला ते तसे वाटले म्हणून मी म्हटले. त्यातूनही मी व्यक्तिश: कुणाचेच नाव घेतलेले नाही..

>>अप्रगल्भ आहेत असे म्हणणे म्हणजे त्या त्या सदस्यांचा जाणुनबुजून केलेला अपमान आहे असे मला वाटते.

परंतु मला तसे वाटत नाही. अर्थात, आपल्या मताचा आदर आहेच..

>> ह्यां संस्थळावर लोकशाही आहे, मतप्रदर्शनाचा हक्क आहे

सदर धाग्यावर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यावर मी कुणाचंही व्यक्तिगत नाव न घेता संसदमान्य भाषेत माझं मत दिलं आहे. त्यातून मी कुणाचा अपमान केला आहे असं मला वाटत नाही..

असो..

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2013 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या, अहो चित्रा जोशीवर कधी लिहिताय ?

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2013 - 7:12 pm | प्रभाकर पेठकर

व्यनि करतो.

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 7:16 pm | विसोबा खेचर

राईट सर..!

ऋषिकेश's picture

7 May 2013 - 10:50 am | ऋषिकेश

आत्ममग्न/स्वमग्न पतीच्या अतृप्त पत्नीचे वक्तव्य वाटते. आता गिर्‍हाईकाची काय नवर्‍याची काय फक्त मर्जीच सांभाळण्यासाठी केलेला संभोग हा समान दुवा दोघींकडे आहे हे ही खरंच म्हणा!

बाकी, उत्तम मुक्तक आहे!

सर्वच प्रतिसाद मननीय वाटले.
कवितेबद्दल मला असे वाटते की कवी अद्याप या कवितेबद्दल पूर्णपणे समाधानी नसावा. माझा अनुभव असा, की काढलेले चित्र वा लिहिलेला लेख दीर्घ काळपर्यंत मला पूर्णत्वास पहुचला, असे वाटत नसते, आणि त्यावर किरकोळ पण महत्वाचे बदल करत राहण्यातून ती कृती हळूहळू पूर्णत्वाकडे पहुचत जाते. रामदास यांना या अपूर्णत्वाच्या जाणिवेमुळे ती प्रसिद्ध करणे इष्ट वाटले नसेल.

....जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतून... आणि
... ये ना पुढे. लाखो डोळ्यानी - लाखो इंद्रीयाचा इंद्र होउन ये...!
या दोन्ही ओळीतून तिला शारीरिक समागमापेक्षा त्याने नजरेने, प्रेमळ रसिकतेने आपले सौदर्य निरखावे, स्त्रीत्वाची कदर करावी, असा भाव प्रकट होतो.

...."एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही.
एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर....
तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप..
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात"...

या शेवटल्या ओळीं मात्र मात्र प्रत्यक्ष शारीरिक संबंधाविषयी बोलतात. काहीसे विस्कळीत वाटणारे हे मुक्तक अद्याप अपूर्णावस्थेत आहे, असे मलातरी वाटते.

...एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते...
ही ओळ सॉक्रेटिसची बायको 'झांटिपी' आणि तुकारामांची पत्नि यांचीही आठवण करून गेली.

पिलीयन रायडर's picture

7 May 2013 - 11:14 am | पिलीयन रायडर

...एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते...

इथे मला पण अडखळल्यासारखं झालं..

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 11:21 am | विसोबा खेचर

इथे मला पण अडखळल्यासारखं झालं..

:)

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2013 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

काय काव्य आहे ! वाह !

बाकी,
आमच्या प्रभुगुर्जींच्या 'जुळ्या चिंबोर्‍या' वाचून थयथयाट करणारे आणि ती विडंबन कविता म्हणजे मिपाला लागलेला डाग असल्यासारखे थैमान घालणारे आज कुठे दिसले नाहीत ह्या धाग्यावर. :)

संजय क्षीरसागर's picture

10 May 2013 - 12:26 pm | संजय क्षीरसागर

यावर सगळं अवलंबून असावं असं वाटतं.

चाणक्य's picture

7 May 2013 - 12:45 pm | चाणक्य

तात्या, तुम्ही शीर्षकही अगदी चपखल दिले आहे. वेश्या शेवटी एक माणूसच असल्यामुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे तिलाही भावना असणारच.
खरेंचा प्रतिसादही आवडला. अगदी योग्य शब्दात लिहिलाय.

