२६/११ - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
4 Mar 2013 - 11:16 pm

राम गोपाल वर्माचा २६/११ सिनेमा पाहिला .. - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य आहे हे !

अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत.

d

उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत.

१) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग .. रक्तपात अंगावर काटा उभा करतात.

२) कसाबाची भूमिका - उत्तम . हा अगदी खरा खरा कसाब वाटतो. केवळ त्याच्यासाठी सिनेमा बघायला हरकत नाही .

hm

३) इतर शहीद पोलिस अधिकारी करकरे , साळस्कर , - फार कमी फ़ुटेज

४) एन एस जी कमांडो , मेजर उन्नी कृष्णन - सिनेमात नाहीतच .

५) नाना पाटेकरने साकारलेली जोइंट कमिश्नर राकेश मारिया यांची भूमिका -अतिसामान्य

बाकी तात्पर्य काय - शून्य. दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य

कसाब नाना ला सांगतो - काफ़िरांना मारल्या वर जन्नत मिळते . अस कुराणात लिहील आहे. शिणुमात या डायलोग मध्ये कुराण साठि "अल किताब" असा शब्द वापरला आहे. अल किताब म्हण्जे कुराण हे मुस्लिमाना माहित असतं हिंदुना माहित नसत. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांना ते कळत नाही . असो . तर कसाब नाना ला त्याची भूमिका सांगतो .- दिन (इस्लाम धर्म ) खत्र्यात आहे. त्यावेळी जिहाद करायला पाहिजे अस ' किताब ' मध्ये लिहिलेलं आहे. काफिर लोकाना जिहाद करून ठार मारले कि जन्नत (स्वर्ग) मिळते. स्वर्गात हूर (पर्या ) मिळतात . त्या दुधान अंग धुतात . जिहाद मध्ये जिंकलो तर गाझी आणि मेलो तर शहीद वगैरे वगैरे ... अशी शहादत मला मिळवायची आहे. आणि हे सगळ " अल किताब " मध्ये लिहील आहे बर का !अणि मग शेवटी राम गोपाल वर्मा स्टाइल रियलिस्टिक शिव्या - साल्या काफर ***** - पाच अक्षरि मकारी शिवी ज्याच्या शेवटी द येतो .

हायला भलताच रियालिस्टिक सिणुमा बाई !

शिव्या म्हण्जे रियालिटी असे ज्यांना वाटते त्यांनी आवर्जून शिणुमा पहावा .

yty

आता ह्यो सगळा सेन्सोर मध्ये पास कसा व्हायचा ? मंग नाना पाटिकर कासाबला इस्लाम चा खरा अर्थ सांगतो. च्यायला आता मात्र अति होतं ..... पाक मध्ये जन्मलेल्या . त्या धर्माच्या धार्मिक संस्कारात घडलेल्या. ट्रेनिंग झालेल्या कासाबला इस्लाम चा खरा अर्थ माहित नाही. ... मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो. आणि मग .... मग काय एकदम कासाबला भडभडून येत ... कासाबला वाटु लागत हायला चुकलच कि - मग फासावर जाताना तो लहान बालकाप्रमाणे मुळू मुळू रडतो .

कारण कि नाना सांगतो ना त्याला -- अरे जन्नत सोड --- जहन्नुम (नर्क) च्या दारावरचा सैतान सुद्धा तुझ्या **वर लाथ मारून हाकलून देईल. ** हा परत एक राम गोपाल वर्माचा ग कारी दोन अक्षरि रियालिस्टिक शब्द... हायला ! आता एव्हढी रियालिटी तुमच्या पचनी पडत असेल .. तर नाना पाटेकरचे ओव्हर एक्टिंग ने भरलेले इस्लामवरील प्रवचन तुम्ही मुळातूनच ऐकल पाहिजे. इथे प्रवचनात स्तुती करताना मात्र कुराण अल्लाह असे कळणारे शब्द येतात . ना - ना पाटेकर कासाबला सांगतो - तू कुराण वाच - तू कुराण वाचलेच नाहीस. इथे मात्र मी हसून हसून लोटपोट झालो होतो. च्यायला जगातल्या सर्व धर्मांचे खरे अर्थ वगैरे सांगण्याची जवाबदारी आपण कधी सोडणार आहोत.? कासाबला कुराण चा खरा अर्थ सांगण्याची जवाबदारी स्वीकारलेला नाना ...... हल्ल्याच्या वेळी रडताना .. भांबवलेला वगैरे दाखवलाय .. नानाचे पोलिस दल रडताना घाबाराताना आपण सिनेमातही पाहू शकता ..

कारण त्यावेळी कसाबाचे धार्मिक प्रवचन त्याच्या एके ४७ मधून घडत असते.

चित्रपटप्रतिसाद

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

4 Mar 2013 - 11:28 pm | अर्धवटराव

आर. जी. व्ही. कडुन आणखी काय अपेक्षा करणार. त्या घटनेवर पिच्चर काढायची उतु जाणारी रामुची हौस लातुरकरांना फार नडली... सी.एम. ची खुर्ची गेली कि वो... तो प्रसंग पण हाये काय शिणुमात??

अर्धवटराव

आदूबाळ's picture

4 Mar 2013 - 11:36 pm | आदूबाळ

:)

साला एक मच्छर आदमी को...

या घटनेवर चित्रपट काढायला रामूपेक्षा अनुराग कश्यप जास्त लायक होता. असो.

आशु जोग's picture

5 Mar 2013 - 1:01 am | आशु जोग

आदूबाळ
एव्हढा कसा रे शाम तू.
> जगातलं पहिलं दही बनवताना विरजण कशाचं वापरलं असेल ?

गंजातलं, पातेल्यातलं.

जग

अहो, पण पातेल्यात/गंजात तरी कुठून आलं? :)

असो - पुढच्या गप्पा ख.व.त मारू. या धाग्याचा कात्रज नको करायला. नानासो यांच्या खालच्या प्रतिसादामुळे आधीच धाग्याचा चेचेन्या होणार असं दिसतंय!

बॅटमॅन's picture

4 Mar 2013 - 11:38 pm | बॅटमॅन

च्यायला!!!!!

बरं.

नाना चेंगट's picture

4 Mar 2013 - 11:45 pm | नाना चेंगट

हं. एकंदर राजघराणं या नावाला साजेसा लेख.
भारतीय, हिंदू, संस्कृती यांना बालिश वगैरे विशेषणं लावल्याशिवाय बरं न वाटणारी एक हलकट मनोवृत्ती दिसून येते.
केवळ बालिश भाष्य असा उल्लेख चालला असता पण भारतीय हा शब्द वापरण्याची खाज कशी फिटली असती? आता इथे तुम्ही म्हणाल की सिनेमा भारतीय आहे म्हणून बालिश भारतीय भाष्य म्हटले. पण त्यात अर्थ नाही. कारण कला ह्या सर्वांच्या पलिकडे असते असेच काही दिवसांपूर्वी कूणीतरी घसा खरवडून सांगत होतं. तेव्हा कलेत भारतीय अभारतीय असं नसतं म्हणे. नसतं ना मग भारतीय शब्द वापरुन ओकार्‍या का? तसे करण्याचे कारण एकच की मग काही कारण नसतांना उजव्या मताच्या लोकांवर थुंकता कसे आले असते? अत्यंत दरिद्री मनोवृत्ती.

>>>शिव्या म्हण्जे रियालिटी असे ज्यांना वाटते त्यांनी आवर्जून शिणुमा पहावा .
असं कसं? काही विचारवंतांनीच असं साहित्य हेच खरं साहित्य असतं आणि ज्याला अभिजात साहित्य मानलं जातं ते आता नामशेष झालं आहे असं इथेच आम्हाला शिकवलं होतं, त्याविरुध्द ब्र काढण्याची आमची तरी हिंमत नाही ब्वा !

>>>च्यायला जगातल्या सर्व धर्मांचे खरे अर्थ वगैरे सांगण्याची जवाबदारी आपण कधी सोडणार आहोत.?
का सोडावी? अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही काय फक्त स्वतःला विचारवंत समजणार्‍यांची मक्तेदारी थोडीच आहे?

>>>हल्ल्याच्या वेळी रडताना .. भांबवलेला वगैरे दाखवलाय .. नानाचे पोलिस दल रडताना घाबाराताना आपण सिनेमातही पाहू शकता ..

हे प्रत्यक्षात पण घडू शकतं. पोलीस सुद्धा माणूस आहे विचारवंत नाही.

एकंदरीत गरळछाप विचारवंती परिक्षण... चालू द्या...
मी हा पिच्चर काही पाहिला नाही. पाहण्याची शक्यत नाही.
मात्र

२६/११ च्या हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व निर्दोष आणि निष्पाप माणसांना माझी पुन्हा एकदा विनम्र आदरांजली.

कवितानागेश's picture

5 Mar 2013 - 12:53 am | कवितानागेश

पोलीस सुद्धा माणूस आहे विचारवंत नाही. >>
=))

Dhananjay Borgaonkar's picture

5 Mar 2013 - 9:03 am | Dhananjay Borgaonkar

अगदी करेक्ट बोललास नाना. मी सुद्धा परीक्षण वाचल्यावर हीच प्रतिक्रिया देणार होतो.
उजव्या हिंदूनी फोन केला म्हणुन हे गेले होय पिच्चर पहायला. स्वतःच काही डोकं अस नाहीच का?
तद्दन भिकारडं परीक्षण. परी़क्षणापेक्शा पिच्चर नक्कीच चांगला असेल यात काहे वाद नाही.

वेताळ's picture

5 Mar 2013 - 10:38 am | वेताळ

अत्यंत टुकार आणि हिणकस परिक्षण.... निव्वळ एका समुदायाची टिंगल उडविण्याचा केविलवाणा प्रयत्न....

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2013 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद रे नानबा.

माझे टंकनाचे सगळे कष्ट वाचवलेस. हिंदू धरम, संस्कृती ह्याची यथेच्छ टिंगल करुन आपण कसे 'समाजसुधारक', 'विचारवंत', एकूणात जगातले एकमेव बॅलेन्स्ड पर्सन आहोत हे दाखवण्याचा खटाटोप..

असो..

बाकी सदरहू लेखकाने फेसबुकवरती सध्या नानाचा जो व्हिडो फिरत आहे तो आणि फक्त तोच पाहून सदर परिक्षण लिहिलेले आहे हे उघडच आहे.

राजघराणं's picture

5 Mar 2013 - 11:44 am | राजघराणं

निदान परिक्षण तरि पुर्ण वाचावे ... टिका करण्या आधि ... रामुने इस्लाम धर्माचे उदत्तिकरण चलवले आहे म्हणुन चित्रपटावर टिका आहे

राजघराणं's picture

5 Mar 2013 - 11:45 am | राजघराणं

इस्लामगौरवाद्बद्दल उदासिन आहेत म्हणुन खंत

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2013 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार

हास्याचा धबधबा......

अहो राजघराणं साहेब आपण काय बोलत आहात (माफ करा, पण 'बरळत आहात' असे खरेतर योग्य होईल) हे तुम्हाला तरी कळतय का?

लेखात तुम्ही म्हणताय :-

अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत.

उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत.

आणि प्रतिक्रियेत म्हणता :-

रामुने इस्लाम धर्माचे उदत्तिकर चलवणले आहे म्हणुन चित्रपटावर टिका आहे

म्हणजे असे 'इस्लाम धर्माचे उदात्तीकरण करणारे' शिणेमे ज्यांना आवडतात आणि जे इतरांना फोन वैग्रे करून ते बघायला लावतात, त्यांना उजवे-कडवे-भगवे वैग्रे म्हणतात का ? अहो मग जर ते इतके सौजन्यधारी आहेत, तर त्यांच्यावरती धर्मांध म्हणून टिका का होते बरे ?

नानबा's picture

5 Mar 2013 - 11:52 am | नानबा

या प्रतिक्रियेवर ह.ह.पु. :)) :))

सूड's picture

5 Mar 2013 - 11:54 am | सूड

जे ब्बात !!

राजघराणं पुरते कोलमडले आहे.

सुहास झेले's picture

5 Mar 2013 - 5:03 pm | सुहास झेले

:D :D :D

+ १०^१०००००००००००००००००००००००!!!!!!!!

प्यारे१'s picture

5 Mar 2013 - 7:04 pm | प्यारे१

परा दुत्त आए, मला पतिशाद आलेले त्याला बगवत नाईत, त्याचं घलच उनात बांदनाले मी.

- लाजगलानं :)

बॅटमॅन's picture

5 Mar 2013 - 7:11 pm | बॅटमॅन

लाजगलानं

हा शब्द वाचून लाज सोडलेल्या आणि गळून गेलेल्या कुणाशी निगडित आहे की काय असे वाटल्या गेले क्षणभर =))

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2013 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

या चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद. सिनेमागृहात जाऊन पाहायचा बेत रद्द करणे सोपे झाले.

शीर्षकातला 'भारतीय' शब्द खटकला. दिग्दर्शकाने जे स्वतःचे भाष्य केले त्याला 'भारतीय' का म्हणावे?

विकास's picture

4 Mar 2013 - 11:54 pm | विकास

असेच या शिणुमाबद्दल ऐकले आहे. म्हणजे अगदी ताज मध्ये (तत्कालीन) मुख्यमंत्र्यांबरोबर तात्काळ प्रवेश मिळूनही काही जमले नाही असे दिसते.

एन एस जी कमांडो , मेजर उन्नी कृष्णन - सिनेमात नाहीतच .

त्याच बरोबर ओबेराय हॉटेल आणि नरीमन हाऊसचा देखील उल्लेख नाही असे ऐकले आहे.

राजघराणं's picture

5 Mar 2013 - 12:11 am | राजघराणं

साहेब आपण माझ्याबद्दल काहितरि जबर्दस्त पुर्व ग्रह करुन घेतलेला दिसतो आहे.

हल्ल भारतावर झाला होत .. आणि रामुने जि उथळ व्रुत्ती दहशत्वादाच्या चिकित्सेसाठि वापरलि आहे ... तिच सर्व भारतिय वापरतात ....

येव्हढ चिडायला काय झाल भौ

इतकं भिकार परीक्षण या चित्रपटाबद्दल येईल असं वाटलं नव्हतं. आम्ही तुमच्या सारखे कडवे पुरोगामी नाही की सो कॉल्ड विचारवंत नाही, त्यामुळे सिनेमा आवडला.

>>"अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि " याचा अर्थ कळला नाही, पण तुमचं परिक्षण वाचून तो विचारावा अशी इच्छाही नाही.

आशु जोग's picture

5 Mar 2013 - 12:44 am | आशु जोग

२६/११ च्या घटना जिथे घडल्या ती ठिकाणे प्रत्यक्ष पाहता यावीत म्हणून विलासरावांनी रामूसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकाला तिथली सफरही घडवली होती. त्यापायी त्यांचे पदही गेले होते.

एवढे मोठे स्वप्न पडद्यावर आणले पण ते पहायला विलासराव आज नाहीत.

जाऊदे
बडे बडे शहरो में .. ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Mar 2013 - 2:10 am | निनाद मुक्काम प...

ह्या हल्ल्यात ज्यू धर्मियांवर हल्ला म्हणजे वैश्विक जिहादचा भाग होता थोडक्यात दहशतवादाच्या पाकिस्तानातील वैश्विक युनिवर्सिटी ला आखातातून पेट्रो डॉलर ची
स्कॉलरशिप मिळवून देणे व तेथून गुणवंत विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण साठी आणणे
जे पुढे गाझा व जगभरात आपली गुणवत्ता दाखवू शकतील असा दुहेरी हेतू होता ,
पण सिनेमात त्याचा उल्लेख केला नाही कारण ज्यू धर्मियांच्या वर हल्ला व त्यांना वाचवण्यासाठी भारतीय जवानांची पराकष्ठा दिसली असती तर भारतात अल्प अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्या असत्या व सिनेमा गोत्यात येऊ शकला असता.
सिनेमात कसाब वर जास्त फोकस ठेवण्यात आला.
व जिहाद वर प्रवचन देण्यात आले
हे मान्य आहे, मात्र हा सिनेमा पुढे फक्त चित्रपटगृहात नाही तर बनावट सीडी व टीव्ही वर प्रदर्शित झाल्याने भारतातील कानाकोपर्यात सर्व ठरत पहिला जाणार.
ग्रामीण भागातील व शहरातील मुस्लिम तरुणांना माथी भडकवणारे भाषणे दाखवून
इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी तयार करतात. तेव्हा असे प्रवचन दाखवणे हे ओघाने आले ,
इस्लाम शांततेचा धर्म आहे व त्यात हिंसा मान्य नाही , व मासूम लोकांची जान घेणे इस्लाम मध्ये मंजूर नाही अश्या आशयाची भाषणबाजी मी पाकिस्तानी प्रसार माध्यमांतून अलीकडच्या काळात खूप ऐकत आहे
कारण तेहेरीके तालिबान त्यांना घरचा आहेर देत आहेत.
तेव्हा ह्या सिनेमातून रामूचा हेतू चांगला दिसतो.
मुळात लहान मुलाचा ताज मध्ये गोळी घालून मारणारे अतिरेकी हे दृश्य पाहून भारतीय जनता नक्कीच ज्या मानवाधिकार संस्था अतिरेकी लोकांच्या वतीने गळा काढतात
त्यांना पुढे काडीची किंमत देणार नाही.
प्रत्येक सिनेमा हा मदर इंडिया च्या लेवल चा असावा असा आग्रह का धरायचा

निनाद मुक्काम.. यांचा प्रतिसाद आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2013 - 2:26 am | अत्रुप्त आत्मा

आंम्हास माहित होते कि रामू या विषयात 'माती' खाणार म्हणून ! आणी त्यानी ती खाल्लीच. :-)
हे खरे ई मान दार :-b

दादा कोंडके's picture

5 Mar 2013 - 2:55 am | दादा कोंडके

मस्तच.

इस्लामी दहशतवादावर आधारीत कोणत्याही सिनेमात खरा इस्लाम म्हणजे यंव त्यंव असं सांगत असतील तर ते सर्वच बालिश वाटतं. ज्या धर्मग्रंथात 'इस्लामीकरणाच्या मध्ये आलेल्या माणसांना मारल्यावर जन्नत मिळते' असं वाटू शकतं ते मानायचच का? मुळात माणूस म्हणून चांगलं वागायला कुराणच्या (किंवा फोर द्याट म्याटर कोणत्याही धर्म ग्रंथाच्या) कुबड्या कशाला हव्यात? गांधींनी अस्पृश्यते बाबत "I would far rather than hinduism died than that untouchability lived" विधान केलं होतं तसं या बाबतीत बेधडक विधान करताना कुणी का दिसत नाही?

चौकटराजा's picture

5 Mar 2013 - 10:54 am | चौकटराजा

मुळात माणूस म्हणून चांगलं वागायला कुराणच्या (किंवा फोर द्याट म्याटर कोणत्याही धर्म ग्रंथाच्या) कुबड्या कशाला हव्यात?
एक हजार टक्के सहमत. असा प्रमाणग्रंथ आमच्या धर्माला नाही. याचाच गर्व आहे.

धन्या's picture

5 Mar 2013 - 11:28 pm | धन्या

असा प्रमाणग्रंथ आमच्या धर्माला नाही. याचाच गर्व आहे.

होते की. :)

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2013 - 4:21 am | राजेश घासकडवी

धन्याभाऊजी, हिंदू धर्माला उगाचच्या उगाच शिव्या देणारांच्या कळपात तुमचाही समावेश झाला तर. कुठचे प्रमाणग्रंथ त्या अल-पुस्तकाइतके वाईट होते सांगा की!

कपिलमुनी's picture

5 Mar 2013 - 8:18 am | कपिलमुनी

आणि एककल्ली चित्रपट परीक्षण...
बाकी , बालिश भारतीय भाष्य ? यावर बरेच बोलता येइल ..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2013 - 9:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

परिक्षण आवडले नाही.

नाना पाटेकरने साकारलेली जोइंट कमिश्नर राकेश मारिया यांची भूमिका -अतिसामान्य

असहमत. नाना पाटेकरांनी न्याय दिलाय भुमिकेला.

देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत.

तुम्ही कोणाच्यातरी आग्रहाला म्हणा विनंतीला म्हणा बळी पडुन गेलातचं ना, मग कडव्या हिंदुना कशाला बोल लावतं आहात?

भारतीय, हिंदू, संस्कृती यांना बालिश वगैरे विशेषणं लावल्याशिवाय बरं न वाटणारी एक हलकट मनोवृत्ती दिसून येते.

नाना चेंगट ह्यांच्याशी सहमत.

विषेशतः कामा हॉस्पिटलचे डॉक्टर जोशि, शहिद पोलिस तुकाराम ओंबाळे व इतर काही एक दोन रेफरन्स सोडले तर, अगदी सामान्य मुंबैकरांचे प्रसंगावधान, धैर्य, परीस्थितीशी लढत व मनुष्यहानी कमी होण्यात लागलेल्या हातभार याचा यथोचित मागोवा घेण्याकडे सपशेल दुर्लक्ष.

शहिद पोलिस कामटे, करकरे, साळसकर यांच्यावर झालेल्या हल्यासंदर्भात राकेश मारिया वर्शनचे चित्रण. कामटे यांच्या पत्निने सरकारने घेतलेल्या असहकार्याच्या भुमिकेच्या विरोधात, केवळ एक सामान्य नागरीक या नात्याने माहितीचा अधिकार वापरुन या संदर्भातील अधिकृत सरकारी नोंदी, रेफरन्स, कंट्रोलरुम संभाषण तपासुन लिहलेले टु द लास्ट बुलेट या पुस्तकातल्या घटनाक्रमाकडे संपुर्ण पाठ फिरवली आहे.

अवांतर :-

अतिशय इंटेन्स प्रसंगात व फारच क्वचीत कधी कसाब तर कधी राकेश मारियांच्या तोंडात येणारी शिवी कुठेही कधीच खटकत नाही. असे प्रसंगही चित्रपटात बहुदा दोन अथवा तिनच.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2013 - 10:57 am | मृत्युन्जय

पाकिस्तानच्या मिलिटंट ट्रेनिंन एकॅडमी मध्ये कशी जिहादची भाषणे देतात हे सर्वज्ञात आहेत. तिथे सर्वधर्मसमभावाची शिकवण देउन बौद्धीय तत्वज्ञानाचे पाठ पढवण्यासाठी शांतीदूत जगभर पाठवतात अशी कल्पना करणे मुर्खपणाचा कळस ठरेल. असे असताना. कसाबला कुराणातल्या आयता पढवुन भारतात पाठवले नसेल असे समजण्यात काहिच अर्थ नाही. धार्मिक ग्रंथातले सोयिस्कर शास्त्र अज्ञानांच्या गळी उतरवुन कामे करुन घेण्याची जुनी पद्धत आहे. बर्‍याचदा या शिकाऊ अतिरेक्यांना कुराणाचा गंधही नसतो. कुराणातल्या अरबीए शब्दांचा सोयिस्कर अर्थ लावुन किंवा सोयिस्कर अशी वचने काढुन तेवढीच त्यांच्या मनावर बिंबवणे हेच कार्य या अतिरेकी शिबिरांतुन होते. हेच जर चित्रपटात दाखवले असेल तर राजघराणं साहेबांना काय खटकले हे तो देवच जाणे.

पोलिस अधिकारी आणि ते सुद्धा उच्चपदस्थ ही माहिती जाणुन असतात. तद्नुषंगाने थोडाफार अभ्यास केल्यास कुराणातीलच वचने शोधुन अतिरेक्यांना त्यांच्या शिकवणीतील चुका दाखवुन देणे फारसे अबघड नाही. मी एक पोलिस अधिकारी असतो तर असे नक्की केले असते. तेच राकेश मारियांनी केले असेल किंवा केले नसेल् पण तरीही रामुने तसे दाखवले असेल तर त्यात काही चुकीचे असेल असे वाटत नाही.

बाकी कसाबच्या रडण्याचे नाट्य एवढे काही वावगे वाटुन घेण्यासारखे वाटत नाही. तेवेढी सिनेमॅटिक लिबर्टी की काय ती असतेच की हो शिनेमावाल्यांना.

बाकी एकुणातच इस्लामी दहशतवादाला नावे ठेवल्याने राजघराणं साहेबांना राग आला असेल तर समजु शकतो. आजकाल बर्‍याच विचारवंतांना त्याची जळजळ होते. "भगवे लोक " अवतरणातले देशभक्त वगैरे अश्या माध्यमातुन ती जळजळ बाहेर पडते. असो.

राजघराणं's picture

5 Mar 2013 - 11:31 am | राजघराणं

निदान परिक्षण तरि पुर्ण वाचावे ... टिका करण्या आधि ... रामुने इस्लाम धर्माचे उदत्तिकरण चलवले आहे म्हणुन चित्रपटावर टिका आहे

बॅटमॅन's picture

5 Mar 2013 - 11:43 am | बॅटमॅन

हा हा हा...हे बाकी कुणाच्या लक्षात आलेलं दिसत नै.

वेल्लाभट's picture

5 Mar 2013 - 11:02 am | वेल्लाभट

कुठे हरवला 'कंपनी' चा तो 'वास्तवात' वर्मा !?!

रामूकडून आणखी काय अपेक्षा ठेवायच्या? भूत आणि डरना मना है सारखे भिकार चित्रपट काढायची लायकी त्याची, या विषयात तो चांगली घमेलंभर माती खाणार हे अपेक्षितच होतं. हाच चित्रपट अनुराग कश्यप, निरज पांडे (अ वेन्सडे चा दिग्दर्शक) यांनी काढला असता तर चित्रपट आणि परिक्षण दोन्ही उत्तमच असतं..

कपिलमुनी's picture

5 Mar 2013 - 2:47 pm | कपिलमुनी

No Smoking पाहिला असेल अशी अपेक्षा करतो !!
बाकी भूत काय वाइट होता ?? एक साधारण भूत पटा मधे असता तसा होता !!

भूत बरा होता ओ. पण तेवढीच मजल आहे हो रामुची.. असल्या गंभीर विषयांवर चित्रपट काढायची नाही..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Mar 2013 - 1:03 am | विश्वनाथ मेहेंदळे

रामूने कुठले कुठले चित्रपट बनवले आहेत हे माहित तरी आहे का साहेब? शिवा, रात, रंगीला, कौन, सत्या, कंपनी ही नावे ऐकली आहेत कधी ? एका सत्या साठी १० टुकार चित्रपट माफ आहेत त्याला.

अवांतर :- तुम्ही ज्याची वाखाणणी करत आहात त्या अनुराग कश्यपने चित्रपटाचे पहिले धडे रामूच्या हाताखाली गिरवले आहेत.

अग्निकोल्हा's picture

6 Mar 2013 - 1:02 pm | अग्निकोल्हा

एका सत्या साठी १० टुकार चित्रपट माफ आहेत त्याला.

पण याचं रामुला भान आहे का ? एकट्या आरजिव्हीच्या आगिसाठी त्याने निवृत्ति घ्यायला हवी होती. तेंडुलकर कडुन लोक प्रत्यक्ष चांगल्या गोष्टी कधी शिकणार देवच जाणो..... सगळेच सेहवाग बनु र्‍हायले मधुनच एक फिफ्टी अन धा सामने बदकाच्या आसपास.

अवांतर :- तुम्ही ज्याची वाखाणणी करत आहात त्या अनुराग कश्यपने चित्रपटाचे पहिले धडे रामूच्या हाताखाली गिरवले आहेत.

सत्याचा स्क्रिनप्ले अनुराग कश्यपने लिहला होता. म्हणजे संपुर्ण चित्रपटाचा आराखडा, लेखकांच्या संवादाचे पडद्यावरील प्रसंगात रुपांतर, कॅमेरा मुव्हमेंट, वगैरे वगैरे चित्रपटाची फ्रेम बाय फ्रेम कसा बनला पाहिजे याचे सर्व डिटेल्स अनुराग कश्यपने क्रिएट केले... आणी रामुने तो दिग्दर्शीत केला होता म्हणजे मिळालेल्या स्क्रिप्ट नुसार त्याने क्यामेरामनला क्यामेरा हलवायला सांगितला व कलाकारांकडुन यशस्वीपणे अपेक्षित अभिनय करुन/काढुन घेतला.

थोडक्यात, अवांतर पटलं नाही. रामुच्या हाताखाली धडे गिरवुन तो रामुच्या पुढे जाउ शकत नाही हा नियम असेल तर त्याचा कर्ण अथवा एकलव्य बनवला गेला समजण्यास वाव आहे. सालं निव्वळ अंगभुत टॅलेंटला जगात काय किंमत हाय का नाय राव ??? :(

म्हणुनच एव्हडा आवडुनही सत्याच्या स्क्रिन्प्ले रायटिंगबद्दल माझ्या माहितीतल्या एखाद्या शेंबड्यालाही अनुराग कश्यपला सत्यासाठी सामान्य प्रेक्षकाच्या भुमिकेतुन ड्यु क्रेडीट द्यावस वाटल नाही ही एक शोकांतिकाच होय. असो, आता जेंव्हा मलाच असह्य सर्दी डोकेदुखि होइल तेव्हां मी हे काम किमान मिपावर उरकुन घेइन.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Mar 2013 - 12:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

सत्याचा स्क्रिनप्ले अनुराग कश्यपने लिहला होता. म्हणजे संपुर्ण चित्रपटाचा आराखडा, लेखकांच्या संवादाचे पडद्यावरील प्रसंगात रुपांतर, कॅमेरा मुव्हमेंट, वगैरे वगैरे चित्रपटाची फ्रेम बाय फ्रेम कसा बनला पाहिजे याचे सर्व डिटेल्स अनुराग कश्यपने क्रिएट केले... आणी रामुने तो दिग्दर्शीत केला होता म्हणजे मिळालेल्या स्क्रिप्ट नुसार त्याने क्यामेरामनला क्यामेरा हलवायला सांगितला व कलाकारांकडुन यशस्वीपणे अपेक्षित अभिनय करुन/काढुन घेतला.

तुमचे पटकथेबद्दलचे ज्ञान बरेचसे गंडलेले वाटते आहे (किंवा माझे तरी). तुमच्या प्रतिसादातून सर्व मुख्य काम अनुरागने केले आणि रामू ने फक्त execute केले असे प्रतित होते आहे, जे चुकीचे आहे.

रामुच्या हाताखाली धडे गिरवुन तो रामुच्या पुढे जाउ शकत नाही हा नियम असेल तर ...

असे मी कुठे म्हटले भाऊ? म्हणणे सोडा, सुचवले पण नाही आहे.

अवांतर :- अनुरागने स्वत: एका मुलाखतीत म्हटले आहे, "Ramu taught me everything about cinema".

पिंपातला उंदीर's picture

8 Mar 2013 - 9:32 pm | पिंपातला उंदीर

कॅप्टन ऑफ द शिप हा नेहमी दिग्दर्शकच असतो. पटकथा लेखनापासून, कॅमरा वर्क, एडिटिंग, सेट्स, आणि इतर असंख्य बाबीमध्ये दिग्दर्शकाचा शब्द प्रमाण मानला जातो. सगळ्यात मुख्य म्हणजे चित्रपटाच्या यशापयश चे टिप्पर दिग्दर्शकाच्या माथ्यावर मारले जाते. सत्या हे रामुचेच ब्रेन चाइल्ड होते आणि त्याचे क्रेडिट रामुलाच जाते. आणि वाईट सिनेमे तर स्पीलबर्ग ने पण केले आहेत. ही फेज़ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. रामू नकीच झबरी कम बॅक करेल असे मला वाटते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Mar 2013 - 8:33 pm | निनाद मुक्काम प...

विमे
येथे थोडा मतभेद आहे ,
माझ्या मते शिवा साठी आणि रात साठी त्याचे सर्व गुन्हे माफ आहे ,
सत्या थोडा फिल्मी होता.

'नो स्मोकिंग' आणि 'दॅट गर्ल इन यल्लो बूट्स' बघून मी आधी खसाखसा आंघोळ केली. पण मला वाटतं त्यांना अनुराग कश्यपची योग्यता 'ब्लॅक फ्रायडे' आणि (काही प्रमाणात) 'वासेपूर' पाहून वाटली असावी. मलाही तसंच वाटतं...

अनुप ढेरे's picture

6 Mar 2013 - 5:02 pm | अनुप ढेरे

नो स्मोकिंग खूप आवडला मला. खूप वेगळया धाटणीचा आहे. परेश रावळ ची भूमिका तर निव्वळ अप्रतिम...

कपिलमुनी's picture

6 Mar 2013 - 6:56 pm | कपिलमुनी

मी पाहिलेला ,ऐकलेला, वाचलेला प्रथम मनुष्य , आयडी ज्याला 'नो स्मोकिंग ' आवडला..
धन्य तुमची !! एक विनंती , काय काय आवडले ते जरा डीटेल मधे लिहा किंवा रस ग्रहण लिहा

मुळात १० दहशतवादी हे जर ३ दिवस २००० पेक्षा जास्त पोलिसांशी व कमांडोंशी लढाई करत असतील तर मग आपण उगाच आपल्या शुरपणाच्या गोष्टि का करायच्या? रामुने जो काही चित्रपट केला आहे त्यात त्याने त्याच्या परीने त्याला जे दाखवायचे असेल ते दाखवल आहे. पण मुळात फक्त १० अतिरे़क्यानी आपल्या सुरक्षा यंत्रणेची वाट लावली हे ही तितकच मानहानीकारक आहे. आपण ह्या हल्यातुन काही शिकणार आहोत की नाही कि फक्त भांडतच बसणार आहोत?

मृत्युन्जय's picture

5 Mar 2013 - 6:17 pm | मृत्युन्जय

फरक आहे. १० दहशतवादी समोर जो दिसेल त्याला उडवायच्या हेतुने आले होते. २००० सैनिकांना सामान्य नागारिकांना वाचवत त्यांना मारायचे होते. सैनिकही अंदाधुंद गोळीबार करत सुटले असते तर दहशतवादी तासाभरात मेले असते की हो. पण मग त्यासाठी किती प्राणांची किंमत मोजावी लागली असती बरे

मुळात पहिला हल्ला रेल्वे स्टेशन व लिओपोल्ड व्रर झाला तेव्हा जे रेल्वे पोलिस होते त्यातले काही वीर पोलिस सोडले तर बाकीचे पळुन गेले होते. त्यांच्याकडे शस्त्र ही नव्हती. मुळात अतिरेकी हल्ला होणार हे माहीत असुनही पोलिसाना त्या विरुध्द लढायच प्रक्षिक्षण नव्हत. हेही खरच. किती दिवस खोटि कारण देणार व स्वताच्या चुकांवर पांघरुण घालणार आहोत.

मुळात पहिला हल्ला रेल्वे स्टेशन व लिओपोल्ड व्रर झाला तेव्हा जे रेल्वे पोलिस होते त्यातले काही वीर पोलिस सोडले तर बाकीचे पळुन गेले होते. त्यांच्याकडे शस्त्र ही नव्हती. मुळात अतिरेकी हल्ला होणार हे माहीत असुनही पोलिसाना त्या विरुध्द लढायच प्रक्षिक्षण नव्हत. हेही खरच. किती दिवस खोटि कारण देणार व स्वताच्या चुकांवर पांघरुण घालणार आहोत.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2013 - 7:21 pm | मृत्युन्जय

अहो पण रेल्वे स्टेशन वर २००० सैनिक नव्हते. ते नंतर आले. तुमच्या २००० आकड्यावर माझा आक्षेप आहे.

शिवाय हातात काठी धरुन पोलिसांनी कसाबला पकडायला किवा मारायला हवे होते ही अपेक्षाच चुकीची आहे. तुकाराम ओंबाळेंनी जे काही केले ती शौर्याची आणि देशप्रेमाची परिसीमा होती. प्रत्येकाकडुन तशी अपेक्षा करणेच चुकीची.

शिवाय चोर पोलिस खेळात चोर नेहमीच पोलिसांपेक्षा २ पावले पुढे जाणार. जर दहशतवाद्यांना यशस्वी सशस्त्र हल्ला करायचा असेल तर सर्व हत्यांरानिशी येणारच. पोलिसांकडे ती हत्यारे असावीत अशी अपेक्षा करणेदेखील चुकीचे. प्रत्येक पोलिसाच्या हातात ए क ४७, रॉकेट प्रोपेलर्स आणि हँड ग्रेनेड कसे दिसावेत.

त्या दहशतवाद्यांशी अपुर्‍या साधनसामग्रीनिशी लढणार्‍या पोलिसांना दोष कसा द्यावा.

डोस्।अ द्यायचा झालाच तर अगदी अद्ययावत नाहित तरी किमान चांगली हत्यारे देखील न पुरवु शकणार्‍या सरकाराचा आणि अपयशी ठरलेल्या गुप्तचर यंत्रणेलाच देता येइल.

माझा मूळ आझेप "२००० सैनि़क" या शब्दरचनेवर आहे. सैनिकांनी आणी पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली.

उपास's picture

5 Mar 2013 - 8:57 pm | उपास

हेच म्हणणार होतो..
'अपुर्‍या शस्त्रांनिशी पोलिस' असे गळे काढण्यात काहीच अर्थ नाही, अपुर्‍या (मानसिक्/शारिरिक) तयारीशी असं फार तर म्हणता येईल. अपयश असेल तर ते गुप्तचर यंत्रणेच आणि सागरी सीमा संरक्षित ठेवण्यार्‍या गस्त यंत्रणेचं. उद्या मोठाले हात बॉम्ब घेऊन समुद्र मार्गे आले जिहादी तर एक ४७ काय ५६ असलेले पोलिस सुद्धा काही करु शकतील का? आणि प्रत्येक पोलिसाच्या हातात एक ४७ देणे व्यवहार्य आहे का? (नाहीतर अमेरिकेत सुरु झालेत तसे घात सुरु व्हायला वेळ लागणार नाही!)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2013 - 1:27 pm | निनाद मुक्काम प...

प्रगत देशात अगदी साधा पोलिसांकडे सुद्धा बुलेटप्रूफ जेकेट असते, व अद्ययावत शस्त्रे असतात. अगदी पाकिस्तानी पोलिसांकडे सुद्धा असतात.
आता तुम्ही म्हणाल कि भारत तर विकसनशील देश ............
एवढेच सांगतो ,भारताकडे नक्कीच पैसा आहे , आपण जगातील सर्वात मोठे शस्त्र खरेदीदार आहोत. आपल्याकडे असणारे सुपर सोनिक शेपानास्त्रे हे जगात नंबर १ आहे , जे भारतने रशिया सोबत विकसित केले आहे.
आपापले सरकार शेपानास्त्रे , पाणबुडी , विमाने ह्यांच्यावर अमाप पैसा खर्च करतो कारण देशाला बाहेरच्या शत्रूपासून वाचवायचे असते.
मात्र देशात अंतर्गत शत्रू दहशतवाद्यांना मात्र सामोरे जाणार्‍या पोलिसांच्या हातात काठ्या
देशात अनेक योजना वर अफाट पैसा खर्च होतो अनेकदा कर्जमाफी शेतकर्‍यांनाच दिली जाते, अनुदाने दिली जातात हा खर्च हजार करोड असतो ,
व मुंबई पोलिसी दलाचे आधुनिकीकरण करण्यात १०० कोटी सुद्धा पुरतील.
जास्ती जास्त २००
ज्या शहरातून देशाला सर्वाधिक महसूल त्याची सुरक्षा करणाऱ्या व्यक्तींना
हातात काठ्या द्याव्यात.
हाच विरोधाभास खटकतो.

दादा कोंडके's picture

6 Mar 2013 - 4:32 pm | दादा कोंडके

आपल्याकडे असणारे सुपर सोनिक शेपानास्त्रे हे जगात नंबर १ आहे , जे भारतने रशिया सोबत विकसित केले आहे.
आपापले सरकार शेपानास्त्रे , पाणबुडी , विमाने ह्यांच्यावर अमाप पैसा खर्च करतो कारण देशाला बाहेरच्या शत्रूपासून वाचवायचे असते.

निनाद, या बद्दल एकुणच आपली झाकली मुठ सव्वा लाखाची आहे. बाकी सगळं दिसतं म्हणून आपल्याला कळतं. गोपनियतेच्या नावाखाली खूप काही चालतं. (किंवा काही चालतच नाही :)) डिआरडीओ, बेल, भेल वगैरे जवळून बघितलं आहे. तिथं १५-१५ वर्षे काम केलेल्यां बरोबर काम करतोय. जास्त काही सांगू शकत नाही. असो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2013 - 2:00 am | निनाद मुक्काम प...

येथे मात्र असहमत
मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात दहशतवाद्यांशी त्यांच्या हातात एके ४७ असतांना
हातात दंडुके व पुरातन संग्रहात शोभाव्यात अश्या बंदुका घेऊन लढणारे आपले पोलिस असा तो सामना होता. च्यायला त्या पाकिस्तान मध्ये कराचीत पोलिसांकडे दंगलीत
मी एके ४७ पहिल्या होत्या ,
एन एस जी कमांडो येण्यात उशीर झाला.
एक गमतीदार गोष्ट अशी की एखादा धक्का बसल्यावर आपल्या सरकारला जाग येते.
उदा ९ अकरा च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत टेररिस्ट कौण्तर युनिट निर्माण केले.
हे प्रो एकटीव असण्याचे उदाहरण होते , त्यानंतर भारतात अतिरेकी हल्ले होत राहिले , मात्र मुंबई हल्ल्यानंतर अश्या प्रकारचे युनिट भारतात निर्माण केले , जे आधीच निर्माण केले असते , तर देशभर अतिरेकी कारवाया जर घडल्या तर त्यांना पाचारण करता येते तेच आताच्या हैद्राबाद जाऊन तपास करत आहेत.
जगातील पहिला फिदायीन आत्मघाती अतिरेकी जिवंत पकडणार्या मुंबईच्या ओबाळे ह्यांच्याकडे हातात कोणते शस्त्रे होते , करकरे ह्यांचे बुलेट प्रुफ जेकेट ची गुणवत्ता काय होती पुढे ते कुठे गायब झाले. ह्या सिनेमात हातात एक पिस्तुल असतांना इन्स्पेक्टर शिंदे कसाब ला सामोरे गेले हे दाखवून रामूने मुंबई पोलिसांच्या त्यावेळच्या असमर्थता व त्यातून पुढे जितेंद्र जोशी ह्यांची एका हवालदाराची आपण ह्या शस्त्र सज्ज अतिरेक्यांच्या पुढे हतबल आहोत हे कळल्यावर आक्रोश करणे प्रभावी पणे दाखवले आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2013 - 2:13 am | निनाद मुक्काम प...

येथे मात्र असहमत
मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात दहशतवाद्यांशी त्यांच्या हातात एके ४७ असतांना
हातात दंडुके व पुरातन संग्रहात शोभाव्यात अश्या बंदुका घेऊन लढणारे आपले पोलिस असा तो सामना होता. च्यायला त्या पाकिस्तान मध्ये कराचीत पोलिसांकडे दंगलीत
मी एके ४७ पहिल्या होत्या ,
एन एस जी कमांडो येण्यात उशीर झाला.
एक गमतीदार गोष्ट अशी की एखादा धक्का बसल्यावर आपल्या सरकारला जाग येते.
उदा ९ अकरा च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत टेररिस्ट कौण्तर युनिट निर्माण केले.
हे प्रो एकटीव असण्याचे उदाहरण होते , त्यानंतर भारतात अतिरेकी हल्ले होत राहिले , मात्र मुंबई हल्ल्यानंतर अश्या प्रकारचे युनिट भारतात निर्माण केले , जे आधीच निर्माण केले असते , तर देशभर अतिरेकी कारवाया जर घडल्या तर त्यांना पाचारण करता येते.
तेच आताच्या हैद्राबाद जाऊन तपास करत आहेत.
जगातील पहिला फिदायीन आत्मघाती अतिरेकी जिवंत पकडणार्या मुंबईच्या ओबाळे ह्यांच्याकडे हातात कोणते शस्त्रे होते , करकरे ह्यांचे बुलेट प्रुफ जेकेट ची गुणवत्ता काय होती पुढे ते कुठे गायब झाले. ह्या सिनेमात हातात एक पिस्तुल असतांना इन्स्पेक्टर शिंदे कसाब ला सामोरे गेले हे दाखवून रामूने मुंबई पोलिसांच्या त्यावेळच्या असमर्थता व त्यातून पुढे जितेंद्र जोशी ह्यांची एका हवालदाराची आपण ह्या शस्त्र सज्ज अतिरेक्यांच्या पुढे हतबल आहोत हे कळल्यावर आक्रोश करणे प्रभावी पणे दाखवले आहे.
आता कुठे जराशी चांगली बातमी वाचवायला मिळत आहे.

चित्रपट म्हणजे त्या घटनेचे/घटनेवरचे सर्वात शेवटचे भाष्य असा आलाकाल एक समज होतो आहे असा माझा समज आहे. रामू असुदे किंवा अजून कोणीही , यथार्थ भाष्य करण्यापेक्ष्या "पैसा / गल्ला" ह्याकडे सगळे लक्ष असते.
सिनेमा भिकार असणार / परीक्षण ही भिकार .
भगवी पत्रकारिता - स्वदेश , स्वधर्माविषयी हिणकस लिहिणे व पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणे.
माफ करण्यात आले आहे.

श्रिया's picture

5 Mar 2013 - 5:35 pm | श्रिया

बालिश भारतीय भाष्य
' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी '

हे उल्लेख खूप खटकले आणि ओढूनताणून लेखात वापरल्यासारखे वाटले.

कपिलमुनी's picture

5 Mar 2013 - 5:42 pm | कपिलमुनी

अहो , असे शब्द वापरल्याशिवाय धाग्याचा टीआरपी वाढत नाही !!

चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे त्यामुळे क्वालिटीवर काही मत नाही.
पण "... मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो..."
हे उपरोधाने म्हणण्यात काय पॉईंट अाहे ते कळलं नाही.
ही कॉमेंट अभिनयावर अाहे असं वाटतं नाही.
कसाबला 'जिहाद'चा चुकीचा अर्थ सांगून ब्रेन-वॉश केलं होतं हे दाखवलं असेल तर काय चुकलं.
पेपरमधल्या बातम्या अाणि उज्वल निकम, मारिया वगैरे मंडळीनी कसाबला त्याच्या हे लक्षात अालं होतं की त्याला ब्रेन-वॉश केलं गेलं होतं हेही सांगितलं अाहे. अर्थात त्यामुळं खटल्यावर काही परिणाम झाला नाही.
मुळात जरका इस्लामचा चांगला अर्थ सांगितला असेल तर ते उदात्तीकरण (उपरोधाकीत अर्थाने) कसं काय?

असे विषय केवळ धार्मिक अंगाने चर्चून अापणही चुक करत अाहोत.

अग्निकोल्हा's picture

5 Mar 2013 - 6:58 pm | अग्निकोल्हा

जेलमधे बदिस्त कसाब शाहरुख खानच्या रामजाने चित्रपटातिल अभिनयाची वारंवार आठवण करुन देतो... अगदी खल्लास चिवटे खल्लास डायलॉगही नानाकडे बघुन टाकणार की काय वाटत राहतं.

हा प्रतिसाद अर्थातच ज्यांनी रामजाने पचवला आहे त्यांसाठीच.

चेतनकुलकर्णी_85's picture

5 Mar 2013 - 7:25 pm | चेतनकुलकर्णी_85

तुमचे राजघराणे कोणते हो? मुघलांचे का हो?

उपास's picture

5 Mar 2013 - 9:16 pm | उपास

चित्रपट पाहिला... नानाने रंगवलेली बरेचदा पात्र परिस्थितीला भिडणारी (थोडी लाऊड) असतात (अब तक छपन्न, प्रतिघात, प्रहार, क्रांतिवीर वगैरे वगैरे) पण इथले पात्र बरेचसे उलट आहे. भांबावलेला, बावरलेला बराचसा संयमी पण हतबल. नानामधल्या कलाकाराने त्याला न्याय दिलाय असं वाटतं पण साला 'असा नाना' बघायची आपल्यालाच सवय नसल्याने एखादा नानाला शिव्या घालू शकतो, तेच त्याच्या भूमिकेचं यश आहे.
दिग्दर्शनात रामूला अजून खूप मजल गाठायचेय असं वाटून गेलं, खूप भडक सीन्स, भडक भाषा, काळ्या ब्याग्राउंड वापरुन लाऊड केलं की झालं असं नाही हे त्याला कुणीतरी सांगायला हवं. ह्या पिक्चरचं अजून सोनं नक्कीच करता आलं असतं, त्याने त्याबतीत तरी नक्कीच माती खाल्लेय.
शेवटी जे उपदेशाचं डोसींग आहे, ते पाहून कंपनीची आठवण झाली पण एकूणात कंपनी खूप उच्च आहेच ह्या चित्रपटापेक्षा!

अन्या दातार's picture

5 Mar 2013 - 10:29 pm | अन्या दातार

वक्रोक्ती जमत नसेल तर करु नये. "जेणो काम तेणो ठाय, दुजा करे सो गोता खाय" याची प्रचिती देणारा धागा व धागाकर्त्याच्या प्रतिक्रिया.

नाना पाटेकरांसाठी पाहावा असा चित्रपट .

अवांतर - मला नाना पाटेकरांच्या घरचा गणपती फार आवडतो, तशी मुर्ती कुठे मिळेल याबद्दल मार्गदर्शन मिळेल काय ? म्हणजे इथंच विचारतो उगा मदतीचा वेगळा धागा काढायला नको.

नाना पाटेकरांच्या घरी सध्या वराडकर नावाच्या मूर्तीकारांकडून मूर्ती येते (बहुदा ही वराडकरांची दुसरी पिढी असावी)

त्या आधी तुळसकर व त्याही आधी भाऊ बोरगांवकर.

यांलोकांना शोधायला पेणला जावे लागेल असा अंदाज आहे.

अमोल खरे's picture

6 Mar 2013 - 10:14 am | अमोल खरे

मुंबईवरील ताज / ओबेरॉय वगैरे ठीकाणांवरील हल्ला संपल्यावर जेव्हा कोण कसं मेलं ह्याचा पंचनामा सुरु झाला तेव्हा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये काम करत असणा-या २२-२३ वर्षे वयाच्या तरुण रिसेप्शनीस्ट मुलींना त्यांच्या जवळ जाऊन डोक्यात गोळी घातल्याचे समोर आले होते. ते पाहुन मुंबई पोलिसातले डेअरडेव्हिल अधिकारी सुद्धा ढसाढसा रडले होते असे एका परिचिताकडुन ऐकले होते. सुदैवाने प्रसिद्धी माध्यमांनी संयम दाखवुन हे छापले नाही. मी हा पिक्चर पाहिला नाही, पण त्यात जर पोलिस अधिकारी रडताना दाखवले असतील तर तसं झालंही होतं हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. पोलिसांनाही भावना असतात.

बाकी परिक्षण अजिबात आवडले नाही.

मन१'s picture

6 Mar 2013 - 12:20 pm | मन१

बालिश भाष्याची अजून सेंचुरी कशी झाली नाही?

राजघराणं साहेब, एक नम्र विंनती की असले फुटकळ विषयावर न लिहिता तुम्ही चालु केलेल्या 'बडवा' ह्या लेखाचे पुढचे भाग टाका पटापट....मस्त चालु होती ती मालिका, का बंद केली?

सोत्रि's picture

8 Mar 2013 - 9:56 pm | सोत्रि

मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो.

ज्वाइंट कमिश्नर सोडा एका इन्स्पेक्टरने दिलेले इस्लामवरचे हे प्रवचन ऐका!

