डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
28 Mar 2013 - 9:22 pm

नवीन वर्षाचा पहिला दिवस , माया -बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते मुनिसीपालीटीने शहरातला कचरा उचलून, कचरा घरांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिच्रारे सकाळ पासून कुजक-माजक, नासलेल- सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी , श्रीखंड खायला मिळेल. डुक्कर म्हणाला , दारुड्या भाऊ , असेल अन्न मी नाही खात! दारुडा म्हणाला, मग तुला काय पाहिजे? डुक्कर म्हणाला -

कुजक-माजक खाईन, झिंगात येईन.
गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.

दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, त्या साठी वणवण फिरायची काय गरज,ये माझ्या जवळ बस, एक घोट घे, दोघही झिंगात येऊ, गळ्यात- गळे घालू , गटरात लोळू, एक-मेकांना चाटू व स्वर्गसुख भोगू.

पुढे काय जाहले ते सांगायची गरज नाही. दोघ ही दारू पिऊन गटरात पडलेले होते. त्यांच्या अंगावर माश्या भिणभिणत होत्या, दारुड्याच्या घरी त्याची बायको आणि पोर फाटक्या कपड्यात, भुकेले खंगलेले घरात अश्रू गाळीत पडलेले होते, हे सांगायला नकोच. खंर म्हणाल तर दारुडा दुर्गंधयुक्त गटरात नरक यातनाच भोगत होता. त्याचा घर-संसार उध्वस्त झालेला होता.

मायानो-बहिणीनो, बाप्यानो- तरुणानो असलेच स्वर्गसुख भोगायचे असेल तर अवश्य दारू प्या. पृथ्वीवर खरच स्वर्गसुख भोगायचे असेल तर बाबा रामदेव म्हणतात, नवा वर्षाचा नवा संकल्प घ्यावा -

सकाळी उठावे, प्राणायाम करावे,
मनाला व शरीराला कसवावे,
अभक्ष्य ते सर्व टाळावे,
दारू एवजी- फळांचे रस प्यावे,
शाकाहारी राहावे.
तन प्रसन्न, मन प्रसन्न तर घरात आनंदी-आनंद. जिथे आनंद त्या घरी लक्ष्मी सरस्वती आगमन होणारच. मग घरातच स्वर्ग निर्माण होईल.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

28 Mar 2013 - 9:35 pm | अभ्या..

नवीन आर्थिक वर्षाकरिता का हा संकल्प?
छान छान.

मन१'s picture

28 Mar 2013 - 9:43 pm | मन१

हे ही रोचक; ते ही रोचक.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2013 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा

पण यातुन बोध घ्यायचा कुणी? ;-)

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Mar 2013 - 9:01 am | श्री गावसेना प्रमुख

दारु समर्थकांनी

उपास's picture

28 Mar 2013 - 11:05 pm | उपास

प्रतिसादात्मक धागा..?

त्याबद्दल जरा माहिती देना भाऊ

पैसा's picture

29 Mar 2013 - 10:07 am | पैसा

माळ्याच्या घरात झोप न येणार्‍या कोळिणीची गोष्ट आठवली!

अनुप ढेरे's picture

29 Mar 2013 - 11:18 am | अनुप ढेरे

अभक्ष्य ते सर्व टाळावे,

'अभक्ष्य ' या सदराखाली काय काय येतं ते सांगाल का?

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2013 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

सकाळी उठावे, प्राणायाम करावे,
मनाला व शरीराला कसवावे,
अभक्ष्य ते सर्व टाळावे,
दारू एवजी- फळांचे रस प्यावे,
शाकाहारी राहावे.
तन प्रसन्न, मन प्रसन्न तर घरात आनंदी-आनंद. जिथे आनंद त्या घरी लक्ष्मी सरस्वती आगमन होणारच. मग घरातच स्वर्ग निर्माण होईल.

आयुष्यात मिपावरती हे असले काही वाचायची वेळ येईल असे वाटले नव्हते.

बाकी, डानरावांच्या वाढदिवसानिमित्त सुरक्षीतता म्हणून हा धागा काढला आहे असे आतल्या गोटातून समजले आहे.

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2013 - 2:53 am | पिवळा डांबिस

आयुष्यात मिपावरती हे असले काही वाचायची वेळ येईल असे वाटले नव्हते.

परा, परा, असा त्रागा नाही करुन घ्यायचा...
(येड)पटाईत धागा म्हणून सोडून द्यायचं!!!!!
:)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2013 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

अहो, दारु पिताना असे काही वाचले की त्रास होतो हो.

कवितानागेश's picture

30 Mar 2013 - 6:00 pm | कवितानागेश

आता मात्र कमाल झाली.
मला हल्ली मिपा वाचताना आवंढा गिळायलापण त्रास होतो, तू प्रत्यक्ष दारु कशी काय पिउ शकतोस?

मन१'s picture

30 Mar 2013 - 6:54 pm | मन१

एक उपायः-
सक्काळी उठून शुद्धीत असताना हे वाचणे सुरु करायचे. हे वाचण्याचा त्रास व्हायला लागला की मग दारु प्यायची; त्रास कमी करायला!
(प्रार्थना करताना मधेच उठून बागेत फिरलेले चालत नाही, पण बागेत फिरताना प्रार्थना केलेले चालते; ही बोधकथा/झेनकथा ठाउक असेलच ;) )

कवितानागेश's picture

29 Mar 2013 - 3:06 pm | कवितानागेश

काहीतरी गोंधळ होतोय का?
पहिल्या अर्ध्या भागातलं स्वर्गसुख, शेवटच्या ओळीतल्या स्वर्गसुखाला टक्कर देइल असं दिसतय..
असो.
ज्याचं त्याचं स्वर्गसुख... आप्ले ते हे.... जाण, समज..जाउ द्या...
म्हन्जे चालू द्या! ;)

पटाईतपणे लेख लिहीला गेला आहे.

पुलेशु!

स्पंदना's picture

29 Mar 2013 - 5:11 pm | स्पंदना

बाबा रामदेव? की रामदेव बाबा?

चिगो's picture

29 Mar 2013 - 6:18 pm | चिगो

मिपावर श्री. मोरारजी देसाईंच्या आत्म्याने काही करणी-बिरणी केलीय का काय? ;-) असो.
शेवटी ज्याची त्याची जाण, समज.. बाकी सध्या बर्‍याच लोकांना इतर मिपाकरांचे बौद्धीक, मानसिक वय पार शिशुवर्गाच्या लेव्हलचे असल्याची जाणीव झाली असावी, असे दिसतेय..

तिमा's picture

29 Mar 2013 - 8:17 pm | तिमा

उद्यापास्नं दागु पिना हगाम है!