वीर सावरकर

Dhananjay Borgaonkar's picture
Dhananjay Borgaonkar in जनातलं, मनातलं
26 Feb 2013 - 4:04 pm

आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत.

सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते. भारतीची फाळणी त्यांना कधीच मान्य नव्हती.
त्यांनी कायम अखंड भारताचं स्वप्न बघितलं होतं. गांधींच्या खुनामधे त्याचा सहभाग होता की काय याची पुढे अनेक वर्र्षे शहानिशा चालली. पण निश्पन्न काहीच झाल नाही. सावरकरांना स्वातंत्र्यप्रात्पी नंतरसुद्धा भाषणबंदी होती.
स्वातंत्र्यप्राप्तीचा पहिला लढा, कमला, काळे पाणी ही त्यांनी लिहीलेली काही गाजलेली पुस्तके.
जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला या कवितांचे कवी देखील सावरकरच होत.

अशा या स्वातंत्र्यवीराला कोटी कोटी प्रणाम.

_/\_

मांडणीसद्भावना

प्रतिक्रिया

विटेकर's picture

26 Feb 2013 - 4:27 pm | विटेकर

समाजसुधारक सावरकर हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखाचा विषय आहे. त्यांचे सामाजिक कार्य देखील त्यांच्या
देशभक्तिइतकेच प्रखर होते. क्रांतिकारक सावरकर/ काले पाणी या पैलू इतके सामाजिक कार्य प्रकाशात आले नाही.किबहुना त्यपुढे हे झाकोळले गेले.

नितिन थत्ते's picture

26 Feb 2013 - 4:54 pm | नितिन थत्ते

>>क्रांतिकारक सावरकर/ काले पाणी या पैलू इतके सामाजिक कार्य प्रकाशात आले नाही.किबहुना त्यपुढे हे झाकोळले गेले.

त्यांच्या भक्तांना ते कार्य नकोसेच होते म्हणून ते फार प्रकाशात आले नाही.

पिंपातला उंदीर's picture

26 Feb 2013 - 5:03 pm | पिंपातला उंदीर

कैच्या कैइ : )

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

तरी मी विचारच करत होतो की धाग्याची अजून काश्मीरकडे वाटचाल कशी सुरु झाली नाही.

मन१'s picture

26 Feb 2013 - 5:29 pm | मन१

तुम्हालाही सावरकरांचे बरेचसे कार्य नकोसे वाटते असे निरिक्षण आहे.
निरिक्षण बरोबर आहे काय? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

त्यांना एकूणातच कुठलेच चांगलेसे कार्य नकोसे वाटते असे आमचे निरिक्षण आहे. विशेषतः ते कोणा काँग्रेसेतराचे असेल तर. ;)

नाना चेंगट's picture

26 Feb 2013 - 6:02 pm | नाना चेंगट

अगदी अगदी.

नन्दादीप's picture

27 Feb 2013 - 4:30 pm | नन्दादीप

+१.

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 5:37 pm | ऋषिकेश

तुम्हालाही सावरकरांचे बरेचसे कार्य नकोसे वाटते असे निरिक्षण आहे.

थत्तेचाचा सावरकर भक्त आहेत असे तुम्हाला सुचवायचे आहे का?

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 5:33 pm | ऋषिकेश

त्यांच्या भक्तांना ते कार्य नकोसेच होते म्हणून ते फार प्रकाशात आले नाही.

नकोसे पेक्षा गैरसोयीचे म्हणायचे आहे का? :)

मन१'s picture

26 Feb 2013 - 5:38 pm | मन१

गांधींच्या भक्तांना गांधींचे कार्य जसे गैरसोयीचे होते त्याच धर्तीवर सावरकरांबाबतही म्हणताय काय?

तसे म्हणायचे नव्हते पण असु शकेल. वरचे मत सावरकरांच्या वैज्ञानिक व सामाजिक कार्याबद्दल होते.
गांधींचे कार्य/मत विज्ञाननिष्ठ नव्हतेच. तेव्हा त्या बाबतीत त्यांचे कार्यं काही निरिश्वरवादी परंतू गांधींचा आदर करणारे आहेत अशा भक्तांना गैरसोयीचे असण्याची शक्यता आहे. गांधीजींचे बहुतांश सामाजिक कार्य गैरसोयीचे असायचे कारण नाहीच. काही वैयक्तीक वागणूक (जसे त्यांचे लैंगिक भावनांवर नियंत्रणाचे प्रयोग) अनेक भक्तांना गैरसोयीची आहे हे ही सर्वमान्य आहे.

बाकी या धाग्यावर गांधी आले कसे नाहित हे समजत नव्हते.. चला आता धाग्याचे काश्मिर व्हायला सुरवात होईल या पराच्या मताशी सहमती व्यक्त करतो आणि या धाग्यावर अधिक अवांतर वाद घालणे उचित न वाटल्याने अवांतराबद्दल क्षमा मागून रजा घेतो:)

विकास's picture

26 Feb 2013 - 8:10 pm | विकास

मिपासंदर्भात म्हणत असाल तर येथे, घरगुती सावरकर, सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे, सुधारक सावरकर, सावरकर आणि नास्तिकवाद, उपेक्षित सावरकर असे अनेक विविधांगाने लिहीलेले लेख दिसतील. अजूनही असतील हे पटकन मिळालेले... त्याव्यतिरीक्त सावरकरांचा क्रांतिवाद, राजकारण, हिंदूत्व वगैरेवर लेख आहेत ते वेगळेच.

दुर्दैवाने गांधीजींच्या बाबतीत मात्र जे स्वतःला गांधीवादी म्हणवतात ते असे लेख लिहीण्याऐवजी केवळ गांधीजींचा उपयोग नथुराम, हिंदूत्ववाद वगैरेवर टिका करण्यासाठीच केला जातो असे वाटते. अर्थात हा दोष गांधीजी अथवा गांधीवादाचा नाही, स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍यांच्या प्रामाणिकपणाचा आहे. असो.

आनंदी गोपाळ's picture

27 Feb 2013 - 10:19 am | आनंदी गोपाळ

शिवाय गांधींचे मार्केटिंग करावे लागावे इतपत गांधीजी लहान वा इन्सिग्निफिकण्ट अजूनही झाले नसावेत, असेही कारण असू शकते ;)

विकास's picture

27 Feb 2013 - 10:34 am | विकास

गांधीजी लहान अथवा इन्सिग्निफिकण्ट आहेत असे कुणाला वाटत नसावे. पण अनुयायी/भक्त वगैरे जे काही असतात त्यांचे वागणे कसे असते याबद्दल फक्त लिहीले होते. गांधीजींबद्दल लिहायचे तर गांधीहत्याच बाकी काही नाही. सावरकरांवर कोणी लिहीले तर त्यात अजून काहीतरी खुसपट काढणार, तेच टिळकांबद्दल (जरा बिचकत पण) करणार... कारण या आणि अशा सगळ्याच नेत्यांचा वापर केवळ वैचारीक दुही माजवण्यात केला जातो...

असो. आज कुसुमाग्रजांची आठवण म्हणून मराठी दिन साजरा केला जातो. त्यामुळे याच संदर्भातील त्यांची "पुतळे" ही कविता आठवली...

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
जोतिबा म्हणाले, शेवटी
मी झालो फक्‍त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्‍त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले,
मी फक्‍त बौद्धांचा.
टिळक उद्‌गारले,
मी तर फक्‍त
चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळ्यातील गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान;
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्‍त सरकारी कचेऱ्यातील भिंती....

Dhananjay Borgaonkar's picture

27 Feb 2013 - 10:44 am | Dhananjay Borgaonkar

गांधीजी लहान अथवा इन्सिग्निफिकण्ट आहेत असे कुणाला वाटत नसावे. पण अनुयायी/भक्त वगैरे जे काही असतात त्यांचे वागणे कसे असते याबद्दल फक्त लिहीले होते. गांधीजींबद्दल लिहायचे तर गांधीहत्याच बाकी काही नाही. सावरकरांवर कोणी लिहीले तर त्यात अजून काहीतरी खुसपट काढणार, तेच टिळकांबद्दल (जरा बिचकत पण) करणार... कारण या आणि अशा सगळ्याच नेत्यांचा वापर केवळ वैचारीक दुही माजवण्यात केला जातो...

कधी कधी वाटतं सगळे क्रांतीकारी ऊगाच स्वत्व विसरुन देशासाठी बलिदान करुन गेले. त्यापे़क्षा राजकारणात पडले असते तर अजुन त्यांचं कल्याण झाल असतं. किमान घर,संसार,पैसा सगळच सांभाळता आल असत. असो.

नितिन थत्ते's picture

27 Feb 2013 - 10:51 am | नितिन थत्ते

>>दुर्दैवाने गांधीजींच्या बाबतीत मात्र जे स्वतःला गांधीवादी म्हणवतात ते असे लेख लिहीण्याऐवजी

तसे वाटत नाही.

विकास's picture

27 Feb 2013 - 7:31 pm | विकास

आपल्या प्रतिसादात चुकून बददुवा दिला गेला आहे ;) खालील प्रमाणे दिसते. :(

Page not found
The requested page "/node/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%

असे लेख लिहून एखाद्याविषयीची भक्ती सिद्धा करावी लागते होय! अरेरे माहितच नव्हत! :(

विकास's picture

27 Feb 2013 - 7:34 pm | विकास

मुद्दा भक्ती सिद्ध करण्याचा नव्हता. स्वतःस गांधीजींचे भक्त म्हणवणारे बहुतांशी वेळेस गांधीहत्या या एकाच विषयाशी जाऊन थांबतात हा होता. हा मुद्दा काढायचे कारण हे सुरवातीस सावरकरांच्या संदर्भात त्यांचे इतर पैलू चर्चीले जात नाहीत असा जो सूर होता त्या संदर्भात होता.

स्वयंसंपादन (सोय नाही माहिती आहे. पोस्ट करायच्या आधीच काढून टाकला :( )

सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला सर्वात अनुकरणीय वाटते.
या राष्ट्रभक्तास आदलांजली वाहतो!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2013 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

@सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला सर्वात अनुकरणीय वाटते.>>> पूर्ण सहमत....

पैसा's picture

26 Feb 2013 - 4:33 pm | पैसा

राजकारण करायला बंदी घातल्यावर रत्नागिरीसारख्या एका कोपर्‍यातल्या शहरात राहून समाजसुधारणेचा प्रयत्न चालू ठेवणार्‍या प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Feb 2013 - 4:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आदरांजली
__/\__

स्पा's picture

26 Feb 2013 - 4:40 pm | स्पा

__/\__

नि३सोलपुरकर's picture

26 Feb 2013 - 4:58 pm | नि३सोलपुरकर

प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन.

मूकवाचक's picture

26 Feb 2013 - 4:59 pm | मूकवाचक

_/\_

तर्री's picture

26 Feb 2013 - 5:06 pm | तर्री

भाषा शुद्धी आणि त्यांच्या "कमला " प्रभाकारास " इ. कविता व सन्यस्त खड्ग हया नाटकाचा चाहता !
कोटी कोटी प्रणाम !

पिंपातला उंदीर's picture

26 Feb 2013 - 5:13 pm | पिंपातला उंदीर

सावरकारांबद्दल आदरच आहे. पण १९७१ च्या बांगलादेश निर्मितीनंतर त्यांची आणि जिना यांचा हिंदू आणि मुस्लिम हे दोन धर्म नसून दोन वेगळी राष्ट्र आहेत ही theory कितपत बरोबर होती या विषयावर राग आणि त्रागा न करता चर्चा होत असेल तर खूप चांगल होईल

Dhananjay Borgaonkar's picture

26 Feb 2013 - 5:19 pm | Dhananjay Borgaonkar

जिनांच्या मुस्लिम लीगला रोखण्यासाठीच हिंदू महासभेची स्थापना झाली. बाकी १९७१ संदर्भ कळाला नाही.

पिंपातला उंदीर's picture

26 Feb 2013 - 5:27 pm | पिंपातला उंदीर

पाकिस्तान हे धर्मा च्या आधारावर स्थापन झालेले राष्ट्र होते. काही मुस्लिम विचारवंतानी यानी हिंदू व मुस्लिम हे केवळ दोन धर्म नसून दोन राष्ट्र आहेत असा विचार मांडला होता. त्याच आधारावर जिन्ना यानी पाकिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती. विशेष म्हणजे सावरकर यानी या दोन धर्म नाही तर दोन राष्ट्र या सिद्धांताला पाठिंबा दिला होता. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती लढ्याने या सिद्धांताला सुरुंग लावला. कारण वेगळ्या बांगलादेश ची मागणी करणारे मुस्लिम च होते. सावरकर यांचा हा स्टॅंड चुकला की नाही ह्यावर मुद्देसुद चर्चा व्हयला हवी

धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली मात्र बांग्लादेश बांग्ला भाषेच्या अस्मितेतून निर्माण झाला तेथील मुस्लिम उर्दू आपली भाषा न मानता बांग्ला हीच भाषा मानत होते.

