-पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश
आज आपला स्वातंत्र्यदिन आहे पण भारतमाता मात्र पूर्ण स्वतंत्र नाही आहे; पण जेवढे स्वतंत्र आहोत त्याचा आनंद आहे पण आपल्या अंतःकरणात दुःख पाहिजे कि सिंधू स्वतंत्र नाहीये, तिबेट आपल्यापासून हरवलेला आहे, नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रम्हदेश गमावलेला आहे, लंका आपली नाही याबाबत थोडा इतिहास सांगतो तुम्हाला
" ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत"
आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या नीचपणाने हिंदुंच्या डोक्यात माती कालवण्यासाठी आपल्यात हे त्यानी भिनवलेले आहे
कि हे साहित्य टाकावू आहे
अरे शस्त्रांनी मारले तर माणसाचे शरीर मरते त्याचे मन मरत नाही ते मन पुनरपी देहाचे वस्त्र पांघरून जन्माला येऊ शकतो. त्या इच्छा, आकांक्षा, भावना, वासना त्या पुनरपी कार्यरत होतात परंतू जर माणसाचे मन मारले तर हत्येचा दोष टळतो आणि तो मन मेलेला हृदय मेलेला जिवंत देहात एक वेगळे जीवन जगायला लागतो, त्याचे वैभव हि नाश करता येते, त्याचे कर्तृत्व संपवता येते, त्याचा जीवन प्रवाह उध्वस्त करता येतो. ज्यांची बुद्धी मारली अशा लोकांचा हा देश आहे आणि मग आपल्याला हिंदुस्थान म्हणायला लाज वाटते
मी जे बोलतोय ते अनभ्यासाने बोलत नी कुणाचे खरकटे खाऊन कुणाचे ऐकून बोलत नाही तर देवाने दिलेल्या अति तीव्र प्रज्ञा चक्षुने अभ्यास करून बोलतोय या कातडीच्या डोळ्याने नाही तर अकलेच्या डोळ्यांनी
देश भक्ती धर्म भक्ती हा ज्या डोळ्यांचा स्वभाव आहे ज्यात समर्पण आणि मातृभूमीसाठी सर्वस्व गमावून टाकायला तयार असणाय्रा डोळ्यांनी अभ्यास करून मी हे बोलतोय
भारत हा शब्दच किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे
"भा" या संस्कृत शब्दाचा अर्थ "तेज" "तेजस्विता" "द्युतीमानता" असा आहे फार सुरेख अर्थ आहे तो जसा भास्कर तो सूर्य
"रत" म्हणजे रममाण झालेला म्हणजे त्या तेजास्वीतेत, त्या द्युतीमानतेत रममाण झालेला देश असा जो तो आपला देश भारत
आज १५ ऑगस्ट अतिशय आनंदाचा दिवस आहे कसे का असेना पण जे काही मिळाले आहे तुटलेला भंगलेला खंगलेला झडलेला राष्ट्र म्हणून जो काही भाग मिळालेला आहे तो भाग अतिशय पवित्र आहे उदात्त आहे श्रेष्ठ आहे वंद्य आहे पूज्य आहे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण जे यात नाही आहे ते आपण मिळवू शिवाजी महाराज अन संभाजी महाराज चित्तात धरले तर बघताबघता मिळवू एक हिंदुस्थान जर समजून घ्यायचा असेल आपल्या देशाची जर जाणीव व्हायची असेल तर त्यासाठी वाङमय आहे त्यात ४ वेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे, रामायण, महाभारत, भगवतगीता, १०८ उपनिषदे आहेत. हे सगळे आपली धरती आपली माती आपली संस्कृती आपली परंपरा आपला धर्म याची जाणीव करून देणारे हे वाङमय आहे पण या सगळ्या वाङमयाचा आणि आपला काहीही संबंध नाही किंबहुना हे टाकावू. गलिच्छ, बेकार असे आपल्या चित्तात शेकडो वर्षे बिंबवले गेले आहे असो
पण हे बदलणार आहोत आपण पुराणे म्हणजे काय आहेत हो! ते हिंदुस्थानच्या इतिहासाचे ग्रंथ आहेत ते काव्यात्मक आहेत रुपकात्मक आहेत पण त्याला कळायला मेंदू बरोबर हृदय असावे लागते देशप्रेम लागते पण हृदय नावाचा जिन्नस आपला झडलेला आहे त्यामुळे काही कळत नाही आपल्याला
जी १८ पुराणे आहेत त्यापैकी पहिले पुरण आहे हे 'विष्णूपुरण' आहे यात ज्यांनी लिहिले त्या माणसाचे नाव नाही आहे तर भगवान विष्णू भगवंत त्याला अर्पण केलेले ते पुराण आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली धरती आपली भारत माता तिचा हा पती आणि त्यांच्या संसारातील लेकरे ते आम्ही हा उदात्त हेतू यात आहे या विष्णू पुराणातला पहिला श्लोक असा
उत्तरम्य समुद्रस्य
हिमाद्रे शैव लक्षणम
वर्षम भारतम नाम
भारतीय यत्र संततिः
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जि भूमी तिचे नाव आहे भारत अन त्या भारतभूमीची संताने ते भारतीय म्हणजे काय आहे हो ? आपले जे सगळे जे पूर्वज आहेत ते कधीही फापट पसारा बोलत नसतं
बीजगणितात काही सूत्रे असतात (अ + ब)२ सारखे असे सूत्र थोडे असते त्याचा विस्तार मोठा असतो तसेच हे सूत्र रुपाने मांडलेले आहे || उत्तरम्य समुद्रस्य हिमाद्रे शैव लक्षणम वर्षम भारतम नाम भारतीय यत्र संततिः||
आपल्या इथे महर्षी सातवडेकर नावाचे ऋषी होऊन गेले. ते १०४ वर्षाचे असताना गेले. त्यांनी आयुष्यात फक्त भारतीय साहित्याचा संस्कृतीचा संवर्धन करणारा इतिहास लिहिला आणि प्रचार केला. ते प्रकांड पंडित होते, विद्वान होते, निस्वार्थी होते. कारण साधारण विद्वान माणसे शक्यतो स्वार्थी असतात पण अग्नीला मळ नाही, विटाळ नाही तसा यांच्या बुद्धीला काही स्वार्थाचा विकाराचा स्पर्श होऊ शकला नाही
असे ते प्रकांड पंडित होते. चारही वेदांच्यावरती ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात टीका लिहिली अशी हि व्यक्ती आहे. पार्डीला गुजरात मध्ये त्यांचा आश्रम आजही आहे त्यांचे वाङमय मी वाचले. त्याच्यात त्यांनी दिलाय या श्लोकाचा अर्थ. कि, तो श्लोक सूत्र रुपाने दिलेला आहे. महर्षी म्हणतात कि, हिमालयाचा मध्य धरून खालती समुद्र पर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत आहे. याचा अर्थ असा कि
ज्याला आपण जपान म्हणतो ना ! त्याचे मुळ नाव आहे 'जयपान'
ज्याला आपण तिबेट म्हणतो ना ! त्याचे मूळ संस्कृत नाव आहे 'त्रिबिष्टम' म्हणजे देवांच्या राहण्याचे वस्तीचे ठिकाण. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यस्ताश्रम म्हणजे शेवटी त्यांनी तिकडे देव लोकाला जायचे, मरणाकडे आपणहून जायचे म्हणजे तिकडे जायचे आणि शरीर विसर्जित करायचे अशी पध्दत होती; आपली त्यांच्याच पुस्तकात मी वाचले आहे. आहे आपल्या देशाचा इतिहास हा किती वर्षांचा आहे हो ! कपाळाला हात लावाल पण ते सत्य आहे त्यांनी लिहिले आहे कि या देशाचे आयुष्य किती तर सर्वात प्राचीन राष्ट्र आपले आहे अमेरिकेचे आयुष्य २०० - २२५ वर्षांचे आहे. इंग्लंड चे असेच एक १३०० वर्षांचे आयुष्य आहे पण आपल्याइतके प्राचीन कोणी नाही
तुकाराम महाराज एके ठिकाणी बोलले कि
!! जिकडे पाहे तिकडे उभा अवघा गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहोनी संचले !
! न व्रजता दाही दिशा जिकडे पाहे तिकडे सरसा, तुकाम्हणे समपदी उभा दिठीचीये आधी !!
अरे मी जिकडे पाहीन ना त्या ठिकाणी मला कर कटावरती ठेवून समचरण, नासाग्र दृष्टी भक्तांच्यासाठी अखंड उभा असलेला तो पांडुरंग मला दिसतो आहे हो ! आणि जसा जसा पाहत जातोय तसा तो अधिकाधिक भव्य दिव्य रूप मला दिसतंय आणि त्याला किती वर्ष झाली त्याचा निवडा तुकारामांनी सांगितलाय
||" उभा दिठीचीये आधी "||
म्हणजे दृष्टी नावाचा, डोळे नावाचा पदार्थ अजून जन्माला यायचा होता त्याच्या आधीपासून तो उभा आहे पण हे आपल्याला झेपत नाही
याबाबत पंडितजी सतावाडेकर काय सांगत आहेत ते बघा. ते म्हणाले, " नामदेवांनी आरती लिहिली आपण ती म्हणतो कि
"युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा,
पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा देगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा".
एक युग म्हणजे काय ? आता मी परत अजून जरा आत जातो जगाच्या पाठीवरती आपल्या भारतीय लोकांनी शोधून काढलेल्या कालमापन पद्धती इतकी अचूक पद्धती जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशात आजतागायत अद्याप अस्थित्वात नाही इतकी अति अति अति श्रेष्ठ ती पद्धती आहे.
किती ताकदीची पद्धती आहे ती तुमच्या आमच्या बापजाद्यानी निर्माण केलेली ?
समजा आजचा दिनांक किती ? १ मे २०१० . तर १ मे ८०१० ला, १००१० ला, १४०१० ला, म्हणजे १२००० वर्षांनंतर हि एखादे सूर्य ग्रहण असेल तर त्याचा स्पर्श काळ कोणचा?, ते खग्रास कि खंडग्रास? मोक्ष काळ कोणचा? ते आत्ता आपण सांगू शकतो. हे समोर ठेवले तर तुम्हाला हजारो वर्षांच्या तिथ्या, ग्रहणे सगळेसगळे तुम्हाला स्पष्ट कळते . हे किती सुक्ष्म आहे? तर सेकंदाचा हजारावा हिस्सा मोजणारी आपली कालमापन पद्धती आहे
तर एक युग म्हणजे ५००० वर्षे २८ युगे म्हणजे १४० हजार वर्षे हा चंद्रभागेच्या काठी उभा आहे म्हणजे भक्तांची परंपरा जर १,४०,००० वर्षांची असेल त्या देवाची आरती करण्याची तर तो देव हा समाज हे राष्ट्र १,४०,००० वर्षाचे आहे असे समजायला हरकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू दिठीचीये आधी म्हणजे दृष्टीच्याहि आधी. एवढी १,४०,००० वर्षांची परंपरा असणारा आपला देश आहे त्याच्यात हे संस्कृत वाङमय उत्पन्न झालेले आहे त्याच्यात ते पुराण ग्रंथ आहेत . पुराण म्हणजे काही मागास शब्द नाही आहे भंपक नाहीये भाकड कथा चांदोबा मासिकाचे अंक नाही आहेत ते
तर आपण करंटे आहोत
!! करंटी येथे जन्मली भुते मातृ संहृते सदविती देहा !!
आपण आपल्या आईला न ओळखाणाय्रा अवलादिचे आहोत. म्हणून आपल्याला कळत नाही कि आपली मातृभूमी काय उंचीची आहे ते काय ताकदीची आहे
तर या १,४०.००० वर्षांच्या या देशामध्ये काय घडले त्याचे इतिहास लिहून ठेवलेले आहे ते. त्यातील सुरुवातीच्याच श्लोकात काय म्हणले आहे?
उत्तरम्य समुद्रस्य
हिमाद्रे शैव लक्षणम
वर्षम भारतम नाम
भारतीय यत्र संततिः
= समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत
आपण खाली जो आहे त्याला हिंदी महासागर म्हणतो. नाही आपण विसरलोत. देशाला विसरलोत आईला विसरलोत तो हिंदी महासागर नाहीये तर तो गंगा महासागर आहे.हिकडचा जो अरबी सागर म्हणून आपण आज ओळखतोय त्याचे मूळचे नाव सिंधू सागर आहे, सिंधू ज्या सागराला मिळते तो सिंधू सागर आहे तो
आपण ज्याला मालदीव बेटे म्हणतो ना ती लक्ष्यद्विप बेटेच आहेत ती आपली आहेत
ब्रम्हदेश आहे न त्याचे नावच सांगते कि तो आपला आहे
श्रीलंका आपला आहे
ज्याला आपण अरबस्तान म्हणतो यात 'स' ला 'त' नाही आहे 'थ' आहे ते अरबस्थान. यातील अरब हा संस्कृत शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ अश्व अर्थात घोडा असा आहे उत्तम घोड्यांची पैदास होण्यासाठी लागणारे तापमान वायुमान असणारा देश आहे तो
तुर्कस्थान यात आपण 'क' वरती रफार मारतो पण 'तूरग' म्हणजे घोडा तो संस्कृत शब्द आहे त्याचा अपभ्रंश करून आत्ता आपण म्हणतो
हे सगळे मूळ देश आपले आहेत आपले भूभाग आहेत
इराण हा आपलाच भाग आहे
अहो ! खालती ब्राझील आहे ना त्या ब्राझील देशात काय दक्षिण अमेरिकेत काय आजही हिंदू संस्कृतीचे उदंड पुरावे आहेत जाऊन बघा मी वाचले आहे ते बोलतोय
हा चीन बघा ! या चीनच्या तिथले सगळे राजे लोक मांडलिक म्हणून धुताराष्ट्राला जेव्हा सप्त सिंधू सप्त गंगांच्या जलाने राज्याभिषेक हस्तिनापूरला केला त्यावेळी मांडलिकत्व मान्य करून आहेर घेऊन आलेले होते त्यासाठी महाभारत वाचा मराठवाडा पब्लिशिंग कंपनीने १० खंड काढले आहेत महाभारताचे त्याच्यात मी बोलतोय ते लिहिलेले आहे
असा आपला देश आहे
आपण हा आपला देश इतका प्राचीन असून सुद्धा एक गोष्ट अगदी दुर्दैवाची आहे आजची जि स्थिती आहे ती इतकी विलक्षण घाणेरडी आहे कि काहीच आपल्या वाट्याला येणार नाहीये दुःखाशिवाय
कशात कमी आहे हो ? मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे " देवाने दिलं अन कर्माने नेलं"
आपण म्हणतो एखादयाला कि करंटा आहे तो ! म्हणजे काय सगळे काही चांगले आहे पण कर्तृत्व नाहीये, दृष्टी नाहीये, अक्कल नाहीये. कसं बोलावे? कसं वागावे? कसं जगावे? कसं राहावे हे कळत नाही तो करंटा आहे तसे आपण करंटे आहोत
कसे? तुम्हाला ठावूक नसेल तर सांगतो कि, जगाच्या पाठीवरती ज्याची furtility factror म्हणजे उद्बीजक क्षमता असामान्य असलेला एकमेव देश आहे हा. सलग अशी शेकडो हजारो मैल भूमी जिची उत्कृष्ट अशी उद्बिजक क्षमता जगाच्या पाठीवरील अन्य कुठल्याही देशात नाही. मी येथे हिंदुस्थान चा भाडोत्री स्तुतिपाठक म्हणून आलेलो नाहीये. मी सत्य बोलतोय तुमच्या आयुष्यात हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल
आपल्या सारखी जलसंपत्ती जगात कुठे नाहीये पण तुम्ही आम्ही करंटे आहोत
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे स्पष्ट तीन ऋतू असणारा एकमेव देश आहे हा हिंदुस्थान
वनसंपत्ती हि हिंदुस्थान सारखी जगात कुठे नाहीये होय ! मलेशियात जंगले आहेत, आफ्रिकेत जंगले आहेत जगाच्या पाठीवरती आणखीनही कुठे आहेत पण विश्वाच्या पाठीवरती ज्या ज्या प्रकारचे वृक्ष ज्या ज्या प्रकारचे गवत ज्या ज्या प्रकारच्या भाज्या ज्या ज्या प्रकारचे तृणांकुर तृणधान्य कि जे जे काही सृष्टीला ठावूक आहे ते ज्या एकाच देशात मिळते असा हा देश आहे आपण मुर्खासारखे म्हणतो कि बटाटा जपान मधून आला आणि टोमॅटो अमेरिकेतून आला आणि गुलाब इराण मधून आला अन भावी पंतप्रधान इटलीतून आला .पण आपल्याला चालते सगळे कारण कारटी करंटी आहेत करणार काय ?
तुम्हाला सांगतो कि आपली पशु संपत्ती तर इतकी विलक्षण आहे. आज या आपल्या देशात मोठेले ३७६ कत्तलखाने सरकार मान्य आहेत गावोगावी बकरी कापण्याचा धंदा चाललाच आहे त्याच्यात २६ केवळ गायी मारण्याचे आहेत. निसर्गाने जो जो पशु जन्माला घातलाय कुठे पांढरे कुठे काळे वाघ हि पाली झुरळे डास चिलटे खेचर जलचर जे काही असेल ते सगळे या एकाच देशात मिळतात असे शास्त्रज्ञ बोलतात. आपली पशु संपत्ती इतकी विलक्षण आहे कि शेकडो वर्षांपासून कातडी निर्यात करणारा क्रमांक एक चा देश आहे हा
या देशाची खनिज संपत्ती पण काय सांगू ! शास्त्राज्ञाना जाऊन जर विचारले कि, " काय हो! मूलद्रव्ये किती ?" तर ते सांगतील १०८ . हि १०८ Elements ज्यात सोने, चांदी, तांबे. जस्त, पितळ अशी आणखी काही कि जि विश्वात शास्त्रज्ञांच्या नजरेला आढळली ते १०८ धातू ज्या एकाच देशात सापडतात त्याचे नाव आहे हिंदुस्तान. अरे ! कोणी म्हणेल त्या दक्षिण आफ्रिकेत तांब्याच्या खाणी आहेत ऑस्ट्रेलियात सोने सापडते, अमेरिकेत काय कोळसा फार आहे. असे कुठे काही तर कुठे काही. पण हे सगळे धातू ज्या एकाच देशात सापडतात तो देश आहे आपला
पुढे बुद्धिमत्ता ! हो || तयासी तुलना कैसी || अरे ! हा नील आर्मस्ट्राँग तो ऑर्लिन्स, तो रॉबर्ट हे तिघेजण उतरले चंद्रावरती १९ जुलै १९६९ ला. तिथून माघारी येताना ते हवेचे काही नमुने , मातीचे काही नमुने, दगडाचे काही नमुने घेऊन आले पण तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगतो कि हा पराक्रम जो अमेरिकेने केला त्याचे एकूण ३९ प्रयोग झाले पण पहिले ३८ अयशस्वी झाले हा ३९ व तेवढा यशस्वी झाला
त्याकाळात Advansments of America in the Scintific World हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याच्या काय होते ते सांगतो म्हणजे आपली बुद्धी काय लायकीची आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यात त्यांनी लिहिले होते कि आत्ता पर्यंत ३८ अयशस्वी प्रयोगानंतर ते राष्ट्र जिद्दीने पेटून उठले कि आपण झेप घेतलीच पाहिजे वरती. नासा नावाच्या संघटनेत ८-८ तासांच्या शास्त्रज्ञांच्या संशोधन पाळ्या सुरु झाल्या आणि या संशोधनाच्या आधारावरती ते चंद्रावर उतरले. त्या पुस्तकात त्यांनी पुढे सांगितले होते कि हे कार्य यशस्वी होण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला रक्ताचे पाणी केले हाडाची काडे केली असे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ लोक २,८२,००० होते या संशोधनात आणि तेच सांगतात कि या २,८२,००० पैकी ८०% लोक हे भारतीय आहेत हि आपली बुद्धिमत्ता आहे अहो ! आत्ता हि परवा एक लेख आला होता अमेरिकेच्या अंतराळ संशोधन कार्याबद्दल लोकसत्ता मध्ये त्यात मी वाचले कि त्यांची जि अंतराळ संशोधनातील १० सर्वोच्च अधिकाय्रांची कि समिती आहेत त्यात ९ जण भारतीय आहेत हिंदू आहेत
त्या जीनिव्या मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठा अॅटॉमिक प्लांट आहे तिथे ५०% पेक्षा जास्त शास्त्रज्ञ हे आपले आहेत आत्ताचे हे कॉम्पुटर. या संगणक शास्त्रात जगातील जि एकूण शास्त्रज्ञांची लोकसंख्या आहे त्या ३७% पेक्षा जास्त उत्कृष्ठातील उत्कृष्ठ शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत हि आपली बुद्धिमत्ता आहे अहो ! || मृगचीये अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा || भाग्यवंत घेती वेचूनिया मोरे भारवाही मेले वाहता ओझे || त्या कस्तुरी मृगाला तो सुगंध आपल्या पोटात आहे हे ठावूक नसते पण वाय्रामुळे पसरणारा त्याचा सुगंध शोधण्यासाठी काळीज फुटे पर्यंत ते जिकडे तिकडे फिरत राहते. आजही आपण कस्तुरी मृगच आहोत आपल्याला ठावूक नाही कि आपण कोण आहोत
अरे ! धर्म कुणाला कळायचं असेल त्यांनी या भारत मातेच्या पायाशी यावे भगवंताने दिलेला मनुष्य जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर तर तो आत्म्याचा प्रकाश फक्त या भरत भूमीच देऊ शकते
अहो ! आपले पसायदान इतके उदात्त आहे कि ज्याला तोड नाही जोड नाही तुलना नाही उपमा नाही केवळ मराठीच नाही तर हिंदुस्थान मधल्या सगळ्या भाषातून धर्म म्हणून जे काही चिंतन केले आहे तुम्ही आम्ही त्याला तोड नाही
असे सगळे असून सुद्धा भगवंताने इतक्या उत्कृष्ट संरक्षक सीमा तुम्हाला आम्हाला दिलेल्या आहेत कि असा चहूबाजूनी निसर्गतः च संरक्षण असणारा देश फक्त हिंदुस्थान हा आहे एकीकडे हिमालय, हिंदुकुश तिन्ही बाजूनी समुद्र. एक सर्वात मोठी नदी फक्त हिंदुस्थानात, सर्वात मोठा पर्वत हिमालय फक्त
हिंदुस्थानात. जगाच्या कल्याणासाठी अखंड कार्यरत चिंतनात असलेली असंख्य व्यक्तिमत्वे केवळ हिंदुस्थानात झाली आहेत हि उंची कुणी गाठू शकणार नाही कुणाला ते परवडणार नाही हो ! आमच्या तुकाराम महाराजांच्या इतकी उंची असणारा मनुष्य अन्य देशात जन्मू शकणार नाही
किती सर्वोत्कृष्ट परंपरा असणारा हा देश आहे. जगातले जे सर्वात उत्तमातले उत्तम ते भगवंताने या भूमीला दिले आहे येथे सहा शास्त्रे आहेत त्यातील ब्राहस्पत्य शास्त्राचा सुरुवातीचा श्लोक आहे त्यात या देशाच्या नावाचा उल्लेख असलेला तो श्लोक आहे || हिमालयात सभारभ्या यावत हिंदू सरोवरं तत् देश निर्मितम् देवं हिंदुस्थानम् प्रचीक्षति || अरे हिमालय पासून खाली हिंदू सागरापर्यंत देवाने निर्मिलेला हा देश आहे. अरे ! ज्यावर खास मायेची पाखर आहे देवाच्या अंतःकरणात ज्याच्या विषयी कौतुक आहे असा हा देश आहे
असा १,४०,००० वर्षांची परंपरा असणार हा देश एका आज एका वाईट गोष्टीत क्रमांक एक वर आहे लाज वाटावी शरम वाटावी, अन्न गोड वाटू नये, दुःख व्हावे अशी ती गोष्ट आहे. कोणाची गोष्ट आहे ती ? कि, जास्तीतजास्त काळ पारतंत्र्याच्या नरकात आनंद मानणारा हा देश आहे या देशावर झालेल्या आक्रमणा इतकी आक्रमणे जगात कुठल्याही देशावर झालेली नाहीत. किती देशांनी आक्रमणे केली ? १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत आपल्यावर ७४ देशांनी आक्रमणे केलेली आहेत. कुणी भाषेच्या माध्यमातून, कुणी व्यापाराच्या माध्यमातून, कुणी धर्माच्या माध्यमातून, कुणी संस्कृतीच्या माध्यमातून, कुणी राजकीय माध्यमातून अखंड आपल्यावरती अक्रमाणेच होत आलेली आहेत.
तुकोबाराय एका अभंगात बोलतात
"त्या पाण्यात राहणारी आणि पाण्यात काय असतील ते कण खाऊन जगणारी जिचा पाण्यातच जन्म आणि पाण्यातच मरण अशी निरपराध बारकी मासोळी तिने काय कुणाचे वाईट केले आहे बरे पण त्या माश्यांना हे कोळी पकडतात आणि खातात. ती हरणे तृणांकुरावरती जगतात, कुणाला मारत नाहीत अतिशय भित्री जात पण त्या हरणांचा व्याध नाश करतात, कातडी सोलतात, मांस खातात तसेच गावातील काही बदमाश माणसे संतांना सज्जनांना तरही भगवान करून सोडतात पण तुकाराम महाराजांनी याचे उत्तर जेवढे चांगले दिले आहे तेवढे कुणालाच जमलेले नाही ते म्हणतात, "हे तर जन्मजात वैर आहे"
तसेच आपले आहे. या ७४ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केले आपण काय काय केलं ? ७५वे चीन ने आपल्यावर आक्रमण केले २० ऑक्टोबर १९६२ ला. पण आपण काय केले? त्यांच्या वाळल्या पाचोळ्यावर तरी कधी पाय दिला ? वाकड्या नजरेने तरी कधी बघितलं का? अरे ! आपला कोणता अपराध ? काय चूक? यात गोष्ट अशी कि दुर्बलांच्या नशिबी जे येते तेच आजवर तुमच्या आमच्या नशिबी आलेले आहे. ससा म्हणून जे जगातील त्यांना कुत्री फाडून खाणारच. मासे आहेत त्यांना कोळी मारणार. हरणे आहेत त्यांना व्याध मारणार म्हणून जगायचे असेल तर सिंह म्हणून जगा. शिवाजी महाराज संभाजी महाराज या पितापुत्रांनी ते केले बघा ! आपली गुणवत्ता इतकी मोठी कि आपले गुणच दोषात रुपांतर झाल्यासारखे झालेले आहेत आणि आपण भक्ष बनलो त्याला काय इलाज.
गोष्ट अशी कि, शक, कुशाण, हूण, तार्तर, बलुची, अफगाणी, खिलजी, तुघलक, लोधी, सूर, पठाण, मोगल, डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, चीन इत्यादी आक्रमक. अरे ! खाली एवढीशी लंका त्यांनी आपली काही बेटे लाटलीत २५ वर्षांपूर्वी पण आपण काहीच करू शकलो नाहीआझु आपल्यावर आक्रमणे होतात पण मन मेले कि आक्रमण झालेले कळत हि नाही
कल्पना करा कोट्यावधीचा देश आपल्या भूमितून येणारी माणसे इतकी वांझ आहेत का ? कि त्यांच्यावर राज्य करणारी माणसे दुसय्रा देशातून यावीत यासारखी शरमेची गोष्ट नाही पण बुद्धी मारली गेल्यानंतर बाकीचे काही सुचत नाही पण या सगळ्यासाठी हिंदूंचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे आणि तो आजही कायम आहे यात बदल केल्याशिवाय १५ ऑगस्ट १९४७ सुरक्षित राहणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो," पृथ्वीराज नावाचा चौहानांच्या कुळामध्ये जन्मलेला एक अतिशय उदात्त अतिशय कर्तुत्ववान, बुद्धिमान, हिम्मतवान, पराक्रमी, लढाऊ, नेतृत्वाचे गुण असलेला संन्यस्त वृत्तीचा राजा होता त्याच्या वरती मुहम्मद घोरी ने एकूण फक्त १३ वेळा चाल केली. हा मुहम्मद घोरी कोण? तो अरबस्थानातला. काय केले आपण म्हणून तो आला? तर त्यांची ती वृत्ती आहे. पहिल्या १२ वेळा आला त्याच्यात ८ वेळा त्याला पराभूत होऊन पळून जावे लागले आणि ४ वेळा आपण त्याला जिवंत पकडला. कल्पना करा म्हणजे त्या पृथ्विराजाचे बळ त्याचे सैन्य, त्याचे नेतृत्व, त्याची हिम्मत किती विलक्षण आहे पण तो ८ वेळा हल्ला करून आला पण पृथ्विराजाच्या मनात असे आले नाही कि, " हा किडका साप. मी च्या बापाच्या बापाचं, बापाच्या बापाचं काय वाईट केले आहे पण हा का येतोय अंगावरती? अरे! याला संपवला पाहिजे. ज्या वारुळातून हा साप येतोय ते वारूळ जाळून उध्वस्त केले पाहिजे असे त्याच्या हिंदू अंतःकारणात आले नाही. ४ वेळ त्याला आपण जिवंत पकडला त्या सज्जन गडावरती राहणारा गोसावी रामदास स्वामी त्यांच्या एक श्लोक आहे
|| कुठेही दिसो साप ठेचुनी मारावा, मनी अन्य चर्चेस द्यावा न थारा | विषाचे विना कोणता सर्प आहे , वरुनी कसे पाहुनी ओळखावे ||
पण हिंदू अंतःकरण त्याला आपण सोडून दिले आजही विमान अपहरण झाले तेव्हा असेच किडके साप जसवंत सिंगांनी लग्न हून माहेरी आलेल्या मुलीला परत सासरी सन्मानाने धाडावे तसे त्या सापांना सोडले. हिंदूंचा स्वभावच बनला आहे कि पडते घ्यायचे, नमते घ्यायचे शरण जायचे आणि जिवंत राहायचा पराक्रम करायचा असा नासका प्रवाह आहे आपला त्या पृथ्विराजालाही वाटले नाही कि कुठेही दिसो साप ठेचुनी मारा
तो घोरी तेराव्यांदा आला तेव्हा जयचंद राठोड दिल्ली चे राज्य मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावाविरुद्ध त्याला जाऊन मिळाला. पृथ्वीराज पराभूत झाला आणि त्याला मृत्युदंड दिला नंतर त्यांनी ते पृथ्विराजाचे पार्सल तिकडे त्यांच्या देशात नेलं. त्याचे डोळे काढले तुकडे तुकडे केले शरीराचे. कारण घोरीला माहित होते || कुठेही दिसो साप ठेचुनी मारा || आणि आपण त्याला १२ वेळा सोडला मोठ्या मनाने; पण १३ व्यांदा आला आणि तुमची माती केली आणि त्या वेळेपासून दिल्लीच्या तख्तावरील आपले निशाण गेले आहे ते पुनरपी कधी आजतागायत आलेले नाही आहे. पृथ्वीराजजी मारले गेले पण नंतर त्यांच्या कुळातील त्यांचा मुलगा, नातू, पणतू कुणालाही वाटले नाही कि याचा सूड घेतला पाहिजे आपण याला मातीत मिळवले पाहिजे पण पुढे सगळे कसे शांत शांत राहिले. पण फक्त महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास त्याला अपवाद आहे अरे ! हे ७४ देश आपल्यावर का चालून आले? चीन का चालून आला? तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. आपले युद्ध झाले पाकिस्तानशी बांगलादेशसाठी १९७१ ला तर १५ ऑगस्ट १९४७ ते १६ डिसेंबर १९७१ पर्यंत २४९ वेळा पाकिस्तान ने आपल्यावर आक्रमण केले पण त्याचे कधी आपण उत्तर दिलेले नाही
आजही सीमेवर हेच चालू आहे पण याच्या वार्ता देत नाहीत गाळून टाकल्या जातात त्या. आपण याच्या विचार केला पाहिजे कि आपण इतिहासातून काय शिकलो? हे जर टिकवायचे असेल तर आपण आपल्या मनोवृत्तीत बदल केला पाहिजे
इ.सं.१००० ते इ.सं. १०३० या दरम्यानचा आपला इतिहास काय आहे हो ! तर या ३० वर्षात महम्मद गझली आपल्यावर १७ वेळा चालू आला. आणि काय केले तर कत्तल रक्तपात जाळपोळ. आजही पहा मुंबई वरील हल्ल्यात २०७ जण मारले गेले तर दुसय्रा दिवशी वर्तमान पत्रात बातमी का आली तर मुंबई सावरली, जनजीवन पूर्ववत. तुम्ही प्रेतागरात जावा कुठल्याही दवाखान्यातल्या तेथिल प्रेतांमध्ये कधी वाद होत नाहीत कधी भांडणे नाहीत. तसाच कोणी कुणाला चिमटा काढताना दिसत नाही कुणाला राग येत नाही सगळे कसे शांत निवांत असते तसाच हा आपला ११३ कोटी मन मेलेल्या लोकांचा देश आहे म्हणून आम्ही या हल्ल्या नंतर केले काय ? तर फक्त मेणबत्त्या नेवून लावल्या कारण गांडूळ कधी फणा काढत नसतं. कसे आपले स्वातंत्र्य चिरायू राहील काही कळत नाही कारण आपल्या इथे 'सुशिक्षित' नावाचा G A N D U गोत्रातला समाज गेली ६२ वर्षे स्वातंत्र्य भोगतोय.
हे जर बदलायचे असेल तर शिवाजी संभाजी मंत्राशिवाय आपल्याला पर्याय नाही.
म्हणून आपले हे चिंतन जात धर्म पंथ, संप्रदाय भाषा याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र टिकवण्यासाठी उपयोगी पडणार आहे ...
-संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश
(हा लेख प्रत्येक सच्च्या राष्ट्रप्रेम्याच्या ब्लॊगवर, संकेतस्थळावर, मुखपृष्ठावर,सोशल नेटवर्क वर असावाच असावा)
http://shrishivpratishthan.com/
www.dasbodh.com
प्रतिक्रिया
22 Apr 2013 - 4:58 pm | मन१
आज मिपावरती विवेक, पांचजन्य ही नियतकालिके वाचल्याचा भास झाला.
मधूनच "सहा सोनेरी पाने" सुद्धा आठवले.
4 May 2013 - 2:38 pm | विनोद बोरोले
अन भावी पंतप्रधान इटलीतून आला ........... लय भारि
22 Apr 2013 - 5:09 pm | पिंपातला उंदीर
लेख वाचून डोळे खाडकन उघडले.
22 Apr 2013 - 5:12 pm | दासबोध.कॊम
संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव सांगली जिल्ह्याला नवीन नाही.
गुरुजी हे तसे मरठवाड्यातले. शिकले पुण्यात...चांगले अणु शास्त्रात पी.एच.डी. स्वर्णपदकासह मिळवून, फर्गसन मध्ये प्राध्यापकी करीत होते. पुण्यातील प्रभात रस्त्यासारख्या भागातील करोडो रुपायाच्या स्थावराला लाथाडून समाजासाठी बाहेर पडले. पायात वहाणा घालीत नाहीत. एक धोतर,सदरा,टोपी अंगावर, एक १० बाय १० च्या खोलीतील दोरीवर, दार सताड उघडे. आत एक सतरंजी अंथरलेली, उशी घेत नाहीत. एक पाण्याचा तांब्या, शिवचरित्र, गाथा, दासबोध...बस्स....एवढाच पसारा.
एक क्षण एका जागी थांबत नाहीत. गाडीत बसत नाहीत. ८०-८५ च्या आसपास वय आहे...परंतु गडकोट मोहीम काढतात ते दरवर्षी त्यात वाघासारखे ५-६ दिवस अनवाणीच चालतात! किल्ले चित्त्याच्या चपळाईने चढतात उतरतात...
आजही रोज पहाटे २००-२०० जोर मारतात...पूर्वी ५००-५०० मारत. रोज १२० सूर्यनमस्कार न चुकता...
मागच्याच आठवड्यात सांगलीत एक अपघात झाला गुरुजींना, एकाने उडवले....८ तास बेशुद्ध होते...धर्मवीर बलिदान मास असल्याने ते एक घासही अन्न घेत नाहीत महिनाभर! त्याच्या थकव्याने ग्लानी आली....जागे होताच वैद्यांना हातातील नळ्या काढायला लावल्या व तडक सायकल घेऊन पुढच्या कामला निघाले! डॉक्टर म्हणत होते किमान एक महिना बेडरेस्ट हवी!
आज संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजींनी हाक मारली की सुमारे ४-५ लाख तरूण तत्परतेने प्रतिसाद देतात....
उशीरा का होईना या महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचे मोल कळते आहे...
मित्रानो, आयुष्यात एकदाच गुरुजींना भेटा! तुम्हाला लक्षात येईल की अशी व्यक्ती तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नाहीत व या पुढे तर कधीच पाहाता येणार नाही,,,
22 Apr 2013 - 5:33 pm | नितिन थत्ते
>>आज संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजींनी हाक मारली की सुमारे ४-५ लाख तरूण तत्परतेने प्रतिसाद देतात....
४-५ लाख म्हणजे सॉलीडच आहे. बाळासाहेबांनापण एवढं जमलं नसेल.
22 Apr 2013 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार
थत्तेचाचा खरं खरं सांगा, तुम्हाला कसा हो, कसा सुगावा लागतो अशा धाग्यांचा आणी त्यातील वाक्यांचा?
बाकी, राहूल गांधींनी हाक मारली तर किती माणसे गोळा होतील असा चाचांचा अंदाज आहे ?
थत्तेचाचांनी हाक न मारता देखील धावून जाणारा
पराण्णा
22 Apr 2013 - 6:30 pm | नितिन थत्ते
>>बाकी, राहूल गांधींनी हाक मारली तर किती माणसे गोळा होतील असा चाचांचा अंदाज आहे ?
हा हा हा .... कल्पना नाही. मी जाणार नाही हे नक्की. :)
22 Apr 2013 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> ४-५ लाख म्हणजे सॉलीडच आहे. बाळासाहेबांनापण एवढं जमलं नसेल.
:) दिली का काडी टाकून...
-दिलीप बिरुटे
23 Apr 2013 - 12:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो पण मोठी माणसं तर नेहेमी अभ्यास वाढवा, वाचन वाढवा, व्यासंग करा असं सांगतात. गुरुजींकडे निदान किंडल वगैरे काही आहे का? किमान दोन-चार संपन्न ग्रंथालयांचं सभासदत्त्व?
हे पी.एच.डी.मधे स्वर्णपदक ही काय भानगड असते हो? मुळात या पी.एच.डी. पदवीचा अर्थ सांगाल का?
22 Apr 2013 - 5:19 pm | बाळ सप्रे
उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका का सोडलीत? त्यांना पण काही संस्कृत नाव देउन प्राचीन भारतात विलिन करुन घ्या ना!!
आणि एवढं सगळं बदलु शकणारा हा जादुई शिवाजी संभाजी मंत्र काय तो तरी सांगा डिटेलमधे ..
22 Apr 2013 - 5:23 pm | बाळ सप्रे
तुम्ही, गुरुजी आणि हाकेला तत्परतेने प्रतिसाद देणारे ४-५ लाख तरुणसुद्धा "त्याच" गोत्रातले का?? की सगळे अशिक्षित?? :-)
22 Apr 2013 - 5:25 pm | गवि
आत्तापर्यंत (१७:२५ वाजेपर्यंत) आलेल्या प्रतिक्रियांबाबत :
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुण्याकडे जात असताना तळेगाव टोलनाका ओलांडला आणि अगदी बॅरियरजवळच ट्रॅफिक हवालदार उभा होता. त्याने माझी टोलपावती मागितली.
आधीची खालापूर नाक्यावर मिळालेली पावती त्याने पहायला मागितली. त्यावरचा एंट्री टाईम निरखून पाहिल्यानंतर त्याने स्वतःच्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं आणि मला जाऊ दिलं
..आणि "अशीच सावकाश आणि सुरक्षित गाडी चालवत जा" असंही म्हटलं.
पण बर्याचजणांचा खालापूर एंट्री टाईम बघून तो त्यांना अडवून ठेवत होता...
.........................
अवांतर वाटले तर उडवण्यास हरकत नाही.. :)
22 Apr 2013 - 5:36 pm | नितिन थत्ते
९ तारखेला वरून खाली येताना टोल नाक्यानवळ ९३ किमीच्या स्पीडने गाडी चालवल्याबद्दल २०० रु दंड भरला. लोक १४०-१६० ने जातात हे पाहिलेले आहे. असो. मी मर्यादेपेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवत होतो हे खरेच आहे.
अवांतर वाटले तर उडवण्यास हरकत नाही.. :)
22 Apr 2013 - 5:40 pm | नितिन थत्ते
या लेखावरौतारा म्हणून फारएण्ड यांचा तिरंगा लेख पुन्हा वाचतो.
22 Apr 2013 - 5:40 pm | नितिन थत्ते
या लेखावर उतारा म्हणून फारएण्ड यांचा तिरंगा लेख पुन्हा वाचतो.
22 Apr 2013 - 5:47 pm | बॅटमॅन
पु ना ओकांचा अवतार पुन्हा उतरला जणू. तुफान विनोदी एकपात्री प्रयोग.
22 Apr 2013 - 5:53 pm | मालोजीराव
काल सेहवाग नंतर आज गॉथमवासी ब्याटम्यान ची इनिंग रंगणार दिसत्ये…गॉथम सुद्धा तत्कालीन भारतात येत असावे काय ?
22 Apr 2013 - 6:13 pm | परिकथेतील राजकुमार
संपूर्ण विश्वात महान असलेल्या आणी ह्यापुढे देखील राहणार्या भारतीय संस्कृतीची अशी खिल्ली उडवणार्या श्री. थत्ते चाचा, श्री. बॅटमॅन, श्री. बॅटमॅन ह्यांना पाठिंबा देणारे मालोजीराव ह्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.
संबंधीत लोकांना तातडीने हद्दपारी द्यावी, तसेच ह्या प्रतिक्रिया लिहिल्या जात असताना ऑनलाईन असलेल्यास संपादकांना तातडीने सेवामुक्त करून त्यांच्यावरती खटले भरावेत. सायंकाळी आमचा मेणबत्ती मोर्चा धडकी भरवायला येईलच.
धन्यवाद.
22 Apr 2013 - 7:14 pm | नितिन थत्ते
>>सायंकाळी आमचा मेणबत्ती मोर्चा धडकी भरवायला येईलच.
हेच ते. आपल्या सौंस्क्रुतीचं आपल्यालाच काही नाही. समई मोर्चा- गेला बाजार पणती (शाडू मातीच्या) मोर्चा काढला असता तर ...
(स्वगत: मोर्चा तरी देशी आहे का?)
22 Apr 2013 - 10:20 pm | परिकथेतील राजकुमार
"जपान ते ब्रा़झील भारतच आहे म्हटल्यावर ...."
23 Apr 2013 - 5:59 pm | पुष्कर जोशी
22 Apr 2013 - 6:29 pm | बॅटमॅन
गॉथम तर बोलूनचालून आम्रविका खंडातले. ते भारतात येणार नाही तर अजून कुठले शहर येणार ? हे शहर गौतम बुद्धाच्या काळात वसल्याचे त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ऐंशी वर्षांनी गॉथमची स्थापना झाली. त्यामुळे "गौतम-अशीति(८०)" असे नाव पडले, त्याचा अपभ्रंश "गॉथम सिटी" असा झाला आहे. शिवाय वाल्गुदेय ऊर्फ बॅटमॅनचा उल्लेख मुक्तेश्वरांच्या कवितेच्या एका (पानशेतच्या पुरात वाहून गेलेल्या) प्रतीत आहे तोच माझी सही म्हणून घेतलेला आहे. मुळात बॅटमॅन हा शब्द तिथे चालणार्या बटाट्याच्या शेतीला अनुलक्षून बनलेल्या एका द्राविडी शब्दाचा अपभ्रंश आहे. तिथे मणभर बटाटे पिकत, त्यामुळे बट्ट-मण्ण असे म्हटल्या जाऊ लागले, त्याचाच अपभ्रंश बट्टमण्ण-बटमण-बटमन असा झाला. पुढे इंग्रजांनी तो शब्द ऐकला आणि क्रिकेटमधल्या बॅट्स्मनशी साधर्म्य आढळल्याने त्याचे बॅटमॅन असे रूपांतर केले. बटाटे पिकवणारा मॅन अशीही त्याची व्युत्पत्ती तत्कालीन नवपाणिनीने दिलेली आहे. तर पुढे हेच नाव गॉथम भागात राहणार्या प्रतिष्ठित नागरिकांत रूढ झाले.
तर असा आहे गॉथम आणि बॅटमॅनचा इतिहास...सर्वार्थाने भारतीय ;)
22 Apr 2013 - 6:41 pm | प्यारे१
अबे मारतो का काय?????????????
>>>बट्ट-मण्ण
फुटलो. आकाश अंबानीने बॅट मॅनचा ड्रेस घातलाय असं सचित्र दृश्य डोळ्यासमोर येऊन एकदम नीता अंबानी डोळ्यापुढं आली.
22 Apr 2013 - 6:46 pm | बॅटमॅन
प्यारेजी पण नीता अंबानी कायले आली म्हणे डोळ्यापुढं ;) नै म्हंजे यायला काय कारण पायजेच असं नै पण हिते कळ्ळं नै. :)
22 Apr 2013 - 6:51 pm | प्यारे१
आकाश अंबानी की मम्मी बोलकु!
हमें आयपील देखते ना हल्ली. ;)
वो मणभर बट्ट वाला आकाश दिखता उसके साईड में बैठी नीता भी दिखती! एकदम बिच्चारी लगती. वो कोई चेपु पे कहा था.... ये देखो 'जिल्ले से बडा तालुका' बोलके! ;)
22 Apr 2013 - 6:55 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
खरंय प्यारेजी ;)
अन बिचार्या नोलानसाहेबाला आमचे इतिहाससंशोधन धक्कादायक वाटले वाट्टे. त्याला खाजगीत पत्रच लिहितो बगा, काय म्हंटा मालोजीराव?
22 Apr 2013 - 6:46 pm | मालोजीराव
आत्ताच आलेल्या ताज्या बातमीनुसार संगणकावरील काही आंतरजालीय मजकूर वाचता वाचताच क्रिस्तोफर नोलान ला फिट आली म्हणे
22 Apr 2013 - 7:34 pm | आदूबाळ
अगागागागागा.... :)) :)) बॅ. मॅ. ओक!
प्रतिसाद वाचनखुणेत टाकायची सोय असते का हो? :))
22 Apr 2013 - 9:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
... धाग्यापेक्षा प्रतिसादच भारी.
दक्षिण भारतात त-थ यांचे गोंधळ असतात हे गौतम->गॉथम यावरून स्पष्ट करणार का कसे?
22 Apr 2013 - 10:26 pm | श्रावण मोडक
म्हणजे निथीन तथ्थे असे का?
22 Apr 2013 - 11:23 pm | नितिन थत्ते
हॅलो.....
त आणि थ चे गोंधळ नसतात. थ च नसतो.
(दाक्षिणात्य) नितिन तत्ते
22 Apr 2013 - 10:32 pm | श्रीरंग_जोशी
दक्षिण भारतात त-थ यांचे गोंधळ असतात
माझाही असाच समज होता पण या धाग्यावरील जाणकारांच्या प्रतिसादांनंतर शंकानिरसन झाले.
22 Apr 2013 - 11:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
त-थ च्या गोंधळात लिंकांचे गोंधळ? बुद्धा, पहातो आहेस ना कलियुगात हे काय सुरू आहे ते!
22 Apr 2013 - 11:50 pm | श्रीरंग_जोशी
हा दुवा होता तो.
तसदीबद्दल क्षमस्व.
22 Apr 2013 - 11:19 pm | बॅटमॅन
अगदी बरोब्बर!!!! कसं सुचतं बै तुला अस्लं ;)
23 Apr 2013 - 12:01 pm | प्रकाश घाटपांडे
+१
22 Apr 2013 - 6:12 pm | नीलकांत
असे लेख वाचले की १५-१६ च्या वयात काय छाती भरून यायची काय सांगू. साला आपण म्हणजे कुणाचे वंशज आहोत आणि कुणाचे नाही. आणि आता आपल्या बापजाद्यांनी एवढं करून ठेवल्यावर आपण करण्यासारखं काहीच नाही त्यामुळे एवढया तेवढ्यावर भावना दुखावल्या म्हणून, 'आवाज' टाकायचा, निषेध नोंदवायचा, पुतळे जाळायचे असं करायचो.
पण आता वय झालंय हो आमचं... आता असं ऐकून मन मोहरत नाही... कारण जपान , ब्रम्हदेश, आज तर अगदी ब्राझीलला सुध्दा आपलं म्हणवणारे लोक यांना केवळ नाव सांगून होत नाही त्यांना आडनाव लागतंच. आडनावात जात समजते हे त्याकाळी कुठे ठाऊक होतं. हिंदू सारा एक म्हणनार्यांना काही जाती विशेष स्पेशल वाटतात हे लक्षात आल्यावर मोहरणारं मन कोमेजून गेलंय.
प्रश्न उठतातच ना की आपल्या देशातले मुस्लीम हे लोक मुख्य प्रवाहात आणू शकले नाही ते लोक आमच्या मनी करंटेपणाचा न्युनगंड देऊन काय साधणार आहेत? मुस्लीम जाऊद्यात हिंदू धर्मातील जातींविरोधात बोलताना कधी दिसले नाहीत. किंवा जे लोक हिंदू धर्माचा त्याग करून धम्म अथवा ख्रिश्चन धर्मात गेले त्यांच्या विषयी यांना कधी आपल्या चुकीची जाणीव झाली असं कधी जाणवलं नाही. केवळ आम्ही 'जात' मानत नाही असं म्हणून वेळ मारून न्यायची, 'वेळ' गेली आता.
वर जसे विष्णु पुराणाचा उल्लेख केला तसा गरूड पुराणाचाही करा, अत्री संहितेचा करा आणि मनुस्मृतीचाही करा की... हे सगळंच आपलं आहे ना?
मी हिंदू आहे माझ्या धर्माचा मला अभिमान आहे. मात्र जे माझं आहे ते किंवा तेच चांगलं किंवा चांगलच आहे, असं मला मुळीच वाटत नाही. प्रत्यक्ष जीवणात काय करायचे याचे ध्यान नाही, मात्र अश्या बौध्दीकात रमताना गुडी गुडी वाटलं म्हणजे झालं.
जाऊ द्या आता आमचं वय झालंय...
- नीलकांत
22 Apr 2013 - 6:52 pm | विकास
(पहील्या परीच्छेदाचा स्वानुभव नाही पण ते सोडल्यास) वय झालेल्या नीलकांत आजोबांशी सहमत. :-)
22 Apr 2013 - 7:01 pm | नितिन थत्ते
सहमत.
आम्ही पण काही वर्षांपूर्वी असेच भारावून जायचो.
(वयस्कर) नितिन थत्ते
22 Apr 2013 - 7:47 pm | प्राध्यापक
खरय्,निलकांतजी हे असले लेख १५/१६ वर्षांच्या कोवळ्या मुलांवर फार झटकन परीनाम करतात,आणी मग आपल्या देशाचा खरा इतिहास समजण्याआधीच त्यांच्या मनावर या विचारांच नकळत बिजारोपण होत्,भावनेच्या आहारी जाउन मग काही विशिष्ट विचारांनाच हे तरुन कवटाळुन बसतात्,आणी मग या तथाकथीत राष्ट्रीय विचाराविरोधी कोणी काही बोलायला अथवा लिहायला गेल की त्याच्यावर चोहोबाजुने टिकेचा भडीमार केला जातो.
जोपर्यंत आपण इतिहास पुराव्याद्वारे वस्तुनिष्ठ पणे न तपासता भावनेच्या आहारी जाउन तपासतो तो पर्यंत हे असच चालणार अस दिसतय.
22 Apr 2013 - 8:03 pm | पिंपातला उंदीर
हिंदू सारा एक म्हणनार्यांना काही जाती विशेष स्पेशल वाटतात हे लक्षात आल्यावर मोहरणारं मन कोमेजून गेलंय.
अख्ख्या धाग्याच सार या वाक्यात : )
22 Apr 2013 - 10:47 pm | शिल्पा ब
हा व्हीडो मिळाला पहा.
एका आयायटीयनने लेक्चरवलंय म्हंटल्यावर काय बोलणार.
22 Apr 2013 - 10:50 pm | विकास
आय आय टी भारतात आहे आणि आयआयटीअन भारतीय आहेत.
23 Apr 2013 - 4:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण आय.आय.टी. नावानुसार 'इंडीयन' आहे. भारत का इंडीया?
23 Apr 2013 - 7:18 am | विकास
सत्यदेव म्हना की सत्यनारायन म्हना, देव येकच हाय!
टिपः त्यात असलेले कमळ हे राजकीय पक्षाचे नसावे.
22 Apr 2013 - 6:40 pm | कपिलमुनी
अशी एक तरी ओवी अनुभवली की जपान ते ब्राझील ओढाताण होत नाही बघा ...
22 Apr 2013 - 7:03 pm | प्यारे१
पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे वेगळा आहे.
कशाला करावी म्हणतो मी ही धडपड?
मागे मीच लिहीलं होतं मिपावर.
मणभर सोनं उशाला घेऊन लोकं झोपायचे घरात. मान्य.
आज त्या सोन्यातली गुंज शिल्लक नसेल तर उपयोग काय?
पूर्वी इतर संप्रदाय/धर्म नव्हतेच. त्यामुळं वैदिक कल्चर वगैरे असेल कदाचित. पण भारत तरी कधी एकसंध होता?
गुरुजींबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या कार्याबद्दल प्रेम देखील आहे. हाक मारल्यावर ४-५ लाख लोक जमतील हे देखील मान्य आहे. दुर्गा दौडीमध्ये सांगलीतच १०-१५ हजार लोक असतात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे. पण म्हणून अमेरिका करते तेच आपण देखील करु, आज त्यांच्याकडे जे आहे ते आमच्याकडे पूर्वी होतं हे सांगण्यासाठी अनाकलनीय तर्क लावणं कशासाठी?
तंत्रज्ञानातली प्रगती आज नसली तरी जो आपला चांगला वारसा आहे तो नीट जोपासूया की. संस्कृती श्रेष्ठ होती तर ती आज सगळ्यांपर्यंत पोचते आहे का? तिच्या हस्तांतरणामध्ये जर काही दोष आहेत तर ते दूर करतोय का? ते बघा. तसं झालं तर हे अमेरिकन येतील की जेट प्लेन घेऊन आपल्याकडे मनःशांतीसाठी.
22 Apr 2013 - 9:53 pm | मुक्त विहारि
आज पण नाही
आणि
उद्या पण नसणार..
केरळ,तामिळनाडु आणि भारत ही ३ वेगळी राष्ट्र आहेत ह्याचा अनुभव गेली १४ वर्षे घेत आहे.
22 Apr 2013 - 6:58 pm | नंदन
नानू सरंजामे आठवला. बाकी लेख रोचकच. जपान, ब्राझिल इ. असले तरी आग्नेय आशियाई राष्ट्रांचा अनुल्लेख खटकला. मजापहित, श्रीविजय इ. नावे केवळ पूर्वरंग वाचून ऐकून आहोत. त्याबद्दल अधिक काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती.
बाकी काय लिहावे? 'आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । ' असं काहीसं समर्थच म्हणून गेलेत.
22 Apr 2013 - 8:54 pm | उपास
>>'आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । '
नेमका अभिप्राय..
पूर्वीच्या काळचे, पुराणांचे सोयीस्कर दाखले देऊन विशेषतः तरूण पिढीला भावनेच्या आहारी घालून आपण त्यांना सदसदविवेकबुद्धीने, अभ्यासाने निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेपासून उलट नेतोय असं वाटत नाही का? मग त्या पी एच डी किंवा तत्सम उच्च शिक्षणाचा काय फायदा?
तसही उत्तर अमेरिका आणि इतर देशांनी ब्रेन ड्रेन केलेलंच आहे, गेल्या काही दशकांमध्ये जगाला चालना देतिल, दिशा बदलतील असे किती शोध, औषधे भारतात मिळाल्येत आणि त्याच वेळी पश्चिम राष्ट्रांमध्ये किती शोध लागलेत ह्याचा विचार आणि कारणमिमांसा आपण करणार आहोत की नाही? की 'भारतीय वंशाचा/ची' इतक्यावरच आपली कॉलर टाईट होणार!
पूर्वजांनी शोधलेल्या कालमापनाचं कोरडं कौतुक किती दिवस? गेला बानार, आज/ उद्या पाऊस पडणार आहे का म्हणजे छत्री घेऊन बाहेर पडायला, हे साधं गणित सोडवण्याइतपत आपलं हवामानशास्त्र, उपग्रह विश्वासार्ह आहे का? उत्तर अमेरिकेत तासागणिक हवामानाचा अंदाज अगदी कानाकोपर्यातला सुद्धा अचूक आणि विश्वासार्ह मिळतो, कधीही/ कुठेही आणि फुकट.
केवळ इतिहासाच्या गमजा मारणार्या आणि त्यातून काहीच न शिकणार्यांची आताशा कीव येते, निलकांत म्हणतो त्याप्रमाणे, पूर्वी छाती फुगून यायची आताशा वय झाल्याने झापडं गळून पडलेयत.
वाईट अशाच वाटतं, की समाजाला दिशा देण्याची क्षमता असलेले, समाजापुढे आदर्श ठरू पाहाणारे लोक असं सांगतात त्याच!
- (हतबल) उपास
22 Apr 2013 - 7:45 pm | जयंत कुलकर्णी
फारच विनोदी भाषण !
22 Apr 2013 - 8:03 pm | विकास
दासबोध.कॉम या आयडीसभासदास केवळ आकाशवाणी न करता चर्चेत भाग घ्यावा. तसेच या भाषणातून पुढच्या वाटचालीबद्दल पण आपले विचार मांडावेत अशी विनंती. या संदर्भात चर्चा योग्य मार्गावर चालू रहाण्यासाठी आपल्यासाठी एक प्रश्न (उत्तराची अर्थातच अपेक्षा आहे).
मातृभुमीची ताकद माहीत आहे हो. मागचे चांगले-वाईट सर्व पाठ देखील आहे. पण भूतकाळ सारखा पाठ करताना आपण वर्तमान आणि भविष्याकडे पाठ फिरवत असतो. त्याचे काय? आपली स्वतःची ताकद कशी ओळखायची आणि या आपल्या आईसाठी परत तिची मुलांनी (यात मुली देखील आल्या) परत एकदा (चांगल्या अर्थाने) दिवे कसे लावायचे या बद्दल काही मार्गदर्शन? आणि हो असे दिवे जेणे करून आजच्या वर्तमानात या आईला आणि तिच्या मुलांना फायदा होयला पाहीजे आणि भविष्यासाठी "पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" अशी कामगिरी देखील दाखवली पाहीजे...
22 Apr 2013 - 8:22 pm | टवाळ कार्टा
आपण असे आहोत???...मग हुंडा मागणे म्हणजेसुध्धा संस्क्रुतीच असेल ना??? सती जाणे सुध्धा...साठीच्या म्हतर्याने म्हातार्याने सोळाच्य मुलीशी लग्न करणे आणि बरेच काही जसे अस्प्रुश्यता जपणे (आपण आणि "ते")...हे सगळे सुध्धा पुरणांमधेच लिहिले आहे
आणि इतकेच जर गांडु लोक इथे आहेत तर मग एक सांगा....मंत्रालयात ८०% पेक्शा जास्त मराथ मराठी लोक असुन सुध्धा मराठीलोकांचि कामे सुध्धा का अडतात...४-५ लाख जण गोळा होत असतील तर मग कितीतरी कामे मार्गी लागु शकतात पण त्या ४-५ लाखातल्या किती घरात मुली शिकतात किंवा त्याना निर्णय स्वातंत्र्य दिले जाते
शेवटचा प्रश्न...कुठचा पक्ष...गेलाबाजर संघटना...इतका संस्क्रुतीचा अभिमान असता तर आज महाराष्ट्रातले गड किल्ले इतक्या वाइट अवस्थेत नसते...
उगाच फुकाच्या गप्पा...ज्याना खरोखर तळमळ असते ते दुसरे जागे होण्याची वाट नाही बघत बसत...उदाहरणच हवे असेल ना तर जरा हेमलकसाला जाउन या...महात्मा या शब्दासाठी सगळ्यात लायक माणुस
22 Apr 2013 - 9:47 pm | मुक्त विहारि
"आपण असे आहोत???...मग हुंडा मागणे म्हणजेसुध्धा संस्क्रुतीच असेल ना??? सती जाणे सुध्धा...साठीच्या म्हतर्याने म्हातार्याने सोळाच्य मुलीशी लग्न करणे आणि बरेच काही जसे अस्प्रुश्यता जपणे (आपण आणि "ते")...हे सगळे सुध्धा पुरणांमधेच लिहिले आहे," ही गोष्ट चूकीची होती..
".मंत्रालयात ८०% पेक्शा जास्त मराथ मराठी लोक असुन सुध्धा मराठीलोकांचि कामे सुध्धा का अडतात?" ह्याची २ मह्त्वाची कारणे आहेत.
१. अमराठी लोक सचिव पदावर आहेत.
२. मराठी लोकांत एकी नाही.
"इतका संस्क्रुतीचा अभिमान असता तर आज महाराष्ट्रातले गड किल्ले इतक्या वाइट अवस्थेत नसते."
मान्य.. आणि ह्याला कारण.. आपलीच मानसिकता. आपण स्वतः वैयक्तिक रित्या किती प्रयत्न केले आहेत?
मी एक ही केलेला नाही.त्यामुळे मला माझीच लाज वाटते, पण म्हणून ते इतरांनी करावे ही अपक्षाही बाळगत नाही.
"उगाच फुकाच्या गप्पा...ज्याना खरोखर तळमळ असते ते दुसरे जागे होण्याची वाट नाही बघत बसत...उदाहरणच हवे असेल ना तर जरा हेमलकसाला जाउन या...महात्मा या शब्दासाठी सगळ्यात लायक माणुस"
मान्य १०० % मान्य. पण हेमलकसा आणि इतर अनेक प्रकल्प (मुक्तांगण, शेगाव इ.) समाजाच्या सहाय्यानेच पार पाडले आहेत.
23 Apr 2013 - 5:18 pm | टवाळ कार्टा
ह्म्म...माफी.... :(
पण समोर बसलेला मराठी आहे हे त्या कारकुनाला दिसते ना...सचिव लोक लोकांची कामे नका करु असे सांगत नाहीत
फार अभिमानाने सांगण्याइतके नाही पण जमेल तसे थोडेफार...साफ सफाइ करायला मदत केलि आहे
22 Apr 2013 - 8:28 pm | आशु जोग
या धाग्यात खूप माहिती दिली आहे. उर भरून आला.
पण नंतर
प्रतिसादही पाहिले आणि शंका निर्माण झाल्या.
त्यामुळे विनंती
या धाग्यावरच्या बर्याच प्रतिसादकांना विचारावेसे वाटते,
या लेखातली कोणती गोष्ट खटकली ?
विचारमंथन झाले तर कळेल कितपत खरे नि काय ?
विवेक, पांचजन्यचा संदर्भ काय आहे ?
22 Apr 2013 - 10:06 pm | आदूबाळ
तेच तर ना. माहिती भरपूर आहे. पण माहितीचं परिष्करण करून त्यातलं ज्ञान शोधू पहाता "वडिलांची सांगे कीर्ती..." एवढंच उरतंय...
22 Apr 2013 - 10:37 pm | आशु जोग
हो पण नेमकी कोणती विधाने खरी
कोणती खोटी ?
किंवा किती टक्के
म्हणजे अभिमानाने तेवढे टक्केच उर भरेन.
22 Apr 2013 - 8:35 pm | आशु जोग
> आडनावात जात समजते हे त्याकाळी कुठे ठाऊक होतं. हिंदू सारा एक म्हणनार्यांना काही जाती विशेष स्पेशल वाटतात
असली वाक्ये आल्यावर काही आडनावे बॅकफूटवर जातात, असे निरीक्षण आहे.
थत्ते यांचा 'सहमत' चा प्रतिसाद पाहिल्यावर असं प्रकर्षानं वाटलं.
22 Apr 2013 - 10:25 pm | नीलकांत
किमान मी तरी आयुष्यात आडनावावरून मानसाची लायकी ठरवत नाही. ज्यांच्या मनात जाती व्यवस्थेबद्दल आस्था नाही त्यांना बॅकफुटवर जाण्याची गरज नाही.
22 Apr 2013 - 10:12 pm | राजेश घासकडवी
अरेरे, पूज्य व्यक्तीच्या तोंडी अशा शिव्या वाचून वाईट वाटलं. झोपडपट्टी भाषा अशी जाहीर मंचावर का बरं बोलावी?
22 Apr 2013 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भिडे गुरुजी थोर आणि त्यांचे विचारही थोर आहेत. मी त्यांच्या विचारांना नमस्कार करतो.
पण, गुरुजींनी जोधा अकबर या चित्रपटाला विरोध केला होता तेव्हा पासून आपल्याला गुर्जीचे विचार कै पटले नाही.
बाकी, दासबोध कॉम हे चर्चेत सहभागी झाले तर गुरु माऊलींचे विचार आणखी योग्य पद्धतीने समजून घेता येईल.
एवढे मोठे व्याख्यान इथे डकवल्याबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
22 Apr 2013 - 10:47 pm | आदूबाळ
सर, हे व्याख्यान नाहीये काही. फक्त सारांश आहे. (लेखाची शेवटची ओळ बघा!)
22 Apr 2013 - 10:29 pm | अर्धवटराव
होळी साजरी करुन तर बरेच दिवस झालेत...
अर्धवटराव
22 Apr 2013 - 11:03 pm | सस्नेह
लेखाच्या लांबीरुंदीवरून भारत किती महान आहे हे समजले !
वाचायचे कष्ट कशाला ?
22 Apr 2013 - 11:26 pm | श्रावण मोडक
आणि प्रतिसादावरून?
23 Apr 2013 - 10:42 am | सस्नेह
... तो किती 'स्वतंत्र' अन वैविध्यपूर्ण आहे हे ...!
23 Apr 2013 - 1:22 am | निनाद मुक्काम प...
एक अनुभव ह्या लेखा निमित्त सांगावासा वाटतो.. आमचे एक स्नेही अश्याच विचारांनी भारलेले व संघटनेला वाहिलेले.आहेत.
माझ्या पत्नीसह पहिल्यांदा भारतात आलो तेव्हा डोंबिवलीच्या फडके रोड वर ते अकस्मात आमच्या समोर आले.
मला क्षणभर काही सुचले नाही.
मागच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी एका पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊ नका कारण त्यांचे नेते परदेशातून आयात होतात असा सणसणीत आरोप करत प्रचार केला होता.
आता सदर पक्षाच्या उमदेवार प्रथमच निवडणुकीला उभा होता, त्याला इटली नक्की कोठे आहे हे सुद्धा माहिती नव्हते. त्याने डोंबिवलीत मुंब्रा फेम इमारती बांधल्या होत्या.. , व आता त्याला समाजकार्य करायचे होते.
तर असे हे आमचे स्नेही समोर आल्यावर मी बिचकतच त्यांना आमच्या कुटुंबाची ओळख करून दिली.
कानावर आले आहे माझ्या तुझ्याबद्दल असे त्यांचे पहिलेच वाक्य वाचून हा फडके रोड मला आता स्वतःच्या पोटात सामावून घेईल का असा एक रास्त प्रश्न , शंका माझ्या मनात आली.
पुढे
स्पष्ट देशी भाषेत त्यांनी कोणत्या देशाच्या आपण असा माझ्या कुटुंबाला प्रश्न केला.
देशाचे नाव कळले.
आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव झटकन बदलले,
विलक्षण कौतुकाने ,आस्थेने त्यांनी तिची चौकशी केली.
व जातांना शेवटी आपण सर्व एकच असे फर्ड्या इंग्रजीत सुनावले.
ह्याचा अर्थ काय असे तीने मला विचारले
ह्याचे उत्तर मी तिला देऊ देऊ शकलो नाही,मात्र
ह्या लेखातून काही बोध होईल
माझ्या वंशाच्या उपशाखा जगभरात कोठे कोठे पसरल्या आहेत ह्याची माहिती मिळेल अशी आशा होती
पण अपेक्षाभंग झाला.
23 Apr 2013 - 1:36 am | अर्धवटराव
तुमच्या स्नेह्यांची संघटना मी जर ओळखली असेल तर त्याच संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मांडलेल्या उच्छाचाची एक कहाणी मलाही आठवते. त्या काळी दलेर मेहेंदी भलताच फार्मात होता. त्याच्या गाण्यांच्या चालीवर पाकिस्तानचं यथेच्च "कौतुक" करणारे काव्य हा उच्छादी कार्यकर्ता अगदी तन्मयतेने रचायचा, आणि शिवाय आपल्या तारस्वरात असली गाणि समाज प्रबोधनार्थ अगदी मोठमोठ्याने ऐकवायचा. ते सगळं इतकं डोक्यात जायचं कि आजही तो प्रकार आठवुन झीट येते.
अर्धवटराव
23 Apr 2013 - 2:02 am | निनाद मुक्काम प...
दीर्घ श्वास घ्या , आणि कळ सोसून ह्या आर्यकन्येचे पाकिस्तानला उद्देशून प्रवचन ऐका
तेव्हा हीच ती वेळ ,हाच तो क्षण
जागे व्हा, हे प्रवचन ऐकतांना तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिले किंवा नाही राहिले तरी तुम्ही घरी किंवा कार्यालयात किंवा आणि कुठेही असा पण
जेव्हा ही कन्या कश्मीर तो होगा पर पाकिस्तान का नामोनिशाण नही होगा असे सांगते तेव्हा
तिला साथ देत तुम्ही सुद्धा बेंबीच्या देठापासून ओरडत हेच वाक्य उच्चारा.
काय अश्याने पाकिस्तान नष्ट झालच म्हणूनच समजा.
हे प्रवचन मला दाखवून एका पाकिस्तानी सहकार्याने भारत पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी फौज उभारत आहे असे सांगितले होते,
ही वीर कन्या पाकिस्तानात खूपच लोकप्रिय झाली.
व तिच्या क्लिप तेथील मदरशां मध्ये माझ्या सहकार्याने पहिल्या होत्या.
23 Apr 2013 - 2:27 am | निनाद मुक्काम प...
कहर म्हणजे पाकिस्तान मध्ये ह्या आर्य कन्येला प्रत्युत्तर देण्यासाठी गल्लोगल्ली
स्पर्धा घेण्यात आल्या. तेथे पाक कन्या हिरिरीने ह्या आर्य कन्येला उत्तर देत होत्या.
त्याची एक झलक
तिच्या सुरवातीच्या मरगळलेल्या संवादावर जाऊ नका , हळू हळू तिच्या अंगात यायला लागते..
ह्या दोन्ही लिंक ह्यासाठी देत आहे की धर्माच्या देशाच्या नावावर माथी भडकून दोन्ही बाजूने फक्त द्वेष निर्माण होतो.
आपल्याकडील सर्व सामान्य भारतीयाला कदाचित ही आर्यकन्या माहिती नसेल मात्र तिला पाकिस्तान मध्ये सतत प्रकाश झोतात ठेवून भारत द्वेष शिकवला जातो, कोवळ्या वयात तेथील मुलांच्या मध्ये असे जिहादी विष भिनवले जाते.
मोदी हे केवळ विकासाचा मंत्र घेऊन चालले आहे ह्या एका गोष्टींचे मला कौतुक वाटते.
त्यांच्या विकासाच्या मुद्द्यात हिंदुत्व राम मंदीर असे अनेक मुद्दे घुसवण्याचा त्यांच्याच काही लोकांकडून प्रयत्न चालले आहेत.त्यांचे विरोधक सारखे गुजरात दंग्याचा राग आलापतात तेव्हा ते नकळत पणे हिंदुत्ववादी मोदी अशी प्रतिमा उभारतात.
देशाला परत रथ यात्रा , राम मंदिर मग दंगल मग बॉंब स्फोट नको आहेत.
23 Apr 2013 - 3:03 am | अर्धवटराव
एक ति आर्यकन्या विद्वान, आणि तिला रेफर्न्स बनवुन प्रतिफौजा बनवणारे पाकि अतिविद्वान.
अर्धवटराव
23 Apr 2013 - 3:14 am | निनाद मुक्काम प...
सध्या तिरंगा मधील गुळमुळीत संवाद मिपावर परत एकदा वाचले.
त्यामानाने ह्या दोन कन्या जर समोर आल्या तर तुफान शाब्दिक राडा होईल.
आपली आर्य कन्या प्रवचन तिच्या संघटनेच्या लोकांच्या समोर देत होती, सर्व सामान्य भारतीयांना माहिती पण नसेल , मात्र पाकिस्तानात तिच्या नावाने जे काही गल्लोगल्ली हिंदू लडकी को जवाब म्हणून फौज उभारली गेली. हे पाहून माकडाच्या हाती कोलीत ही म्हण पटली,
हिंदूंना दारिद्र्य रेषेतून वर येण्यास मदत करणे सोडून हे बसल्याजागी भव्य दिव्य गतकाळाची गुटी पाजून ह्या लोकांना काय मिळते हेच कळत नही,
23 Apr 2013 - 9:25 am | तर्री
हिंदूंना दारिद्र्य रेषेतून वर येण्यास मदत करणे सोडून हे बसल्याजागी भव्य दिव्य गतकाळाची गुटी पाजून ह्या लोकांना काय मिळते हेच कळत नही,
त्या साठी १९४७ सालात जायला हवे. १९४७ सालात ज्या कारणाने फाळणी झाली त्याचे "रूट कॉज" पाहायला हवे. त्या साठी "करेक्टीव व प्रीवेन्तीव " एक्शन हवी .
पुरोगामित्वाची जोरात भरपूर साथ आली आहे हेच बहुतेक प्रतिसादातून दिसते आहे.
लेखामाधाली अतिशयोक्ती समजून घेवून दुर्लक्षित करण्यात आली आहे . भाव समजून घेवून श्री.भिडे गुरुजींना कोटी कोटी प्रणाम . लेख बददल आभार.
23 Apr 2013 - 10:58 am | आशु जोग
>> हिंदूंना दारिद्र्य रेषेतून वर येण्यास मदत करणे सोडून हे बसल्याजागी भव्य दिव्य गतकाळाची गुटी पाजून ह्या लोकांना काय मिळते हेच कळत नही,
निनादभाऊ दुष्काळासाठी पावती फाडताय का ?
दुष्काळनिधी जमा करतोय आम्ही.
23 Apr 2013 - 11:08 am | मृत्युन्जय
हा धागा खालीलपैकी नक्की कशाबद्दल आहे:
१. महान आणि प्राचीन भारतीय संस्कृती की
२. सहिष्णु हिंदुस्थानी की
३. प्राचीन भारताचा इतिहास की
४. हिंदुंचे शोषण की
५. हिंदु जनजागृती अभियान की
६. भारत - पाक हिंतसंबंध
७. प्राचीन भारताच्या जगभर विखुरलेल्या सांस्कृतिक पाऊलखुणा की
८. गांडु गोत्रीय भारतीय समाज
खुप कन्फ्युजन झाल्याने काहिच प्रतिसाद देता येत नाही आहे.
23 Apr 2013 - 11:45 am | मन१
काही तुमच्यातले काही त्यांच्यातले
"डार्विन च्या माकडांचा नंगानाच" http://www.misalpav.com/node/23586
.
मिपाकर कुठल्या धाग्याची सेंचुरी गेलाबाजार अर्धशतक करतील कै नेम नै ब्वा.
23 Apr 2013 - 11:55 am | नितिन थत्ते
>>आपण ज्याला मालदीव बेटे म्हणतो ना ती लक्ष्यद्विप बेटेच आहेत ती आपली आहेत
ब्रम्हदेश आहे न त्याचे नावच सांगते कि तो आपला आहे
श्रीलंका आपला आहे
ज्याला आपण अरबस्तान म्हणतो यात 'स' ला 'त' नाही आहे 'थ' आहे ते अरबस्थान. यातील अरब हा संस्कृत शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ अश्व अर्थात घोडा असा आहे उत्तम घोड्यांची पैदास होण्यासाठी लागणारे तापमान वायुमान असणारा देश आहे तो
तुर्कस्थान यात आपण 'क' वरती रफार मारतो पण 'तूरग' म्हणजे घोडा तो संस्कृत शब्द आहे त्याचा अपभ्रंश करून आत्ता आपण म्हणतो
हे सगळे मूळ देश आपले आहेत आपले भूभाग आहेत
इराण हा आपलाच भाग आहे
अहो ! खालती ब्राझील आहे ना त्या ब्राझील देशात काय दक्षिण अमेरिकेत काय आजही हिंदू संस्कृतीचे उदंड पुरावे आहेत
होय होय. हे आधुनिक विज्ञानानेही मानले आहे.
26 Apr 2013 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
साधारण १,५०० - २,००० कोटी वर्षांपूर्वी ही चार खंडे आणि भारतीय उपखंड गोंडवन नावाच्या एका महाखंडाच्या (सुपर काँटिंनंट च्या) स्वरूपात आस्तीत्वात होती आणि नंतर वेगळी होत आताच्या जागी पोचली आहेत. या महाखंडाला गोंडवन हे संस्कृत नाव Eduard Suess या ऑस्ट्रियन शास्त्राज्ञाने मध्य भारतातील गोंडवनावरून दिले.
मात्र त्याकाळच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांवरून जरी या महाखंडाला पुरावा असला तरी मानवी संस्कृतिचा / आस्तित्वाचा (५०-७०,००० वर्षे पूर्वी) उदय होण्याअगोदर शेकडो कोटी वर्षांपूर्वी हे भूभाग एकमेकापासून दूर झाले होते.
23 Apr 2013 - 12:54 pm | तिमा
लेखात केलेले सर्व देशांचे ग्लोबल शॉपिंग आवडले. लवकरच, जगांत कुठेही गेलो तरी आपल्याला व्हिसा लागणार नाही! फक्त छाती इतकी फुगलेली असताना, पायाखालचे कसे दिसेल या कुशंकेनेच चिंता निर्माण झाली आहे.
23 Apr 2013 - 3:24 pm | सूड
उत्तरम्य समुद्रस्य
हिमाद्रे शैव लक्षणम
वर्षम भारतम नाम
भारतीय यत्र संततिः
व्याकरणदृष्ट्या चुकीच्या आहेत. ब्याट्याला विचारायला हवं, त्याचं संस्कृत बरंय!! ;)
23 Apr 2013 - 3:29 pm | बॅटमॅन
'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्तति:॥
हा करेक्ट पाठ आहे नेटवर.
इथे तर रम्य समुद्र आणि शैव हिमालय केलाय ;)
23 Apr 2013 - 3:35 pm | इरसाल
அனைத்து வெண்டை இன்று நிச்சயதார்த்தம்
23 Apr 2013 - 3:47 pm | क्लिंटन
हल्ली असे लेख वाचून हसूही येईनासे झाले आहे.
23 Apr 2013 - 4:06 pm | अविनाशकुलकर्णी
लेख आवडला....
23 Apr 2013 - 4:54 pm | अविनाशकुलकर्णी
पुणे विद्यापीठाचे नामांतर
पुणे शहरात महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली . शाळा सर्वांसाठी होती . सावित्री बाई फुले या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका झाल्या . त्यामुळे पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. मागणी करणाऱ्यांमध्ये पुरोगामी विचारांच्या संघटना आघाडीवर आहेत .
आताच एका वेब साईट वर पुणे विद्यापीठाला पुण्यश्लोक जिजाबाई असे नाव देण्याची मागणी वाचली . ही मागणी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची केली आहे . हि संघटना हिंदुत्ववादी समजली जाते . ( http://shrishivpratishthan.com/Jijamata%20Vidhyapeeth.html )
आपल्याला काय वाटते ? पुणे विद्यापीठाचे नामांतर व्हावे का ?
23 Apr 2013 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार
उद्या नाव बदलल्याने शिक्षणाच्या दर्जात फरक पडणार आहे का ? पेपरफुटी बंद होणार आहे का? प्राध्यापकांच्या विद्यापिठाच्या आवारातच चालणार्या दारू पार्ट्या थांबणार आहेत का?
24 Apr 2013 - 9:31 pm | मराठी_माणूस
नामांतराने काही फरक पडत नसला तरी नामांतर होतच असतात , मग पुणे विद्यापिठाचे व्हायलाही हरकत नाही. फुले दांपत्याचे पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील योगदाना चे महत्त्व विसरता येण्या सारखे नाही.
23 Apr 2013 - 5:28 pm | श्रीगुरुजी
हा लेख वाचून हसू आले. इतिहासात आपण अजून किती वेळ रमणार? इतिहासापेक्षा वर्तमान व भविष्यकाळ जास्त महत्त्वाचा आहे. आपण भूतकाळात केलेल्या चुका परत करू नयेत यासाठी इतिहास शिकायचा असतो. आपण इतिहासात काय होतो याच्यात रममाण होऊन निव्वळ अभिमान बाळगण्यापेक्षा इतिहासात केलेल्या चुका टाळून वर्तमान व भविष्य जास्त उज्वल करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
23 Apr 2013 - 6:32 pm | क्लिंटन
अजून काही:
ज्याला आपण रशिया म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’ऋषिय’ म्हणजे ऋषिंच्या राहण्याचे ठिकाण.
ज्याला आपण सौदी अरेबिया/अरबस्तान म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’अर्वस्थान’ म्हणजे चांगले घोडे ज्या ठिकाणी निपजतात ते ठिकाण.
ज्याला आपण व्हॅटिकन सिटी म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’वेदवटी’.
ज्याला आपण कॅन्टरबरी (इंग्लंडमधील शहर) म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’कृष्णकुटी’.
ज्याला आपण मदिना म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’मेदिनी’. मेदिनी भविष्य मुळचे तिथले.
ज्याला आपण सिरीया म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’सुरिय’. सूर मुळचे तिथले.
ज्याला आपण असिरीया (मेसापोटेमियन संस्कृतीतील ठिकाण) म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’असुरिय’. असूर मुळचे तिथले.
इंग्रजी भाषा तर संस्कृतोद्भव आहे.ज्याला इंग्रजीत ’That' म्हणतात त्यातला 'h' काढा. म्हणजे तुम्हाला मिळेल संस्कृतमधील तत अर्थात इंग्रजीमधले That.
पूर्वी रोमन नववर्षाची सुरवात मार्चपासून होत असे.त्या कालगणनेप्रमाणे सप्टेंबर हा सातवा महिना येतो. मुळचा तो ’सप्तांबर’ (सातवा). त्याचा अपभ्रंष ’सप्टेंबर’ झाला.त्याचप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे अनुक्रमे अष्टांबर, नवांबर आणि दशांबरची अपभ्रंष झालेली रूपे आहेत.
अहो हे तर सोडाच.क्रिश्चिऍनिटी म्हणजे मुळची कृष्णनीती हो.