<ये दिल मांगे मिनिमल!>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
7 May 2013 - 3:18 pm

रामराम मिपाकरहो,
साचा तयार होता. शब्द बदलले. बघा जमलंय का?
---------------------------------------------------------------------

जा ना घरी सत्तापिपासू नेत्या. जा..!

माझे करोडो नागरीक वाट बघतायत..
त्या खर्‍या लोकशाहीची जी वर काढेल मला हजारो समस्यांतून..
भिरकावून टाकेल आडवं येणारांना करारी निर्णयांनी
झेलेल आव्हानं अल्लद अनेक हातानी...

आणि मी म्हणेन तिला तूच बनून रहा सत्ताधीश आता...!

मी वाट बघते त्या लोकशाहीची, जी करेल मोकळे जनतेचे घुसमटलेले श्वास
आणि नेईल मला प्रगतीच्या उंच शिखरावर..

अशी लोकशाही जिच्यामध्ये पुरून उरेल अन्न, द्रौपदीच्या थाळीसारखं... कुणासाठीही...कधीही...!

आणि मलाही अभिमान वाटेल तिला माझी म्हणायचा ...

जा ना घरी जा. लाखो मार्गांनी माझं रक्त खेचणार्‍या नराधमा जा...!

एक राष्ट्र म्हणजे निव्वळ दोन पाच हजार लोकांची मनसब नसते...

एक योजना म्हणजे प्रगती नाही
एका दो बूंद जिंदगी के च्या आतषबाजीत तुझी प्रगतीची कल्पना संपत असेल तर....

तर बघत बस हिरव्या देशांची नुसती स्वप्नंच..
बस बघत मुंबईच्या शांघाय करण्याच्या घोषणा देत
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या समृद्ध प्राचीन इतिहासाच्या मढ्याला ...!

मुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

कोमल's picture

7 May 2013 - 3:43 pm | कोमल

आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या समृद्ध प्राचीन इतिहासाच्या मढ्याला ...!

मस्तच
+११११११११११......

मी_आहे_ना's picture

7 May 2013 - 4:34 pm | मी_आहे_ना

ह्या दोन ओळींना कडकडाटी टाळ्या...

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 3:48 pm | बॅटमॅन

मस्त जमलंय हो प्यारेजी. प्राचीन इतिहासाचे मढे विशेष आवडले.

मूकवाचक's picture

7 May 2013 - 3:51 pm | मूकवाचक

+१

वा क्या बात .. चांगलं जमवलंयस रे..

गुड वन..

आवडले.

जाता जाता.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

ये ना पुढे. अन दे..!!

माझी लाळावलेली जीभ वाट बघतेय..
त्या तुपाळ वाफाळ बिर्याणीची जी भोगीन मी जिव्हेच्या हजारो रुचिकलिकांनी..
टरकावून टाकेन तिच्या तोंडावरची ओली कणीक
फोडत फोडत अल्लद तिच्या अनेक थरांना...

आणि मी म्हणेन आणखी आग हवी मला आता...ग्रेव्ही कुठाय.?!

मी वाट बघतोय मी तिची, जी करेल शांत ही ढेरीतली लसलस..
आणि खाऊ घालेल माझ्या बेबंद स्वाहाकारी क्षुत्पीडितात्म्याला..

फपफपून उठेल जिची वाफ, अशा धगीसासहित भाजेल... आता कधीही...!

आणि मलाही लाज वाटणार नाही माझ्या दाताखाली भरडल्या जाणार्‍या रसदार कलेजीची...

एक दम बिर्यानी म्हणजे ठासून भरलेल्या मसाल्याची हंडी असते...

एक चमचा म्हणजे यज्ञकर्म नाही.

एका चार घासांच्या चर्वणात तुला आग लागत असेल तर....

तर जा अन चाप.. रस्त्याकडेच्या चायनीज गाड्यावरचे लॉलीपॉप..

आणि घेत बस तुझे काढे चूर्णे अन अरिष्टे रात्रीच्या अंधारात...!

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 4:51 pm | बॅटमॅन

स्तिशभौ अन गविशेठची क्शमा मगुन कविता तंकली आहे.

ये न पुधे अन दे!!!

मझि लाळावलेलि जिभ वात बगतेय
त्य तुपल वफल बिर्यनिचि भोगिन मि जिइवहेच्य हजारो रुचिकल्कनि
टर्कवुन तकेन तिच्या तोन्दावरचि ओओलि कनिक
फोदत फोदत अल्लद तिच्य अनेक थररांना

आनि मी म्हनेन अग हवि मल आता....गिरवि कुथाय?

