कुंकू का लावतात

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
16 Jan 2013 - 8:38 pm
गाभा: 

रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच.

अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?"

मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते.

पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात.

आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?

प्रतिक्रिया

शुचि's picture

18 Jan 2013 - 12:47 am | शुचि

सहमत

बॅटमॅन's picture

18 Jan 2013 - 3:04 pm | बॅटमॅन

अगं अवांतरच करायचं तर किरकिरतेस कशाला? यामुळेच बैकांना शिव्या घालतात बघ लोक.

केदार-मिसळपाव's picture

17 Jan 2013 - 3:11 pm | केदार-मिसळपाव

कुंकू का लावतात

कारण त्या वेळी इतर वहिन्यान्वर कोणतेही मनोरन्जक कार्यक्रम नसतात म्हणून...

हे आपले सहजच सुचले..तुमच्या आमेरिकन प्रश्णकर्त्यास सान्गा असे... आम्ही असल्या प्रतीसादा ला पी-जे असे म्हणतो...

पिलीयन रायडर's picture

17 Jan 2013 - 3:24 pm | पिलीयन रायडर

____/\_____
तो ही साष्टंग...!!

पण बर्याचदा असल्या प्रथांची जी कारण सांगितली जातात ती खरच अवास्तव वाटतात !!
एखादीला सहज वाटल असेल बघू कसं दिसतं ते , तिचं बघून बाकीच्याही करायला लागल्या असतील !!!
कारण पहिल कुंकू लावलेल्या बाईला एवढं शास्त्र सांगितले गेला असेल अस वाटत नाही

तिमा's picture

17 Jan 2013 - 5:35 pm | तिमा

हल्लीच्या भेसळीच्या युगात, कुंकवामधे शिसे असते असे वाचले होते. त्याने पिट्युटरी ग्लँडच काय, सगळ्या शरीराचा बँड वाजू शकतो.

चौकटराजा's picture

17 Jan 2013 - 6:12 pm | चौकटराजा

कुंकू खाता येत नाही .नाहीतर मिपाकरानी त्याचा ही एखादा कट्टा केला असता ना ? अतः ते लावतात !

नाना चेंगट's picture

17 Jan 2013 - 7:08 pm | नाना चेंगट

बायकांनी कुंकू लावणे बंद केले पाहिजे.
कुंकू लावण्यामधून तर्कहीनता आणि विज्ञानद्वेष्टेपणा दिसून येतो. :)

विधानाची सत्यता पडताळून दाखवण्याचा आग्रह फाट्यावर मारला जाईल. ;)

पहील्यांदा पुरषांनी "बायकांनी यंव बंद करावं अन त्यवं बंद करावं" अशी हुकूमशाही बंद केली पाहीजे ;)

अन पैल्यांदा बायकांनी सोताचे सुद्दलेकण सुदार्ले पायजे, नैतर आंतरजालीय टीकाचार होतात ;)

जबरा धागा आणि प्रतिक्रीया!

नंदन ने म्हणल्याप्रमाणे अगदी मळवट भरला आहे! प्रतिसादांमधे सगळेच कव्हर झाले (आणि कहर पण झाला) आहे! त्यामुळे अधिक काय लिहायचे! :-)

कुंकू म्हणल्यावर अजून एक आठवावी अशी गोष्ट म्हणजे...

आनन्दिता's picture

17 Jan 2013 - 9:44 pm | आनन्दिता

हे गाणं ऐकलं की कार्तिकी गायकवाड च आठवते..

'पिच्युटरी ग्लँड' वाल्यांसाठी एक शंका..
हिंदू नसलेल्या स्त्रियांना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात गळ्याला कुंकू लावतात. त्यांची पिच्यु गळ्यात असते का ?

जेनी...'s picture

17 Jan 2013 - 11:22 pm | जेनी...

=)) पिच्यु पिच्यु पिच्यु =))

नंदन's picture

17 Jan 2013 - 11:36 pm | नंदन

याचे उत्तरही ग्रंथित आहे - म्हणजे ग्रंथीत, थायरॉईड ग्रंथीत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Jan 2013 - 12:45 am | विश्वनाथ मेहेंदळे

दंडवत साहेब !!! उच्चकोटीची कोटी केली आहे.
त्यानिमित्ताने कभूधावि हा शब्द अनेक वर्षांनी आठवला.

