मी नव्याने कोवळा झालो...

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
14 Jan 2013 - 11:31 pm

मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच. प्रेरणा कळली नाही तरी जिलेब्यांचा आस्वाद घेण्यात काही अडचण येणार नाही याची आम्हांस खात्री आहे.

---------------------------------------------------------
अ‍ॅक्टीवावरी घालूनी मांडी, मी नव्याने कोवळा झालो
अहो फेडूनीया धोतर माझे, मी पँटीत* सोवळा झालो

सहा आसनीत बसली बाला, परी मज वाटेना काही
जणू मुरूनी अनुभवांच्या, मी बरणीत आवळा झालो

जरी पाहीना तिजकडे मी, ती निमित्त परी एक ठरली
आठवणींत मम यौवनाच्या, मी रंगूनी बावळा झालो

गेली नजर चु़कूनी जेव्हा, भिरभीरते नेत्र त्या षोडशेचे
नजरेत अडकूनी मात्र तेव्हा, मी क्षणभर कावळा झालो

आला सहा आसनीचा थांबा, गती जराशी मंद झाली
बा़जूला काढत अ‍ॅक्टीव्हा, मीही शांत मावळा झालो

गाडीतून उतरली कन्या, येई फडकावीत हाती चिठ्ठी
म्हणे काका हा पत्ता सांगा, मी झणी मोरावळा झालो
------------------------------------------------------------

* हा शब्द "फुलपँटमध्ये" असा वाचावा. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊन आमच्या जिलब्यांना कचर्‍याचा डब्बा दाखवला जायचा.

हास्यकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2013 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाडीतून उतरली कन्या, येई फडकावीत हाती चिठ्ठी
म्हणे काका हा पत्ता सांगा, मी झणी मोरावळा झालो

जबरा. :)

-दिलीप बिरुटे

शुचि's picture

15 Jan 2013 - 9:06 pm | शुचि

मोरु होणे हा वाक्प्रचार माहीत होता. पण मोरावळा होणे हा नवीनच विचार समोर येतोय ;)

धन्या's picture

15 Jan 2013 - 9:10 pm | धन्या

परंतू मराठी साहित्यात नव्यानेच रुढ होऊ पाहणार्‍या जिलबीकाव्यात यमक जुळवण्यासाठी शंब्दाची अशी मोडतोड करण्याची "लिबर्टी" कवीला असते. त्या लिबर्टीमुळेच इथे मोरुचा मोरावळा झाला आहे. :)

पोएटीक लायसन म्हन्त्यात त्याला भाऊ (काका) =))

धन्या's picture

15 Jan 2013 - 9:24 pm | धन्या

त्याचं काय आहे, जिलबीकाव्य हा साहित्यप्रकार जालावर भुछत्रासारख्या उगवलेल्या नव्या पीढीतील नवकवींनी सुरु केलेला असल्याने त्यांना अजून मराठी काव्याचा अर्वाचीन/प्राचीन इतिहास आणि त्यासंबंधीच्या संज्ञा माहिती नाहीत. (यातलं अर्वाचीन म्हणजे काय हे कुणी सांगेल का? :) )

रच्याकने, ते अ‍ॅक्टीवावाले काका आम्ही नाही बरं का. ते बिचारे त्या पोरीने काका म्हटल्यावर अतृप्त मनाने कुठेतरी डोकं थंड होण्यासाठी कुठे ताक मिळतंय का ते शोधायला गेले. ;)

स्पंदना's picture

16 Jan 2013 - 3:13 am | स्पंदना

(यातलं अर्वाचीन म्हणजे काय हे कुणी सांगेल का? )

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र वाचीन वाचीन म्हणत हुतो खरं.....

असा काहीसा अरथ असावा.

शुचि's picture

16 Jan 2013 - 3:26 am | शुचि

हाहाहा मस्त :)

धन्या's picture

16 Jan 2013 - 8:29 am | धन्या

एक नंबर !!

शैलेन्द्र's picture

15 Jan 2013 - 8:50 pm | शैलेन्द्र

कड्डक तीन तारी पाकातली जिलेबी.. तुकडा मोडावा म्हणतो..

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2013 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-lol-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emo/laughing/troll-face-evil-laugher-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emo/happy/clicking-your-heels-smiley-emoticon.gif

धन्या's picture

15 Jan 2013 - 9:06 pm | धन्या

आम्ही तुम्हालाही मांडी घालून अ‍ॅक्टीवा चालवताना पाहिलं आहे. तुम्हालाही कधी असा अनुभव आला होता का? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2013 - 9:11 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हालाही कधी असा अनुभव आला होता का? >>> http://www.sherv.net/cm/emoticons/horror/best-devil-smiley-emoticon.gif

५० फक्त's picture

15 Jan 2013 - 9:43 pm | ५० फक्त

मांडी घालुन अ‍ॅक्टिव्हा, काहीच नाही मी काही(धी)काही(धी) बुवांना मांडी घालुन अल्टो चालवताना पाहिलं आहे.

धन्या's picture

15 Jan 2013 - 9:48 pm | धन्या

मारुतीनं ऑटो ट्रान्समीशन वाली अल्टो काढल्याचं अजून तरी वाचण्यात नाही.

मारुतीला पर्वतावरुन संजीवनी नाय काढता आली, अ‍ॅटो अल्टो फार लांबची गोष्ट आहे,

असो तुमच्या वाचण्यात आलेलं नसेल पण आमच्या पाहण्यात आलेलं आहे. आता पुरावे मागु नका म्हणजे मिळवलं.

स्पंदना's picture

16 Jan 2013 - 3:14 am | स्पंदना

मारुतीला पर्वतावरुन संजीवनी नाय काढता आली, अ‍ॅटो अल्टो फार लांबची गोष्ट आहे,

ये हुइ ना बात्त!

पैसा's picture

15 Jan 2013 - 9:11 pm | पैसा

मोरावळा आवडला. आता याची प्रेरणा शोधणे आले!

धन्या's picture

15 Jan 2013 - 9:16 pm | धन्या

अ‍ॅक्टीवावाल्या काकांनी प्रेरणाला पत्ता सांगितल्यानंतर ती लगेच निघून गेली. :)

अ‍ॅक्टिवावाला काका खंय/कोंण आशिल्लों ता पळोंवक जाय, मागीर प्रेरणा सोदपाची गरजच ना. ना जाल्या प्रेरणा सोदूनलेगित मेळची ना अशें दिसतां गें !! ;)

पैसा's picture

15 Jan 2013 - 9:47 pm | पैसा

अरे ताणे सांगला मरे, बुवाक पळयला म्हणून! :D

माका मालवणी आणि कोकणी भाषा शिकुची आसा. कोण तयार आसा शिकवुक?

पैसा's picture

15 Jan 2013 - 11:02 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/21287

हे घे. हांव, प्रीतमोहर आणि यशोधरा आसात. प्रीतमोहर फुडलो धडो दितले. ताका याद करपाक जाय.

मी-सौरभ's picture

16 Jan 2013 - 3:59 pm | मी-सौरभ

मराठी संस्थळावर प्रत्यक्ष संपादकच मराठेतर (महत्वाच म्हणजे मला न समजणारी) भाषा वापरतात हे वाचून......

जाऊ दे पैसाकाकूंबद्दल आपली काय बि खम्प्लेंट नाय हाये.....

अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून बसण्याच्या करामतीपेक्षा धोतर घालणारा काका कोण असावा बरे? ती बाला त्याला 'आजोबा' का म्हणाली नाही?

जेनी...'s picture

15 Jan 2013 - 11:13 pm | जेनी...

काका चान आहे हं कविता !

रेवती's picture

15 Jan 2013 - 11:16 pm | रेवती

हा हा हा. छान.

किसन शिंदे's picture

16 Jan 2013 - 12:38 am | किसन शिंदे

=)) =))

कवितानागेश's picture

16 Jan 2013 - 12:48 am | कवितानागेश

मजा आली! :)

अभ्या..'s picture

16 Jan 2013 - 12:59 am | अभ्या..

मांडी घालूनच बसा अ‍ॅक्टीव्हावर, पण मागच्या सीटवर.
चालवणार्‍याच्या पाठीला पाठ लावून बसलात तर अजून बर्‍याच बाला, षोडशा, कन्या नीट दिसतील.

धन्या's picture

16 Jan 2013 - 1:06 am | धन्या

एव्हढा कोकलतोय तरी पब्लिक मलाच काका म्हणतंय. :)

चालवणार्‍याच्या पाठीला पाठ लावून बसलात तर अजून बर्‍याच बाला, षोडशा, कन्या नीट दिसतील.

सध्यातरी अशी काही पाठीला पाठ लावून बसण्याची पद्धत नाही.
रच्याकने, पाठीला पाठ लावण्यावरून खुप पूर्वी मिपावर प्रचलीत असलेल्या आणि नंतर काळाच्या ओघात गडब झालेला "पाठीला साबण चोळणे" हा शब्दप्रयोग आठवला. ;)

स्पंदना's picture

16 Jan 2013 - 3:16 am | स्पंदना

धनाजीराव (काका) काव्य अतिशय यमकात, वृतात बसत असल्याने आम्ही याला नव्-काव्य म्हणायचे नाकारत आहोत. अहो नवकाव्य अस तस नाही घडत. त्या साठी फुल्ल्प्यंट तर नाहीच नाही चालत.

