डाम्बीसपणा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Sep 2008 - 9:20 am

मिपावरच्या ब-याच तज्ञांकडुन गझल या विषयावर बरीच काही माहिती मिळाली आहे.
गझलेच्या दोन कडव्यांमधे काही संबन्ध असलाच पाहिजे असे नाही हे एक म्हणणे आहे
प्रत्येक कडवे /शेर हा स्वतन्त्र लिहिले जाते दोन कडव्यांत / शेरांत एकमेकाना जोडणारा अर्थाचा प्रवाह एकसंध वाहिलाच पाहिजे असा आग्रह नसावा. हा अर्थात मी त्या चर्चेतुन माझ्या मगदुरानुसार काढलेला अर्थ.
थोडा प्रयत्न केला आहे तसेच काहिबाही लिहिण्याचा. हे लिहिण्याच्या नादात मला अर्थाचा प्रवाहीपणा जमला नाहीय्ये.
बघुया तुमचा एखादा प्रयत्न अर्थाचा प्रवाहीपणा आणुन देईल.
या तुकबन्दीला जुळतील अशा काही ओळी तुम्हीही सुचवा.
( आपण र लाट न जुळवता चारोळी केली होती तेंव्हा सदस्यांचा असाच मस्त रीस्पोन्स मिळाला होता )

चला करायची सुरुवात ?

आज मी माझाच यार झालो
उमाळे उगाळीत तुज पार झालो

ये आठवण तुझी कधी जरा
कढ ह्रयदात दाटुन येती
मांडुन शब्द त्यावरती
माझ्याच भावनांचा आज मी बाजार झालो

नजरेस नजर भिडवुनी बेहोश झालो
आठवुनी क्षण तो कैकदा; डोळ्यांस मी स्वप्नभार झालो

पिंजून शब्द सारे मी गीत लिहीता झालो
लावूनी ना अर्थ लागे तो मी विचार झालो

हे गीत कोणते गाता न ये मजला
माझ्याच पाठीत खुपसली ती मी कट्यार झालो.

मी कोण म्हणोन विचारी कोणी मला उद्याला
( प्रीतीत सारे विसरलो तुझ्या मी आणि )
नाव ना ये सांगता माझे इतुका मी भिकार झालो.

याच्या पुढे मधे मागे काही ओळी सुचवाव्या ही विनन्ती.
अवांतरः हे "जे न देखे रवी" इथे न लिहिता इतिहास आणि सल्ला या सदरात लिहिले आहे हा डाम्बीसपणा समजा. प्रतिसाद मिळवण्यासाठी काहीवेळा असा डाम्बीसपणा करावा लागतो

इतिहाससल्ला

प्रतिक्रिया

गणा मास्तर's picture

11 Sep 2008 - 9:38 am | गणा मास्तर

पाहिली स्वप्ने तुझ्या केसांत माळण्याची
ती फुले माळुनी मी निर्माल्यातला हार झालो
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 9:44 am | चतुरंग

येत होता तू क्रमाने मी जरी बेजार झालो
पाहुनी या गजलपंक्ती डांबिसा मी ठार झालो! ;)

चतुरंग

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 9:51 am | आनंदयात्री

ठोकण्याच्या या भ्रमाने मी जरी तलवार झालो
पाडु नका या गझलपंक्ती मी पुन्हा ट्टुक्कार झालो !!

गणा मास्तर's picture

11 Sep 2008 - 9:54 am | गणा मास्तर

मौन जेथे बोलले गुज मनीचे नेत्रातुनी
स्वप्न ते भंगूनी मूक मी हुंकार झालो
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

शिवा जमदाडे's picture

11 Sep 2008 - 12:21 pm | शिवा जमदाडे

आवडले...

- शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

रामदास's picture

11 Sep 2008 - 10:07 am | रामदास

सातार, सावकार , तडीपार, व्यापार, आचार,लाचार, उच्चार, असे शब्द जुळवून लावायचे आहेत का?
कठीण आहे.
no bid .pass.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2008 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भौ,

ही शुद्ध फसवणूक आहे. "जे न देखे रवी"वर मी हल्ली टिचकी मारत नाही .... पण आता तुमचं नाव पाहूनही विचार करावा लागेल. :W

विजुभाऊ's picture

11 Sep 2008 - 10:29 am | विजुभाऊ

पण आता तुमचं नाव पाहूनही विचार करावा लागेल.
पागलपन भी थोडासा जरुरी है. म्हणुनच मी त्याला थोडा डाम्बीसपणा म्हणालो आहे.
असो.
गझलेतल्या शेरांमधुन अर्थाचा प्रवाह आवश्यक नाही की कसे हे आजमावयला काय हरकत आहे?
इथे या विषयावरचे तज्ञ आहेत. माझी शंका व्यवस्थीत निरसून मिळेल इथे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

