✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॅनिएला गार्सिया

म
मोदक यांनी
गुरुवार, 02/28/2013 - 03:00  ·  लेख
लेख
Phantom Pain म्हणतात. या वेदना मूलत: मानसिक असतात. रेकी व अन्य उपचारांनी तिने यावर मात केली. यादरम्यान डॅनिएलाच्या वडिलांनी कृत्रीम अवयव बसवण्यासाठी व त्या प्रकारच्या पुढच्या उपचारांबाबत शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणी संपर्क साधून, माहिती मिळवून शेवटी त्यांनी प्रख्यात Moss Rehabilitation Institute मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जखमा बर्‍या झाल्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यात डॅनिएला तिथे पोहोचली. आपल्या नव्या अवयवांची ओळख करून घेण्यासाठी, त्यांची सवय करून घेण्यासाठी तिथे सहा आठवडे रहाणार होती. यादरम्यान तिचे गुरू बनले डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी. Moss Rehabilitation Institute मधले एक तज्ञ डॉक्टर. यांनी आपला उजवा हात प्रयोगशाळेमधील एका स्फोटामध्ये गमावला होता, परंतु हाताच्या अभावाचा कोणताही फरक पडू न देता ते सर्व कामे हाताच्या जागी जोडलेल्या हूकच्या सहाय्याने लीलया पार पाडत असत. डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी. . "Your life is what you do with it." डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचे आश्वासक शब्द कानी पडले आणि डॅनिएला सज्ज झाली, एका नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी. कृत्रीम अवयवांचा वापर कसा करायचा ते शिकण्यासाठी. रोज सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या तज्ञांच्या गराड्यामध्ये व्यायाम करणे, आधाराच्या सहाय्याने चालणे, शरिराला जोडलेल्या अवयवांचा वापर करण्यास शिकणे, त्यांची सवय करून घेणे या गोष्टी ती शिकत होती व प्रचंड वेगाने आत्मसात करून घेत होती. अनेकदा तिला शिकवणारे प्रशिक्षक, डॉक्टर व तज्ञ लोक बुचकळ्यात पडत असत कारण बरेचसे लोक एखाद्या अवयवाच्या अभावामुळेही मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात व त्यांना नवीन काही शिकवणे ही अशक्यप्राय बाब असते मात्र डॅनिएला या सगळ्याला ढळढळीत अपवाद होती. तिने लवकरच नवीन अवयवांना आपलेसे करून घेतले व सर्व दैनंदिन कामे लीलया पार पाडू लागली. कृत्रीम हात आणि पायांसह हसतमुख डॅनिएला. . डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झीं आणि सर्व कर्मचारी मात्र काळजीत पडले होते. खूप आत्मविश्वासाने कृत्रीम अवयवांच्या सहाय्याने जरी सर्व कामे करता येत असली तरी हे अवयव मानवी हाताला आणि हाताच्या कार्यक्षमतेला पर्याय ठरत नाही याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. एखादे काम कृत्रीम अवयवांच्या सहाय्याने जमले नाही तर तिचा आत्मविश्वास डळमळू नये म्ह्णून डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींनी डॅनिएलाला स्पष्ट जाणीव करून दिली. "तुला तुझ्या हातांची उणीव कायम भासेल, कोणतीही गोष्ट तुझे हातांइतकी कार्यक्षम असणार नाही. नियतीला दोष देवून तू परावलंबी आयुष्य जगू शकतेस किंवा परिस्थितीशी झगडून जे मिळाले आहे त्यातून सर्वोत्तम साकारू शकतेस. तुला यातली एकच गोष्ट निवडावी लागणार आहे." डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचा आदर्श मानत डॅनिएलाने मानसिक बळ गोळा केले व पुनश्चः कॉलेजमध्ये परतून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. कॉलेजमध्ये परतून शिक्षण पूर्ण करतानाही ते कृत्रीम अवयवांसदर्भातच असेल असेही ठरवले. कॉलेजमध्ये परतून तिने कोणत्याही विशेष सवलती न घेता शिक्षण पूर्ण केले. "first quadrilateral amputee physician in the world" असाही मान मिळवला. रिहॅब डॉक्टर म्हणून तिने स्वत:ला कामात बुडवून घेतले. नोव्हेंबर २००३ मध्ये एका संध्याकाळी घरी बसून Telethon fundraising marathon event टीव्हीवर पाहताना तिच्या मनात अचानक एक विचार आला व अचानकपणे तिने त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम संपत आला असताना तिच्या आगमनाने कार्यक्रमाला हजर असणारे व संपूर्ण देशाभरातून टीव्हीद्वारे पाहणारे प्रेक्षक अवाक् झाले. तिच्या अपघाताला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती, रेल्वे खात्यानेही डॅनिएलाला अविश्वसनीय नुकसानभरपाई दिली होती. सर्वांना या गोष्टींचे कुतूहल असतानाच अचानक कार्यक्रमाला हजेरी लावून व त्यांच्या देणगीमध्ये भरभक्कम भर घालून डॅनिएला सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली. घडलेल्या अपघाताला सामोरे जावून परिस्थितीवर मात करून आयुष्याला नवे वळण देणार्‍या डॅनिएलाचे सगळीकडून कौतुक होवू लागले. चिली सरकारनेही तिला "वूमन ऑफ द इयर" सारख्या सन्मानाने सलग दोनदा गौरवले. आयुष्य हादरवून टाकणार्‍या घटनेनंतरही तोच अदम्य उत्साह.. जिवंतपणीच दंतकथा बनलेली डॅनिएला. . आज डॅनिएला कृत्रीम हातांच्या सहाय्याने खास तिच्यासाठी बनवलेली गाडी वापरते, स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवते. एक सामान्य मनुष्य जी कामे करतो ती सर्व कामे आपल्या कृत्रीम हाताच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करते. अपघाताच्या क्षणापासून बदललेले आपले आयुष्य तिने शब्दबद्ध केले आहे. डॅनिएला चे आत्मचरित्र - “I choose to Live” . तिच्याकडे पाहून सहानुभुती दाखवणार्‍यांना, अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करणार्‍यांना ती सांगते.. "It's a Happy Story" आयुष्याला कलाटणी देणार्‍या दुर्दैवी घटना घडूनही नियतीच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देणार्‍या डॅनिएलाचा थक्क करणारा प्रवास पाहिला की नकळत तिचेच शब्द उमटतात.. "It's a Happy Story" ******************************************************** सर्व माहिती व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार. ********************************************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
30075 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

+१

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/28/2013 - 22:26 नवीन
आपल्या देशात अपघातांच्या वेळी दिरंगाईच दाखवली जाते या सरसकटीकरणाशी असहमत. # मोदक - लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

इतके सिनिकल असू नये माणसाने.

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/01/2013 - 01:08 नवीन
इतके सिनिकल असू नये माणसाने. आणि 'आपले ते सगळे वाईट' हा न्यूनगंड असणे अजून जास्त वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

खूप छान लेख!

प्यारे१
गुरुवार, 02/28/2013 - 22:20 नवीन
खूप छान लेख!
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
गुरुवार, 02/28/2013 - 22:48 नवीन
"Your life is what you do with it." ..... जबरी लिहिलंय रे :) :)
  • Log in or register to post comments

झकास लिहिलय

लॉरी टांगटूंगकर
Fri, 03/01/2013 - 00:15 नवीन
जिद्दीला सलाम __/\__
  • Log in or register to post comments

__/\__ दंडवत डॅनिएलाला.

शुचि
Fri, 03/01/2013 - 00:18 नवीन
__/\__ दंडवत डॅनिएलाला.
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलंय !!

सूड
Fri, 03/01/2013 - 01:02 नवीन
वाचता वाचता कुठच्याश्या जुन्या मालिकेच्या शीर्षक गीतातल्या 'राखेतून मीच नवा घेतला आकार' या ओळी आठवल्या.
  • Log in or register to post comments

डॅनिएला च्या जगण्याच्या

लौंगी मिरची
Fri, 03/01/2013 - 01:08 नवीन
डॅनिएला च्या जगण्याच्या उमेदीला सलाम . छान शब्दबद्ध केलयत मोदक . पूढिल लिखानास अनेक शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

डॅनिएलाला सेल्युट. अप्रतिम

NiluMP
Fri, 03/01/2013 - 02:09 नवीन
डॅनिएलाला सेल्युट. अप्रतिम लेख.
  • Log in or register to post comments

लेख छान आहे आहे ....

फिझा
Fri, 03/01/2013 - 08:29 नवीन
लेख छान आहे आहे ....
  • Log in or register to post comments

सॉलिड लेख आहे. अप्रतिम. शेवट

अमोल खरे
Sun, 03/03/2013 - 19:30 नवीन
सॉलिड लेख आहे. अप्रतिम. शेवट चांगला असल्याने खुप बरं वाटलं. ह्या मुलीत अफाट जिद्द आहे. अशा लोकांच्या कहाण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हव्यात.
  • Log in or register to post comments

मांडीची शीर आखडून' पळता आलं

अद्द्या
Mon, 03/04/2013 - 02:19 नवीन
मांडीची शीर आखडून' पळता आलं नाही म्हणून रडणारे आम्ही आणि हि सुपर गर्ल स्वतः बद्दल वाटणारी लाज आणि तिला सलाम दोन्ही एकाच वेळी
  • Log in or register to post comments

शेवटच्या फोटोतले तिच्या

स्पंदना
Mon, 03/04/2013 - 06:11 नवीन
शेवटच्या फोटोतले तिच्या डोळ्यापर्यंत पोहोचलेल्या हास्याने सारे सारे संशय फिटले या अद्भुततेचे. मोदक तुमच्या लेखणीतुन वाचताना या असल्या कथा खरोखरी सामोर्‍या येतात. नुसत्या कागदावर नाही रहात त्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद या लेखाबद्दल. अप्रतिम

खटासि खट
Mon, 03/04/2013 - 06:27 नवीन
धन्यवाद या लेखाबद्दल. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

सलाम!

क्रान्ति
Mon, 03/04/2013 - 10:42 नवीन
या मुलीची जगण्याची जिद्द, दुर्दम्य आशावाद आणि मोदक यांची लेखनशैली या सगळ्याला सलाम!
  • Log in or register to post comments

+१ टु क्रान्ति

दिपक.कुवेत
Mon, 03/04/2013 - 12:54 नवीन
अश्या लोकांची जगण्याची जीद्द पाहिली कि जाणवत धडधाकट असुन सुद्धा आपण काहि गोष्टिंचा किति बाउ करत असतो ते!
  • Log in or register to post comments

छान लिहिलेय

सर्जेराव
Tue, 12/10/2013 - 10:11 नवीन
छान लिहिलेय
  • Log in or register to post comments

मोदकशेठ

वाटाड्या...
Tue, 12/10/2013 - 22:02 नवीन
धन्यवाद...चांगली माहिती. प्रेरणा घ्यावी अशीच.
  • Log in or register to post comments

अफाट!

स्वाती दिनेश
Sun, 10/02/2016 - 11:34 नवीन
हा लेख माझ्या नजरेतून कसा सुटला? धन्यवाद लिंकबद्दल. फार सुंदर लेख! स्वाती
  • Log in or register to post comments

सलाम!

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 10/02/2016 - 12:26 नवीन
फारच प्रेरणादायी माहिती! हिची गोष्ट वाचून आपल्या अरुणिमा सिन्हाचीच आठवण झाली!
  • Log in or register to post comments

हो,

स्वाती दिनेश
Sun, 10/02/2016 - 14:46 नवीन
अरुणिमा सिन्हा वरून तर हिची परत एकदा आठवण झाली, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

अप्रतिम लेख मोदकराव लिहीत

माझीही शॅम्पेन
Sun, 10/02/2016 - 13:32 नवीन
अप्रतिम लेख मोदकराव लिहीत राहा !!
  • Log in or register to post comments

कुठुन कुठुन शोधुन काढतो बे

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/02/2016 - 13:40 नवीन
कुठुन कुठुन शोधुन काढतो बे भावा हे सगळे, कमाल डॅनियेलाची अन तुझी पण हे सगळे आमच्यापर्यंत पोचवल्या बद्दल, मिपाचा सायकल ब्रँड अष्टपैलु हाय भो!!! ____/\____ .
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त

अरिंजय
Sun, 10/02/2016 - 13:48 नवीन
मनाला भिडणारे, प्रेरणादायी लिखाण. मोदकदादा __/|\__
  • Log in or register to post comments

मोदकजी सुंदर प्रेरणादायी लेख आहे आवडला.

मारवा
Sun, 10/02/2016 - 14:55 नवीन
खालील तीनही टेड टॉक्स वरीलप्रमाणेच अत्यंत प्रेरणादायी आहेत अवश्य पहावे. https://www.youtube.com/watch?v=6P2nPI6CTlc https://www.youtube.com/watch?v=VaRO5-V1uK0 https://www.youtube.com/watch?v=36m1o-tM05g
  • Log in or register to post comments

जबरदस्त आणि अत्यंत

केडी
Mon, 10/03/2016 - 14:18 नवीन
जबरदस्त आणि अत्यंत प्रेरणादायी! हॅट्स ऑफ टू डॅनिएला!
  • Log in or register to post comments

सुपर्ब

चाणक्य
Mon, 10/03/2016 - 22:23 नवीन
शब्द नाहीत. _/\_
  • Log in or register to post comments

It's a happy story! मानले!

शिव कन्या
Mon, 10/03/2016 - 22:36 नवीन
It's a happy story! मानले!
  • Log in or register to post comments

अफाट!!!!

पिलीयन रायडर
Tue, 10/04/2016 - 23:12 नवीन
अफाट!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा