इतकं कशाला झाकोळायला हवं
माझ्या नसण्याने?
मला शोध ना..
इथं, तिथं,
फुललेल्या रानफुलात,
कोमेजल्या निर्माल्यात.
दवानं भिजलेल्या रानात,
अंगार ओकणार्या वाळवंटात.
पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात,
कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही.
निळ्या मुक्त आकाशात,
अन् करड्या फांदीवरल्या
हळूच डोकावणार्या, बंदिस्त
चार काड्यांच्या घरट्यातही.
जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वार्याच्या सळसळीत,
हवेच्या झुळुकीत,
जीवघेण्या वादळात,
नि:शब्द, नीरव शांततेत,
न सरत्या कोलाहलात.
हास्याच्या लकेरीत,
पापणीआडच्या पाण्यात.
पहा नीट एकदा,
कदाचित सापडेनही
तुझ्या मनाच्या एखाद्या,
खोलश्या कप्प्यात.
प्रतिक्रिया
24 Apr 2013 - 11:42 am | स्पंदना
__/\__!!
24 Apr 2013 - 12:43 pm | आतिवास
सुरेख!
24 Apr 2013 - 1:08 pm | पैसा
श्वास रोखून वाचतच गेले. अजून तिथेच आहे!
24 Apr 2013 - 1:39 pm | सूड
सुरेख !!
24 Apr 2013 - 2:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
निव्वळ अप्रतिम रचना!!
__/\__
24 Apr 2013 - 2:11 pm | चाणक्य
कविता....
24 Apr 2013 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2013 - 2:21 pm | सुबक ठेंगणी
त्या फुलांच्या गंधकोशी...ची आठवण झाली. :)
30 Oct 2020 - 7:38 am | प्राची अश्विनी
+1
सुरेख.
24 Apr 2013 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
टाळ्या..............!
24 Apr 2013 - 5:17 pm | यशोधरा
सगळ्यांना धन्यवाद :)
24 Apr 2013 - 5:20 pm | प्यारे१
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं....
केवळ लाजवाब!
24 Apr 2013 - 6:31 pm | भावना कल्लोळ
मस्त
24 Apr 2013 - 6:35 pm | सस्नेह
ते झाकोळणं थांबलं...
अन शोधही संपला....!
24 Apr 2013 - 6:35 pm | शुचि
आवडली. ओघवती आहे.
24 Apr 2013 - 6:50 pm | रेवती
सुरेख!
24 Apr 2013 - 7:11 pm | उपास
ओघवत्या तरल भावना.. आवडलीच कविता!
हं पण, नसण्याचा नुसत्या भासानेही झाकोळायला होवू शकतं..
संदीप म्हणतो तसं.. 'नसतेस घरी तू जेव्हा.. जीव तुटका तुटका होतो...' :)
25 Apr 2013 - 9:34 am | इन्दुसुता
आवडली.
25 Apr 2013 - 9:47 am | सुमीत भातखंडे
छान
25 Apr 2013 - 11:03 am | यशोधरा
वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार.
@आतिवास, तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल केला आहे, थ्यांक्यू.
25 Apr 2013 - 11:15 am | नंदन
कविता आवडली.
25 Apr 2013 - 2:02 pm | उत्खनक
सुंदर लिहिलंय!
25 Apr 2013 - 9:10 pm | पद्मश्री चित्रे
आवडली कविता. मस्तच. शेवट सुरेख.
13 May 2013 - 2:25 pm | बॅटमॅन
भारीच!!!!!
14 May 2013 - 10:12 am | ज्ञानोबाचे पैजार
कविता समजली तरी समजलीच नाही,
बघु पुर्णपणे केव्हा समजते ती.
केव्हातरी समजेलच, इथे घाई कुणाला आहे.
14 May 2013 - 10:23 am | रुमानी
सह्ज आणि सुंदर........!
14 May 2013 - 10:56 am | Bhagwanta Wayal
जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वा..! सुरेख.
17 May 2013 - 3:45 pm | Bhagwanta Wayal
उत्तम रचना...!
आवडली.
20 May 2013 - 10:31 pm | पिवळा डांबिस
अनेक लेव्हल्सवर सुरेख आहे!
जियो!!!
21 May 2013 - 11:40 am | मनिष
हेच म्हणतो! सुरेखच आहे कविता :-)
21 May 2013 - 7:25 am | वेल्लाभट
वाह ! सुरेख आहे. आवडली...
21 May 2013 - 11:47 am | आदूबाळ
सुंदर कविता. उदास उदास वाटायला लावणारी...
29 Oct 2020 - 8:16 pm | राघव
आज यशोतैची खूप आठवण आली. जरा तिचं जेवढं मिळालं तेवढं वाचत बसलो होतो.
ही रचना वाचून एकदम समाधान वाटलं. खूप खूप सुंदर रचना. स्पर्शणारी. :-)