घाटावरचे भट's picture

11 Sep 2008 - 11:48 am | घाटावरचे भट

मिटले असो खुले वा हे दोन नेत्र माझे
पाही छबी तुझी मी, मी नजरबंद झालो

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

बबलु's picture

11 Sep 2008 - 12:07 pm | बबलु

.
धोका देऊनी गेली मज ती | आयुष्यात मी गपगार झालो ||........
(स्वगत -- जाऊदे च्यायला... दुसरी येईल).......
धोका देऊनी गेली मज ती | आयुष्यात मी गपगार झालो ||
फाट्यावर मारूनी सर्वांना | माझा मीच साहुकार झालो ||

:) :) :)

....बबलु-अमेरिकन

आंबोळी's picture

11 Sep 2008 - 12:22 pm | आंबोळी

होउनी साहुकार सर्वां मारले मी फाट्यावरी!
गजाली करण्यास गावात अंमळ मोकळा झालो!!

आंबोळी

धमाल मुलगा's picture

11 Sep 2008 - 12:23 pm | धमाल मुलगा

हाण्ण तिच्याआयला....

चालुद्या...

आम्ही जातिवंत औरंगजेब, आम्ही आपले टोप्या विणत तुम्हा सगळ्यांना ब्याकिंग देतो.

विजुभाऊ's picture

11 Sep 2008 - 12:46 pm | विजुभाऊ

होउनी साहुकार सर्वां मारले मी फाट्यावरी!
गजाली करण्यास गावात अंमळ मोकळा झालो!!

यातले "मोकळा झालो!!" हे सावकार , कट्यार , पार अशा यमकात बसत नाही.
गझलेचा तेवढा एक नियम तरी पाळुन लिहुयात

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

स्वाती राजेश's picture

11 Sep 2008 - 12:12 pm | स्वाती राजेश

मस्त जमला आहे डांबिसपणा...:)
आम्ही काय या प्रांतातील नाही.:) त्यामुळे प्रतिसादापलिकडे काही लिहू शकत नाही...माफी असावी..
बक अप!!!!!!
गणा मास्तर. चतुरंग, आनंदयात्री, घाटावरचे भट यांनीही छान साथ दिली आहे....:)

गणा मास्तर's picture

11 Sep 2008 - 12:37 pm | गणा मास्तर

गीत तुझ्या ओठीचे ऐकताना वेडावुनी
जी कुणी न छेडीली ती ह्रद्याची तार झालो
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 12:42 pm | विसोबा खेचर

आप्ल्याला तर काव्यातलं काय पन कळत नाय बा!

चालू द्या.. :)

विजुभाऊ's picture

11 Sep 2008 - 12:49 pm | विजुभाऊ

आप्ल्याला तर काव्यातलं काय पन कळत नाय बा!
तात्या हे असे लिहिले तर?
काव्यातलं आप्ल्याला तर काय पन ना कळाले
म्हणुनी स्वतः होऊनी मीच त्यातुनी डीबार झालो

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

गणा मास्तर's picture

11 Sep 2008 - 1:12 pm | गणा मास्तर

लोकशाहीचा पुरस्कर्ता मी नवा मंच झालो
लादुनी आणीबाणी मी पुन्हा सरपंच झालो

(स्वगत : मास्तरा मरशील लेका)
अवांतर : नाना चेंगटा अन शिवा जमदाड्या आंबोळीच्या वखारीतन लाकड आणुन ठेवा
भोकरवाडी (बुद्रुक)

अवलिया's picture

11 Sep 2008 - 6:20 pm | अवलिया

लाकड वल्ली हायत
पेट्रल टाकायच का?

विजुभाऊ's picture

12 Sep 2008 - 10:15 am | विजुभाऊ

नाना
लाकड वल्ली हायत
पेट्रल टाकायच का?

हे असे नका लिहु.
त्याऐवजी हे कसे वाटेल बघा
कापलेले झाड लाकुड ;सर्वांगी ओलाच् राहीलो
पेट्रोलनेही जळेना ;मी ती लाकडाची वखार झालो

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

गणा मास्तर's picture

12 Sep 2008 - 10:26 am | गणा मास्तर

वीजदाहिनीत वीज नाही लाकडे ओली मिळाली
पेट्रोलचा तो भाव पाही , मास्तरा सोडुन देइ
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आंबोळी's picture

11 Sep 2008 - 1:04 pm | आंबोळी

लावूनी कंदीलास आम्ही पोचवीले अनेकांस !
लाकडे पुरवीता पुरवीता त्याना शेवटी वखार झालो !!

