मातृदिनाच्या निमित्ताने

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
29 Aug 2008 - 3:06 pm

उद्या मातृदिन. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी, सुखासाठी पिठोरी ची पूजा करेल..
इथे अनेक जण आहेत , जे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त घरापासून लांब रहातात. अशाच एखाद्याच्या आईचे हे मनोगत..

सातासमुद्रापल्याड दूर देशात तू बाळा
आठवणींचा पाउस भिजवतो सांजवेळा
तुझ्याविना घर इथे शांत,अबोल, मोकळे
तुझ्या हाकेच्या भासाने दृष्टी दाराकडे वळे.
घरी पावलोपावली तुझ्या दिसतात खुणा
गोकुळाला सोडुनीया जणू दूर जाई कान्हा.
तुझ्या आवडीचे सारे, घास हातातच फ़िरे
तुझ्या काळजीने पोरा, मन कावरे-बावरे
दूरदेशी मला ठावे, सारी सुखे तुझ्यापाशी
तरी घर आठवता ,हळु ओलावते उशी
नको होवुस उदास , सुखी तुझ्या मी यशात
आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात..

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मनीषा's picture

29 Aug 2008 - 3:29 pm | मनीषा

तुझी ....एक सुंदर कविता
खूप आवडली !!

प्रमोद देव's picture

29 Aug 2008 - 3:32 pm | प्रमोद देव

"लाविते मी निरांजन" च्या चालीवर मस्तपैकी म्हणता येतेय.
फुलवा कविता आवडली.

आनंदयात्री's picture

29 Aug 2008 - 3:35 pm | आनंदयात्री

नको होवुस उदास , सुखी तुझ्या मी यशात
आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात..

आईला विसरलो होतो असे वाटले.
सुंदर कविता.

ऋषिकेश's picture

29 Aug 2008 - 3:43 pm | ऋषिकेश

फारच छान :)
अगदी भिडली.
फुलवा अजून येऊ दे
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

यशोधरा's picture

29 Aug 2008 - 3:44 pm | यशोधरा

सुरेखच!!

शितल's picture

29 Aug 2008 - 5:24 pm | शितल

फुलवा ,
मनाला हळवे करणारी सुंदर काव्य रचना आवडली.
नेहमी प्रमाणेच सुंदर.
:)

विकास's picture

29 Aug 2008 - 6:15 pm | विकास

>>>आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात..

सुंदर कविता. वरील ओळ वाचल्यावर एकदम "लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू, इथून दृष्ट काढते, निमिष एक थांब तू" या ओळींची आठवण झाली.

मदर्स डे च्या जमान्यात पिठोरी आमावस्या आणि त्या दिवशी असलेल्या मातृदिनाची आठवण देऊन आणि आम्हाला करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 7:08 am | विसोबा खेचर

अतिशय टचिंग कविता....!

वृद्ध आईवडिलांसोबत राहून त्यांची सेवा-शुषृषा करायचं भाग्य माझ्या मते सर्वात मोलाचं! त्यापुढे परदेशातली सर्व सुखं, संपत्ती कवडीमोलाची आहेत!

तात्या.

मदनबाण's picture

30 Aug 2008 - 9:02 am | मदनबाण

अतिशय सुरेख कविता..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सैरंध्री's picture

31 Aug 2008 - 7:15 am | सैरंध्री

सुरेख कविता , फुलवा. आईच्या ह़ळूवार भावना छान टिपल्या आहेत.
सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci

श्रीकान्त पाटिल's picture

30 Aug 2008 - 11:52 pm | श्रीकान्त पाटिल

तुझ्या आवडीचे सारे, घास हातातच फ़िरे
तुझ्या काळजीने पोरा, मन कावरे-बावरे
दूरदेशी मला ठावे, सारी सुखे तुझ्यापाशी
तरी घर आठवता ,हळु ओलावते उशी
नको होवुस उदास , सुखी तुझ्या मी यशात
आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात..

किती छान रेखाटलेस हे चित्र तु "फुलवा" [ padmashree ] खुपच मनाला भावले माझ्या ...

श्रीकांत पाटिल काका

ईश्वरी's picture

31 Aug 2008 - 6:49 am | ईश्वरी

सुरेख कविता, फुलवा. आवडली.
ईश्वरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2008 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुझ्या आवडीचे सारे, घास हातातच फ़िरे
तुझ्या काळजीने पोरा, मन कावरे-बावरे
दूरदेशी मला ठावे, सारी सुखे तुझ्यापाशी
तरी घर आठवता ,हळु ओलावते उशी

व्वा !!! सुंदर आशय ....