मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
12 Mar 2013 - 8:36 pm

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'

बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते. त्याची नव्याने मांडणी करते.

पण त्यापूर्वी...

या नाटकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची भाषा.

सध्या मराठीमधे ग्रामीणच्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीच्या बाही मारलं जातंय.
ग्रामीण चित्रपटात शहरी कलाकार 'ग्रामीण'च्या नावाखाली चित्रविचित्र हेल काढून बोलत राहतात .

सगळी सोंगं आणता येतात पण भाषेचं सोंग नाही आणता येत त्यामुळे जी भाषा आपली नाही
ती बोलायच्या फंदात पडा कशाला ?

या नाटकातले सगळे कलाकार स्वतःची ओरिजीनल भाषा बोलतात त्यामुळे भाषेत सहजता आहे.
त्यांच्या जीभेवर ती भाषा लादल्यासारखी वाटत नाही.

यातले पोवाडे खड्या आवाजात आहेत. कलाकार आपापली भूमिका नीटपणे वठवतात.

यातले काही शब्द पहा
मधात - मधे
नटाएला - नटाला
कामून रे - का म्हणून रे

असे अनेक खास शब्द ऐकायला मिळतात. ही भाषा नुसती शब्दात नाही मांडता येणार.
उदा. "काही बी बोलssतो". लांबवलेला ल. जे त्या भागातले असतील त्यांना हे लक्षात येइल.

मेल्या मुडद्या टकुरं डोसकं, आत्ता ग बया याशिवायही ग्रामीण असू शकते ही कल्पना अनेकांसठी नवीन असेल.

असो.

काय आहे या नाटकात -

इ. स. १६८०. स्वर्गात इंद्रदेव यमाला बोलवून घेतो आणि सांगतो.
पृथ्वीवर जा आणि शिवाजीमहाराजांना त्यांच्या विचारांसकट घेऊन ये. पण शिवाजीमहाराज यमाच्या तावडीतून निसटतात आणि त्यानंतर कित्येक शतके यम महाराजांचा शोध घेतच राहतो. ३५० वर्षानंतर महाराजांचा विचार यमाला भीमनगर मोहल्ल्यांमधे 'मिलिंद कांबळे' याच्या रुपाने सापडतो.

पण हा शोध घेताना नाटककार राजकुमार तांगडे(दलपतसिंग येता गावाचे लेखक) काही नवे शोध मांडतात.

१> "शके १५८१ विकारीनाम संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, गुरुवार दुपारी आठवे तासी
स्थळ - प्रतापगड "

असे तपशील एका दमात घडाघडा म्हणून दाखवणे म्हणजे शिवचरीत्र नव्हे.
(आपल्या लक्षात आले असेल हा टोला कोणाला ते)

२> गोब्राह्मणप्रतिपालक - यावर नाटककाराचे भाष्य असे - "खरेतर ब्राह्मणांपासून रक्षण करा गायींचे असे म्हणायला हवे"

३> महाराज गोब्राह्मणप्रतिपालक असते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला का ठार केले असते ?
४> महाराजांचे ३३ पैकी ११ म्हणजे ३३% अंगरक्षक मुस्लिम होते. मग महाराजांचा संघर्ष मुसलमानांविरुद्ध कसा.

५> महाराज धर्मासाठी लढले नाहीत .
६> महाराजांना गरजच नाही वाटली धर्माची. उलट धर्मालाच मोठे होण्यासाठी महाराजांची गरज वाटली.
७> त्यांच्या सैन्यात ३५ % मुसलमान होते.
८> हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर हे त्यांच्या सेवेत होते. अति विश्वासू होते.
तर ते मुसलमानाविरुद्ध कसे ?
९> अफजलखानाचे पोट फाडले, शायिस्तेखानाची बोटे तोडली एवढेच सांगितले जाते. त्यांनी अनेक मराठा सरदारांनाही शासन केले हे सांगितले जात नाही.
१०> नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता, हसन गंगू बहामनी लहानपणी एका भटाच्या
घरी वाढला म्हणून त्याने नाव घेतले बहामनी किंवा ब्राह्मणी.
तर हे मुस्लिम बादशहा हिंदूविरोधी कसे ? ते हिंदूविरोधी नव्हतेच.
११> विजापूरच्या आदिलशाहाची बायको मराठी. आदिलशाहाचा कसा असेल विरोध हिंदूंना ?
१२> शिवाजी महाराजांच्या वडीलांचे व काकांचे नाव शहाजी, शरीफजी. ते शहाशरीफ या दर्ग्यावरून ठेवले होते. महाराज तुकाराम व याकूतबाबा यांना गुरु मानत असत. तर ते मुस्लिमविरोधी कसे ?
१३> अफजलखानाच्या वधानंतर त्यांनी त्याची कबर बांधली. तर ते मुस्लिमविरोधी कसे ?
१४> हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हताच.
१५> ही दलितांची आणि शोषितांची शोषणाविरुद्धची लढाई होती.
१६> महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून काशीहून
गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाला धाक दाखवून आणि भरपूर लाच देवून राज्याभिषेकासाठी आणावे लागले.

१७> संभाजी महाराजही अतिशय विद्वान, शूरवीर होते. बुधभूषण या ग्रंथाची रचना त्यांनी केली.
अनेक भाषा त्यांना अवगत होत्या.
त्यांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांना शिक्षा स्वतः औरंगजेबाने दिल्यासारखी वाटत नाही.
ती शिक्षा मनुवाद्यांनी दिल्यासारखी वाटते. संस्कृत शिकल्याबद्दल जीभ छाटणे,
स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिल्याबद्दल डोळे काढणे.
या सगळ्या शिक्षा मनुवाद्यांच्या आहेत. मनुस्मृतीला अनुसरून आहेत.

१८> महाराजांनंतर आलेल्या 'पेशवाई' मुळे खरा इतिहास बाहेर आला नाही.

मनुस्मृती का जाळली हे समजून घेतले पाहीजे.

'संभाजी महाराजांचा शेवट' याबाबत एका थोर संशोधकाने
मांडलेले विचारही
या लिंकवर
आवर्जून पहावेत, समजून घ्यावेत.

या नाटकात पोवाडे सादर करणार्‍या मंडळामधे पाशा नावाचा एक मुस्लिम युवक आहे.
तोही आपले विचार, वेदना मांडतो. तो म्हणतो "आम्हा मुस्लिमांनाही नेहमी बदनाम केलं जातं.
खतरे में है. खतरे में है. असं म्हणून धार्मिक संघर्षात ओढलं जातं. ज्यापासून आम्ही दूर राहायला हवं."

"आम्ही इथे ९०० वर्षे राज्य केले हेही आमच्या मनावर सतत बिंबवले जाते."

या चर्चेनंतर मिलिंद कांबळे आणि पाशा एक होतात. असे दाखवले आहे

इथे खतरे में है. पण काय खतरे में है ?
हे मात्र नाटककार तांगडे स्पष्टपणे उच्चारत नाहीत.

तर एकूण असे महान संशोधन नाटककाराने आपल्यापुढे मांडल्यावर सर्वसामान्य प्रेक्षक चकीत होऊन जातो.

(स्तिमित झालेला) जोग

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

24 Mar 2013 - 12:46 am | बॅटमॅन

बर्‍याच अंशी तथ्य आहे.

आशु जोग's picture

25 Mar 2013 - 1:30 pm | आशु जोग

काही वर्षांपूर्वी एका साहेबांनी
निरनिराळ्या पत्रकार, साहीत्यिक, इतिहास अभ्यासक यांची बैठक बोलाविली होती.
हे साहेब म्हणजे राजकारणातले साहेब नव्हेत.

हे साहेब म्हणजे या सगळ्या चळवळीचे नेते किंवा पितॄत्व असलेले साहेब.
(यांची ग्रंथसंपदा अफाट आहे)

असो

तर या साहेबांनी एक बैठक बोलाविली होती. त्यामधे त्यांनी सुरुवातीलाच हेतू स्पष्ट केला की
या पुढे संशोधन करताना कोणतीही ब्राह्मणविरोधी गोष्ट दिसली की ती लोकांसमोर आणायची आणि
विशेषत: ब्राह्मण समाजातील संतांची जर काही निगेटीव्ह गोष्ट दिसली तर त्याला मोठी प्रसिद्धी द्यायची.

यात सहभागी एकाने विचारले, "साहेब, तुमची आई केव्हातरी तरुण असेल, तरुणपणी तिने काही चूक, अपराध केला असेल
प्रत्यक्ष कृती नाही पण तसा विचार तरी केला असेल"

साहेब भडकले, म्हणाले, "ए कोणाच्या आईबद्दल बोलतो आहेस रे तू"

यावर उत्तर आले, " तुमच्या आईबद्दल बोलले तर इतका राग येतो मग हे संत म्हणजे आमची आईच आहेत
त्यांच्याबद्दल बोललेले आम्ही कसे सहन करू"

बैठक तिथेच आटोपली.

प्रसाद गोडबोले's picture

25 Mar 2013 - 2:59 pm | प्रसाद गोडबोले

हे साहेब नक्कीच पश्चिम महाराष्ट्रातले असणार ... आजकाल हे लोक फॉर्मात आहेत ...परवाच परेळ स्टेशन वर मी पुस्तक पाहिले " मी दासबोध जाळणार आहे "( लेखकाचे नाव टाळलेलेच बरे ) =))

अवांतर : अशीच एक घटना मीही ऐकुन आहे ...

बॅटमॅन's picture

25 Mar 2013 - 3:09 pm | बॅटमॅन

गरीब कोकटे आपलं कोकलणारे असतील ;)

समीरसूर's picture

25 Mar 2013 - 2:43 pm | समीरसूर

काही काही प्रतिसादांमध्ये क्रौर्याची जी वर्णने आहेत ती बघून त्याकाळी माणसांचेच राज्य होते ना अशी शंका येते. अर्थात ही सगळी माहिती खरी आणि बिनचूक असेल तर.

बाकी इतिहासाची थडगी उकरावीत तेवढी भूतकाळाची निर्जीव मातीच हाती लागते. आपण इतिहासातून शिकतो कमी पण वर्तमानकाळ मात्र नक्कीच खराब करतो. भारतीयांची ती खास ओळख आहे. असो.

मालोजीराव's picture

25 Mar 2013 - 3:26 pm | मालोजीराव

काही काही प्रतिसादांमध्ये क्रौर्याची जी वर्णने आहेत ती बघून त्याकाळी माणसांचेच राज्य होते ना अशी शंका येते.

26/11,9/11,1993 चे स्फोट आणि दंगली ,आसाम आणि म्यानमार च्या दंगली,हिटलर ,हिरोशिमा नागासाकी हे वाचूनसुद्धा 300 वर्षा नंतरचा माणूस हेच म्हणेल ;)

बॅटमॅन's picture

25 Mar 2013 - 3:36 pm | बॅटमॅन

इंडीड!!!

कोकाटे नाही त्यांचेही साहेब आहेत हे

आणि राजकारणातले साहेब नाहीत.

मनोरंजनासाठी यांच्या पुस्तकाची नावे एकदा देइन इथे.

खेडेकर नैतर साळुंखे नैतर अजून कोणी असतील. अशी ४ टाळकी सोडल्यास आहेच कोण म्हणा.

आशु जोग's picture

25 Mar 2013 - 4:28 pm | आशु जोग

साळुंखेंना सोडा सध्या.

बरोब्बर ओळखलत.

चित्रपटासारखी माध्यमेदेखील काही विचार पेरताना दिसतात .

काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता.
त्यात एक मंत्री गद्दार, देशद्रोही असतो. त्याचे नाव देवधर
आणि डॉ. अन्सारी प्रखर देशभक्त.

असे दाखवून काय साध्य झाले.
अहो देवधरला देश सोडावा लागला तर जगात दुसरा कोणताच देश त्याला घ्यायला तयार होणार नाही

पण अन्सारीला मात्र ५० देश आहेत.
आमच्या मराठवाड्यातली औरंगबाद, नांदेडची उदाहरणे पहा.
तिथली मुले दहशतवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी सौदीला चकरा मारतात.

पानिपतावर लढणार्‍या मराठ्यांकडे काही अफगाणांची पगारी फौज होती.
ऐन युद्धाच्या वेळी मात्र त्यांच्या तलवारी मराठ्यांच्याच विरुद्ध उलटल्या.

गद्दारी केल्यास स्वर्गात स्थान मिळेल असे तत्त्वज्ञान डोक्यात भरवले असणार या अफगाणांच्या.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2013 - 12:56 pm | श्रीगुरुजी

या नाटकातल्यासारखाच प्रचार आंतरजालावरून सदैव सुरू असतो. उदाहरणादाखल खालील पान पहा.

http://www.facebook.com/#!/photo.php?fbid=528389137211618&set=at.4072814...

सुहास..'s picture

1 Apr 2013 - 1:42 pm | सुहास..

Endless !

> सर्वच जगाचा इतिहास कत्तली, लुटालूट, अत्याचार, धर्मांधता असल्या गोष्टींनी भरलेला आहे. कोणत्याही एका जातीला, पंथाला किंवा धर्माला त्यातून हात झटकता येणार नाहीत

काहीतरी जनरल टाकला म्हणजे २ मिनिटे विचारवंताचा फील येतो हे खरे आहे

पण आपण ज्या हवेतल्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टी बोललात त्याचा व्यवहारात नेमका अर्थ काय

शब्दांत जे लिहिले आहे त्याला जनरल आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणणे ही विचारवंत होण्याची लक्षणे आहेत असे आजवर उगाचच वाटत होते. त्यासाठी स्पष्ट लिहिणे पुरेसे असते हे नवलच म्हणायचे!
वर जे काही लिहिले आहे तोच त्या शब्दांचा नेमका अर्थ आहे. ज्यांना त्या गोष्टी हवेतल्या वाटत असतील त्यांनी व्यवहारातील कठोर सत्ये स्वीकारण्याची सवय लावून घेतली तर तो अर्थ आपोआप स्पष्ट होईल.

आशु जोग's picture

10 Apr 2013 - 7:09 pm | आशु जोग

हे राम !
माणसाच्या पातळीवर काही लिहा ना

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2013 - 4:22 pm | निनाद मुक्काम प...

नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता,
तरीच म्हणतो आमच्यात हे राजेशाही गुण , रुबाब , तोरा , कुठून आला
आता उत्तर सापडले .
आतच माझ्या पत्नीला सांगतो , आमचे पूर्वज राज्यकर्ते होते.
पुढे ते डोंबिवलीत स्थायिक झाले.

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2013 - 6:43 pm | प्रसाद गोडबोले

नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता,
>>> %)
हा शोध कुणी लावला ??

आशु जोग's picture

9 Apr 2013 - 10:56 pm | आशु जोग

छत्रपती संभाजी महाराज यांची उद्या पुण्यतिथी.
चला वढूला, संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करायला

हुप्प्या's picture

10 Apr 2013 - 4:30 am | हुप्प्या

महाराज रमझानमधे रोझे पाळत होते. त्यांना पूर्ण कुराण मुखोद्गत होते. आणि अर्थातच संभाजीराजांनाही! प्रत्येक शुभ कार्याची नव्हे पाक कामाची शुरुआत ते बिस्मिल्ला उर्रहमानउर्रहीम ह्या पवित्र प्रार्थनेने करायचे. हर हर महादेव वगैरे साफ झूठ!
मुळात हे राजघराणे हिंदू नव्हतेच. अस्सल मुस्लिम घराणे होते हे म्हणूनच इतके न्यायी, नि:स्वार्थी, नेतृत्वकुशल होते ते.
हिंदू धर्मात काहीतरी खोट आहे ज्यामुळे तिथे इतका थोर पुरुष जन्माला येणे शक्यच नाही.
मुळात गोब्राह्मणसंहारक अशी पदवी भटी कावा करुन गोब्राह्मणप्रतिपालक अशी बदलली तिथेच सगळे पितळ उघडकीस आले.
शिवाजी झिंदाबाद! अल्लाहु अकबर!

अर्धवटराव's picture

10 Apr 2013 - 6:52 am | अर्धवटराव

मित्रा, असे प्रतिसाद नको देत जाऊ रे. तुला ज्यांना खरच मॅसेज द्यायचा आहे त्यांच्यापर्यंत असे लोक मिपावर (बहुदा) येत नाहि. बाकिच्यांची मने मात्र दुखावली जातात. अशाने हे संस्थळ अनेक चांगल्या सभासदांपासुन वंचीत राहील. काहि अगोदरच येण्याचे टाळतात, काहि नविन जोडायचे थांबतात. (सामाजीक सद्भावनेबद्दल वगैरे भाषण देत नाहि. आपण सध्या मिपापुरता विचार करुया)

अर्धवटराव