तरीही...अतिशय रसाळ अन आनंददायी काव्यकृती.

धन्या's picture

16 Jan 2013 - 8:30 am | धन्या

काका आम्ही नाही. हा आमच्या एका अतृप्त मित्राचा अनुभव आहे, जो इकडे तिकडे वेडेवाकडे चेहरे करत फिरत असतो. :)

नाखु's picture

16 Jan 2013 - 9:03 am | नाखु

जिलबी सम्राटांना संक्रांतीच "वाण" दिल्ये गेले आहे.. (मि.पा.भाषेनुसार)

श्री गावसेना प्रमुख's picture

16 Jan 2013 - 9:28 am | श्री गावसेना प्रमुख

आला सहा आसनीचा थांबा, मी जरासा धुंद झालो
बा़जूला सारत लोका, मी मजनु झालो

गाडीतून उतरली रुपवती, येई फडकावीत हाती चिठ्ठी
बघुनी ती यौवना ,मी ही क्षणीक प्रेमवीर झालो
1
----------------------------------------------------

५० फक्त's picture

16 Jan 2013 - 11:12 am | ५० फक्त

सदर कविता वाचुन स्वारगेट्-धायरी सहा आसनी प्रवासी वाहतुक संघाने सदर कविला व कवितेच्या नायकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. समत मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा.

धन्या's picture

16 Jan 2013 - 8:23 pm | धन्या

कवीला भेटायचे असेल तर स्वारगेटवरुन धायरीला जाताना संतोष हॉलजवळ उजव्या गल्लीत वळायचे. आणि कवितेच्या नायकाला भेटायचे असेल तर संतोष हॉलवरुन तसंच पुढं जायचं, फन टाईम आणि त्यानंतरचा कालवा ओलांडायचा आणि लगेचच डाव्या बा़जूला वळायचं. :)

आपलाच,
धनाजीराव वाकडे पाटील
अखिल शिंव्हगड रोड, वडगांव धायरी (डीयेस्के सहीत) आन्नी वारजे जिलेबी व्यावसायिक म्हासंग

जिलब्यापाडु साहित्यसंमेलन स्वारगेट्-धायरी दरम्यान कोठेतरी भरवा ;-)

अवांतरः तेरावच घालायच असेल तर मी नव्याने कावळा झालो असही चाललं असतं ;-)

मूकवाचक's picture

16 Jan 2013 - 12:08 pm | मूकवाचक

=))

सस्नेह's picture

16 Jan 2013 - 12:12 pm | सस्नेह

तुम्ही तर जिलबीवाल्यांचीच जिलबी वळलीत की हो !

अनिल तापकीर's picture

16 Jan 2013 - 1:02 pm | अनिल तापकीर

धनाजीराव, लय भारी

प्रीत-मोहर's picture

16 Jan 2013 - 1:02 pm | प्रीत-मोहर

=)) =)) =))

जयवी's picture

16 Jan 2013 - 2:13 pm | जयवी

सही !!

मी-सौरभ's picture

16 Jan 2013 - 4:02 pm | मी-सौरभ

आता काका काय प्रतिसादतात ते बहघाहायहला पायजे ;)

कॉलिंग काका ऑण अ‍ॅक्टिव्हा!!

रुमानी's picture

16 Jan 2013 - 4:27 pm | रुमानी

धन्य.......! धनाजीराव.

सोत्रि's picture

16 Jan 2013 - 8:28 pm | सोत्रि

व्वा! धनाजीराव मस्तच.

-(कोवळा) सोकाजी

५० फक्त's picture

16 Jan 2013 - 8:42 pm | ५० फक्त

-(कोवळा) सोकाजी

म्हणजे जुनाच कोवळा की नव्यानं झालेला कोवळा...

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2013 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा

@ की नव्यानं झालेला कोवळा...>>> =)) =)) =))

लीलाधर's picture

16 Jan 2013 - 8:40 pm | लीलाधर

धनाजीराव जीलबीवाले अक्तीवा ते अल्तो मधुन फिरताना काय शुंडर मष्तच जीलबी टाकलीत की ओ फारच छान जलेबीवाले काका :-P :-D ;) :)

धन्या's picture

16 Jan 2013 - 8:46 pm | धन्या

माज्याकर प्याशन परो आनि आय्टेन हायेत.
तु तुज्या आत्मा दादुसला यिचार, त्येज्याकर याक्टीवा आनि आल्टो हाय. ;)

तिमा's picture

16 Jan 2013 - 8:56 pm | तिमा

'धन्या ते कोवळी कळा!'