डॅनिएला गार्सिया

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
28 Feb 2013 - 3:00 am

Phantom Pain म्हणतात. या वेदना मूलत: मानसिक असतात. रेकी व अन्य उपचारांनी तिने यावर मात केली.

यादरम्यान डॅनिएलाच्या वडिलांनी कृत्रीम अवयव बसवण्यासाठी व त्या प्रकारच्या पुढच्या उपचारांबाबत शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणी संपर्क साधून, माहिती मिळवून शेवटी त्यांनी प्रख्यात Moss Rehabilitation Institute मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जखमा बर्‍या झाल्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यात डॅनिएला तिथे पोहोचली. आपल्या नव्या अवयवांची ओळख करून घेण्यासाठी, त्यांची सवय करून घेण्यासाठी तिथे सहा आठवडे रहाणार होती.

यादरम्यान तिचे गुरू बनले डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी. Moss Rehabilitation Institute मधले एक तज्ञ डॉक्टर. यांनी आपला उजवा हात प्रयोगशाळेमधील एका स्फोटामध्ये गमावला होता, परंतु हाताच्या अभावाचा कोणताही फरक पडू न देता ते सर्व कामे हाताच्या जागी जोडलेल्या हूकच्या सहाय्याने लीलया पार पाडत असत.

डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी.

.

"Your life is what you do with it." डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचे आश्वासक शब्द कानी पडले आणि डॅनिएला सज्ज झाली, एका नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी. कृत्रीम अवयवांचा वापर कसा करायचा ते शिकण्यासाठी. रोज सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या तज्ञांच्या गराड्यामध्ये व्यायाम करणे, आधाराच्या सहाय्याने चालणे, शरिराला जोडलेल्या अवयवांचा वापर करण्यास शिकणे, त्यांची सवय करून घेणे या गोष्टी ती शिकत होती व प्रचंड वेगाने आत्मसात करून घेत होती. अनेकदा तिला शिकवणारे प्रशिक्षक, डॉक्टर व तज्ञ लोक बुचकळ्यात पडत असत कारण बरेचसे लोक एखाद्या अवयवाच्या अभावामुळेही मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात व त्यांना नवीन काही शिकवणे ही अशक्यप्राय बाब असते मात्र डॅनिएला या सगळ्याला ढळढळीत अपवाद होती. तिने लवकरच नवीन अवयवांना आपलेसे करून घेतले व सर्व दैनंदिन कामे लीलया पार पाडू लागली.

कृत्रीम हात आणि पायांसह हसतमुख डॅनिएला.

.

डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झीं आणि सर्व कर्मचारी मात्र काळजीत पडले होते. खूप आत्मविश्वासाने कृत्रीम अवयवांच्या सहाय्याने जरी सर्व कामे करता येत असली तरी हे अवयव मानवी हाताला आणि हाताच्या कार्यक्षमतेला पर्याय ठरत नाही याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. एखादे काम कृत्रीम अवयवांच्या सहाय्याने जमले नाही तर तिचा आत्मविश्वास डळमळू नये म्ह्णून डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींनी डॅनिएलाला स्पष्ट जाणीव करून दिली.

"तुला तुझ्या हातांची उणीव कायम भासेल, कोणतीही गोष्ट तुझे हातांइतकी कार्यक्षम असणार नाही. नियतीला दोष देवून तू परावलंबी आयुष्य जगू शकतेस किंवा परिस्थितीशी झगडून जे मिळाले आहे त्यातून सर्वोत्तम साकारू शकतेस. तुला यातली एकच गोष्ट निवडावी लागणार आहे."

डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचा आदर्श मानत डॅनिएलाने मानसिक बळ गोळा केले व पुनश्चः कॉलेजमध्ये परतून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. कॉलेजमध्ये परतून शिक्षण पूर्ण करतानाही ते कृत्रीम अवयवांसदर्भातच असेल असेही ठरवले.

कॉलेजमध्ये परतून तिने कोणत्याही विशेष सवलती न घेता शिक्षण पूर्ण केले. "first quadrilateral
amputee physician in the world" असाही मान मिळवला. रिहॅब डॉक्टर म्हणून तिने स्वत:ला कामात बुडवून घेतले.

नोव्हेंबर २००३ मध्ये एका संध्याकाळी घरी बसून Telethon fundraising marathon event टीव्हीवर पाहताना तिच्या मनात अचानक एक विचार आला व अचानकपणे तिने त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम संपत आला असताना तिच्या आगमनाने कार्यक्रमाला हजर असणारे व संपूर्ण देशाभरातून टीव्हीद्वारे पाहणारे प्रेक्षक अवाक् झाले.

तिच्या अपघाताला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती, रेल्वे खात्यानेही डॅनिएलाला अविश्वसनीय नुकसानभरपाई दिली होती. सर्वांना या गोष्टींचे कुतूहल असतानाच अचानक कार्यक्रमाला हजेरी लावून व त्यांच्या देणगीमध्ये भरभक्कम भर घालून डॅनिएला सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली. घडलेल्या अपघाताला सामोरे जावून परिस्थितीवर मात करून आयुष्याला नवे वळण देणार्‍या डॅनिएलाचे सगळीकडून कौतुक होवू लागले. चिली सरकारनेही तिला "वूमन ऑफ द इयर" सारख्या सन्मानाने सलग दोनदा गौरवले.

आयुष्य हादरवून टाकणार्‍या घटनेनंतरही तोच अदम्य उत्साह.. जिवंतपणीच दंतकथा बनलेली डॅनिएला.

.

आज डॅनिएला कृत्रीम हातांच्या सहाय्याने खास तिच्यासाठी बनवलेली गाडी वापरते, स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवते. एक सामान्य मनुष्य जी कामे करतो ती सर्व कामे आपल्या कृत्रीम हाताच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करते.

अपघाताच्या क्षणापासून बदललेले आपले आयुष्य तिने शब्दबद्ध केले आहे.

डॅनिएला चे आत्मचरित्र - “I choose to Live”

.

तिच्याकडे पाहून सहानुभुती दाखवणार्‍यांना, अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करणार्‍यांना ती सांगते.. "It's a Happy Story"

आयुष्याला कलाटणी देणार्‍या दुर्दैवी घटना घडूनही नियतीच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देणार्‍या डॅनिएलाचा थक्क करणारा प्रवास पाहिला की नकळत तिचेच शब्द उमटतात.. "It's a Happy Story"

********************************************************
सर्व माहिती व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार.
********************************************************

रेखाटनसद्भावना

प्रतिक्रिया

याआधीही डॅनिएलाची कहाणी मराठीतच कुठेतरी वाचली होती. बहूतेक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत वाचली असावी.

अर्थात तुम्ही खुपच त्या लेखापेक्षा अधिक माहिती खुपच चांगल्या पद्धतीने संकलीत केली आहे.

डॅनिएलाच्या "It's a Happy Story" अ‍ॅटटीटयुडला सलाम !!!

अभ्या..'s picture

28 Feb 2013 - 11:47 am | अभ्या..

राईट्ट. चतुरंगच लोकसत्ताची.
पण मोदकरावांनी त्यापेक्षा छान आणि विस्तृत लिहिले आहे.
धन्यवाद

अर्धवटराव's picture

28 Feb 2013 - 4:05 am | अर्धवटराव

हत्तीचे बळ असलेल्यांना भितीने, निराशेने मारुन टाकेल, तर कधी अशी बहारदार हॅप्पी स्टोरी जीवंत करेल. हॅट्स ऑफ्फ...

अर्धवटराव

उपास's picture

28 Feb 2013 - 4:21 am | उपास

जबरदस्त...

आयुष्याकडे बघण्याचा डॅनिएलाचा सकारत्मक दृष्टीकोण मनाला भावला, एकदम हृद्यस्पर्शी
हॅट्स ऑफ टु हर स्पीरीट.
लेख छान लिहिला आहेस.