(सावकार , कट्यार , पार अशा यमकात वखार बसला का?)

आंबोळी

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 2:41 pm | आनंदयात्री

देउनी प्रतिसाद आम्ही खरडीलेही अनेकांस !
छान छान म्हणता कविंना शेवटी टुक्कार झालो !!

हसरा सुहास's picture

11 Sep 2008 - 1:21 pm | हसरा सुहास

खुपकाहि वाचले फाडूनी डोळे
वाचता वाचता पुरता बेजार झालो.

डोमकावळा's picture

11 Sep 2008 - 2:36 pm | डोमकावळा

विस्फारुनी मी डोळे तिज पाहिले कितीदा
भावास हाक देता ती मीही पसार झालो.
;)

- डोम
ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

ऍडीजोशी's picture

11 Sep 2008 - 2:51 pm | ऍडीजोशी (not verified)

लागले डोक्यास शॉट, मी इथे सैरभैर झालो,
माझ्याच ओळी वाचूनी, मी पुन्हा शुद्धीत आलो.

दत्ता काळे's picture

11 Sep 2008 - 3:34 pm | दत्ता काळे

विजुभाऊ

अर्थ-वेंधळ्या गझलेला प्रसविण्या तय्यार झालो
प्रतिसादाच्या भिकेने मी असा लाचार झालो

हसरा सुहास's picture

11 Sep 2008 - 3:51 pm | हसरा सुहास

नयनी भिडले नयन माझे तिच्या
नंबर चश्म्याचा बघुनी थंडगार झालो.

मिलन झाले माझे तीचे
गूंजले सूर मधुर संगीताचे....
नंतर गोंधळाने त्याच संगीताच्या
बहिरा ठार झालो.

विजुभाऊ's picture

11 Sep 2008 - 5:08 pm | विजुभाऊ

ठेविले अनंत्या तैसेचि राहुन चित्ती मी समाधान झालो
उत्तम नवी कंपनी मिळताच तेथून पहिला मी पसार झालो

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अवलिया's picture

11 Sep 2008 - 6:14 pm | अवलिया

विजुभावुंचा जाहीर निषेध

ओ विजुभौ हे तुम्ही चांगले केले नाही
अहो मनातल पाहुन व तुमच नाव पाहुन आम्ही घुसलो
पण पहातो तर काव्य........ :''(
अहो आमचा काय संबंध काव्याशी ?

फार दिवस झाले त्या गोष्टीला....

जेव्हा प्रियेचा साखरपुडा चालु होता
तेव्हा मी विषाची बाटली रिकामी केली होती
जेव्हा ती पत्रिका वाटत होती
तेव्हा मी जमीनीवर कोसळत होतो
जेव्हा ती मंडपात येत होती
तेव्हा डेथ सर्टिफिकेटवर सही झाली होती
जेव्हा अक्षता लोक टाकत होते
तेव्हा मला तिरडीला बांधले जात होते
जेव्हा मंगळसुत्र ती बांधुन घेत होती
तेव्हा लोक मला घेवुन चालले होते
जेव्हा ती घरात माप ओलांडुन जात होती
तेव्हा मला चितेवर निजवले होते
जेव्हा सत्यनारायणाचे मंत्र म्हटले जात होते
तेव्हा मला अग्नीडाग दिला जात होता
जेव्हा ती चुंबिली गेली होती
तेव्हा माझी कवटी तडकली होती

अन तेव्हापासुन फिरतो आहे वायुयोनीत ....
ना रुप... ना नामऽ....ना स्थल काल बंधन
काव्य संपले अन भोजन ही संपले त्या दिवशीच

तेव्हापासुन न देखे रवि अन पाककृती मी पहात नाही

अन आज तुम्ही मला फसवलेत.

याला आम्ही के एल पी डी म्हणतो.

जैनाचं कार्ट's picture

11 Sep 2008 - 6:20 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हा हा हा !!!
के एल पी डी झालेले खुप पाहीले ;)

विजुभाउ तुमच्या कडून अशी अपेक्षाभंगाची अपेक्षा केली नव्हती आम्ही !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 6:34 pm | आनंदयात्री

खम्मा घणी जैन साब .. पण ते नाना आहेत विजुभाउ नाहीत.

जैनाचं कार्ट's picture

11 Sep 2008 - 6:38 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अरे बाबा,
"विजुभाउ तुमच्या कडून अशी अपेक्षाभंगाची अपेक्षा केली नव्हती आम्ही ! "

हे वाक्य विजुभाउ साठीच आहे रे ... आद्या कधी मोठा होणार तु :?