अभ्या..'s picture

18 Jan 2013 - 12:48 am | अभ्या..

अत्यंत उच्च दर्जाचीच कोटी.
असे पाणिनी, असे वैय्याकरणी मिपावर आहेत अन कोन म्हणते मिपावर सुद्दलेकनाना फाट्यावर मारण्यात येते? ;)

ते आहेत म्हणून कळते फाट्यावर मारल्याचे.. :P

बॅटमॅन's picture

18 Jan 2013 - 1:11 pm | बॅटमॅन

आयला!!!!!!

उत्तर भारतात कुंकवाला सिंदूर म्हटले जाते.(दोन्हीतले घटक वेगळे असू शकतील) आणि तो भांगात लावण्याची प्रथा आहे. एकवेळ कपाळावर टीका नसला तरी चालेल पण 'माँग में सिंदूर'हवाच.सिंदुरातला मुख्य घटक शेंदूर अर्थात मर्क्युरिक सल्फाइड. असे म्हणतात की बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीकाठी हा विपुल मिळे.ह्या नदीकाठी हिंगलाज मातेचे देऊळ आहे.पाकिस्तानातली ती एक 'प्रोटेक्टेड साइट' आहे. आपल्याकडच्या क्षत्रियांची,पांचाळ,लोहाणा समाजाची आणि इतर अनेकांची ती कुलदेवता आहे. महाराष्ट्रात तिला हिंगुळजा देवी म्हणतात. फाळणीनंतर ह्या देवीची यात्रा करणे तितकेसे सुकर राहिले नाही त्यामुळे भारतातल्या गुजरात किंवा राजस्थानात एक नवीन देऊळ उभारले गेले आहे. पाकिस्तानातले मूळ देऊळ थरपारकरच्या वाळवंटात म़करान टेकड्यांमध्ये एका गुहेत आहे.

बॅटमॅन's picture

17 Jan 2013 - 11:35 pm | बॅटमॅन

ही माहिती नवीन आहे एकदम!!! धन्यवाद :)

कवितानागेश's picture

17 Jan 2013 - 11:49 pm | कवितानागेश

जुनंपानं काई सापडलं की ब्याट्यास्वामी खुश!
आधी कुंकू का लावतात ते शोध रे.

कॉलिन्ग वल्ली. जुन्या लेण्यांमध्ये बायकांच्या कपाळावर कुंकू कोरलेले असते का?

५० फक्त's picture

17 Jan 2013 - 11:57 pm | ५० फक्त

माउतै, तुमचा प्रश्न नीट विचारा जरा, तुम्हाला जुन्या लेण्यांमधल्या चित्रांत असलेल्या बायकांच्या कपाळावर म्हणायचं आहे का जुन्या लेण्यात असलेल्या बायकांच्या कपाळावर, मा.सं.वल्ली उर्फ इं.जो. यांच्या समजुतीत थोडा गोंधळ झाला तर ..... असो.

कवितानागेश's picture

18 Jan 2013 - 12:06 am | कवितानागेश

होउ दे की गोंधळ थोडा... काय ५०काका तुम्हीपण.
अहो, ते लगेच फोटो टाकतील की इथे लेण्यात बघितलेल्या कुंकूवाल्यांचे! :P

प्रचेतस's picture

18 Jan 2013 - 9:38 am | प्रचेतस

हे घ्या.

अजिंठा लेणीत बायकांच्या कपाळावर कुंकवाच्या जागी केसातून ओवलेले दागिने आढळतात.

कार्ले लेणीत मात्र स्त्रियांच्या कपाळावर कुंकवासारखी गोलाकार आणि ठसठशीत खूण कोरलेली दिसते. पण ही शिल्पे महायानकालीन म्हणजे इस. २५० ते ६५० या दरम्यानची आहेत

हे पहा

a a

बॅटमॅन's picture

18 Jan 2013 - 12:09 am | बॅटमॅन

शोधू की, है कै अन नै कै :) बाकी देवळांत कोरलेल्या बायांची कपाळे कोरीच दिसतात. अजिंठा धाग्यातील बायांची चित्रे बघ, तीदेखील तशीच आहेत. हे कुंकवाचे बंड गुप्तोत्तर कालीन असण्याचा संभवही बराच आहे.