अग्निकोल्हा's picture

7 May 2013 - 1:34 pm | अग्निकोल्हा

तिला माहिती असत ऑर्गेजम म्हणजे भावनीक गुंतवणुक आणी गिर्‍हाइका सोबत हे होणे म्हणजे तिच्या शेवटाची सुरुवात. त्याला ते पटत असुनही अपेक्षित मात्र काहीसं विरुध्द असतं. तो प्रयत्न करत राहतो हे सर्व जास्तिजास्त वेळ चालाव ज्यातुन पैश्यापैश्याचीही वसुली होइल.

तिला मात्र ते पटकन उरकलेलंच हव असतं कारण ज्यामुळे ति आणखी कोणाला सोबत देउ शकेल. त्याला वाटत असत तिला सगळ शरीरा-मनापासुन फिल व्हावं व त्याच्या सोबतच तिने सुखाच्या उत्युच्च शिखरावर पोचावं, ति मात्र स्वतःला व्यवस्थित वाचवत असते ही भावनीक गुंतवणुक निर्माण होण्यापासुन...

In short no matter how they impersonate of having great sex and orgasm, they both knows it deep inside that it is nothing beyond mere vaginal masturbation.

बाकि मन कोणाला नसतं... दिल मे अरमां होते तो है. बस कोइ समझे जरा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 May 2013 - 2:16 pm | निनाद मुक्काम प...

मुक्तक आवडले.
प्रेटी वुमन , रिहाई , मंडी असे अनेक सिनेमे डोळ्यासमोरून तरळले.
पंचतारांकित शेत्रात अनेक नामांकित वेश्याव्यवसाय विविध कारणास्तव करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिला पाहण्यास आल्या आहेत.
त्यांचे मनोगत व्यक्त करणारे हे मुक्तक वाटले.
रामदास काकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

चौकटराजा's picture

7 May 2013 - 2:19 pm | चौकटराजा

प्रेम हा फार व्यापक अर्थाने वासनेचाच एक प्रकार आहे. मन म्हणजे काय हो ? आपल्या शरीरातील एक अव्यक्त इंद्रिय.वासनेची तृप्ती ही शरीराच्या व्यक्त इंद्रियांच्या माध्यमातून अनुभवली जाते.तरी शेवटी तिचे अनुभवाचे साधन मन हेच असते .( मेंदू म्हणा हवे तर ! ) पण ज्यावेळेस फक्त मनाच्याच माध्यमातून जी तृप्ती अनुभवली जाते तिला प्रेम म्हणतात. ते कशावरही असू शकते. स्त्री पुरूष संबंधातील शारिरिक व मानसिक संबंधाचा प्रेम या दिव्य अनुभवाशी संबध असेल पण दूरान्वयाने !
( या प्रतिसादाचा मूळ धाग्याशी काय संबंध बुवा ? असे वाटल्यास हहपुवा असा उपप्रतिसाद द्यावा )

स्पा's picture

7 May 2013 - 2:21 pm | स्पा

हहपुवा

सहज's picture

7 May 2013 - 2:32 pm | सहज

पौरुषाला कसले आव्हान हे तर गुड ओल्ड प्रियकराला (स्वप्नातल्या राजकुमाराला) आवाहन आहे. कोणत्याही अतृप्त स्त्रीचे मनोगत असु शकते.

शिवाय लाचार वेश्या असु दे की पापभीरु सज्जन माणूस की एखादी हरामी व्यक्ती - एक सुत्र तर सगळ्यांनाच लागू होते - ये दिल मांगे मोर! सतत अविरत....

विनायक प्रभू's picture

7 May 2013 - 4:13 pm | विनायक प्रभू

रामदासांच्या लेखनाला शिर्षक देणे हे सुद्धा एक आव्हानच असते.

महेश नामजोशि's picture

9 May 2013 - 1:53 pm | महेश नामजोशि

भन्नाट !!!!! पण हे फक्त २००३ पर्यंतच का ? अजून दाखवा कि ?????
महेश नामजोशी

jaypal's picture

9 May 2013 - 5:59 pm | jaypal

>>>पण हे फक्त २००३ पर्यंतच का ? अजून दाखवा कि ?????
ईथे नको. ठाणे किंवा डोंबिवली कट्ट्याला भेटलो की पुढचा आलेख दाखवतो,

त्यासाठी ग्राफ उजवीकडून डावीकडे बघावा.

नाजूक आणि संवेदनशील मन असलेली वेश्या असू शकत नाही असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ नाही.

नाजूक आणि संवेदनशील मन असलेली वेश्या आपल्या प्रियकराला :

एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते...

एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही.
एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर....

तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप..
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!

असं कधीही म्हणणार नाही आणि कोणतीहि प्रेमिका स्वतःच्या प्रियकराच्या `पौरूषाला आव्हान' देणार नाही इतकाच मुद्दा आहे.

प्रेमाच्या नांवाखाली `प्रणयतृप्तीची इच्छा' करणारी वेश्या असेल तर ती स्वतःच्या रोजवापरायच्या शय्येवर कधीही तृप्त होऊ शकणार नाही. प्रणयतृप्तीसाठी स्त्री स्वामिनी हवी. ती शय्या तिला सन्मानानं लाभलेली हवी. असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे.

नाजूक आणि संवेदनशील मन असलेली वेश्या असू शकत नाही असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ नाही.

नाजूक आणि संवेदनशील मन असलेली वेश्या आपल्या प्रियकराला :

एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते...

एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही.
एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर....

तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप..
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!

असं कधीही म्हणणार नाही आणि कोणतीहि प्रेमिका स्वतःच्या प्रियकराच्या `पौरूषाला आव्हान' देणार नाही इतकाच मुद्दा आहे.

प्रेमाच्या नांवाखाली `प्रणयतृप्तीची इच्छा' करणारी वेश्या असेल तर ती स्वतःच्या रोजवापरायच्या शय्येवर कधीही तृप्त होऊ शकणार नाही. प्रणयतृप्तीसाठी स्त्री स्वामिनी हवी. ती शय्या तिला सन्मानानं लाभलेली हवी. असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे.

सुबोध खरे's picture

9 May 2013 - 8:42 pm | सुबोध खरे

कोणतीहि नाजूक आणि संवेदनशील मन असलेली प्रेमिका स्वतःच्या प्रियकराच्या `पौरूषाला आव्हान' देणार नाही इतकाच मुद्दा आहे.
मुद्दा एकदम पटला. मान्य

त्यावरनं दुसरा निष्कर्श आपसूक निघतो : लेखनाची दिशा आणि शीर्षक यांचा स्त्रीच्या प्रेमभावनेशी काही एक संबंध नाही.

अग्निकोल्हा's picture

10 May 2013 - 1:51 pm | अग्निकोल्हा

कोणतीहि नाजूक आणि संवेदनशील मन असलेली प्रेमिका स्वतःच्या प्रियकराच्या `पौरूषाला आव्हान' देणार नाही इतकाच मुद्दा आहे.

प्रेमिका आव्हान देणार नाही ? मग कोण देणार ? बेगडी जवळीक साधणारी वेश्या ???

संजय क्षीरसागर's picture

10 May 2013 - 7:34 pm | संजय क्षीरसागर

प्रेम एकमेकांच्या सहवासाचा माहौल आहे. ती अत्यंत तरल आणि मनस्वी अवस्था आहे. दोघांना सारं आयुष्य एकमेकांसोबत रमायचयं. प्रेमाची परिणिती नेहमी संगच होईल असं कुठे आहे? तिच्यावर केलेली कविता तिला ऐकवावी. तिच्याशी कॅरम खेळावा आणि ती हरत असलेल्या डावात तिला जिंकवावं. तिच्या बरोबर पोहावं. तिला पहाटे उठवून फिरायला न्यावं आणि तिच्या बरोबर योगासनं करावी. विलाच्या टेरेसवर, विस्तिर्ण आकाशाखाली तिच्याबरोबर नि:शब्दतेत चहा घ्यावा. चांदण्या रात्रीत तिच्या बरोबर मद्याचा आस्वाद घेत अस्तित्वाच्या स्त्रीरूपाचे अनोखे पैलू उलगडत न्यावे.

तिची इच्छा असेल तर तिच्याशी संग करावा. प्रेमिकांचा प्रणय सम-भोग आहे, तिथे कुणी कुणाला आव्हान देत नाही. ते दोघांनी एकमेकांना केलेलं समर्पण आहे, एकमेकांना दिलेलं आव्हान नाही. कधी तुम्ही बढत करता आणि कधी ती तुम्हाला सावरते,अशी ती जुगलबंदी आहे. कमालीच्या निवांत क्षणात रंगत गेलेली ती रागदारी आहे. तो संग एकमेकांना तृप्त करण्याचा, एकमेकांशी पुन्हा एकदा अंगोपांग एकरूप व्ह्यायचा इरादा आहे.

आणि सर्वात कहर म्हणजे जे लिहीलंय त्या कवी कल्पना नाहीत, वास्तविकात ते तसं आहे.