मी वात बगतोय तिचि, जि करेल शांत ही धेरीतली लसलस
आनि खऊ घलेल माझ्या बेबंद सावहाकरि क्शुतपिदितात्म्यला

फपपपुन उथेल तिची वाआफ, धगिसकत भाजेल अता कदिही!!

आनि मलही लाज वतनार नाही माज्झ्यआ दाआतखलि भरदल्य जानर्य रसदर कलेजिचि

एक दम बिरियनि म्ह्न्जे थासुन भर्लेल्य मसल्यचि हन्दि अस्ते..

एक चमच म्हन्जे यदन्यकर्म नाहि

एक चार घासांच्य चरवनत तुल आग लगत असेल तर..

तर ज अन चप..रस्त्यकदेच्य चयनिज गाद्यावरचे लालीपाप

अनि गहेत बस तुझे काधे चुर्ने अन अरिश्ते रत्रिच्य अन्धरात...!

लेगपिस झाले थेन्गने अन तंदुर्‍या झुकल्या जरश्या
आता मी न बन्दा कुनाचा मज हादडाया दाही डिश्या..

गवि's picture

7 May 2013 - 5:54 pm | गवि

मझि लाळावलेलि जिभ वात बगतेय

फपपपुन उथेल तिची वाआफ, धगिसकत भाजेल अता कदिही!!

अनि गहेत बस तुझे काधे चुर्ने अन अरिश्ते रत्रिच्य अन्धरात...!

ठार केलेस मेल्या... :)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:06 am | ढालगज भवानी

हाहा "हादडाया दाही डिश्या" =)) =))

उदय के&#039;सागर's picture

7 May 2013 - 5:28 pm | उदय के'सागर

बाप रे मेलो हसून हसून :)) :)) .... 'गवि द ग्रेट'

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2013 - 1:48 am | विश्वनाथ मेहेंदळे

मग शुक्रवारी दिल्ली दरबार ????

प्यारे१'s picture

8 May 2013 - 2:05 am | प्यारे१

दिल्ली दरबार. आह!
काय याद आणवली विश्वनाथजी तुम्ही. ह्या स्टेशनवर उतरुन तिकडच्या गल्लीतनं न जाता असं असं गेलं की लगेच सापडणारं. जुन्या कानपूरसारखा माहौल.
'आवो नि खावो प्यारोबा' म्हणून माझ्या ताटातली एक तंगडी हळूच तोच उचलायचा.
रेकॉर्डवर मस्त उस्तादजींचा दादरा सुरु असायचा नि आमची हड्डी तोडण्यातली जुगलबंदी सुरु असायची.
उस्तादजी समेवर यायला नि आम्ही उस्मान 'एक रस्सा वाटी' म्हणायला एकच वेळ....
दिल भर के खाना झाल्यावर आमचा नेहमीचा अमुक तमुक पानवाला. स्साला पान बनवावं तर त्यानंच. वाह!

गेले ते दिवस. हह्ह्ह्ह्ह!
- मी लई भारी प्यारोबा टोचर :)

आजानुकर्ण's picture

8 May 2013 - 1:51 am | आजानुकर्ण

झकास...

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2013 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

लेखन एन-आय-आर चष्म्यातून केल्यासारखे भासले.

प्यारे१'s picture

7 May 2013 - 5:38 pm | प्यारे१

वाटत नसलं तरी गुजरात अजून भारतातच आहे काय? एका दृष्टीनं आपण देखील एन आर आय च आहात.
जरा गुजरातच्या बाहेर येऊन सत्यपरिस्थितीचा आढावा घ्या नि मग बोला.
;)
- हॅ हॅ हॅ

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 4:44 pm | विसोबा खेचर

अशी लोकशाही जिच्यामध्ये पुरून उरेल अन्न, द्रौपदीच्या थाळीसारखं... कुणासाठीही...कधीही...!

क्या बात है..

क्लास..!

मूकवाचक's picture

7 May 2013 - 4:49 pm | मूकवाचक

अभ्यास, गृहपाठ आणि व्यक्तिमत्व विकासाच्या ओझ्याखाली पिचलेल्या मुलाचे मातृवात्सल्याला आव्हान -

आई, ये ना पुढे. ये..!

माझ्या लाखो पेशी वाट बघतायत..
त्या एक्सबॉक्स व्हिडिओ गेम कन्सोलची जो मी मनमुराद खेळेन नजरेच्या हजारो कोनांतून..
भिरकावून टाकेन माझ्या अस्तित्वाला त्याच्या अ‍ॅनीमेशनच्या वावटळीत
गुंतेन अलगद त्यातल्या क्लिष्ट मिशन्समधे...

मी म्हणतोय उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी थोडा मोकळा वेळ देत जा मला ...!

