यमास आवडती हिंदी चित्रपट ,हिरोंना न्यायची करेना खटपट ,
यमाने सनीचा गदर पाहिला ,भेटण्या सनीला उभा राहिला,
वाटले ,सनी हा आहे कोण?,त्याने केला सनीला फोन,
सनीला विचारले यमाने एवढी माणसे कशी मारतो एकट्याने?,
सनी म्हणे हे सर्व आहे खोटे ,तुला एवढे आश्चर्य का वाटे?,
आमच्या पेक्षा तुझा चित्रपट मोठा ,अचानक येतात कशा त्सुनामी लाटा ,
लाखावर माणसे मारतो क्षणात ,आम्हीही मारत नाही रणात ,
तुझे मात्र सर्व असते खरे,तुझ्या पेक्षा आमचे चित्रपट बरे,
ऐकुनी यम झाला निरुत्तर,म्हणे सनीला खरे आहेरे पुत्तर.
प्रतिक्रिया
24 Apr 2013 - 12:11 pm | स्पंदना
ये ढाई किलो का हाथ जब किसीपे पडता है, तो आदमी उठता नही उठ जाता है।
24 Apr 2013 - 2:14 pm | पैसा
मला आपले सनी पुत्तर पेक्षा हीमॅन धर्मेंदर पाजी आवडतात.
24 Apr 2013 - 6:17 pm | चौकटराजा
राजाभाव मिपावरच्या काही कविता अशा असतात की त्यावर तीन चार वेळा वाचन केले तरी काय बी उमगत नाय !
ही तुमची किंचित कविता त्यामानाने हलक्या फुलक्या शब्दात तरीही काहीशी आशयघन आहे. लिहित जा !
24 Apr 2013 - 7:44 pm | दिपक वायळ
उत्तम