चित्रगुप्त's picture

10 May 2013 - 10:45 pm | चित्रगुप्त

@संजय क्षी.
'प्रणय' याविषयीचे अत्यंत सुंदर, उत्कट प्रकटन.

ढालगज भवानी's picture

10 May 2013 - 10:59 pm | ढालगज भवानी

तिच्याशी कॅरम खेळावा आणि ती हरत असलेल्या डावात तिला जिंकवावं.

हे भारी!!

प्यारे१'s picture

11 May 2013 - 12:41 am | प्यारे१

बहोत खूब संजयजी. दिलसे!

चिगो's picture

16 May 2013 - 11:58 am | चिगो

संजयकाका, अत्यंत तरल, सुंदर प्रतिसाद.. आवडला..

विलाच्या टेरेसवर,

हे जरा कठीण आहे, सध्या आणि नजीकच्या भविष्यकाळात..;-)

आणि न जमण्यासारखं काय आहे त्यात? ऑफ सिझनला रिसॉर्टचे विला अत्यंत स्वस्त असतात. (अर्थात बायको मात्र स्वतःची हवी.)

चिगो's picture

16 May 2013 - 5:24 pm | चिगो

न जमण्यासारखं काय आहे त्यात? ऑफ सिझनला रिसॉर्टचे विला अत्यंत स्वस्त असतात.

अहो काका, मला वाटलं की स्वत:च्या विलाबद्दल बोलताय म्हणून बोलताय.. त्यामुळे 'कठीण आहे' म्हणालो..:-) तसाच रिसाॅर्ट, विला ह्यांपासून शेकडो मैल दुर असलेल्या भागात सरकारी नोकरी करतोय हो मी..:-(

(अर्थात बायको मात्र स्वतःची हवी.)

अगदी अगदी.. तसा सभ्य आहे हो मी..;-)

राजेश घासकडवी's picture

16 May 2013 - 8:03 pm | राजेश घासकडवी

(अर्थात बायको मात्र स्वतःची हवी.)

या प्रणयाच्या बाबतीत ही लग्नव्यवस्थेची भानगड कुठून उपटली? निसर्गाने दोन धृव तयार केले तेव्हा लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं ब्वॉ.

आजानुकर्ण's picture

16 May 2013 - 8:43 pm | आजानुकर्ण

हहपु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 May 2013 - 12:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वपीडनाचा "विकार" तुम्हां दोघांपैकी आधी कोणाला झाला? ;-)

jaypal's picture

16 May 2013 - 9:18 pm | jaypal

चिगोशी सहमत

ही दुर्दमनीय अविरोध गती कामेच्छेचा मुलाधार आहे. म्हणुनच तिच्यात मनाला मुळापासुन झंकारायची प्रचंड शक्ती आहे. हे झंकार आपले तरंग सर्वत्र पसरवतात. नैसर्गीक प्रेमभावना असो, वा मानवनिर्मीत लग्नव्यवस्था असो... प्रेमीकांचे नाते असो वा पती-पत्नीचे, वेश्येने पैशापोटी केलेली शय्यासंगत असो किंवा समर्पण भवनेने लीन झालेली प्रेमीका असो... या सर्वांना जीवन देणारी मुळ प्रेरणा एकच आहे. ति प्रेरणा अमुक एक रूपात, अमुक एक नात्यातच बहरेल असं काहि नाहि. या काव्यात रामदासजींनी वर्णन केलेलं स्त्रिमनाचं आंदोलन अगदी सहज शक्य आहे...

रामदासजींचा (तात्यांच्या मार्फत मारलेला) आणखी एक जोरदार षट्कार.

अवांतरः लज्जा हा मनाचा फार लोभसवाणा पैलु आहे. या कुलीन स्त्रिच्या माथी सरसकट टॅबु नावाचा शिक्का मारुन तिला विद्रुप करायची हौस अत्यंत गचाळ आहे. असो.

अर्धवटराव

सदाराम's picture

10 May 2013 - 7:42 pm | सदाराम

झकास्

संजय क्षीरसागर's picture

11 May 2013 - 11:15 am | संजय क्षीरसागर

बिफोर आय क्लोज....

