सोन्याचं परिवर्तन

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
5 Sep 2008 - 2:29 am

गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत
फेकायची.अशा तर्‍हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या हा बाबू महाराचा मुलगा.
सोन्याची आई कधीकधी बांबूच्या पट्याची काही खेळणी आणि सुपे,रवळ्या टोपल्या सारख्या गोष्टी घेवून दारो दार विकायला जायची.त्यावेळी हा सोन्या तिच्या कंबरेवर बसण्याच्या वयाचा होता.तेव्हा पासून मी त्याला पाहिला होता.
त्याच्या आईचा आवाज,
"सुपा, रवळ्यो, टोपल्यो होयेत गे आई?"
असं घरासमोर मोठ्याने ओरडून माझ्या आईला बोलवावयाची.माझी आई तिच्या कडून एखाद दुसरी वस्तु विकत घ्यायाची.
"एकादी फाटकी पैरण नाय तर चड्डी माझ्या सोन्याक नेसूक आसा काय गे आई?"
हे ऐकून माझी आई माझे किंवा माझ्या धाकट्या भावाचे जूने कपडे तिला द्दायची.तर अशा परिस्थितीत वाढलेला हा सोन्या त्या दिवशी मला व्हि.टी. स्टेशनच्या हारभरच्या प्लॅटफॉमवर भेटला.

इतक्या वर्षानी दिसल्यावर ओळख कशी पटायची हा पण योगायोगच म्हटला पाहिजे.गाडी लेट झाली असल्याने तो बसला होता त्याच्या जवळच मी बाकावर बसलो.हारभर गाड्या नेहमीच लेट असतात ह्या विषयावरून आमचं बोलणं सुरू झालं.आणि त्याची बोलण्याची स्टाईल आणि हसंण्याच्या लकबीवरून माझी स्मृती तिस पसतिस वर्षावार गेली.राहवलं नाही म्हणून मीच त्याला विचारलं,
"तू सोन्या महार का रे?"
तो हो म्हणाल्यावर सहाजिक माझी ओळख करायला तो उत्सुक्त झाला.मला त्याने बरोबर ओळखलं.मग काय जुन्या आठवणीना कहर यायला लागला.दोघानी ठरवलं की आपण कुठे तरी निवांत बसून बोलूंया.क्राफोर्ड मार्केटच्या सदानंद रेस्टॉरंट मधे बसून बोलुंया म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो.संध्याकाळची वेळ होती. ऑफिसीस सुटल्यामुळे त्या रेस्टॉरंट मधे त्यामानाने गर्दी कमी असायची.एका निवांत जागी बसून दोन चहाला ऑर्डर देवून बोलायला सुरवात केली.जुन्या गोष्टी संपल्यावर मी त्याला विचारलं,
"तू आता काय करतोस?"

त्यावर सोन्या म्हणाला,
"गावाहून इकडे मुंबाईला आम्ही सर्व भावंडं आलो.आमचे आई बाबा दोघंही त्यापूर्वी निर्वतले.
इकडे आल्यावर आंम्ही सर्व आमच्या काकाच्या घरात ठाकूरद्वारला रहायला गेलो.चर्नीरोड स्टेशनच्या समोर पारसी अग्यारी वाडीत राहत होतो.
स्वतःच्या भूतकाळापासून स्वतःला दूर ठवणं हे जरा चमत्कारीक वाटतं.
एक दलित माणूस म्हणून मलाच नव्या जगात मी पहातो.मला वाटतं शिक्षणात अशी क्षमता आहे की हे शिक्षण एखाद्दाच्या जीवनात पूर्ण बदलाव आणू शकतं.
मला शिक्षणामुळे ह्या दलित जमातीतल्या जगातल्या एखाद्या सशाच्या बिळातून सुटका करून घेतल्या सारखं वाटतं.मी सत्तर किलोचा भरभक्कम त्या बिळातून सुटलो आणि इतरानी माझ्या पाठोपाठ यावं असा अपेक्षीत राहिलो.आणि आता त्या ऐवजी मलाच मी एका अनोळखी प्रदेशात येऊन,जास्त करून माझा मी राहून ह्या नवीन जीवना बद्दल आश्चर्य करीत राहिलो.
उदाहरणार्थ अलीकडे मी छोट्या छोट्या नाटकात भाग घेऊन पुर्वीच्या झोपडीतल्या चालू करमणुकीतून बाहेर पडलो.मी आता बारबालाच्या कार्यक्रमापासून दूर राहत गेलो.कारण आता मला स्त्रीमुक्तिच्या आंदोलनात डोकाऊन पाहून लक्षात आलं की तसल्या कार्यक्रमातून मिळणारी चेतना त्या स्त्रीयांच्या होणार्‍या शोषणाचं चिंतन करून फिकी वाटू लागली.

अमली पदार्थ वाटणारा तो मवाली मंद दिव्याच्या प्रकाशात मोठ्या डीलर कडून ते पदार्थ घेऊन रेंगाळणारा तो आता त्याचं काय झालं असेल.?
मी मात्र आता लायब्ररीत दलित लेखकांची पुस्तकं वाचण्यात मग्न असतो.आणि जुने माझे दोस्त आता तुरूंगात जीवन कष्टीत असावेत.

तसा मी मला नशिबवान समजतो कारण असलं काही मुर्खासारखं करून पकडला गेलो नाही.असाच मी जेव्हा रस्त्यावर मोकाट फिरायचो तेव्हा मला असलं काही करण्यात एक्सपर्टच समजत नव्हतो.परंतु त्या तारुण्याच्या काळात मी एका मुलीवर कविता लिहिल्याचं आठवतं.तिला माझा पूर्ण तिटकारा का येतो हा त्या कवितेचा आशय होता.ती कविता मी लोकल मासिकात प्रसिद्धिला दिली.त्यावेळी मला व्याक्रण म्हणजे काय आणि कवितेतले यमकासारखे बारकावे तरी काय हे काही समजत नव्हतं.

म्हणून मी पुन्हा शाळेत जाऊन हे शिकायला लागलो आणि एकातून एक निघायला लागलं.
माझी रस्त्यावरची दादागिरी आता हळू हळू जशी वाफ विरळ होऊन लोप पावते तशी व्हायला लागली.चांगल्या जीवनासाठी जगण्याची माझी इच्छा बळावत गेली.
आता सुद्धा मी झगडतोय पण निराळ्या प्रकारची लढाई आहे.लिहिण्या वाचण्याचे फायदे मला आता कळायला लागले आहेत.चर्चा करणं व्याख्यानं ऐकण्याचेही फायदे मला कळायला लागले आहेत.

माझी ही नवी लढाई आणि रणांगणं म्हणजे दलितांच शोषण,गरीबी,स्त्रीयांच शोषण आणि जातपातीचा धिक्कार अशा पॉलीसीवर चालू राहिली.
मला वाटतं मी स्वतःच जागतं बोलतं -शिक्षणात असलेल्या क्षमतेमुळे माणसाचं परिवर्तन कसं होतं ह्याचं- उदाहरण होऊन बसलो आहे.माझी खात्री आहे की नव्या चहर्‍यांच पीक कॉलेज मधे आलं की मला ते प्रोफेसर म्हणून संभोततील.कदाचीत त्या हॉल मधे मी एकटाच दलित चेहर्‍याचा आणि दलित जमातीतला असेन.कदाचीत मला वेगळा पडल्याचा डंक दुखवत
राहिल.पण मी त्या डंकाशी दोन हाथ करीन.कारण मला त्या बदलावर विश्वास बसला आहे की जो शिक्षणाने आलेल्या क्षमतेमुळेच होवू शकतो."

सोन्याचं हे सर्व ऐकून मी खरोखरंच अचंबित झालो.म्हणतात ना,
"शेणातले किडे शेणात राहत नाहीत"
तसंच सोन्याचं पारिवर्तन एका सुशिक्षीत माणसात झालं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

धनंजय's picture

5 Sep 2008 - 2:35 am | धनंजय

शिक्षणाने सोन्याला तारले, (आणि कायद्याने शिक्षण मिळवण्याची संधी दिली असावी.)

भर मुंबईत फलाटाच्या गर्दीत अनायासे गावाकडचा ओळखीचा माणूस भेटावा म्हणजे किती हृद्य योगायोग!

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Sep 2008 - 11:35 am | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
खरंच, अगदी सत्य आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

5 Sep 2008 - 7:30 am | प्राजु

जो शिकेल तो टिकेल..
हे पटतं आहे लोकांना अतिशय आनंदाची बाब आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Sep 2008 - 11:37 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
आपले विचार छान आहेत.
प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com