प्राचीन हस्त लिखित भृगु संहिता व्हिडिओ ची लिंक
कार्यशाळा २०११ च्या अंतर्गत होशियारपुरच्या महाशिव यांच्याशी बोलताना केलेले शूटींग. एका हातात कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने पत्रे हाताळण्यामुळे जरा गचाळ झाले आहे. तरीही उत्सुक व्यक्तींना यावरून कल्पना येईल.
पंजाबी ढंगातून बोलणारे महाशिवजी लगेच नाराज होताना 'बस करो' म्हणतात. तेवढ्यात एक जण मला हे फल ऐकायचे आहे किती फी वगैरे विचारत असताना मी पटकन संधी साधून माझे त्यादिवशी निघालेले भृगु फल पत्र व त्या पानावरील 'शशिकांत' नावाच्या उल्लेख मला हाताळायला मिळाला. एरव्ही फलपत्र हातात देण्यास ते फारसे राजी नसतात.
व्यक्तीचे नाव भृगु संहिताच्या पट्टीत लिहिलेले असते काय? असे अनेकदा विचारले जाते म्हणून हा धागा. तरी ह्या ठिकाणी
ते थोडे अस्पष्ट व ओळीत टोकाला शशि व पुढील ओळीत कान्त असे तोडून आले आहे.
प्रतिक्रिया
16 Feb 2013 - 1:07 am | अग्निकोल्हा
भुतकाळ मात्र नेमका सांगतात राव... एकदम बिंचुक.
16 Feb 2013 - 1:11 am | संजय क्षीरसागर
ओक कुठे आहे?
18 Feb 2013 - 5:38 pm | बाळ सप्रे
शशि*, *कान्त असे वाचावे..
अस्पष्ट आणि २ ओळीत असल्यामुळे शशि ने नाव सुरु होणारा वा कान्त ने नाव संपणारा कुठल्याही आडनावाचा "श्रद्धावान" मनुष्य ही हे भृगुफलपत्र वाचून खूष होतो. :-)
16 Feb 2013 - 1:32 am | शशिकांत ओक
मित्रा,
शोधा म्हणजे सापडेल...
16 Feb 2013 - 2:03 am | मराठे
काका विडीयो दिसत नाहिये.
16 Feb 2013 - 6:19 am | अत्रुप्त आत्मा
चला...चांगली सोय झाली. ;-)
@ओक कुठाय? >>> =)) अहो सं.क्षी.,चारचौघात अपल्याला असं ओकणं शोभतं का? :-b
16 Feb 2013 - 9:25 am | संजय क्षीरसागर
भृगुसंहिता कधी मी पालथी केली नाही
16 Feb 2013 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा
@कधी मी पालथी केली नाही>>>> आरारारारारा....... ;-)
17 Feb 2013 - 10:35 am | संजय क्षीरसागर
मज जन्म पट्टीचा मिळता, पोहोणारा झालो असतो
कधी हुक उघडला नाही, नाडीही ओढली नाही
17 Feb 2013 - 1:32 pm | प्रकाश घाटपांडे
मस्त!
18 Feb 2013 - 6:30 pm | विटेकर
संक्षी ..
काय चाललयं काय ?
बरे आहात ना ?
16 Feb 2013 - 9:50 am | अविनाशकुलकर्णी
पुण्यात भानुविलास टोकिज जवळ घाणेकर म्हणुन भ्रुगु संहिता सांगायचे ,,त्या काळात{ ७२ साल }ते रु १००० घ्यायचे.
16 Feb 2013 - 9:56 am | संजय क्षीरसागर
त्यावेळी ७५ रूपये महिना मेस होती.
16 Feb 2013 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे
म्हणजे त्याकाळी करमणूकीसाठी म्हणा वा मानसिक समाधानासाठी म्हणा एवढे पैसे देणारे लोक होते.
16 Feb 2013 - 12:13 pm | संजय क्षीरसागर
हजार रुपये घेणारे घाणेकर मात्र `बस,.. करते रहो, ..करते रहो' म्हणत असतील
16 Feb 2013 - 10:27 am | वेताळ
तोळा होते.
16 Feb 2013 - 12:19 pm | संजय क्षीरसागर
सोनाली बरी म्हणतात
16 Feb 2013 - 12:12 pm | बॅटमॅन
भृगुसंहितेसारखाच हा व्हिडिओ पण गुप्त झाला वाटते.
16 Feb 2013 - 12:18 pm | आदूबाळ
बरोबर लिंक ही घ्या
http://www.youtube.com/watch?v=HttOshqlZ5k
17 Feb 2013 - 11:46 am | खटासि खट
ओकसाहेब, ! तुमचा जीमेल आयडी आणि पासवर्ड विचारतंय आमचं टॅबडं.. व्यनितून कळवा