पहिली गोष्ट, रामदासजींना मी फक्त गविबरोबर फोटोत पाहिलंय. जसं इतर एकालाही मी व्यक्तिश: ओळखत नाही तसंच त्यांनाही नाही. माझ्या पहिल्याच प्रतिसादावर इथल्या अनेकांच्या मनात रामदासजी काय चिज़ आहेत ते रेवतीनं स्पष्ट केलंय. ते इथल्या अनेकांचे आप्त आहेत. मला रामदासजींच्या प्रतिसादाची अपेक्षा होती. देहाला साधन बनवून उपजिविका करणा‌र्‍या स्त्रीची प्रणयाप्रती काय भावना असते या तरल विषयाचा वेध घ्यायचा होता. पण रामदासजींसारख्या व्यासंगी सदस्यानं प्रतिसाद न देण्याचा पर्याय निवडला. माझा प्रतिसाद लेखनाच्या आशयावर आहे, लेखकावर नाही इतकं (त्यांचे चाहते समजू शकतील किंवा नाही पण) रामदासजींसारखा माणूस तरी नक्की समजू शकेल अशी अपेक्षा करतो.

दुसरी गोष्ट, खुद्द फोरास रोडवर काम केलेल्या शेखरनं माझ्या प्रतिसादाचा किमान प्रतिवाद तरी करावा अशी अपेक्षा होती. ‘रोशनी’ सारखं अनोखं ललित लेखन करणारा तात्या; वेश्येची चाहत काय, सारी दुनिया जिसके पिछे पागल है वो मोहोब्बत तिच्या लेखी काय आहे, ती प्रियकरात काय शोधते या अंगानं चर्चा करेल असं वाटलं होतं. तात्यानं सुबोध खर्‍यांना धन्यवाद देऊन सरळसरळ प्रतिसादाच्या इमॅच्युरिटीवर रोख नेला.

पुढे हाईट झाली, इंटरनेटवर कितीही पटलं तरी तसं आवर्जून सांगणारे दुर्लभ. सुबोध खर्‍यांच्या प्रतिसादावर मी उपप्रतिसाद दिला तेंव्हा ते माझ्याशी राजी झाले! वास्तविक ज्यांच्या लेखावरच्या प्रतिसादामुळे मी अश्लील लिहीतो या वादात सापडलो त्या लेखकानं आवर्जून प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं. त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आहे. (त्या पोस्टवर त्यांच्याशी देह आणि मानसिकता या अंगानं स्त्रीयांच्या स्तनांच्या कॅन्सरविषयी चर्चा करायची होती. आणि स्त्रैण मानसिकता, स्वत:च्या स्त्रित्वाचा गौरव, आणि स्तनांच्या कॅन्सरपासनं भयमुक्तीसाठी स्त्रीनं काय करायला हवं ते सांगितलं आहेच.)

शेवटी कहर झाला, ‘प्रेमिका आव्हान देणार नाही ? मग कोण देणार ?’
असा सवाल झाला आणि त्यामुळे स्त्रीची मानसिकता (मग ती वेश्या असो की कुणी सामान्य स्त्री) प्रेम म्हणजे काय, आणि प्रणयतृप्तीवर लिहू शकलो! जे म्हणायचं होतं ते सांगायला इतका अविश्वसनीय प्रवास झाला!

संपादित

विसोबा खेचर's picture

11 May 2013 - 11:25 am | विसोबा खेचर

जाव द्या हो संजयराव.. प्रत्यक्ष बोलूया केव्हातरी..

रामदासभाऊंना पण बोलावतो.. एकेक क्वार्टर मारू आणि जरा गंभीर चर्चा करू आणि काहितरी सुवर्णमध्य काढू..

काय बोल्ता? :)

तात्या.

विसोबा खेचर's picture

11 May 2013 - 11:27 am | विसोबा खेचर

किंबहुना, एखादा 'क्वार्टर-कट्टा' करुया असं रामदासभाऊ म्हणतात. आत्ता ते माझ्यासोबतच आहेत.. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 May 2013 - 8:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

क्वार्टरची किंमत काय असते? एखाद्या क्वार्टरमध्ये आठवड्याचा किराणा येतो का? की ४ दिवसांचा येतो ?

संजय क्षीरसागर's picture

12 May 2013 - 8:34 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे प्रश्न गैरलागू आहे

मुळात किराणा मालात कशाकशाचा समावेश होतो ते विचार की....!

आमचा एक मित्र उसने दिलेले पैसे मागायला गेलो की फार वाईट परिस्थिती आहे, पैसे नाहीत द्यायला म्हणतो नि संध्याकाळ झाली की हाप ब्लेंडर्स प्राईड मागवतो रोज.

