✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुंकू का लावतात

श
शुचि यांनी
Wed, 01/16/2013 - 20:38  ·  लेख
लेख
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78745 वाचन

💬 प्रतिसाद (237)

प्रतिक्रिया

तुमी लावता का कूकू

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 23:41 नवीन
तुमी लावता का कूकू तुमी आर्य का अनार्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कुंकू का लावतात

श्रीनिवास टिळक
Fri, 01/18/2013 - 07:43 नवीन
प्रतिसाद वाचून ज्ञानवर्धन आणि करमणुकही झाली आता एक शंका-कुंकवाचा धनी या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments

काही चांगली माहिती आणि

मृत्युन्जय
Fri, 01/18/2013 - 12:48 नवीन
काही चांगली माहिती आणि प्रचंड गोंधळ दोन्ही मुळे मजा आली. जे काही थोडे फार विषयाला अनुसरुन प्रतिसाद आले आहेत त्यामुळे धागाकर्तीचा हेतु साध्य झाला असावा आणि बर्‍याच काळाने दंगा करायला मिळाला म्हणुन लोकांचाही उद्देश साध्य झाला असाव :)
  • Log in or register to post comments

आयला

इरसाल
Fri, 01/18/2013 - 15:56 नवीन
एवढ झालच आहे तर....... हळद रुसली कुंकु हसलं वाहतो ही कुंकवाची पुडी कुंकु कुंकु मिल गया कुंकुफॉल कुंकु नेव्हर डाइज कुंकु हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणी तो मी मिळवणारच. माझे कुंकवाचे प्रयोग. कुंकु व्हर्सेस कुंकु तारक मेहता का उल्टा कुंकु मॅन व्हर्सेस कुंकु चख ले कुंकु कुंकु ऑन माय प्लेट फबुलस कुंकु संजीव कपुर'स कुंकु
  • Log in or register to post comments

अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक

आनन्दिता
Fri, 01/18/2013 - 22:46 नवीन
अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक पिक्चर काढणार आहे म्हणे ....थांब कमांडो कुंकु लावते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

डोळ्यासमोर चित्र उबं राहिलं

आदूबाळ
Sat, 01/19/2013 - 00:25 नवीन
डोळ्यासमोर चित्र उबं राहिलं आणि लय हसलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

आगामी आकर्षण

अभ्या..
Sat, 01/19/2013 - 01:12 नवीन
अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक पिक्चर काढणार आहे म्हणे ....थांब कमांडो कुंकु लावते
आता लवकरच बघा हे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

अगायायायायायायायाय

बॅटमॅन
Sat, 01/19/2013 - 01:15 नवीन
अगायायायायायायायाय =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लैच वाईट्ट जिकलाईस अब्या भावा तू _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चेपु वर शेयर करू का, तुमची

आदूबाळ
Sat, 01/19/2013 - 02:26 नवीन
चेपु वर शेयर करू का, तुमची परवानगी असेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बिनधास्त करा

अभ्या..
Sat, 01/19/2013 - 02:33 नवीन
करा, बिनधास्त करा. आपलीच कलाकृती समजून करा. (दिग्दर्शक म्हणून तेवढे आनंदितातैचे नाव घ्या मात्र ;)) लोकं चेपुवरुन काय काय आणून हिकडं लावतेत. तुम्ही हितनं कायतरी तिकडं न्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ये गुनाह मैने नही किया जज्ज

आनन्दिता
Sat, 01/19/2013 - 05:16 नवीन
Image removed. ये गुनाह मैने नही किया जज्ज साब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

है शब्बास!! लगेच सिनुमाचा

आनन्दिता
Sat, 01/19/2013 - 02:34 नवीन
है शब्बास!! लगेच सिनुमाचा फस्ट लूक पण रिलिज केलात की अभिजीत राव तुम्ही! बाकी अलकाबाईंना गालावर आसवाची माळ न वागवता उलुसच का होइना पण हसताना पाहुन अमंळ हळवी झाले बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

त्ये कसं झालं म्हैतै का?

अभ्या..
Sat, 01/19/2013 - 02:43 नवीन
अलकाबाईंना गालावर आसवाची माळ न वागवता उलुसच का होइना पण हसताना पाहुन अमंळ हळवी झाले बघा..
त्ये कसं झालं म्हैतै का? आरनाल्डराव म्हन्लं की लढायच्या टैमाला जाताना तरी हास जरा. म्या म्येल्यावर रडायचच हाय की पूर्ण पिच्चरभर. तवाचा त्यो फटू हाय. (पिच्च्ररमदी १२ व्या मिन्टाला आरनाल्डराव मरतेत. एन्डला काळूबाईच्या आशिर्वादानं परत येतेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

_/\_

जेनी...
Sat, 01/19/2013 - 03:46 नवीन
=)) _/\_ अभिजीत राव वाचुन मज्जा वाटली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मरूद्या ते सगळे दुसरे डायरेक्टर

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/19/2013 - 15:10 नवीन
जल्ले मरूद्या ते सगले दुसरे डॅरक्टर ! तुमीच काडा का पिच्चर. तुमालाच लई झ्याक आयडियाची कल्पना हाये या ष्टोरीची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आता लावा

इरसाल
Sat, 01/19/2013 - 15:42 नवीन
कमांडोला कुकु....... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

'तुझे रिकामपणाचे उद्योग'

किसन शिंदे
Sat, 01/19/2013 - 05:25 नवीन
=)) 'तुझे रिकामपणाचे उद्योग' भारीयेत रे अभि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तीव्र निषेध

अभ्या..
Sat, 01/19/2013 - 08:20 नवीन
आमच्या प्रतिसाद प्रतिभेला रिकामपणाचे उद्योग आणि ते पण भारी म्हणणार्‍यांचे आभार आणि तीव्र निषेध. साक्षरता मोहिमेवर पडलेल्या दिर्घ अतिदिर्घ प्रतिसादातील प्रत्येक शब्दाइतकाच आमचा पण प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. असे मी नम्रपणे नमूद करु इच्छितो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अरे चे पु वर टाकु देरे ..

शैलेन्द्र
Sat, 01/19/2013 - 14:39 नवीन
अरे चे पु वर टाकु देरे .. प्लीज..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कुंकू पांडा! त्री-मित

मराठे
Fri, 01/18/2013 - 23:36 नवीन
कुंकू पांडा! त्री-मित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ब्येष्ट!

कवितानागेश
Sat, 01/19/2013 - 00:11 नवीन
ब्येष्ट! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

काही नाही.... फक्त २००

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 20:36 नवीन
काही नाही.... फक्त २००
  • Log in or register to post comments

हे धत्ताड तत्ताड धत्ताड

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/18/2013 - 20:38 नवीन
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड ... कुंकू >>>नॉन-स्टॉप 200... ;-)
  • Log in or register to post comments

उपखंडातला क्रिकेट सामना

श्रीरंग_जोशी
Fri, 01/18/2013 - 22:39 नवीन
हा धागा व इतर '... का लावतात' धाग्यांवरचे एकूण प्रतिसाद मिळून ३०० धावा कधीच झाल्या आता ४०० कडे वाटचाल सुरू आहे. शुचि यांना मिपाचा तेंडल्या म्हणण्यास हरकत नाही :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खफवरील तुमच्याच पोस्टवरुन

धन्या
Sat, 01/19/2013 - 00:21 नवीन
खफवरील तुमच्याच पोस्टवरुन साभार... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

या प्रतिसादावरून 'लावणे' या

इनिगोय
Wed, 01/23/2013 - 19:20 नवीन
या प्रतिसादावरून 'लावणे' या क्रियापदाच्या वापरावर आलेला एक मस्त लेख आठवला. वानगीदाखल ही वाक्यं.. 'मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '. 'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '. 'मीन्स लाव, बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर! ' 'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वेगळे उदाहरण

श्रीरंग_जोशी
Sat, 01/19/2013 - 00:32 नवीन
काही (पुरुष) राजकीय नेत्यांना देखील कुंकू वाटेल अशा आकाराचा गंधाचा टिळा लावताना पाहिले आहे. उदा. मु.म. जोशी व वाय एस येडीयुरप्पा. त्यामागे कोणती परंपरा असेल यावर कुणी प्रकाश टाकेल काय?
  • Log in or register to post comments

काय आडनावं असतात नै

जेनी...
Sat, 01/19/2013 - 00:39 नवीन
=)) काय आडनावं असतात नै येडी यु रप्पा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

येडियुर अप्पा असे आहे ते.