विकास's picture

26 Feb 2013 - 8:47 pm | विकास

या विषयावर राग आणि त्रागा न करता चर्चा होत असेल तर खूप चांगल होईल

हा विषय येथे अनेकदा चघळला गेला आहे. ते आधी वाचले असते तरी चांगले झाले असते. मूळ संस्कृत आणि संस्कृतोद्भव "राष्ट्र" आणि "देश" आणि त्याला समांतर "नेशन" आणि "कंट्री (नेशन-स्टेट)" हे शब्द आहेत. जालावरील दोन्हीचा एकत्रित संदर्भ असलेले एक वाक्यः While the terms country (synonomyous with "State") and nation are often used interchangeably, there is a difference. A country is a self-governing political entity while a nation is a tightly-knit group of people which share a common culture.

जेंव्हा जेंव्हा नेशन अथवा राष्ट्र हा शब्द वापरला गेला तेंव्हा तेंव्हा त्यातील समान परंपरेस महत्व दिले गेले आहे. अगदी १८८७ साली प्रथम सर सय्यद यांनी हा मुद्दा आणला त्यात देखील "Although my own thoughts and desires are towards my own community, yet I shall discuss whether or not this agitation is useful for the country and for the other nations who live in it. " असे म्हणलेले आहे. बर्‍याचदा युके ही कंट्री चार नेशन्सची बनलेली आहे असे म्हणले जाते. अमेरीकेत नेटीव्ह अमेरीकन्सच्या भूभागाला आजही नेशन्स म्हणले जाते. येथे "नेशन ऑफ इस्लाम" ही संघटना देखील वादग्रस्त संघटना असली तरी ती त्यातील "नेशन" या शब्दामुळे नाही... युरोपात देखील सेलटीक्स नेशन्स हा प्रकार आहे. आणि हो अजून एक आहेच की: स्वतंत्र भारत देशातील "महाराष्ट्र" ..

पिंपातला उंदीर's picture

26 Feb 2013 - 9:12 pm | पिंपातला उंदीर

देश या संकल्पनेच्या व्याख्या स्थळ-काळ नुसार वेगळ्या असु शकतात. पण फ्रंटलाइन मधले हे आर्टिकल उद्बोधक आहे. सावरकरांचे हे वाक्य " "I have no quarrel with Mr Jinnah's two-nation theory. We, Hindus, are a nation by ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two nations." त्यांची भूमिका स्पष्ट दाखवत. मुळात संपूर्ण आर्टिकल च वाचण्यासारखे आहे. ही लिंक http://www.frontlineonnet.com/fl1915/19151160.htm

विकास's picture

26 Feb 2013 - 11:40 pm | विकास

सावरकरांच्या वाक्यासाठी त्या लेखात सावरकरांच्या हिंदूत्व या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे, जे त्यांनी १९२३ साली लिहीले आहे आणि जिनांनी पाकीस्तानची मागणी ही १९४० साली केलेली आहे. तरी देखील सावरकरांचे हे वाक्य असू शकते का? अगदी सहज शक्य आहे. पण खात्री नाही... जर ते त्यांचे वाक्य असलेच तर (कदाचीत संदर्भ वेगळा असेल, "हिंदूत्व" नसेल). त्याचा अर्थ लावण्यासाठी त्याच्या मागेपुढे ते नक्की काय म्हणालेत ते देखील बघायला हवे. दुर्दैवाने त्या लेखात या पिएचडीच्या विद्यार्थ्याने ते स्पष्ट केलेले नाही. त्या व्यतिरीक्त, फ्रंटलाईन हे लेफ्टीस्ट आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे मासिक/साप्ताहीक जे काही असेल ते, असल्याने त्यातील biased विचार पण लक्षात घेण्याशिवाय पर्याय नाही. मी इथे लिहीताना कुठल्याच (डाव्या-उजव्या) बाजूचे विचार वाचून लिहीत नाही, तर स्वतः वाचून त्यातील संदर्भ लक्षात घेऊन विश्लेषण करायचा प्रयत्न करतो.

Dhananjay Borgaonkar's picture

27 Feb 2013 - 9:12 am | Dhananjay Borgaonkar

हा धागा सावरकरांना श्रद्धांजली म्हणुन उघडला होता/आहे. हिंदू,मुस्लिम,जिना,गांधी,फाळणी,इत्यादी विषयांवर चर्चा करायची असल्यास तुम्ही अवश्य दुसरा धागा चालु करु शकता.माझ्याकडुन याविषयावर इथे पुर्णविराम.

मन१'s picture

26 Feb 2013 - 5:18 pm | मन१

विज्ञानिष्ठ, ध्येयनिष्ठ दिग्गजास वंदन.
त्याकाळात देशात सुरु असणार्‍या तुलनेने मवाळ main stream विचारास सडेतोड उत्तर, आव्हान देण्याचे महत्कार्य लक्षात रहावे असेच.

नाना चेंगट's picture

26 Feb 2013 - 6:03 pm | नाना चेंगट

सावरकरांना आदरांजली !

फिरंगी's picture

26 Feb 2013 - 7:31 pm | फिरंगी

आदरांजली

लाल टोपी's picture

26 Feb 2013 - 8:17 pm | लाल टोपी

नाटककार, खंडकाव्याचे कवि, भाषासुधारणेचे जनक मराठीतील कित्येक प्रचलीत शब्द सावरकरांची देण्गी आहेत, विज्ञानिष्ठ प्रखर देशभक्तास विनम्र अभिवादन

आशु जोग's picture

26 Feb 2013 - 8:22 pm | आशु जोग

स्वा. सावरकरांना 'हिंदूहृदयसम्राट' का म्हणतात ?
इतर कुणालाही तशी पदवी दिली आहे का ?

(ज्ञानेच्छु) जोग

खेडूत's picture

26 Feb 2013 - 9:05 pm | खेडूत

प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन...

सर्वसाक्षी's picture

26 Feb 2013 - 9:16 pm | सर्वसाक्षी

स्वातंत्र्यवीर सावरकर या महान देशभक्तास विनम्र अभिवादन! देशासाठी त्यांनी जे काही केलं त्याबद्दल त्याना देशानं काय दिलं? तर अपमानास्पद वागणुक आणि उपेक्षा. चालायचेच. अशी उपेक्षा वा अवहेलना पदरी आलेले ते एकमेव देशभक्त नव्हेत. त्यांनी जे खडतर व्रत अंगिकारलं ते ध्येयाखातर. अंदमानच्या हाल अपेष्टांपेक्षा आपल्याच देशात आपल्याच राज्यात निघालेले धिंडवडे त्यांना अधिक यातनामय वाटले असतील. निदान अंदमानात कोलु पिसताना एक दिवस माझा देश स्वतंत्र होईल हा ध्यास आणि दुर्दम्य आशा तरी होती.

प्रचेतस's picture

26 Feb 2013 - 10:26 pm | प्रचेतस

स्वातंत्र्यवीरांना विनम्र आदरांजली.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Feb 2013 - 10:40 pm | निनाद मुक्काम प...

सावरकरांवर सिनेमा करण्यासाठी बाबूजींना यत्न करावा लागला ह्याचे अतीव दुख वाटते.
अय्यर साहेबांना सावरकर म्हटले तर थेट गांधी खुनाचा खटला आठवतो. मात्र
त्यांचा अंदमान ते रत्नागिरी हा प्रवास दिसत नाही.
सध्याच्या काळात सावरकरांचे सामाजिक कार्य व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन भारतीयांना विशेषतः तरूणाईला व जगाला समजावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सिनेमा निघाला पाहिजे. असे वाटते.

तर्री's picture

27 Feb 2013 - 7:36 am | तर्री

अनेक चित्तपावन / ब्राम्हण समाज सावरकरांचे विचार न वाचता - समजून घेता , सावरकरांचे गुणगान करतात.
तर अनेक सावरकरांचे विचार न वाचता त्यांच्या बद्दल आकसाने बोलतात.
हे दुर्दैव.

आदरांजली, कारण यापेक्षा जास्त काही करायची माझी लायकी नाही.

बाकी आजच अभिनव भारत या संस्थेवर ती जहाल अतिरेकी असुन मालेगाव, अजमेर, समझौता अशा बॉम्बस्फोटांसाठी तिला जबाबदार धरुन त्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे अशी बातमी दै.सकाळ मध्ये आलेली आहे.

विकास's picture

27 Feb 2013 - 9:17 am | विकास

बाकी आजच अभिनव भारत या संस्थेवर ती जहाल अतिरेकी असुन मालेगाव, अजमेर, समझौता अशा बॉम्बस्फोटांसाठी तिला जबाबदार धरुन त्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे अशी बातमी दै.सकाळ मध्ये आलेली आहे.

सावरकरांनी स्थापलेल्या अभिनव भारत संघटनेची सांगता स्वतः सावरकर यांनीच आता अशा संघटनेची गरज नाही म्हणत, स्वतंत्र भारतात केलेली होती. मालेगाव वगैरे प्रकरणात ज्या अभिनव भारत संघटनेचे नाव घेतले जात आहे, ते त्यांनी घेतलेले नाव असले तरी सावरकरांनी स्थापलेली संघटना नाही.

मन१'s picture

27 Feb 2013 - 9:45 am | मन१

माझ्याकडील माहिती :-
ही संघटना ०च्या दशकात स्थापलेली आहे.हिमानी सावरकर मध्ये त्याच्याशी स्ंबंधित होत्या.बहुदा अध्यक्ष वगैरे. हिमानी सावरकर ह्या पूर्वाश्रमीच्या हिमानी गोडसे आहेत. गोपाळ गोडसे ह्यांच्या कन्या त्या होत. काही दशकांपूर्वी सावकर घराण्याच्या सून म्हणून प्रवेशिल्या.
.
त्यांचे विचार कित्येकांना ज्वलंत , तेजस्वी वगैरे वगैरे वाटतात; तर कित्येकांना आत्यंतिक खोडसाळ(ओवेसीस्टाइल) वाटतात.
.
माहिती समाप्त. वादास शुभेच्छा.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वीर देशभक्त, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी, महाकवी, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार, नेते व तत्वज्ञ होते. सावरकर हे खर्‍या अर्थाने सर्वस्पर्शी विचार करणारे राष्ट्रशिल्पकार होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2013 - 9:21 am | श्रीरंग_जोशी

स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन!!

भारतमातेचा असा सुपुत्र पुन्हा होणे नाही...

मालोजीराव's picture

27 Feb 2013 - 6:48 pm | मालोजीराव

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली _/\_

azaad

चंद्रशेखर आझाद यांची आज पुण्यतिथी या थोर क्रांतीकारकास हि त्रिवार मुजरा !

सावरकर ,सुभाषचंद्र बोस आणि आझाद यांच्यातील साम्य म्हणजे तिघेही प्रखर शिवभक्त होते

तर्री's picture

27 Feb 2013 - 6:54 pm | तर्री

शिवभक्त म्हणजे शंकराचे उपासक असे वाटले.
म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्त का ? तर मग बरोबर . स्वा.सावरकर यांनी छ.शिवाजी महाराज याची जी आरती केली आहे ते काव्य , संगीत ह ही एक समसमा योग आहे.

मालोजीराव's picture

27 Feb 2013 - 7:11 pm | मालोजीराव

शिवभक्त म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्त

(१) १९५७ साली ११वीची परीक्षा देऊन मी दिल्लीला गेलो होतो. वडील तेथे नोकरीस होते. १०मेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्ययुद्धाची शताब्दी या निमित्ताने मराठीतून भाषण झाले त्याला मी वडिलांबरोबर गेलो होतो. भाषणातील एक मुद्दा काही कारणाने अजून लक्षात आहे. कागदोपत्री Arabian sea किंवा अरबी समुद्र असा उल्लेख असतो. त्याला सिंधू सागर हा पर्याय सावरकरांनी सुचविला.

(२)२६/२ला स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आणि २७/२ला मराठी राजभाषा दिन आहे म्हणून प्रत्येक मराठी व्यक्तीने आज तरी निदान एक मराठी वाक्य लिहावे, वाचावे, आणि बोलावे.

विकास's picture

27 Feb 2013 - 7:42 pm | विकास

कागदोपत्री Arabian sea किंवा अरबी समुद्र असा उल्लेख असतो. त्याला सिंधू सागर हा पर्याय सावरकरांनी सुचविला.

सिंधू नदी ही कदाचीत या समुद्रास मिळणारी सगळ्यात मोठी नदी असल्याने त्याला सिंधूसागर हे वेदकालीन नाव आहे असे म्हणले जाते. त्यामुळे सावरकरांनी त्याचा पुरस्कार केला असावा. मला वाटते बाबासाहेब पुरंदर्‍यांनी शिवकालाचे वर्णन करताना "सिंधू सागर" असा उल्लेख केलेला आहे. विकीवर पण अरेबिअन सी च्या माहीतीत जुने नाव "सिंधू सागर" असल्याचे लिहीले आहे. तसेच सिंधूसागर हे नाव काही उद्योगांनी आणि संस्थांनी देखील वापरल्याचे लक्षात येते.