-पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश
आज आपला स्वातंत्र्यदिन आहे पण भारतमाता मात्र पूर्ण स्वतंत्र नाही आहे; पण जेवढे स्वतंत्र आहोत त्याचा आनंद आहे पण आपल्या अंतःकरणात दुःख पाहिजे कि सिंधू स्वतंत्र नाहीये, तिबेट आपल्यापासून हरवलेला आहे, नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रम्हदेश गमावलेला आहे, लंका आपली नाही याबाबत थोडा इतिहास सांगतो तुम्हाला
" ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत"
आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या नीचपणाने हिंदुंच्या डोक्यात माती कालवण्यासाठी आपल्यात हे त्यानी भिनवलेले आहे
कि हे साहित्य टाकावू आहे
अरे शस्त्रांनी मारले तर माणसाचे शरीर मरते त्याचे मन मरत नाही ते मन पुनरपी देहाचे वस्त्र पांघरून जन्माला येऊ शकतो. त्या इच्छा, आकांक्षा, भावना, वासना त्या पुनरपी कार्यरत होतात परंतू जर माणसाचे मन मारले तर हत्येचा दोष टळतो आणि तो मन मेलेला हृदय मेलेला जिवंत देहात एक वेगळे जीवन जगायला लागतो, त्याचे वैभव हि नाश करता येते, त्याचे कर्तृत्व संपवता येते, त्याचा जीवन प्रवाह उध्वस्त करता येतो. ज्यांची बुद्धी मारली अशा लोकांचा हा देश आहे आणि मग आपल्याला हिंदुस्थान म्हणायला लाज वाटते
मी जे बोलतोय ते अनभ्यासाने बोलत नी कुणाचे खरकटे खाऊन कुणाचे ऐकून बोलत नाही तर देवाने दिलेल्या अति तीव्र प्रज्ञा चक्षुने अभ्यास करून बोलतोय या कातडीच्या डोळ्याने नाही तर अकलेच्या डोळ्यांनी
देश भक्ती धर्म भक्ती हा ज्या डोळ्यांचा स्वभाव आहे ज्यात समर्पण आणि मातृभूमीसाठी सर्वस्व गमावून टाकायला तयार असणाय्रा डोळ्यांनी अभ्यास करून मी हे बोलतोय
भारत हा शब्दच किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे
"भा" या संस्कृत शब्दाचा अर्थ "तेज" "तेजस्विता" "द्युतीमानता" असा आहे फार सुरेख अर्थ आहे तो जसा भास्कर तो सूर्य
"रत" म्हणजे रममाण झालेला म्हणजे त्या तेजास्वीतेत, त्या द्युतीमानतेत रममाण झालेला देश असा जो तो आपला देश भारत
आज १५ ऑगस्ट अतिशय आनंदाचा दिवस आहे कसे का असेना पण जे काही मिळाले आहे तुटलेला भंगलेला खंगलेला झडलेला राष्ट्र म्हणून जो काही भाग मिळालेला आहे तो भाग अतिशय पवित्र आहे उदात्त आहे श्रेष्ठ आहे वंद्य आहे पूज्य आहे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण जे यात नाही आहे ते आपण मिळवू शिवाजी महाराज अन संभाजी महाराज चित्तात धरले तर बघताबघता मिळवू एक हिंदुस्थान जर समजून घ्यायचा असेल आपल्या देशाची जर जाणीव व्हायची असेल तर त्यासाठी वाङमय आहे त्यात ४ वेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे, रामायण, महाभारत, भगवतगीता, १०८ उपनिषदे आहेत. हे सगळे आपली धरती आपली माती आपली संस्कृती आपली परंपरा आपला धर्म याची जाणीव करून देणारे हे वाङमय आहे पण या सगळ्या वाङमयाचा आणि आपला काहीही संबंध नाही किंबहुना हे टाकावू. गलिच्छ, बेकार असे आपल्या चित्तात शेकडो वर्षे बिंबवले गेले आहे असो
पण हे बदलणार आहोत आपण पुराणे म्हणजे काय आहेत हो! ते हिंदुस्थानच्या इतिहासाचे ग्रंथ आहेत ते काव्यात्मक आहेत रुपकात्मक आहेत पण त्याला कळायला मेंदू बरोबर हृदय असावे लागते देशप्रेम लागते पण हृदय नावाचा जिन्नस आपला झडलेला आहे त्यामुळे काही कळत नाही आपल्याला
जी १८ पुराणे आहेत त्यापैकी पहिले पुरण आहे हे 'विष्णूपुरण' आहे यात ज्यांनी लिहिले त्या माणसाचे नाव नाही आहे तर भगवान विष्णू भगवंत त्याला अर्पण केलेले ते पुराण आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली धरती आपली भारत माता तिचा हा पती आणि त्यांच्या संसारातील लेकरे ते आम्ही हा उदात्त हेतू यात आहे या विष्णू पुराणातला पहिला श्लोक असा
उत्तरम्य समुद्रस्य
हिमाद्रे शैव लक्षणम
वर्षम भारतम नाम
भारतीय यत्र संततिः
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जि भूमी तिचे नाव आहे भारत अन त्या भारतभूमीची संताने ते भारतीय म्हणजे काय आहे हो ? आपले जे सगळे जे पूर्वज आहेत ते कधीही फापट पसारा बोलत नसतं
बीजगणितात काही सूत्रे असतात (अ + ब)२ सारखे असे सूत्र थोडे असते त्याचा विस्तार मोठा असतो तसेच हे सूत्र रुपाने मांडलेले आहे || उत्तरम्य समुद्रस्य हिमाद्रे शैव लक्षणम वर्षम भारतम नाम भारतीय यत्र संततिः||
आपल्या इथे महर्षी सातवडेकर नावाचे ऋषी होऊन गेले. ते १०४ वर्षाचे असताना गेले. त्यांनी आयुष्यात फक्त भारतीय साहित्याचा संस्कृतीचा संवर्धन करणारा इतिहास लिहिला आणि प्रचार केला. ते प्रकांड पंडित होते, विद्वान होते, निस्वार्थी होते. कारण साधारण विद्वान माणसे शक्यतो स्वार्थी असतात पण अग्नीला मळ नाही, विटाळ नाही तसा यांच्या बुद्धीला काही स्वार्थाचा विकाराचा स्पर्श होऊ शकला नाही
असे ते प्रकांड पंडित होते. चारही वेदांच्यावरती ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात टीका लिहिली अशी हि व्यक्ती आहे. पार्डीला गुजरात मध्ये त्यांचा आश्रम आजही आहे त्यांचे वाङमय मी वाचले. त्याच्यात त्यांनी दिलाय या श्लोकाचा अर्थ. कि, तो श्लोक सूत्र रुपाने दिलेला आहे. महर्षी म्हणतात कि, हिमालयाचा मध्य धरून खालती समुद्र पर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत आहे. याचा अर्थ असा कि
ज्याला आपण जपान म्हणतो ना ! त्याचे मुळ नाव आहे 'जयपान'
ज्याला आपण तिबेट म्हणतो ना ! त्याचे मूळ संस्कृत नाव आहे 'त्रिबिष्टम' म्हणजे देवांच्या राहण्याचे वस्तीचे ठिकाण. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यस्ताश्रम म्हणजे शेवटी त्यांनी तिकडे देव लोकाला जायचे, मरणाकडे आपणहून जायचे म्हणजे तिकडे जायचे आणि शरीर विसर्जित करायचे अशी पध्दत होती; आपली त्यांच्याच पुस्तकात मी वाचले आहे. आहे आपल्या देशाचा इतिहास हा किती वर्षांचा आहे हो ! कपाळाला हात लावाल पण ते सत्य आहे त्यांनी लिहिले आहे कि या देशाचे आयुष्य किती तर सर्वात प्राचीन राष्ट्र आपले आहे अमेरिकेचे आयुष्य २०० - २२५ वर्षांचे आहे. इंग्लंड चे असेच एक १३०० वर्षांचे आयुष्य आहे पण आपल्याइतके प्राचीन कोणी नाही
तुकाराम महाराज एके ठिकाणी बोलले कि
!! जिकडे पाहे तिकडे उभा अवघा गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहोनी संचले !
