देहाला चोळून घेता
मालिशवाला वदला
ढेरी वाढली मालक!
लाईफस्टाईल बदला
देहाला चोळून घेता
नेते सुखाने म्हणले
सत्तेच्या कृपेने मी
बख्खळ पैसे आणले
देहाला चोळून घेता
रोमिओही तणतणले
बायका वाघिणी झाल्या
आम्हा चप्पलने हाणले
देहाला चोळून घेता
ते विकलतेने कण्हले
लवकर ये मृत्यू
मन रोगाला शीणले...
प्रतिक्रिया
29 Jan 2013 - 6:15 am | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही :-D :-D :-D
29 Jan 2013 - 7:56 am | पैसा
तेल मालीऽऽऽश म्हणणारा जॉनी वॉकर आठवला. पण शेवटच्या ओळी गंभीर करून गेल्या.
29 Jan 2013 - 7:42 pm | यशोधरा
हेच म्हणते.
29 Jan 2013 - 9:49 am | शिलेदार
झकास!!!
29 Jan 2013 - 9:56 am | सुधीर
:)
29 Jan 2013 - 10:07 am | मूकवाचक
=))
29 Jan 2013 - 3:23 pm | विटेकर
आवडेश !
29 Jan 2013 - 6:07 pm | प्रभाकर पेठकर
शेवटच्या ओळींचा संदेश मनावर घेतला आहे.
29 Jan 2013 - 8:02 pm | तिमा
चार ओळींमुळे ते विडंबन राहिले नाही.
का हो, आम्हा म्हातार्यांना संध्याछाया दाखवता ?
29 Jan 2013 - 8:38 pm | शुचि
शेवटच्या ओळींचा इम्पॅक्ट (प्रभाव/ छाया) रेंगाळते.
30 Jan 2013 - 12:24 am | योगप्रभू
देहाला चोळून घेता.. या ओळी अन्य एका कवितेत वाचल्या आणि वाटले, की देहाला चोळून घेण्याच्या विविध अवस्थांतील काही व्यक्तींचे मनोभाव कसे असतील? त्यातून सुचली ती कडवी टाकली. त्यात सुखासीनता, माज, निलाजरेपणा आणि अखेर विकलता या भावना आल्या. राहून गेलेल्या आणखी दोन अवस्था म्हणजे १) आई/बहीण/पत्नी यांनी मायेने घातलेली अंघोळ २) 'चेतवून अंग अंग' टाईपचा शृंगार.
शेवटच्या कडव्यामुळे उदासीनतेची छाया रेंगाळतेय खरी, पण तसंच तर जीवन आहे ना. कवी ना. धों. महानोरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर
'जीवनाच्या या फुलाला
वेदनेचा गंध आहे
गंधवेड्या वेदनेला
रेशमाचा बंध आहे'
30 Jan 2013 - 1:12 am | अग्निकोल्हा
देहाला चोळून घेता
मिपा लॉगिन केलें :P
अन नंतर यांव घडले
अन नंतर त्यांव झाले... ;)
30 Jan 2013 - 1:27 am | चित्रगुप्त
संता-बंताच्या बँकॉक प्रवासातः
देहाला चोळून घेता
परमानंद जाहला
स्वगृही परतल्यावर:
आनंद सगळा ओसरला
परमा तेवढा राहिला