आमचे वार्ताहराकडुन
शनीवार श्रावण कृष्ण सप्तमी शके १९३० पुण्यपत्तन
मोडकी बातमी ( ब्रेकिंग न्यूज) आज वडगाव धायरी येथे एक भव्य मिपा सदस्यांचे जंक्षन फ़ंक्षन झाले त्यावेळी काही सदस्यांस उत्खनन करताना एक दूर्मीळ हस्तलिखीत सापडले. हे हस्त लिखीत पोथी स्वरुपात असुन त्यात आष्चर्य म्हणजे मिपा सदस्यांच्या मेळाव्याचे वर्णने चक्षुर्वैही सत्यांशासह वर्णीले आहे, मूळमजकूर अर्धमागधीत आहे.
या शोधाबद्दल सर्वत्र मिपा सदस्यांत तसेच पुणपतनातात एकच कौतुहल निर्माण झाले आहे. इतके पुरातन असुनसुद्धा त्यात अर्वाचीन मजकुर कसा हाच औत्सुक्याचा विषय आहे.
सर्वत्र हीच चर्चा आहे
प्रस्तुत पोथीतील चित्रे स्वाती राजेश या सदस्यानी अधीक संशोधनासाठी पास्चात्य देशात नेली आहेत. काही चित्रे भिंगात बंद करुन ज्येष्ठ संशोधक सेतुप्रभाकरराव पेठकर ( गडकरी) याणि नेली आहेत . ( हे फ़ोटो स्वच्छ धुवोनी देतात अशी एका बखरीत नोंद आहे) उपलब्धेतेनुसार ते प्रकाशीत करण्यात येतील
विजुभाऊ हे त्या मजकूर पूर्णमागधीत रूपांतरीत करीत आहेत.
वानगी दाखल उपलब्ध हस्तिलिखीतातला काही मजकूर येथे देत आहे. जाणकाराना यात अधुनमधुन अनुष्टुभ छंद दिसतो.
येथ दास म्हणे. वर्णीतो सात्वीक कट्टा पुणे
मानुनी घ्या संपूर्ण नसे येथ काही उणे
कट्टा ठरला येता स्वाती राजेशच्या मनी
ठरविला दिवस शेखरे श्रावण सप्तमी
पाचारण केले सर्वांस धमाल मुलाने
इन्या अंद्या धम्या सवे सखाराम गटणे
विजुभौ, दाढे, पेठकरा काका श्री व सौ आणि घाटपांडे
पाहुन चित्तर ,मन आणि छत्रपती वदले आनंदे
अभीर येतो आहे यमी सांगे
शेखरु ऋचा आणि स्वाती संगे
परीने लाविली टांग ऐसे विजुभौ सर्वाना सांगे
गटणे विचारी पुन्हा पुन्हा जैसा हा विजुभौचा गुन्हा
वास्तपुस्त मृगनयनीने पुसली, फ़ोनवर पण परी रुसली
पुणे अभिरुची बाग
मिपा कट्टा जाहला अहो भाग.
येक येक चमत्कार घडे जमता जाल सौंगडे
खेळ गप्पां सुरु होती चहा आल्याचा कुणा हाती
विजुभौ येता सोबत आणती छोट्याडॊन्या संगती.
नामे घेता खरी खोटी खुलासा होई प्रत्यक्ष भेटी
पाहोन मस्त कठपुतळीयांचे खेळु अणि सदस्यांचा मेळु
मोद सर्वांस झाला आणि भेटता गळोगळु
खेळ जादुचे सुरु जाहले. चेंडु चित्रे आत्तर पुसले
येथ विजुभौ म्हणे चला धमाल मुला
झोपाळा खेळु आन्द्या आणि धमाल बाळु
धमी पाही सोहळा नेत्र भरौन
आणि धम्यास दटावे आडुन आडुन.
बेत जेवण्या़चा खाषा होता.पक्वानांचा ताफ़ा होता.
पोळी भाकरी ज्वारी नाचणी
कढीचा भुरका होता मसाले भाता संगे
ताट सजले उसळी अळुच्या भाजी रंगे
इनोबा सांगे आवडे त्यास चटणी वांगे
श्रीखंड खीर आणि कसल्या चटण्या होत्या
पाहौन ताट असे बंद झाल्या बोलत्या
सदस्य दंग झाले चाखण्यात गप्पा पडल्या बंद
येथ घेता थोडा ब्रेक डॊ दाढे आले अचानक
घाई लवकर जाण्याची त्याना चंट. म्हणे वाट पहाती पेशंट
विजुभौ म्हणे थांबरे पान खावोनी जारे
असौन वैद्य दंत; मसाला पान खाती पंत
वाजवी बासरी विजुभौ संत ;मान डोलवी वैद्य दंत
येथ फ़ोनवरी भेटीस आला ब्रीटीश टिंग्या
मदनबाण सहाये करीत अनेक दंग्या
सदस्य काही पांगले काही गप्पांत रंगले
जे रंगले ;सायंपर्यन्त ते दंगले
कुम्हारकाम पाहौन संतुष्ट जाले
मातीतुनी सृष्टी निर्मिली देवा कुंभाराने
येथ पुन्हा चहा झाला आईस्क्रीम येकेक
पाय निघो म्हणेना थांबतो प्रत्येक
निरोप घेउनी बाळे हलली
आणि कट्ट्याच्या स्मतीत फ़ुलली
येथ म्हणे विजुभौ लेखकु
शेखरु आखकु. धमाल आयोजकु
संतोष पावले कट्ट्यावरी.
उतु नको मातु नये घेतला वसा टाकु नये
कट्ट्यास नाही म्हणो नये.
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!!
प्रतिक्रिया
25 Aug 2008 - 10:16 am | विसोबा खेचर
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!!
वा! हेच खरं!
विजूभाऊ, कमाल आहे बुवा तुमची. आजकाल एकदम फार्मात दिसताय! :)
तात्या.
25 Aug 2008 - 12:14 pm | अवलिया
विजूभाऊ, कमाल आहे बुवा तुमची. आजकाल एकदम फार्मात दिसताय
हेच म्हणतो
नाना
25 Aug 2008 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजूभाऊ, कमाल आहे बुवा तुमची. आजकाल एकदम फार्मात दिसताय
25 Aug 2008 - 6:57 pm | सहज
विजुभौ कमाल!
=D>
25 Aug 2008 - 10:28 am | मेघना भुस्कुटे
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!!
खिखिखि! मस्त आहे!
25 Aug 2008 - 10:32 am | वरद
वा मान गये विजूभाउ... मस्त आहे...
(दोन / तिन नावे मात्र विसरलात)
“to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
28 Aug 2008 - 7:12 pm | टारझन
=)) =)) =)) आय कॅन इमॅजिन
बाकी आख्खी पोथी वाचली ... ज ब रा ट
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
13 Oct 2013 - 11:49 pm | विजुभाऊ
खॅ खॅ खॅ खीक्क्क्क्क्क्क
14 Oct 2013 - 12:00 am | प्यारे१
५ वर्षे दीड महिना ....
नॉट बॅड विजुभौ!
प्रगती आहे.
जमेल हळूहळू.
25 Aug 2008 - 11:26 am | अनिल हटेला
सही है विजुभौ !!!!!
पहीली च पोथी आहे ह्या जगतातली ...
जी मला समजली.....
बाकी फोटोज नाही टाकलेत तुम्ही ...
त्याबद्दल निषेध .................................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Aug 2008 - 11:29 am | मनस्वी
भारीच पोथी सापडलेली दिसतीये विजुभाऊंना!
मस्त लिहिलंय.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
25 Aug 2008 - 12:31 pm | पद्मश्री चित्रे
ष्टाईल एक्दम बेष्ट!
आवडले...
25 Aug 2008 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर
व्वा विजूभाऊ ब्येष्ट्...ब्येष्ट...७ ब्येष्ट बरका..!
25 Aug 2008 - 1:13 pm | अवलिया
छान वृत्तांत
नाना
25 Aug 2008 - 1:52 pm | II राजे II (not verified)
जबरा !!!!!!!!
परीचे गुढ काही उकल्लं नाही वाटतं अजून ;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
25 Aug 2008 - 2:03 pm | ब्रिटिश टिंग्या
पोथी आवाल्डी!
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!!
+१
25 Aug 2008 - 2:22 pm | मृगनयनी
अशीच काव्ये करीत रहा.....
आपापल्या... नातु- पणतुंना पुढे 'मिसळ-पाव' च्या इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी येइल....
विजुभै.... तुम्हाला मिपा चे 'हेमाडपंत' च म्हटले पाहीजे....
:) :)
25 Aug 2008 - 5:58 pm | प्राजु
विजुभौ..
तुमचं डोकं अजब आहे बुवा.. इतकं भारी लिहिलं आहे.. बोलती बंद.. :$
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Aug 2008 - 6:00 pm | शितल
काव्यमय कट्टा वृत्तांत आवडला.
:)
25 Aug 2008 - 6:50 pm | संदीप चित्रे
इथे च्यायला सलग काही ओळींची कविता सुचताना मारामार आणि तुम्ही तर एकदम पोथीच !
अभिनंदन.
25 Aug 2008 - 7:37 pm | डॉ.प्रसाद दाढे
एकदम खास! विजूभाऊ॑च्या पोतडीतून काय काय निघेल ह्याचा अ॑दाज करणे अवघड आहे..
मिपावर पण काय वल्ली आहेत एकेक? :)
25 Aug 2008 - 10:24 pm | कोलबेर
मान गये विजुभाऊ! पोथी मस्त जमली आहे.
-------------------------------------
'रक्त गाभुळलेली', 'शेवाळलेली' असली विशेषणे विनोद निर्मितीसाठी वीट येई पर्यंत वापरुन (कधी कधी )वात आणणारे हेच का ते विजुभाऊ? असा प्रश्न पडला.. प्रामाणिक मत राग नसावा :)
25 Aug 2008 - 11:01 pm | मदनबाण
मिपाचा वृतांत
ऐकुन आनंदु
मनात माझ्या
जाहला असे..
विजुभाऊ जबरदस्तच.!! :)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
26 Aug 2008 - 11:16 am | धमाल मुलगा
काय माणुस आहे बॉ हा?
हे विजुभाऊ म्हणजे खरंच काहीही करु शकतात असंच वाटावं एखाद्याला!
आता, कट्ट्याचा वृत्तांत पोथीत लिहिणे..कोणि विचार तरी केला असेल का?
भौ, सह्हीच :)
=))
का भाऊ सगळ्यांपुढे गरिबाच्या दारुण परिस्थितीची वर्णनं करता?
हा..हे लय भारी!
मजा आली बॉ :)
28 Aug 2008 - 6:44 pm | विजुभाऊ
पोथी वाचनास आलेल्या सर्वांचे धन्यवाद
आरती आणि प्रसाद श्री डॉन भौ देणार आहेत
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Aug 2008 - 7:19 pm | छोटा डॉन
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ...
कसचं कसं !
प्रसाद वगैरे घेऊन जावा ज्याला पाहिजे त्याने ...
"आरती" चे नाव काढल्यास "बत्तीशी घशात" घातली जाईल.
जोक्स अपार्ट !
आमच्या "इंटरनेट सर्वीस प्रोव्हाईडर" चा सध्या प्रॉब्लेम चालु असल्याने फोटो टाकता आले नाहीत.
युद्धपातळीवर काम सुरु आहे.
लवकरच "प्रसाद" मिळेल.[ आरतीचे नाव काढु नये, महागात पडेल ]
आरतीप्रेमी - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Aug 2008 - 7:28 pm | टारझन
"आरती" चे नाव काढल्यास "बत्तीशी घशात" घातली जाईल.
खॅ खॅ खॅ .... अब्ब आया उंट पहाड के निचे ...
प्रसाद(खायचा) प्रेमी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
28 Aug 2008 - 6:57 pm | मन
झकास जमलिये पोथी..........
आपलाच,
मनोबा
14 Oct 2013 - 9:35 am | चित्रगुप्त
वाहवा. कट्टापोथी एकदम झकास.