! न व्रजता दाही दिशा जिकडे पाहे तिकडे सरसा, तुकाम्हणे समपदी उभा दिठीचीये आधी !!
अरे मी जिकडे पाहीन ना त्या ठिकाणी मला कर कटावरती ठेवून समचरण, नासाग्र दृष्टी भक्तांच्यासाठी अखंड उभा असलेला तो पांडुरंग मला दिसतो आहे हो ! आणि जसा जसा पाहत जातोय तसा तो अधिकाधिक भव्य दिव्य रूप मला दिसतंय आणि त्याला किती वर्ष झाली त्याचा निवडा तुकारामांनी सांगितलाय
||" उभा दिठीचीये आधी "||
म्हणजे दृष्टी नावाचा, डोळे नावाचा पदार्थ अजून जन्माला यायचा होता त्याच्या आधीपासून तो उभा आहे पण हे आपल्याला झेपत नाही
याबाबत पंडितजी सतावाडेकर काय सांगत आहेत ते बघा. ते म्हणाले, " नामदेवांनी आरती लिहिली आपण ती म्हणतो कि
"युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा,
पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा देगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा".
एक युग म्हणजे काय ? आता मी परत अजून जरा आत जातो जगाच्या पाठीवरती आपल्या भारतीय लोकांनी शोधून काढलेल्या कालमापन पद्धती इतकी अचूक पद्धती जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशात आजतागायत अद्याप अस्थित्वात नाही इतकी अति अति अति श्रेष्ठ ती पद्धती आहे.
किती ताकदीची पद्धती आहे ती तुमच्या आमच्या बापजाद्यानी निर्माण केलेली ?
समजा आजचा दिनांक किती ? १ मे २०१० . तर १ मे ८०१० ला, १००१० ला, १४०१० ला, म्हणजे १२००० वर्षांनंतर हि एखादे सूर्य ग्रहण असेल तर त्याचा स्पर्श काळ कोणचा?, ते खग्रास कि खंडग्रास? मोक्ष काळ कोणचा? ते आत्ता आपण सांगू शकतो. हे समोर ठेवले तर तुम्हाला हजारो वर्षांच्या तिथ्या, ग्रहणे सगळेसगळे तुम्हाला स्पष्ट कळते . हे किती सुक्ष्म आहे? तर सेकंदाचा हजारावा हिस्सा मोजणारी आपली कालमापन पद्धती आहे
तर एक युग म्हणजे ५००० वर्षे २८ युगे म्हणजे १४० हजार वर्षे हा चंद्रभागेच्या काठी उभा आहे म्हणजे भक्तांची परंपरा जर १,४०,००० वर्षांची असेल त्या देवाची आरती करण्याची तर तो देव हा समाज हे राष्ट्र १,४०,००० वर्षाचे आहे असे समजायला हरकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू दिठीचीये आधी म्हणजे दृष्टीच्याहि आधी. एवढी १,४०,००० वर्षांची परंपरा असणारा आपला देश आहे त्याच्यात हे संस्कृत वाङमय उत्पन्न झालेले आहे त्याच्यात ते पुराण ग्रंथ आहेत . पुराण म्हणजे काही मागास शब्द नाही आहे भंपक नाहीये भाकड कथा चांदोबा मासिकाचे अंक नाही आहेत ते
तर आपण करंटे आहोत
!! करंटी येथे जन्मली भुते मातृ संहृते सदविती देहा !!
आपण आपल्या आईला न ओळखाणाय्रा अवलादिचे आहोत. म्हणून आपल्याला कळत नाही कि आपली मातृभूमी काय उंचीची आहे ते काय ताकदीची आहे
तर या १,४०.००० वर्षांच्या या देशामध्ये काय घडले त्याचे इतिहास लिहून ठेवलेले आहे ते. त्यातील सुरुवातीच्याच श्लोकात काय म्हणले आहे?
उत्तरम्य समुद्रस्य
हिमाद्रे शैव लक्षणम
वर्षम भारतम नाम
भारतीय यत्र संततिः
= समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत
आपण खाली जो आहे त्याला हिंदी महासागर म्हणतो. नाही आपण विसरलोत. देशाला विसरलोत आईला विसरलोत तो हिंदी महासागर नाहीये तर तो गंगा महासागर आहे.हिकडचा जो अरबी सागर म्हणून आपण आज ओळखतोय त्याचे मूळचे नाव सिंधू सागर आहे, सिंधू ज्या सागराला मिळते तो सिंधू सागर आहे तो
आपण ज्याला मालदीव बेटे म्हणतो ना ती लक्ष्यद्विप बेटेच आहेत ती आपली आहेत
ब्रम्हदेश आहे न त्याचे नावच सांगते कि तो आपला आहे
श्रीलंका आपला आहे
ज्याला आपण अरबस्तान म्हणतो यात 'स' ला 'त' नाही आहे 'थ' आहे ते अरबस्थान. यातील अरब हा संस्कृत शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ अश्व अर्थात घोडा असा आहे उत्तम घोड्यांची पैदास होण्यासाठी लागणारे तापमान वायुमान असणारा देश आहे तो
तुर्कस्थान यात आपण 'क' वरती रफार मारतो पण 'तूरग' म्हणजे घोडा तो संस्कृत शब्द आहे त्याचा अपभ्रंश करून आत्ता आपण म्हणतो
हे सगळे मूळ देश आपले आहेत आपले भूभाग आहेत
इराण हा आपलाच भाग आहे
अहो ! खालती ब्राझील आहे ना त्या ब्राझील देशात काय दक्षिण अमेरिकेत काय आजही हिंदू संस्कृतीचे उदंड पुरावे आहेत जाऊन बघा मी वाचले आहे ते बोलतोय
हा चीन बघा ! या चीनच्या तिथले सगळे राजे लोक मांडलिक म्हणून धुताराष्ट्राला जेव्हा सप्त सिंधू सप्त गंगांच्या जलाने राज्याभिषेक हस्तिनापूरला केला त्यावेळी मांडलिकत्व मान्य करून आहेर घेऊन आलेले होते त्यासाठी महाभारत वाचा मराठवाडा पब्लिशिंग कंपनीने १० खंड काढले आहेत महाभारताचे त्याच्यात मी बोलतोय ते लिहिलेले आहे
असा आपला देश आहे
आपण हा आपला देश इतका प्राचीन असून सुद्धा एक गोष्ट अगदी दुर्दैवाची आहे आजची जि स्थिती आहे ती इतकी विलक्षण घाणेरडी आहे कि काहीच आपल्या वाट्याला येणार नाहीये दुःखाशिवाय
कशात कमी आहे हो ? मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे " देवाने दिलं अन कर्माने नेलं"
आपण म्हणतो एखादयाला कि करंटा आहे तो ! म्हणजे काय सगळे काही चांगले आहे पण कर्तृत्व नाहीये, दृष्टी नाहीये, अक्कल नाहीये. कसं बोलावे? कसं वागावे? कसं जगावे? कसं राहावे हे कळत नाही तो करंटा आहे तसे आपण करंटे आहोत
कसे? तुम्हाला ठावूक नसेल तर सांगतो कि, जगाच्या पाठीवरती ज्याची furtility factror म्हणजे उद्बीजक क्षमता असामान्य असलेला एकमेव देश आहे हा. सलग अशी शेकडो हजारो मैल भूमी जिची उत्कृष्ट अशी उद्बिजक क्षमता जगाच्या पाठीवरील अन्य कुठल्याही देशात नाही. मी येथे हिंदुस्थान चा भाडोत्री स्तुतिपाठक म्हणून आलेलो नाहीये. मी सत्य बोलतोय तुमच्या आयुष्यात हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल
आपल्या सारखी जलसंपत्ती जगात कुठे नाहीये पण तुम्ही आम्ही करंटे आहोत
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे स्पष्ट तीन ऋतू असणारा एकमेव देश आहे हा हिंदुस्थान
वनसंपत्ती हि हिंदुस्थान सारखी जगात कुठे नाहीये होय ! मलेशियात जंगले आहेत, आफ्रिकेत जंगले आहेत जगाच्या पाठीवरती आणखीनही कुठे आहेत पण विश्वाच्या पाठीवरती ज्या ज्या प्रकारचे वृक्ष ज्या ज्या प्रकारचे गवत ज्या ज्या प्रकारच्या भाज्या ज्या ज्या प्रकारचे तृणांकुर तृणधान्य कि जे जे काही सृष्टीला ठावूक आहे ते ज्या एकाच देशात मिळते असा हा देश आहे आपण मुर्खासारखे म्हणतो कि बटाटा जपान मधून आला आणि टोमॅटो अमेरिकेतून आला आणि गुलाब इराण मधून आला अन भावी पंतप्रधान इटलीतून आला .पण आपल्याला चालते सगळे कारण कारटी करंटी आहेत करणार काय ?
तुम्हाला सांगतो कि आपली पशु संपत्ती तर इतकी विलक्षण आहे. आज या आपल्या देशात मोठेले ३७६ कत्तलखाने सरकार मान्य आहेत गावोगावी बकरी कापण्याचा धंदा चाललाच आहे त्याच्यात २६ केवळ गायी मारण्याचे आहेत. निसर्गाने जो जो पशु जन्माला घातलाय कुठे पांढरे कुठे काळे वाघ हि पाली झुरळे डास चिलटे खेचर जलचर जे काही असेल ते सगळे या एकाच देशात मिळतात असे शास्त्रज्ञ बोलतात. आपली पशु संपत्ती इतकी विलक्षण आहे कि शेकडो वर्षांपासून कातडी निर्यात करणारा क्रमांक एक चा देश आहे हा
या देशाची खनिज संपत्ती पण काय सांगू ! शास्त्राज्ञाना जाऊन जर विचारले कि, " काय हो! मूलद्रव्ये किती ?" तर ते सांगतील १०८ . हि १०८ Elements ज्यात सोने, चांदी, तांबे. जस्त, पितळ अशी आणखी काही कि जि विश्वात शास्त्रज्ञांच्या नजरेला आढळली ते १०८ धातू ज्या एकाच देशात सापडतात त्याचे नाव आहे हिंदुस्तान. अरे ! कोणी म्हणेल त्या दक्षिण आफ्रिकेत तांब्याच्या खाणी आहेत ऑस्ट्रेलियात सोने सापडते, अमेरिकेत काय कोळसा फार आहे. असे कुठे काही तर कुठे काही. पण हे सगळे धातू ज्या एकाच देशात सापडतात तो देश आहे आपला
पुढे बुद्धिमत्ता ! हो || तयासी तुलना कैसी || अरे ! हा नील आर्मस्ट्राँग तो ऑर्लिन्स, तो रॉबर्ट हे तिघेजण उतरले चंद्रावरती १९ जुलै १९६९ ला. तिथून माघारी येताना ते हवेचे काही नमुने , मातीचे काही नमुने, दगडाचे काही नमुने घेऊन आले पण तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगतो कि हा पराक्रम जो अमेरिकेने केला त्याचे एकूण ३९ प्रयोग झाले पण पहिले ३८ अयशस्वी झाले हा ३९ व तेवढा यशस्वी झाला
