रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी ,
घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट,
अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा ,
आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि,
आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे,
लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा,
करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा,
उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे
प्रतिक्रिया
29 Apr 2013 - 1:19 pm | पक पक पक
हम्म..!!
29 Apr 2013 - 1:21 pm | प्रकाश घाटपांडे
छाण कविता
29 Apr 2013 - 5:09 pm | सामान्य वाचक
खरेच , नशिब्वान आहत ब्वा! देवाने तुम्हाला काय प्रतिभा प्रदान केली आहे.
29 Apr 2013 - 5:10 pm | विसोबा खेचर
मस्त..
2 May 2013 - 12:13 am | शशिकांत ओक
आणि रविवारच्या रात्री,
लावला बाम कपाळी । अन चोळली पाठ मोकळी।।
म्हणे राजा, या बसा । करा कामाच्या लीला।।
दमला फार करुनी कामे । माझ्या तोंड माऱ्याला
दावा आता तोऱ्याला। हळुच सोडवुन नाडीला ।।
पाहतो रोज वाट आता रविवारची।
करीत कामे हाताने पटापट । स्वप्नात रंगतो रातिच्या झटापटीची।।
2 May 2013 - 2:12 pm | संजय क्षीरसागर
ही सुविधा वापरावी
2 May 2013 - 7:51 pm | प्यारे१
बघा ना राव,
बर्याच जणांना कळतच नाही.
@मोदक,
ह्या ह्या ह्या.
(तुझ्या प्रश्नानंतरचे हे माझे उत्तर आहे.) ;)