✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुंकू का लावतात

श
शुचि यांनी
Wed, 01/16/2013 - 20:38  ·  लेख
लेख
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78745 वाचन

💬 प्रतिसाद (237)

प्रतिक्रिया

क्लोरमिंट का खातात?

बॅटमॅन
गुरुवार, 01/17/2013 - 01:14 नवीन
क्लोरमिंट का खातात? इंग्लंड सोडून अमेरिकेत वसाहती का करतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

धार्मिक कारणे

आनंदी गोपाळ
गुरुवार, 01/17/2013 - 00:57 नवीन
धार्मिक कारणे अनेक असू शकतात. साने गुरुजींच्या एका लेखात नारळ फोडणे हा नरबळीचा सबस्टीट्यूट आहे, (डोळे, शेंडी, पाणी म्हणजे रक्त, खोबरे मांस असते इ.) असे वाचल्याचे अंधुकसे आठवते. तसेच, कुंकू हे त्या बळी दिलेल्या प्राण्याच्या रक्ताचा तिलक आहे, या प्रकारांनी अनिष्ट रूढींना फाटा मिळाला असे वाचल्याचेही आठवते. इतर नॉन धार्मिक कारणांत, घरी लहानपणी एक गंधाची साखळी नामक प्रकार होता. चांदीच्या तबकडीत उगाळलेल्या चंदनादि गंधात ती डबल साखळी भिजवून कपाळावर आडवे वैष्णव गंध लावणे हा प्रत्येक समारंभातील जेवणाच्या पंक्तीतला कार्यक्रम आम्ही लहान मुले उत्साहाने करीत असु. मोठ्या बंधूंना या टिळे लावण्याचे कारण विचारले असता, 'एकदा जेवून गेला, की परत दुसर्‍यांदा येऊन बसू नये याची ओळख पटावी, म्हणून ते गंध लावतात' असे उत्तर मिळाले होते. तेच बरोबर असावे असे वाटते. (मतदानात बोटाला काळा टिळा लावून घेण्यात आनंद मानणारा) गोपाळ.
  • Log in or register to post comments

'एकदा जेवून गेला, की परत

किसन शिंदे
गुरुवार, 01/17/2013 - 01:04 नवीन
'एकदा जेवून गेला, की परत दुसर्‍यांदा येऊन बसू नये याची ओळख पटावी, म्हणून ते गंध लावतात' असे उत्तर मिळाले होते.
=)) =)) हे कारण नेमके वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

+१

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 01:14 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

फक्त जेवणासाठी गंध?

अभ्या..
गुरुवार, 01/17/2013 - 01:19 नवीन
काय नेमकं वाटतंय यात किसनदेवा? असे किती लोक आणि प्रसंग असतील? पुरुषांनी रोज गंध लावायची पध्दत अजूनही ग्रामीण भागात आहेच. गंध लावल्याशिवाय आंघोळ झाल्यासारखी वाटत नाही असे म्हणणारे कित्येक तरुण मुले सुध्दा मला माहीती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आडवे वैष्णव गंध ?

योगप्रभू
गुरुवार, 01/17/2013 - 12:39 नवीन
हे काही कळले नाही. वैष्णव नेहमी गंध उभेच (नाम) लावतात, शैव आडवे (त्रिपुंड) लावतात आणि शाक्त भृकुटीमध्यात कुंकवाचा टिळा लावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मळवट

नंदन
गुरुवार, 01/17/2013 - 01:41 नवीन
धाग्याने शे-दीडशे प्रतिसादांचं कुंकूच काय पण दणदणीत मळवट भरला आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले ;) बाकी ही प्रथा आर्यांच्या टोळ्यांनी आक्रमण करून जिंकलेले पशुधन आणि स्त्रिया आपल्या मालकीचे आहे, हे दर्शवणारी खूण ("मैं तेजा हूं, मार्क इधर है") म्हणून सुरू झाली असं लोकसत्तेतल्या एका लेखात वाचल्याचं आठवतं. खरं खोटं, परशुरामच जाणे!
  • Log in or register to post comments

धाग्याने शे-दीडशे

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 01:44 नवीन
धाग्याने शे-दीडशे प्रतिसादांचं कुंकूच काय पण दणदणीत मळवट भरला आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले
:) :) प्रचंड हसू कोसळले आहे मार्क चा किसाही अचाट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अगदी सहमत

अभ्या..
गुरुवार, 01/17/2013 - 01:46 नवीन
अगदी सहमत धाग्याच्या स्कोरला आणि प्रतिसादाला पण. सुरुवातीला ही प्रथा व्रण किंवा गोंदणे अशा कायम टिकणार्‍या स्वरुपातील असावी त्याचेच कुंकू हे सुधारीत रूप असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१ मलाही अगदी असंच वाटलं.

किसन शिंदे
गुरुवार, 01/17/2013 - 02:01 नवीन
नंदनच निरीक्षण एकदम अचूक आहे असं निरीक्षण नोंदवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

ओह असे आहे होय

सहज
गुरुवार, 01/17/2013 - 12:08 नवीन
ओह असे आहे होय, ऐकीव किस्सा असा की, "माय आईज आर अप हिअर डुड" असे एखादी व्यक्ती सतत किती वेळा म्हणणार मग लक्ष वेधायला (साईन) म्हणून कुंकू लावायला सुरवात झाली की येथे फोकस करावे. असो अमेरीकन लोकांना सांगायला हे कारण बरे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खी: खी: मस्त!!! एकदम सिक्सर

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 12:52 नवीन
खी: खी: मस्त!!! एकदम सिक्सर :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

("मैं तेजा हूं, मार्क इधर है"

घाटावरचे भट
गुरुवार, 01/17/2013 - 16:34 नवीन
("मैं तेजा हूं, मार्क इधर है")
हे वाचून ड्वॉले पानावले. बाकी तेजालाही भ्रूमध्यापासून ते ब्रह्म की काय म्हणतात त्या रंध्रापर्यंत मार्क लावावयास हवा होता. बाकी या विषयावरून 'मा. श्री. गोगो यांचे अंगवस्त्र (विंग्रजीत 'केप' बरं का, नाय तर उगास अनर्थ व्हायचा) लालच' का या विषयावरून उद्बोधक चर्चा सुरू करावयास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बरं काही उत्तरांचा आढावा घेता

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 01:46 नवीन
बरं काही उत्तरांचा आढावा घेता - अमेरीकन पुरषांना "मसिक धर्म आणि तदनुषंगिक प्रथा" सांगत बसण्यापेक्षा ते ७ चक्रांचं उत्तर परवडलं असं वाटू लागलय :(
  • Log in or register to post comments

एकदा ते आनंदी गोपाळांचं "एकदा

आदूबाळ
गुरुवार, 01/17/2013 - 03:46 नवीन
एकदा ते आनंदी गोपाळांचं "एकदा जेवलेला माणूस कळावा म्हणून" वगैरेचं उत्तर पण देऊन पहा! एकाच प्रश्नासाठी ३-४ ष्टोर्या विकायलाही मजा येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अलका कुबल यांना सदस्य करुन

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 08:21 नवीन
अलका कुबल यांना सदस्य करुन घेता येईल का, त्या याचं उत्तर खात्रीनं देउ शकतील.
  • Log in or register to post comments

कुंकु लावण्याची अनेक कारणे

मनीषा
गुरुवार, 01/17/2013 - 09:11 नवीन
कुंकु लावण्याची अनेक कारणे कळली मग विधवा स्त्री कुंकु का लावत नाही ?
  • Log in or register to post comments

माझी माहिती...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/17/2013 - 11:07 नवीन
मेंदूच्या तळाशी पिटिट्यूरी ग्रंथी असते. ती शरीरातील वाढीचा एकूण समतोल सांभाळत असते. कपाळाच्या मध्यावर (दोन भूवयांच्या मध्ये)असणार्‍या बिंदूचा संबंध ह्या ग्रंथीशी असतो. लाल कुंकवात चिंचोक्याच्या पिठाचा वापर होतो. चिंचोका औषधी आहे. त्याने वरील बिंदूद्वारे पिटिट्यूरी ग्रंथीस उत्तेजना मिळते आणि तिचे कार्य (शरीरातील सर्व समतोल सांभाळणे)व्यवस्थित चालते. (ऐकिव माहिती). पुरुषांनी उभे गंध लावण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे कल्पना नाही. कदाचित स्त्री-पुरूष भेद अधोरेखित करण्यासाठी तशी पद्धत पडली असावी.
  • Log in or register to post comments

पुरुषांनी उभे गंध लावण्यामागे

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/18/2013 - 01:16 नवीन
पुरुषांनी उभे गंध लावण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे कल्पना नाही. कदाचित स्त्री-पुरूष भेद अधोरेखित करण्यासाठी तशी पद्धत पडली असावी.
ह्यां ????? त्यासाठी कपाळाकडे कशाला बघायचे ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मग काय...

टवाळ कार्टा
Fri, 01/18/2013 - 02:12 नवीन
मग काय... ;) स्त्रीयांचे केस लांब असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

लेखातून व प्रतिसादांतून

श्रिया
गुरुवार, 01/17/2013 - 11:17 नवीन
लेखातून व प्रतिसादांतून कपाळावर कुंकू लावण्याची वेगवेगळी कारणे समजली. हे फायदे मिळण्यासाठी कुंकू त्वचेच्या संपर्कात आले पाहिजे. पण पूजेच्या वेळी देवाला ही कुंकू वाहतात व देवांच्या तसबीरीलाही कुंकू लावतात. रांगोळी काढल्यावरही हळद कुंकू वाहण्याची पद्धत आहे. ह्यामागे काय कारण असावे, कुंकवा मध्ये वातावरणातील सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता आहे असे मानले जाते का?
  • Log in or register to post comments

काहिहि खास असं कारण नाही

ऋषिकेश
गुरुवार, 01/17/2013 - 11:49 नवीन
माझ्यामते काहिहि खास असं कारण नाही.. प्रत्येक संस्कृतीत काहि पद्धती असतात त्या संस्कृतीचं वेगळेपण, वेगळ्या सवयी, वेगळी प्रतिके सांगणार्‍या त्यापैकिच ही एक पद्धत. आजानुकर्णाचा प्रतिसाद सर्वात प्रॅक्टिकल वाटतो. हवाई बेटांवरील सुंदरींनी कोणत्या कानात फुल घातले आहे त्यावर ती उपलब्ध आहे की अद्याप कुमारी आहे ते कळते, तसेच पूर्व युरोपमध्ये घरात उपवर मुलगी असली तर खिडकीत कुंडी ठेवली जात असे. हा त्यातला प्रकार असु शकतो, पुढे कारण लुप्त झाले व एक पद्धत इतकेच उरले
  • Log in or register to post comments

तेच तर. बाकी फक्त

गवि
गुरुवार, 01/17/2013 - 11:56 नवीन
तेच तर. बाकी फक्त स्त्रियांच्याच पिच्युटरी ग्लँडना आणि त्यातही कुमारिका / सधवा स्त्रियांनाच पिच्युटरी ग्लँडला संरक्षण किंवा फायदा याची खास गरज का असावी असा विचार करतो आहे. बिचार्‍या पुरुषांनाही पिच्युटरी असते की अगदी तिथ्थेच.. की त्यांना चंदनाच्या शीतलतेची जास्त गरज असते?? !! याच तर्काने मंगळसूत्र थायरॉईड / अन्ननलिका वगैरेचं रक्षण / पोषण करत असेल का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

...जरा कुठे धर्मानी बायकांचे

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 12:15 नवीन
...जरा कुठे धर्मानी बायकांचे लाड केले की आले लगेच पुरुषमुक्तीवाले!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कोण हा धर्मा ?

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 13:06 नवीन
कोण हा धर्मा ? आणि खरे पुरुषमुक्तीवाले अजुन आलेच नाहीत इथं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खरे पुरुषमुक्तीवाले अजुन आलेच

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 13:20 नवीन
खरे पुरुषमुक्तीवाले अजुन आलेच नाहीत इथं> म्हणजे तुम्ही गविकाकांची पुरुषांबद्दलची कळकळ खोटी ठरवताय तर!! -//||माउ||\\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

गविकाकांना पुरुषांबद्दल कळकळ

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 15:20 नवीन
गविकाकांना पुरुषांबद्दल कळकळ असती तर त्यांनी टंचनिक नसता ठेवला ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हे बघा पुरुश्मुक्तीला काहीही

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/18/2013 - 01:40 नवीन
हे बघा पुरुश्मुक्तीला काहीही बोलायचे नाही. नुकतेच मी शिफॉन अलुबुखारी यांचे "द फोर्थ इंटरकोर्स" हे पुस्तक वाचले आहे. ४-५ परिच्छेद फेकीन तोंडावर, कळले ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ह्या:

पैसा
Fri, 01/18/2013 - 12:10 नवीन
एक पुस्तक वाचून तेच तेच रेफरन्स तोंडावर फेकले म्हणून आम्ही तुम्हाला विद्वान समजू असं कसं समजता तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कुंकू का लावतात

क्श्मा कुल्कर्नि
गुरुवार, 01/17/2013 - 12:02 नवीन
कुंकू का लावतात या विषयी माहिती खालील धाग्यावर छान दिली आहे. http://sanatanhindudharma.blogspot.in/2008/06/blog-post_4185.html
  • Log in or register to post comments

क्षमा'जी... खूप सुन्दर,

मृगनयनी
गुरुवार, 01/17/2013 - 12:31 नवीन
क्षमा'जी... खूप सुन्दर, पवित्र आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे.. या सनातन'वाल्यांनी!!!... लिन्क दिल्याबद्दल आभार!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्श्मा कुल्कर्नि

नाव नीट लिहा आधी. क्शमा असे

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/18/2013 - 01:01 नवीन
नाव नीट लिहा आधी. क्शमा असे आहे ते. टीप :- या मूद्द्यावर अजीबात मतभेद दर्शवु नका. नाहीतर युद्द आमचा "सूड" करणार....मज्जा येणार निश्चित।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

'क्श्मा' असं आहे.. 'क्शमा'

बाळ सप्रे
Fri, 01/18/2013 - 10:28 नवीन
'क्श्मा' असं आहे.. 'क्शमा' नाही!! तुम्ही १ a जास्त टंकलाय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

त्यांना म्हणायचं

प्रियाकूल
गुरुवार, 01/17/2013 - 13:00 नवीन
'एक चटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेसबाबू ..'
  • Log in or register to post comments

' एक चेटकी सिंदुर की किमत'

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 13:07 नवीन
' एक चेटकी सिंदुर की किमत' असं वाचलं, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल

५० फक्त!.... काहीईई!..

मृगनयनी
गुरुवार, 01/17/2013 - 13:36 नवीन
५० फक्त!.... काहीईई!..=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चटकि कि चेटकि कि चुटकि ....

जेनी...
गुरुवार, 01/17/2013 - 23:17 नवीन
चटकि कि चेटकि कि चुटकि .... जानकारांनी बॅट्री टाकावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल

घ्या बैट्रीचा उजेड-

तुषार काळभोर
Fri, 01/18/2013 - 15:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पण आजच्या जमान्यात कुंकु कोण

पियुशा
गुरुवार, 01/17/2013 - 13:20 नवीन
पण आजच्या जमान्यात कुंकु कोण लावतय शुचीतै ?
  • Log in or register to post comments

मिपावर ह्ळ्दीकुंकू समारंभ

विलासिनि
गुरुवार, 01/17/2013 - 13:51 नवीन
मिपावर ह्ळ्दीकुंकू समारंभ असल्यासारखे वाटले. बाकी कुंकवाच्या जोडीला ह्ळद का असते??
  • Log in or register to post comments

कुंकवानी रॅश येउ नये म्हणून.

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 14:11 नवीन
कुंकवानी रॅश येउ नये म्हणून. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासिनि

हो हो.. कुंकवात ट्यानिन

गवि
गुरुवार, 01/17/2013 - 14:19 नवीन
हो हो.. कुंकवात ट्यानिन नावाचं विष असतं.. -गविमास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

टी - ट्यानिन कुंकु - क्यानिन

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 15:34 नवीन
टी - ट्यानिन कुंकु - क्यानिन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

.

दादा कोंडके
गुरुवार, 01/17/2013 - 15:37 नवीन
. - (चिंचोक्याची बी थुंकणारा) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

संपादन कधी सुरू होणार?

दादा कोंडके
गुरुवार, 01/17/2013 - 20:03 नवीन
च्यामारी जांभळाची पाहिजे होतं. चिंचोका का टंकलं गेलं माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आपली जीभ झाम्बळी करुन घेणारा...

केदार-मिसळपाव
गुरुवार, 01/17/2013 - 20:12 नवीन
मग तुम्हाला इद्रुसचाचा म्ह्णायला हवे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अडिचशे प्रतिसाद

सूड
Fri, 01/18/2013 - 10:43 नवीन
आता अडिचशे प्रतिसादांची निश्चिंती बगुनानाऽऽऽऽ!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

छे.. क्यानिन म्हणजे जपानी

गवि
गुरुवार, 01/17/2013 - 15:47 नवीन
छे.. क्यानिन म्हणजे जपानी लोकांची छायाचित्रपेटिका..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पेटिका म्हणली की फक्त

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 18:40 नवीन
पेटिका म्हणली की फक्त शवपेटिका आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कुंकवा सारख्या सवाष्नं

जेनी...
गुरुवार, 01/17/2013 - 23:19 नवीन
कुंकवा सारख्या सवाष्नं धाग्यावर मेली शवपेटिका कशाला आनायची .. कसलं अभद्र बोलता हो ५० :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा