Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by यशोधरा on Wed, 04/24/2013 - 11:37
इतकं कशाला झाकोळायला हवं माझ्या नसण्याने? मला शोध ना.. इथं, तिथं, फुललेल्या रानफुलात, कोमेजल्या निर्माल्यात. दवानं भिजलेल्या रानात, अंगार ओकणार्‍या वाळवंटात. पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात, कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही. निळ्या मुक्त आकाशात, अन् करड्या फांदीवरल्या हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त चार काड्यांच्या घरट्यातही. जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वार्‍याच्या सळसळीत, हवेच्या झुळुकीत, जीवघेण्या वादळात, नि:शब्द, नीरव शांततेत, न सरत्या कोलाहलात. हास्याच्या लकेरीत, पापणीआडच्या पाण्यात. पहा नीट एकदा, कदाचित सापडेनही तुझ्या मनाच्या एखाद्या, खोलश्या कप्प्यात.

Submitted by स्पंदना on Wed, 04/24/2013 - 11:42

Permalink

__/\__!!

__/\__!!
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Wed, 04/24/2013 - 12:43

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 04/24/2013 - 13:08

Permalink

!!!

श्वास रोखून वाचतच गेले. अजून तिथेच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 04/24/2013 - 13:39

Permalink

सुरेख !!

सुरेख !!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 04/24/2013 - 14:10

Permalink

निव्वळ

निव्वळ अप्रतिम रचना!! __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Wed, 04/24/2013 - 14:11

Permalink

छान झाली आहे

कविता....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 04/24/2013 - 14:17

Permalink

क्या बात है.

आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Wed, 04/24/2013 - 14:21

Permalink

छान गं...

त्या फुलांच्या गंधकोशी...ची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 10/30/2020 - 07:38

In reply to छान गं... by सुबक ठेंगणी

Permalink

+1 सुरेख.

+1 सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 04/24/2013 - 14:41

Permalink

टाळ्या..............!

टाळ्या..............!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 04/24/2013 - 17:17

Permalink

सगळ्यांना धन्यवाद

सगळ्यांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 04/24/2013 - 17:20

Permalink

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं....

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं.... केवळ लाजवाब!
  • Log in or register to post comments

Submitted by भावना कल्लोळ on Wed, 04/24/2013 - 18:31

Permalink

आवडली

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 04/24/2013 - 18:35

Permalink

इथे,

ते झाकोळणं थांबलं... अन शोधही संपला....!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 04/24/2013 - 18:35

Permalink

आवडली. ओघवती आहे.

आवडली. ओघवती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 04/24/2013 - 18:50

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Wed, 04/24/2013 - 19:11

Permalink

चिंब वाटलं..

ओघवत्या तरल भावना.. आवडलीच कविता! हं पण, नसण्याचा नुसत्या भासानेही झाकोळायला होवू शकतं.. संदीप म्हणतो तसं.. 'नसतेस घरी तू जेव्हा.. जीव तुटका तुटका होतो...' :)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on गुरुवार, 04/25/2013 - 09:34

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 04/25/2013 - 09:47

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 04/25/2013 - 11:03

Permalink

वाचक, प्रतिसादकांचे मनापासून

वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार. @आतिवास, तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल केला आहे, थ्यांक्यू.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 04/25/2013 - 11:15

Permalink

छान

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by उत्खनक on गुरुवार, 04/25/2013 - 14:02

Permalink

अप्रतीम!

सुंदर लिहिलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on गुरुवार, 04/25/2013 - 21:10

Permalink

आवडली कविता. मस्तच. शेवट

आवडली कविता. मस्तच. शेवट सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 05/13/2013 - 14:25

Permalink

भारीच!!!!!

भारीच!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 05/14/2013 - 10:12

Permalink

कविता समजली तरी समजलीच नाही,

कविता समजली तरी समजलीच नाही, बघु पुर्णपणे केव्हा समजते ती. केव्हातरी समजेलच, इथे घाई कुणाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on Tue, 05/14/2013 - 10:23

Permalink

छान.

सह्ज आणि सुंदर........!
  • Log in or register to post comments

Submitted by Bhagwanta Wayal on Tue, 05/14/2013 - 10:56

Permalink

जन्म मृत्यूच्या उत्सवात,

जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वा..! सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhagwanta Wayal on Fri, 05/17/2013 - 15:45

Permalink

उत्तम रचना...! आवडली.

उत्तम रचना...! आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 05/20/2013 - 22:31

Permalink

अरेच्चा, ही कविता वाचलीच नव्हती..

अनेक लेव्हल्सवर सुरेख आहे! जियो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Tue, 05/21/2013 - 11:40

In reply to अरेच्चा, ही कविता वाचलीच नव्हती.. by पिवळा डांबिस

Permalink

+१

हेच म्हणतो! सुरेखच आहे कविता :-)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 05/21/2013 - 07:25

Permalink

वाह ! सुरेख आहे. आवडली...

वाह ! सुरेख आहे. आवडली...
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 05/21/2013 - 11:47

Permalink

सुंदर कविता. उदास उदास

सुंदर कविता. उदास उदास वाटायला लावणारी...
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 10/29/2020 - 20:16

Permalink

नमन

आज यशोतैची खूप आठवण आली. जरा तिचं जेवढं मिळालं तेवढं वाचत बसलो होतो. ही रचना वाचून एकदम समाधान वाटलं. खूप खूप सुंदर रचना. स्पर्शणारी. :-)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 11220 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com