कवितानागेश's picture

18 Jan 2013 - 12:43 am | कवितानागेश

माझा प्राथमिक अंदाज असा आहे, की कुठल्यातरी कुंकू तयार करणार्‍या कंपनीनी काढलेलं हे फॅड असावं! ;)

सस्नेह's picture

18 Jan 2013 - 10:15 am | सस्नेह

बाकी देवळांत कोरलेल्या बायांची कपाळे कोरीच दिसतात.
इतक्या शतकांनंतर त्यांचे हातपायसुद्धा जागेवर राहिलेले नाहीत तर कुंकू काय राहाणार कप्पाळ ?

गवि's picture

18 Jan 2013 - 12:45 pm | गवि

का बोवा? त्यांचे पतीपुतळे तुटले असतील,,तर ?

अभावितपणे तुम्ही कप्पाळावर उत्तम कोटी केलेली आहे. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Jan 2013 - 12:50 am | विश्वनाथ मेहेंदळे

लेण्यांमधल्या बायकांच्या कपाळाकडे काय कप्पाळ लक्ष जाणार...
तुम्ही भटे अशीच... भंडाऱ्याच्या खानावळीत गेलात तरी वरणभात आणि मेतकुट हेच शोधणार ;-)

गवि's picture

18 Jan 2013 - 6:49 am | गवि

ट्रोलनाथ गदारोळे... :)

सूड's picture

18 Jan 2013 - 10:50 am | सूड

ते फक्त शोधत असतील हो. नंतर 'तीर्थात मुंडण आणि कोर्टात भांडण यास लाजायचें नाहीं' या न्यायाने चालत असतील. ;)

मला वाटलं शिक्रण अन मटार उसळ =))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2013 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

हळद/कुंकू देविला वहाताना हे मंत्र अनुक्रमे म्हटले जातात
हरिद्रा:स्वर्ण वर्णाभा सर्वसौभाग्य दायिनी।
सर्वालंकार मुख्याही देवित्वं प्रतिगृह्यताम॥

हरिद्रा चूर्ण संयुक्तंम् कुंकूमम् कांतीदायकम्।/(वा-काम दायकम।)
वस्त्रालंकरणं सर्वं देवित्वं प्रतिगृह्यताम॥

वाघुळशास्त्री....अता यांना सुद म्हर्‍हाटीत करा वो...

बॅटमॅन's picture

18 Jan 2013 - 12:06 am | बॅटमॅन

अवो अत्रुप्त, हे आल्रेडी साध्या संस्कृतात हाये. कुंकवाची स्तुती केलीये. सोन्याच्या रंगाचे, सौभाग्यदर्शक असे कुंकू सर्व
अलंकारांत मुख्य आहे आणि ते आम्ही त्वां देवीला अर्पितोय असे म्हटलेय.

पैसा's picture

18 Jan 2013 - 12:17 pm | पैसा

सोन्याच्या रंगाचे हरिद्राला म्हण्टलाय. काय समजलेत? आणि हरिद्राचा संयोग केलेले कुंकुम असे आहे ते. भाशांतर परत एकदा नीट कर पाहू!

आआआआअह! कुठे लक्ष होतं मायला कै म्हैती. सॉरी आणि चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद :)

योगप्रभू's picture

18 Jan 2013 - 12:17 am | योगप्रभू

राही यांची माहिती छान आहे, पण कुंकू आणि सिंदूर यात फरक आहे. शुद्ध कुंकू हे शुद्ध हळद, चुनकळी आणि शुद्ध कापूर यापासून बनवले जाते. ते रंगाने लालभडक असते. सिंदूर किंवा शेंदूर हा रंगाने तांबडा असतो.

पूर्वीपासून देवीपूजन करताना कुंकू आणि सिंदूर अर्पण करण्याचे मंत्र वेगवेगळे आहेत.
प्रथम हळद, मग कुंकू, नंतर काजळ व नंतर सिंदूर वाहिला जातो.

कुंकू लावताना 'हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम् / वस्त्रालंकरणं सर्व देवि त्वं प्रतिगृह्यताम्' असा मंत्र आहे.
शेंदूर लावताना ' उदितारुणसंकाशं जपाकुसुमसंन्निभम् / सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्' असा मंत्र आहे.

राही's picture

18 Jan 2013 - 12:39 am | राही

तसे वर म्हटले आहेच. शिवाय घरगुती चिकट कुंकू बनवताना पणजीआजीला पाहिलेले आहे. ती हळद,कापूर,कोळश्याची वस्त्रगाळ पूड थोड्या तेलात एकत्र करून पाट्यावर अगदी मुलायम होईपर्यंत वाटत असे.अगदी गंधासारखे मऊ. हे वाटणे अशासाठी असे की रॉ-मटीरिअल सगळे पूडस्वरूपात असले तरी ते एकजीव व्हावे लागे.तसे ते झाले नाही तर कपाळावर हव्या त्या आकारात(चिरी,टिळा इ.)लावता येत नसे.त्यातली पूड फुसफुशीत होऊन खाली पडे.

शिल्पा ब's picture

17 Jan 2013 - 11:52 pm | शिल्पा ब

आमच्या ऐकीव अन वाचीव माहितीप्रमाणे अनार्य लोक कुंकू लावीत असत ... आर्य बायकांनी ते पाहिलं अन "अय्या, कित्ती छान दिसतंय नै " म्हणून स्वत:हि कुंकू लावायला सुरुवात केली. अन मग त्याची प्रथा अन संस्कृती बनली.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jan 2013 - 12:52 am | श्रीरंग_जोशी

या नव्या माहितीने या धाग्याला चार चाँद लागले आहेत.

चार चाँद असा उल्लेख असलेली टिकल्यांच्या कंपनीची जाहिरात पण होती एकेकाळी....

अभ्या..'s picture

18 Jan 2013 - 12:56 am | अभ्या..

शिल्पा चार चाँद लगाये. :)

मी शिल्पाची ८ आणि ९ नंबरची बिंदी वापरते :)

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2013 - 2:18 am | टवाळ कार्टा

मग शिल्पा काय वापरते...असो हा जोक जुना झाला आता

आणि तु ८ आणि ९ नंबर वापरायला कमी जास्त होत असते का? (उगीच एक शंका...)

अबे डक्कन मी नै कै .. शिल्पा बिंदी साइझ कमी जास्त असते
८ जरा मोठी ९ तिच्यापेक्षा किंचित कमी .
कधी ८ तर कधी ९

:-/

टिकल्या आणि ब्रिटिश वायर गेज, हे उलटे का असतात आकडा जेवढा मोठा तेवढा साईझ कमी.

गिटारीच्या तारासुद्धा.. एक नंबर जाडजूड डाँग डाँग, आणि सहा नंबर सर्वात बारकी टिंग टिंग..

हेच हार्मोनियमच्या बाबतीतही... एकदम बारीक वाटनारा आवाज वरच्या पटटीतला आणि जाडा भरडा आणि म्हणून मोठा वाटणारा आवाज खालच्या पट्टीतला. :)

चाणक्य's picture

18 Jan 2013 - 3:46 pm | चाणक्य

सिंगल माल्ट लई महाग.

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 11:41 pm | नर्मदेतला गोटा

तुमी लावता का कूकू
तुमी आर्य का अनार्य

श्रीनिवास टिळक's picture

18 Jan 2013 - 7:43 am | श्रीनिवास टिळक

प्रतिसाद वाचून ज्ञानवर्धन आणि करमणुकही झाली आता एक शंका-कुंकवाचा धनी या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?

मृत्युन्जय's picture

18 Jan 2013 - 12:48 pm | मृत्युन्जय

काही चांगली माहिती आणि प्रचंड गोंधळ दोन्ही मुळे मजा आली.

जे काही थोडे फार विषयाला अनुसरुन प्रतिसाद आले आहेत त्यामुळे धागाकर्तीचा हेतु साध्य झाला असावा आणि बर्‍याच काळाने दंगा करायला मिळाला म्हणुन लोकांचाही उद्देश साध्य झाला असाव :)

इरसाल's picture

18 Jan 2013 - 3:56 pm | इरसाल

एवढ झालच आहे तर.......
हळद रुसली कुंकु हसलं
वाहतो ही कुंकवाची पुडी
कुंकु
कुंकु मिल गया
कुंकुफॉल
कुंकु नेव्हर डाइज
कुंकु हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणी तो मी मिळवणारच.
माझे कुंकवाचे प्रयोग.
कुंकु व्हर्सेस कुंकु
तारक मेहता का उल्टा कुंकु
मॅन व्हर्सेस कुंकु
चख ले कुंकु
कुंकु ऑन माय प्लेट
फबुलस कुंकु
संजीव कपुर'स कुंकु

आनन्दिता's picture

18 Jan 2013 - 10:46 pm | आनन्दिता

अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक पिक्चर काढणार आहे म्हणे ....थांब कमांडो कुंकु लावते

डोळ्यासमोर चित्र उबं राहिलं आणि लय हसलो!

अभ्या..'s picture

19 Jan 2013 - 1:12 am | अभ्या..

अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक पिक्चर काढणार आहे म्हणे ....थांब कमांडो कुंकु लावते

आता लवकरच बघा हे.
a

बॅटमॅन's picture

19 Jan 2013 - 1:15 am | बॅटमॅन

अगायायायायायायायाय =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

लैच वाईट्ट जिकलाईस अब्या भावा तू _/\_

आदूबाळ's picture

19 Jan 2013 - 2:26 am | आदूबाळ

चेपु वर शेयर करू का, तुमची परवानगी असेल तर?

अभ्या..'s picture

19 Jan 2013 - 2:33 am | अभ्या..

करा, बिनधास्त करा. आपलीच कलाकृती समजून करा. (दिग्दर्शक म्हणून तेवढे आनंदितातैचे नाव घ्या मात्र ;))
लोकं चेपुवरुन काय काय आणून हिकडं लावतेत. तुम्ही हितनं कायतरी तिकडं न्या. :)

आनन्दिता's picture

19 Jan 2013 - 5:16 am | आनन्दिता

deva

ये गुनाह मैने नही किया जज्ज साब

आनन्दिता's picture

19 Jan 2013 - 2:34 am | आनन्दिता

है शब्बास!! लगेच सिनुमाचा फस्ट लूक पण रिलिज केलात की अभिजीत राव तुम्ही!

बाकी अलकाबाईंना गालावर आसवाची माळ न वागवता उलुसच का होइना पण हसताना पाहुन अमंळ हळवी झाले बघा..

अभ्या..'s picture

19 Jan 2013 - 2:43 am | अभ्या..

अलकाबाईंना गालावर आसवाची माळ न वागवता उलुसच का होइना पण हसताना पाहुन अमंळ हळवी झाले बघा..

त्ये कसं झालं म्हैतै का? आरनाल्डराव म्हन्लं की लढायच्या टैमाला जाताना तरी हास जरा. म्या म्येल्यावर रडायचच हाय की पूर्ण पिच्चरभर. तवाचा त्यो फटू हाय. (पिच्च्ररमदी १२ व्या मिन्टाला आरनाल्डराव मरतेत. एन्डला काळूबाईच्या आशिर्वादानं परत येतेत)

जेनी...'s picture

19 Jan 2013 - 3:46 am | जेनी...

=))

_/\_

अभिजीत राव वाचुन मज्जा वाटली ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2013 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

जल्ले मरूद्या ते सगले दुसरे डॅरक्टर ! तुमीच काडा का पिच्चर. तुमालाच लई झ्याक आयडियाची कल्पना हाये या ष्टोरीची !

इरसाल's picture

19 Jan 2013 - 3:42 pm | इरसाल

कमांडोला कुकु.......
http://t0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQbYqLKpBqFd3zN_6rx87hQdXNlCwgF8jh6maG_TQhx3saw0RIvJQ

किसन शिंदे's picture

19 Jan 2013 - 5:25 am | किसन शिंदे

=))

'तुझे रिकामपणाचे उद्योग' भारीयेत रे अभि.

अभ्या..'s picture

19 Jan 2013 - 8:20 am | अभ्या..

आमच्या प्रतिसाद प्रतिभेला रिकामपणाचे उद्योग आणि ते पण भारी म्हणणार्‍यांचे आभार आणि तीव्र निषेध.
साक्षरता मोहिमेवर पडलेल्या दिर्घ अतिदिर्घ प्रतिसादातील प्रत्येक शब्दाइतकाच आमचा पण प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. असे मी नम्रपणे नमूद करु इच्छितो.
;)

शैलेन्द्र's picture

19 Jan 2013 - 2:39 pm | शैलेन्द्र

अरे चे पु वर टाकु देरे .. प्लीज..

मराठे's picture

18 Jan 2013 - 11:36 pm | मराठे

कुंकू पांडा! त्री-मित

कवितानागेश's picture

19 Jan 2013 - 12:11 am | कवितानागेश

ब्येष्ट!
:D

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 8:36 pm | शैलेन्द्र

काही नाही.... फक्त २००

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2013 - 8:38 pm | अत्रुप्त आत्मा

हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड ... कुंकू >>>नॉन-स्टॉप 200... ;-)

श्रीरंग_जोशी's picture

18 Jan 2013 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी

हा धागा व इतर '... का लावतात' धाग्यांवरचे एकूण प्रतिसाद मिळून ३०० धावा कधीच झाल्या आता ४०० कडे वाटचाल सुरू आहे.

शुचि यांना मिपाचा तेंडल्या म्हणण्यास हरकत नाही :-).

खफवरील तुमच्याच पोस्टवरुन साभार...

image

या प्रतिसादावरून 'लावणे' या क्रियापदाच्या वापरावर आलेला एक मस्त लेख आठवला.

वानगीदाखल ही वाक्यं..

'मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '.
'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '.
'मीन्स लाव, बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर! '
'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jan 2013 - 12:32 am | श्रीरंग_जोशी

काही (पुरुष) राजकीय नेत्यांना देखील कुंकू वाटेल अशा आकाराचा गंधाचा टिळा लावताना पाहिले आहे.
उदा. मु.म. जोशी व वाय एस येडीयुरप्पा.

त्यामागे कोणती परंपरा असेल यावर कुणी प्रकाश टाकेल काय?

जेनी...'s picture

19 Jan 2013 - 12:39 am | जेनी...

=))

काय आडनावं असतात नै

येडी यु रप्पा =))

बॅटमॅन's picture

19 Jan 2013 - 1:17 am | बॅटमॅन

येडियुर अप्पा असे आहे ते. येडियुर हे गाव बंगळूरजवळ आहे, तिथला अप्पा तो येडियुरप्पा.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jan 2013 - 1:18 am | श्रीरंग_जोशी

ते प्रथम नाव पण असू शकतं...

श्रिया's picture

19 Jan 2013 - 1:51 pm | श्रिया

इथला हळदीकुंकू समारंभ रथसप्तमी पर्यंत चालेल वाटतं.

पक्या's picture

20 Jan 2013 - 1:27 pm | पक्या

कुंकवावर मात टिकलीची http://esakal.com/esakal/20130120/4644365888387750517.htm - इथे पण काही कारणे दिली आहेत लेखकाने.

बलात्कार कोण करतंय, हे शोधून काढण्यासाठी ब्रिटीश राजवटीत गुन्ह्याच्या तपासासाठी कुंकू वापरल्याचा किस्सा वाचनात आहे.

भारतातील एका प्रसिद्ध देवस्थानात (दुसर्‍या प्रांतातले आहे. नाव उघड करत नाही. परप्रांतियांच्या भावना दुखावतील ना :)) पुजारी पूजेनिमित्त मुक्काम करणार्‍या चांगल्या कुलवान स्त्रियांवर बलात्कार करत असल्याची कुजबूज होती. या स्त्रिया उच्च कुळातील असल्याने बदनामीच्या भीतीने झाल्या प्रकारची वाच्यता करत नव्हत्या. लोकांचा क्षोभ वाढत होता. घटनेतील सत्यता तपासण्यासाठी ब्रिटीश अंमलदारांनी हुशारीने बेत आखला. त्यांनी अत्यंत सुस्वरुप अशा वेश्यांना उच्चकुलीन महिलांच्या वेशभूषेत मंदिराच्या खोल्यांत मुक्कामासाठी पाठवले. त्यांचे काम एकच होते. बळजबरी करणार्‍या पुजार्‍यासमोर प्रारंभी विनवण्या करायच्या आणि नंतर हताश झाल्यासारखे दाखवून त्या नीचांना संबंध करु द्यायचा. यादरम्यान चतुराईने त्या पुजार्‍याच्या चेहर्‍यावर लवकर न पुसल्या जाणार्‍या विशिष्ट रंगाच्या कुंकवाचा ठिपका उमटवायचा. हे कुंकू त्या गणिकांच्या कपाळावर आणि हाताच्या बोटांनाही होते. कुंकवाने काम चोख बजावले. पोलिसांनी हे कुकर्म करणार्‍या पुजार्‍यांची गठडी वळली.

बाप रे. रोचक आहे किस्सा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2013 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण आणी हहपुवा करणारी अशी चर्चा. मजा आली. :)

-दिलीप बिरुटे

क्रान्ति's picture

24 Jan 2013 - 12:18 am | क्रान्ति

तांबडी मातीतलं एक गोड गाणं आठवलं. असो, आपण रथसप्तमीपर्यंत वाट पहावी वाण काय मिळणार त्याची. :P

आर्र देवा हळ्दी कुक्कु उराकल वाटत पन हळ्दी कुक्कवाला आलेल्या समद्यांनी नाव उखाण्यात घेतल्या बिगर जायाच नाही आसा आमचा आग्रेव हाय.कोन करतया सुरूवात?