बरसाली..
इटारसी नागपूर मार्गावरील एक लहानसं स्थानक. या स्थानकाला मुंबै-दिल्लीची ऐट नाही की तसा बडेजाव नाही. परंतु येथील विलक्षण निवांतपणा आणि अगदी नीरव शांतता मन मोहून टाकते..
सभोवताली अगदी भरपूर, नजर जाईस्तोवर हिरवागार झाडझरोरा.. झाडं अगदी फलाटावर आलेली. किंबहुना, झाडीतूनच थोडी साफसफाई करून स्थानक उभारलं आहे असं म्हणूया..
दिवसाकाठी एखाद-दुसरी पाशिंजर थांबेल तेवढीच काय ती जाग.. एरवी अगदी निसर्गरम्य नीरव शांतता..
एफ वाय-एस वाय, किंवा फार तर टी वाय चं वय असावं.. वर्गातल्याच एखादीशी नुकतंच सूत जमलेलं असावं..आणि दोघांनी उन्हं उतरल्यावर हळूच येथे यावं.. फलाटावरच एखाद्या झाडाखाली निवांत बसावं..थोडंसं रुसव्याफुगव्याचं तर थोडंसं गुलुगुलू बोलावं..
"गाणं म्हण ना एखादं.. "
त्याने थोडा आग्रह करावा.. तिनं लाजेनं थोडं चूर व्हावं, थोडं गोरंमोरं व्हावं आणि मग 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' हे गाणं म्हणावं..
तीन सांजा होऊन अंधारू लागावं आणि मग दोघांनी पुन्हा उद्या भेटण्याच्या आणाभाका घेऊन निघावं.. जाताना स्टेशन मास्तरवजा तिकिट कलेक्टराकडून थोडं कौतुकवजा दटावूनही घ्यावं... : )
अजून साला त्या वयात काय पायजेल..?!
-- तात्या..
सॉरी,
--शेखर अभ्यंकर,
एफ वाय बीकॉम. : )
प्रतिक्रिया
22 Apr 2013 - 4:12 pm | मन१
गुड वन....
लिहित रहा तात्या.
22 Apr 2013 - 4:13 pm | नीलकांत
तात्या बॅक इन फॉर्म म्हणावे का?
22 Apr 2013 - 4:52 pm | धमाल मुलगा
तात्यानुं, नोष्टॅल्जिक नोष्टॅल्जिक एकदम? हं? :)
22 Apr 2013 - 4:57 pm | शुचि
खी: खी: शेवटची सही आवडली.
कथन मस्तच.
22 Apr 2013 - 5:03 pm | प्यारे१
तरंगणारं वय!
मस्तच.
22 Apr 2013 - 5:13 pm | निनाद मुक्काम प...
आपल्याला बुआ एकदम हे गाणेच ऐकावेसे वाटले हा लेख वाचून
22 Apr 2013 - 5:55 pm | कोमल
+१*११११११११११११
22 Apr 2013 - 5:18 pm | रुमानी
अजून साला त्या वयात काय पायजेल..?!
मस्तच की
22 Apr 2013 - 5:38 pm | पैसा
त्या वयात पोचवलंत की आम्हाला!
22 Apr 2013 - 5:41 pm | बॅटमॅन
फटू बघून मिरज-धारवाड प्रवासातील लोंढा, अळणावर, मुगद ही स्टेशने आठवली. अगदी अस्साच फील!
22 Apr 2013 - 5:54 pm | कोमल
लै भारी ठिकाण.. आणि लेखन पण..
टी.ई.-बी.ई. च्या आठ्वणी जाग्या झाल्या.. ;)
22 Apr 2013 - 6:00 pm | प्रचेतस
आवडलं.
22 Apr 2013 - 6:22 pm | हरिप्रिया_
:) मस्त..
अशीच निवांत स्टेशन आठवली..
कधीतरी सगळी काम सोडून खरच जाउन बसायला आवडेल :)
(तुम्ही म्हणता त्या वयात पण परत जायला जमल तर बेस्टच ;) )
22 Apr 2013 - 6:38 pm | मी-सौरभ
तात्या जियो!!
22 Apr 2013 - 10:04 pm | मुक्त विहारि
त्या काळावर छान "रोशनी" टाकलीत,,
22 Apr 2013 - 10:10 pm | सुहास झेले
मस्त.... :) :)
22 Apr 2013 - 10:37 pm | अर्धवटराव
आमच्या वेळी हे असं नव्हतं.
अवांतरः अरे तात्या... तुझं पुर्वाश्रमीचं (शब्द मुद्दाम वापरला आहे) नाव शेखर आहे होय... मला उत्सुकता होती :) मित्रा... भूतकालीन वसंत बहारची चाहुल लागतेय... आता लेखणी थांबवु नकोस हि विनंती.
(बालमंदीरातला) अर्धवटराव
23 Apr 2013 - 1:44 am | उपास
तात्या, शंभर शब्दांची मर्यादा घातलेयस का? येउंदे फर्मास अजून..
सालं इंजिनिअरींगच्या नादात आम्हाला मुंबईच्या बाहेर पडायचा चानस भेटला नाही.. त्यामुळे हेवाच वाटतो असं वाचलं की ;)
23 Apr 2013 - 2:11 am | श्रीरंग_जोशी
या स्थानकाचं वर्णन वाचून राज कपूरच्या दिवाना चित्रपटातलं टूमदार रेल्वे स्थानक डोळ्यासमोर उभं राहिलं.
वाह तात्या, दिल खूष कर दियां!!
23 Apr 2013 - 4:54 am | स्पंदना
मला आता या पत्त्याचा काही उपयोग नाही, पण पोरांना दाखवुन ठेवते.
सार्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी हिरवळ येतेच, त्यासाठी हिरव्या रंगात रंगलेले हे स्थान कधीही सुरेखच.
तात्या मस्तु!
25 Apr 2013 - 10:13 am | पांथस्थ
तात्या,
बर्याच दिवसांनी तुमचे नविन लेखन वाचायला मिळाले. तुम्ही परत लिहिते होता आहात हे बघुन आनंद झाला.
अपर्णातै,
क्या बात है!
23 Apr 2013 - 7:16 am | निमिष ध.
तात्यानु अरे काळजात कळ आली बघ. कसले जीवघेणे वर्णन केलेस.
लिहिता रहा!
23 Apr 2013 - 1:16 pm | तिमा
तात्या,
वर्णन आवडले पण फारच त्रोटक वाटले. फोटो बघून 'ही वाट दूर जाते' हे गाणं आठवलं.
23 Apr 2013 - 1:27 pm | ऋषिकेश
आवडले.. पण अजून लिहिले असते तर अधिक आवडले असते
23 Apr 2013 - 2:20 pm | अग्निकोल्हा
अजून साला त्या वयात काय पायजेल..?
खल्लास. लेखाचा न्हवे मनाचा शेवट झाला... काही बोलायला उरलच नाही :) थोडं भान आलं अन शब्द आपसुकत मनावर उमटले... ते वयच खरं तर अजुन (पुन्हा एकदा) पाहिजे.
24 Apr 2013 - 11:20 am | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे आभार.. :)
25 Apr 2013 - 10:36 am | मी_आहे_ना
तात्या, मस्त एकदम! पण "अजून साला त्या वयात काय पायजेल..?" असं आत्ता वाटतं हो... :)
25 Apr 2013 - 10:51 am | jaypal
३/४ दा शोभा घुर्टुंना ऐकतोय
25 Apr 2013 - 12:14 pm | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे मनापासून आभार.. :)
25 Apr 2013 - 1:45 pm | चौकटराजा
शेखरभाउ, तुझी ती गायची ओळ व माझी शेंम टू शिएम कशी काय भौ ? तिन्ही सांजा ...पर्वतीचा उतार....नाद जसा वेणूत.....मग शेवट..साक्षी ऐसे अमर करूनी .....त्याच दिवशी ..रादर त्याच संध्येला गायलेले....
झूला धनकका धीरे धीरे हम झूले
अंबर तो क्या है तारोंके भी लब चूमे
मस्तीमे झूमे और सभी गम भूले
पीछे ही मुडते मुडते निगाहे.....आ ...जा चल दे कही दूर.
फरक एवढाच की तिच्या हातात एंगेजमेंट रिंग होती (मीच दिलेली बरं )
25 Apr 2013 - 2:20 pm | निरन्जन वहालेकर
क्या बात है तात्या ! ! !
अजून साला त्या वयात काय पायजेल..?!
खरच
25 Apr 2013 - 4:41 pm | तुमचा अभिषेक
फोटो मस्तच आलाय..
कोकण रेल्वेवर देखील अशीच मनमोहक स्थानके.. असाच उल्हासित करून जाणारा रेल्वेट्रॅक आहे.. कधीतरी चैन खेचून खास फोटोसाठी उतरावे..
29 Apr 2013 - 11:49 am | माजगावकर
बास बास..! मस्त फोटु आणि छान लेख...
29 Apr 2013 - 2:11 pm | jaypal
काढला आहे का? असल्यास या क्षेत्रातही पारगंत दिसता