मी वाट बघतोय त्याची, जो करेल मोकळे आतून बंद झालेले झरे
आणि न्हाऊ घालेल मला अन माझ्या बेबंद अल्लड अस्तित्वाला..

सतत उसळतील ज्याच्या लाटा, अशा समुद्रासारखा यावा तो... कधीही...!
आणि मलाही आता लाज वाटणार नाही माझ्या अपूर्ण गृहपाठाची...

ये.., ये ना पुढे. दोन प्रेमळ डोळ्यानी - निरपेक्ष प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक होउन ये...!

एक पोर म्हणजे भरभरून ओसंडणार्‍या चैतन्याचा महाप्रपात असतो...

आईसक्रीमची एक कँडी म्हणजे 'ट्रीट' नाही.
क्रिकेट अ‍ॅटॅक्सच्या एका कॅटमधे तुझी माया संपत असेल तर....

तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच मातृवात्सल्याचे आलाप..
आणि हसत-कवटाळून बस
माझ्या प्रगतीपुस्तकातल्या तथाकथित गुणवत्तेला व्यक्तिमत्व विकासाच्या नकली उजेडात...!

प्रचेतस's picture

7 May 2013 - 5:30 pm | प्रचेतस

आता इकडे पण आलात काय.
कविता आवडली.
बाकी आम्हाला तरी आवडतं ब्वा न कुढता त्या प्राचीन इतिहासाच्या मढ्याला कुरवळत बसायला.

बाकी आम्हाला तरी आवडतं ब्वा न कुढता त्या प्राचीन इतिहासाच्या मढ्याला कुरवळत बसायला.

+११११११११११११११११११११.

न कुढता ती मढी जिवंत करायला लै आवडतं :)

प्यारे१'s picture

7 May 2013 - 5:39 pm | प्यारे१

गवि, मू वा यांच्या 'सरस' नि 'खर्‍या' विडंबनांबद्दल आभारी आहोत. :)

अभ्या..'s picture

7 May 2013 - 5:43 pm | अभ्या..

गवि, बॅट्या, मुव्वा आणि प्यारे तुम्ही सगळे भारी आहात.
(बास्स का आता प्यारे?) ;)

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 5:45 pm | बॅटमॅन

गवि, बॅट्या, मुव्वा आणि प्यारे तुम्ही सगळे भारी आहात.

माझं नाव पण आलंय इथं. आवडला प्रतिसाद ;)

बॅटबिंदू.

अर्धवट's picture

7 May 2013 - 5:46 pm | अर्धवट

>>आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या समृद्ध प्राचीन इतिहासाच्या मढ्याला ...!

टाळ्या..

सहज's picture

7 May 2013 - 5:47 pm | सहज

सगळी विडंबन जोरात!!!

प्यारे१'s picture

7 May 2013 - 5:47 pm | प्यारे१

ब्याटम्यानच्या 'बोब्ल्या बोलाम्साती' विशेष वेग्ले आभार.
-उगा ट्यार्पी वाढायच्या अपेक्षेत प्यारे ;)

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 5:49 pm | बॅटमॅन

बहुत दहन्यवद प्यरेजि ;)

(कवी बॅटेश्चन्द्रा दोशि)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मूळ कविता तर आवडलीच... पण तिने इतर कविंच्या स्फुर्तीची दारे खोलून जो हसण्याचा महापूर आणला त्यांत वाहून गेलो आहे... वाचवा, वाचवा !!!

jaypal's picture

7 May 2013 - 7:30 pm | jaypal

सगळेच सरसावले आहेत

खणखणीत, निव्वळ विडंबनाहून उत्तम.

मू वा यांचे व्हर्जनही आवडले.

तुपाळ वाफाळ बिर्याणी तर.. अहाहा!

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 2:06 am | ढालगज भवानी

आवडली रे.

पैसा's picture

8 May 2013 - 9:28 am | पैसा

मला प्यारे, गवि, मूकवाचक आणि वाघुळशास्त्री सगळ्यांच्याच कविता आवडल्या. निव्वळ विडंबनापेक्षा जास्त काहीतरी आणि खर्‍या आयुष्याच्या जास्त जवळ जाणार्‍या.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2013 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

प्यारे१'s picture

8 May 2013 - 12:55 pm | प्यारे१

सर्व रसि क... थांबा बघून येतो... हा सर्व प्रतिसादी रसिकवरांचा आभारी आहे..
ढण्यवाद्स ;)

सुहास झेले's picture

8 May 2013 - 3:33 pm | सुहास झेले

भारीच... सगळेच पेटलेत ;-)

कवितानागेश's picture

10 May 2013 - 2:19 pm | कवितानागेश

शी बै!
कैतरीच!!