- रोज आवश्यक झालेल्या गोष्टीला किराणा मध्ये गणलं जावं का?

jaypal's picture

16 May 2013 - 9:26 pm | jaypal

>>>>मुळात किराणा मालात कशाकशाचा समावेश होतो ते विचार की....!
माझ्या माहितीनुसार गायकी मधे देखिल किरानाचा समावेश होतो.

>>> रोज आवश्यक झालेल्या गोष्टीला किराणा मध्ये गणलं जावं का?
एखाद्या रुग्णास त्याचा रोजच्या औषधांची मात्रा देखिल मग किराणा मधेच मोडते का ? असा प्रश्न पडतोय.

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2013 - 10:34 pm | अप्पा जोगळेकर

जनता क्वार्टर म्हणजे ओल्ड मंक किंवा इंपिरिअल ब्लू १०० रुपयांच्या एका नोटेत मिळून जाते. तेवढ्यात आठवड्याचा किराणा येणे अशक्य आहे.

अभ्या..'s picture

12 May 2013 - 11:35 pm | अभ्या..

कॅन्टीनला काय?
बाहेर महाराष्ट्रात नाही मिळत एका नोटेत. :( थोडे वर द्यावे लागतात.

"दारुचा पाश करी संसाराचा नाश"

आणि नशा कशात नाही? हे संकेतस्थळ काय कमी नशेमन आहे? इथे लिहीण्यात नशा आहे. एकेकाशी प्रतिवाद करण्यात नशा आहे. तुझ्या आणि रामदासजींच्या प्रतिसादातल्या दिलदारीला दाद देण्यात नशा आहे.

परवा मित्रांच्या मैफिलीत प्रत्येकी चार पेग झाल्यावर `स्त्री काय चिज़ आहे' यावर एकानं सांगितलेला हा ज्योक ऐकः

बराकच्या सेकंड टर्म प्रेसिडेंशियल विजयानंतर मिशेल म्हणते; बॅरी आपण हा आनंद व्हाइट हाऊसचा कोणताही प्रोटोकॉल न पाळता, दोघंच कुठं तरी दूर जाऊन, आपल्या पहिल्या दिवसांसारखा साजरा करू. बराक म्हणतो, मला मंजूर आहे, कुठे जायचं ते ठरव. मिशेलनं ठरवलेल्या एका दूरच्या साध्याश्या हॉटेलात दोघं सामान्य नागरिक म्हणून जातात. हॉटेल मालक म्हणतो, `मिस्टर प्रेसिडेंट, माझ्यासारख्याचं हॉटेल तुम्ही सेलिब्रेशनला निवडलं यात माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. तुमच्या इच्छेप्रमाणे इथे तुम्हाला इतरांसारखच वागवलं जाईल. माझी फक्त एक विनंती आहे, मला मिशेलशी दोन मिनीटं बोलायचंय. बराक म्हणतात, वाय नॉट? प्लीज गो अहेड.

मालक आणि मिशेल तब्बल वीस मिनीटांनी परत येतात आणि सुहास्य वदनानं मिशेल सांगते : बॅरी, तू मला प्रपोज करण्यापूर्वी वी हॅड अ‍ॅन अफेअर. याच्याशी गपा मारतांना मी नॉस्टॅलजिक झाले आणि वेळेचं भान राहिलं नाही'

बराक पण मिश्कीलपणे म्हणतो, तू याच्याशी लग्न केलं असतंस तर आज या हॉटेलची मालक असतीस.

मिशेल म्हणते, बॅरी तसं नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकाचा प्रेसिडेंट असता!'

विसोबा खेचर's picture

11 May 2013 - 12:42 pm | विसोबा खेचर

तात्या, जगणं हीच एक नशा आहे त्यामुळे मला तर कायम चढलेलीच असते

हरकत नाही.. उतार्‍याची घ्यायला या.. :)

मिशेल म्हणते, बॅरी तसं नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकाचा प्रेसिडेंट असता!'

मस्त.. :)

संजय क्षीरसागर's picture

11 May 2013 - 12:50 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

सुहास..'s picture

11 May 2013 - 11:28 am | सुहास..

नो वे !!

(कुठल्याही) स्त्रींच मन, पुरूष कसा काय ओळखु शकतो व्बा ?

काल्पनिक प्रकटन म्हणुन आवडली असे म्हणायचे धाडस रामदास काकांशी असलेल्या सख्यामुळे करताही येत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

13 May 2013 - 9:07 am | अप्पा जोगळेकर

मस्तच.

खटपट्या's picture

16 May 2013 - 4:04 am | खटपट्या

आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!

ह ह पू वा