-(पुरोगामी पण कडवा नसलेला)सोकाजी

उपास's picture

9 Mar 2013 - 12:13 am | उपास

२६/११ पाहिल्यांनतर म्युनिक (हो Steven Spielberg चा) आठवला. (मोदकाने ह्या घटनेबद्दल इथे Munich Massacre... लिहून ठेवलय).
दोन्ही चित्रपट दहशतवाद्यांनी केलेल्या विध्वंसावर आणि गडबडलेल्या, हतबल प्रशासन/ पोलिस यंत्रणा ह्यांच्या प्रतिसादावर आहेत आणि त्यामुळेच त्यांची तुलना केल्यावाचून राहावत नाही. नुसत्या काळ्या ब्याग्राउंड आणि शिव्या घालून सवंगतेवर चांगला चित्रपट होऊ शकत नाही. सखोल निरीक्षण, प्रसंगात खोल शिरायची वृत्ती, काम करण्यातले झपाटलेपण तुमच्या कृतीत दिसले पाहिजे जे २६/११ मध्ये अजिबात दिसत नाही.
१. रामू ने स्वतः घटनास्थळी जाऊन सगळ्यागोष्टी जवळून पाहिल्या होत्या त्यामुळे प्रसंगात खोल शिरायची त्याला चांगली संधी होती.
२. मातब्बर स्टारकास्ट घेऊन काम करत असल्याने, त्याला नानाला अजून चांगले वापरता आले असते असं वाटतं.
एकूणात, न्युनिक पुढे खूप आव्हाने असून (आंतर देशीय राजकारण, जर्मनीवर दोषारोपण वगैरे) एक सुंदर चित्रपट झालाय त्याउलट २६/११ ने जखमांवरच्या खपल्या काढण्याव्यतिरीक्त फारसं काही केलय असं वाटत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Mar 2013 - 9:53 pm | निनाद मुक्काम प...

उपास राव
स्टीवन स्पीलबर्ग व रामू ह्यांची मुळात तुलना कशाला करायची ,
खुद्द हॉलीवूड वाले चारवेळा विचार करतील.
रामू चा प्रयत्न चांगला होता.
मागे भारताचे पाकिस्तानात सांस्कृतिक प्रदूषण असा लेख लिहिला होता.
तेव्हा फोर्थ जनरेशन वोरफ़ेअर चा उल्लेख केला होता.
आतापर्यंत शीत युद्धाच्या काळात हॉलीवूड सिनेमात बहुसंख्य खलनायक रशियन असायचे, त्यांची जागा आता इस्लामी दहशतवाद्यांनी घेतली आहे.
समाजात झालेल्या घटनेवर सिनेमे काढणे हा हॉलीवूड चा मक्ता किंबहुना वेस्टन वर्ल्ड चा मक्ता , त्यांचे अश्या सत्य घटनेवर आधारीत सिनेमे पाहिले तर सत्य व कल्पना ह्यांची उत्तम सरमिसळ करून आपल्या जनतेच्या माथी जो संदेश पोचवायचा आहे.
तो व्यवस्थित पणे जनतेच्या डोक्यात फिट बसवला जातो , सत्याचा विपर्यास , हे त्याचे खास वैशिष्ट्य किंबहुना आपल्या सोयीचे तेच सत्य ही त्यामागील प्रेरणा असते.
भारतीय मुस्लिम जनतेला माथी भडकवणारा विडीयो दाखवून गुमराह करणार्‍यांचे हे तत्त्व असते,
आपल्या हाती बॉलीवूड चे माध्यम आहे ,
आणि तुम्हाला मुस्लिम आवडो किंवा न आवडो त्यांचे अस्तित्व ह्या देशात अटल आहे ,
तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहातून लांब ठेवणे म्हणजे पाकिस्तानी हेर संस्थांना आपले भारतात हस्तक निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासारखे आहे.
तेव्हा वाटेल त्या मार्गाने मुस्लिम समाजाचे भारताच्या मुख्य प्रवाहात येणे हे त्यांच्या व भारताच्या दृष्टीने मोलाचे आहे ,
ह्या सिनेमातून कसाब व मारिया ह्यांच्यात फिल्मी संवाद घडवून तोच हेतू साध्य झाला आहे ,
अजमेर च्या मुस्लिम नागरिकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे , हे लोण हैद्राबाद मध्ये पोहचले पाहिजे.
आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे येथे असा आक्षेप घेतला गेला की मारिया एखाद्या मौलवी प्रमाणे कसाब ला प्रवचन देत असल्याचे दाखवले आहे.
ह्यात वावगे असे काहीच नाही आहे ,
दाउद ची कंपनी आय एस आय च्या नादी लागली व त्यांच्या भारतातील नेटवर्क चा फायदा आय एस आय घेऊ लागली ,
पुर्वी दाउद ची बातमी देणारे पोलिसांचे खबरी आता आय एस आय च्या धार्मिक चिथावणी ला बळी पडायला लागले .
धर्म ह्या अफूच्या गोळी पुढे ते अधीन झाले तेव्हा साहजिकच पोलिसांचे नेटवर्क कमी पडायला लागले , माझ्या मते तेव्हा पासून पोलिसी दलात उच्च स्तरीय अधिकारी इस्लाम धर्माचा ,कुराणाचा अभ्यास करायला लागले ,
एखाद्या माथेफिरू खबरी किंवा तरुणाचे ब्रेन वॉश झाले असेल तर त्यांच्याकडून बातमी काढून घेण्यासाठी त्यांचे रिव्हर्स ब्रेन वॉश करणे अनिवार्य असते ,
माझ्या माहितीत आपल्या पोलिसी दलात असे अधिकारी आपल्या कामात निष्णात आहे ,.

रामपुरी's picture

9 Mar 2013 - 2:18 am | रामपुरी

पुरोगामित्व दाखविण्यासाठी काढलेला भिकार धागा हेच याचे वर्णन होऊ शकते. मिपाकरांनी त्याला फाट्यावर जागा करून दिलेली असल्याने गर्दी खेचण्यासाठी केलेल्या सवंग विधानांचाही काही उपयोग झालेला नाही. धाग्याने शंभरी सुद्धा गाठलेली दिसत नाही. एकदम बकवास परीक्षण...

इकडे रामुचे बरेच पंखे दिसत असल्यामुळे पुढील प्रतिक्रिया गुंडाळण्यात आलेल्या आहेत. उगीच पंख्यांची घरघर वाढायला नको..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Mar 2013 - 12:11 am | विश्वनाथ मेहेंदळे

द्या ना पुढील प्रतिक्रिया. कुणाला घाबरता ??

नानबा's picture

11 Mar 2013 - 12:43 am | नानबा

घाबरायचं काय हो? उगाच भांड्याला भांडं कशाला लावायचं? त्याने माझंही मत बदलणार नाही, आणि दुसर्‍यांचंही.. मग निष्कारण वाद का घालावेत?

कवितानागेश's picture

11 Mar 2013 - 12:48 am | कवितानागेश

पावलो कोहेलो झिन्दाबाद!
पैसाताई झिन्दाबाद! :D

लीमाऊजेटचा ऽ ऽ विजय असो! :-D

असे जर प्रत्येक मिपाकर म्हणू लागला/ली तर सर्व लेख आपोआपच वाचनमात्र होऊ शकतील. ;)

नाना चेंगट's picture

11 Mar 2013 - 7:06 pm | नाना चेंगट

चांगला "उपक्रम" होईल तो

विकास's picture

11 Mar 2013 - 8:00 pm | विकास

मला वाटते कधीकाळचे मिभो (कुठे गेले कोणास ठाऊक!), त्याला "चुपक्रम" असे देखील म्हणायचे. :-)

उपास's picture

13 Mar 2013 - 2:11 am | उपास

तुलना का करावीशी वाटली हे मी वर लिहिलेलेच आहे. मी स्वतः रामूचा पंखा आहे पण ह्या चित्रपटात तो कमी पडलाय असं वाटून गेलं. चित्रपट काढण्याचा उद्देश एक मेसेज देणं, विचार देणं असं काही वाटत नाही (जसा अमीरचे काही पिक्चर्स पाहून वाटतं) निव्वळ एका घटनेचे सादरीकरण केल्यासारखं झालय, ह्यापेक्षा जास्त काहीतरी रामू नक्कीच देऊ शकतो.
अमेरीका किंवा तत्सम देश चित्रपटांच्या माध्यमाचा वापर करुन गोष्टी गळी उतरवतात का हा सर्वस्ची वेगळा विषय आहे, पण म्युनिक ची जातकुळीच वेगळी आहे हे खरं!