त्याकाळात Advansments of America in the Scintific World हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याच्या काय होते ते सांगतो म्हणजे आपली बुद्धी काय लायकीची आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यात त्यांनी लिहिले होते कि आत्ता पर्यंत ३८ अयशस्वी प्रयोगानंतर ते राष्ट्र जिद्दीने पेटून उठले कि आपण झेप घेतलीच पाहिजे वरती. नासा नावाच्या संघटनेत ८-८ तासांच्या शास्त्रज्ञांच्या संशोधन पाळ्या सुरु झाल्या आणि या संशोधनाच्या आधारावरती ते चंद्रावर उतरले. त्या पुस्तकात त्यांनी पुढे सांगितले होते कि हे कार्य यशस्वी होण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला रक्ताचे पाणी केले हाडाची काडे केली असे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ लोक २,८२,००० होते या संशोधनात आणि तेच सांगतात कि या २,८२,००० पैकी ८०% लोक हे भारतीय आहेत हि आपली बुद्धिमत्ता आहे अहो ! आत्ता हि परवा एक लेख आला होता अमेरिकेच्या अंतराळ संशोधन कार्याबद्दल लोकसत्ता मध्ये त्यात मी वाचले कि त्यांची जि अंतराळ संशोधनातील १० सर्वोच्च अधिकाय्रांची कि समिती आहेत त्यात ९ जण भारतीय आहेत हिंदू आहेत
त्या जीनिव्या मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठा अॅटॉमिक प्लांट आहे तिथे ५०% पेक्षा जास्त शास्त्रज्ञ हे आपले आहेत आत्ताचे हे कॉम्पुटर. या संगणक शास्त्रात जगातील जि एकूण शास्त्रज्ञांची लोकसंख्या आहे त्या ३७% पेक्षा जास्त उत्कृष्ठातील उत्कृष्ठ शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत हि आपली बुद्धिमत्ता आहे अहो ! || मृगचीये अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा || भाग्यवंत घेती वेचूनिया मोरे भारवाही मेले वाहता ओझे || त्या कस्तुरी मृगाला तो सुगंध आपल्या पोटात आहे हे ठावूक नसते पण वाय्रामुळे पसरणारा त्याचा सुगंध शोधण्यासाठी काळीज फुटे पर्यंत ते जिकडे तिकडे फिरत राहते. आजही आपण कस्तुरी मृगच आहोत आपल्याला ठावूक नाही कि आपण कोण आहोत
अरे ! धर्म कुणाला कळायचं असेल त्यांनी या भारत मातेच्या पायाशी यावे भगवंताने दिलेला मनुष्य जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर तर तो आत्म्याचा प्रकाश फक्त या भरत भूमीच देऊ शकते
अहो ! आपले पसायदान इतके उदात्त आहे कि ज्याला तोड नाही जोड नाही तुलना नाही उपमा नाही केवळ मराठीच नाही तर हिंदुस्थान मधल्या सगळ्या भाषातून धर्म म्हणून जे काही चिंतन केले आहे तुम्ही आम्ही त्याला तोड नाही
असे सगळे असून सुद्धा भगवंताने इतक्या उत्कृष्ट संरक्षक सीमा तुम्हाला आम्हाला दिलेल्या आहेत कि असा चहूबाजूनी निसर्गतः च संरक्षण असणारा देश फक्त हिंदुस्थान हा आहे एकीकडे हिमालय, हिंदुकुश तिन्ही बाजूनी समुद्र. एक सर्वात मोठी नदी फक्त हिंदुस्थानात, सर्वात मोठा पर्वत हिमालय फक्त
हिंदुस्थानात. जगाच्या कल्याणासाठी अखंड कार्यरत चिंतनात असलेली असंख्य व्यक्तिमत्वे केवळ हिंदुस्थानात झाली आहेत हि उंची कुणी गाठू शकणार नाही कुणाला ते परवडणार नाही हो ! आमच्या तुकाराम महाराजांच्या इतकी उंची असणारा मनुष्य अन्य देशात जन्मू शकणार नाही
किती सर्वोत्कृष्ट परंपरा असणारा हा देश आहे. जगातले जे सर्वात उत्तमातले उत्तम ते भगवंताने या भूमीला दिले आहे येथे सहा शास्त्रे आहेत त्यातील ब्राहस्पत्य शास्त्राचा सुरुवातीचा श्लोक आहे त्यात या देशाच्या नावाचा उल्लेख असलेला तो श्लोक आहे || हिमालयात सभारभ्या यावत हिंदू सरोवरं तत् देश निर्मितम् देवं हिंदुस्थानम् प्रचीक्षति || अरे हिमालय पासून खाली हिंदू सागरापर्यंत देवाने निर्मिलेला हा देश आहे. अरे ! ज्यावर खास मायेची पाखर आहे देवाच्या अंतःकरणात ज्याच्या विषयी कौतुक आहे असा हा देश आहे
असा १,४०,००० वर्षांची परंपरा असणार हा देश एका आज एका वाईट गोष्टीत क्रमांक एक वर आहे लाज वाटावी शरम वाटावी, अन्न गोड वाटू नये, दुःख व्हावे अशी ती गोष्ट आहे. कोणाची गोष्ट आहे ती ? कि, जास्तीतजास्त काळ पारतंत्र्याच्या नरकात आनंद मानणारा हा देश आहे या देशावर झालेल्या आक्रमणा इतकी आक्रमणे जगात कुठल्याही देशावर झालेली नाहीत. किती देशांनी आक्रमणे केली ? १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत आपल्यावर ७४ देशांनी आक्रमणे केलेली आहेत. कुणी भाषेच्या माध्यमातून, कुणी व्यापाराच्या माध्यमातून, कुणी धर्माच्या माध्यमातून, कुणी संस्कृतीच्या माध्यमातून, कुणी राजकीय माध्यमातून अखंड आपल्यावरती अक्रमाणेच होत आलेली आहेत.
तुकोबाराय एका अभंगात बोलतात
"त्या पाण्यात राहणारी आणि पाण्यात काय असतील ते कण खाऊन जगणारी जिचा पाण्यातच जन्म आणि पाण्यातच मरण अशी निरपराध बारकी मासोळी तिने काय कुणाचे वाईट केले आहे बरे पण त्या माश्यांना हे कोळी पकडतात आणि खातात. ती हरणे तृणांकुरावरती जगतात, कुणाला मारत नाहीत अतिशय भित्री जात पण त्या हरणांचा व्याध नाश करतात, कातडी सोलतात, मांस खातात तसेच गावातील काही बदमाश माणसे संतांना सज्जनांना तरही भगवान करून सोडतात पण तुकाराम महाराजांनी याचे उत्तर जेवढे चांगले दिले आहे तेवढे कुणालाच जमलेले नाही ते म्हणतात, "हे तर जन्मजात वैर आहे"
तसेच आपले आहे. या ७४ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केले आपण काय काय केलं ? ७५वे चीन ने आपल्यावर आक्रमण केले २० ऑक्टोबर १९६२ ला. पण आपण काय केले? त्यांच्या वाळल्या पाचोळ्यावर तरी कधी पाय दिला ? वाकड्या नजरेने तरी कधी बघितलं का? अरे ! आपला कोणता अपराध ? काय चूक? यात गोष्ट अशी कि दुर्बलांच्या नशिबी जे येते तेच आजवर तुमच्या आमच्या नशिबी आलेले आहे. ससा म्हणून जे जगातील त्यांना कुत्री फाडून खाणारच. मासे आहेत त्यांना कोळी मारणार. हरणे आहेत त्यांना व्याध मारणार म्हणून जगायचे असेल तर सिंह म्हणून जगा. शिवाजी महाराज संभाजी महाराज या पितापुत्रांनी ते केले बघा ! आपली गुणवत्ता इतकी मोठी कि आपले गुणच दोषात रुपांतर झाल्यासारखे झालेले आहेत आणि आपण भक्ष बनलो त्याला काय इलाज.
गोष्ट अशी कि, शक, कुशाण, हूण, तार्तर, बलुची, अफगाणी, खिलजी, तुघलक, लोधी, सूर, पठाण, मोगल, डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, चीन इत्यादी आक्रमक. अरे ! खाली एवढीशी लंका त्यांनी आपली काही बेटे लाटलीत २५ वर्षांपूर्वी पण आपण काहीच करू शकलो नाहीआझु आपल्यावर आक्रमणे होतात पण मन मेले कि आक्रमण झालेले कळत हि नाही
कल्पना करा कोट्यावधीचा देश आपल्या भूमितून येणारी माणसे इतकी वांझ आहेत का ? कि त्यांच्यावर राज्य करणारी माणसे दुसय्रा देशातून यावीत यासारखी शरमेची गोष्ट नाही पण बुद्धी मारली गेल्यानंतर बाकीचे काही सुचत नाही पण या सगळ्यासाठी हिंदूंचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे आणि तो आजही कायम आहे यात बदल केल्याशिवाय १५ ऑगस्ट १९४७ सुरक्षित राहणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो," पृथ्वीराज नावाचा चौहानांच्या कुळामध्ये जन्मलेला एक अतिशय उदात्त अतिशय कर्तुत्ववान, बुद्धिमान, हिम्मतवान, पराक्रमी, लढाऊ, नेतृत्वाचे गुण असलेला संन्यस्त वृत्तीचा राजा होता त्याच्या वरती मुहम्मद घोरी ने एकूण फक्त १३ वेळा चाल केली. हा मुहम्मद घोरी कोण? तो अरबस्थानातला. काय केले आपण म्हणून तो आला? तर त्यांची ती वृत्ती आहे. पहिल्या १२ वेळा आला त्याच्यात ८ वेळा त्याला पराभूत होऊन पळून जावे लागले आणि ४ वेळा आपण त्याला जिवंत पकडला. कल्पना करा म्हणजे त्या पृथ्विराजाचे बळ त्याचे सैन्य, त्याचे नेतृत्व, त्याची हिम्मत किती विलक्षण आहे पण तो ८ वेळा हल्ला करून आला पण पृथ्विराजाच्या मनात असे आले नाही कि, " हा किडका साप. मी च्या बापाच्या बापाचं, बापाच्या बापाचं काय वाईट केले आहे पण हा का येतोय अंगावरती? अरे! याला संपवला पाहिजे. ज्या वारुळातून हा साप येतोय ते वारूळ जाळून उध्वस्त केले पाहिजे असे त्याच्या हिंदू अंतःकारणात आले नाही. ४ वेळ त्याला आपण जिवंत पकडला त्या सज्जन गडावरती राहणारा गोसावी रामदास स्वामी त्यांच्या एक श्लोक आहे
|| कुठेही दिसो साप ठेचुनी मारावा, मनी अन्य चर्चेस द्यावा न थारा | विषाचे विना कोणता सर्प आहे , वरुनी कसे पाहुनी ओळखावे ||
पण हिंदू अंतःकरण त्याला आपण सोडून दिले आजही विमान अपहरण झाले तेव्हा असेच किडके साप जसवंत सिंगांनी लग्न हून माहेरी आलेल्या मुलीला परत सासरी सन्मानाने धाडावे तसे त्या सापांना सोडले. हिंदूंचा स्वभावच बनला आहे कि पडते घ्यायचे, नमते घ्यायचे शरण जायचे आणि जिवंत राहायचा पराक्रम करायचा असा नासका प्रवाह आहे आपला त्या पृथ्विराजालाही वाटले नाही कि कुठेही दिसो साप ठेचुनी मारा
तो घोरी तेराव्यांदा आला तेव्हा जयचंद राठोड दिल्ली चे राज्य मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावाविरुद्ध त्याला जाऊन मिळाला. पृथ्वीराज पराभूत झाला आणि त्याला मृत्युदंड दिला नंतर त्यांनी ते पृथ्विराजाचे पार्सल तिकडे त्यांच्या देशात नेलं. त्याचे डोळे काढले तुकडे तुकडे केले शरीराचे. कारण घोरीला माहित होते || कुठेही दिसो साप ठेचुनी मारा || आणि आपण त्याला १२ वेळा सोडला मोठ्या मनाने; पण १३ व्यांदा आला आणि तुमची माती केली आणि त्या वेळेपासून दिल्लीच्या तख्तावरील आपले निशाण गेले आहे ते पुनरपी कधी आजतागायत आलेले नाही आहे. पृथ्वीराजजी मारले गेले पण नंतर त्यांच्या कुळातील त्यांचा मुलगा, नातू, पणतू कुणालाही वाटले नाही कि याचा सूड घेतला पाहिजे आपण याला मातीत मिळवले पाहिजे पण पुढे सगळे कसे शांत शांत राहिले. पण फक्त महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास त्याला अपवाद आहे अरे ! हे ७४ देश आपल्यावर का चालून आले? चीन का चालून आला? तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. आपले युद्ध झाले पाकिस्तानशी बांगलादेशसाठी १९७१ ला तर १५ ऑगस्ट १९४७ ते १६ डिसेंबर १९७१ पर्यंत २४९ वेळा पाकिस्तान ने आपल्यावर आक्रमण केले पण त्याचे कधी आपण उत्तर दिलेले नाही
आजही सीमेवर हेच चालू आहे पण याच्या वार्ता देत नाहीत गाळून टाकल्या जातात त्या. आपण याच्या विचार केला पाहिजे कि आपण इतिहासातून काय शिकलो? हे जर टिकवायचे असेल तर आपण आपल्या मनोवृत्तीत बदल केला पाहिजे
इ.सं.१००० ते इ.सं. १०३० या दरम्यानचा आपला इतिहास काय आहे हो ! तर या ३० वर्षात महम्मद गझली आपल्यावर १७ वेळा चालू आला. आणि काय केले तर कत्तल रक्तपात जाळपोळ. आजही पहा मुंबई वरील हल्ल्यात २०७ जण मारले गेले तर दुसय्रा दिवशी वर्तमान पत्रात बातमी का आली तर मुंबई सावरली, जनजीवन पूर्ववत. तुम्ही प्रेतागरात जावा कुठल्याही दवाखान्यातल्या तेथिल प्रेतांमध्ये कधी वाद होत नाहीत कधी भांडणे नाहीत. तसाच कोणी कुणाला चिमटा काढताना दिसत नाही कुणाला राग येत नाही सगळे कसे शांत निवांत असते तसाच हा आपला ११३ कोटी मन मेलेल्या लोकांचा देश आहे म्हणून आम्ही या हल्ल्या नंतर केले काय ? तर फक्त मेणबत्त्या नेवून लावल्या कारण गांडूळ कधी फणा काढत नसतं. कसे आपले स्वातंत्र्य चिरायू राहील काही कळत नाही कारण आपल्या इथे 'सुशिक्षित' नावाचा G A N D U गोत्रातला समाज गेली ६२ वर्षे स्वातंत्र्य भोगतोय.
हे जर बदलायचे असेल तर शिवाजी संभाजी मंत्राशिवाय आपल्याला पर्याय नाही.
म्हणून आपले हे चिंतन जात धर्म पंथ, संप्रदाय भाषा याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र टिकवण्यासाठी उपयोगी पडणार आहे ...
-संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश
(हा लेख प्रत्येक सच्च्या राष्ट्रप्रेम्याच्या ब्लॊगवर, संकेतस्थळावर, मुखपृष्ठावर,सोशल नेटवर्क वर असावाच असावा)
http://shrishivpratishthan.com/
www.dasbodh.com
प्रतिक्रिया
23 Apr 2013 - 6:38 pm | विकास
क्लिंटन देखील मुळात भारतीयच नाव आहे. ;)
23 Apr 2013 - 6:47 pm | तिमा
क्लिंटन = कली नर्तन.
जेंव्हा हे कलियुग संपेल तेंव्हा कली नर्तन सुरु होईल .. इत्यादि इत्यादि.
23 Apr 2013 - 6:51 pm | क्लिंटन
म्हणजे कलीयुग संपले म्हणायचे का? :)
23 Apr 2013 - 6:56 pm | विकास
माझ्या डोळ्यासमोर कली-नर्तन येत आहे. एखादा व्हिडीओ टाका की क्लिंटन साहेब. ;)
23 Apr 2013 - 7:02 pm | क्लिंटन
छे हो. Kali या नावाने व्हिडिओ सर्च केल्यावर एकतर कश्मीर की कली येत आहे नाहीतर कालीदेवीची स्तोत्रे :)
23 Apr 2013 - 7:14 pm | परिकथेतील राजकुमार
भयानक चुकीची माहिती पसरवली जात आहे.
क्लिंटन ह्या शब्दाचे मूळ Kelantan ह्या शब्दात आहे. Kelantan म्हणजे "Land of Lightning".
23 Apr 2013 - 7:23 pm | क्लिंटन
Land of Lightning म्हणजे विद्युल्लताभूमी का? एक सुधारणा:आमच्या घराण्याचे मूळ चीनमध्ये नाही तर ते आहे अमेरिकेतील अर्कान्सॉ राज्यातील होप या शहरात. आणि हे आमच्या पूर्वजांचे घर :)
23 Apr 2013 - 7:30 pm | परिकथेतील राजकुमार
ते हिरव्या रंगावरुन लक्षात येते आहेच.
27 Apr 2013 - 11:54 am | चिगो
क्लांत तन -> क्लांत्तन -> क्लांटन -> क्लिंटन अशी व्युत्पत्ती आहे म्हणे ती.. प्रसिद्ध क्लिंटनांनी "तन क्लांत" कसे करावे ह्याची बरीच प्रात्यक्षिके केलीत पांढर्या घरात, त्यामागे नावाला जागण्याचा एवढाच उद्देश होता म्हणे त्यांचा.. :-)
27 Apr 2013 - 2:28 pm | बॅटमॅन
खल्लास व्युत्पत्ती!!!
28 Apr 2013 - 8:12 pm | क्लिंटन
आवडले :)
23 Apr 2013 - 7:07 pm | नितिन थत्ते
अरे हॅट...
रोम आणि व्हॅटिकन म्हणजे रामाची वाटिका.
23 Apr 2013 - 7:26 pm | वेताळ
सोनिया बाई पण हिंदुच आहेत कि? त्याच्या नेतृत्वाला मग विरोध का?
23 Apr 2013 - 7:33 pm | क्लिंटन
आपले मूळ विसरलेले लोक लय "डेंजरस" असतात बघा.इटली हा हिंदू संस्कृतीचाच भाग होता.पण ते लोक आपली मूळची ओळख विसरले आणि आपल्याच मूळावर उठले बघा.मग अशांना विरोध करायला नको का?
24 Apr 2013 - 9:36 am | इरसाल
सगळं वाचुन आता लक्षात येतेय की येशुने स्वतःहुन आधी एका हाताला होल पाडले मग त्या हाताने आपल्या उरलेल्या हाता-पायाला खिळे ठोकुन घेतले नंतर मग आधीच होल पाडलेला हात उरलेल्या खिळ्यात अडकवुन घेतला.
23 Apr 2013 - 7:35 pm | आदिजोशी
भारतीय संस्कृती बद्दल लिखाण आले की इथल्या बुद्धीवादी जनतेला जणू स्फुरण चढते. तलवार घेऊन सगळे तुटून पडतात नी जो काही हल्ला चढवतात की यंव रे यंव. सगळे एकजात टिकोजीराव. स्वतःचं भारतीय संस्कॄतीला आणि देशाला खरंखुरं योगदान नगण्य अथवा शुन्य असलं तरी फरक पडत नाही.
पण इतकं सगळं वाचून तुमच्यातल्या एकाने तरी त्यावर अभ्यास केला का? एकाने तरी आपले वेद वाचून त्यातलं ज्ञान रिलेव्हंट करायच्या प्रयत्न केला का? उत्तर - नाही. कारण त्यासाठी बुद्धी लागते. बुद्धीवादी असल्याचा आव आणणं सोपं आहे.
अभिमानाने छाती आता फुगत नसली तरी इतिहास खोटा ठरत नाही.
समजा आजचा दिनांक किती ? १ मे २०१० . तर १ मे ८०१० ला, १००१० ला, १४०१० ला, म्हणजे १२००० वर्षांनंतर हि एखादे सूर्य ग्रहण असेल तर त्याचा स्पर्श काळ कोणचा?, ते खग्रास कि खंडग्रास? मोक्ष काळ कोणचा? ते आत्ता आपण सांगू शकतो. हे समोर ठेवले तर तुम्हाला हजारो वर्षांच्या तिथ्या, ग्रहणे सगळेसगळे तुम्हाला स्पष्ट कळते. हे किती सुक्ष्म आहे? तर सेकंदाचा हजारावा हिस्सा मोजणारी आपली कालमापन पद्धती आहे.
कसलं जबरदस्त गणित आहे हे. ह्या आणी असल्या ज्ञानाचा प्रॅक्टीकल वापर करायला शिकुया की.
सोपे उदाहरण: तिथीवरून भरती-ओहोटीच्या वेळा अचूक सांगता येतात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करता येऊ शकतो.
अजून एकः संस्कॄत ही काँप्युटर प्रोग्रॅमींगसाठी सर्वात भाषा आहे असे वाचले होते. त्यावर आय.आय.टी. मधे संशोधनही सुरु आहे. त्या टीम मधले एक सदस्य चांगल्या परिचयाचे आहेत त्यामुळे माहिती खात्रीची आहे. आय.आय.टी. मधल्याच अजून एका प्राध्यापकाने ह्याला दुजोरा दिला आहे.
असं काही तरी काम करा की. इथे वांझोट्या चर्चा आणि आपल्याच संस्कॄतीची थट्टा करण्यासाठी अक्कल नाही लागत. लायकी फक्त सिद्ध होते.
23 Apr 2013 - 7:47 pm | क्लिंटन
बस.तुम्हाला कारण समजले की.
याविषयावर मिपावरच इथे यापूर्वीच चर्चा झाली आहे.आणि एक गोष्ट समजत नाही.त्या सी,जावा की सुमात्रा या भाषा असतात त्यांच्यासाठी संस्कृत ही सर्वात योग्य भाषा आहे म्हणजे नक्की काय आणि कुठच्या पातळीला संस्कृत भाषा प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य आहे?सिन्टॅक्ससाठी की कंपायलरसाठी?शेवटी काहीही असले तरी संगणक ते बायनरीमध्येच बदलणार मग संस्कृत काय आणि अरबी काय आणि इंग्रजी काय!!
अहो आय.आय.टी चे काय घेऊन बसला आहात?नासामध्येही त्यावर संशोधन सुरू आहे.
काय बोलता राव. वरच म्हणालात ना की अशी चर्चा करत असलेल्यांना बुध्दी नाही म्हणून!! मग सरड्याची धाव कुंपणापर्यंत या न्यायाने आमच्या अकलेची झेप जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंतच आमची मजल जाणार.काय करणार. इतर कसलेही सोंग आणता आले तरी अकलेचे सोंग आणता येत नाही हो.
23 Apr 2013 - 7:47 pm | बॅटमॅन
इतिहास खराच आहे, पण भारतीय संस्कृतीचे तथाकथित अभिमानी तर सर्वांत पोकळ असतात. खरा इतिहास जाणून न घेता नुसतीच छाती फुगवत बसतात.
भारतीय पंचांग आणि गणितावर सीरिअस काम प्रचंड झालेले आहे. डेव्हिड पिंग्री, किम प्लोफ्कर, आर एस शर्मा, शं.बा. दीक्षित, इ. लोकांनी त्याचे डीटेल विश्लेषण केलेले आहे. त्याच्या मर्यादाही सांगितल्या आहेत. आणि पंचांग वगैरे तर अजून चालतेच की.
संस्कृत आणि प्रोग्रॅमिंगचा काही संबंध नाही. पाणिनीने संस्कृत व्याकरणात वापरलेल्या काही विश्लेषणपद्धती या कंपायलर कन्स्ट्रक्शनमधल्या काही ठिकाणी खूप उपयोगी पडतात हेच आणि इतकेच त्यातले सत्य आहे. ती विश्लेषणपद्धती संस्कृत व्याकरणाला लावली गेल्यामुळे लोकांना वाटते की संस्कृत भाषा लै भारी आहे. क्रेडिट संस्कृत भाषेला नसून पाणिनीला आणि त्या विश्लेषणपद्धतीला आहे. उद्या तीच पद्धत तमिळ व्याकरणासंबंधी वापरलेली असती तर लोक संस्कृतऐवजी तमिळ भाषा प्रोग्रॅमिंगसाठी भारी म्हणाले असते.
आपल्याच संस्कृतीचा आंधळा अभिमान बाळगण्याने जितके नुकसान होते तितके नुकसान अजून कशानेही होत नाही. त्यानेही अर्थातच लायकी सिद्ध होते. काम करण्याची जबाबदारी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्यांचीही तितकीच नव्हे काय? आंधळ्या अभिमान्यांपैकी कितीजण काहीतरी काम करतात तेही सांगावे. म्हणजे काय ते पाहताही येईल.
23 Apr 2013 - 7:57 pm | अग्निकोल्हा
इथल्या वांझोट्या चर्चा वाचुन टिकात्मक उपदेश सोडुन आपण काय काम केलेत ? भविष्यासाठी झोंम्बी मारायचं ऑटोमॅटीक मशिन तयार केलत की भुतकाळामधे क्राऊंचिग टायगर हिडन ड्रॅगन चित्रपटाचा शेवट समजुन घेतलात ?
24 Apr 2013 - 10:42 am | बाळ सप्रे
अजिबात नाही.. स्फुरण चढते ते पोकळ अभिमान दिसला की. सर्व प्रतिक्रियांमध्ये पोकळपणावर व्यवस्थित बोट ठेवले आहे. एकाही मुद्द्याला धागाकर्ते/तुम्ही/आशु जोग वगैरे मंडळींनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही.
भारतीय संस्कृतीचा अभिमान योग्य तेथे असावा जो सारासार विचार करणार्यांना नक्कीच असतो.. भारतीय संस्कृतीचा ठेका घेतल्याचा आव आणणार्या अशा लोकांमुळेच भारतीय संस्कृती हा अशा काथ्याकूटात थट्टेचा विषय होतो हे दुर्दैव!
5 May 2013 - 5:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही करा संशोधन आणि घाला सगळ्यांचे दात घशात. तुमच्याकडे असेलच ना बुद्धी, तिचा फायदा होऊ द्या की सगळ्यांना.
मी ही आवई अनेक वर्षे ऐकतो आहे. संगणक शास्त्रातले ५ वर्षांचे शिक्षण आणि ९ वर्षे काम करूनही हे नक्की कसे होते याचा मला उलगडा झाला नाही. त्या टीम मधल्या कुणाला ओळखता म्हणता तर त्यांचा काही संपर्क असेल तर व्यनि कराल का?? माझे जिज्ञासा शमवून घेईन म्हणतो.
23 Apr 2013 - 8:02 pm | आदिजोशी
झाली सुरूवात.
23 Apr 2013 - 8:05 pm | पैसा
धन्यवाद! :D
23 Apr 2013 - 9:04 pm | प्यारे१
लोहा गरम है, मार दो हथोडा|
-प्यारे ठाकूर
23 Apr 2013 - 8:53 pm | वेल्लाभट
सद्यस्थिती विचारता?
गटार !
23 Apr 2013 - 10:00 pm | श्रीरंग_जोशी
पेरू देशही भारताच भाग असावा कधी काळी, नाही का? ;-).
23 Apr 2013 - 11:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चिले नाही का?
वास्तविक मिरची भारतात (सध्या भारत किंवा इंडिया हा देश जेवढा समजला जातो तिथे) त्या दक्षिण अमेरिकेतूनच पोर्तुगीजांकरवी आली.
आणि मद-अगासकर, आलास्का (तिथे भरपूर तेल आहे. मिळालं तर उत्तमच) आणि इंग्लंड, स्कॉटलंड, नेदरलंड, फिनलंड ... हे पण!
23 Apr 2013 - 11:22 pm | श्रीरंग_जोशी
बरोबर आहे, हे सर्वच एकेकाळी भारताचा हिस्सा होते :-)
24 Apr 2013 - 11:07 am | आदूबाळ
चुकतीय तुमची व्युत्पत्ती. "चिले" हे नाव एका प्रसिद्ध महाराजांवरून त्या देशाला ठेवण्यात आलं होतं...
25 Apr 2013 - 12:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या नावातच बाळ हा शब्द आहे, तस्मात तुम्ही म्हणताय ते खरंच असणार.
पण हा जोक वरून गेला. प्लीज नवनीत गाईड द्या.
26 Apr 2013 - 10:37 pm | आदूबाळ
हे घ्या नवनीत गाईड
23 Apr 2013 - 10:52 pm | आशु जोग
> भारतीय संस्कृती बद्दल लिखाण आले की इथल्या बुद्धीवादी जनतेला जणू स्फुरण चढते
आदिजोशी यांनी स्वघोषित पुरोगामींना चांगला फटकार मारला आहे.
त्यातही सतीप्रथा, अस्पृश्यता, विषमता इ. विषय आले की काही आडनावे
हीच ती प्रायश्चित्त घेण्याची वेळ असे समजून या गोष्टींवर तूटून पडतात
आणि आपला पुरोगामित्वाचा कोटा पूरा करतात.
पण
खोट्याचा आवाज मोठा हेच खरे.
मग तो खोटेपणा आंबेडकरजयंती वा तत्सम विषयांवर उघडा पडतो.
23 Apr 2013 - 11:18 pm | प्यारे१
>>>आदिजोशी यांनी स्वघोषित पुरोगामींना चांगला फटकार मारला आहे.
आदिजोशी आमचे हुंकार आहेत, आमचा अभिमान आहेत, आमचे.... जौ दे!
24 Apr 2013 - 8:20 am | नितिन थत्ते
अॅडीभौंचा प्रतिसाद सटली उपरोधिक होता असा संशय आहे.
24 Apr 2013 - 5:26 am | मराठे
ह्या श्लोकात हिमलयापसून समुद्रापर्यंत त्रिज्या घ्या, मग त्याचा वर्तुळ काढा वगैरे कुठे आहे? माझं संस्कृत आणी भूगोल दोन्ही कच्चं आहे. त्यामुळे मूळ लेख वाचताना मी अजूनही इथेच अडकलोय.
दुसरं म्हणजे भलेही व्युत्पत्तीशास्त्राचा (काडीचा का होईना) आधार घेऊन जरी असं सिद्ध केलं की ह्या सगळ्या देशांना संस्कृत (सदृष्य) नावं असली तरी त्यामुळे ते सगळे भारताचा भाग आहेत असं कुठे म्हटलं आहे?
रच्याकने: इथे असलेले भूभाग सांभाळण्याचे वांदे झालेले असताना 'कोणे एके काळी भारत (किंवा हिंदूस्थान म्हणूया हवं तर) एवढा मोठा होता' यासारख्या वाक्यांनी काय स्फुर्ती मिळणार.. फारफारतर थोडं डिप्रेशन येईल.
24 Apr 2013 - 10:10 am | अरुण मनोहर
24 Apr 2013 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजच चीननं दहा किलोमिटरपर्यंत घुसखोरी केल्याची बातमी वाचण्यात आली.
-दिलीप बिरुटे
(भारताचा भूभाग असा थोडा थोडा चाललेला पाहून डिप्रेशन मधे चाललेला)
24 Apr 2013 - 5:16 pm | प्रसाद१९७१
भारतीय जनता आणि राजकारणी बघितल्यावर माझी शेवटची आशा चीन च आहे.
सर्व भारत कधी ताब्यात घेतायत त्याचीच वाट बघतोय. म्हणजे मुंबई ची शांघाय होईल.
24 Apr 2013 - 11:58 am | मन१
बहुतेक धागाकर्ते भलतेच चतुर असावेत. त्यांना ज्या विषयाची टर उडवायची आहे, खिल्ली उडवायची आहे त्यावर पब्लिकला अल्लाद चाबी मारुन ते मस्त मजा पहात बसलेले दिसतात. प्रतिसादक तावातावाने खरडताहेत.
पूर्वी जामोप्या हे सभासदही असेच करीत. पब्लिक तुटून पडेल असे विषय मुद्दाम उकरून काढून, पिन मारुन ते मौज पहात बसत.
24 Apr 2013 - 4:51 pm | विकास
इंटरेस्टींग...
24 Apr 2013 - 8:43 pm | चावटमेला
ओहम (कुणीतरी सिम्बॉल टाका रे) हा ओम चा अपभ्रंश आहे आणि डिनो मोरिया चा उगम दिनेश मोरे मधून झाला आहे अशी आमची ठाम धारणा आहे.
24 Apr 2013 - 9:23 pm | आदूबाळ
टेनिसजगतावर राज्य करणार्या आनंदराव आगाशे यांना विसरू नका
24 Apr 2013 - 9:28 pm | श्रीरंग_जोशी
नक्कीच नाही विसरणार...
बाकी कॅरेबियन बेटांवर तर खरोखरची भारतीय नावे / आडनावे आहेतच.
24 Apr 2013 - 9:32 pm | प्यारे१
चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेले नील आर्मस्ट्राँग हे अमेरिकेत ओबीसी चळवळ सुरु करुन द्राक्षोत्सव देखील सुरु करणार होते.
त्यांना अमेरिकाबैल वेळेत मिळाला नाही.
26 Apr 2013 - 8:01 pm | अमोल खरे
अफाट. =))
27 Apr 2013 - 11:44 am | चावटमेला
हो. आणि देशाविदेशांतील बालमनांवर राज्य करणार्या हरी पाटकरांना सुद्धा..
26 Apr 2013 - 12:23 pm | आशु जोग
> इंग्लंड, स्कॉटलंड, नेदरलंड, फिनलंड ... हे पण!
ते कसं काय !
26 Apr 2013 - 12:36 pm | बॅटमॅन
याला उत्तर द्यायचं तर जरा मोठे निबंध लिहिले पाहिजेत. तूर्त यांच्या नावातील प्रत्यय हा अस्सल भारतीय आहे याची नोंद घेणे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अतिरेकामुळे देशालाही तो प्रत्यय लावला गेला. ते लोक मातृभूमी न म्हणता पितृभूमी म्हणतात, त्यावरून हे सिद्धच होते की तिकडे पुरुषप्रधान संस्कृतीचा अतिरेक आहे.
26 Apr 2013 - 8:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
याबद्दल अजिबात वाद नाहीत.
पण डॉईशलंड वगळता अन्य देशांच्या बाबतीत संस्कृती आणि चालीरीतींचा अधिक अभ्यास करावा लागेल. सुप्रसिद्ध विचारजंती संशोधक श्री. रिचर्डसेठ लाँग यांच्यामते हा कॅथलिक स्त्रियांच्या धर्मविरोधी बंडखोरीचा परिपाक आहे. जगप्रसिद्ध संशोधक श्री. डॉ. वल्गुद गॉथमकर यांनी कृपया सर्व बाजूंनी विचार करावा अशी विनंती.
27 Apr 2013 - 12:36 am | बॅटमॅन
इंग्लंड बाबतीत तरी आजिबात अभ्यासाची गरज नाही. त्यांनी इंगा तसाही दाखवलेला आहेच =)) =))
3 May 2013 - 10:28 pm | आशु जोग
जरा खोलून सांगा ना !
3 May 2013 - 10:35 pm | बॅटमॅन
नंतर कधीतरी. यात अख्खा धागा निघू शकेल.
27 Apr 2013 - 10:48 am | अमोल केळकर
मस्त मस्त.
सांगलीकर पटवर्धन संस्थानचा गणपती आणि संभाजीराव भिडे या दैवतांना कधीच विसरणार नाही
( सांगलीकर ) अमोल केळकर