बॅटमॅन
Sat, 01/19/2013 - 01:17 नवीन
येडियुर अप्पा असे आहे ते. येडियुर हे गाव बंगळूरजवळ आहे, तिथला अप्पा तो येडियुरप्पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आडनाव कशावरून?

श्रीरंग_जोशी
Sat, 01/19/2013 - 01:18 नवीन
ते प्रथम नाव पण असू शकतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

इथला हळदीकुंकू समारंभ

श्रिया
Sat, 01/19/2013 - 13:51 नवीन
इथला हळदीकुंकू समारंभ रथसप्तमी पर्यंत चालेल वाटतं.
  • Log in or register to post comments

कुंकवावर मात टिकलीची http:/

पक्या
Sun, 01/20/2013 - 13:27 नवीन
कुंकवावर मात टिकलीची http://esakal.com/esakal/20130120/4644365888387750517.htm - इथे पण काही कारणे दिली आहेत लेखकाने.
  • Log in or register to post comments

संजय, असा एक ऐतिहासिक किस्सा आहे बरं का?

योगप्रभू
Wed, 01/23/2013 - 13:29 नवीन
बलात्कार कोण करतंय, हे शोधून काढण्यासाठी ब्रिटीश राजवटीत गुन्ह्याच्या तपासासाठी कुंकू वापरल्याचा किस्सा वाचनात आहे. भारतातील एका प्रसिद्ध देवस्थानात (दुसर्‍या प्रांतातले आहे. नाव उघड करत नाही. परप्रांतियांच्या भावना दुखावतील ना :)) पुजारी पूजेनिमित्त मुक्काम करणार्‍या चांगल्या कुलवान स्त्रियांवर बलात्कार करत असल्याची कुजबूज होती. या स्त्रिया उच्च कुळातील असल्याने बदनामीच्या भीतीने झाल्या प्रकारची वाच्यता करत नव्हत्या. लोकांचा क्षोभ वाढत होता. घटनेतील सत्यता तपासण्यासाठी ब्रिटीश अंमलदारांनी हुशारीने बेत आखला. त्यांनी अत्यंत सुस्वरुप अशा वेश्यांना उच्चकुलीन महिलांच्या वेशभूषेत मंदिराच्या खोल्यांत मुक्कामासाठी पाठवले. त्यांचे काम एकच होते. बळजबरी करणार्‍या पुजार्‍यासमोर प्रारंभी विनवण्या करायच्या आणि नंतर हताश झाल्यासारखे दाखवून त्या नीचांना संबंध करु द्यायचा. यादरम्यान चतुराईने त्या पुजार्‍याच्या चेहर्‍यावर लवकर न पुसल्या जाणार्‍या विशिष्ट रंगाच्या कुंकवाचा ठिपका उमटवायचा. हे कुंकू त्या गणिकांच्या कपाळावर आणि हाताच्या बोटांनाही होते. कुंकवाने काम चोख बजावले. पोलिसांनी हे कुकर्म करणार्‍या पुजार्‍यांची गठडी वळली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बाप रे. रोचक आहे किस्सा.

शुचि
Wed, 01/23/2013 - 19:53 नवीन
बाप रे. रोचक आहे किस्सा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/23/2013 - 19:43 नवीन
माहितीपूर्ण आणी हहपुवा करणारी अशी चर्चा. मजा आली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जीव भरंना

क्रान्ति
गुरुवार, 01/24/2013 - 00:18 नवीन
तांबडी मातीतलं एक गोड गाणं आठवलं. असो, आपण रथसप्तमीपर्यंत वाट पहावी वाण काय मिळणार त्याची. :P
  • Log in or register to post comments

आर्र देवा हळ्दी कुक्कु उराकल

अधिराज
गुरुवार, 01/31/2013 - 15:16 नवीन
आर्र देवा हळ्दी कुक्कु उराकल वाटत पन हळ्दी कुक्कवाला आलेल्या समद्यांनी नाव उखाण्यात घेतल्या बिगर जायाच नाही आसा आमचा आग्रेव हाय.कोन करतया सुरूवात?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा