भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया!

चिखल्या's picture
चिखल्या in जनातलं, मनातलं
22 Jan 2013 - 10:18 pm

(लेख इतरत्र पुर्व-प्रकाशित)

या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती. म्हणतात नं, If there is will, there is way. बाईने दावा साधलाच शेवटी. थ्यंक यु रे शाहरुख़ खान.

या निमित्ताने आम्ही (म्हणजे मी ) काही सन्माननीय लोकांच्या मुलाखती घेतल्या.

दिग्गी राजा उर्फ़ दिग्विजय सिंह - हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान आहे.
मोहन भागवत: हे काँग्रेस पक्षाचं षड्यंत्र आहे. पूनम हि मूलतत्ववाद्यांच्या/पाकिस्तानच्या हातातले बाहुले आहे.
हीना रब्बानी खार - यह हिंदुस्तान की साजिश हैं, हम भी इसका मुहतोड़ जवाब देंगे! (आणि नंतर या बाईने वीणा मलिक यांना फोन केल्याचं ऐकिवात आहे)

अरविंद केजरीवाल - हा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाजी उपोषण करणार आहेत.
अण्णा हजारे - डॉक्टरांनी मला उपोषण करू नका असे इंग्लिश मध्ये लिहून दिले आहे.
प्रशांत भूषण - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. ते उपोषण नव्हे तर आमरण उपोषण करणारच. पूनम शिखंडी आहे.
किरण बेदी -प्रशांत भूषण, पूनमला शिखंडी म्हणालेच नाहीत.
अण्णा हजारे - जर पूनमला आमच्यापैकी कोणी शिखंडी म्हणाले असतील तर मी राजीनामा देईल.
अरविंद केजरीवाल - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. अण्णा राजीनामा नव्हे तर आमरण उपोषण करणार आहेत.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.
अण्णा हजारे - मी उपोषण करणार नाही. मात्र ही पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
कपिल सिब्बल - ह्या प्रकाराला पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.
सुषमा स्वराज - कपिल सिब्बल यांनी अण्णाजींची माफी मागावी. मी अण्णाना विनंती करते, त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देईन.
कॉंग्रेस प्रवक्ता - ते कपिल सिब्बलांचे वैयक्तिक मत आहे. अण्णाजीनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी रामलीला मैदानावर आमरण उपोषण करणारच.
अरविंद केजरीवाल - मी अण्णाना विनंती करतो , त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.

रामदेव बाबा - अरेच्च्या, मी जिचे कपडे घालून पळून गेलो तिचे नाव पूनम पांडे आहे तर.
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी थी, मुजसे पूछा, "बाबा मैं famous कैसे बनूँगी? मैंने पुछा "बेटा कपड़े पहनती हो? उसने जवाब दिया "हांजी" मैंने तभी उसे कह दिया "तभी तो कृपा रुकी हुयी हैं"

मनमोहन सिंग - या असैन्विधानिक कृत्याचा मी निषेध करतो. (आणि नंतर म्याडम ला फोन जातो, आज्ञा विचारायला)
सोनिया गांधी - आम्ही या घटनेचा निषेध करतो. (आणि नंतर एक फोन प्रणब मुखार्जीना जातो)
प्रणब मुखर्जी - सरकारच्या प्रगतीवरच लक्ष हटवण्यासाठी हे विरोधकांच कारस्थान आहे.
मोमता ब्यानर्जी - घटक पक्षांना काँग्रेस ने विचारात घेवून कृती करावी अन्यथा आम्हाला निर्णोय घ्यावा लागेल. ही डाव्या पक्षांची चाल आहे. आम्ही पूनमला कोपडे देणार आहोत.
जयललिता: आम्ही तिला मोफत कपडे पुरवणार आहोत.
शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवू.

जया बचपन - मैं किसी पूनम पांडे को नहीं जानती, मैं सिर्फ पूनम धिल्लों को जानती हूँ!
राम गोपाल वर्मा : माझ्या पुढच्या पिक्चर चे नाव आहे "पूनम के शोले"
महेश भट्ट: जिस्म ची खरी हेरोईन मिळाली.
शक्ती कपूर - आऊ!
गब्बर सिंग - कितने कपडे थे!
कमाल आर खान - ती ज्या दिवशी पूर्ण कपडे घालेल, त्या दिवशी मी माझे सगळे कपडे काढणार आहे.
अवधूत गुप्ते - चाबुक तोडलंस sorry काढलस सगळं काढलस (आणि नंतर मिठी नेहमीच्याच सवयीने)
आदेश बांदेकर - पूनम वाहिनीने कपडे काढले म्हणून काय झालं मी तिला एक पैठणी देणार आहे.
ACP (सी आय डी फेम) - पूनम ने कपडे नहीं पहने इसका मतलब समजे दया? इसका मतलब यह हैं की, खुनी एक औरत हैं जो पूनम के कपडे ले भागी हैं!
राखी सावंत: मी एवढ्या वेळेस कपडे काढले तरी मला कोणीच का भाव देत नाही.

इतर पक्षी
मोन्टेक सिंग हळू हळू वालिया -लवकरच आम्ही तिला दारिद्र्य रेषेखाली आणणार आहोत.
सचिन तेंडूलकर - आयला.
राहुल गाँधी - मी तिच्या सेट वर जाऊन जेवण करणार आहे.

महाराष्ट्र माझा
धाकले ठाकरे - करून दाखवलं (ते कॅमेरा घेवून कुणाचे तरी फोटो काढायला गेल्याचं ऐकिवात आहे.)
राज ठाकरे - परप्रांतीयांचा आक्रमण आम्ही सहन नाही करणार, सडकून काढील एकेकाला, तिकडे विदर्भात पहा..... (आणि नंतर महाराष्ट्रीय अगम्य प्रश्न राखी सावंत यांना फोन गेल्याचा कळते )
दादा - एकदा सत्ता द्या मग दाखवतो...
सुशीलकुमार शिंदे -हायकमांड जसे सांगतील तसे करू. मी एक पट्टेवाला.........
मुख्यमंत्री - हायकमांड सोबत आज बैठक आहे. बैठकीनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

मानवतावादी कार्यकर्ते -
तिस्ता सेटलवाड - कपडे काढायचा हक्क तिला घटनेने दिला आहे, मी तिच्या पाठीशी उभी आहे.
ज्येष्ठ गांधीवादी - पूनम हि गांधीजींची शिष्य आहे, विदेशी कपडे काढून तिने तिच्या उच्च सामाजिक मुल्यांच दर्शन घडवलं आहे. मी तिला सुत कातायच शिकवणार आहे.

आम्ही - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले | तोची साधू मानावा, देव तेथेची जाणावा ||

आता होऊन जाऊ द्या. या लेखाचं वस्त्रहरण आणि तुमच्या प्रतिक्रियाही...

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

22 Jan 2013 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी

शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवू.

हे यापेक्षा असे हवे होते....

शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी नियमांत बसते की नाही हे पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेवू.

असे हवे होते. :-)

छान कल्पनाविस्तार.
परंतु (गेले वर्षभर टीव्ही, वर्तमानपत्रे इ. पासून दूर असल्याने) मुळात ही पूनम पांडॅ कोण, तिने काय काय केले, हे ठाऊक नसल्याने फारसे समजले नाही. कदाचित हे ठाऊक नसलेला इथे मी एकटाच असेन, तरिही ही माहिती दिल्यास उत्तम.

पक्या's picture

23 Jan 2013 - 3:20 am | पक्या

हे हे हे ..चांगला आहे कल्पनाविस्तार.

खटपट्या's picture

23 Jan 2013 - 6:30 am | खटपट्या

छानच लिहीले आहे. मस्त !!!!

आशु जोग's picture

23 Jan 2013 - 8:34 am | आशु जोग

लिखाण अगदी ठीक पण लोकांचे उद्गार दिलेत ते नाही पटले

बाकी
मोहन भागवत यांचे नाव घेतले की
टी आर पी वाढतो का ?

इरसाल's picture

23 Jan 2013 - 9:37 am | इरसाल

चिखल्या यांनी लिहीलेला लेख सदस्यांनी खेळीमेळीने घ्यावा. एक मनोरंजन म्हणुन उगाच दुसर्‍या सामन्यातील धावांचा हिशोब/बदला(कुणाच्याही) इथे नको.

> चिखल्या यांनी लिहीलेला लेख सदस्यांनी खेळीमेळीने घ्यावा

हे सांगावे लागते आहे यातच सर्व काही आले
-
> एक मनोरंजन म्हणुन उगाच दुसर्‍या सामन्यातील धावांचा हिशोब/बदला(कुणाच्याही) इथे नको.

इरसाल
काय मनोरंजन म्हणून घ्यायचे हे तुम्ही लोकांना शिकवू नका.

दुसरा सामना ??
अहो याच सामन्यातील लिखाणावर आम्ही मत व्यक्त केले आहे
वाचलेले दिसत नाही तुम्ही

इरसाल's picture

23 Jan 2013 - 11:53 am | इरसाल

तुमच्या पुढील प्रतिसादाकरिता शुभेच्छा.

इरसाल
काय मनोरंजन म्हणून घ्यायचे हे तुम्ही लोकांना शिकवू नका.

हे ही सांगावे लागते आहे यातच सर्व काही आले

तिमा's picture

23 Jan 2013 - 11:02 am | तिमा

युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे.

स्वतःचे कपडे काढणारे ऐतिहासिक पात्र कोण हे कळले नाही.
आपल्याच देशाची निंदानालस्ती करताना पुरेशी उदाहरणे द्यावीत. एका उदाहरणावरुन जनरलायझेशन कसे करता येईल ?

खटासि खट's picture

23 Jan 2013 - 12:30 pm | खटासि खट

शिळ्या कढीला ऊत का आणला जात आहे ? खुसखुशीत नाही वाटला.

भरपूर हसू आले. अगदी थोडेच संदर्भ किंSSचित जुने असल्याने उतरलेल्या बोंबलांसारखे झाले आहेत, पण हास्यमूल्य शेवटपर्यंत टिकलं आहे. लगे रहो....!!

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2013 - 1:50 pm | संजय क्षीरसागर

सुशीलकुमार शिंदे -हायकमांड जसे सांगतील तसे करू. मी एक पट्टेवाला.........

हे भन्नाट!

आणि शेवटी पूनम पांडे : उधर बारमे कपडे उतरवानेके पैसे फेकते हो. घरवाली उतारे इसके वास्ते क्याक्या जुलूम सहते हो. और इधर मैं खुद उतार रहीं हूं तो हंगामा क्यों?

पैसा's picture

23 Jan 2013 - 6:12 pm | पैसा

आवडले.

अभ्या..'s picture

23 Jan 2013 - 6:19 pm | अभ्या..

अजिबात हसू आले नाही. :(
यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया जरी मागवल्या असत्या तरी त्या वाचून जास्त मनोरंजन झाले असते.

चिखल्या's picture

23 Jan 2013 - 9:00 pm | चिखल्या

सर्व प्रतिसाद वाचले! भा. पो. :)

आशु जोग's picture

23 Jan 2013 - 10:45 pm | आशु जोग

why chicken crossed the road ?

असा एक रतीब काही वर्षापूर्वी कुणीतरी मेलमधून घातला होता
त्यात अशाच अनेक राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

पण आजचा प्रकार सुमार वाटला

राजेश घासकडवी's picture

27 Jan 2013 - 7:35 pm | राजेश घासकडवी

विनोदी आणि चुरचुरीत...