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 6:41 pm | आनंदयात्री

जाउद्या बॉ .. आम्हाला काही उमजत नाही.

विजुभाऊ's picture

12 Sep 2008 - 10:36 am | विजुभाऊ

जेव्हा ती चुंबिली गेली होती
तेव्हा माझी कवटी तडकली होती

नाना हाय तूने मार डाला
हे वाक्य मुम्बैतल्या एका मुम्बैय्या ने असे म्हंटले
नान्या हाय तूने मार्‍या डोल्या

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

धमाल मुलगा's picture

12 Sep 2008 - 10:59 am | धमाल मुलगा

जेव्हा ती घरात माप ओलांडुन जात होती
तेव्हा मला चितेवर निजवले होते
जेव्हा सत्यनारायणाचे मंत्र म्हटले जात होते
तेव्हा मला अग्नीडाग दिला जात होता
जेव्हा ती चुंबिली गेली होती
तेव्हा माझी कवटी तडकली होती

नाना...नाना...
काय दर्द आहे, काय दर्द आहे एकेका वाक्यात!
साला काळजाच्या तळापासुन एखाद्यावर प्रेम करुन ज्यावर प्रेम केलं त्यानंच असं काळिज पिळवटून टाकणार्‍या निर्णयांना जवळ केलेलं असल्याशिवाय असं दर्द कागदावर (मॉनिटरवर हो) उतरु शकत नाही....

अवलिया's picture

12 Sep 2008 - 6:25 pm | अवलिया

नाना...नाना...
काय दर्द आहे, काय दर्द आहे एकेका वाक्यात!
साला काळजाच्या तळापासुन एखाद्यावर प्रेम करुन ज्यावर प्रेम केलं त्यानंच असं काळिज पिळवटून टाकणार्‍या निर्णयांना जवळ केलेलं असल्याशिवाय असं दर्द कागदावर (मॉनिटरवर हो) उतरु शकत नाही....


अरे तु़झे लग्न झालेय ना नक्की?
मग तुला नसलेल्या गोष्टी असलेल्या व असलेल्या गोष्टी नसलेल्या असे बोलायची सवय नाही झाली अजुन?
शिकुन घे बाबा ! लवकर !
नाय तर पार खुळखुळा होईल तुझा...

( आणि ते बिचार नुसत गप्प गप्प होत अस कुणाबद्दल तरी बोलला होतास ना..... तीच तुझी पण गत होईल. संभाळ रे बाबा)

प्राजु's picture

11 Sep 2008 - 7:44 pm | प्राजु

लिहित होते लोक आता रोज काही वेगळे
मग पाडण्या गझल मीही तय्यार झालो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनीषा's picture

12 Sep 2008 - 2:25 am | मनीषा

वादळे थांबलेली मार्गात माझ्या सारी
घेउनी त्यांना सवे , मी पार झालो

काळजात या जपली दु:खेही त्यांची
सुखाच्या क्षणी मात्र मी, भार झालो |

जैनाचं कार्ट's picture

12 Sep 2008 - 10:24 am | जैनाचं कार्ट (not verified)

प्रेमाच्या जगात एक एक वार झाले
तीच्या एका नजरेने मी घायाळ झालो !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

गणा मास्तर's picture

12 Sep 2008 - 2:04 pm | गणा मास्तर

हाती घेउनी हात, वचनी मी बद्ध झालो
स्वप्नातुनी जागता अन, हय कसा मी स्तब्ध झालो
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

घाटावरचे भट's picture

12 Sep 2008 - 4:24 pm | घाटावरचे भट

विजुभौ, हे काय केलंत....

विजुभाऊ नाव पाहून मारली टिचकी दुव्यावर
पाहुनि डांबिसगिरी पण हाय मी बेशुद्ध झालो

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

पद्मश्री चित्रे's picture

12 Sep 2008 - 4:44 pm | पद्मश्री चित्रे

लोकहो, साधा तसा मी, 'मिपा' मुळे डांबिस झालो
दिग्गजांना फसवुनी -चोरावरी मी मोर झालो

डोमकावळा's picture

12 Sep 2008 - 5:46 pm | डोमकावळा

मनात असे म्हणत असतील...

लोकहो, साधा तसा मी, मिपावरी विचार झालो
परकाया प्रवेशाच्या या आरोपामुळे बेजार झालो

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

शेखस्पिअर's picture

12 Sep 2008 - 5:59 pm | शेखस्पिअर

तुकबन्दीच्या धारेचे मीही एक गटार झालो...
तिकडून आला गजाली,मी इकडून पसार झालो..