दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे.
तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले.
प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला.
आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली:
मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे:
ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे.
ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात...
अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?
प्रतिक्रिया
11 Jan 2013 - 11:43 pm | आनन्दिता
काँट्रॉव्हर्सी होत नसेल तर ती तयाऱ करा , हे आपल्या प्रचार माध्यमांचं वर्क कल्चर बनलंय..
आता राष्ट्र्पतींचा दिवटा व इतर काँग्रेसी मंडळी या संवेदनशील विषयावर रोजच अशी बेताल वक्तव्ये करू लागल्याने त्यात नवा मसाला असा काही उरला नव्हता.
मग तो तयार करण्यासाठी संघासारखा दुसरा पर्याय होउच शकत नाही.. अशात भागवत कुठेसे भाषणाला गेलेत असं ऐकुन काहीतरी मिळेल या आशेने जमलेल्या बिचार्या माध्यमांच्या हातात 'तसं ' काहीच आलं नाही.. तरीही निराश न होता त्या खत्रुड पत्रकारांनी भागवतांचे जे काही शब्द मिळाले त्यांनाच तोडुन मोडून आपल्याल हवं तसं मोल्ड करुन, काँट्रॉव्हर्सी तयार करण्याचं आपलं काम चोख पार पाड्लं...
गरज आहे तिथे न बोलणार्या व नको तिथे उच्छाद मांडणार्या मिडीयाला आणि सनसनीखेस बातम्यांनाच भीक घालणार्या प्रेक्षकांना देव सदबुद्धी देवो. बास्स.
12 Jan 2013 - 12:22 am | संचित
हे लक्ष्यत आणून दिल्याबाबत आभार.
बाकि स्वतःला विद्वान् समजणार् या टाइम्स ने बरेच आकडे अणि टक्केवारी प्रसिद्ध करण्यात वेळ घालवला. जरा युट्युब विडिओ पण पहिला असता तर बरे झाले असते.
12 Jan 2013 - 12:27 am | योगप्रभू
ज्या देशातील समाजाची जशी जाण/आवड/मानसिकता/पातळी तीच तेथील प्रशासन व्यवस्था, राजकारण, प्रसारमाध्यमे, साहित्य आणि दैनंदिन व्यवहारांत प्रतिबिंबित होते.
12 Jan 2013 - 1:10 am | दादा कोंडके
भारतात 'हे असं का?' याचं उत्तर हेच आहे.
12 Jan 2013 - 12:32 am | मोदक
पद्मश्री सुचेता दलाल (यांच्या अधिक कार्याबद्दल माहिती नाही पण जनजागृतीमध्ये आहेत असे ऐकून आहे) यांच्या मनीलाईफ फाऊंडेशनच्या एका सेमीनारमध्ये मिडीया आणि करप्शन यावर एक शॉर्ट फिल्म दाखवली होती.
गावपातळीवरच्या वर्तमानपत्रापासून नीरा राडीया केसपर्यंतचे बरेच काही होते त्यामध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे प्रभु चावला, वीर संगवी अशी अनेक "व्हूज व्हू" (?) अचानक का गायब झाली ते कळाले.
बाकी "प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा" ही खंग्री द्विरूक्ती झाली.. :-D
12 Jan 2013 - 2:03 am | दादा कोंडके
पण याउप्पर सद्यस्थिती बघून असं वाटतं की राजकारण्यांना जर कुणाची भिती वाटत असली तर ती माध्यमांची.
एखाद्या स्टेटमेंटची अकाउंटॅबिलिटी विचारण्याची शक्ती फक्त माध्यमांकडेच आहे. परवाच चेपूवर एकाने हा विडिओ टाकला होता. नक्की बघा.
12 Jan 2013 - 2:15 am | विकास
सहमत. म्हणूनच तर माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणातात. फक्त माध्यमांनी त्यांचे काम हे अलिप्तपणे करायला हवे - अर्थात कुठल्याही विचारसरणीचे प्रतिनिधी म्हणून नाही.
शहारूख - जुही चा या संदर्भात मेसेज देणारा (पण विशेष न चाललेला) "फिर भी दिल है हिंदूस्थानी" हा चित्रपट या संदर्भात आठवला.
12 Jan 2013 - 3:36 am | निनाद मुक्काम प...
लेखाचा विषय आणि त्याचे सादरीकरण ह्यामुळे तुम्ही दिलेल्या शीर्षकाला लेख जागतो.
माझ्या मागच्या मलालाच्या लेखात तिचे उदाहरण एक निमित्त होते मात्र लेखाची सुरुवात आपण प्रसार माध्यमांच्या आधीन का आहोत असे लिहिले होते ,
परकीय प्रसार माध्यमे व त्यांच्याकडून प्रेरित आपली देशी प्रसार माध्यम सवंग बनत चालली आहेत ,
आज सागरिका ह्यांनी जेव्हा सोशल मिडीयावर जाहीर माफी मागितली तेव्हा मला हा संघाचा विजय वाटण्यापेक्षा सोशल मिडियाचा विशेषतः तू नळी व थोबाड पुस्तक व टीव टीव चा विजय वाटला ,
मूळ भाषण उपलब्ध असल्याने हरी तात्यांच्या भाषेत पुराव्याने ह्या माध्यमांची लबाडी शाबीत झाली , ह्या आधी गडकरी ह्यांच्या बाबतीत हाच प्रकार झाला होता.
आज आठवण होत आहे त्या ब्लॉगर ची ज्यावर अश्याच एका पंचतारांकित पत्रकारितेने तिच्या विरुद्ध लेख लिहिला म्हणून कोर्टात खटला भरला होता.
कुत्रा माणसाला चावला ही साधी बातमी होऊ शकते मात्र माणूस कुत्र्याला चावला ही मसालेदार बाजारू बातमी होऊ शकते , व लोकांचे जास्त लक्ष वेधून घेते म्हणून साधी बातमी चे मसालेदार बातमीत रूपांतरण करण्याकडे प्रसार माध्यमांचा कटाक्ष असतो.
12 Jan 2013 - 4:47 am | राजेश घासकडवी
एखाद्याने जे म्हटलंच नाही ते त्याने म्हटलं असा दावा करणं हे कुठच्याच माध्यमाला शोभत नाही. कोणीतरी मुळात ती चूक केली, आणि ती बातमी पसरवणारे काही जण क्षमा मागत आहेत हे उत्तमच. अशा तांत्रिक चुका कुठच्याच कारणाने होऊ नयेत झाल्या तर लवकरात लवकर निस्तरल्या जाव्यात.
मात्र लोकांचा यावर विश्वास बसला यात आश्चर्य वाटण्यासारखं नक्की काय आहे? संघ स्त्री-पुरुष भेदभाव करतो हे जगजाहीर आहे. संघाच्या वेबसाइटवर हे सापडलं.
Expressed in the simplest terms, the ideal of the Sangh is to carry the nation to the pinnacle of glory, through organising the entire society and ensuring protection of Hindu Dharma.
ध्येय अर्थातच उदात्त आहे. मात्र हे करणार कोण? तर स्वयंसेवक. आणि स्वयंसेवक कोण? संघाच्या घटनेप्रमाणे,
- Any male Hindu 18 years or above, who subscribes to the Aims and Objects of the Sangh and conforms generally to its discipline and associates with the activities of the Shakha will be considered as a Swayamsevak.
म्हणजे संघाची उदात्त ध्येयं साध्य करण्याची परवानगी संघ स्त्रियांना देत नाही. या दोन ओळींच्या मध्ये लिहिलेलं सत्य हेच आहे, की संघ पुरुषांना उच्च समजतो, आणि स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन. अर्थातच संघाने हे कुठे जाहीर म्हटलेलं नसल्याने तशी बातमी देणं तांत्रिकदृष्ट्या चूकच होईल. पण मूलभूत तात्विक पातळीवर सगळेजण ते मानतात हे उघड आहे. 'मी हे वाक्य म्हणालोच नव्हतो, माझी माफी मागा' असं खुशाल म्हणता येईल. पण जोपर्यंत या तात्विक भूमिकेत बदल होत नाही, तोपर्यंत त्याला नक्की काय अर्थ आहे? सरसंघचालक जर खरोखरच स्त्रीपुरुष समानता मानत असतील, तर तो male शब्द घटनेतून काढून टाकता येतो का बघा म्हणावं.
12 Jan 2013 - 7:56 am | अर्धवटराव
>>म्हणजे संघाची उदात्त ध्येयं साध्य करण्याची परवानगी संघ स्त्रियांना देत नाही.
-- अर्थाचा अनर्थ कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे असले दावे. इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं स्विकृत जबाबदारी" असा अर्थ घेऊन बघा आहे. असो. संघाच्या कार्यात स्त्रियांनी किती आणि काय योगदान दिलय हा वेगळा विषय आहे.
>> या दोन ओळींच्या मध्ये लिहिलेलं सत्य हेच आहे, की संघ पुरुषांना उच्च समजतो, आणि स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन.
-- पुरुषांना उच्च समजायचा आणखी एक (चुकीचा) अर्थ. संघाचा संपूर्ण भार संस्कार देण्यावर आहे... आणि संस्कार देण्याचं काम घरातली स्त्रि जास्त उत्तम करु शकते ये संघाला निश्चित समजतं. शिवाय बाल संगोपन आणि घर सांभाळणे - स्वयंपाक घर खासकरुन- हे आपल्या करता जरी "इतर काम" क्षुल्लक असले तरी याच दोन घटकांवर कुटुंब-समाज-राष्ट्राचा गाडा सावरु शकतो, तेंव्हा ते इतकं हलक्या प्रतिचं नाहि असं वाटण्यास जागा आहे. माणासाची प्रथम शाळा त्याचं घर असतं आणि स्वयंपाक घर हे (निदान मध्यम आणि कनिष्ठ वर्गीयांसाठी) पैसा, आरोग्य, सामाजीक संबंध सांभाळाण्याचं महत्वाचं व्यासपीठ आहे. असो.
अर्धवटराव
12 Jan 2013 - 10:39 am | राजेश घासकडवी
स्वयंस्वीकृत जबाबदारी ही संघाने घेतलेली आहे यात वादच नाही. पण अशी जबाबदारी घेण्यासाठी जे कार्यकर्ते निवडलेले आहेत ते फक्त पुरुष असले पाहिजेत अशी अट आहे. ती अट इतकी महत्त्वाची आहे की ती घटनेमध्येच अंतर्भूत केलेली आहे. त्यावरून काय बोध घ्यायचा? जाहीर भाषणांपेक्षा लिखित घटना, आणि ती पाळण्याची कसोशी अधिक स्पष्टपणे बोलते.
12 Jan 2013 - 10:53 am | अर्धवटराव
क्लॅरीटी ऑफ थॉट्स म्हणतात त्याला. "जबाबदारी देणे" हि फार जबाबदारीने करायची गोष्ट आहे.
अर्धवटराव
12 Jan 2013 - 10:55 am | मृत्युन्जय
आरएसएस चीच महिला स्वयंसेविका संघ ही एक शाखा देखील आहे हे गुरुजींना कदाचित माहिती नसावे. संघाने महिलांना चळवळीतुन वगळले नसुन त्यांची केवळ एक वेगळी शाखा आहे एवढेच.
जसे भावे हायस्कूल ही फक्त मुलांची शाखा आहे. म्हणुन काय भावे हायस्कूल मुलींना दुय्यम दर्जाचे मानते आणि त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारते असे मानावी की काय? तसेच हुजुरपागा केवळ मुलींची शाळा आहे म्हणुन ती शाळा पुरुषांना दुय्यम दर्जाची मानते आणि त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारते असे म्हणावे की काय?
12 Jan 2013 - 11:25 am | राजेश घासकडवी
हे सेपरेट बट इक्वल डॉक्ट्रीन वाटतं.
आणि 'महिला स्वयंसेविका संघ'? तुम्हाला 'राष्ट्रीय सेविका समिती' म्हणायचं आहे का?
"Laxmibai Kelkar was the founder of Rashtra Sevika Samiti. Before starting the organization she visited Dr K.B. Hedgewar in 1936 and had a long discussion with him to convince Dr Hedgewar about the need for starting a ladies wing in Rashtriya Swayamsevak Sangh itself, but Dr Hegewar refused." (विकीपेडिया)
समितीच्या साइटवर हे सापडलं.
Women constitute the very backbone of the family. They simultaneously play multiple roles: Caring-providing nutrition, nursing, maintaining hygiene and sanitation, taking care of ecology, bringing up children, and a host of other roles......All the above mentioned duties of a women could be summarized in a single word “Matrutva” (Enlightened Motherhood)
थोडक्यात घरकाम, बालसंगोपन, स्वच्छता आणि मातृत्व.
आणि हो प्रमिला मेढेंच्या मते या बलात्कार वगैरे घटना भारतातच घडल्या आहेत. इंडिया असा शब्द वापरलेलाच नाही त्यांनी. :)
12 Jan 2013 - 11:58 am | पैसा
त्यंच्या उद्देशांमधे फक्त मातृत्व नाही तर कर्तृत्व आणि नेतृत्व हे सुद्धा यात अंतर्भूत आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे उपाय शिकवणे असणि इतर अनेक गोष्टी आहेत. महिलांना कोणत्याही प्रकारे कमी दर्जा आणि रा स्व संघाचे पुरुषी वर्चस्व नाही तर महिलांचे स्वतंत्र नेतृत्व या संस्थेत आहे. हे सगळे मी फक्त वाचून आणि ऐकून लिहिते आहे. कारण माझ्या डोळ्यावर कोणताही चष्मा नाही. मी राष्ट्र सेविका समितीशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. असलेच तर मी ज्या कर्मचारी युनियनचे काम करते त्यांच्या पेरेंट कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित आहे. पण कोणालाही गैरसमजातून नावे ठेवली जाऊ नयेत, कारण इथे राष्ट्र सेविका समितीची बाजू मांडायला कोणी येण्याची शक्यता नाही. ती अत्यंत लो प्रोफाईल संघटना आहे. गाजावाजा न करता महिलांना सबल करण्याचे काम ही संस्था गेली कित्येक वर्षे करत आहे याबद्दल महिला मुक्तीवाल्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे.
12 Jan 2013 - 12:46 pm | राजेश घासकडवी
समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट समिती' पानावर फक्त मातृत्वाचा उल्लेख आहे.
उद्देश नावं ठेवण्याचा नव्हता. सरसंघचालकांची विधानं काय आहेत याचा विकास यांनी अत्यंत समर्पक आढावा घेतला आहे. त्याच अनुषंगाने तात्विक भूमिका काय आहे याचा ऊहापोह चालू होता. समिती लो प्रोफाइल आणि संघ हाय प्रोफाइल, यातच बरंच काही दिसून येत नाही का?
स्त्री-मुक्तीला समितीने दिलेलं योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल. संघाप्रमाणे समितीची घटना आहे का?
12 Jan 2013 - 2:09 pm | पैसा
http://rashtrasevika.org/about-us/ideals-for-women/ इथे इतर गोष्टी पहायला मिळतील.
http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Sevika_Samiti
मला वाटते संघाचे काम सुद्धा आवाज न करता चालू असते. त्यांना बरीवाईट प्रसिद्धी मिळते ती इतरांकडूनच.
याबद्दल मी आधीच लिहिले आहे की मी कोणत्याही प्रकारे रा.से.स. शी संबंधित नाही. पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांना जवळून ओळखते. या सर्वच्या सर्व महिला घर संसार, मुले, नोकरी, समितीचे काम सांभाळून इतर सामाजिक कार्यांत उत्साहाने भाग घेत असतात. अतिशय सुसंस्कृत, चतुरस्त्र, आणि तडफदार असे प्रभावी व्यक्तिमत्व असेच मी सगळ्यांचे वर्णन करीन. त्यांच्यावरून समितीमधे घरकोंबड्या बायका तयार करत नसावेत हा माझा अंदाज. पण तरीही त्यांच्यापैकी एखादीकडून समितीच्या कार्याबद्दल लेख मिळवायचा नक्कीच प्रयत्न करीन.
या लेखाच्या विषयाला सोडून फारच अवांतर होत आहे. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.
12 Jan 2013 - 11:12 am | विकास
||| म्हणजे संघाची उदात्त ध्येयं साध्य करण्याची परवानगी संघ स्त्रियांना देत नाही. या दोन ओळींच्या मध्ये लिहिलेलं सत्य हेच आहे, की संघ पुरुषांना उच्च समजतो, आणि स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. |||
असं दिसतयं की तुम्हाला रा.स्व. संघा प्रमाणेच राष्ट्रसेवीका समिती देखील आहे ह्याची कल्पनाच नाही. :( या राष्ट्रसेवीका समितीच्या संस्थळावर लिहील्याप्रमाणे:
आता कदाचीत तुम्ही असे म्हणाल की राष्ट्र सेवीका समिती पुरूषांना का येऊ देत नाही म्हणून... पण संघ आणि समिती त्यांच्या समान ध्येयाबाबत सुस्पष्ट आहेत. त्याच बरोबर त्यांना स्त्री-पुरूष ह्यांच्यासाठी स्वतंत्र संघटना काढणे योग्य वाटले हा त्यांचा त्यांच्या संघटनेसाठीचा निर्णय होता.
आता राहता राहीला स्त्री-पुरूष समानतेचा मुद्दा... या बाबत केवळ ध्येयपुर्तीसंदर्भातच समानता नव्हती तर सध्याच्या काळात जे काही स्त्रियांच्या बाबतीत अन्याय होत आहेत त्यावरून संघाच्या प्रतिनिधी सभेत (ज्यात राष्ट्रसेवीका समितीच्या सरसंचालीका पण हजर असतात आणि त्यांना देखील सरसंघचालकांचाच मान मिळतो) २००८ ला "Dignity of Women" ठराव संमत करण्यात आला. त्यातील काही भागच खाली देत आहे. उरलेला खरच अभ्यास करायचा असेल तर येथे अवश्य संपूर्ण वाचा.
||| आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन. अर्थातच संघाने हे कुठे जाहीर म्हटलेलं नसल्याने तशी बातमी देणं तांत्रिकदृष्ट्या चूकच होईल. |||
इथेच तर गोच झाली. कारण ते पाश्चात्य संस्कृतीबद्द्ल ते म्हणत होते. आता कदाचीत ते देखील तुम्हाला माहीत असण्याची शक्यता नाही, तेंव्हा खाली कॉर्नेल विद्यापिठाच्या लॉ डिपार्टमेंटच्या संस्थळावर मिळालेली माहीती देतो:
12 Jan 2013 - 11:47 am | राजेश घासकडवी
टीका विधानांबद्दल नव्हतीच. मूलभूत विश्वासांबाबतच होती.
त्याबद्दलही वाद नाही. स्वयंसेवकांनी राष्ट्राचा उद्धार करायचा आणि सेविकांनी मातृत्वावर लक्ष केंद्रित करायचं याबाबत त्यांचं एकमत आहेच असं दिसतं. (वर उद्धृत केलेला परिच्छेद वाचावा) सेविकांसाठी 'सुजाण मातृत्व' हे पहिलं ध्येय. स्वयंसेवकांसाठी राष्ट्रोद्धार. आय रेस्ट माय केस.
असो. कुठच्या संघटनेने काय ध्येयं ठेवावी ही त्यांची मर्जी. ठराव काहीही करता येतात पण प्रत्यक्ष वागणूक काय असते ती दिसते. शतकांपूर्वीची, आता कालबाह्य झालेली पितृसत्ताक मूल्य संघ कवटाळून बसला आहे असं मला दिसतं. मला दिसलं ते मी मांडलं. कदाचित तुमचंच म्हणणं बरोबर असल्याची तुम्हाला खात्री असेल. चला, सोडून देऊ इथेच.
12 Jan 2013 - 7:42 pm | विकास
>>>आय रेस्ट माय केस. <<<
बिनबुडाची केस असली की ती रेस्ट होत नाही तर डिसमिस होते. असो.
>>>टीका विधानांबद्दल नव्हतीच. मूलभूत विश्वासांबाबतच होती. <<<
ते आता काही म्हणा, पण टिका ही अभ्यास न करता होती. "....स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन...." असल्या वाक्यांतून ते स्पष्ट होते.
आधी समिती माहीत पण नव्हती, मग म्हणायचे ते लो की प्रोफाईल आहे. ज्यात परत बाकी काही नाही पण, माफ करा, फक्त परत परत वर्षानुवर्षे द्वेषाने पसरवलेल्या विचारांचा प्रभाव आणि त्याला आंधळेपणाने खरे मानण्याचा प्रकार दिसला. अभ्यास दिसला नाही.
12 Jan 2013 - 9:47 pm | राजेश घासकडवी
समिती माहीत होती. दोन्हींच्या स्थापनांचा इतिहासही माहीत आहे. संघाची घटना व त्यावरची कॉमेंटरीही वाचलेली आहे. समितीच्या वेबसाइटवर जाऊन तिथेही काय सापडतं ते पाहिलं. इतकं सगळं करूनही अभ्यास नाही म्हणणं चुकीचं वाटतं.
असो. मुद्दे संपलेले दिसतात, तेव्हा मूळ विषय सोडून ऍड होमिनिम ऍटॅक्सना उत्तरं देण्याऐवजी मी या चर्चेला पूर्णविराम देतो.
12 Jan 2013 - 10:12 pm | पिंपातला उंदीर
साहेब पुढची चर्चा वाचली तर कळेल की या so called स्वयंसेवकाना फक़त भावनिक आवाहन देऊन चर्चा करता येतात. फॅक्ट्स द्या म्हणाले की वैयक्तिक हल्ले सुरू होतात. अती उजव्या विचारसरणीची लक्षण. नाझी असोत वा बजरंग दलाला पाठिंबा देणारे ..
12 Jan 2013 - 11:08 pm | अर्धवटराव
>>so called स्वयंसेवकाना फक़त भावनिक आवाहन देऊन चर्चा करता येतात.
-- एकदम पर्फेक्ट मुद्दा. कुठल्याही नैसर्गीक आपत्तीच्या काळात स्वयंसेवक केवळ भावनीक आहावन करतात आणि मदत कार्य आपोआप हवेतुन होऊन जाते... आहे कि नाहि गंमत :)
>>फॅक्ट्स द्या म्हणाले की वैयक्तिक हल्ले सुरू होतात.
-- अगदी बरोबर. जगात इंटरनेट नावाची गोष्ट आहे, थोडं सर्च मारलं तर संघाच्या कामांविषयी भरपूर माहिती मिळते.. अगदी फॅक्ट्स वगैरे. पण कशाला तेव्हढे कष्ट घ्यायचे.
>>नाझी असोत वा बजरंग दलाला पाठिंबा देणारे ..
-- जे ब्बात. असल्या लोकांच्या मुसक्या बांधल्या पाहिजे. बाकी संघ आणि त्याच्या प्रेरीत संघटनांचं जाळं जर देशभरात उभं राहिलं नसतं तर मागे जे आझाद मैदानावर झालं ते आपल्या प्रत्येकाच्या घरात झालं असतं, आणि ते ही २१व्या शतकाची वट न बघता... पण हि बाब किरकोळ आहे.
अरे हो.. ते कोकणास्थ वगैरे मुद्दे राहिले... कसय ना राव, असं आडवळणाने जाण्यापेक्षा सरळ सरळ ब्राह्मण म्हणुन विचारलं असतं तर मिपाकरांना तेव्हढाच खुराक मिळाला असता चघळायला. असो. तर काय म्हणत होतो कि, मलाहि हाच प्रश्न पडला होता गणिताच्या बाबतीत.. कि पहिल्य दहा आकड्यात २ अंकी संख्या का नाहि येत ते. थोडी मदत कराल काय ?
अर्धवटराव
13 Jan 2013 - 11:00 pm | आशु जोग
मग तू चालू कर नवे संघटन तुला हवे तसे...
हे लिखाण म्हणजे अगदीच हे आहे
12 Jan 2013 - 6:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एका संघसमर्थकाकडून (त्याच त्या फेसबुकावर) मिळालेल्या भागवतांच्या भाषणातली ही काही वाक्य:
प्रसारमाध्यमांचा निषेध. भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा यावरून त्यांना व्यवस्थित कोंडीत पकडता आलं असतं. पण भागवत वाट्टेल ते बरळले तरीही वर पुन्हा त्यांचीच माफी मागण्याची वेळ आली. आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत.
12 Jan 2013 - 8:03 am | अर्धवटराव
तुम्हाला भागवतांमध्ये तर्कहीनता आणि विज्ञानद्वेष्टेपणा कुठे दिसला? कुठेही दोन चार ओळी वाचुन उगाच मतं बनवायची याला तर्क आणि विज्ञानाचं कुठलं अधिष्ठान आहे? आणि वरुन स्त्रिद्वेष्टेपणा ??? इतिहास आणि वर्तमानाच्या मर्यांदा सांभाळुन राष्ट्रनिर्मीतीचं उद्देशाने काम करणार्या एका संघटनेला, तिच्या प्रमुखाला, सो कॉल्ड स्त्रि-पुरुष समानतेचं विजोड अस्तर लावण्यात काय हाशिल??
अर्धवटराव
15 Jan 2013 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वाक्यात विज्ञानद्वेष्टेपणा पुरेपूर आहे. विज्ञानद्वेष नसेल तर अज्ञान आहे.
प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही, ती माणसाच्या अस्तित्त्वाच्याही आधीपासून आहे आणि मानव त्याचा एक भाग आहे. 'सबकुछ देनेवाली माता'च असेल तर मग वडलांचं काय? वडलांचा शुक्राणू न वापरता बनलेला फक्त माईचा लाल (किंवा लाली) कोणी आहे का?
या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे. "हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " काही स्त्रियांना माता समजणं वगैरे ठीक आहे. सर्व स्त्रियांना माता समजणं योग्य आहे का? वडील, वडीलधारे, मित्र, नवरा, भाऊ अशी काही नाती स्त्रियांच्या बाबतीत अस्तित्त्वात नसतातच का? विशेषतः मित्र वगैरे नाती असणं (ज्याकडे पारंपरिक लोकं fishy नजरेने बघतात) भागवतांच्या (अ?)ज्ञानकोषात अस्तित्त्वातच नाही का?
एकंदर स्त्रिया कशा महान, थोर वगैरे म्हणताना त्याही मनुष्यच आहेत, सामान्य मनुष्यांना असणारे राग, लोभ, वगैरे भावना त्यांनाही असणार हे विसरून सरसकटीकरण केलेली भावनिक आवाहनं करणार्यांना स्त्रीद्वेष्टे म्हणायचं नाही तर काय? एकीकडे स्त्रियांवर बलात्कार करताना त्यांच्या नकाराधिकाराचा संकोच करणारे जसे रोगट वृत्तीचे समजले जातात, तसे त्या वृत्तीला विरोध करताना दुसर्या टोकाला जाऊन स्त्रिया देवी असतात टायपातला बिनबुडाचा बकवास करणार्यांनाही स्त्रीद्वेष्टे का समजू नये?
त्यातून कोणा सामान्य स्वयंसेवकांनी अशी बडबड केली (जे भरपूर करतात याची प्रत्यक्ष आयुष्यातल्या स्वानुभवातून कल्पना आहे.) तरी दुर्लक्ष करता येतं. पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं.
---
समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे.
सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक, प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं.
पण या गोष्टींबद्दल भागवत सध्या बोललेले नाहीत. तेव्हा हे अवांतरच आहे.
15 Jan 2013 - 10:45 pm | श्रीगुरुजी
बापरे! आपला हा वरचा प्रतिसाद वाचून हतबुद्ध झालो.
"या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे."
सरसंघचालकांनी आपल्या वाक्यांतून स्त्रीचा गौरव केलेला आहे. त्यात एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल तर कोणाल अज्ञान वाटेल. पण यात स्त्रीद्वेष कुठे दिसला तुम्हाला?
"पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं."
माध्यमे कुठे शांत आहेत? सरसंघचालक जी वाक्ये म्हटलेच नाहीत ती वाक्ये त्यांच्या तोंडात घालून व त्यांना त्याबद्दल झोडपून माध्यमांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावलेच ना!
"सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक,"
हे कोणी सांगितलं तुम्हाला?
"प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं."
माझ्या माहितीतल्या आणि ओळखीच्या अनेक संघस्वयंसेवकांपैकी कोणीही आणि कधीही अशी वागणूक केलेली नाही. त्यांच्याविषयी "लाज बाळगत नाहीत" असे लिहिणे अत्यंत अयोग्य आहे.
"या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे."
सरसंघचालकांच्या विधानात अजिबात स्त्रीद्वेष दिसलेला नाही. किंबहुना आपल्या विधानातून त्यांनी महिलांचा गौरवच केलेला आहे. पण आपल्या संघाविषयीच्या अज्ञानातून सरसंघचालकद्वेष आणि संघद्वेष आलेला आहे हे नक्की.
16 Jan 2013 - 12:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अजून एक मागच्या प्रतिसादात लिहायचं राहिलं. स्त्रिया वस्तू नाहीत हे ठीक आहे. पण भोगावर कशाबद्दल आकस? भोगाशिवाय मातृत्त्व म्हणजे बलात्कार (किंवा शरद जोशींच्या 'इंडिया'तले लोक करू शकतात ती कृत्रिम गर्भधारणा, सरोगेट मातृत्त्व) हे भागवतांना समजत नसेल तर त्यांना सामाजिक शास्त्राबद्दलही माहिती नाही असं म्हणावं लागेल.
सिमोन दी बोव्व्हार, आणि मराठीत करूणा गोखले, मंगला आठलेकर इत्यादींनी लिहीलेलं स्त्रीवादी लिखाण वाचल्यास हा मुद्दा स्पष्ट होईल. इथे अवांतराच्या भीतीपोटी लिहीत नाही.
संघ ही संघटना (माझ्या माहितीप्रमाणे) स्वतःला सामाजिक काम करणारी संघटना समजते. आणि तिथे स्त्रियांना प्रवेश नाही. आणखी स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नसावी.
ही लाज जे स्वयंसेवक असे वागतात त्यांना वाटणं अपेक्षित आहे, अन्य लोकांना कशाबद्दल?
तुम्ही नशीबवान आहात कारण रविवारी सकाळी-सकाळी तुमच्या(च तीर्थरूपांच्या) घरी येऊन कोणी तुमची झोपमोड केली नाही, आईला चहा-पोह्यांच्या ऑर्डरी दिल्या नाही आणि वर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या थोर भारतीय परंपरेवर लेक्चरही दिलेलं नाही. आठवतं तेव्हापासून असे अनेक अनुभव मला आलेले आहेत. कॉलेजमधे वगैरे असताना भारतीय पोशाखाचं महत्त्व, मुलींनी कसं शालीन, गृहकृत्यदक्ष असावं वगैरे वगैरे भरपूर बकवास मी ऐकून घेतलेला आहे. अवांतराच्या भयास्तव संघ स्वयंसेवकांच्या उठवळ वर्तनाच्या स्वत: पाहिलेल्या आणखी "मनोरंजक" गोष्टी सांगत नाही.
अरे हां, स्त्रिया "प्रकृतिच्या निर्मात्या" वगैरे असल्यामुळे त्यांनी या उठवळ स्वयंसेवकांना क्षमा करावी अशी भागवतांची अपेक्षा असेल तर सॉरी! मी पण मनुष्य आहे आणि राग, लोभ वगैरे भावना मलाही तेवढ्याच आहेत जेवढ्या माझ्या आजूबाजूच्या इतर लोकांना आहेत. फक्त काही लोकं जन्मतः ठराविक प्रकारची गुणसूत्रं घेऊन येतात म्हणून ते महान (किंवा क्षुद्र) असं जे भागवत मानतात तसं काही मी मानत नाही.
---
मला (ठाण्यात) समितीचा असणारा प्रत्यक्ष अनुभव एक दिवसाचा, माझ्या बालपणीचा आहे. (तिथे मला पाठवणं म्हणजे माझा वेळ फुकट घालवणं आहे हे नशीबाने तेवढ्यातच आमच्या मातोश्रींना लक्षात आलं.) पण समितीमधे कार्यरत असणार्या एक अलिकडेच फेसबुकावर भेटल्या. (त्या बहुदा पुण्याच्या आहेत.) त्यांनाही समितीच्या राजकारण, समाजकारणातील सहभागाबद्दल प्रश्न विचारले. "अशा प्रकारच्या कामांमधे आपण का नसावं?" असे प्रश्न त्यांनी समितीमधे विचारले; याचा परिणाम म्हणून अन्य समितीसदस्यांनी त्यांना वाळीत टाकलं, अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडूनच आलं.
16 Jan 2013 - 8:53 pm | ईन्टरफेल
१००+
17 Jan 2013 - 1:00 am | विश्वनाथ मेहेंदळे
चिविंची एक गोष्ट आहे, त्यात एका 'विद्वानांनी' एकच संस्कृत नाटक वाचलेले असते आणि संदर्भ सोडून प्रत्येक ठिकाणी ते त्याच नाटकाचा संदर्भ देत असतात. तुमचे काही प्रतिसाद वाचताना सतत त्या कथेची आठवण येते.
असो, बाकी राहू देत सगळे, सध्या इतकेच की तुमचे प्रतिसाद भयानक विनोदी असतात कधी कधी. मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे.
17 Jan 2013 - 3:25 pm | पुण्याचे वटवाघूळ
+१.
20 Jan 2013 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> बाकी राहू देत सगळे, सध्या इतकेच की तुमचे प्रतिसाद भयानक विनोदी असतात कधी कधी. मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे.
विमेशी मिपावर एवढ्यात सहमत व्हावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं.
[फक्त कधी कधी च्या ऐवजी 'नेहमीच’ असा शब्द हवा होता]
-दिलीप बिरुटे
22 Jan 2013 - 5:06 pm | मदनबाण
फक्त इतकेच म्हणु शकतो...
हॅ हॅ हॅ... ;)
विमे इथे विनोदाची कमी नाही हो...
माधुरी दिक्षित चांगली अभिनेत्री नाही असा मोठा विनोद मी मिपावर पहिल्यांदाच वाचला होता...आणि खो खो खो असे मोठ्यांदा हसलो होतो,तरी नशिब खुर्ची धरुन ठेवली होती... नाही तर "तोल" गेला असता माझा ! ;)
जुन्या आणि नविन सदस्यांच्या "मनोरंजनासाठी" परत माझा आठवणीतला धागा देतो कसा !
http://www.misalpav.com/node/19208
या धाग्यातले बरेचसे प्रतिसाद मि.इंडिया झाल्याने धाग्यातली मूळ मजा आता कमी झाली आहे !
@ प्रा.डॉ
आपण सुचवलेल्या बदलाशी मी "प्रचंड" "सहमत" आहे. ;)
@ निलकांत
अरे निलकांता जुन्या धाग्यांचे संदर्भ देणे किती मजेशीर असते बघ... पण हल्ली अश्या धाग्यांची पाटी पुसलेलीच दिसते ! मग आम्ही जुने धागे का उकरावेत? काही तरी करा की राव !
19 Jan 2013 - 5:57 pm | विटेकर
कृपया " उठ्वळपणाची" व्याख्या सांगावी.आणि कोणत्या स्वंयसेवकांनी काय काय उठवळपणा केला हे ही सांगावे. आता मनोरंजक आणि येथे अवांतर असेल तर नवीन धागा काढावा ..
आपण " स्वयंसेवक " हा शब्द वापरला आहे , त्याद्वारे एका समूहाचे प्रतिनिधित्व होते, आपला रोख एखाद्या व्यक्तिवर आहे की पूर्ण समूहांवर ? एखादी भगिनी विक्षिप्त आहे म्हणून सारयाजणी विक्षिप्त आहेत असे विधान करता येईल का ?
बाकी एका इंग्रजी म्हणीची आठ्वण आली..
When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty !
हा उपमा अलंकार आहे, तुम्हाला पिग म्हंट्लेले नाही !
16 Jan 2013 - 1:03 am | अर्धवटराव
>>या वाक्यात विज्ञानद्वेष्टेपणा पुरेपूर आहे. विज्ञानद्वेष नसेल तर अज्ञान आहे
-- विज्ञान कशाला म्हणावं याचा अत्यंत लघु दृष्टीकोन ठेवल्यामुळे असं तुम्हाला वाटतं. मुळात विज्ञानाचा परिघ फार विषाल आणि खोल आहे. तुम्ही तुमच्या "माहितीला" ज्ञान म्हणत असाल तर इतर प्रत्येक गोष्ट अज्ञान वाटणं स्वाभावीक आहे. अभिजनांनी ज्ञानाचे, कलेचे क्षेत्र आपल्याच व्याख्येने ठरवणे हे यात नवल ते काय .
>>प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही, ती माणसाच्या अस्तित्त्वाच्याही आधीपासून आहे आणि मानव त्याचा एक भाग आहे. 'सबकुछ देनेवाली माता'च असेल तर मग वडलांचं काय? वडलांचा शुक्राणू न वापरता बनलेला फक्त माईचा लाल (किंवा लाली) कोणी आहे का?
-- मनुष्य एका अर्थाने प्रकृतीच्या निर्माण शक्तीचं आणि ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे, प्रकटीकरण आहे. वडिलांचा शुक्राणुच कशाला, अगदी इतर कुठलीच बाह्य मदत न घेता देखील सृजनशक्ती आपलं काम नीट करु शकते. 'सबकुछ माता'च समजणं या आदरार्थी, काव्यात्मक भावाला शुक्राणुच्या कसोटीवर तपासणं म्हणजे गणिताच्या प्राध्यापकाने राग - रागिण्यांना आपल्या इक्वेशन मध्ये बसत नाहि असं म्हणणं... "भारतमाता" म्हणजे एका जमिनीच्या तुकड्याने मनुष्याला जन्म दिला असं म्हणाअयचं असतं का कोणाला?
>>या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे.
-- काहिही संबंध नाहि.
>>"हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " काही स्त्रियांना माता समजणं वगैरे ठीक आहे. सर्व स्त्रियांना माता समजणं योग्य आहे का? वडील, वडीलधारे, मित्र, नवरा, भाऊ अशी काही नाती स्त्रियांच्या बाबतीत अस्तित्त्वात नसतातच का? विशेषतः मित्र वगैरे नाती असणं (ज्याकडे पारंपरिक लोकं fishy नजरेने बघतात) भागवतांच्या (अ?)ज्ञानकोषात अस्तित्त्वातच नाही का?
-- जर कोणाला स्त्रीयांमध्ये प्रकृतीच्या अलौकीक सृजन शक्तीचा वावर अत्यंत आदरणीय वाटत असेल तर ते वाईट आहे ? "सर्व स्त्रीयांना माता समजणं" याचा शब्दशः अर्थ काढतो म्हटलं तर तसं समजणं काहि स्त्रियांच्या बाबतीत देखील शक्य नाहि मग सर्व स्त्रियांच्या बाबतीत काय बात. आपली घटना समता, बंदुता तत्वांना सर्वोच्च मानते. आपल्या प्रतिज्ञेत "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं वाक्य आहे... म्हणुन भारत सरकारने लग्नांवर बंदी आणावी काय? किंवा प्रत्येकाची मालमत्ता अगदी देशभराच्या लोकांमध्ये समसमान वाटुन टाकायची काय? (जनरली) माणासाला सर्वात आपुलकीचं नातं त्याच्या आईबद्दल वाटतं. स्त्रीयांच्या बाबतीत जर कधी निगेटीव्ह भावना आलि, तसा प्रसंग आला, तर या आपुलकिच्या भावनेला एक चान्स द्या असा अर्थ आहे "सर्व स्त्रियांना माता समजा" या वाक्याचा... अर्थात, कुणि कुठल्या वाक्याचा काय अर्थ काढावा हि ज्याची त्याची समज.
>>एकंदर स्त्रिया कशा महान, थोर वगैरे म्हणताना त्याही मनुष्यच आहेत, सामान्य मनुष्यांना असणारे राग, लोभ, वगैरे भावना त्यांनाही असणार हे विसरून सरसकटीकरण केलेली भावनिक आवाहनं करणार्यांना स्त्रीद्वेष्टे म्हणायचं नाही तर काय?
-- सरसकटीकरण केलेली भावनीक आवाहनं "बाय अॅण्ड लार्ज पॉलिसी स्टॅण्ड" असतात. त्यात द्वेष कुठुन आला? "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं म्हणायला लावणारं भारत सरकार माझ्या वडिलोपार्जीत संपत्तीचा द्वेष करते असं म्हणावं काय?
>>एकीकडे स्त्रियांवर बलात्कार करताना त्यांच्या नकाराधिकाराचा संकोच करणारे जसे रोगट वृत्तीचे समजले जातात, तसे त्या वृत्तीला विरोध करताना दुसर्या टोकाला जाऊन स्त्रिया देवी असतात टायपातला बिनबुडाचा बकवास करणार्यांनाही स्त्रीद्वेष्टे का समजू नये?
-- "देवी" हि बिनभावनेची, सुख-दु:खापलिकडली, रबर-काष्ठ-पाषाणाची अशी काहि तरी वस्तु आहे हेच चुकीचं तत्वज्ञान आहे. हलाहल प्राशन करणारा शिव, माजलेल्या दैत्यांचं रक्त घटाघट पिणारी जगदंबा, १८ औक्षहिणी सैन्याचा रणयज्ञ मांडणारा श्रीकृष्ण, लेखनादी कार्यात अत्यंत रमणाण होऊन लग्न-संसार वगैरेचं भान विसरलेली शारदा, हे माणसाच्या कमाल क्षमतांना केलेली आवाहनं आहेत. इतकं प्रचंड मनुष्यपण उपभोगणं, अॅट्लिस्ट ते भोगायचा प्रयत्न करणं राहिलं एका बाजुला... त्यात द्वेष्टेपणा शोधावा?
>>त्यातून कोणा सामान्य स्वयंसेवकांनी अशी बडबड केली (जे भरपूर करतात याची प्रत्यक्ष आयुष्यातल्या स्वानुभवातून कल्पना आहे.) तरी दुर्लक्ष करता येतं. पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं.
-- त्या संघटनेच्या सर्वेसर्वाची वैचारीक बैठक किती खोल आहे, त्याला समाजमनाचं किती भान आहे, स्विकारलेल्या जबाबदारीचं त्याला किती मुल्य आहे... याचा काहिही विचार न करता असं एकदम स्त्रीद्वेष्टा वगैरे ठरवणं हे पेड न्युज देणार्या चॅनलवाल्यांना शोघतं... विचार करु शकणार्या सामान्य माणासाने तरी थोडा विवेक दाखवावा.
>>समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे.
-- त्याच संघटनेने प्रेरीत दुर्गावाहिनी मुलींना काय शक्तीवान बनवते हे देखील पाहाण्यासारखं आहे. तसं मला समितीच्या कार्यपद्धतीविषयी काहि कल्पना नाहि. पण एखाद्या संस्थेने आपली कार्यपद्धती पुरुषप्रधानतेने ठरवली असेल तर त्यात स्त्रीद्वेष्टेपणा दिसण्यात काहि अर्थ नाहि...(आपले सैन्यदल सुद्धा थोडंफार त्याच पद्धतीने कार्य करते)
>>सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक...
-- अत्यंत बिनबुडाचा आरोप एव्हढंच म्हणेल याविषयी. असो.
>>...प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं.
-- आमच्याकडे कोणि असं आलं तर आम्हि त्याला आपुलकी म्हणतो कोडगेपणा नाहि. हेच स्वयंसेवक घरदार सोडुन संघटनेच्या कामाप्रित्यर्थ वर्षोनवर्षे अनोळखी प्रदेशात घालवतात, वार लावुन जेवतात, असाहि अनुभव आहे.
असो.
अर्धवटारव
16 Jan 2013 - 1:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद.
16 Jan 2013 - 1:49 am | अर्धवटराव
"पुरुषप्रधानतेने"चा अर्थ "प्राधान्याने पुरुषांनाच करायला दिलेली कार्ये" असा न धरता "पुरुष श्रेष्ठ आहेत" असा घेतला असेल तर विशेष धन्यवाद.
अर्धवटराव
16 Jan 2013 - 1:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की उपरोल्लेखित अर्थांपैकी कोणताही अर्थ तेवढाच (नि:)उपयुक्त ठरतो.
16 Jan 2013 - 1:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की उपरोल्लेखित अर्थांपैकी कोणताही अर्थ तेवढाच (नि:!)उपयुक्त ठरतो.
16 Jan 2013 - 1:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तो शब्द निरुपयुक्त असा वाचणे.
16 Jan 2013 - 2:00 am | अर्धवटराव
मुल्यांनाच कार्यपद्धती बनवायचा अट्टहास धरुन कार्यनाश करायचा कि मुल्याधिष्ठीत कार्यपद्धती ठेऊन कार्यभाग साधायचा हा इंडीव्हिज्युअल कॉल आहे.
अर्धवटराव
17 Jan 2013 - 2:03 pm | कवितानागेश
लिंगसमानता म्हणजे नक्की काय काय अभिप्रेत आहे?
बर्याच गोष्टीत एकसारखी ताकद असलेले पण काही वेगळी आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेले बहुतेक सगळ्या प्राण्यामध्ये दिसणारे निसर्गनिर्मित २ प्रकारचे परस्परपूरक जीव नेहमीच 'समान' नसतात.
..............
आणि याचा प्रसारमाध्यमांच्या अप्रामाणिकपणाशी काय संबंध?
भागवत चुकले की नाही, यापेक्षा प्रसारमाध्यमे नेहमीच या लोकांच्या बाबतीत का चुकतात, हा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे.
16 Jan 2013 - 12:29 pm | श्रीगुरुजी
अर्धवटराव,
आपल्या अत्यंत समर्पक व सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! परंतु हे विवेचन काही जणांच्या बाबतीत 'पालथ्या घड्यावर पाणी' एवढीच सदिच्छा.
16 Jan 2013 - 12:34 pm | श्रीगुरुजी
"परंतु हे विवेचन काही जणांच्या बाबतीत 'पालथ्या घड्यावर पाणी' एवढीच सदिच्छा." हे वाक्य पूर्ण लिहिण्याच्या आधीच सेव्ह झाले.
"परंतु हे विवेचन काही जणांच्या बाबतीत 'पालथ्या घड्यावर पाणी' असे होऊ नये एवढीच सदिच्छा." असे लिहायचे होते.
16 Jan 2013 - 12:42 pm | श्रीगुरुजी
"पण एखाद्या संस्थेने आपली कार्यपद्धती पुरुषप्रधानतेने ठरवली असेल तर त्यात स्त्रीद्वेष्टेपणा दिसण्यात काहि अर्थ नाहि...(आपले सैन्यदल सुद्धा थोडंफार त्याच पद्धतीने कार्य करते)"
काही विशिष्ट क्षेत्रात फक्त पुरूषांनाच प्रवेश असतो. अभियांत्रिकीच्या "खाण अभियांत्रिकी" या अभ्यासक्रमाला मुलींना प्रवेश दिला जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे परिवहन महामंडळ स्त्रियांना चालकाची नोकरी देत नाही. बहुतेक अग्निशामक दलात सुद्धा स्त्रियांना प्रवेश नसतो (चूभूदेघे). अशी उदाहरणे पाहिली तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार स्त्रीद्वेष्टे आहेत असा दावा सहज करता येईल.
18 Jan 2013 - 1:19 pm | क्लिंटन
ही चर्चा मी वाचत होतो पण चार-पाच दिवस बाहेरगावी असल्यामुळे आधी प्रतिसाद देता आला नाही.
रा.स्व.संघ या संघटनेविषयी माझे दोन मुख्य आक्षेप आहेत.एक तर त्या परिवारातल्या संघटना इतक्या विचित्रपणे एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत की म्हणावे तर एखाद्या संघटनेचा एखादा अजेंडा असतो आणि म्हणावे तर नसतो.म्हणजे स्वदेशी जागरण मंचाचा "स्वदेशी" हा आर्थिक कार्यक्रम तर वाजपेयींच्या सरकारचा आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम हे दोन परस्परविरोधी अजेंडे असूनही स्वदेशी जागरण मंच आणि भाजप एकाच संघ परिवाराचे सदस्य एकाच वेळी असू शकतात. तसेच अयोध्या आंदोलन हे विश्व हिंदू परिषद आणि संघाचे तसेच बाबरी पाडली ती बजरंग दलाने असे म्हणत भाजप त्यातून पाहिजे तेव्हा अंग काढून घेऊ शकतो.तेव्हा एकाच वेळी विविध मुखवटे परिधान केले तर पाहिजे तेव्हा अनुकूल मुखवटा सामोरा करता येईल असे गणित असावे का? माझा या परिवाराविषयी हा पहिला आक्षेप आहे.याविषयी दुसरे काही मुद्दे असतील तर ते वाचायला आवडतीलच. दुसरा आक्षेप म्हणजे संघ परिवार मनाने भूतकाळात वावरतो (प्राचीन भारतीय संस्कृती इत्यादी) असे वाटते.जुन्या उज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन भविष्यकाळ उज्वल बनवायचा असेल तर त्यात काही चूक आहे असे वाटत नाही.पण अनेकदा गाडी पहिल्याच भागात अडकते (आमचा भूतकाळ उज्वल होता) आणि पुढे सरकत नाही (भविष्य उज्वल बनविणे).
तरीही संघ स्त्रीद्वेष्टा आहे किंवा केवळ उच्चवर्णीय सरसंघचालक झाले म्हणून संघ जातीयवादी आहे अशा प्रकारची वक्तव्ये अप्रस्तुत आहेत असे मला वाटते. तसेच अनेक संघ स्वयंसेवक निस्वार्थीपणे काम करतात हे बघून माझ्यासारख्या पैशाच्या मागे लागलेल्या पक्क्या मटिरिअॅलिस्ट माणसाला नक्कीच कुतुहल आणि आदर दोन्ही वाटतो हे पण लिहितो.
दुसरे म्हणजे मिडिआचे लोक स्वतःचा टी.आर.पी वाढवायला कसा "ध" चा "मा" करतात याची इतरही अनेक उदाहरणे आहेत. काँग्रेस मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करते हा उजव्या गटाचा दावा नेहमीच असतो. त्या संदर्भात मागे बाळासाहेबांनी म्हटले होते (१९९४-९५ मध्ये इंटरनेट यायच्या आधी तेव्हा या गोष्टीचा आंतरजालिय पुरावा माझ्याकडे नाही)--- जर मुस्लिमांचा मताधिकार काढून घेतला तर काँग्रेस त्यांच्याविषयी अजिबात पर्वा करणार नाही. मिडियामध्ये याचा विपर्यास करून बातमी दिली होती--"बाळासाहेब ठाकरे यांची मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा अशी मागणी"!! तसेच अलीकडेच भाजप नेते रमेश बाएस (वैश्य) यांनी "पूर्ण वाढ झालेल्या स्त्रियांवर बलात्कार होणे समजण्यासारखे आहे" असे म्हटले अशी बातमी आली. त्याचा विपर्यास कसा झाला असावा (माझा तर्क)-- पत्रकारांनी रमेश वैश्य यांना दोन-तीन वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतात त्याविषयी विचारले असावे.त्यावर त्यांचे म्हणणे--"पूर्ण वाढ झालेल्या मुलकडे/स्त्रीकडे बघून बलात्कारी पुरूषांची जी काही भावना (किंवा हवस किंवा जे काही असेल ते) चाळविली जाऊ शकेल पण दोन वर्षाच्या मुलीकडे बघून असे कसे होते हे आश्चर्य आहे". आता यात त्यांनी पूर्ण वाढ झालेल्या मुलींवर्/स्त्रीवरील बलात्काराचे समर्थन केले आहे का?तरीही मिडिया बातमी द्यायला मोकळा की रमेश वैश्य यांनी म्हटले की "पूर्ण वाढ झालेल्या मुलींवर/स्त्रियांवर बलात्कार होतात हे समजण्यासारखे आहे"!! तसेच मध्यंतरी नितीन गडकरींनी म्हटले की "विवेकानंद आणि दाऊद इब्राहिमचा आय.क्यू एकच आहे.विवेकानंदांनी तो चांगल्या कामासाठी वापरला तर दाऊदने वाईट कामांसाठी". यात मला तरी काही चुकीचे वाटले नाही.पण मिडियाची बातमी होती--"नितीन गडकरींनी विवेकानंदांची तुलना दाऊद इब्राहिमबरोबर केली". तेव्हा हे मिडियावाले एखादी गोष्ट कशी विपर्यास करून सांगतील याची काहीही गॅरंटी नाही.
18 Jan 2013 - 3:28 pm | दादा कोंडके
सहमत. मलाही चुकीचे वाटले नाही. पण एकदा राळ उठवून दिली आणि लोकमत तयार झालं की भल्याभल्यांना 'यु' टर्न घेउन माफी मागावी लागते. आणि एकदा माफी मागितली की कायमचा शिक्का बसतो. मला वाटतं आपले पंतप्रधान म्हणूनच तोंड उघडत नाहीत.
18 Jan 2013 - 4:23 pm | गणामास्तर
क्लिंटन यांचा नेहमीप्रमाणेचं संतुलित प्रतिसाद.
19 Jan 2013 - 6:18 pm | विटेकर
छान प्रतिसाद !
19 Jan 2013 - 6:10 pm | विटेकर
सोडून द्या हो.. हे उगाच बाईट वाया घालवण्याचे अनुत्पादक काम आहे.. आपद्धर्म म्हणून करावे लागते एवढेच !
ते तुम्ही छान केले आहे !
16 Jan 2013 - 6:48 am | विकास
सर्वप्रथम, ही चर्चा या चर्चेत अवांतर आहे, ह्या आपल्या मताशी सहमत :-) . कारण मुळ मुद्दा हा माध्यमांनी संदर्भहीन बातमी तयार करून कसे खोटे लिहीले ह्या संदर्भात होता आणि आजही माझ्या दृष्टीने तोच मुद्दा आहे. ते unequivocally मान्य करणे आपल्याला साहजिकच जड गेले आहे... त्यात देखील आपले प्रतिसाद वाचले आणि ३.१४ (अर्थात irrational) वाटले. मराठीत कधी कधी, "कवीला नक्की काय म्हणायचे आहे?" असे अशा लिखाणासंदर्भात म्हणतात, तीच काहीशी अवस्था "शब्द बापुडे केवळ वारा" वाचताना माझी देखील झाली. (पण दुर्लक्ष केले असे वाटायला नको म्हणून उत्तर देत आहे. नाहीतर उद्या ऐकायला वाचायला मिळायचे की फक्त पुरुषांनाच प्रतिसाद दिले म्हणून! ;) ह.घ्या.!!!)
मोहनजींचे संपूर्ण भाषण लिखित स्वरूपात येथे वाचता येईल: डा. मोहन भागवत ने वास्तव में क्या कहा?
प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है। या वाक्यात तुम्हाला नक्की विज्ञानद्वेष्टेपणा कसा दिसला? हे इतके प्रतिसाद दिले तरी मान्य होण्यासारखे एकही कारण नाही. असे (म्हणजे विज्ञानद्वेष्टे) म्हणण्यातच, माफ करा, वैचारीक वाद नाही तर अज्ञान दिसले अथवा अनाठायी द्वेष दिसला, जो तुमच्याकडून अपेक्षित नव्हता.
>> प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही,...
अर्थातच ते माहीत आहे. पण स्त्री ला "प्रकृति की निर्मात्री" अर्थात सांस्कृतिकरीत्या "माता" असे मानण्यात किमान "अदिती" हे नाव असलेल्या व्यक्तीस तरी आक्षेपार्ह वाटू नये असे वाटते. उद्या अगदी अमेरीकन लोकांना पण तुम्ही. "Mother Earth कसे काय म्हणता? मग वडलांचा शुक्राणु कुठला?" वगैरे प्रश्न विचारलात आणि मग पृथ्वीचा द्वेष करता असा अर्थ लावला तर "डं?" असा प्रतिसाद मिळेल. असो.
काही संदर्भ हे सांस्कृतिक असतात. ते प्रत्येक ठिकाणी जसेच्या तसे मानायचे नसतात पण त्यातील मतितार्थ लक्षात आणि आचरणात ठेवण्याची अपेक्षा असते. "परस्त्रीला माते समान मानणे" हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. त्यात देखील तुम्ही संदर्भ दिलेल्या वाक्यात त्यांनी ""हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " (मातृशक्ती, माता असे नाही) असे सुस्पष्ट वाक्य म्हणले आहे. तरी देखील तुम्हाला सांस्कृतिक दृष्टीकोन पटत नसला तर तो तुमचा प्रश्न आहे. कोणी मागे लागलेले नाही... तुमचे देखील सांस्कृतिक अथवा सांस्कृतिक शब्दच मान्य नसला तर इतर दृष्टीकोन असतील जे इतरांना पटतीलच असे नाही. मात्र आपणच तेव्हढे खरे असे म्हणायचे असेल आणि इतरांना तुच्छ लेखायचे असेल तर मग असेच बोलणार्या इतर (लिबरल नसलेल्या आणि) radical वृत्तींपेक्षा वेगळे ते काय?
----------------------
समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे.
आता निव्वळ या धाग्यात मिळालेल्या माहितीवरून तरी अंदाज आला असेल की मी कधी समितीत गेलो नसणार म्हणून. तरी देखील काही प्रश्नांबाबत: समिती हे प्रकरण लो - प्रोफाईल असणे म्हणजे त्यांच्याबद्दल बातम्या (त्या देखील वाटेल तशा) छापून न येणे असे म्हणायचे आहे का? कदाचीत प्रसिद्धी माध्यमे त्यांना केवळ एक स्त्री संघटना म्हणून दुर्लक्ष करत असावीत. भाजपा मधे समितीचे स्थान हा एक विनोदी प्रश्न झाला. कारण त्या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. हे म्हणजे एका संस्थळाचे दुसर्या संस्थळामधे काय स्थान असे विचारण्यासारखेच झाले.
आता तुम्ही नंतरच्या प्रतिसादात स्वत:चा एक दिवसाचा अनुभव आहे आणि एका व्यक्तीने चेपूवर लिहीलेत म्हणून सांगितले. म्हणजे अशास्त्रीय अशा one-point extrapolation वर आधारीत आहे.. तरी देखील असे समजूयात की असतीलही ते खरे, पण त्या विरुद्ध अनुभव आलेले देखील असणारच ना, नाहीतर इतकी वर्षे ती संघटना कशी चालेल? एक संघटना काढून टिकवणे हे काही सगळ्यांना जमते अशातला भाग नाही. इतके वर्षे तर नाहीच नाही. पण त्यांना जमलेले आहे असे दिसतयं. आणि हो त्यातील ज्या काही महीला मी पाहील्या आहेत त्या प्रोफेशनल आहेत, विचारी आहेत, आणि स्वत:च्या घर आणि प्रोफेशनल कामाच्या बाहेर जाऊन समाजासाठी काम करणार्या देखील आहेत. नुसते इतरांना नावे ठेवत चकाट्या पिटणार्या, तुमच्या वरील प्रतिसादाच्या भाषेतच म्हणायचे तर गॉसिपमय नाहीत. असो.
17 Jan 2013 - 4:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
दुर्दैवाने माझं नाव काय असावं यावर, बहुतांश लोकांचा नसतो तसा, माझाही ताबा नव्हता. घरचे, आजूबाजूच्यांनी ज्या नावाने हाक मारायला सुरूवात केली, तेच नाव चिकटलं, तेच इथेही डकवलं. प्रत्यक्ष कागदावरमात्र आमच्या मातोश्रींनी ठेवलेलं माझं नाव वेगळं आहे आणि ते 'कोणाचीतरी आई' यापेक्षा ते अधिक अर्थपूर्ण आहे. अर्थात त्यातही माझं काहीच कर्तृत्त्व नाही.
पृथ्वीला माता म्हणण्यात अडचण नाही; बहुदा इथे पृथ्वीवर झालेल्या/होणार्या भीषण बलात्कारासंदर्भात चर्चा नसावी. पण त्याबद्दल बोलतोच आहोत तर सूर्याला मराठी, इंग्लिश खगोलीय लिखाणात जनक-तारा असं म्हणतात. पृथ्वी आई आणि सूर्य वडील असा विचार करून सूर्यमालेच्या निर्मितीचा प्रचलित सिद्धांत पाहिला तर सध्याच्या मूल्यांमधे फारच गडबड होईल. (शब्दकोषामधे देव हा शब्द आहे म्हणून नास्तिकांनी देवाचं अस्तित्व मान्य करावं का, असा एक हास्यास्पद प्रश्न पडला.) त्यामुळे कविकल्पना तेवढ्याच मर्यादित असलेल्या बर्या. भागवत अशाप्रकारची शेंडाबुडखा असणं आवश्यक नसणारी वक्तव्य करत होते असं सुचवत असेल तर पुन्हा माझा आक्षेप मागे.
आणि नाही बुवा, मला नसता प्रतिसाद दिलात तरी चाललं असतं. माझ्या प्रतिसादावर आक्षेप घेणार्यांपैकी एकाने आधीच उत्तर दिलेलं आहे. तुमचा मूळ मुद्दा, खोट्यानाट्या बातम्या देण्याबद्दल प्रसारमाध्यमांचा निषेध, तो मला मान्यच आहे. आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला acknowledge करून तुम्ही प्रतिसादसंख्या निष्कारण फुगवत नाही हे एवढ्या वर्षांत माहित झालेलं आहे. त्यात लिंगभेद मी तरी नाही बघू शकत. अर्थात निषेधाची आपापली कारणं वेगवेगळी आहेत म्हणून माझा निषेध तुमच्या निषेधापेक्षा पातळ ठरवणार असाल तर खुश्शाल ठरवा. लिंगसमानतेप्रमाणेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्यही मी मानते.
आधुनिक स्त्रीवादी लेखक-लेखिका या प्रकारचं महत्त्व स्त्रियांना देण्याला विरोध करतात. याचं कारण असं की यात स्त्रीला उच्च दर्जा दिला जातो त्यामागे काहीही रॅशनेल नाही. आपला वंश/मनुष्यजात टिकवण्यामधे स्त्रियांचा किंचित जास्त वाटा आहे असं दिसतं, याचं कारण पुरुषांकडे गर्भाशय नाही. पण या प्रकारे उच्च दर्जा दिल्याचं भासवून स्त्रियांना खालचं सामाजिक स्थान देण्याचा प्रकार हजारो वर्ष सुरू आहे. "कागदोपत्री" उच्च दर्जा देऊन स्त्रियांवर केलेल्या या अन्यायाकडे भागवतांनी (आणि/किंवा त्यांच्या समर्थकांनी) डोळेझाकच करायची ठरवली असेल तर मग चालू द्या, एवढंच म्हणू शकते.
दुसर्या बाजूने एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की लिंगाधारीत उच्चस्थान असो नीचस्थान, ते अमान्यच.
ज्या संस्कृतीचे दाखले देऊन शोषण होतं, उच्चनीचत्त्व दिलं जातं, तो दृष्टीकोन मला अमान्य आहे. माझ्या प्रतिसादाचा अधिक अर्थ विचारेपर्यंत (संघ किंवा भागवतांच्या समर्थनाची अपेक्षा न ठेवता) मी फक्त प्रसारमाध्यमांचा निषेध करूनच थांबले होते. पुढच्या प्रतिसादांमधेही विचारसरणीचा विरोध आहे, त्यात व्यक्तींना हीन लेखण्याचा प्रयत्न दिसत असेल तर माझी शब्दनिवड चुकली असेल. माझा असा हेतू अजिबात नाही.
असा तर्क भरपूर वेळा ऐकला आहे. समितीने नक्की काय केलेलं आहे याची माहिती मिळाली तर आनंद होईल. ती कोणी देतच नाही. हळद-तिखट कुटून विकतात हे माहित्ये; आमच्या घरी अनेक वर्ष तिथूनच रतीब येत असे. समितीचं संस्थळ पाहिलं, समितीच्या कामाबद्दल काहीही भरीव माहिती मिळाली नाही. (त्यामानाने संघाचं संस्थळ बरंच भरगच्च आहे.)
समितीच्या सदस्या किती उच्चशिक्षित आहेत याची फक्त आकडेवारी किंवा उदाहरणं मला नकोत. यात समितीचा सहभाग नक्की काय, किती? (आमच्या उच्चभ्रू शाळेतून दरवर्षी मुलं मेरिट लिस्टमधे यायची. पण त्यात शाळेचा नक्की वाटा किती होता? आम्हाला शिकवणारे शिक्षक किती थोर होते आणि या मुलांच्या पालकांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती यांचा संबंध किती असे प्रश्न या शाळेच्या पालकांमधे नेहेमी असायचे.) भाजप-प्रमुख कोण असावं यावर संघाचं काही मत असतं असं अधूनमधून काहीबाही वाचायला मिळतं. या बातम्यांचे तपशील खोटे, बनावट असतील पण भाजपमधे संघाचं मॅनिफेस्टेशन असतं किंवा असावं अशा प्रकारची इच्छा संघात नसते का? (असं असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज प्रतिसाद देऊन तसं सांगा.) अशा प्रकारच्या किती बातम्या समितीबद्दल येतात? बरं, तुम्ही म्हणता तशी प्रसारमाध्यमं स्त्रीद्वेष्टी असतील (ज्यावर माझा याबाबतीत विश्वास नाही,) तरीही गेली ७-८ वर्ष भारताच्या मध्यमवर्गात इंटरनेट, सोशल नेटवर्किंग चांगलंच पसरलेलं आहे. समितीचं अस्तित्त्वही माझ्या माहितीप्रमाणे याच मध्यमवर्गात आहे. मग समितीबद्दल काहीच चर्चा या मध्यमवर्गाकडून होत नाही याचं कारण काय? अगदी स्त्रियांची संख्या इंटरनेटवर आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे हे मान्य करूनही समितीच्या भरीव (किंवा बोगस) कामाबद्दल कोणीही, काहीही बोलत नाहीत याचं स्पष्टीकरण काय देणार? उलटपक्षी संघावर बोटं ठेवली की इंटरनेटवरच्या निदान काही स्त्रियाही (संघशाखेत त्यांना प्रवेश देत नाही तरीही) हिरीरीने संघाच्या बाजूने मुद्दे मांडताना दिसतात. अगदी वनवासी कल्याण आश्रमाचं नाव पुढे होतं, पण ते संघाचं कर्तृत्व आहे असं सांगण्यात येतं; समितीचं काय?
माझ्याकडे तीनच (बाईमाणूस यांच्या प्रतिसादात त्यांना समितीचा अनुभव असण्याचा उल्लेख आहे, भरीव काम किंवा त्याबद्दल गौरवोद्गार दिसले नाहीत. उलट त्यांनी संघातल्या लिंग-असमानतेवर ओझरती टीका केली आहे.) डेटापॉईंट्स आहेत कारण उरलेला विद्याचा अभाव हा एक मोठा गोळा दिसत नाहीये किंवा आत्तापर्यंत मी तो दाखवण्यात अयशस्वी ठरले आहे. एकतर समितीकडे अधिक डेटापॉईंट्स नसावेत, किंवा असलेले डेटापॉईंट्स मांडायला त्यांच्याकडे प्रतिनिधित्त्व नाही (जे संघाकडे भरपूर आहे असं दिसतंच) किंवा दोन्ही. अगदी या धाग्यावरही संघाबद्दल प्रेम असणारे अनेक लोक आहेत, समितीचा मुद्दा काढला गेला आहे, पण कुठेही समितीच्या भरीव कामाबद्दल एकही प्रतिसाद नाही. ('अॅड होमिनेम'मुळे माझंही मनोरंजन होतं हो!)
एवढी वर्ष टिकायला काय लागतं, डायनोसॉरची हाडंही लाखो वर्ष टिकलेली आहेत. फॉसिल्स म्हणून टिकून रहाण्यासाठी फार कर्तृत्व दाखवावं लागत नाही. ज्या गोष्टी नष्ट करण्यासाठी ठरवून, प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात त्याही तगून रहातात. (विश्व पृथ्वीकेंद्री नाही हा सिद्धांत, ज्यू धर्म, पोलिओचा व्हायरस अशी भरपूर उदाहरणं देता येतील.) पण फक्त टिकून रहाणं एवढंच महत्त्व असेल तर मग अधिक बोलत नाही.
समितीच्या तीन आदर्शांपैकी एक झाशीची राणी आहे. समितीकडून लक्ष्मीबाईंचा वारसा कोण चालवतंय? मुलांसाठी उत्तम माता बनण्यासाठी (जे समितीचं एक ध्येय/आदर्श आहे) आजच्या जमान्यात फक्त हळद-तिखट विकण्यापलिकडे बायकांनी बरंच काही शिकण्याची, करण्याची आवश्यकता असते हे १०० वर्षांपूर्वी विठ्ठल रामजी शिंदे सांगायचे. ते तेव्हाही फार सफल झाले नाहीत. आजही हरलेच म्हणायचं.
---
विमे, मी तुमचं मनोरंजन केल्याचं समितीमधे कळवू नका. स्त्रिया (म्हणजे त्यांच्या कृती, असा मला लागलेला अर्थ) मनोरंजनासाठी नाहीत असं समितीच्या पूर्वप्रमुखांनी म्हटलेलं आहे. ;-)
17 Jan 2013 - 5:06 am | अर्धवटराव
तुम्ही म्हणता तसं (अगदी) डायनासोरच्या हाडांप्रमाणे समिती (उगाच, काहि उपयोग नसताना) टिकुन राहिली... पण त्यात सरसंघचालकांचा स्त्रीद्वेष, अज्ञान, विज्ञानविरोध वगैरे कुठे दिसुन येतो?
अर्धवटराव
17 Jan 2013 - 5:09 am | अर्धवटराव
विशेषतः भागवतांचा दुर्गुण कुठे दिसतो? (सध्याची चर्चा पर्टीक्युलरली त्यांच्याबद्दल चालली आहे म्हणुन हा मुद्दा...)
अर्धवटराव
24 Jan 2013 - 9:22 pm | बाईमाणुस
>>बाईमाणूस यांच्या प्रतिसादात त्यांना समितीचा अनुभव असण्याचा उल्लेख आहे, भरीव काम किंवा त्याबद्दल गौरवोद्गार दिसले नाहीत. उलट त्यांनी संघातल्या लिंग-असमानतेवर ओझरती टीका केली आहे.
माझ्या प्रतिसादाचा उल्लेख आला म्हणुन हे स्पष्टीकरण. समितीचेच काय पण इतरही कुठल्या परिवार-सन्घटनांचे काम हा माझ्या प्रतिसादाचा विषय नव्हता. निव्वळ महिलाविषयक सन्घाच्या धोरणाविषयी मला काही म्हणायचे होते. जे म्हणायचे होते ते मी स्पष्ट लिहिले होते. त्यावर पूर्णतः समाधान्कारक नसले तरी थोssssडेसे का होईना आशादायक उत्तर मला मिळाले आहे.
अवान्तर - मी वयाच्या ज्या वळणावर आहे तिथे मला पूर्णतः काळी किन्वा पान्ढरी उत्तरे अपेक्षित नाहीत. ती जशी सन्घ-विचारातूनही मिळतील अशी अपेक्षा नाही. आणि इतरही विचारधारान्तूनही मिळतील इतके भाबडेपण माझ्यात नाही. (उदा. - आजचा स्त्रीवाद हा भान्डवलवादाच्या दावणिला बान्धला गेला आहे हा विचार मला पदोपदी येऊन भिडत असतो. त्याचे काय करायचे या विवनचनेतही असते मी अधून-मधून )
17 Jan 2013 - 1:08 pm | पुण्याचे वटवाघूळ
विकासराव, अर्धवटराव, विश्वनाथ मेहेंदळे, श्रीगुरूजी आणि इतरांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
एके काळी ही मिपा आय.डी धारण करणारी व्यक्ती बरीच संतुलित आहे असे वाटले होते पण कसलाच संबंध नसताना विनाकारण स्त्रीमुक्ती घुसडणे आणि प्रतिसादांमध्ये सतत लैंगिकतेशी ओढून ताणून संबंध लावायचा प्रयत्न करणे यावरून माझ्या जुन्या मतात बराच बदल झाला हे पण नमूद करावेसे वाटते.
12 Jan 2013 - 10:57 am | मृत्युन्जय
मी तो परिच्छेद परत परत वाचला. मला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळाले नाही. तुझे वक्तव्य थोडे औपरोधिक होते काय?
12 Jan 2013 - 2:41 pm | मन१
आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत
काश ये सच होता.....
लोकशाहीतील lesser evil चा समर्थक
13 Jan 2013 - 1:37 am | कवितानागेश
४ वेळा वाचले. भागवतांच्या वाक्यात निदान मला तरी कुठलाही द्वेष्टेपणा दिसला नाही.
बाकीची सगळ्या केसची माहिती अजून पूर्ण वाचली नाही. वाचतेय....
17 Jan 2013 - 1:29 pm | पुण्याचे वटवाघूळ
असे काहीतरी बरळले नाही तर आपला विचारवंतीपणा सिध्द होत नाही बहुतेक.
12 Jan 2013 - 10:52 am | स्पा
लेख आवडला
विकास यांच्याशी तंतोतंत सहमत
12 Jan 2013 - 11:27 am | गणामास्तर
लेख आवडला. विकास,अर्धवटराव आणि मृत्युन्जय यांच्याशी बाडीस.
12 Jan 2013 - 11:54 am | श्रीगुरुजी
दिल्लीतल्या घटनेनंतर बाष्कळ बडबड करणार्यांविरूद्ध उद्या रविवार सकाळच्या पुरवणीमध्ये हेमन्त देसाईंनी लेख लिहिला आहे. लेखाच्या सुरवातीलाच मोहन भागवतांचे प्रकाशचित्र आहे. म्हणजे लेखात इतरांबरोबर त्यांनाही या लेखात झोडपले असणारच. हेमन्त देसाईं हे कट्टर संघद्वेष्टे आहेत. त्यांनी भागवतांचे मूळ भाषण ऐकण्याचे कष्ट घेतले नसतीलच किंवा ऐकले असले तरी ते भागवतांविरूद्धच लिहिणार याची खात्री आहे.
यावरून २००५ मधील अडवाणींचे जिनावरील वक्तव्य माध्यमांनी फिरवून कसा विपर्यास केला हे आठविले. २००५ साली पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून अडवाणी पाकिस्तानला गेले असताना ते असे म्हणाले होते की, "१९९४७ साली पाकिस्तान वेगळे राष्ट्र झाल्यावर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात जिनांनी जे भाषण केले त्यात निधर्मी राज्यव्यसस्था कशी असावी याबद्दलचे उत्कृष्ट विवेचन होते. जर पाकिस्तान त्या भाषणात सांगितलेल्या मार्गावर चालला असता तर पाकिस्तान आज एक सर्व धर्मियांना समान वागणूक देणारा निधर्मी राज्य बनला असता." यात गोंधळ माजण्यासारखे काहीही नव्हते. पण "भारताचे विभाजन करणार्या जिनाची अडवाणींनी स्तुती केली" असा माध्यमांनी गलबला करून अडवाणींना सर्वत्र झोडपून काढले गेले. प्रत्यक्षात अडवाणींनी पाकिस्तानच्या धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेला टोला हाणला होता. पण त्यावेळी त्यागदेवता सोनिया गांधींच्या तेजामुळे दिपलेल्या माध्यमांनी या वाक्यांचा संपूर्ण विपर्यास करून अडवाणींची छीथू करून टाकली.
14 Jan 2013 - 3:04 pm | विटेकर
---------- Forwarded message ----------
From: vitekar
Date: 2013/1/14
Subject: Article in Sakal
To: hemant.desai001@gmail.com, author@esakal.com
नमस्कार श्री. देसाई ,
आपला सकाळ मधील लेख वाचला . लेख अजिबात पटला नाही आणि म्हणून ही मेल !
श्री मोहन भागवत यांच्यावर आपण केलेली टिका अत्यंत कलुषित बुद्धीने आणि पूर्वग्रहदूषित असून, पीत पत्रकारितेला देखील काळिमा फासणारी आहे. उत्तमॉत्तम पत्रकार आणि न्याय बुद्धीने चालवलेल्या मराठी वृत्तपत्रीय परंपरेस आपण गालबोट लावले आहे.
आपला "बोलविता धनी" कोणीतरी वेगळाच असून केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण ही गरळ ओकली असून सत्याचा विपर्यास्त करण्याचा जाणून-बुजून प्रयत्न केला आहे अशी आम्हाला खात्री आहे .
याबद्दल आपला निषेध व्यक्त करून ईश्वर आपल्याला सद् बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो.याचे प्रायश्चीत्त म्हणून आपण ताबडतोब जाहीर माफी मागून लेखन संन्यास घ्यावा .
मा. संपादक ,
लोकशाहीमध्ये वृत्तपत्रे हा महत्वाचा स्तंभ मानला जातो आणि म्हणोन वृत्तपत्रांनी जबाबदारीने लेखन करणे अपेक्षित आहे.आपल्याकडून या संकेताची पायमल्ली झाली आहे असे आमचे नम्र सांगणे आहे.
जाहीर माफी आणि पुन्हा असला अश्लाघ्यपणा न करण्याची जाहीर हमी याद्वारे आपण आपली चूक निस्तरू शकता.
बाकी महाराष्ट्र टाईम्स च्या आव्हानापुढे आपले वृत्तपत्र लवकरच बंद पडणार असल्यामुळे तुमचे वृत्तपत्र बंद करा असे म्हणण्याचे आवश्यकता वाटत नाही.
ईश्वेरेच्छा बलीयसी !
धन्यवाद
सुहास क्षीरसागर ( विटेकर )
14 Jan 2013 - 3:17 pm | दादा कोंडके
या ओळी खत्राच. :)
14 Jan 2013 - 3:49 pm | अभ्या..
अहो कशाला मेलामेली कर्ताय?
ह्याच असल्या मेल्स त्यांना बढती मिळवून देतील.
आणि पेपरला ट्यार्पी.
12 Jan 2013 - 12:06 pm | श्रीगुरुजी
"भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा यावरून त्यांना व्यवस्थित कोंडीत पकडता आलं असतं. पण भागवत वाट्टेल ते बरळले तरीही वर पुन्हा त्यांचीच माफी मागण्याची वेळ आली. आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत. "
भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा तुम्हाला कधी दिसला? दिसला असल्यास उदाहरणे/पुरावे/संदर्भ द्यावा ही नम्र विनंती.
तसेच भागवत वाट्टेल ते बरळतात याची काही उदाहरणे/संदर्भ्/पुरावे असल्यास द्यावे.
बहुतेक सर्व माध्यमे कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधली गेली आहेत यात शंका नाही. पण तथाकथित उजव्या पक्षांना विकली गेलेली माध्यमे फार थोडी आहेत. बहुसंख्य माध्यमे काँग्रेसची मुखपत्रे आहेत. टाईम्स ग्रुप, हिंदुस्तान टाईम्स इ. प्रमुख इंग्रजी वृत्तसंस्था गेली अनेक दशके काँग्रेसच्या बरोबर आहेत. "हिंदू" ग्रुप डाव्या पक्षांच्या बाजूने आहे. आऊटलुक सारखी सात्पाहिके काँग्रेसची मुखपत्रे आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर "सकाळ" ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने, "लोकमत" ग्रुप काँग्रेसच्या बाजूने आहे. "सामना" शिवसेनेचे मुखपत्र आहे. कुमार केतकरांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतरच "मटा", "लोकसत्ता" इं. चे काँग्रेसपुराण जरा कमी झाले आहे, परंतु दोन्हीकडे सुरेश भटेवरा, गिरीश कुबेर इ. सारखे कट्टर संघ/भाजपविरोधी आहेत. त्यातल्या "पुढारी" हे एकमेव वृत्तपत्र बर्याच प्रमाणात समतोल राखून आहे.
"झी न्यूज", "एनडीटीव्ही", "आजतक", "आयबीएन" इ. वृत्तवाहिन्या उघडउघड काँग्रेसच्या समर्थक आहे. तथाकथित उजव्या पक्षांची समर्थक अशी एकही वृत्तवाहिनी नाही.
त्यामुळे "आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत." हे वाक्य खरे नाही.
14 Jan 2013 - 9:19 am | अँग्री बर्ड
त्यातल्या "पुढारी" हे एकमेव वृत्तपत्र बर्याच प्रमाणात समतोल राखून आहे.
-१
12 Jan 2013 - 12:08 pm | नाखु
विकासराव्,श्री गुरुजी यांनी आमची संघाची "टिंगल-टवाळी (चिखलफेक)करण्याच्या हेतुलाच बाधा आणली कि राव.
तुमच काय म्हणण कि आम्ही संघाचं देशकार्य (देशाच्या ईशान्य पुर्व भागतलं) कशाला बघायचय.
12 Jan 2013 - 6:13 pm | पिंपातला उंदीर
भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा.
12 Jan 2013 - 6:47 pm | मन१
रज्जूभैय्या आणि कुप्प सी सुदर्शन हे कोकणस्थ आहेत्/होते काय?
12 Jan 2013 - 7:09 pm | पिंपातला उंदीर
दोघेही महाराष्ट्रीयन नाहीत. असो माझा मुद्दा पोहोंचला असावा ही अपेक्षा.
13 Jan 2013 - 12:53 am | निनाद मुक्काम प...
च्यायला थोडी टीका देशस्थांच्या वर सुद्धा करा की
ह्या निमित्ताने ही पोट जात सुद्धा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ह्याची दखल घेतल्या जाईल.
हे वाक्य जे प्रत्येक गोष्टीत ब्राह्मण द्वेष आणतात त्यांच्या साठी आहे/
विशेतः बिगर कोकणस्थ.... असे विधान करण्याच्या ऐवजी अभ्यास वाढवा
सर्व मराठी बांधवांनी एकत्र ह्या यावे असे मला मनापासून वाटते ,
जात पात प्रत्येक गोष्टीत आणली पाहिजे का
16 Jan 2013 - 9:08 pm | ईन्टरफेल
१
21 Jan 2013 - 2:49 pm | बॅटमॅन
अगदी अगदी :)
12 Jan 2013 - 7:46 pm | विकास
>>> भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा.
परत परत तेच. काही न वाचता टंकायचे... वरची चर्चा वाचा अथवा संघ आणि समितीवरील माहिती वाचा. बाकी काही नाही तर लोकसत्ता आयडीआ एक्सचेंजमधील सरसंघचालक मोहनजी भागवत यांची विस्तृत मुलाखत ऐका...
>>> १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा.
तुम्ही जाती मानता का? संघ मानत नाही आणि कधी विचारत देखील नाही.
बाकी मुळ मुद्याबद्दल काय म्हणणे आहे ते लिहायचे विसरलात का? - प्रसार माध्यमांच्या खोटेपणाबद्दल काय म्हणायचे आहे?
12 Jan 2013 - 8:20 pm | पिंपातला उंदीर
तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला. एवढ्या मोठ्या संघटनेला गेल्या ८७ वर्षात एकही स्त्री किंवा गेला बाजार एका विशिष्ट जातीपलिकडे सरसंचालक मिळत नाही हे पटत नाही. आम्ही जात मानत नाही वैयागेरे युक्तिवाद भावनिक ठिकाणी ठीक आहेत.
12 Jan 2013 - 8:30 pm | पैसा
ओ साहेब, स्त्रियांबद्दल इथेच वर झालेली चर्चा वाचलीत का? ती आधी वाचा. तुम्हाला कशाबद्दलही काहीही माहिती नाही असे दिसतेय!
कोकणस्थ सरसंघचालक
Keshav Baliram Hedgewar (1925-1930 and 1931 to 1940)
Dr. Laxman Vaman Paranjpe (1930-1931) (when Dr Hedgewar was in jail during Forest Satyagraha)
Madhavrao Sadashivrao Golwalkar, called as Guruji (1940-1973)
Madhukar Dattatraya Deoras, called as Balasaheb (1973-1994)
Rajendra Singh, called as Rajjubhaiya (1994-2000)
K. S. Sudarshan (2000-2009)
Mohan Bhagawat (March 2009-present)
यांच्यापैकी श्री परांजपे हे एकटे कोकणस्थ होते हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते. इतरांबद्दल माहिती दिलीत तर माझेही सामान्यज्ञान वाढेल.
12 Jan 2013 - 8:35 pm | पिंपातला उंदीर
अहो बाईसाहेब एक तरी ब्राम्हणेतर आहे का या यादीत. बाकी देवरस हे कोकणस्थ नवते म्हंतल्यावर डोळे पानवले. असो.
12 Jan 2013 - 8:38 pm | प्रचेतस
रज्जूभैय्या कोण होते ओ?
12 Jan 2013 - 8:44 pm | पिंपातला उंदीर
सांगा की तुम्हीच. वैश्या होते की क्षत्रीया.?
13 Jan 2013 - 9:45 am | श्री गावसेना प्रमुख
संघचालक कोणी का असेना,पण त्यांच्या मदतकार्याच्या वृत्तीला तोड नाही.
13 Jan 2013 - 9:51 am | पिंपातला उंदीर
हे मात्र लाखाच बोललात ; )
12 Jan 2013 - 8:44 pm | पैसा
माझ्या आईवडिलांनी मला नावावरून जाती ओळखायला शिकच्वले नाही ही मोठी चूक झाली. इतर सरसंघचालक जातीने कोण हे मला माहिती नाही म्हणून तर तुम्हाला विचारतेय ना! तुम्हाला जातींबद्दल बरीच माहिती दिसतेय. म्हणून तर सांगा की. आम्ही तरी माणसाला त्याच्या कामावरून ओळखतो. जातीवरून नाही.
12 Jan 2013 - 8:49 pm | पिंपातला उंदीर
तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे तुमच्या बद्दल नाही बोलत आहोत. संघाबाद्दल बोलत आहोत. वैयक्तिक होणे इथेच थांबवुयात. आणि मुखया म्हणजे आती भावनिक ना होता जरा fact-based चर्चा करूयाात.
12 Jan 2013 - 8:58 pm | चित्रा
आत्तापर्यंत बोलले नाही. वाचते आहे.
पण फॅ़क्टस तुम्हीच सांगा. संघावर जातीयतेचा आरोप तुम्ही करत आहात. प्रूफ तुम्ही द्या.
12 Jan 2013 - 9:03 pm | पिंपातला उंदीर
तेच तेच पुन्हा पुन्हा. वरची चर्चा वाचा हो.
12 Jan 2013 - 9:42 pm | आनन्दिता
कै च्या कै... चर्चेचा मूळ मुद्दा कुठल्या कुठे सोडून जातिपाती चे फाटे फोडण्याला काय अर्थ आहे..
12 Jan 2013 - 9:19 pm | अन्या दातार
कोणी का असेना, फरक काय पडतो? (तुम्हाला व मला, दोघानाही)
या 'फॅक्ट' बदल बोलाल का जरा?
13 Jan 2013 - 11:20 am | मैत्र
आधी सर्व कोकणस्थ म्हणालात, मग दोन दक्षिण भारतीय म्हणून त्यांना वगळलं.
मग जेव्हा बहुसंख्य कोकणस्थ नाहीतच हे लक्षात आणून दिल्यावर ब्राम्हणेतर नाहीत यावर वळलात.
मग यादी माहीत नसताना कोकणस्थ हा मुद्दा इथे कशासाठी आणला होता आणि त्याचा वरील चर्चेशी - भागवत यांच्या वाक्याचा मीडियाने केलेला विपर्यास आणि संघविरोधकांनी मूळ भाषण न पाहताच चालवलेल्या लेखण्या हा होता.
त्यातून श्री घासकडवी यांनी भागवत काहीही म्हटले असले तरी स्त्रियांचे संघातील स्थान हे दुय्यम आहे असा मुद्दा काढला.
म्हणजे जो मूळ चर्चाविषय आहे की मीडिया हवा तसा विपर्यास करून mass (मराठी ?) मध्ये पाहिजे तो विरोधी विचार पसरवण्याचं काम करते हा बाजूलाच.
(संघ समर्थक नसलेला पण जातीभेदविरहीत अनेक शाखा जवळून पाहिलेला) मैत्र
12 Jan 2013 - 9:25 pm | विकास
अजून माध्यमांच्या संदर्भाच्या चर्चेत काही बोलता येत नाही.माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का? पण त्याबद्दल लिहायचे सोडून जे आडात नाही ते पोहर्यात आणायचा बाष्कळ प्रयत्न चाललाय. जिथे तिथे जाती बघण्यार्यांना आणि तरी स्वतःला सुधारकी दाखवण्याची धडपड करणार्यांना "जातीयवादी सुधारक" असे म्हणता येईल
12 Jan 2013 - 9:36 pm | पिंपातला उंदीर
बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील.
हा प्रतिसाद पाहावा. आणि एखाद्या संघटनेत एका जातीपलिकडे सरसंचालक होत नाः हे दाखवणे हा जातीयवाद कसा? माझा युक्तिवाद मान्य नसेल तर तो उदाहरण देऊन नाकारवा. बाकी भावनिक युक्तिवाद ला reply द्यायला खरेच वेळ नाही. फॅक्ट्स द्या आणि बोला.
12 Jan 2013 - 10:20 pm | विकास
अजून देखील मूल चर्चेतील प्रश्नाला बगल देत आहात. माध्यमे प्रामाणिक वाटतात का? ही चर्चा आहे... याचे उतर द्या.
बाकी कोणाची जात काय बघणे आणि त्यावरून काँमेंट करणे याला जातीयवाद म्हणतात. तुम्ही कदाचीत स्वतःला सुधारक समजणार्या कंपुतले समजता असे दिसते , म्हणूनजातीयवादी सुधारक आहात असे म्हणले.
12 Jan 2013 - 10:42 pm | पिंपातला उंदीर
ह्या मुद्द्यावर भागवत यांच्यावर खूप टीका केली होती मीडीया ने. करा प्रतिवाद. बाकी मी मांडलेले इतर मुद्दे खूप जड आहेत प्रतिवाद करायला.
बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील.
13 Jan 2013 - 11:49 am | चेतन
"आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी" आणि "माकड म्हणतं माझीच लाल" या म्हणिंची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
तुम्ही मांडलेले इतर मुद्दे खूप जड आहेत -;)
19 Jan 2013 - 2:31 pm | नर्मदेतला गोटा
हे हे
13 Jan 2013 - 12:56 pm | श्रीगुरुजी
"अजून माध्यमांच्या संदर्भाच्या चर्चेत काही बोलता येत नाही.माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का? "
८ जानेवारी २०१३ ला संध्याकाळी आयबीएन लोकमत पहात होतो. त्यादिवशी मुम्बई दंगलीला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निखिल वागळे एक "विशेष वृत्तांत" दाखवित होते. त्यांच्या प्रतिधिनिने त्या दंगलीत एकून ९०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असे सांगून त्यापैकी ६०० ते ६४० "मुस्लिम" होते व उरलेले "इतरधर्मीय" होते, असे सांगितले. ज्या व्यक्तीने ९०० तले एकूण मुस्लीम अगदी अचूक मोजले त्या व्यक्तीने उरलेल्यातले "हिंदू" किती हे मात्र सांगितले नाही. नंतर एकूण ४-५ जणांच्या मुलाखती दाखविल्या. त्यात दंगलीची झळ पोचलेल्या दोन मुस्लिम व्यक्ती होत्या, तिस्ता सेटलवाडची मुलाखत दाखविली व उरलेले दोघे दंगलीची झळ पोचलेल्या मुस्लिमांचे प्रातिनिधित्व करणारे मुस्लिम वकील होते. त्या दंगलीत किमान एक तृतीयांश हिंदू मृत्युमुखी पडलेले होते (यात राधाबाई चाळीत खोलीत कोंडून जाळलेले ८ जण, ६ जानेवारीला भोसकून मारलेल ६ माथाडी कामगार अशा अनेकांचा समावेश होता), पण "हिंदू" या शब्द वापरून आपली जीभ विटाळून घेण्यापेक्षा त्या प्रतिनिधिने "इतरधर्मीय" हा शब्द वापरला. तसेच दंगलीची झळ अनेक हिंदूंनादेखील पोचली होती. पण या "विशेष" वृत्तांतात त्याचा पुसटता देखील उल्लेख नव्हता. हा अत्यंत एकतर्फी व पक्षपाती वृत्तांत होता व असे करण्याची वागळे यांची व आयबीएन-लोकमतची ही पहिली वेळ नव्हती किंवा अखेरची देखील नसेल. वागळे, हेमंत देसाई, जतीन देसाई, गिरिष कुबेर, सुरेश भटेवरा इ. पत्रकार हे कट्टर संघ/भाजपविरोधी आहेत आणि ते वेळोवेळी पक्षपाती वृत्तांकन करत असतात.
14 Jan 2013 - 2:08 pm | विटेकर
किती बर ळाल ?
14 Jan 2013 - 2:13 pm | विटेकर
गिर्या तो भी टांग उप्पर...
12 Jan 2013 - 6:56 pm | परिकथेतील राजकुमार
संघद्वेष्ट्यांची मांदियाळी...
12 Jan 2013 - 7:19 pm | विकास
सहमत.
20 Jan 2013 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संघाच्या विचारांशी मतभेद म्हणजे संघद्वेष्टपणा नव्हे.
बाकी, चालू द्या.
-दिलीप बिरुटे
12 Jan 2013 - 7:31 pm | पैसा
लेख आवडलाच. प्रसारमाध्यमे जबाबदार असावीत त्यांनी समाज जागृतीचे कार्य करावे वगैरे अपेक्षा आता टू मच वाटतात. अगदी इंदिराजींच्या काळातही ठराविक बातम्याच दूरदर्शन आणि आकाशवाणीवर येत असत. मुंबई हल्ल्याच्या काळात ताज हॉटेलवरून थेट प्रक्षेपण करून अतिरेक्यांना कमांडो कारवाईची इत्थंभूत माहिती पुरवायचे काम मीडियाने केले होतेच. काही ठराविक लोकांचे उद्गार मोडतोड करून वापरणे हा मीडियाचा आवडता उद्योग आहे. जो तो ट्यार्पीच्या मागे. त्याचे इतर काही अवांछित परिणाम होतात का याच्याशी काही देणे घेणे नाही.
त्यामुळे आजकाल आम्ही बातम्या बघणे सोडले आहे. पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्स आल्यामुळे तेही कार्यक्रम बघणे सोडले आहे. येऊन जाऊन कार्टून फिल्म्स बघायला टीव्ही नावाच्या खोक्याचा उत्तम उपयोग होतो आणि रद्दी जमा करण्यासाठी वृत्तपत्रांचा.
12 Jan 2013 - 8:09 pm | इरसाल
12 Jan 2013 - 8:03 pm | अनन्न्या
स्त्रीयांवरील अत्याचाराचे घटनास्थळीचे प्रक्षेपण एखादया चॅनलवर दाखवतात म्हणजे घटना घडत असताना कोणी प्रतिनिधी तेथे असतो. दिल्ली प्रकरणाबद्दल नव्हे आधीच्या काही घटनांमध्ये पाहिले होते. तो प्रतिनिधी मदत न करता पोलिसाना न कळ्वता आपल्या चॅनलला प्रथम बातमी पोहोचणे यातच धन्यता मानतो.
12 Jan 2013 - 8:26 pm | हुप्प्या
मला सुरवातीला भागवतांचे विधान ऐकून त्यांचा खूप राग आला होता. पण नंतर उलगडा झाला. आपण पुरोगामी आहोत, आपण कडव्या मुस्लिमांच्या विरोधात आहोत तसेच कडव्य हिंदूंच्याही असे लोकांच्या मनावर ठसवायचेच असा काहीसा अजेंडा घेऊन ही उच्चभ्रू माध्यमे काम करतात. त्यामुळे संघाच्या कुठल्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळालीच तर ती अशी हिंदुत्वद्वेषाची कावीळ झालेली असते. अती उजवे मुस्लिम आणि अती उजवे हिंदू हे एक अत्यंत समतोल समीकरण आहे असा ह्या लोकांचा समज आहे. आणि तो साफ चुकीचा आहे.
मागे सुमार केतकर लोकसत्तेचा संपादक असताना मनमोहनसिंग निवडणूक जिंकले आणि लगेच भारतातील शेअर कोसळले तेव्हा हे सगळे किरीट सोमय्या (भाजप) ने घडवून आणले असा बिनबुडाचा आरोप केतकरांनी केला होता. एक मोठ्ठा अग्रलेख लिहिला होता. पण नंतर कधीतरी बारीकशा चौकटीत ह्या बिनबुडाच्या, खोट्या आरोपाबद्दल माफी मागणारा उल्लेख होता. आता लोकांच्या अग्रलेख लक्षात रहातो का हा खुलासा हे ओळखणे अवघड जाऊ नये.
वरील काही लोकांच्या मतावरून झोपलेल्याला उठवणे अवघड असेल पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे अशक्य ह्या विधानाची आठवण झाली. असो!
अभ्यासपूर्ण लेख. आभार!
12 Jan 2013 - 8:42 pm | पिंपातला उंदीर
बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील.
13 Jan 2013 - 1:01 pm | श्रीगुरुजी
दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून अनेक बलात्कार होत आहेत. पुण्यासारख्या तुलनेने लहान शहरात सुद्धा बलात्कारांच्या अनेक घटना घडताना दिसतात. दिल्लीला भारताची "बलात्कारांची राजधानी" अशी कुप्रसिद्धी मिळालेली आहे. अशा परिस्थितीत लहान गावांच्या तुलनेत मोठ्या शहरात जास्त बलात्कार घडतात असा गैरसमज होणे साहजिक आहे.
13 Jan 2013 - 4:32 pm | पिंपातला उंदीर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17896786.cms
12 Jan 2013 - 9:34 pm | यशोधरा
विकास, मुद्देसूद लेख, पैसाताई वगैरे इतरेजणांनीही उत्तम मुद्दे मांडून बेसलेस विधाने खोडली आहेत हे उत्तम.
धन्यवाद.
12 Jan 2013 - 11:27 pm | आनन्दिता
काही दिवसापूर्वी सानिया मिर्झा ने कुठल्याशा कार्य्क्रमात सांगितलेला तिच्या लग्नाच्या वेळचा मिडीया संबंधी एक अनुभव ऐकला..
हे मिडीयावाले ८ दिवस तिच्या घराभोवती खडा पहारा देऊन होते.. दारंखिड्क्या सोडाच पण घराच्या वेंटिलेटर्स मधुन हि कॅमेरे घरात घुसवण्याचे प्रयत्न त्यांनी केले. स्वतःच्याच घरात सगळीकडे बेड्शीटे लावुन त्यांना ८ दिवस रहाव लागलं... इररिस्पेक्टि व ऑफ ऑल ऑदर काँट्रोव्हर्सीज ऑफ सानिया , तिच्यासारख्या सेलिब्रिटीला जर हे असलं सहन कराव लागलं असेल तर काही कारणाने चर्चेत आलेल्या एखाद्या सामान्य माणसाला काय भंडावून सोडत असतील हे लोकं..
प्रसारण स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याच्या वैयक्तीक आयुष्यावर आपण किती अतिक्रमण करतोय याचा विचार माध्यमांनी करायला हवा...
या धाग्याच्या निमित्ताने 'पीपली लाइव्ह' मधला नथ्था आठवला....
13 Jan 2013 - 1:04 am | बाईमाणुस
माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दलचा सदर प्रसंगातला त्रागा कळला. या धाग्याची प्रस्तावना करताना ' संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो'. असे आपण म्हणाला आहात पण तुम्ही(विकास/अर्धवट/इतर) धोरणान्बद्दलच्या आक्षेपाना प्रतिसाद देऊन विषयातर केलेच आहे तर माझे काही प्रश्न-
दोनच मुद्द्यांबद्दल आक्षेप, एकतर प्रश्नकर्त्याच्या सरसंघाचालाकाना विचारलेल्या मूळ प्रश्नाबद्दल - दिल्लीतल्या बलात्काराने फक्त हिंदूंचेच तेवढे खच्चीकरण नक्की कसे काय होते ते कळले नाही. प्रश्नकर्त्याचा रोख याबाबतीत पुरेसा स्पष्ट असताना सरसघचालकानी त्याची दखलही घेतली नाही. मग लोकसत्तेच्या मुलाखतीत संघाचा हिंदुत्ववाद समजावून सांगताना 'संघात हिंदूही आहेत, मुस्लिमही आहेत' हे जे विधान केले गेले त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण करण्याची संधी या प्रश्नाचे उत्तर देताना घेता आली असती. हा अत्याचार एका स्त्रीवर झाला हे अधोरेखित करता आले असते. तसे का झाले नसावे यावर आपले मत ऐकायला आवडेल.
लोकसत्तेच्या मूळ मुलाखतीत मोहनजी म्हणतात, 'संघ समाजाचे संघटन करतो'. संघ हा समाजातले संघटन नसून समाजाचे संघटन करतो हेही वेळोवेली ऐकलेले आहे. वैचारिक पातळीवर त्या विचाराचे मोलही मलातरी पटण्यासारखे आहे. पण मग समाज फक्त पुरुषांचाच आहे का? त्याच(लोकसताच्या) मुलाखतीमध्ये 'संघात महिलांना कसे काय स्थान नाही' या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, ' त्यांचे वेगळे संघटन आहे. त्यांच्या सरसंघाचालिका आमच्या बैठकांमध्ये असतात.' हेही मान्य. म्हणजे संघाच्या बैठकीमध्ये एक राष्ट्रसेविका समितीची प्रतिनिधी येणे आणि संघात महिलांना स्थान असणे यात काहीच फरक नाही असे म्हणायचे आहे का? की इतर परिवार सघटनापेक्षा समितीचे स्थान परिवारात वेगळे आहे? ते 'मान देण्याचे' वगैरे शाब्दिक खेळ न करता संघाचे स्त्रीयांना समानता याबाबतीत संघाचे नक्की काय धोरण आहे ते कृपया समजवावे. समितीबद्दल वरचे वाचले आहेच. शिवाय संघ-परिवारात पुर्वी काही वर्षे कार्यरत असल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवही आहे (अगदी समितिचासुद्धा).
13 Jan 2013 - 6:21 am | अर्धवटराव
अर्धवट कोणाला म्हणताय ? मिपाकराचा असा अपमान? आता तुम्ही नेमके कोण आहात ते माहित नाहि (बाई कि माणुस) म्हणुन आवरतं घेतो (नसत्या बाबतीत आपण स्त्रि-पुरुष समानता मानत नाहि) आयला... आमची रावबाजी एव्हढी जगजाहीर असताना असं अनुल्लेखानं मारायचं म्हणजे काय.
>> एकतर प्रश्नकर्त्याच्या सरसंघाचालाकाना....तसे का झाले नसावे यावर आपले मत ऐकायला आवडेल.
- सरसंघचालक अगदी प्रत्येक गोष्ट हिंदुंवर काय परिणाम करते या अँगलने बघत असतील तर त्याचं मलातरी काहि आश्चर्य वाटत नाहि. तसं पाहिलं तर दिल्लीची घटना स्त्रि अत्याच्याराच्या कॅटॅगरीत येतच नाहि मुळी... ति येते व्यक्ती व्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत. एका मनुष्याने दुसर्या मनुष्याचा स्वतंत्र जीवन जगण्याचा हक्क नाकारते आहे हि घटना. मग म्हणुन काय स्त्रि-संघटनांनी आपला आवाज गप्प करायचा का?
>>लोकसत्तेच्या मूळ ... अनुभवही आहे (अगदी समितिचासुद्धा).
-- तुम्हाला जर सैन्यदलात स्त्रियांना जबाबदार्या फारशा का दिल्या जात नाहित हे कळलं तर याहि प्रश्नाचं उत्तर मिळेल. कुठलिही संघटना आपल्या उद्दीष्ट प्राप्तीकरता बेस्ट पॉसीबल कार्यक्षम मार्ग अनुसरते. संघाचे स्वयंसेवक अगदी तरुण वयात प्रचाराला घराबाहेर पडावे अशी अपेक्षा आहे. आपला ऐन तारुण्याचा काळ हे स्वयंसेवक घरापासुन दूर, कुठल्याही करीअर वगैरे भानगडीत न पडता, आर्थीक सुबत्तेला मुकण्याचा धोका पत्करुन, केवळ संघटनेचं काम म्हणुन करत असतात. घरोघरी वार लावुन जेवतात. (मी जेंव्हा या संघटनेचा थोडाफार अभ्यास केला तेंव्हा तरी हेच चित्र होतं...). त्यातले अनेक पुढे स्वखुषीने किंवा अनिवार्यतेने अविवाहीत राहातात. भारतीय समाजात स्त्रिवर्गाला असलं जीणं थोडं कठीण आहे. तेंव्हा "मोड्स ऑफ ऑपरेंडी" ठरवताना फक्त पुरुषांची अशी वेगळी संघटना बांधायचं ठरवलं असेल तर ते सहाजीक होतं... त्यात बराच सुटसुटीतपणा आहे व मॅनेजमेण्ट दॄष्टीने सहजता देखील. जसा जसा काळ बदलेल तसं तसं संघटनेचं रूप देखील बदलेल (अशी अपेक्षा आहे...)
अर्धवटराव
13 Jan 2013 - 6:52 am | बाईमाणुस
चुकुन राव लिहायचे राहुन गेले. बाईमाणुस ही टर्म 'मी आपली बाईमाणुस' इतक्याच अर्थाने घेण्याची आहे हो. माझी आयडेन्टिटी हा इथे मुद्दा अनाठायी आहे. पण तुम्ही माझ्या प्रश्नाना बगल दिली नाहीत हे महत्वाचे.
>> तसं पाहिलं तर दिल्लीची घटना स्त्रि अत्याच्याराच्या कॅटॅगरीत येतच नाहि मुळी... ति येते व्यक्ती व्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत.
अगदी हेच म्हणायचे होते मला. आणि सरसन्घचालकानी प्रश्नकर्त्याला तसेर का बरे म्हटले नसावे? प्रश्नाच्या त्या भागाचा भागाचा अनुल्लेख का केला असावया? असे मी विचारत होते. असो!
>> जसा जसा काळ बदलेल तसं तसं संघटनेचं रूप देखील बदलेल (अशी अपेक्षा आहे...)
असा सूर भागवतानी लावला असता तर? याचा विचार करत होते म्हणुन एक बाईमाणुस असूनही प्रश्न विचारायचे धाडस केले हो. :)
13 Jan 2013 - 7:27 am | अर्धवटराव
>>सरसन्घचालकानी प्रश्नकर्त्याला तसेर का बरे म्हटले नसावे?
-- काहि कल्पना नाहि. पण जसं मी पूर्वी म्हटलं, कि सरसंघचालक अगदी २४ बाय ७ आपली काळि टोपी उतरायला तयार नसतील तर मला तरी त्यात आश्चर्य नाहि वाटत.
>>असा सूर भागवतानी लावला असता तर?
अगदी संघटनेत स्त्रि सभासदांसंदर्भात नाहि, पण कळानुरुप बदलण्याची भाषा त्यांनी अनेकदा वापरली आहे. असो.
अर्धवटराव
16 Jan 2013 - 8:18 am | हंस
मग लोकसत्तेच्या मुलाखतीत संघाचा हिंदुत्ववाद समजावून सांगताना 'संघात हिंदूही आहेत, मुस्लिमही आहेत' हे जे विधान केले गेले त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण करण्याची संधी या प्रश्नाचे उत्तर देताना घेता आली असती.
अहो ताई, "मुस्लिम राष्ट्रीय मंच" याविषयी एकले आहे का?. राष्ट्रवादी मुस्लिमांची संघाच्या प्रेरणेने उभी राहिलेली संघटना आहे ही. संघाचे जेष्ठ प्रचारक आणि अ. भा. कार्यकारीणी सदस्य मा. इंद्रेशजी या संघटनेचे मुख्य संरक्षक आहेत. गरज असेल तेव्हा संघ या संघटनेला आपले पाठबळ पुरवत असतो. माझ्या ओळखीत अनेक मुस्लिम स्वयंसेवक आहेत, तसेच अनेक जण मु.रा.मं मध्ये ही काम करत आहेत. संघ कधीही हा मुस्लिम स्वयंसेवक, हा हिंदू स्वयंसेवक (जसा जातीच्या आधारावर केला जात नाही तसा) असा भेदभाव करत नाही, संघात सगळेच स्वयंसेवक असतात. त्यामुळे कदाचित सरसंघचालकांनी उदाहरण दिले नसावे. मु.रा.मं विषयी अधिक माहितीसाठी आपण ह्या पानाला भेट देऊ शकता. http://www.facebook.com/#!/MuslimRastriyaManch
13 Jan 2013 - 1:16 am | बाईमाणुस
आणि हो, अमेरिकेतल्या शाखेत मात्र शाखा पुरुष आणि महिला या दोघान्ची एकत्र असते. ते का? रिटेल मार्केटबद्दल्च्या सरकारी धोरणाबाबतीत दोन परिवार सन्घटनेचवेपरस्पर विरोधी मत असले तरी समजू शकते. पण स्त्री आणि पुरुष या पातळीवर त्याच हिन्दु कुटुम्बाच्या बाबतीत भारतात(इन्डिया/भारत) आणि भारताबाहेर हा फरक कळला नाही.
13 Jan 2013 - 4:27 am | हुप्प्या
भारतात ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतात ती संघटना भारताबाहेर नाही. परदेशात साधारण त्याच विचारांची जी संघटना आहे तिचे नाव हिंदू स्वयंसेवक संघ आहे. त्यांचा गणवेषही वेगळा आहे. त्यामुळे त्यांचे नियम आणि ह्यांचे नियम हे एकच असावेत अशी अपेक्षा का? संघाच्या विचाराच्या अनेक संघटना आहेत जसे विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद वगैरे. ह्या इतर संघटनांमधे स्त्री पुरुष एकत्र काम करतात. त्यामुळे ही तुलना अत्यंत गैरलागू आहे.
13 Jan 2013 - 5:31 am | बाईमाणुस
ती वेगळी सन्घटना आहे हे पण मान्य पण माझ्या अनुभवानुसार धाटणी तीच असते हो, तसेच शारिरीक, बौद्धिक वगैरे. अगदी पावसात ईन्डोर असते तेव्हाचे खेळ सुद्धा नॉस्ताल्गिक करणारे. येऊन बघा हवेतर. :) (त्यातसुद्धा काही बौद्धिकात कधीकधी एकाच वेळेला दोन विषय असतात 'चीनची डबल्यू टू मधली एन्ट्री' पुरुषान्करत आणि 'घरगुती आयुर्वेदिक उपचार' बायकान्करता आणि त्यात अर्थात क्रॉस-एन्ट्री नसते, क्रॉस-एन्ट्री मागुन पाहिली आहे) . गणवेष वेगळा याचे मूळ वातावरणात असेल. तेही बरोबरच. पण जसे वातावरण/तपमानातला बदल हे एक कारण तसेच समाजातले बदलते वातावरण हेही एक कारण कारण होऊ शकते ना? त्या अनुषन्गाने होणार्या बदलाची दखल विचारात घेतली गेली आहे असे चित्र आज दिसले तर उद्या कदाचित बदल प्रत्यक्षात येण्याची शक्यता तरी दिसू शकेल माझ्यासारखीला. एरवी 'स्त्री ही देवी' वगैरे विचार उदात्त असले तरी ते समाजातल्या बदलात टिकणारे नाहीत.
13 Jan 2013 - 1:18 pm | अमोल खरे
मुळ लेख काय ? त्यावरचे प्रतिसाद काय ? मिडियाचा शहाणपणा असा टॉपिक आहे हो..... त्यावर बोला. माझ्या अंदाजाने ६० ते ७० टक्के प्रतिसाद लेखात विचारलेल्या प्रश्नाला सोडुन आहेत.
13 Jan 2013 - 7:15 pm | ५० फक्त
श्री. अमोल खरेजी, मला देखील हाच प्रश्न पडला आहे, पण मिपा देखील या तथाकथित मिडियाचाच एक भाग आहे ना, अगदी मॅक्रो किंवा मायक्रो किंवा कुठल्याही हिशोबात असला तरी. मग बाकी मिडियात जे चालतं, मुळ प्रश्न सोडुन नको त्या विषयावर गप्पा मारणे, इथं देखील तेच चालु आहे असं म्हणायला कुणाची हरकत नसावी.
एक नम्र विनंती - मा. संपादक मंडळ, या किंवा कोणंत्याही काथ्याकुटात मुळ प्रश्नाशी संदर्भ नसलेले चर्चा प्रस्ताव / प्रतिसाद वगैरे मुळ चर्चा प्रस्तावकाच्या संमतीने किंवा मुळ प्रस्तावक व मा. संपादक मंडळ यांची साधक बाधक चर्चा करुन उडवुन टाकण्याची सोय करता येईल काय ?
14 Jan 2013 - 2:45 pm | मालोजीराव
.
13 Jan 2013 - 9:27 pm | सुचेल तसं
तुमचा मुद्देसूद लेख आवडला. भागवतांच्या विधानांवर तत्परतेने चर्चा घडवून आणणारी प्रसारमाध्यमं आपली चूक मान्य करण्यासाठी तेवढ्याच तत्परतेनी चर्चा घडवून आणणार का? नैतिकतेचा ठेका घेतलेले हे सूत्रसंचालक विधानं ट्विस्ट केल्याबद्द्ल प्रामाणिकपणे माफी मागणार का? शक्यता फारच कमी आहे.
अशाच एका कार्यक्रमामधे एक नेता संघाविषयी बोलताना कायम त्यांना नथुरामाची अवलाद म्हणतो. त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी ह्या बेजबाबदार विधानाबद्द्ल त्या नेत्यावर कार्यक्रमात आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. असो.
आता ही जी माहिती तुम्ही वरती दिली तिचा टारगेट ऑडिअन्स फारच कमी आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना भागवतांनी वादग्रस्त विधानं केली हेच कायम लक्षात राहिल.
13 Jan 2013 - 9:48 pm | पिंपातला उंदीर
इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन बोलणार्या प्रतिसादाची लोकाणा आलर्जी आहे का ? पुन्हा एकदा दुआ देतो. कृपया आपले मत द्या. (भावनिक आणि शब्द बम्बाल प्रतिसादाना महत्व दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17896786.cms
13 Jan 2013 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी
सदर विधान असलेले भाषण मी ऐकले नाही पण त्या विधानाच्या अगोदरची वाक्ये पण तशीच असल्यास ते विधान व भाषण दोन्हीही भंपक असावीत.
बाकी मोहन भागवत बोलण्यामध्ये त्यांच्या पूर्वीच्या दोघांपेक्षा खूपच बरे आहेत.
अवांतर - दोन अडीच वर्षांपूर्वी दोन फूल एक हाफ मध्ये मोहनभैया व (पांढरे कपाळ असलेली) कमळाबाई यांचा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील रंगवलेला प्रसंग आठवला. अन दोन फूल एक हाफ सदर बंद पडल्याचे पुन्हा एकदा दुःख झाले.
सदर धाग्याबद्दल धागाकर्त्याचे अनेक आभार. काही वर्षांअगोदरपर्यंत मी नित्यनेमाने एका हिंदी / इंग्रजी न्यूज चॅनेलचे प्रसारण नेमाने पाहत होतो. पण महाराष्ट्राबद्दलची बातमी असली की त्यांचा पूर्वग्रह ओसंडून वाहायचा. त्यानंतर मी ती वाहिनी पाहणे थांबवले अन जालावरील बातम्या वाचताना भंपक विधानांशी संबंधीत बातम्या वाचणेही सोडून दिले. आजकाल मी फावला वेळ घालवण्यासाठी हिस्ट्री किंवा नॅशनल जिओग्राफिक वाहिन्यांचे जालावर उपलब्ध असलेले कार्यक्रम पाहतो.
13 Jan 2013 - 11:25 pm | अर्धवटराव
किंबहुना मुद्दाम उटपटांग तर्क लावणार्यांची फिरकी घेण्यात मिपा ला मजा येते.
विकासरावांनी प्रसारमाध्य्मांच्या विश्वासाहर्तेवर जे बोट ठेवलय त्याच्या नेमक्या कारणाचं उदाहरण म्हणाजे मटा ची हि बातमी. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात पाश्चात्य जीवलशैलीच्या अंधानुकरणावर बोट ठेवलं. अनेक मुद्दे आले. भारतीय जीवनशैलीचे भलेबुरे पैलु ही त्यात आले. अत्यंत विकृत पद्धतीने सामुहीक बलात्कार करुन व्हीक्टीमला ठार मारण्याचा प्रयत्न करणारी मानसीकता कशी व का फोफावतेय याचा उहापोह झाला. त्याच भाषणातले दोन वेगवेगळे वाक्य कॉईन करुन मटा ने हि बातमी छापली. ग्रामीण भारतात काय काय गुन्हे होतात याचं निरीक्षण सरसंघचालकांना मटावाल्यांपेक्षा निश्चित जास्त आहे.
ति मुलगी अत्यंत दु:खदायक प्रसंगातुन गेली... शेवटी तिने प्राणही गमवले. एव्हढ्या सेन्सेटीव्ह मुद्याला संघाच्या बदनामीकरता वापरण्याची मानसीकता किती खालच्या पातळीवरची म्हणायची... आणि वरुन आपले उफराटे वांझोटे तर्क चालवणारे आंतरजालीय विद्वान. मरणार्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे तर ऐकले होते.. पण मेंदुसुद्धा खाणारे बघुन किळस वाटायला लागली आता.
अर्धवटराव
14 Jan 2013 - 12:00 am | कवितानागेश
ही बातमी खरी आहे का?
कशावरुन?
14 Jan 2013 - 1:08 am | सुचेल तसं
हे तुम्ही म्हणावं? आश्चर्य आहे.. वरती काहीही संबंध नसताना तुम्ही सरसंघचालक एका विशिष्ट जातीचेच झाले आहेत असं विधान केलं होतं. त्याचा आणि विकास ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा काय संबंध? निव्व्ळ रोगट प्रतिसाद वाटला मला तो.
माझी कमेंट ही विकास ह्यांनी जे सागरिका घोष ह्यांनी ट्विट केलं त्यावर होती. त्यावर तुमचं म्हणणं काय?
13 Jan 2013 - 11:48 pm | श्रावण मोडक
'शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावारुपाला आणली होती' यासंदर्भाने? मला नाही वाटत. सरसंघचालक मोहन भागवतांनी ती टिप्पणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच भारतीय संस्कृती (संघप्रणीत) विरुद्ध इंडिया संस्कृती (संघाला वाटते ती) याविषयी केली आहे. शरद जोशींच्या इंडिया विरुद्ध भारत या मांडणीचे संदर्भ सांस्कृतिक कमी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विकासविषयीची भूमिका यासंदर्भात अधिक आहे. तेव्हा, येथे तुम्ही केलेली मांडणी दिशाभूल करणारी ठरते. ती तशी नसेल तर भागवतांच्या बोलण्यामागील भारत विरुद्ध इंडियाचा संदर्भ पूर्ण द्यावा लागेल किंवा मग तो आहे तेवढाच शाब्दीक ठेवून बाकी मांडणी करावी लागेल. ती तेवढीच केली तरी, माध्यमांची चूक ही चूकच राहते, हे निश्चित.
मी काही सरसंघचालकांचे यूट्यूबवर "असणारे" भाषण ऐकलेले नाही. त्यामुळे ते काय म्हणाले याविषयी मी बोलणार नाही. पण, तुम्ही म्हणता तसे ते बोलले असतील आणि माध्यमांनी त्याचे भलतेच संदर्भ लावत बातम्या दिल्या असतील तर ती चूकच आहे. गंभीर चूक आहे. त्याबद्दल ट्विटरवर वगैरे माफी मागण्यात अर्थ नाही, तर ती माफी त्याच माध्यमात मागितली पाहिजे. माफी मागून प्रश्न सुटत नाही, तर असे का घडते आहे याचा विचारही माध्यमांना करावा लागेलच. अर्थात, ही एक अपेक्षा आहे आणि अपेक्षाभंगाची तयारी ठेवूनच ती व्यक्त करतो आहे.
येथे मोहन भागवतांनी भारतीय तत्वज्ञान वगैरेचा उहापोह केला आहे, असे तुम्ही म्हटले आहे. सिल्चरमधल्या इंडिया विरुद्ध भारत यालाही तोच संदर्भ असावा. त्यापलीकडे सरसंघचालक अर्थ-राज्य-विकास अशा संदर्भात भारत-इंडिया असे द्वैत करतील असे वाटत नाही. किंबहुना, तशा मांडणीची क्षमता त्यांच्यात दिसलेली नाही. ते संघटक आहेत. संघटकच राहतील, असे आत्तापर्यंतचे चित्र सांगते.
14 Jan 2013 - 12:55 am | विकास
सहमतच. आणि तसे मी म्हणलेले देखील नाही. म्हणूनच असे म्हणले की, "भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अॅटीट्यूड सांगायची पद्धत ..."
त्यापुढे मी जे, "त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता...." जे म्हणले आहे, त्यातील कदाचीत "त्यांचा" जे म्हणले त्यामुळे गैरसमज झाला का? कारण मी "त्यांचा" हे मी मोहनजींना उद्देशून म्हणले होते शरद जोशींना उद्देशून नाही. म्हणूनच "अर्थातच सांस्कृतिक होता" असे म्हणले.
मी माध्यमांची ती म्हणजे आसाममधील बातमी देण्यात चूक झाली आहे असे म्हणले नव्हते. त्या बातमी संदर्भातील माध्यमांचे (आणि संघाचे) विश्लेषण एखाद्याला पटेल अथवा न पटेल हा वेगळा मुद्दा आहे. म्हणूनच मी त्यात पुढे, "विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते." असे म्हणले होते.
तो भाग मी केवळ सध्या चालू असलेल्या घटनाक्रमातला म्हणून दिला होता आणि म्हणून पुढे मी म्हणले होते की , "त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. " आणि नंतरचा वृत्तांत दिला...
धन्यवाद. हे मी म्हणायचा प्रश्न नव्हता. किंबहूना म्हणूनच सागरीका घोष / पिअर फिटर/ चेतन भगत सारख्यांना माफी मागावी लागली. किंबहूना त्यांनी म्हणजे माध्यमप्रतिनिधींनी तो प्रामाणिकपणा दाखवला. पण माध्यमांनी मात्र दाखवला नाही. (खेदाने म्हणावेसे वाटते की निखिल वागळ्यांना मात्र अशी आचारसंहीता अगदी ट्विटरवर देखील पाळाविशी वाटली नाही.)
असो. खुलासा मागितल्याबद्दल धन्यवाद. मूळ लेख/चर्चा ही माध्यमांच्या अप्रामाणिकपणाबद्दल होती. मात्र ज्यांना केव्ळ संघाबद्दल अभ्यास न करता बरळायचे होते त्यांनी त्यात अतिअवांतर केले. अर्थात त्यात काही आश्चर्य वाटले नाही...
14 Jan 2013 - 9:34 am | पिंपातला उंदीर
संघ संचालकाचा मुद्दा मांडण्यमागे संघाचे वैचारिक व्यासपीठ किती संकुचित आहे हे सांगण्याचा उद्देश होता. ही कूटल्याही एका जातीवर टीका नाही तर एका संघटणेवर केलेली टीका होती. आणि एकूण चर्चा पुढे जाण्यासाठी संघटनेचे गुण-दोष पण चर्चीले गेले पाहिजेत. असो तुम्ही या मुद्द्याचा प्रतिवाद करू शकला नाहीत. किंवा तुम्ही आणि इतर अनेक म्हणता त्याप्रमाणे जात मानत नसल्याने संघाचा हा angel तुमच्या लक्षात आला नसावा. असो. पण महाराष्ट्र टाइम्स दिलेली आकडेवारी भागवत यांच्या विधानाला सरसकट खोडून काढते . भागवत यांच्या विधानाला पुष्टी देणारी आकडेवारी आपण देऊ शकता का ? जर नाही तर भागवत यांचे विधान चुकीचे आहे याची कबूली द्याल का? जाणता अजाणाता कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
14 Jan 2013 - 10:34 am | चेतन
परत एकदा
"आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी" आणि "माकड म्हणतं माझीच लाल" या म्हणिंची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
हा लेख खोटि बातमी देणे आणि ते पुढे आल्यावर माफी मागणे यावर आहे
त्यावर तुमचे
भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा.
असले वांझोटे प्रतिसाद वाचुन थोडा टाईमपास झाल्याबद्दल धन्यवाद.
असो तुमच्यासाठी अजुन काही खाद्य
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17896786.cms
याबद्दल विकास आणि श्रामोंनी लिहले आहेच पण अर्धवट माहिती नको म्हणुन लेखातले सर्वेक्षण कशाचे आहे ते नक्की वाचा (कोर्टाने दोषी ठरवलेल्यांची)
14 Jan 2013 - 10:35 am | मृत्युन्जय
तुमच्या कुठल्या मुद्द्याला कोण उत्तर देउ शकलेले नाही हे कळेल काय? अतिशय हास्यास्पद, तर्कशून्य आणि निराधार विधाने करुन तुम्ही स्वतःचेच हसे करुन घेतले आहेत. त्यावर बर्याच जणांनी तुम्हाला सयुक्तिक पुरावे दिले. त्याकडे लक्ष न देता तुम्ही उत्तरे मिळाले नाही म्हणत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. शिवाय जशी उत्तरे मिळत गेली तसे तुम्ही तुमचे आरोप बदलत गेताल. म्हणजे तुमचे आधीचे सगळे आरोप चुकीचेच्च होते हे तर सिद्धच झाले.
14 Jan 2013 - 10:47 am | यशोधरा
सगळे जण एका आयडीचे "गैरसमज" दूर करायच्या पंदात का पडत आहेत. सदर आयडी मुद्दाम खोडसाळपणा करत आहे हे दिसून येत आहे, तेह्वा सरळ दुर्लक्ष करणे हे उत्तम.
14 Jan 2013 - 11:05 am | विकास
चर्चेचा मुद्दा हा माध्यमांचे अप्रामाणिक वर्तन या संदर्भात होता आणि त्याबद्दल अजुनही पार्टी क्रॅशरसारखे संघावर वाटेल ते बरळणार्यांनी उत्तर दिलेले नाही. अर्थात त्यात नवल नाही. हा लेख संघाच्या प्रचाराकरता नव्हता. किंबहूना कुणाला कोणची विचारसरणी आवडावी आणि नावडावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खोटे-नाटे लिहीणे हे अनैतिक आहे आणि तेच येथे काहीजणांकडून परत परत दिसून आले.
वर सारखा म.टा. मधे आलेल्या मुळच्या टाईम्समधील बातमीवरून दुवा देत, (पुलंच्या भाषेतल्या) टॉवेल मिळालेल्या आर्कीमिडीझचा आनंद गगनात मावत नसल्याप्रमाणे, युरेका युरेका म्हणून ओरडले गेले. वास्तवीक तो विदा आणि मोहनजींचे मुळचे संपूर्ण वक्तव्य यात काडीचाही संबंध नाही. त्याबद्दल मी येथे लिहू इच्छित नाही. जर कुणाला त्यावर चर्चा करायची हौसच असेल तर त्यांनी नविन धागा चालू करावा आणि त्यात संपूर्ण वक्तव्याचे वाचून विश्लेषण करावे, मग चर्चा करायची का ते बघेन.
तो पर्यंत मटा/टाईम्स मधे ज्याचा संदर्भ देत लिहीले गेले आहे त्या म्रिणाल सतिशच्या संशोधनाबाबतः त्याला ट्विटरवर कोणी एका sunetra choudhury ने विचारले की, Oh. how is it that people were already quoting from it? did you write a newspaper article? त्यावर म्रिणाल सतिश यांनी उत्तर दिले आहे की, "It's a part of my doctoral dissertation at Yale on rape sentencing. Not published yet. Will publish once I receive degree. "
म्हणजे थोडक्यात ज्या संशोधकाच्या नावाने हे पेपरवाल्यांनी छापले आहे, त्याने ते अजून अधिकृतपणे छापले देखील नाही. त्यावर त्याला पिएचडी देताना ते संशोधन कसे केले गेले याचा उहापोह होऊन पिएचडी दिली जाईल, मग तो विदा सर्वांना अधिकृतपणे बघता येईल आणि मग त्यातले बरोबर काय आणि चूक काय हे ठरवता येईल. पण जी प्रसारमाध्यमे एकदा नाकावर पडली त्यांना मात्र वाट्टेल ते करून मोहनजींना आणि संघाला चूक ठरवायची घाई झालेली आहे म्हणून आधीच लिहून टाकले झाले. बाकी त्यात देखील निकाल लागलेल्या केसेस वगैरे मुद्दे आहेतच पण माझ्या दृष्टीने विश्वासार्ह नसलेल्या माध्यमांनी एका अनपब्लीश्ड रिसर्चचा त्यांना वाटेल तसा केलेला गैरउपयोग या व्यतिरीक्त त्या बातमीला अधिक महत्व नाही.
14 Jan 2013 - 3:13 pm | मालोजीराव
बलात्काराचे प्रमाण लाखामागे मोजल्यास दिल्ली ४.५,मुंबई ३.७ तर पुणे २ च्या आसपास आहे.हीच आकडेवारी शिकलेल्या आणि कायदा आपल्या तुलनेत ठीकठाक असलेल्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मध्ये २३ तर लॉस एंजलीस मध्ये तब्बल २७.५० आहे.अमेरिकेत २७ , ब्रिटन मध्ये २३ आणि भारत (इंडिया) मध्ये १.८ आहे .
तथाकथिक बलात्काराची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये ४.५ तर पुणे २.१ ,मुंबई ३.५असे प्रमाण आहे.भारत आणि इंडिया हि तुलना चुकीची वाटली, ग्रामीण भागात हे प्रमाण आकडेवारी नुसार जास्त आहे आणि तरीसुद्धा ग्रामीण भागातील ८५-९०% गुन्हे पोलिसात नोंदविले जात नाहीत.
आकडेवारी : ऍड.असीम सरोदे आणि UNODC (United Nations Office on Drugs and Crime)
15 Jan 2013 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का ?
हो. पण कोणा एका विषयासंदर्भात 'हो' म्हणत नाही.
सर्वसामान्य कोणत्याही विषयांवर माध्यमांचा अप्रामाणिकपणा दिसतो.
-दिलीप बिरुटे
16 Jan 2013 - 11:30 am | चेतन
बिरुटे सर तुम्ही पुरोगामी आहात का? असलात तर तुमची मते(निष्पक्ष)नाहितर तुम्ही ईंटरनेट हिंदू
अवांतरः संस्कार ही काही पुरोगामी विचारजंताची मक्तेदारी नव्हे ही सही डकवावी म्हणतो
20 Jan 2013 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> बिरुटे सर तुम्ही पुरोगामी आहात का ?
च्यायला, हे पुरोगामीपणा काय असतो ते मला माहिती नाही. पण, माझी बांधिलकी आधुनिक विचारांशी आहे.
>>> नाहितर तुम्ही ईंटरनेट हिंदू
इंटरनेट हिंदु काय आहे, हे मला अजून नीट समजलेले नाही.
कळलं तर लिहिन म्हणतो. बाकी, विचारजंत वगैरे असं हिणवणे
बरं नाही.
-दिलीप बिरुटे
20 Jan 2013 - 6:20 pm | चेतन
>> पुरोगामी सदस्य येथे बरेच वावरतात असे कळले
सहमत नसाल तर इंटरनेट हिंदु म्हणुन हीणवलेले चालते आणि जंत झाल्यासारखे विचार प्रसवणार्यांना विचारजंत म्हणलं तर बर नाही. ;-)
एक तर चर्चाप्रस्तावाशी संबधीत मते द्यायची नाहित आणि बर्याचवेळा इतरांनी समजावलं तरी वागळेसारख किंवा घोष बाईंसारख आपलाच हेका चालु ठेवायचा मग इथे चालत नाही म्हणुन मग तिथे धागा काढायचा की झाले पुरोगामी.
>> हो. पण कोणा एका विषयासंदर्भात 'हो' म्हणत नाही.
सर्वसामान्य कोणत्याही विषयांवर माध्यमांचा अप्रामाणिकपणा दिसतो.
तुम्ही संदिग्ध "हो" म्हणलात असुदे पण हो तरि म्हणलात पण स्वतःला संस्कारी पुरोगामी म्हणणार्यांकडुन तेव्हढा "हो" पण धाग्यावर आला नाही, आल्या त्या फक्त वांझोट्या प्रतिक्रिया.
असो...
संघ दक्ष पोरींकडे लक्ष असे एकेकाळि मजेत हिणवणारा इंटरनेट हिंदु (चेतन)
16 Jan 2013 - 6:39 pm | नाना चेंगट
एकंदर चर्चा विषयाला सोडून असलेली अवांतर चर्चा वाचून मौज वाटली. पूर्वग्रहपिडीत सहेतुक केलेले विनाकारण गरळ्बरळ अपेक्षित होते ती अपेक्षा पूर्ण झाली. मनोरंजन मस्त झाले. अधून मधून असे धागे आणि चर्चा झाल्या बरे वाटते.
सध्या मिडीयाकडे आम्ही मनोरंजन म्हणूनच पहातो.
19 Jan 2013 - 5:36 pm | विटेकर
तुमच्या चहा-पोह्यांचे पैसे किती झाले ते एकदा सांगा हो ! हे चहा- पोहे तुमच्या प्रतिसादात पूर्वीही डोकावले आहेत .. एकदाचे ते पैसे देऊन टाकू.. शक्य झाल्यास त्या अपराधाबद्दल स्वयंसेवकांना क्षमा करा. ( वास्तविक भारतातील माणसे आपल्याकडे आलेल्या आतिथींचे खाणे-पिणें असे जाहीररित्या काढत नाहीत कदाचित "इंडियातील" काढत असावेत आणि विक्षिप्त च म्हंट्ल्यावर सारे काही माफच !) आणि तुमची जी सकाळी सकाळी झोपमोड होऊन वेळ वाया गेला त्याबद्दल जाहीर माफी !
पण एक गोष्ट लक्षात येत नाही .. आपल्या तिर्थरुपांना आणि मातोश्रींना ही मंड्ळी वारंवार त्रास देतात हे या झाशीच्या राणीला ( सोरी , आमच्या भारतातील उपमा आहे ! ) पहिल्याच वेळी का लक्षात आले नाही ??? आले असेल तर पहिल्याच वेळी प्रतिवाद का केला नाही? प्रतिवाद केल्यावरही ती पुनःपुन्हा आले असतील तर पोलिसात तक्रार का केली नाही ?
- (विक्षप्त नसलेला )विटेकर
20 Jan 2013 - 8:57 am | पिंपातला उंदीर
या अप्रामानिक माध्यमांची खोड मोड्न्याचि ही शक्कल मात्र भारी
http://www.patrakarmitra.com/2013/01/blog-post_1641.html
20 Jan 2013 - 12:46 pm | श्रीगुरुजी
सरसंघचालक श्री. मोहन भागवत जी वाक्ये बोललेच नाहीत ती वाक्ये ते बोलले आहेत असा कांगावा करून त्यांना विनाकारण झोडपून काढणार्या हेमंत देसाईंना धमक्यांचे फोन आले आहेत यावर कोण विश्वास ठेवणार आहे? त्यांनी मागच्या रविवार सकाळमध्ये सरसंघचालकांना झोडपून काढणारा लेख लिहिताना आपली संघद्वेषी मळमळ व्यक्त केली होती. त्याच्या लगेच दुसर्या दिवशी सोमवारी एका व्यक्तीने (नाव विसरलो) हेमंत देसाईंचे दावे पूर्णपणे खोडून काढणारा एक सविस्तर लेख लिहिला होता. त्या लेखाला उत्तर देण्याऐवजी, 'मला धमक्यांचे फोन आले', असा कांगावा देसाईंनी सुरू केलेला दिसतोय. तसे फोन खरंच आले असतील, तर देसाई पोलिसांकडे जायच्या ऐवजी प्रसिद्धीमाध्यमांकडे का गेले? असे फोन आले त्याला पुरावा काय? त्यांच्या लेखाचे पितळ उघडे पाडल्यावर ते का गप्प आहेत आणि त्या लेखाचा प्रतिवाद करण्याऐवजी 'मला धमक्या येत आहेत' असा सवंग कांगावा का करत आहेत?
21 Jan 2013 - 9:41 am | पिंपातला उंदीर
गुरुजी आपण लिंक पुन्हा वाचली तर आपल्या लक्षात येईल की हेमंत देसाई यानी पोलिसांकडे तक्रार नोदवलि आहे. आणि सरसंघ संचालकांवर झालेली टीका कशी अयोग्य आणि चुकीची आहे हे दाखवून देण्यापेक्षा धमक्या देणे हे चुक नाही आहे का? संघाच्या लोकाणी धमक्या दिल्या असतील तर आपली भूमिका त्याचा निषेध करण्याचीच असेल ही अपेक्षा.
21 Jan 2013 - 2:27 pm | श्रीगुरुजी
"आणि सरसंघ संचालकांवर झालेली टीका कशी अयोग्य आणि चुकीची आहे हे दाखवून देण्यापेक्षा धमक्या देणे हे चुक नाही आहे का? संघाच्या लोकाणी धमक्या दिल्या असतील तर आपली भूमिका त्याचा निषेध करण्याचीच असेल ही अपेक्षा."
सरसंघ संचालकांवर झालेली टीका कशी अयोग्य आणि चुकीची आहे हे अनेकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. माध्यमातील काही जणांनी त्याबद्दल माफीही मागितली आहे. पण हेमंत देसाईंनी अजून स्वतःची चूक कबूल केलेली नाही. उलट "मला धमक्या आल्या" असा उलटाच कांगावा ते करत आहेत. कशावरून हेमंत देसाईंना धमक्या मिळाल्या? आणि आल्या असतील तर कशावरून त्या धमक्या संघाच्या लोकांनी दिल्या? ज्या व्यक्तीने सरसंघचालकांबद्दल खोटंनाटं लिहिलेलं आहे ती व्यक्ती आपला खोटेपणा उघडकीला आल्यावर त्याबद्दल जराही दिलगिरी व्यक्त न करता उलट "मला धमक्या आल्या" असे सांगते, अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा?
संघाच्या लोकांनी धमक्या दिल्या असतील तर माझी भूमिका त्याचा निषेध करण्याचीच असेल. यापूर्वी गेली अनेक वर्षे संघावर अनेकांनी टीका केलेली आहे. त्यामुळे हेमंत देसाईंनी असे लेख लिहिणे यात काहीच नवीन नाही. पण संघ बहुतेकवेळा आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देत नाही व आजवर संघाच्या लोकांनी धमक्या दिल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हेमंत देसाई जे सांगतात त्यावर मुळीच विश्वास बसत नाही. हेमंत देसाईंचा लेख ज्या खोट्या वाक्यांवर आधारित होता तितकाच खोटेपणा त्यांच्या धमक्यांच्या दाव्यात असणार हे नक्की.
21 Jan 2013 - 10:19 pm | आजानुकर्ण
सदर चर्चेस 149 प्रतिसाद आले आहेत. सर्वच प्रतिसाद हे संघावर टीका करणारे आहेत व संघाने प्रत्यक्ष किंवा संघप्रेमींच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलेले नाही असे समजायचे काय? बाय द वे गृहमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर काही तासातच प्रत्युत्तर देऊन संघाने माफीची मागणी केली आहे. त्यामुळे संघ प्रत्युत्तर देत नाही किंवा थोडक्यात संघ स्थितप्रज्ञ आहे हा आपला दावा चुकीचा आहे. http://www.indianexpress.com/news/shinde-sees-terror-in-bjp-rss-camps-sa...
22 Jan 2013 - 2:48 pm | श्री गावसेना प्रमुख
इथे स्वयंसेवक आहेत,आणी त्यांनी संघाच्यावतीन स्पष्टीकरण द्याव असे तुम्हाला म्हणायचे आहे काय
21 Jan 2013 - 9:49 am | विटेकर
सकाळ मध्ये त्या लेखावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात.
सकाळ मध्ये छापून आलेली प्रतिक्रिया डॉ.श्रीरंग गोडबोले यान्ची होती.
तो मूळ लेख देतो आहे.
खोटं न लिहिण्याचं काय घ्याल ?
'सकाळ' सारख्या वृत्तपत्रांतून आणि दूरदर्शनच्या अनेक वृत्तवाहिन्यांवर हेमंत देसाई 'तज्ञ' म्हणून नेमाने रतीब घालत असतात. त्यामुळे असेल कदाचित पण आपण सर्वज्ञ आहोत असा त्यांचा भ्रम झालेला दिसतो. 'इन्स्टण्ट पांडित्या'च्या या जमान्यात माहितीची शहानिशा करून घेण्याची त्यांना गरज वाटत नसावी. अन्यथा 'न बोलायचं काय घ्याल?' या आपल्या लेखात त्यांनी
सरसंघचालक श्री.मोहनजी भागवत यांच्याविषयी मुक्ताफळे उधळली नसती. अकबरुद्दीन ओवैसी, गोपाल कांडा, अनीस उर-रहमान यांच्या पंक्तीत त्यांनी सरसंघचालकांना बसवून ठेवले आहे. मजकुराची लांबी -रुंदी आणि त्यांतील विखार लक्षात घेता सरसंघचालक हेच त्यांचे मुख्य लक्ष्य आहेत हे सहज लक्षात येते. लेखासोबत सगळ्यांचे सोडून सरसंघचालकांचेच छायाचित्र शीर्षभागी देण्यामागे 'सकाळ' ची भूमिकाही संदेहास्पद आहे असे खेदाने म्हणावे लागते. देसाईंचा लेख हा 'सकाळ'च्या परंपरेला काळीमा फासणारा आहे.
सरसंघचालकांच्या दोन विधानांवर प्रसारमाध्यमांनी धुरळा उठवला त्यानंतर सरसंघचालकांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आल्याचे आणि त्याबाबतची वस्तुस्थिती मांडणारे निवेदन संघाकडून प्रसिद्ध करण्यात आले. सरसंघचालकांचे मूळ भाषण कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे याची माहितीही देण्यात आली. सरसंघचालकांबाबत धादांत खोटा प्रचार करणार्या.
प्रसारमाध्यमांनी या खुलाश्याला प्रसिद्धी दिली नाही. त्यामुळे हा दुष्प्रचार जाणीवपूर्वक करण्यात येतोय असा निष्कर्ष काढणे क्रमप्राप्त आहे. सरसंघचालकांचे भाषण कुठे उपलब्ध आहे या आशयाचे पत्र 'सकाळ' ने प्रसिद्ध केले. असे असताना हा खोटेपणा उगाळत बसण्यात देसाई आणि 'सकाळ' यांना काय स्वारस्य आहे? वारंवार खोटे बोलत राहिले की ते खरे वाटू लागते या गोबेल्सच्या तंत्रावर देसाईंचा दांडगा विश्वास असावा. त्यांनी सुतावरून नव्हे तर सुतावाचून 'सेक्युलर' स्वर्ग गाठला आहे. हे करत असताना त्यांनी जबाबदार पत्रकारितेच्या संकेतांचा भंग केला आहेच पण सरसंघचालकांबाबत अपशब्द वापरून हीन पातळीही गाठली आहे.
"बलात्कार 'इंडिया'त होतात, 'भारता'त नव्हे" हे सरसंघचालकांचे विधान घेऊन स्त्रियांवरील अत्याचार सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण नव्हे तर शहरी भागांत होतात असा त्याचा सोयीस्कर अर्थ देसाईंनी घेतला आहे. पण सरसंघचालक नेमके काय म्हणाले? सिल्चर (आसाम) येथे प्रबुद्ध नागरिकांशी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात सरसंघचालकांना महिलांवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'इंडिया' मध्ये जे घडतंय ते धोकादायक आणि अश्लाघ्य आहे असे सरसंघचालक म्हणाले. परंतु, हे सर्व 'इंडिया'त होतंय, 'भारता'त नव्हे अशी त्यांनी पुस्ती जोडली. तथापि शहरी-ग्रामीण असा भेद त्यांच्या मनात नव्हता हे त्यांच्या नंतरच्या वाक्यांवरून पुरेसे स्पष्ट होते. जेथे भारताशी नाते तुटले आहे तेथे हे घडते असे ते म्हणाले. आपण मानवता विसरलो, संस्कार विसरलो. या गोष्टी पुस्तकांतून नव्हे तर परंपरेतून येतात, कुटुंबातील शिकवणुकीतून येतात हे त्यांनी स्पष्ट केले.
परंतु, सरसंघचालक न बोललेले वाक्य बेधडक त्यांचे म्हणून खपवण्याचा उपद्व्याप करून देसाई यांनी कहर केला आहे. नवरा-बायको यांच्या संबंधांबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्ये पूर्णपणे खोट्या प्रकारे प्रस्तुत करण्यात आली. इंदोर येथे परमानंद योग थेरपी इस्पितळाच्या उद्घाटन समारंभात सरसंघचालक बोलत होते. साहजिकच त्यांचे भाषण अध्यात्मिक विचार मांडणारे होते. त्यांच्या भाषणाच्या संबंधित भागाचा सारांश पुढील प्रमाणे– “गेल्या ३०० वर्षात मनुष्य आपल्याच अहंकारात गुरफटून विचार करू लागला आहे. जे मी म्हणतो तेच सत्य. त्याचा अहंकार एवढा वाढला आहे की, परमेश्वर असेल तर त्याला माझ्या टेस्ट ट्यूब मध्ये सिद्ध करून दाखवावे लागेल, असे म्हणू लागला.
अशात, तो विचार करू लागला की हे विश्व काय आहे? आत्मा परमात्मा या बेकार गोष्टी आहेत. सर्व काही जडाचा खेळ आहे… या सृष्टीत कोणाचा कोणाशी संबंध नाही. लाखो वर्षांपासून चालणारे हे जग संबंधांवर नाही तर स्वार्थावर चालते आहे. तो एक सौदा आहे. पत्नीशी पतीचा सौदा झाला आहे .तुम्ही त्याला (आपल्या येथे) विवाह संस्कार म्हणत असाल, परंतु तो (पाश्चात्यांसाठी) सौदा आहे. तू माझे घर सांभाळ, मला सुख दे, मी तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करतो आणि तुला सुरक्षित ठेवतो. जोपर्यंत पत्नी ठीक आहे तोपर्यंत पती करार रूपाने तिला ठेवतो. जर तिने करार पूर्ण केला नाही तर तिला सोडून देतो. काही कारणाने जर पतीने करार पूर्ण केला नाही तर त्याला सोडा व दुसरा करार शोधणारा शोधा". हा सगळा पाश्चात्य दृष्टीकोन सरसंघचालक मांडत होते आणि त्याचा फोलपणा सांगत होते. परंतु, ज्या विचाराचा ते धिक्कार करत होते ते विचार त्यांचेच आहेत असा खोटा प्रचार सुरू झाला. त्यानंतर ते काय बोलले त्याचे प्रसारमाध्यमांना सोयरसुतक नव्हतेच! त्यांच्या भाषणातील पुढील भाग असा, " या बाबतीत भारतीय विचार काय म्हणतात. ते म्हणतात, जग हे संबंधांवर आधारित आहे. वेगवेगळे दिसत असले तरी सगळे एक आहेत. असे म्हणा की एकच अनेक रुपात प्रकट झाला आहे. त्या दृष्टीने सगळे एकमेकांपासून वेगळे आहेत. विश्वात कुठेही घडणारी अर्थहीन घटनाही साऱ्या विश्वाच्या व्यापारावर काही ना काही परिणाम करत असते. चांगल्या गोष्टी घडल्या तर चांगले परिणाम होतील. अन्यथा नाही. कोणाचा विनाश होत असेल तर तो तुमचाही विनाश आहे. तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात. तुम्ही मनुष्य आहात कोणी सृष्टीच्या बाहेरील नाही. " अध्यात्माधारित भारतीय विचार जोडणारा आहे हे त्यांचे प्रतिपादनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
'इलेक्ट्रोनिक मीडिया' मुळे काही राजकारणी मंडळींना चळ लागला आहे असे देसाई म्हणतात. ते काहीही असले तरी ‘मिडीया’ ला आलेल्या अवास्तव महत्त्वामुळे देसाई यांच्यासारख्या पत्रपंडितांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत हे निश्चित.
'सकाळ' ने हा खुलासा छापावा ही विनंती. आमच्या भावना दुखावल्या म्हणून नव्हे तर खोटा मजकूर प्रसृत केला म्हणून.
डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले