रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच.
अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?"
मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते.
पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात.
आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
प्रतिक्रिया
16 Jan 2013 - 8:50 pm | विनायक प्रभू
...लावल्यावर एक्दम भारी.
16 Jan 2013 - 9:55 pm | मृगनयनी
शुचिताई.... तुला तर सगळंच माहित आहे गं!.. सात चक्र, कुन्कवाने उद्दीपित करायचं आज्ञा चक्र!,.... तरीही विचारतेस्स? ;)
आज्ञा चक्रातील एनर्जी वर ब्रह्मरन्ध्रांपर्यन्त जाऊन बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना भ्रूमध्यचक्रापासून वरती उभे गन्ध लावण्याची परम्परा आहे.......तेजस्वी योद्धा असणार्या स्त्रियांना देखील उभे गन्ध लावले जाते!!
16 Jan 2013 - 9:58 pm | शुचि
मला कन्फर्म करायचं होतं. म्हटलं आपलं काही चूकतय का :(
16 Jan 2013 - 10:04 pm | मृगनयनी
बहुधा पूर्वीच्या काळी बाई विधवा झाल्यावर बहुधा तिची भ्रूमध्यात येणारी एनर्जी जास्त ऊद्दीपित होऊ नये म्हणून... तिचे कुन्कु पुसण्याची पद्धत रुढ झाली असावी!!!!
16 Jan 2013 - 10:16 pm | धन्या
केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?
16 Jan 2013 - 11:03 pm | मृगनयनी
"केस" हे स्त्री'च्या सौन्दर्याचे प्रतीक मानले जाते. लांब केसांमुळे तिचे सौन्दर्य वाढते. तसेच तिची ऊर्जा केसांमध्ये साठवली जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी सुवासिनी / कुमारी यांना केस कापायची मुभा नव्हती. परन्तु विधवा स्त्रियांची ऊर्जा साठून त्या काय करणार? किन्वा केस वाढवून त्यांचे सौन्दर्य परपुरुषच बघणार किन्वा त्या विधवा बायका परपुरुषाकडे आकृष्ट होणार.. असा विचार त्यांच्या घरातल्या लोकांच्या मनात येई. असे काही होऊ नये.. म्हणून त्यांचे केशवपन करण्याची दुर्दैवी पद्धत प्रचलित होती.
खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट होती.. की पूर्वी लहान वयात किन्वा तरूण वयात विधवा झालेल्या बायकांना या अनिष्ट रूढींना सामोरे जावे लागे. पुनर्विवाहासही मान्यता नसल्याने अनेक इच्छा दडपून टाकाव्या लागत असत...त्या मानाने सध्या तरूण विधवांची स्थिती खुपच चान्गली आहे. किमान मृत नवर्याच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा नको असलेल्या बायका निर्धोकपणे दुसरा कायदेशीर विवाह करू शकतात.
17 Jan 2013 - 11:34 pm | शिल्पा ब
वा !! अशा उत्तमोत्तम संस्कृतीरक्षक धाग्यांचं अन तैंच्या अभ्यासाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय ज्ञानवर्धक माहीती आहे.
16 Jan 2013 - 10:17 pm | धन्या
केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?
17 Jan 2013 - 3:33 am | नेत्रेश
> "आज्ञा चक्रातील एनर्जी वर ब्रह्मरन्ध्रांपर्यन्त जाऊन बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना भ्रूमध्यचक्रापासून वरती उभे गन्ध लावण्याची परम्परा आहे.......तेजस्वी योद्धा असणार्या स्त्रियांना देखील उभे गन्ध लावले जाते!!"
एवढे सगळे गंध लावणारे बुद्धीमान, शुरवीर, धाडसी, तेजस्वी पुरुष आधी मुघालांकडुन व नंतर ईंग्रजांकडुन का पराभुत होउन शेकडो वर्षे गुलामगिरीत गेले कुणास ठाउक...
17 Jan 2013 - 1:57 pm | केदार-मिसळपाव
वर्मी घाव घातलात...
23 Jan 2013 - 1:56 pm | रणजित चितळे
तेच आर्य, हिंदू, चंद्रगूप्त मौर्या पासून च्या लोकांनी सिंकंदर, सेल्यूकस, शक, हून, कूशाण, नाहपान, कासिम इत्यादी इन्व्हेडर्सना चित करुन ४००, ५०० वर्षापर्यंत आपला भारत एकसंध (जेव्हा रीपब्लिकची कल्पना अजून जन्माला आली नव्हती) ठेवला. आपण ह्या लोकांकडून पराभूत होण्यास पूष्कळ कारणे (व काही गंध, कुंकू, व अजून काही चूकीच्या परंपरांमूळे, चाली रुढींमुळे आपले ऐक्य राहू शकले नाही) झाली.
अवांतर -
जून्या सिव्हीलायझेशन मध्ये काही परंपरा आपण वापरतो, त्यानी एक त्या संस्कृतीला आयडेंटीटी येते. देश काल पात्रा मुळे ते बदलत जातात. हल्ली साडी नेसणे कमी झाले आहे. कुंकू लावणेही जवळ जवळ गेलेच आहे. ह्यात काही दुःख वाटायचे कारण नाही. आज न उद्या ते होणारच होते. काही परंपरा काही कारणाने येतात. मुसलमानात घुंघट घ्यायची परंपरा, किंवा काश्मिरी हिंदूं मध्ये लग्न झालेल्या स्त्रीया मंगळसुत्र कानात घालतात (त्यांचे वेगळ्या प्रकारचे असते वेगळेच दिसते व आपल्याला कसेतरीच वाटते पण त्यांच्या कडे पद्धत आहे). सरदार पगडी घालतात, आता घातली नाही तरी चालते. पण एक आयडेंटीटी येते त्यांनी शिख धर्माची. अशी बरीच उदाहरणे देता येतील.
16 Jan 2013 - 8:56 pm | अग्निकोल्हा
अवांतर :- कुंक्वाखाली "देखो मगर प्यारसे" लिहल्यास जाणकार हरकत घेतील काय ?
16 Jan 2013 - 9:39 pm | आनन्दिता
+१००
16 Jan 2013 - 9:05 pm | लीलाधर
सौभाग्य अलंकार आहे. कुंकुम तिलक हे स्त्रीचे सौभाग्य प्रतिक आहे. कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून जगात त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.
16 Jan 2013 - 9:12 pm | धन्या
अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण प्रतिसाद !
16 Jan 2013 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा
=)) =))
धन्या ***** मारायचय का आज हसवुन हसवुन
16 Jan 2013 - 9:38 pm | सूड
'जगात त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.'
वरचं वाक्य वाचून पिच्चरमधली हिरवीण 'दो चुटकी शिंदूर की किम्मत...' वैगरे म्हणतेय असं वाटलं, असो. अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
17 Jan 2013 - 12:31 am | विश्वनाथ मेहेंदळे
"कीतीहि" वरील फ़ुल्लटोस का रे सोडलास ??
17 Jan 2013 - 12:38 am | मोदक
कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून
स्त्रीयांच्या नाकातील चमकी / मोरणी* बद्दल तुझे मत काय रे लीलाधरा..?
(*मोरणी हा शब्द औरंगाबाद / बीड / विदर्भ साईडला वापरला जातो बहुदा - अधिक माहिती नाही!)
17 Jan 2013 - 8:22 am | ५० फक्त
दागिने म्हणजे त्याना किमान १ तोळ्यापेक्षा जास्त असे अपेक्षित असावे.
17 Jan 2013 - 11:37 am | sagarpdy
माताय ! कोण बाई एका वेळी १ तोळा कुंकू लावते हो ?
17 Jan 2013 - 6:02 pm | इनिगोय
:)) राधे गुरु मां ला विचारा.. एक तोळा कुंकू नै पण एक तोळा मेकप नक्कीच असतो तिच्या चेहर्यावर.
16 Jan 2013 - 9:07 pm | रेवती
या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात.
मीही हेच ऐकले आहे.
16 Jan 2013 - 9:10 pm | दादा कोंडके
तुम्ही दिलेलं कारण अगदी बरोबर आहे.
तसेच पुर्वीच्या काळी कुंकू म्हणून कृत्रिम रंग न वापरता विशिष्ठ प्रदेशातली तांबडी माती वापरत. आजुबाजूच्या जडिबुटींमुळे त्यात अनेक औषधी गुणधर्म उतरलेले असायचे. तर पुरुष चंदनाचा वापर करीत. चंदन शितल असते हे आपण जाणताच. मस्तक हे सगळ्या इंद्रियांच्या जाणिवांचं केंद्रबिंदू आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे शिवाय दोन्ही डोळ्याच्या मधोमध असल्याने कुंकू डोळ्यांसाठी लाभदायक आहे. १००-१५० वर्षांपुर्वी भारतीय बायका चश्मा लावित नसत!
-(पिचुफेम) दादाजी तांबे
16 Jan 2013 - 11:03 pm | गणामास्तर
हे म्हणजे लैचं खतरा. . :) :)
16 Jan 2013 - 11:32 pm | रेवती
-(पिचुफेम) दादाजी तांबे
खरंतर या शब्दांचा इथे मी निषेध करते. असे लिहून काय मिळते? यातून बालाजी तांब्यांबद्दल काय वाटते त्यापेक्षा वेगळा अर्थ निघतो व नको ती चर्चा होते. यातून कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी संताप येतोच. कोणत्याही स्त्रीस हे आवडणारे नाही.
18 Jan 2013 - 1:55 am | दादा कोंडके
ज्या दिवशी स्त्रिया असले विनोद असलेल्या प्रतिक्रिया पुरुषांप्रमाणेच खेळकरपणे घेतील आणि त्यांना 'कुंकू म्हणजेच स्त्रीचा खरा दागिना' टाईप प्रतिक्रिया आवडणार नाहीत तोच सुदीन.
असो, तांबी तांबे सोडून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
18 Jan 2013 - 1:00 pm | बॅटमॅन
स्त्रिया आणि खेळकरपणा या दोन गोष्टी इन जण्रल कोसो दूर असतात एकमेकांपासून (काही अपवाद मान्य करून).
आंजावरील एकूण चर्चेवरून लक्षात कसं आलं नाही हो तुमच्या म्हंतो मी , दादा-जी?
19 Jan 2013 - 12:18 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे बघा, स्त्रियांनी कुठले विनोद खेळकरपणे घ्यायचे आणि कुठले मनावर घ्यायचे ते सिमॉन बावरी (आधी आम्हाला फक्त राधा बावरी माहित होती) यांनी "द कंड सेक्स" मध्ये लिहिले आहे का ते आधी शोधू द्या. मग पुढील आक्रस्ताळेपणा करू आम्ही.
18 Jan 2013 - 12:06 am | आदूबाळ
एका पिचुवरून इतकी मारामारी, तर इथे काय होत असेल:
http://en.wikipedia.org/wiki/Machu_Picchu
(हसून गडाबडा लोळायची स्मायली)
अजून जमत नाही
18 Jan 2013 - 12:49 am | किसन शिंदे
= + )) इज इक्वल टू धीस =)) स्मायली ;)
18 Jan 2013 - 1:08 am | आदूबाळ
धन्स! =))
16 Jan 2013 - 9:13 pm | लीलाधर
गंध का लावतात: पुरुषाचा भालप्रदेश म्हणजे कपाळ त्या ठिकाणी परमेश्वराने ब्रह्मदेवाचे स्थान उत्पन्न केलेले आहे म्हणुन गंध हे अलंकाराचे प्रतिक म्हणुन लावले जाते.
16 Jan 2013 - 9:34 pm | शुचि
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
16 Jan 2013 - 9:54 pm | धन्या
आता कुठे चर्चेला रंग भरतोय...
16 Jan 2013 - 9:58 pm | शुचि
:)
18 Jan 2013 - 8:08 pm | स्मिता.
काही खास लिहिण्यासारखं नाहीये... फक्त धाग्याच्या द्विशतकाला हातभार लावतेय.
16 Jan 2013 - 9:38 pm | पिंपातला उंदीर
बाकी मंगळसूत्र, कुंकू यासारखी प्रतीक स्त्रीयानच का बाळगावी लागतात? वरती कुणीतरी कुकवाच्या औषधी गुणधर्माच वर्णन केल आहे. हा फायदा पुरुषाना का नको? अशा पुरुश्द्वेषट्या धर्माचा जाहीर निषेध. : )
16 Jan 2013 - 9:41 pm | सूड
हा फायदा पुरुषाना का नको?
तुमच्यापासूनच सुरुवात करा मग. लग्न झालं असेल तर उद्यापास्नं मंगळसूत्र घालत चला आणि नसेल तर लग्नात स्वतःसाठीही एक बनवून घ्या, कसें ?
16 Jan 2013 - 9:46 pm | जेनी...
हिहिहि.
16 Jan 2013 - 9:48 pm | पिंपातला उंदीर
16 Jan 2013 - 9:50 pm | आनन्दिता
थांबा.. थांबा.. असा जोरदार निषेध करायच्या आधी समस्त पुरुषांना मंगळ्सुत्र, कुंकु या अवतारात इमॅजिन करा.. तुम्हाला, हा फायदा पुरुषाना का नको? याचे उत्तर मिळुन जाइल.
सकाळी हापिसला जाताना , अगं माझं मंगळसुत्र सापडत नाहीये कुठे आजचा दिवस तुझं घालुन जातो हे ऐकायला कसं वाटेल नं??...
16 Jan 2013 - 9:55 pm | जेनी...
आणि एखादा पैल्वान्टैप मुच्छड असेल तर त्याला गोलगरगरित कुंकु आणि मंगळसुत्र
त्यात हातात हिरव्या बांगड्या ... काय भन्नाट लूक असेल नै =))
" च्यायला ह्या ट्रेनच्या गर्दित रोज एक बांगडी पिचकते ... घामानं कुंकवाचा ओघळ
गालावरुन मिश्यांपर्यंत पोचतोय ... नक्को नक्को झालाय हा पूरुषाचा जन्म :-/ "
असं ऐकायला कसं वाटेल :)
17 Jan 2013 - 8:23 pm | बाबा पाटील
यापेक्षा,दाढीमिश्यावाल्या पैलवानबाबाला नववा महिना चालु असुन तो अवघडलेल्या अवस्थेत एक एक पाउल उचलतोय ही कल्पना कसली भन्नाट वाटेल.....
17 Jan 2013 - 11:08 pm | जेनी...
हि हि हि
18 Jan 2013 - 3:42 pm | तुषार काळभोर
???
16 Jan 2013 - 10:00 pm | पिंपातला उंदीर
हे हे हे
17 Jan 2013 - 3:30 pm | चेतन माने
हा हाहा हा मेलो :D :D :D
16 Jan 2013 - 9:45 pm | इष्टुर फाकडा
कपाळाला कुंकू लावण्यामागे अक्युप्रेशर चा संदर्भ आहे असे पूर्वी ऐकले होते.
अवांतर:
लीलाधर आणि ('पिचू' फेम !!!) दादाजी तांबे यांचे प्रतिसाद वाचून इतका हसतोय कि इतर लोक केवळ माझ्याकडे बघूनच खदाखदा हसायला लागले आहेत. बाकी 'पिचू' या शब्दाने किंवा त्याच्या संदर्भाने कायमच मला फास्स्कन हसायला लावले आहे. शतकातला सर्वात विनोदी शब्द आहे हा.
16 Jan 2013 - 9:48 pm | जेनी...
जस्ट लाईक इष्टुर फाकडा =))
मला या नावाचच हसु येतं :D
17 Jan 2013 - 9:02 pm | इष्टुर फाकडा
चला, नाव सार्थकी लागलं :)
16 Jan 2013 - 9:53 pm | धन्या
एकदा कधीतरी बालाजी तांबेंना भगवदगीता कार्ड की तसलंच काहीतरी वापरुन ज्योतिष कथन करताना पाहीलं आणि त्यांचा धसकाच घेतला.
16 Jan 2013 - 10:59 pm | गणामास्तर
अरे ये पीएसपीओ नही जानता.. :)
आता एक काम कर, रद्दीतले सगळे फॅमिली डॉक्टर उपसून सगळी प्रश्णोत्तरे पाठ कर. ;)
17 Jan 2013 - 8:42 pm | धन्या
किंवा इथे सांगण्यासारखे नसेल तर व्यनी कर.
आमच्याकडे सकाळ येत नाही. जाहीरात टाईम्स येतो, कसल्याशा ऑफरमधला आहे म्हणून चालू आहे. शनिवार आणि रविवार लोकसत्ता घेतो. :)
18 Jan 2013 - 12:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
मला पन पायजे व्यनि. कवाधरनं सोदतोय अर्त याचा. फोनवर ५० रुपडे गेले त्या भानगडीत.
18 Jan 2013 - 2:20 am | आदूबाळ
"तो शब्द" अधिक बालाजी तांबे असं गुगलून घ्या. बरंच ज्ञानवर्धन होईल! (माझंही झालं)
18 Jan 2013 - 3:45 pm | तुषार काळभोर
'त्यांच्या' सगळ्या औषधांच्या नावाचा शेवट 'सॅन'ने का होतो?
16 Jan 2013 - 10:04 pm | आजानुकर्ण
कुंकू हे स्त्रियांच्या मासिक धर्माचे प्रतीक आहे. कुंकवाचा लाल रंग हा रक्ताशी संबंधित असून त्याचा पुरषांचे शौर्य वगैरेंशी संबंध नसून मासिक पाळीशी संबंधित आहे. मासिक पाळीच्या आवर्ती चक्राप्रमाणे आवर्तन दर्शवणारा गोलाकार बिंदू म्हणजे कुंकू. ऋतुप्राप्ती झालेल्या स्त्रियाच कुंकू लावत असत. मात्र कुंकवाचा लग्नाशीही संबंध नव्हता. लग्नानंतर कुंकू लावतात असे आपणास दिसते कारण पूर्वीच्या काळी ऋतूप्राप्तीनंतर स्त्रियांचा विवाह लगेचच होत असे.
ऍक्युप्रेशर, आयुर्वेदिक फायदा, मस्तक शांत होते वगैरे बालाजी पद्धतीचे निष्कर्ष निराधार आहेत. अनेक कुंकू लावणाऱ्या कडकलक्ष्मी बायका मला माहीत आहेत. कुंकवाने त्यांचे डोके थंड झाले नाही.
याबाबत मनोगतावर की उपक्रमावर विस्ताराने चर्चा झाली होती. दुवा सापडल्यास देतो.
16 Jan 2013 - 10:09 pm | जेनी...
कुंकु लालच का असतं ?? असा प्रश्न विचारणार होते आता मी :(
पण मग वेगवेगळ्या रंगांच्या साडीवर लावायला वेगवेगळ्या रंगाची कुंकवं बनवायला
हवी होती :( ... त्यामुळेच टिकलीशिवाय पर्याय नसतो :-/
16 Jan 2013 - 11:03 pm | अभ्या..
अगदी सहमत. त्यांचा तर कपाळभर मळवट अस्तो तरीपण.
बादवे रंगाचे ठीक आहे हो पण आकाराचे काय? टिपका, गोल, लंबगोल, चिरी, मळवट या प्रत्येकामागे पण संस्कृती आहे का?
16 Jan 2013 - 11:40 pm | राही
या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत तरीही धार्ष्ट्य केले आहे. फार पूर्वी विश्वनाथ खैरे यांनी त्यांच्या एका लेखात असे मांडले होते की मुलगी ऋतुमती होऊ लागली आहे हे जाहीर होण्यासाठी ती कपाळावर,मुख्यत्वे भांगात लाल रंग भरीत असे.प्राचीन काळात मुलीला जोडीदार निवडण्याचा हक्क होता. ती मुलगी प्रणयाराधन करण्याजोगी झाली आहे हे इच्छुक पुरुषांस कळावे यासाठी ही खूण होती. खैर्यांनी तर ऋतु,रक्त,ह्या शब्दांमध्येही व्युत्पत्तिसाम्य मानले आहे. ठराविक कालावधीचे फेरे हा अर्थ पुढे सार्वत्रिक झाला आणि कालमापनासाठीसुद्धा वापरात आला.
17 Jan 2013 - 12:16 am | शुचि
कारण कळेल का?
बाकी प्रतिसाद आवडला. नवीन माहीती दिल्याबद्दल, मी आजानुकर्ण यांची आणि आपली आभारी आहे.
17 Jan 2013 - 1:01 am | बॅटमॅन
पूर्णपणे सहमत. धागाकर्त्रीचा उद्देश साफ असेल, पण कैच्याकै प्रतिसादांचे प्रमाण बघता असेच म्हणावे लागते.
बाकी एकेका फालतू शब्दाच्या वापरावरून संवेदना जागृत झाल्याचे पाहून मजा वाटली. (नेहमीप्रमाणेच)
16 Jan 2013 - 10:09 pm | आनन्दिता
एस.टी मधे घरचा वैद्य, १०० प्रश्नांची उत्तरे अशी पुस्तके विकायला येतात लोकं. त्यात असतं म्हणे या कुंकवाचं कारण..
आत्तापर्यंत पुस्तकांपेक्षा त्या विक्रेत्याच्या गेंगाण्या आवाजातील जाहिरातीतच जास्त इंटरेस्ट असल्यामुळे कधी वाचनं झालं नाही...
16 Jan 2013 - 11:04 pm | शुचि
उपरोध (आयरनी) हाच की जेव्हा अमेरीकन्स हा प्रश्न विचारतात तेव्हा याचे उत्तर शोधावेसे वाटते, बाकी अंधानुकरण किंवा दबावाखाली अनुसरण :(
17 Jan 2013 - 12:08 am | पिवळा डांबिस
अमेरिकनांना काय गरज पडल्येय आमच्या बायकांच्या कुंकवाची उठाठेव करायची?
तुमच्या बायका कुठेकुठे आणि कायकाय गोंदवून घेतात ते पहिल्यांदा बघा म्हणावं!!!!
:)
17 Jan 2013 - 12:18 am | शुचि
हाहाहा "ह्म्म "कुठे कुठे" हो पिडां =))
17 Jan 2013 - 12:21 am | जेनी...
आणि " काय काय " हो पिंडा काका =))
17 Jan 2013 - 12:36 am | पिवळा डांबिस
शुचि आणि पूजा,
या एकदा आमच्या मालिबू बीचवर,प्रत्यक्षच दाखवतो!!!
गोर्यांच्या गोंदणाला आरसा कशाला!!!
:)
17 Jan 2013 - 1:14 am | शुचि
मालिबू वर खूपदा गेलेय पण त्या देवळातील प्रसाद चापायला :) बाकी बायकांकडे नाही पाहीले :(
17 Jan 2013 - 7:11 am | पिवळा डांबिस
मी मालिबू बीचवर असं म्हंटलय.
अमेरिकन बायका मालिबूच्या देवळात कशाला जातील, तो टॅमरिंड राईस खायला?
तो तर आम्हालासुद्धा मोह पाडत नाही...
:)
17 Jan 2013 - 7:58 am | शुचि
:) .... हाच तो बेवॉच चा बीच :) खरय तुमचं म्हणणं पिडां
17 Jan 2013 - 1:25 pm | नंदन
>>> गोर्यांच्या गोंदणाला आरसा कशाला!!!
बाकी आपल्या पूर्वजांनी ज्या सूक्ष्मचैतन्यदायी बिंदुदाबनाची देणगी फक्त पती हयात असणार्या स्त्रियांच्या पिट्युटरी ग्लँडच्या उद्धारासाठी उपलब्ध केली होती, तेच ज्ञान उसने घेऊन (जसं कणादाच्या सिद्धांतावरूनच त्यांनी 'हिग्ज बोसॉन'चा शोध लावला) ह्या पाश्चात्यांनी सर्वांसाठी पिट्युटरीच काय पण पँक्रिआजपासून हायपोथॅलॅमसपर्यंत सार्या ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत्त्वाची सोय ह्या टॅटूजमार्फत केली आहे, अशी काही वदंता अलीकडेच कानी आली. खरं काय हो हे?
18 Jan 2013 - 1:04 pm | बॅटमॅन
कसलं मेंदुभंजक बोलता हो तुम्ही !!!!!
18 Jan 2013 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा
@ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत्त्वाची>>> =)) =)) =))
@कसलं मेंदुभंजक बोलता हो तुम्ही !!!!!>>> बॅटमॅन यांच्या तापत्रयविहारक वाक्यरचनेशी....... पूर्ण सहमत ;-)
18 Jan 2013 - 3:53 pm | चिगो
बाप रे.. खाचकन ऽ ऽ खप्याच मैं.. =))
22 Jan 2013 - 9:40 am | यशोधरा
नंदन मेल्या, ह्या असला कायबाय लिहीतंस तर एक बरोसो लेख रे लिहूक काय हात दुखतत तुझे?
16 Jan 2013 - 11:10 pm | श्रिया
लेखात नमूद केल्याप्रमाणे कुंकवाचे फायदे मिळण्यासाठी ते कपाळावर नेमके कुठे लावावे ह्याचेही निर्देश आहेत.
कपाळा खाली ,भ्रुमध्याच्याठिकाणी पिच्यूटरी ग्लॅंड (शीरस्थ ग्रंथी)चा अक्यूप्रेशर बिंदू आहे. त्या ठिकाणी शुद्ध कुंकू लावले असता त्यातील औषधी घटक त्वचेमार्फत ग्रंथीना मिळतात व त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित चालू राहते.
तसेच शुद्ध लाल कुंकवामध्ये लोह असेल तर तोही फायदा मिळण्याचे प्रयोजन असावे.
17 Jan 2013 - 2:47 am | स्पंदना
भ्रुमध्याच्याठिकाणी पिच्यूटरी ग्लॅंड असते त्या ग्लँडला संरक्षण अस काहीस मी वाचल आहे. पण वर जो कुंकु लाल मातीपासुन बनल जायच हे जे लिहिलय ते मात्र खरच पहिल्यांदाच ऐकते आहे. कारण आमच्याकडे कुंकवाची फळ असतात. ती कुटुन त्याची पावडर्(चुर्ण म्हणा हवे तर) कुंकु म्हणुन वापरली जाते. कुंकवाचे अनेक आयुर्वेदिक उपयोगही आहेत. मी पाहिली आहेत कुंकवाची झाड, अन फळं सुद्धा. मग पुढे ही फळं कोण गोळा करत फिरणार म्हणुन हळदीत रसायन मिसळुन त्याचा वापर सुरु झाला अन त्यामुळे कपाळावर पांढरे डाग, अथवा जळल्यासारखा काळापणा, आग हे प्रकार सुरु झाले. मग आला गंध विच वॉज कन्सिडर्ड अॅज सेफर दॅन कुंकु. या सगळ्या गोंधळात लोक मुळं कुंकु विसरुनच गेले.
16 Jan 2013 - 11:44 pm | सुबोध खरे
स्त्रियांचे कपाळ गोल असते.पुरुषांचे कपाळ आयताकृती असते.त्यामुळे गोलाच्या केंद्रस्थानी कुंकू जसे चांगले दिसते तसे चौकोनाच्या केंद्रस्थानी दिसत नाही. म्हणून कुंकू जितके बायकांना चांगले दिसते तितके पुरुषांना दिसत नाही.
कुंकू लाल असण्याचे कारण मानवी रक्ताचा रंग लाल आहे. कोणतीही स्त्री (काळी किंवा गोरी) लाजली कि चेहऱ्याचा रक्त पुरवठा वाढतो आणि चेहरा लाल होतो. त्या लालीम्याला मेचींग म्हणून लाल कुंकू लावतात.
काळ्या स्त्री ला सुद्धा लाल कुंकू म्हणूनच खराब दिसत नाही.नटण्या मुरडण्याची हौस बायकांना जितकी असते पुरुषांना तिच्या एक दशांशाने हि नसते.लग्नात आजी आजोबांच्या वयाच्या व्यक्ती पहाम्हणजे आपल्या लक्षात येईल.
17 Jan 2013 - 12:11 am | तिरकीट
"मास्तर, ती द्रौपदी होती न द्रौपदी, ती कपाळावर कुंकवाचे ५ ठिपके लावायची का हो?"
पु. लं चा १ प्रांजळ प्रश्न
17 Jan 2013 - 12:14 am | जेनी...
ह्या .. उगिच कायतरी :-/
17 Jan 2013 - 2:01 pm | केदार-मिसळपाव
मास्तरन्नी मग किती आणी कुठे फटके मारले हो ? आमच्या कडे ह्याला 'तुम्बून काढले' असे वाक्य प्रचलीत आहे.
17 Jan 2013 - 11:10 pm | सूड
नक्की का ? की 'तिंबून काढणे' म्हणायचंय ?
17 Jan 2013 - 11:20 pm | बॅटमॅन
नै. तुंबून काढले, तुंब्या/हग्या मार दिला, इ.इ. शब्दप्रयोग प्रचलित आहेत.
18 Jan 2013 - 12:20 am | केदार-मिसळपाव
वरील सगळे बरोबर आहे.
मला तिम्बुन काढणे म्हणायचे होते. अमळ घाइघाइने लिहिले होते मी, म्हणुन घसरकळीफलकाने झाली चुक.
17 Jan 2013 - 12:14 am | अभ्या..
बायकांना कुंकू चांगले दिसते याला सहमत पण त्या आकाराच्या थिअरीला नाही.
(आणि लाजून एकदा लागले कुंकू की मग रागानेच चेहरा लाल व्ह्यायचे प्रसंग जास्त. तेव्हा सुध्दा मॅचिंग होते बहुतेक.)
17 Jan 2013 - 12:16 am | जेनी...
अब्या तुझं लग्न केव्हा झालं रे ???
17 Jan 2013 - 12:22 am | अभ्या..
ओ गृहकृत्यदक्षिणी. आत्ता कुंकवाची उठाठेव चाललीय. कुंकूवालीची नाही.
आणि कुंकवाची सगळ्यात जास्त निर्मिती माझ्या जिल्ह्यात होत असल्याने माझा नैतिक अधिकार आहे त्यावर बोलायचा.
त्यासाठी लग्नच व्हायला हवे असे काही नाहीये.
17 Jan 2013 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा
@त्यासाठी लग्नच व्हायला हवे असे काही नाहीये.>>> जोरदार अनुमोदन... =))
17 Jan 2013 - 12:33 am | जेनी...
ए अब्या ...
पण कुंकुवाली लाजली तरच कुंकु मेचिंग होतं ना ??
मग नुसती कुंकुवाची उठाठेव काय कामाची बे :-/
17 Jan 2013 - 12:38 am | अभ्या..
लाजणारणीनं समजून घ्यायचं असतं पूजा.
नुस्त्या लाल ठिपक्याचीच चर्चा करायची तर जपानचा झेंडा पण फार चान दिसतो. ;)
17 Jan 2013 - 12:43 am | जेनी...
अब्या मग तुझ्या बायकोच्या भ्रुमध्यावर जपानचा झेंडा फडवुन टाक बरं =))
17 Jan 2013 - 12:56 am | अभ्या..
लवकरच. :)
माझी बायको. बायको देखणा दिवा.
17 Jan 2013 - 12:27 am | जेनी...
ह्याअमेरिकेतल्या लोकांना नसत्या चौकशा असतात हे खरय पण .
मी एकदा मेहेंदी लावली होती हाताला .... तर एक अमेरिकन म्हणतो " टॅटु आहे का? " :-/
" ह्या टॅटु ला येतोय तो वास कसला आहे ? "
" हा पर्मनन्ट आहे का?" :(
अक्खि प्रोसीजर विथ संस्क्रुति समाधान सांगता सांगता पूरेवाट झाली :(
17 Jan 2013 - 1:12 am | शुचि
अगं वास घेण्याइतकी जवळून दाखवलीसच कशाला मेंदी? :(
17 Jan 2013 - 1:17 am | जेनी...
अगं त्यानेच मला न विचारताच पटकन हात हातात घेतला आणि चटकन मेहेण्दीचा वास
घेतला .... :-/
17 Jan 2013 - 1:21 am | विश्वनाथ मेहेंदळे
श्श्श्श्श !!!!! असे प्रश्न चारचौघात विचारू नका. लोक संमं कडे तक्रार करतात.
(वैयक्तिक) विमे
17 Jan 2013 - 12:37 am | कवितानागेश
काजळ का घालतात?
तीट का लावतात?
उटणं का फासतात?
तेल का चोपडतात?
.
.
.
.
..
कपडे का घालतात??? :P
17 Jan 2013 - 12:50 am | किसन शिंदे
:D
आचरट माऊ.
17 Jan 2013 - 1:14 am | बॅटमॅन
क्लोरमिंट का खातात?
इंग्लंड सोडून अमेरिकेत वसाहती का करतात ;)
17 Jan 2013 - 12:57 am | आनंदी गोपाळ
धार्मिक कारणे
अनेक असू शकतात.
साने गुरुजींच्या एका लेखात नारळ फोडणे हा नरबळीचा सबस्टीट्यूट आहे, (डोळे, शेंडी, पाणी म्हणजे रक्त, खोबरे मांस असते इ.) असे वाचल्याचे अंधुकसे आठवते. तसेच, कुंकू हे त्या बळी दिलेल्या प्राण्याच्या रक्ताचा तिलक आहे, या प्रकारांनी अनिष्ट रूढींना फाटा मिळाला असे वाचल्याचेही आठवते.
इतर नॉन धार्मिक कारणांत, घरी लहानपणी एक गंधाची साखळी नामक प्रकार होता. चांदीच्या तबकडीत उगाळलेल्या चंदनादि गंधात ती डबल साखळी भिजवून कपाळावर आडवे वैष्णव गंध लावणे हा प्रत्येक समारंभातील जेवणाच्या पंक्तीतला कार्यक्रम आम्ही लहान मुले उत्साहाने करीत असु. मोठ्या बंधूंना या टिळे लावण्याचे कारण विचारले असता, 'एकदा जेवून गेला, की परत दुसर्यांदा येऊन बसू नये याची ओळख पटावी, म्हणून ते गंध लावतात' असे उत्तर मिळाले होते.
तेच बरोबर असावे असे वाटते.
(मतदानात बोटाला काळा टिळा लावून घेण्यात आनंद मानणारा) गोपाळ.
17 Jan 2013 - 1:04 am | किसन शिंदे
=)) =))
हे कारण नेमके वाटतेय.
17 Jan 2013 - 1:14 am | शुचि
हाहाहा
17 Jan 2013 - 1:19 am | अभ्या..
काय नेमकं वाटतंय यात किसनदेवा? असे किती लोक आणि प्रसंग असतील?
पुरुषांनी रोज गंध लावायची पध्दत अजूनही ग्रामीण भागात आहेच. गंध लावल्याशिवाय आंघोळ झाल्यासारखी वाटत नाही असे म्हणणारे कित्येक तरुण मुले सुध्दा मला माहीती आहेत.
17 Jan 2013 - 12:39 pm | योगप्रभू
हे काही कळले नाही.
वैष्णव नेहमी गंध उभेच (नाम) लावतात, शैव आडवे (त्रिपुंड) लावतात आणि शाक्त भृकुटीमध्यात कुंकवाचा टिळा लावतात.
17 Jan 2013 - 1:41 am | नंदन
धाग्याने शे-दीडशे प्रतिसादांचं कुंकूच काय पण दणदणीत मळवट भरला आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले ;)
बाकी ही प्रथा आर्यांच्या टोळ्यांनी आक्रमण करून जिंकलेले पशुधन आणि स्त्रिया आपल्या मालकीचे आहे, हे दर्शवणारी खूण ("मैं तेजा हूं, मार्क इधर है") म्हणून सुरू झाली असं लोकसत्तेतल्या एका लेखात वाचल्याचं आठवतं. खरं खोटं, परशुरामच जाणे!
17 Jan 2013 - 1:44 am | शुचि
:) :) प्रचंड हसू कोसळले आहे
मार्क चा किसाही अचाट!!
17 Jan 2013 - 1:46 am | अभ्या..
अगदी सहमत धाग्याच्या स्कोरला आणि प्रतिसादाला पण.
सुरुवातीला ही प्रथा व्रण किंवा गोंदणे अशा कायम टिकणार्या स्वरुपातील असावी त्याचेच कुंकू हे सुधारीत रूप असावे.
17 Jan 2013 - 2:01 am | किसन शिंदे
नंदनच निरीक्षण एकदम अचूक आहे असं निरीक्षण नोंदवतो. ;)
17 Jan 2013 - 12:08 pm | सहज
ओह असे आहे होय,
ऐकीव किस्सा असा की, "माय आईज आर अप हिअर डुड" असे एखादी व्यक्ती सतत किती वेळा म्हणणार मग लक्ष वेधायला (साईन) म्हणून कुंकू लावायला सुरवात झाली की येथे फोकस करावे.
असो अमेरीकन लोकांना सांगायला हे कारण बरे आहे का?
17 Jan 2013 - 12:52 pm | शुचि
खी: खी: मस्त!!! एकदम सिक्सर :D
17 Jan 2013 - 4:34 pm | घाटावरचे भट
हे वाचून ड्वॉले पानावले. बाकी तेजालाही भ्रूमध्यापासून ते ब्रह्म की काय म्हणतात त्या रंध्रापर्यंत मार्क लावावयास हवा होता. बाकी या विषयावरून 'मा. श्री. गोगो यांचे अंगवस्त्र (विंग्रजीत 'केप' बरं का, नाय तर उगास अनर्थ व्हायचा) लालच' का या विषयावरून उद्बोधक चर्चा सुरू करावयास हरकत नसावी.
17 Jan 2013 - 1:46 am | शुचि
बरं काही उत्तरांचा आढावा घेता - अमेरीकन पुरषांना "मसिक धर्म आणि तदनुषंगिक प्रथा" सांगत बसण्यापेक्षा ते ७ चक्रांचं उत्तर परवडलं असं वाटू लागलय :(
17 Jan 2013 - 3:46 am | आदूबाळ
एकदा ते आनंदी गोपाळांचं "एकदा जेवलेला माणूस कळावा म्हणून" वगैरेचं उत्तर पण देऊन पहा! एकाच प्रश्नासाठी ३-४ ष्टोर्या विकायलाही मजा येते!
17 Jan 2013 - 8:21 am | ५० फक्त
अलका कुबल यांना सदस्य करुन घेता येईल का, त्या याचं उत्तर खात्रीनं देउ शकतील.
17 Jan 2013 - 9:11 am | मनीषा
कुंकु लावण्याची अनेक कारणे कळली
मग विधवा स्त्री कुंकु का लावत नाही ?
17 Jan 2013 - 11:07 am | प्रभाकर पेठकर
मेंदूच्या तळाशी पिटिट्यूरी ग्रंथी असते. ती शरीरातील वाढीचा एकूण समतोल सांभाळत असते. कपाळाच्या मध्यावर (दोन भूवयांच्या मध्ये)असणार्या बिंदूचा संबंध ह्या ग्रंथीशी असतो.
लाल कुंकवात चिंचोक्याच्या पिठाचा वापर होतो. चिंचोका औषधी आहे. त्याने वरील बिंदूद्वारे पिटिट्यूरी ग्रंथीस उत्तेजना मिळते आणि तिचे कार्य (शरीरातील सर्व समतोल सांभाळणे)व्यवस्थित चालते. (ऐकिव माहिती).
पुरुषांनी उभे गंध लावण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे कल्पना नाही. कदाचित स्त्री-पुरूष भेद अधोरेखित करण्यासाठी तशी पद्धत पडली असावी.
18 Jan 2013 - 1:16 am | विश्वनाथ मेहेंदळे
ह्यां ????? त्यासाठी कपाळाकडे कशाला बघायचे ?????
18 Jan 2013 - 2:12 am | टवाळ कार्टा
मग काय... ;)
स्त्रीयांचे केस लांब असतात
17 Jan 2013 - 11:17 am | श्रिया
लेखातून व प्रतिसादांतून कपाळावर कुंकू लावण्याची वेगवेगळी कारणे समजली. हे फायदे मिळण्यासाठी कुंकू त्वचेच्या संपर्कात आले पाहिजे. पण पूजेच्या वेळी देवाला ही कुंकू वाहतात व देवांच्या तसबीरीलाही कुंकू लावतात. रांगोळी काढल्यावरही हळद कुंकू वाहण्याची पद्धत आहे. ह्यामागे काय कारण असावे, कुंकवा मध्ये वातावरणातील सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता आहे असे मानले जाते का?
17 Jan 2013 - 11:49 am | ऋषिकेश
माझ्यामते काहिहि खास असं कारण नाही..
प्रत्येक संस्कृतीत काहि पद्धती असतात त्या संस्कृतीचं वेगळेपण, वेगळ्या सवयी, वेगळी प्रतिके सांगणार्या त्यापैकिच ही एक पद्धत.
आजानुकर्णाचा प्रतिसाद सर्वात प्रॅक्टिकल वाटतो. हवाई बेटांवरील सुंदरींनी कोणत्या कानात फुल घातले आहे त्यावर ती उपलब्ध आहे की अद्याप कुमारी आहे ते कळते, तसेच पूर्व युरोपमध्ये घरात उपवर मुलगी असली तर खिडकीत कुंडी ठेवली जात असे. हा त्यातला प्रकार असु शकतो, पुढे कारण लुप्त झाले व एक पद्धत इतकेच उरले
17 Jan 2013 - 11:56 am | गवि
तेच तर. बाकी फक्त स्त्रियांच्याच पिच्युटरी ग्लँडना आणि त्यातही कुमारिका / सधवा स्त्रियांनाच पिच्युटरी ग्लँडला संरक्षण किंवा फायदा याची खास गरज का असावी असा विचार करतो आहे. बिचार्या पुरुषांनाही पिच्युटरी असते की अगदी तिथ्थेच.. की त्यांना चंदनाच्या शीतलतेची जास्त गरज असते?? !!
याच तर्काने मंगळसूत्र थायरॉईड / अन्ननलिका वगैरेचं रक्षण / पोषण करत असेल का? :)
17 Jan 2013 - 12:15 pm | कवितानागेश
...जरा कुठे धर्मानी बायकांचे लाड केले की आले लगेच पुरुषमुक्तीवाले!! ;)
17 Jan 2013 - 1:06 pm | ५० फक्त
कोण हा धर्मा ?
आणि खरे पुरुषमुक्तीवाले अजुन आलेच नाहीत इथं.
17 Jan 2013 - 1:20 pm | कवितानागेश
खरे पुरुषमुक्तीवाले अजुन आलेच नाहीत इथं>
म्हणजे तुम्ही गविकाकांची पुरुषांबद्दलची कळकळ खोटी ठरवताय तर!!
-//||माउ||\\
17 Jan 2013 - 3:20 pm | ५० फक्त
गविकाकांना पुरुषांबद्दल कळकळ असती तर त्यांनी टंचनिक नसता ठेवला ???
18 Jan 2013 - 1:40 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे बघा पुरुश्मुक्तीला काहीही बोलायचे नाही. नुकतेच मी शिफॉन अलुबुखारी यांचे "द फोर्थ इंटरकोर्स" हे पुस्तक वाचले आहे. ४-५ परिच्छेद फेकीन तोंडावर, कळले ???
18 Jan 2013 - 12:10 pm | पैसा
एक पुस्तक वाचून तेच तेच रेफरन्स तोंडावर फेकले म्हणून आम्ही तुम्हाला विद्वान समजू असं कसं समजता तुम्ही?
17 Jan 2013 - 12:02 pm | क्श्मा कुल्कर्नि
कुंकू का लावतात या विषयी माहिती खालील धाग्यावर छान दिली आहे.
http://sanatanhindudharma.blogspot.in/2008/06/blog-post_4185.html
17 Jan 2013 - 12:31 pm | मृगनयनी
क्षमा'जी... खूप सुन्दर, पवित्र आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे.. या सनातन'वाल्यांनी!!!... लिन्क दिल्याबद्दल आभार!!!!! :)
18 Jan 2013 - 1:01 am | विश्वनाथ मेहेंदळे
नाव नीट लिहा आधी. क्शमा असे आहे ते.
टीप :- या मूद्द्यावर अजीबात मतभेद दर्शवु नका. नाहीतर युद्द आमचा "सूड" करणार....मज्जा येणार निश्चित।
18 Jan 2013 - 10:28 am | बाळ सप्रे
'क्श्मा' असं आहे.. 'क्शमा' नाही!! तुम्ही १ a जास्त टंकलाय :-)
17 Jan 2013 - 1:00 pm | प्रियाकूल
'एक चटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेसबाबू ..'
17 Jan 2013 - 1:07 pm | ५० फक्त
' एक चेटकी सिंदुर की किमत' असं वाचलं, असो.
17 Jan 2013 - 1:36 pm | मृगनयनी
५० फक्त!.... काहीईई!..=)) =)) =))
17 Jan 2013 - 11:17 pm | जेनी...
चटकि कि चेटकि कि चुटकि .... जानकारांनी बॅट्री टाकावी
18 Jan 2013 - 3:59 pm | तुषार काळभोर
17 Jan 2013 - 1:20 pm | पियुशा
पण आजच्या जमान्यात कुंकु कोण लावतय शुचीतै ?
17 Jan 2013 - 1:51 pm | विलासिनि
मिपावर ह्ळ्दीकुंकू समारंभ असल्यासारखे वाटले. बाकी कुंकवाच्या जोडीला ह्ळद का असते??
17 Jan 2013 - 2:11 pm | कवितानागेश
कुंकवानी रॅश येउ नये म्हणून. :P
17 Jan 2013 - 2:19 pm | गवि
हो हो.. कुंकवात ट्यानिन नावाचं विष असतं..
-गविमास्तर.
17 Jan 2013 - 3:34 pm | ५० फक्त
टी - ट्यानिन
कुंकु - क्यानिन
17 Jan 2013 - 3:37 pm | दादा कोंडके
.
- (चिंचोक्याची बी थुंकणारा) दादा
17 Jan 2013 - 8:03 pm | दादा कोंडके
च्यामारी जांभळाची पाहिजे होतं. चिंचोका का टंकलं गेलं माहित नाही.
17 Jan 2013 - 8:12 pm | केदार-मिसळपाव
मग तुम्हाला इद्रुसचाचा म्ह्णायला हवे..
18 Jan 2013 - 10:43 am | सूड
आता अडिचशे प्रतिसादांची निश्चिंती बगुनानाऽऽऽऽ!! ;)
17 Jan 2013 - 3:47 pm | गवि
छे.. क्यानिन म्हणजे जपानी लोकांची छायाचित्रपेटिका..!!
17 Jan 2013 - 6:40 pm | ५० फक्त
पेटिका म्हणली की फक्त शवपेटिका आठवते.
17 Jan 2013 - 11:19 pm | जेनी...
कुंकवा सारख्या सवाष्नं धाग्यावर मेली शवपेटिका कशाला आनायची ..
कसलं अभद्र बोलता हो ५० :-/