खटपट्या's picture

28 Feb 2013 - 4:44 am | खटपट्या

जबरदस्त !!!!!

एका दु:खद प्रसंगाची आनंदी कथा कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण!
दणदणीत इच्छाशक्तीच्या जोरावर तिने अपंगत्वाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला.
ग्रेट! कोणत्याही गोष्टीकडे आपण ज्या कोनातून बघू तशी ती दिसते.
ते डॉ. अ‍ॅल्बर्ट किती प्रेमळ दिसतायत.

स्मिता.'s picture

28 Feb 2013 - 5:07 pm | स्मिता.

एका दु:खद प्रसंगाची आनंदी कथा कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण!

एखाद्या अप्रिय आणि अनिवार्य परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जाते हे फारच महत्त्वाचे वाटते.

अवांतर: हे अवांतर तर आहेच पण थोडं लेखातून निर्माण होणार्‍या आशावादात खूसपट शोधल्यासारखं, निराशावादी वाटेल.
भावस्पर्शी कथा वाचून मीसुद्धा भारवून गेले पण नंतर थोडा विचार करतांना मनात आलं की डॅनिएलाच्या या राखेतून घेतलेल्या भरारीकरता जेवढा तिचा आशावाद महत्त्वाचा होता तेवढाच तिला मिळालेला आर्थिक आधारही महत्त्वाचा असावा.

भावस्पर्शी कथा वाचून मीसुद्धा भारवून गेले पण नंतर थोडा विचार करतांना मनात आलं की डॅनिएलाच्या या राखेतून घेतलेल्या भरारीकरता जेवढा तिचा आशावाद महत्त्वाचा होता तेवढाच तिला मिळालेला आर्थिक आधारही महत्त्वाचा असावा.

डॅनिएला ला भरभक्काम आर्थिक आधार हा मिळालाच. दुर्मिळातला दुर्मिळ अपघात, तोही रेल्वेप्रशासनाच्या हलगर्जीपणाने झालेला त्यामुळे तिच्या कुटूंबाने गुदरलेला खटला रेल्वे प्रशासनाने बिनशर्त कोर्टाबाहेर मिटवला + तिथल्या नागरिकांना शासनाने पुरवलेल्या सोयी + कार्यक्षम इन्श्यूरन्स कंपन्या या सर्वांचा तिला प्रचंड सपोर्ट मिळाला.(फायदा हा शब्द मुद्दाम वापरत नाहीये, कारण तिने जे गमावले ते नफानुकसानीच्या पलीकडचे होते!)

@ स्मिता, पैशांबद्दल लिहिलं आहेत ते खोटं नाही किवा आशावादात निराशावाद नाही हा, हे प्रखर वास्तव आहे चटके देणारं. नाहीतर अशा आणि यापेक्षा वाईट परिस्थितीत असणारे आणि तरी देखील या मुलीपेक्षा जास्त आणि दुर्दम्य इच्छाशक्ती जगण्याबद्दल असणारे कमी का आहेत, पण प्रत्येकाला असा आर्थिक पाठिंबा मिळतोच असं नाही.

उमलायचं सगळ्याच बियांना असतो, कुणाला पाउस भेटतो कुणाला नाही भेटत.

इनिगोय's picture

28 Feb 2013 - 7:05 am | इनिगोय

डॅनिअ‍ॅलाच्या आयुष्याचा सारांश चांगला मांडला आहेस.

माणसाच्या मनाच्या क्षमतेचा आवाका मांडणारा हा तुझा लेखही चिलीच्या नागरिकांवरचाच आहे, या योगायोगाची गंमत वाटली.

पुलेशु.

मस्त रे माहित नव्हतं या बद्दल, तुम्ही लोकं हे असलं काहीतरी वाचता, त्यावर लिहिता आणि मग संवेदना हरवलेलं मन पुन्हा जागं व्हायला लागतं, पुन्हा त्रास सुरु होतो.....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Feb 2013 - 7:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__

दोघांनाही.

जीवनातून उठवणाऱ्या अपघातातून स्वतःला यशस्वीरीत्या सावरून असामान्य प्रगती करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख या लेखाद्वारे करून दिल्याबद्दल धन्यवाद.

यावरून ट्रॅव्हल चॅनेलवर नुकताच पाहिलेला लेगलेस आर्मी ऑफ वन हा कार्यक्रम आठवला.

किसन शिंदे's picture

28 Feb 2013 - 8:15 am | किसन शिंदे

उत्तम मांडलंय सगळं.

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2013 - 8:44 am | नगरीनिरंजन

मोदकसाहेब, लेख आवडला!

चौकटराजा's picture

28 Feb 2013 - 8:53 am | चौकटराजा

"मनोबलं" ची कथा प्रेरणा दायी. मनोबल हे सर्वात श्रेष्ठ मग बुद्धीबल मग बाहुबल हे या कथेचे सार !

पिंगू's picture

28 Feb 2013 - 9:38 am | पिंगू

हॅट्स ऑफ टू डॅनिएला.. जगण्याची दुर्दम्य इच्छा असण्याचे हे मूर्तीमंत उदाहरणच आहे.

मोदक, तुझे अतिशय आभार की तू हे सर्व शब्दात चित्रित केलेस..

पैसा's picture

28 Feb 2013 - 9:45 am | पैसा

डॅनिएलाची आशेने भरलेली कथा मिपावर आणल्याबद्दल धन्यवाद! मला वाटते काही वर्षांपूर्वी रीडर्स डायजेस्टमधे हिच्याबद्दल वाचले होते.

मृत्युन्जय's picture

28 Feb 2013 - 10:15 am | मृत्युन्जय

असामान्य, अतीव आदरणीय आणि प्रेरणादायी. तिच्या दुर्दम्य जीवनशक्तीला सलाम.

मैत्र's picture

28 Feb 2013 - 12:49 pm | मैत्र

अगदी एखादं बोट गमावलं तरी आयुष्यातला रस कमी होऊ शकतो.
इतक्या दुर्दम्य जिद्दीबद्दल काही माहिती नव्हती.
प्रचंड धन्यवाद मोदक!

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Feb 2013 - 10:25 am | श्री गावसेना प्रमुख

इच्छाशक्तीच.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2013 - 10:42 am | अत्रुप्त आत्मा

__/\____/\____/\__

अक्षया's picture

28 Feb 2013 - 10:43 am | अक्षया

डॅनिएलाची आशेने भरलेली कथा खुपच प्रेरणादायी आहे.
लेखन नेहमी प्रमाणेच उत्तम..

कापूसकोन्ड्या's picture

28 Feb 2013 - 10:43 am | कापूसकोन्ड्या

मोदका,
अत्यंत जीवस्पर्शी कथा. कथा तरी कशी म्हणायची? खुप दिवसांनी काही तरी चांगले वाचायला मिळाले.
आपल्या आयुष्यात येण्यार्‍या काही किरकोळ गोष्टींचा आपण किती बाऊ करतो ते आठवून गिल्टी वाटले.
हॅट्स ऑफ!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Mar 2013 - 1:05 am | विश्वनाथ मेहेंदळे

आपल्या आयुष्यात येण्यार्‍या काही किरकोळ गोष्टींचा आपण किती बाऊ करतो ते आठवून गिल्टी वाटले.

Exactly !!
लिहित रहा रे मोदका..

वेल्लाभट's picture

28 Feb 2013 - 11:00 am | वेल्लाभट

काहीच म्हणता येत नाहीये हे वाचून! काटा आलाय अंगावर. पण तरीही, डॅनिएला असामान्य जिद्दीची आणि आत्मविश्वासाची व्यक्ती आहे. तिला सलाम.

तुमचा अभिषेक's picture

28 Feb 2013 - 11:02 am | तुमचा अभिषेक

एका मुलीची असल्याने विशेष भावली. स्त्री-पुरुष भेद यात आणायचा नाहिये मात्र तरीही निसर्गानेच स्त्रियांना कमजोर बनवलेय असे समजणार्‍यांना पुरुषांना ही चपराक ठरेल तर स्त्रियांना प्रेरणादायी.

लेखाबद्दल धन्यवाद.
Phantom pain नवी माहिती मिळाली, याबद्दलही धन्यवाद.

भटक्य आणि उनाड's picture

28 Feb 2013 - 11:26 am | भटक्य आणि उनाड

मानले बुवा !!! हॅट्स ऑफ!!!

jaypal's picture

28 Feb 2013 - 11:31 am | jaypal

डॅनिएला गार्सियाच्या जिद्दीला आणि आपल्या लेखन शैलीलामानाचा मुजरा

मालोजीराव's picture

28 Feb 2013 - 11:40 am | मालोजीराव

डॅनिएलाच्या दुर्दम्य आशावादाला सलाम !

मोदका…कोलम्बियन ड्रग माफियांवर पण लेख लिही कि एखादा… वाचायला मजा येईल

मोदक's picture

28 Feb 2013 - 11:46 am | मोदक

पाब्लो एस्कोबार का..?

पैसा कमावण्याच्या बाबतीत बिल गेट्स आणि वॉरन बफेला मागे टाकणार्‍या गुन्हेगाराला पब्लिसिटी दिल्यासारखे होईल रे.

५० फक्त's picture

28 Feb 2013 - 1:23 pm | ५० फक्त

जग पादाक्रांत करण्याच्या बाबतीत अलेक्झांडर आणि नेपोलियनला मागे टाकणा-या गुन्हेगाराला पब्लिसिटि देणारे धागे येतातच की, तुम्ही मान्यताप्राप्त गुन्हेगाराबद्दल लिहिलं तर काय बिघडणार आहे.

मालोजीराव's picture

1 Mar 2013 - 12:48 am | मालोजीराव

पाब्लो एस्कोबार, एल चापो गुझमान (सध्याचा सर्वात श्रीमंत ड्रग माफिया ,फोर्चून ५०० मध्ये लिस्टेड) किंवा मेट्टीओ मेसिना दिनारो (युरोपातील सर्वात मोठा आर्म्स आणि ड्रग्स ट्राफिकर, जगातील ५ व्या क्रमांकाचा मोस्ट वॉनटेड ) कोणाबद्दलही लिही रे....किमान २-३ भागात लिहावी लागेल एव्हडी प्रत्येकाची स्टोरी असेल

गणामास्तर's picture

28 Feb 2013 - 10:10 pm | गणामास्तर

मस्त रे..
लिहीचं पाब्लो एस्कोबार वर,मस्त एक लेखमाला होऊ शकते रे त्यावर..

अग्निकोल्हा's picture

4 Mar 2013 - 10:03 am | अग्निकोल्हा

कोलम्बियन ड्रग माफियांवर पण लेख लिही

हम्म विषेशतः कोलम्बियन ड्रग माफिया कन्यका... विवाह वावड्या... हाफ ब्लड प्रिंन्स... कालावधी... अम्रिका... अटक... हाही विषय यानुशंगाने विस्तृत सामोरा आला तर भारतियांसाठी जास्त रोचक.

निव्वळ नि:शब्द..ताळ्यावर आलो की मग देईन प्रतिक्रिया काहीतरी......तूर्त फक्त आणि फक्त सलाम!!!!!! _/\_

इरसाल's picture

28 Feb 2013 - 1:12 pm | इरसाल

शब्दाशब्दाशी सहमत.
बाकी तु काहीही लिहिलेस तरी ते छानच असते.

सुधीर's picture

28 Feb 2013 - 11:53 am | सुधीर

काल्पनिक वाटणार्‍या अशाप्रकारच्या बर्‍याच सत्यकथा अवतीभोवती घडत असतात. ज्या प्रेरणा देऊन जातात. डॅनिएलाला सलाम! पण का कोणास ठाऊक आर्मस्ट्राँग, प्रिस्टोरिअस यांच्यासारख्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनंतर, व्यक्ती बाजूला ठेऊन नुसती प्रेरणाच तेवढी घ्यावी असं वाटतं.

मोदक's picture

28 Feb 2013 - 12:01 pm | मोदक

व्यक्ती बाजूला ठेऊन नुसती प्रेरणाच तेवढी घ्यावी असं वाटतं.

सहमत..

लिलि काळे's picture

28 Feb 2013 - 12:02 pm | लिलि काळे

जबरदस्त मोदुकाका. खूप मोटिवेशनल आहे.

मन१'s picture

28 Feb 2013 - 12:24 pm | मन१

जिद्दीचा विषाणू संक्रमित करीत रहा....

जयंत_अत्यंत पुणेरी's picture

28 Feb 2013 - 12:25 pm | जयंत_अत्यंत पुणेरी

डोस्क सुन्न...छोटया छोटया गोष्टीत कुंथणाऱ्या माझ्यासारख्याना प्रेरणादायी.

प्रचेतस's picture

28 Feb 2013 - 12:44 pm | प्रचेतस

लेख आवडला रे.

सुमीत भातखंडे's picture

28 Feb 2013 - 12:54 pm | सुमीत भातखंडे

जबरदस्त...हॅट्स ऑफ टू हर!

अधिराज's picture

28 Feb 2013 - 2:25 pm | अधिराज

प्रेरणादायी माहितीबद्दल धन्यवाद!

धनुअमिता's picture

28 Feb 2013 - 2:30 pm | धनुअमिता

__/\____/\____/\__

वाचताना डोळ्यातुन पाणी आले.

कवितानागेश's picture

28 Feb 2013 - 3:57 pm | कवितानागेश

+१

अवांतर : ही कथा भारतात घडली असती तर शेवट कदाचित असा झाला असता.
"रेल्वेखाली आलेल्या तरुणीच्या अपघाताचा पंचनामा करून झाल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करतेवेळी घटना घडून सुमारे सात तास झाल्याने तरुणीचा प्राण तिथेच गेला..."

असहमत इतकेच म्हणू इच्छितो.

श्रीरंग_जोशी's picture

28 Feb 2013 - 10:26 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या देशात अपघातांच्या वेळी दिरंगाईच दाखवली जाते या सरसकटीकरणाशी असहमत.

# मोदक - लेख आवडला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Mar 2013 - 1:08 am | विश्वनाथ मेहेंदळे

इतके सिनिकल असू नये माणसाने.
आणि 'आपले ते सगळे वाईट' हा न्यूनगंड असणे अजून जास्त वाईट आहे.

प्यारे१'s picture

28 Feb 2013 - 10:20 pm | प्यारे१

खूप छान लेख!

सुहास झेले's picture

28 Feb 2013 - 10:48 pm | सुहास झेले

"Your life is what you do with it." ..... जबरी लिहिलंय रे :) :)

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Mar 2013 - 12:15 am | लॉरी टांगटूंगकर

जिद्दीला सलाम __/\__

शुचि's picture

1 Mar 2013 - 12:18 am | शुचि

__/\__ दंडवत डॅनिएलाला.

सूड's picture

1 Mar 2013 - 1:02 am | सूड

वाचता वाचता कुठच्याश्या जुन्या मालिकेच्या शीर्षक गीतातल्या 'राखेतून मीच नवा घेतला आकार' या ओळी आठवल्या.

लौंगी मिरची's picture

1 Mar 2013 - 1:08 am | लौंगी मिरची

डॅनिएला च्या जगण्याच्या उमेदीला सलाम . छान शब्दबद्ध केलयत मोदक .
पूढिल लिखानास अनेक शुभेच्छा .

डॅनिएलाला सेल्युट. अप्रतिम लेख.

फिझा's picture

1 Mar 2013 - 8:29 am | फिझा

लेख छान आहे आहे ....

अमोल खरे's picture

3 Mar 2013 - 7:30 pm | अमोल खरे

सॉलिड लेख आहे. अप्रतिम. शेवट चांगला असल्याने खुप बरं वाटलं. ह्या मुलीत अफाट जिद्द आहे. अशा लोकांच्या कहाण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हव्यात.

मांडीची शीर आखडून' पळता आलं नाही म्हणून रडणारे आम्ही

आणि हि सुपर गर्ल

स्वतः बद्दल वाटणारी लाज
आणि तिला सलाम

दोन्ही एकाच वेळी

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 6:11 am | स्पंदना

शेवटच्या फोटोतले तिच्या डोळ्यापर्यंत पोहोचलेल्या हास्याने सारे सारे संशय फिटले या अद्भुततेचे.

मोदक तुमच्या लेखणीतुन वाचताना या असल्या कथा खरोखरी सामोर्‍या येतात. नुसत्या कागदावर नाही रहात त्या.

धन्यवाद या लेखाबद्दल. अप्रतिम.

क्रान्ति's picture

4 Mar 2013 - 10:42 am | क्रान्ति

या मुलीची जगण्याची जिद्द, दुर्दम्य आशावाद आणि मोदक यांची लेखनशैली या सगळ्याला सलाम!

दिपक.कुवेत's picture

4 Mar 2013 - 12:54 pm | दिपक.कुवेत

अश्या लोकांची जगण्याची जीद्द पाहिली कि जाणवत धडधाकट असुन सुद्धा आपण काहि गोष्टिंचा किति बाउ करत असतो ते!

सर्जेराव's picture

10 Dec 2013 - 10:11 am | सर्जेराव

छान लिहिलेय

वाटाड्या...'s picture

10 Dec 2013 - 10:02 pm | वाटाड्या...

धन्यवाद...चांगली माहिती. प्रेरणा घ्यावी अशीच.

स्वाती दिनेश's picture

2 Oct 2016 - 11:34 am | स्वाती दिनेश

हा लेख माझ्या नजरेतून कसा सुटला? धन्यवाद लिंकबद्दल.
फार सुंदर लेख!
स्वाती

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Oct 2016 - 12:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

फारच प्रेरणादायी माहिती! हिची गोष्ट वाचून आपल्या अरुणिमा सिन्हाचीच आठवण झाली!

स्वाती दिनेश's picture

2 Oct 2016 - 2:46 pm | स्वाती दिनेश

अरुणिमा सिन्हा वरून तर हिची परत एकदा आठवण झाली,
स्वाती

माझीही शॅम्पेन's picture

2 Oct 2016 - 1:32 pm | माझीही शॅम्पेन

अप्रतिम लेख मोदकराव लिहीत राहा !!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2016 - 1:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

कुठुन कुठुन शोधुन काढतो बे भावा हे सगळे, कमाल डॅनियेलाची अन तुझी पण हे सगळे आमच्यापर्यंत पोचवल्या बद्दल, मिपाचा सायकल ब्रँड अष्टपैलु हाय भो!!! ____/\____ .

अरिंजय's picture

2 Oct 2016 - 1:48 pm | अरिंजय

मनाला भिडणारे, प्रेरणादायी लिखाण. मोदकदादा __/|\__

खालील तीनही टेड टॉक्स वरीलप्रमाणेच अत्यंत प्रेरणादायी आहेत अवश्य पहावे.

https://www.youtube.com/watch?v=6P2nPI6CTlc

https://www.youtube.com/watch?v=VaRO5-V1uK0

https://www.youtube.com/watch?v=36m1o-tM05g

केडी's picture

3 Oct 2016 - 2:18 pm | केडी

जबरदस्त आणि अत्यंत प्रेरणादायी! हॅट्स ऑफ टू डॅनिएला!

चाणक्य's picture

3 Oct 2016 - 10:23 pm | चाणक्य

शब्द नाहीत. _/\_

शिव कन्या's picture

3 Oct 2016 - 10:36 pm | शिव कन्या

It's a happy story! मानले!

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2016 - 11:12 pm | पिलीयन रायडर

अफाट!!!!